शाब्दिक फराळ

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
23 Oct 2011 - 10:22 am

यंदाच्या दिवाळीत आम्ही अनेक शब्द वेचून फक्कड फराळ पेश करण्याचे ठरवले होते. त्यायोगे प्रयत्न करून विविध विषयांना हाताशी धरले. रुचकर शब्दांची फोडणी देऊन कुरकुरीत चिवडा बनविला. मधाळ शब्दांच्या शर्करेत लाडू वळले. खमंग शब्दांनी युक्त पीठ घेऊन फर्मास अशा चकल्या तळल्या. मउसुत शब्दांच्या पदराखाली चविष्ट शब्दांचे सारण भरून करंज्या केल्या. गोडसर शब्दांचे अनारसे करून त्यावर वेचक शब्दांची खसखस भुरभूरली. एकसूरी शब्दांना घाण्यातून काढून रेखीव शेव तळली. असा हा शाब्दिक फराळ नुकताच आपणापुढे आम्ही ठेवला आहे. आवर्जून या फराळाचे ग्रहण करण्यासाठी हे स्नेहार्द्र निमंत्रण आहे. हा शाब्दिक फराळ कसा वाटला ते आपल्या मनमोकळ्या प्रतिक्रिया देऊन आवड-नावडतेची पावती आमच्या प्रति पोहोच करावी.....
१) फिरकी- ‘भार’नियमन.
श्री. विनोद कुलकर्णी. (पुणे)
२) पुरुष उवाच- ‘स्पर्श’- दी सेन्स ऑफ टच.
श्री. मुकुंद किर्दत व डॉ.गीताली वि.म. (पुणे)
३) माझी वहिनी- जाहिरातींचा भूलभुलय्या.
श्री. विश्वास पटवर्धन व सौ.विदुला पटवर्धन. (पुणे)
४) रंगतरंग- गोपाळमामा व तमाशा.
श्री. शरद पायगुडे. (पुणे)
५) हा हा हा- श्रवणेंद्रीयविजय.
साई सागर पब्लिकेशन (सातारा)
६) झुंज- रोशनचा रोहन.
श्री. अनिल वडघुले. (पुणे)
७) महाराष्ट्राची जत्रा- गुंडोबाचं स्विमिंग.
श्री. अशोक श्रीराम. (शिरपूर-धुळे)
८) चपराक- घोटाळ्यातच करियर.
श्री. घनश्याम पाटील. (पुणे)
९) धमालधमाका- झोप्याची झोप.
धमाका प्रकाशन. (अहमदनगर)
१०) रत्नभूमी- नाम्याची म्हातारी.
सौ. धनश्री पालांडे. (रत्नागिरी)
११) हास्यजत्रा- सदाचं स्वर्गगमन.
श्री. रवी शिरढोणे. (अकलूज)
१२) वार्तादूत- राजा(बाई)माणूस.
श्री. प्रशांत गांगुर्डे. (धरणगाव-जळगाव)
१३) स्वरगंगा- शंकानिरसन.
श्री. आर वाय जाबा. (औरंगाबाद)
१४) सहजीवन विशेषांक- सहजीवन तुझे आणि माझे.
श्री. रवी चौधरी. (पुणे)
१५) भन्नाट- कासवाचा प्रवास.
सौ. वर्षा ढवळीकर. (पुणे)

साहित्यिकमौजमजालेखविरंगुळा

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

23 Oct 2011 - 10:53 am | पाषाणभेद

डॉ. काय आहे हे? काही लिंक बिंक द्यायची राहून गेली काय?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Oct 2011 - 2:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मलाही काही कळ्ळं नाही. विविध दिवाळी अंकातील उत्तम लेखक लेखांची यादी आहे काय ?

-दिलीप बिरुटे
(गोंधळलेला)

डॉ.श्रीराम दिवटे's picture

23 Oct 2011 - 2:47 pm | डॉ.श्रीराम दिवटे

हे सर्व माझे लेखन कार्य आहे.