आगं मैना गं मैना गं,जरा चष्मा तुझा मला दे ना,
माझा बाटलीतं बानच जाइ ना...!॥धृ॥
दमुन थकुन टाइट मी झालो,
फटाकडी उडवाया गच्चीवर आलो,
पन अंधारात नेमच लागं ना...!
बानाची काटकी हाय लय म्होटी,
त्येच्या मापानं बाटली छोटी,
आन् हातानं अंदाजचं यै ना...!
डोळ्यावर झापड वयानं आली,
हात नाय जात अता बाटलीच्या खाली,
अता तुच मला आधार दे ना...!
ये ना मैना माजी साथं कराया,
बानाची वात जरा नीट खुडाया,
तुज्या नजरंचा ख्येळच है ना...?
नंतर माजा बानं जोरातं उडल,
पिरतीच्या गगनाला खोलवर भिडल,
ह्यो हातगुन तुजाचं हाय ना...!
होउं दे झोकात दिवाळी आपली,
माजं ह्ये कडबोळं तुजी ती चकली,
ह्यो लग्नाचा फराळंचं है ना...!
प्रतिक्रिया
25 Oct 2011 - 10:14 pm | प्रचेतस
_/\__/\__/\_
भटजीबुवा. एक नंबर.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. असेच बाण उडवून फराळ करत रहा.
26 Oct 2011 - 9:22 am | प्रकाश१११
डोळ्यावर झापड वयानं आली,
हात नाय जात अता बाटलीच्या खाली,
अता तुच मला आधार दे ना...!
छान लिहिलीस .मस्त ..!!
27 Oct 2011 - 12:03 am | अत्रुप्त आत्मा
वल्ली आणी प्रकाशराव दोघांसही धन्यवाद... :-)
27 Oct 2011 - 10:58 am | लीलाधर
रामबाण दीवाळीचा बाण लागलाय............... एकदम झकास..............
27 Oct 2011 - 1:54 pm | मोहनराव
शेवट मस्त!!
होउं दे झोकात दिवाळी आपली,
माजं ह्ये कडबोळं तुजी ती चकली,
ह्यो लग्नाचा फराळंचं है ना...!
8 Sep 2013 - 1:32 pm | बॅटमॅन
दिवाळीचा बाण हा खास गणपतीच्या वेळेसच बाहेर काढत आहे. या अमोघ अस्त्राकडे मिपाकरांचे आजवर अक्षम्य दुर्लक्ष झालेय.... ही अनास्था चोलबे ना!!!!
8 Sep 2013 - 1:36 pm | प्रचेतस
=)) =)) =))
अगदी अगदी.
इतकी प्रत्ययकारी कविता आजवर इतकी दुर्लक्षित कशी राहिली होती कुणास ठाऊक.
8 Sep 2013 - 1:46 pm | बॅटमॅन
नैतर काय. एकेक कडवे प्रत्ययकारी आहे. शब्दयोजना विलोभनीय, निरागस आणि अल्पाक्षररमणीय आहे. उदा.
जीवनातील अनिश्चिततेचा, मिसफिटपणाचा असा 'फॉक्कन' प्रत्यय क्वचितच अजून कुठे आला असेल.
8 Sep 2013 - 9:47 pm | अभ्या..
अयायायायायायाया
बॅट्या कुठे सापडलं रे खोकं? माळ्यावर टाकून दिले होते की काय?
असला जबरा दारुगोळा बुवांनी लपवून ठेवला होता की काय?
बुवा तुमच्या फायरवर्क्स ला सोलापूरच्या आतिषबाजी स्पर्धेत सहभागी व्हायची इनंती करीत आहोत. पहिले बक्षीस तुमचेच. :)
9 Sep 2013 - 12:18 am | बॅटमॅन
इतिहाससंशोधनाचा असाही फायदा होतो कधीकधी ;)
बाकी बुवांच्या फायरवर्क्स बद्दल आम्ही पामरे काय बोलावे. असला झबरदस्त दारुगोळा अजून नाय कुठं गावायचा.
8 Sep 2013 - 1:42 pm | पाषाणभेद
झकास हो गुर्जी. दिवाळीचे वेध फार लवकर लागले.
8 Sep 2013 - 2:38 pm | लीलाधर
मठ्ठा अन् तुमची ही जीलबी एक णंबर कॉंबिणेशण हाये बरं का ....
