मिथ्या-शास्त्रे - न्या. होम्सचा गमतीदार परिच्छेद

धनंजय's picture
धनंजय in जनातलं, मनातलं
30 Sep 2011 - 8:47 pm

ऑलिव्हर वेंडेल होम्स हा १९०२-१९३२ सालापर्यंत यू.एस. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात व्यायाधीश होता. बिंदूगामी पण गमतीदार लिखाण हा त्याचा हातखंडा होता. त्याचा हा परिच्छेद नुकताच वाचला, तो मजेदार आणि मननीय वाटला :
- - - - -
मिथ्या-शास्त्रांबाबत (Pseudo-science)
-
मित्रांनो, सुरुवातीला मी तुम्हाला मिथ्या-शास्त्राची व्याख्या देतो. मिथ्या-शास्त्रांत स्वतःचे खास शब्द (nomenclature) असलेले तंत्र असते. त्याची अशी लवचिक व्यवस्था असते, की त्याच्या बाजूचे किंवा तत्त्वांना जोर देणारे सर्व आधार ग्राह्य धरले जातात, आणि त्याच्या विरोधातले वा त्याचा तत्त्वांच्या विपरित जाणारे सर्व पुरावे वगळले जातात. ते शास्त्र प्रत्यक्षात लागू करून वारेमाप फायदा मिळवणारा असा कुठलासा धंदा नेहमीच असतो. त्याचे प्रचारक आणि व्यावसायिक सामान्यपणे चाणाक्ष लोक असतात. लोकांशी बोलताना ते फार गंभीर असतात; आपापसात हसून डोळे मिचकावत का असेनात. त्यांच्या श्रद्धाळूंच्या गर्दीत कोण कोण असते? बायका आणि बायकोबा (women of both sexes*), मंदबुद्धी कुतूहलग्रस्त, कविस्वप्नाळू आशावादी, घोड्याच्या सौद्यात गंडणारे, नवयुगाची घाई असलेले दानशूर... हे असले लोक असतात. इथेतिथे थोडे धर्मगुरू असतात, त्याहून थोडे वकील, एखादाच डॉक्टर... पण घोड्यांचा जॉकी किंवा पोलीस अन्वेषक जवळजवळ कधीच नसतो. ...
मिथ्या-शास्त्रात सगळे म्हणजे सगळे खोटे नसते. खूपशी सत्ये असतात. कित्येक मूल्यवान सत्येही असतात. ... मिथ्या-शास्त्राच्या व्यावसायिकांना ठाऊक असते की सामान्य मनसिकतेचे असेच असते : एखाददुसर्‍या तथ्याचा गळ गिळला की मग कुठल्याही फोकांचे लक्तर गिळायला मन उत्सूक असते, इतकेच काय, गळाचा रिकामा आकडादेखील पुरतो. पहिलेवहिले तथ्य पडताळले, की पुढचे सगळे आपल्या कल्पनेतून पुरवण्यात मन तरबेज असते.
- - -
ऑलिव्हर वेंडेल होम्स, मूळ प्रकाशन "द प्रोफेसर ऍट द ब्रेकफास्ट टेबल" पुस्तकात. हा परिच्छेद डॉ. रॉबर्ट कूप यांच्या "द क्वाएट आर्ट : अ डॉक्टर्स ऍन्थॉलॉजी" मध्ये उद्धृत केलेला आहे.
*होम्सच्या काळात उच्च आणि मध्यमवर्गीय स्त्रियांना घरकाम आणि गृहशोभा यावेगळा व्यवसाय करता येत नसे. त्यामुळे त्या ऐतिहासिक संदर्भात "बायका" म्हणजे आजच्या संदर्भात "कर्तृत्व चेचलेले सुशिक्षित" असा मी घेतला आहे. "विमेन ऑफ बोथ सेक्सेस" हे स्पष्टीकरण होम्सला द्यावे लागले. माझ्या नव्या संदर्भाप्रमाणे "बोथ सेक्सेस" असा खुलासा करायची गरज राहात नाही.

हे ठिकाणसमाजमौजमजाभाषांतर

प्रतिक्रिया

  1. रामर पिल्लईचे पाण्याला इंधनात बदलू शकणारी वनस्पती.
  2. काही मानसोपचारतज्ज्ञांचे संमोहनाने मागील जन्माची माहिती काढता येते असे दावे.
  3. ग्रह तार्‍यांच्या भ्रमणावर आधारित फलज्योतिष
  4. फिलाडेल्फिया एक्सपेरिमेंट
  5. आम्हाला प्रिय एरिक व्हॉन डॅनिकेन, डॉ. ब्रायन वैस, सिल्विया ब्राउन वगैरे प्रभृती

हे सर्व मिथ्याशास्त्राची उदाहरणे मानता येतील ना!

पण घोड्यांचा जॉकी किंवा पोलीस अन्वेषक जवळजवळ कधीच नसतो. ...

