'ओपनहायमर' पुस्तक प्रकाशन

चिंतातुर जंतू's picture
चिंतातुर जंतू in जनातलं, मनातलं
30 Aug 2011 - 12:21 pm

आण्विक शस्त्रास्त्रांविषयीच्या मतांमुळे अमेरिकन सरकारच्या रोषाचा धनी ठरलेला सुप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ ओपनहायमर याच्या जीवनावर आधारित चरित्रात्मक पुस्तकाचं आज संध्याकाळी पुण्यात प्रकाशन होणार आहे.

लेखिका: माणिक कोतवाल (यांनी पूर्वी गॅलिलिओवरही चरित्रात्मक पुस्तक लिहिलेलं आहे.)
प्रकाशकः राजहंस प्रकाशन, पुणे

स्थळः एस. एम. जोशी सभागृह, गांजवे चौक
वेळः सं. ५:३० वा.
अध्यक्षः अच्युत गोडबोले
उपस्थिती: डॉ. शंकरराव गोवारीकर

कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. ओपनहायमरविषयी अधिक माहिती इथे मिळेल.

संस्कृतीभाषावाङ्मयविज्ञानबातमीमाहिती