बॅटा वल्ल्या आपलं अगोबा आणा ओ एक बाण बुवाला देउ आपण जीलबीचं वाण :))
8 Sep 2013 - 4:29 pm | अत्रुप्त आत्मा
बॅटा वल्ल्या आपलं अगोबा आणा ओ एक बाण बुवाला देउ आपण जीलबीचं वाण Lol>>> :D बघ... परत "शी" केलीस! =))
9 Sep 2013 - 12:53 am | किसन शिंदे
=)) =))
8 Sep 2013 - 2:51 pm | उद्दाम
बाण
8 Sep 2013 - 5:33 pm | चौकटराजा
दादा कोंडके यांचा सततच्या सिल्वर ज्युबिली चा विक्रम मोडणारी कविता. ह ह पु वा ... पुरती वात लागली ! पेताड कवीचा
बाण भरकटला पण बुवाचा बराबर बसला ! वाट नाही बुवा, वात लागली !!!!!!
8 Sep 2013 - 5:35 pm | चौकटराजा
बुवा , तो कवि दमून टाईट झालाय का ? सॉरी ! तेला पेताड बोल्लो !
8 Sep 2013 - 5:54 pm | अत्रुप्त आत्मा
@तो कवि दमून टाईट झालाय का?>>>प्रथम "तो कवि" ना...ह्ही! "कवितेतला माणूस"..असे म्हणा! :p
दमल्या'नी टाइट होत नाय का??? आपला हणुभव काय? :p
8 Sep 2013 - 7:57 pm | फुलपात्र
कारण प्रतिक्रीया कुठेही दिसत नाहीत......................
का तुम्हाला दिसत नाहीत?
तुमचाही गणेशा झाला की काय ?
गणेशाला फोटो दिसत नाहीत आणि तुम्हाला प्रतिक्रीया :))
8 Sep 2013 - 9:41 pm | अत्रुप्त आत्मा
हा प्रति साद कुणाला उद्देशून ? नक्की कुठे "द्यायचा" होता?
सांगाल काय?
8 Sep 2013 - 9:54 pm | अत्रुप्त आत्मा
फुलपात्र... तुमचा प्रतिसाद बहुतेक इथे- http://misalpav.com/comment/508580#comment-508580 - वांग्याच्या धाग्यावर पडायचा होता, पण एकावेळी दोन भाज्या करण्याच्या नादात,चुकून त्या पातेल्या(वर)चा "डाव" हिकडे पडलेला दिसतोय! =))
8 Sep 2013 - 11:15 pm | मोदक
असूदे हो बुवा.. "भांडे" बदलले. इतकेच! :-D
8 Sep 2013 - 11:43 pm | अत्रुप्त आत्मा
मोदू...मोदू... तुला मारिन अंडी बुदू बुदू!!! =))
9 Sep 2013 - 12:17 am | बॅटमॅन
=)) =)) =)) =))
10 Sep 2013 - 4:06 pm | मुक्त विहारि
त्रिवार दंडवत
11 Sep 2013 - 11:55 am | मालोजीराव
अंधारात बाण बाटलीत घालून उडवताना होणारी 'दमछाक' , ताक घुसळताना होणारी भांड्याची आन दांड्याची 'ओढताण' यांचे उत्स्फूर्त चित्रण आपल्या आशयघन कवितेद्वारे करणारे सामाजिक कवी 'ब्वासायेब घुसळे' यांचे पुनः अभिनंदन !
11 Sep 2013 - 1:04 pm | अत्रुप्त आत्मा
@यांचे पुनः अभिनंदन ! >>> विशेष काव्य रसास्स्वादक विषयो'त्प्रीय,मालो जी राव... =)) यांचे पुनः अभिनंदनाबद्दल... आमच्याकडूनंही पुनःपुन्हा हबिनंदण! :p
12 Sep 2013 - 12:16 am | प्यारे१
अत्युच्च.
काय ती, काय ती अलौकिक प्रतिभा.... आहाहा!
'प्रेमाचा बाण' कुणाच्या तरी वर्मी लागून बुवांची 'दिवाळी' लवकरात लवकर साजरी व्हावी ही गणराजाचरणी प्रार्थना!
24 Oct 2014 - 8:07 am | प्रचेतस
दिवाळीच्या निमित्ताने आत्मूगुर्जींचा हा दिवाळीचा बाण आठवला.
24 Oct 2014 - 9:21 am | अत्रुप्त आत्मा
=)) आंssssssss!!!! =))
दू दू हत्ती!!! :-D :P
24 Oct 2014 - 10:38 am | सूड
हे तर धनाजीराव नामक वाकडे कवीच्या सखू या कवितेहूनही वरताण काव्य आहे. ;)
25 Oct 2014 - 7:33 am | अत्रुप्त आत्मा
आपल्याला हे कळलं,यातच सारं(काही) आलं!