यातल्या घोड्याच्या जॉकीचा संदर्भ डोक्यावरून गेला. पोलीस अन्वेषक नसतीलही पण त्यांचे पितामह असावेत काय? आर्थर कॉनन डॉयल तरी नक्की असावेत.

धनंजय's picture

30 Sep 2011 - 9:20 pm | धनंजय

येथे "जॉकी"बाबत मीदेखील अडखळलो.

मी अर्थ घेतला तो असा - घोड्यांवर पैसे लावणारे पुष्कळदा विचित्र रम्य तत्त्वांच्या आधारे पैसे लावतात. जॉकी मात्र जीव सांभाळून घोड्याच्या खर्‍याखुर्‍या स्वभावानुसार आणि पिंडानुसार घोडेस्वारी करतात. (त्याच प्रमाणे गुन्हे अन्वेषणाबाबत रम्य कल्पना असलेल्या कथा असतात. मात्र ज्ज्याला खुद्द अन्वेषण करायचे असते, त्याला तथ्यातले परिणाम लागतात.)

- - -
या "जॉकी"बाबतीत माझे मत ऑ.वे.होम्सच्या थोडेसे विपरित आहे. म्हणजे घोडे कसे पारखावे, आणि घोडा कसा हाकावा, या बाबतीत जॉकी कठोर तथ्यवादी असतील. पण अपघाती मृत्यूच्या अशाश्वतीमुळे गंडे-ताईत वगैरे बाबतीत विचित्र कल्पनांच्या आहारी जातही असतील.

बायका" म्हणजे आजच्या संदर्भात "कर्तृत्व चेचलेले सुशिक्षित"
हम्म.......... बांगड्या भरा हा वाक्प्रचार आठवला.

अवांतरः पुरषाला बांगड्या भरा असे म्हणावे लागते हे वाक्य बायकांच्या बाबतीत कसे होईल हो.
( तंबाखु चोळा........ की आणखी काही .........)

श्रावण मोडक's picture

30 Sep 2011 - 11:34 pm | श्रावण मोडक

हाहाहाहा... भापो. ;)
विचार महत्त्वाचे आहेत हे मान्य. त्यातला तोल उत्तम आहे. :)
पण ते इथं मांडण्यात 'आरसेविक्या'ची भूमिका दिसली. :)

Nile's picture

1 Oct 2011 - 2:31 pm | Nile

मी एकदम हँडसम दिसून राह्यलो, तुम्ही*? ;-)

हा प्रश्न आरसा हातात धरणार्‍याला आहे.आणि हो, आरसात पाहणे तब्येतीला चांगले असते.

राजेश घासकडवी's picture

1 Oct 2011 - 12:31 am | राजेश घासकडवी

या लेखात दिलेले निकष आवडलेच. मला अजून काही सुचताहेत.

- मिथ्या-शास्त्रातले लोक काटेकोर व्यक्तिनिरपेक्ष चाचण्यांना कधीच सामोरं जात नाहीत. त्यांचा कायमचा लकडा 'तुम्ही स्वतः अनुभव घेऊन पहा' असा असतो.
- निष्कर्ष मांडताना जितक्या साधारण व भोंगळ शब्दांत मांडता येईल तितक्या शब्दात मांडतात. त्यायोगे चूक सिद्ध करणं कठीण जावं.
- एखादा निष्कर्ष चुकला तर त्याला बहुधा ते 'ते शास्त्र वापरणं सगळ्यांनाच जमत नाही. निष्कर्ष चुकला म्हणजे तो काढणारी व्यक्ती चुकली. शास्त्रात तथ्य आहेच.' असं म्हणून बगल देतात.
- सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अमुक एक निष्कर्षापेक्षा वेगळं उत्तर आलं तर या शास्त्राच्या तत्वांमध्ये बदल करणं आवश्यक ठरेल असं कधीच छातीठोकपणे सांगत नाहीत.

प्रकाश घाटपांडे's picture

1 Oct 2011 - 3:07 pm | प्रकाश घाटपांडे

मिथ्या-शास्त्रातले लोक काटेकोर व्यक्तिनिरपेक्ष चाचण्यांना कधीच सामोरं जात नाहीत. त्यांचा कायमचा लकडा 'तुम्ही स्वतः अनुभव घेऊन पहा' असा असतो.

जर तुम्हाला अनुभव आला नाही तर तुमची श्रद्धा/प्रयत्न कमी पडले असे म्हणायला मोकळे! या अनुभूतिच्या प्रांतात गेलो की व्यक्तिसापेक्षता असतेच. या मिथ्थ्या॑ शास्त्रातील लोकांच्या भोवती (अंध)श्रद्धाळू लोकांचा इतका गलका अस्तो कि त्यांना अशा चाचण्यांना सामोरे जाण्याची गरजच भासत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Oct 2011 - 1:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणखी एक उदाहरण सुचलं ते होमिओपथीचं.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अमुक एक निष्कर्षापेक्षा वेगळं उत्तर आलं तर या शास्त्राच्या तत्वांमध्ये बदल करणं आवश्यक ठरेल असं कधीच छातीठोकपणे सांगत नाहीत.

हवामानशास्त्राचा अभ्यास करणार्‍यांना याच्या अगदी उलट अनुभव येतो. शास्त्रात बदल करण्याच्या दृष्टीने विचार सुरू असला तरीही वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव असणारे अनेक शास्त्र आणि शास्त्रज्ञ दोन्हींना नावं ठेवतात.

नितिन थत्ते's picture

1 Oct 2011 - 8:03 am | नितिन थत्ते

सहमत आहे.

अशी बातमी पाहिली की पावसाचे भाकित करणारे मॉडेल सुधारायला पाहिजे असे विज्ञानवादी म्हणतात. 'मॉडेल बरोबरच आहे; आयएमडीला ते वापरता येत नाही' असे म्हणत नाहीत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Oct 2011 - 10:39 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रत्यक्ष शास्त्रात ९५% आणि १०१% यात खरोखर कितपत फरक आहे याचाही विचार केला जातो. एका मिलीसेकंदाचा फरक अ‍ॅथलीट्सना अर्थातच पडतो पण पाऊस पडण्याच्या वेळेत त्याने फरक पडत नाही.

चित्रगुप्त's picture

1 Oct 2011 - 10:45 pm | चित्रगुप्त

माझा होमियोपाथीवर कधीच विश्वास नव्हता. परन्तु पुढे स्वतःची, पत्नीची व अन्य परिचितांची, अ‍ॅलोपाथीला असाध्य असलेली दुखणी होमियोपाथीने अल्पावपावधीत बरी झालेली बघून आश्चर्यचकित झालो. या स्वानुभवामुळे होमियोपाथी हे मिथ्या शास्त्र आहे, हा माझा दृष्टीकोण बदललेला आहे.
असेच अन्य विषयांसंबन्धी पण होउ शकते.
अ‍ॅलोपाथीमुळे अनेकांना नको ते त्रास चालू होण्यापासून मृत्यू ओढवण्यापर्यंतची शेकडो उदाहरणे असतात. म्हणून अ‍ॅलोपाथीलापण मिथ्या शास्त्र म्हणावे काय?.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Oct 2011 - 11:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

"तुम्ही अनुभव घेऊन पहा आणि ठरवा" असं होमिओपथी (आणि "नाडी"सुद्धा) म्हणतं. "अमक्या कारणांमुळे अमकी लक्षणं बरी होतात, त्यात अमकी अशी रासायनिक (किंवा काही) प्रक्रिया घडते" अशा पद्धतीचा अ‍ॅलोपॅथीचा साधारण दावा असतो.

  • अनेक छोटी-छोटी दुखणी, आजार, जखमा औषधाशिवायच बरी होतात मग औषधं सरसकटच बंद करावीत का?
  • "शेजारचे ते आजोबा वयाच्या नव्वदाव्या वर्षी हॉस्पिटलात औषधोपचार सुरू असतानाच गेले हो. कसली ही निरूपयोगी औषधं!"
  • "त्यांचा मेंदू अंतर्गत रक्तस्त्रावामुळे ७५% च्या वर निकामी झाला होता. मेंदूच्या पेशी पुन्हा तयार होत नाहीत. बरं झालं सगळ्यांसाठीच त्या गेल्या ते!" "असं का, मग काय फायदा तुमच्या डॉक्टर असण्याचा आणि महागड्या गोळ्या इंजेक्शनांचा?"

अ‍ॅव्हगॅड्रो नंबर आणि होमिओपथीची औषधं बनवण्याची पद्धत या दोन गोष्टी समजल्यानंतर होमिओपॅथीवर विश्वास कसा ठेवायचा?

लहानपणी घसादुखीवर आम्हालाही होमिओपॅथीच्या डॉक्टरांकडून गोड गोळ्या दिल्या जायच्या आणि घसा दुखणं दीड-दोन दिवसांत थांबायचं. अलिकडच्या काळात, (गेली अनेक वर्ष) मी फक्त गरम पाणी पिते, अनेकदा काही तासांतच घसा दुखणं थांबतं.

गवि's picture

2 Oct 2011 - 7:12 am | गवि

आणखी एक उदाहरण सुचलं ते होमिओपथीचं..

+100

Homeopathy is at best placebo & at worst quackery.

विकास's picture

1 Oct 2011 - 4:53 am | विकास

परीच्छेद एकदम मस्तच आहे. त्यामुळे अनेक दिवसांनी ऑलीव्हर होम्सचे नाव आणि वाचायला मिळाले. मुळचे बॉस्टन आणि मॅसॅच्युसेट्स सुप्रिम कोर्टाचे ते सर्वोच्च न्यायमुर्ती होते आणि मला वाटते ते हार्वर्डमधे पण शिकवायचे का असेच काहीतरी आणि अमेरीकन सर्वोच्च न्यायालयात ९० वर्षांचे होईस्तोवर काम केले होते.