25 Oct 2014 - 8:38 am | माम्लेदारचा पन्खा
बुवा....शीडी काडा तुमी येखांदी.....आमी ऐकू ती....
पन ह्या कुठ्ल्या झाडानं धरलं वो तुमास्नी?
25 Oct 2014 - 10:01 am | खटपट्या
अगागागा !!
दादा कोण्ड्केंना तुम्हीच गाणी लीहुन द्यायचात काहो ?
दादा आज असते तर लाखभर तरी दीलेच असते या गाण्याचे !!
ह. घ्या.
25 Oct 2014 - 10:38 am | अत्रुप्त आत्मा
@दादा आज असते तर लाखभर तरी दीलेच असते या गाण्याचे !! >>> दादांनी दिले .. असं म्हणले असते ,तरी पोचले असते! :-D
25 Oct 2014 - 10:59 am | प्रचेतस
सुचतात तरी कशी हो अशी काव्य तुम्हाला?
26 Oct 2014 - 8:58 pm | सूड
+१
26 Oct 2014 - 9:59 pm | अत्रुप्त आत्मा
27 Oct 2014 - 4:24 pm | बॅटमॅन
+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
("आत्म"प्रतिभेने विस्मयचकित) बट्टमण्ण.
25 Oct 2014 - 10:08 am | जेपी
काय काव्य आहे.
काढल तेवढे अर्थ निघतील. *wink*
25 Oct 2014 - 10:26 am | सतिश गावडे
आहा... काय ते काव्य. अफाट!!!
रसग्रहणाची सुपारी द्यायची का?
10 Nov 2015 - 6:07 pm | प्रचेतस
दिवाळी आली की बुवाचा हा बाण अठवतोच.
10 Nov 2015 - 6:11 pm | सतिश गावडे
हे काव्य वर आणण्यासाठी धन्यवाद. पुनर्प्रत्ययाचा आनंद का काय म्हणतात तो झाला.
10 Nov 2015 - 6:32 pm | स्वामी संकेतानंद
अत्रुप्त कोंडके
=))
10 Nov 2015 - 7:40 pm | अत्रुप्त आत्मा
@अत्रुप्त कोंडके>>>
दुत्त दुत्त स्वामिज्जि!!! 
10 Nov 2015 - 6:49 pm | सूड
अत्युच्च काव्याचे पुनरेकवार रसग्रहण!
10 Nov 2015 - 6:54 pm | मोदक
वा बुवा..!!!! =))
10 Nov 2015 - 8:02 pm | टवाळ कार्टा
बाब्बौ....गुर्जींनी काय अफाट काव्ये रचली आहेत....वेदिओ बन्वा अता यावर ;)
10 Nov 2015 - 8:06 pm | सतिश गावडे
हे चुकून "वेदिवर चढवा" असे वाचले. ;)
10 Nov 2015 - 8:15 pm | टवाळ कार्टा
मग कै कुठचे बाण कुठे उडतील कै पत्ताच नै
10 Nov 2015 - 8:44 pm | अत्रुप्त आत्मा
बाळ टक्कु मक्कू शोनू चे स्वार्थक आत्म रंजन!!!
10 Nov 2015 - 9:02 pm | प्रचेतस
हे गाणे चाल लावून मिळेल काय?
13 Nov 2015 - 6:00 pm | अत्रुप्त आत्मा
10 Nov 2015 - 9:09 pm | खटासि खट
ब-याच दिवसांनी आल्याने चुकून लाईक करायला गेलो.
मस्त उडवलाय बार दिवाळीचा.
13 Nov 2015 - 11:23 am | पाषाणभेद
मस्त
13 Nov 2015 - 4:49 pm | सुमीत भातखंडे
.
13 Nov 2015 - 5:27 pm | मोगा
छान
6 Nov 2018 - 7:56 am | प्रचेतस
दरवर्षी दिवाळी आली की बुवांनी उडवलेला हा दिवाळीचा बाण आठवतो.
6 Nov 2018 - 10:22 am | नाखु
आणि कधीही एक्सपायरी डेट नसलेला दारुगोळा आहे.
वल्लीं चे आभार.
आत्मुदा लिखित साहित्य आस्वादक अखिल पिंपरी-चिंचवड गावठाण महासंघाचा सक्रिय सभासद नाखु वाचकांची पत्रेवाला
6 Nov 2018 - 10:55 am | चित्रगुप्त
शिरसाष्टांग दंडवत बुवा. एवढ्या पूर्वी उडवलेला सूचक शृंगारिक मदनबाण आज नजरेच्या टप्प्यात आला.