मिथ्या शास्त्र हा शब्दप्रयोग आवडला. पण मिथ्या ह्या शब्दात आभास असणे असा देखील अर्थ आहे असे वाटते. "जे नाही ते आहे वाटणे अथवा वास्तव वाटणे" अशा अर्थाने. त्यामुळे ते खरे वाटणारे खोटे बोलतच असतात असे नाही, जरी ते बरोबर बोलत असतात का ह्या संबंधी वाद होऊ शकला तरी. पण ऑलीस्व्हर होम्सना ते अपेक्षित नाही तर सुडो म्हणजे ढोंगी अपेक्षीत आहे असे वाटते.

उ.दा. सध्या न्युट्रीनोच्या प्रयोगाबाबत जे काही भौतिकशास्त्रज्ञामधे जे काही वाद चालले आहेत ते देता येईल. अर्थातच आईनस्टाईनमुळे आलेले अधुनिक शास्त्र त्यामुळे खोटे ठरेल पण मिथ्या या अर्थी. अथवा त्या प्रयोगातील चूक लक्षात येईल, परत मिथ्या या अर्थाने. पण दोन्ही बाजू आणि शास्त्रसमर्थक तुर्तास सुडो (ढोंगी) म्हणता येणार नाहीत.

त्याव्यतिरीक्त होम्सचे वाचत असताना आजच एक ओबामाचे वाचलेले वाक्य आठवले. होम्स म्हणाला होता, The great act of faith is when a man decides he is not God. सध्या निवडणुकीपूर्व वार्‍यांवर स्वार होत असताना लोकांच्या नाराजी, काहीशा स्वतःबद्दलच्या अपेक्षाभंगाला उत्तर देताना ओबामा कॅलीफोर्नीयामधे मदतनिधी गोळा करायला गेला असताना म्हणाला, "“Don’t Compare Me to the Almighty, Compare Me to the Alternative”

तसेच अजून एक मला वाटते एकदम चपखला आहे: “Don't flatter yourself that friendship authorizes you to say disagreeable things to your intimates. The nearer you come into relation with a person, the more necessary do tact and courtesy become.” :-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Oct 2011 - 7:08 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सध्या न्युट्रीनोच्या प्रयोगाबाबत जे काही भौतिकशास्त्रज्ञामधे जे काही वाद चालले आहेत ते देता येईल. अर्थातच आईनस्टाईनमुळे आलेले अधुनिक शास्त्र त्यामुळे खोटे ठरेल पण मिथ्या या अर्थी.

अधिक माहिती मिळेल काय?

विकास's picture

1 Oct 2011 - 4:19 pm | विकास

"सध्या न्युट्रीनोच्या प्रयोगाबाबत जे काही भौतिकशास्त्रज्ञामधे जे काही वाद चालले आहेत..." या संदर्भातील अधिक माहिती: (हा मुळ उल्लेख माझ्या लेखी मिथ्या आणि ढोंगी/pseudo मधे असलेल्या शब्दार्थातील फरक दाखवण्यासाठी होता. सायन्स बरोबर चूक वगैरे म्हणण्याचा नाही.)

Nevertheless, the reaction of the world-wide physics community has been highly skeptical of the findings. "Fundamentally, I think the OPERA experiment is wrong. In fact, I haven't yet met any physicist who believes the result," Barry Blumenfeld, an experimental physicist at Hopkins who is currently involved with experiments at CERN, wrote in an email to The News-Letter.

If the CERN experiment proves to be correct and neutrinos have broken the speed of light, I will eat my boxer shorts on live TV,” Prof Jim Al-Khalili, professor of Physics at Surrey University said according to The Telegraph.

सर्नचे शास्त्रज्ञ हे नम्र आहेत. त्यांना त्यांच्या प्रयोगात काही चूक आढळलेली नाही म्हणून ते त्याला (अनुभवाला) बरोबरच म्हणत आहेत. पण तरी देखील काही चूक असल्यास सांगावीत असे म्हणत आहेत. थोडक्यात ते आवाहन आणि आव्हान आहे. जे शास्त्रज्ञ भौतिकशास्त्राशी निगडीत आहेत पण सर्नशी नाही त्यांच्यातील अनेकांच्या लेखी (ज्ञान-अभ्यास-अनुभवावरून) असे शक्यच नाही असे म्हणणे आहे. दोघेही प्रामाणिकच आहेत पण त्यातील एक निष्कर्ष हा मिथ्या ठरणार असे म्हणणे आहे.

अतीअवांतरः आठवते त्याप्रमाणे (आत्ता दुवा नाही) मला वाटते ५० च्या दशकात, पेशातील/ धंद्यातील निरीक्षण-अनुभवावरून आयबीएमचा अध्यक्ष म्हणाला होता की जगात ३ संगणक पुरेसे होतील! :-)

Nile's picture

1 Oct 2011 - 4:36 pm | Nile

(हा मुळ उल्लेख माझ्या लेखी मिथ्या आणि ढोंगी/pseudo मधे असलेल्या शब्दार्थातील फरक दाखवण्यासाठी होता. सायन्स बरोबर चूक वगैरे म्हणण्याचा नाही.)

मला वाटतं इथे मुलभुत फरक आहे. लेखक (श्री. होम्स) जेव्हा सुडो सायन्स म्हणत आहेत तेव्हा त्यातील 'false'नेस त्यांना मान्य आहे किंवा दिसतो आहे किंवा त्यातला Genuineness कोणीही कधीही सिद्ध केलेला नाही.

न्युट्रिनोच्या उदाहरणात मात्र तसे नाही. न्युट्रिनो प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जाऊ शकत नाही हे गृहितक कोणत्याही 'false premise' वर आहे असे आज कोणालाही वाटत नाही. न्युट्रिनोंच्या उदाहरणात प्रयोगाने एका सर्वमान्य, चुका नसलेल्या सिद्धांतात, विसंगती दाखवलेली आहे. पण त्या सिद्धांतातील 'Genuineness' मधील विसंगती आजवर दिसलेली नाही. केलेल्या प्रयोगात काही चुका (समजा) असल्या तरी त्या ज्ञात नसल्याने तो सुडो होत नाही. त्यामुळे वरील दोन्ही केसेस मध्ये कुठलीही केस सुडो नाही.

विकास's picture

2 Oct 2011 - 4:36 am | विकास

मला वाटतं इथे मुलभुत फरक आहे. लेखक (श्री. होम्स) जेव्हा सुडो सायन्स म्हणत आहेत तेव्हा त्यातील 'false'नेस त्यांना मान्य आहे किंवा दिसतो आहे किंवा त्यातला Genuineness कोणीही कधीही सिद्ध केलेला नाही.

मी काही वेगळे म्हणलेले आहे असे वाटत नाही. माझ्या आधीच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे मिथ्या हा आभास या शब्दाशी जास्त जवळ आहे असे माझे मत आहे. त्यात खोटे ठरले तरी intentionally नसते. तर pseudo हा शब्द ढोंग या शब्दाशी जास्त जवळ आहे असे मला वाटते. ज्यात वर एक आत एक असे असते.

त्यामुळे वरील दोन्ही केसेस मध्ये कुठलीही केस सुडो नाही.

माझे असे म्हणणे नाही असे वाटत असेल तर आधीच्या प्रतिसादातील खालील भाग वाचल्यानंतर आपले माझ्या प्रतिसादाबद्दलचे मत मिथ्या होते (pseudo नाही! ;) ) हे लक्षात येईल:

उ.दा. सध्या न्युट्रीनोच्या प्रयोगाबाबत जे काही भौतिकशास्त्रज्ञामधे जे काही वाद चालले आहेत ते देता येईल. अर्थातच आईनस्टाईनमुळे आलेले अधुनिक शास्त्र त्यामुळे खोटे ठरेल पण मिथ्या या अर्थी. अथवा त्या प्रयोगातील चूक लक्षात येईल, परत मिथ्या या अर्थाने. पण दोन्ही बाजू आणि शास्त्रसमर्थक तुर्तास सुडो (ढोंगी) म्हणता येणार नाहीत.

विसुनाना's picture

1 Oct 2011 - 10:41 am | विसुनाना

'फोकांचे लक्तर ' हा कोणत्या शब्दांचा अनुवाद/भाषांतर आहे?

विनायक प्रभू's picture

1 Oct 2011 - 10:53 am | विनायक प्रभू

छान लेख.
इथे वरील मिथ्या शास्त्राचा वापर करणारे दोन पंडीत आठवले.(सध्या त्यांना मी विसरलो आहे)

धन्या's picture

1 Oct 2011 - 10:31 pm | धन्या

सध्या त्यांना मी विसरलो आहे

विसरा विसरा. पण कधी नाडी सुटली किंवा एखादया अमावस्या किंवा पोर्णिमेला गंडांतर आलं म्हणजे कळेल. :)

नंदन's picture

1 Oct 2011 - 1:09 pm | नंदन

निवडलेला परिच्छेद आणि अनुवाद आवडला. मूळ पुस्तक गूगलबुक्सवर विनामूल्य उपलब्ध आहे, असं दिसतंय. [मूळ उतारा पृ. क्र. २४९ वर आहे. त्यावरून फोकांचे लक्तर हे merest rag of a lie चे भाषांतर असावे, असे वाटते.]

अवांतर - ज्या फ्रेनॉलॉजीच्या स्युडो-शास्त्राचा न्या. होम्स दाखला देतात, त्याचेच दुसर्‍या होम्सच्या कथांतले दाखले (बुद्धिमत्ता दर्शवणारे भव्य कपाळ, हॅटच्या साईझवरून ती वापरणार्‍याची बुद्धिमत्ता ओळखणे इ.) आठवले :)

विसुनाना's picture

1 Oct 2011 - 2:50 pm | विसुनाना

...सगळ्यात जास्त सडलेली बँकसुद्धा कपर्दिकेपासून सुरू होते. ज्या एका रुपयाच्या जिवावर ती धनप्राप्तीची हजारो वचने देते तो रुपया मात्र खराखुरा असतो....

ही वाक्ये अनुवादकाराने वगळलेली दिसतात. शिवाय 'फोकांचे' हा शब्द कुठून आला तेही कळले नाही.

मूळ उतार्‍याबाबत नंदन यांस धन्यवाद.

मूळ लेख मी वाचलेला नव्हता. रॉबर्टा कूप यांच्या पुस्तकात जो उतारा होता, तेवढाच वाचलेला होता. त्यात गाळलेली वाक्ये माझ्या भाषांतरातही दिसत नाहीत.

"फोका (अनेकवचनी)" हा शब्द "lie" या (एकवचनी) इंग्रजी शब्दाकरिता घेतलेला आहे. "फोका" शब्दाचा एकवचनी उपयोग (अनेक फोका, आणि एक फोक) मराठीत कानाला बरा वाटत नाही. लक्तर हा शब्द इंग्रजी rag करिता घेतलेला आहे. या ठिकाणी एकवचनाच्या ठिकाणी अनेकवचन केल्याने मथितार्थात फरक पडत नाही.

भाषांतर शब्दशः नाही. विचारलेल्या शब्दप्रयोगाच्या ठिकाणी शब्दाला शब्द जुळवता येतात हा योगायोगच. म्हणजे भाषांतरातील असे अनेक शब्द आहेत, ज्यांच्याकरिता मूलपाठ्यात एकच असा शब्द सापडणार नाही. उदाहरणार्थ, भाषांतरातील पहिल्या वाक्यात "...खास शब्द असलेले तंत्र..." यातील "खास" आणि "तंत्र" शब्द मुळात कुठेही सापडणार नाही. तरी सुद्धा इंग्रजीतला "a nomenclature" हा शब्दप्रयोग मराठीत बसवण्यासाठी हा शब्दप्रयोग ठीक आहे, असे मला वाटते. या ठिकाणी "संज्ञावली" वगैरे एक-शब्दाचा-प्रतिशब्द योजता आला असता, पण वाक्य संस्कृताळल्यामुळे मला हवी ती शैली राहिली नसती.

दिगम्भा's picture

3 Oct 2011 - 4:12 pm | दिगम्भा

फोका हा शब्द वर्‍हाडी / नागपुरी लोक बहुधा थापा या अर्थाने वापरतात. धनंजयांनी अशा एखाद्या मित्राकडून तो ऐकला व त्यांच्या लक्षात राहिला असावा. पण हा शब्द अन्य महाराष्ट्रीयांच्या वापरात फारसा नसतो. आम्हा अन्य महाराष्ट्रीयांना फोक म्हणजे विद्यार्थ्यांना मारण्यासाठी शिक्षक वापरतात ती छडी वाटते.

पैसा's picture

1 Oct 2011 - 10:11 pm | पैसा

खरं सांगायचं तर मिथ्याशास्त्र या शब्दापाशी मी जरा अडखळले होते. म्हणजे हेही काही शास्त्र आहे की काय असं वाटलं. कारण शास्त्र हा शब्द खूपच "जनरली/लिबरली" वापरला जातो. पण (Pseudo-science) म्हणताच लक्षात आलं, की हे आभासी किंवा तथाकथित शास्त्र आहे.

घासूगुर्जीनी दिलेले निकष हल्लीच एका (कु)प्रसिद्ध शास्त्राच्या बाजूने दिलेल्या आव्हानाच्या स्वरूपात इथेच मिपावर पहायला मिळाले होते असं आठवतंय. कितपत बरोबर आहे जाणकारांनी सांगावं अशी विनंती करते!

शिवाय रेकी, चुंबकशास्त्र, रिफ्लेक्सोलॉजी वगैरेचा समावेश यातच (आभासी/तथाकथित शास्त्रांत) होतो का?

डॉ. होम्सनी अशा शास्त्राच्या श्रद्धाळूंची जी यादी दिलीय ती मजेशीर आहे. मात्र बायका आणि बायकोबा यांचा सरसकट समावेश का केला असावा? म्हणजे त्या काळात बायकांना सहजासहजी कोणीही मेंढरांच्या गर्दीत ओढू शकतो, फसवू शकतो असा समज्/परिस्थिती होती का?

इतर लोकांचा समावेश का असावा हे सहजच कळण्यासारखं आहे पण जॉकी का नसावेत? कदाचित ते घोड्यावर स्वार असतात, आणि अनेकांची नशीबं घडवतात्/बिघडवतात म्हणून का?

"मिथ्याशास्त्रात मूल्यवान सत्येही असतात" ती कोणती हे मात्र लक्षात आलं नाही. कोणी उदाहरण देईल का?

धनंजय's picture

2 Oct 2011 - 12:13 am | धनंजय

रॉबर्ट कूप यांनी केलेले संकलन चाळताना हा परिच्छेद बघितला आणि गंमत वाटली.

मला यात वैशिष्ट्य असे वाटले, की यातील प्रत्येक कलम थोड्या-थोड्या मात्रेत कुठल्याही तंत्राला लागू पडते (मिथ्या असो वा नसो) :
म्हणजे (१) खास तांत्रिक शब्द असणे (२) व्यक्तिगत असमतोलामुळे (बायस मुळे) पुरावे बघण्यात एका-एका व्यक्तीने चुकारपणा करणे (३) व्यक्तिगत फायदा - कुठल्याही तंत्राच्या व्यावसायिकांना पगार-मोबदला वगैरे मिळतोच - सिव्हिल इंजिनियरला पूल किंवा नाला बांधल्याबद्दल वैयक्तिक मोबदला मिळतोच... वगैरे.

परंतु या सर्व गोष्टी अतिशय मोठ्या प्रमाणात एखाद्या तंत्राच्या बाबतीत दिसू लागल्या, तर विशेष साशंक व्हावे. म्हणजे (१) त्यातील कुठल्याच खास शब्दांचा अन्य शास्त्राशी - किंवा व्यावहारिक शब्दांशी - संबंध जुळून येऊ नये, (२) सामान्यपणे उपयोगी तंत्रांमध्ये एखाद्या व्यक्तीचा एकीकडे असमतोल असतो, तर दुसर्‍याचा दुसरीकडे. त्यामुळे त्या तंत्राच्या अंतर्गत चर्चेतही उलट-सुलट पुरावे दोन्ही उपस्थित करायची संधी उद्भवते. मात्र मिथ्या शास्त्रांमध्ये सर्वच प्रचारक असमतोल असतात. (३) व्यावसायिकाला होणार्‍या व्यक्तिगत फायद्याचा गिर्‍हाइकाला होणार्‍या फायद्याशी थेट संबंध कळून येत नाही. किमतीबाबत काहीच विश्लेषण करता येत नाही.

म्हणजे व्याख्येतील व्याखेतील कुठलेही कलम व्यावर्तक (पुरते वर्गीकरण करणारे) नाही, पण सर्व कलमे मिळून बर्‍यापैकी व्यावर्तक आहेत.

वरील स्पष्टीकरण भौतिकशास्त्र/न्यूट्रीनो वगैरेंना लागू करून बघता येते. (१) "न्यूट्रीनो" शब्दाला भौतिकशास्त्राबाहेर अर्थ नाही. (पण स्पेस, टाईम, एक्स्टेन्शन" वगैरे मूळ संज्ञांना आहे.) (२) न्यूट्रीनोच्या वेगाबाबत यापूर्वी प्रयोग झाला होता, पण त्यातील निष्कर्ष संदिग्ध होता. संदिग्ध प्रयोगांच्या बाबतीत भौतिकशास्त्रात कमी वजन दिले जाते. पण पुन्हा-पुन्हा तसा प्रयोग केला, आणि संदिग्धता कमी झाली, तर पुरावा ग्राह्य धरलाच जातो. न्यूट्रीनोचा प्रयोग करणार्‍या "सर्न" संस्थेच्या बजेटबद्दल वादविवाद ती-ती सरकारे उघडपणे करतात. अमुक प्रयोगाचा लवकर व्यावसायिक फायदा होणार नाही, कधीही होईल याबाबत सुद्धा शाश्वती नाही, त्या दृष्टीनेच पैसे गुंतवा, हे बहुतेक भौतिकशास्त्रज्ञ उघडच सांगतात. मात्र भौतिकशास्त्राच्या संशोधनातले साईड-इफेक्ट शोध इतके फायदेशीर आहेत, त्या दृष्टीने सरकारे गुंतवणूक करतात... वगैरे.

म्हणजे प्रत्येक कलमाच्या दृष्टीने भौतिकशास्त्र थोडेथोडे मिथ्याशास्त्रासारखे होते. पण फार नाही. आणि तीनही कलमे बघता कुठलीच शंका राहात नाही.

- - -

चित्रगुप्त म्हणतात :

अ‍ॅलोपाथीमुळे अनेकांना नको ते त्रास चालू होण्यापासून मृत्यू ओढवण्यापर्यंतची शेकडो उदाहरणे असतात. म्हणून अ‍ॅलोपाथीलापण मिथ्या शास्त्र म्हणावे काय?

त्यांचा विचार चर्चेच्या विषयाला धरून आहे. परंतु अपूर्ण आहे. अर्थातच पूर्ण विचार म्हणजे फायदे आणि तोटे यांना पारड्यात ठेवून त्यांची तुलना करणे. त्याच प्रमाणे होमियोपॅथीबाबत. म्हणजे ज्या लोकांना अल्पावधीत दिलासा मिळाला आहे, आणि ज्यांना मिळालेला नाही, या दोहोंची पूर्ण तुलना करून निष्कर्षाप्रत पोचले पाहिजे.

- - -
आणखी एक गोष्ट मला गमतीदार वाटली, म्हणजे सुरुवातीला गळाला मूल्यवान सत्य लावण्याची प्रथा होय. (पैसा यांच्या करिता हे "मूल्यवान सत्याचे" उदाहरण आहे.) (अ) ग्रहांच्या आकाशातील मार्गाच्या गणिताने दररोज बदलणार्‍या भरती-ओहोटीबाबत भाकिते उत्तम होतात. मच्छीमाराचा जीवनमरणाचा प्रश्न असतो हा. (आ) कुठल्याकुठे मध्य आफ्रिकेच्या जंगलांत मौसमी पाऊस पडल्यामुळे दुर कुठेतरी पावसाचा थेंब नसलेल्या ईजिप्तमध्ये नदीला पूर येत असत. त्या पूराचे भाकीत रवी-ग्रहाच्या गणिताने करता येते. हे गणितही जवळजवळ तंतोतंत बरोबर आहे. हे सत्यही आहे आणि मूल्यवानही आहे. मात्र या ढळढळीत सत्यांपलीकडचे बहुतेक फलज्योतिष इतके अचूक नसतेच. पण जातक थोड्या ढळढळीत सत्यांचा पूर्ण फायदा ग्रहशांती करून पैसे उकळणार्‍या ज्योतिषाला देतो.

- - -
("आरसेविक्या" म्हणजे लोकांना आरसे विकून स्वतः मात्र आरशात कधी बघत नाही, गबाळा राहातो, असा काही वाक्प्रचार आहे काय? मला नवीन आहे हा वाक्प्रचार. मात्र होम्स बहुधा - किंवा मीसुद्धा निश्चित - आरशात स्वतःसुद्धा बघावे, असेच म्हणतो.)

- - -
@विकास :
"मिथ्या"बाबत :

मिथ्या ह्या शब्दात आभास असणे असा देखील अर्थ आहे असे वाटते. "जे नाही ते आहे वाटणे अथवा वास्तव वाटणे" अशा अर्थाने....

मला वाटते की वरील अर्थ थोडासा प्रचलित आहे. पण तसा मूळ अर्थ नाही. आणि तसा अर्थ करण्यात तोटासुद्धा आहे. मिथ्या म्हणजे खोटे - आभास असेल किंवा नसेल तरी मिथ्याच. ("समोर साप आहे" हे विधान समोर साप नसला तर मिथ्या आहे. मग दोरीमुळे सापाचा आभास झाला असो किंवा कुठलाच आभास नसो, तरी मिथ्याच.) आता आपण म्हणू शकतो, की गेल्या काही शतकांत "मिथ्या" शब्दाचा अर्थ बदलून "आभासामुळे खरे वाटणारे असत्य" असा झाला आहे. पण मग मूळ "मिथ्या"अर्थाची गरज भाषेत राहातेच. त्याकरिता ";लिअहेफ्;अ" असा काही का असेना नवा शब्द निर्माण केला नाही, तर भाषा लंगडी होईल. त्यापेक्षा हीच सोय बरी नाही का? मूळ अर्थानेच "मिथ्या" शब्द राहू दे, आणि मूळ अर्थानेच "आभास" शब्द राहू दे...

सध्या न्युट्रीनोच्या प्रयोगाबाबत जे काही भौतिकशास्त्रज्ञामधे जे काही वाद चालले आहेत ते देता येईल. अर्थातच आईनस्टाईनमुळे आलेले अधुनिक शास्त्र त्यामुळे खोटे ठरेल पण मिथ्या या अर्थी. अथवा त्या प्रयोगातील चूक लक्षात येईल, परत मिथ्या या अर्थाने.

यात महत्त्वाचे एक लक्षात ठेवले पाहिजे की ज्ञान मिळवताना दोन वेगवेगळी क्षेत्रे आहेत : "अस्तित्वशास्त्र (ontology)" आणि "प्रमाणशास्त्र (epistemology). थोडक्यात "अमुक वस्तू आहे" आणि "ज्ञानवर्धनासाठी अमुक प्रकारची प्रमाणे आहेत". विज्ञानात अधोरेखितांपैकी प्रथम वाक्य नेहमीच "फक्त कृती करण्यापुरते" (pragmatic) असते. न्यूट्रीनोबाबत निरीक्षण बरोबर असले किंवा चूक तरी दुसर्‍या वाक्यात काहीच फरक पडत नाही.

राजेश घासकडवी यांनी वर याबाबत अधिक म्हटले आहे :

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अमुक एक निष्कर्षापेक्षा वेगळं उत्तर आलं तर या शास्त्राच्या तत्वांमध्ये बदल करणं आवश्यक ठरेल असं (मिथ्याशास्त्रात) कधीच छातीठोकपणे सांगत नाहीत.

विज्ञाने मात्र कुठलेही अस्तित्वशास्त्र सांगताना त्याच ठिकाणी "अमुक-अमुक प्रयोगात तमुक-तमुक निरीक्षण झाले, तर या अस्तित्वशास्त्रातील ढमुक-ढमुक वस्तू रद्द आहेत" असे थेट सांगतात.

विजुभाऊ's picture

10 Oct 2013 - 4:04 pm | विजुभाऊ

पंतांच्या ज्योतिषाकडे जाण्याबद्दलच्या धाग्यावरून हे एक सापडले