श्री गणेश लेखमाला २०२३

1

"तो सलीम राजपुत्र" ह्या मराठी गीताचा हिंदी अनुवाद !

नरेंद्र गोळे's picture
नरेंद्र गोळे in जे न देखे रवी...
14 Oct 2007 - 8:16 pm

तो सलीम राजपुत्र

मूळ मराठी गीतकारः अनिल भारती, संगीतः गजानन वाटवे, गायकः गजानन वाटवे

प्रीतीची आसवे पत्थ्थरात पाझरली | तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली || धृ ||

अनोळखी शिपाईगड्या एकदाच पाहिले | शूराच्या चरणावर मस्त हुस्न वाहिले ||
इष्काच्या दरबारी चांदरात बरसली | तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली || १ ||

बंड करून उठली तलवार सलीमाची | राजनिष्ठ, राजबीज आस मोंगलांची ||
अकबरच्या न्यायकसोटीस प्रीत उतरली | तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली || २ ||

ते शराबी नयन कधी कुणा नाही डरले | राजा वा रयतेला ना कधीच घाबरले ||
मिलनच्या वाटेवर भिंत जरी बांधली | तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली || ३ ||

अल्लाच्या दरबारी दोन पाखरे जुळी | पंख मिटून मूकपणे चढली एका सुळी ||
तो पतंग ती शमा एकसाथ जाळली | तो सलीम राजपुत्र नर्तकी अनारकली || ४ ||

वो सलीम राजपुत्र

पत्थ्थर में झर लिए प्रिती के आसू भी | वो सलीम राजपुत्र, नर्तकी अनारकली || धृ ||

अन्जान इक सिपाही को देखा एकबार था | शूर के चरण में तबही मस्त हुस्न झुक लिया |
इष्क के महफिल में देख, चाँदरात हो गई | वो सलीम राजपुत्र, नर्तकी अनारकली || १ ||

कर बगावत उठी तरवार वो सलीम की | राजनिष्ठ, राजबीज आस मोंगलों की ||
अकबर के न्यायनिकष पर भी प्रीत कस ली | वो सलीम राजपुत्र, नर्तकी अनारकली || २ ||

वो शराबी नयन कभी डरे ना किसीसे | राजा वा रंक से वो कभीभी ना डरे ||
मिलन की राह में दीवार क्यूँ न बाँध ली | वो सलीम राजपुत्र, नर्तकी अनारकली || ३ ||

अल्लाह की दुनिया में, जुडवा थे, दो पंछी | पर मिट के एकसाथ, चढ गये दोनो सुली ||
नामशेष वो पतंग, वो शमा भी रह गई | वो सलीम राजपुत्र, नर्तकी अनारकली || ४ ||

हिंदी अनुवाद: नरेंद्र गोळे २००७०३२८

हिंदीत अनुवाद करण्याची सोय मनोगतावर नाही. इथे अनुमती असावी अशी अपेक्षा आहे.
प्रशासनाने स्पष्ट करावे. मार्गदर्शन करावे.

कविताप्रतिभाभाषांतरविरंगुळा

प्रतिक्रिया

मिसळपाव पंचायत समिती's picture

14 Oct 2007 - 10:10 pm | मिसळपाव पंचायत समिती

मूळ 'मराठी' कविता/गाणे अनुवादासोबत प्रसिद्ध केल्यास हिंदी अनुवाद प्रकाशीत करण्यास हरकत नाही.
- मिसळपाव पंचायत

विसोबा खेचर's picture

15 Oct 2007 - 12:50 am | विसोबा खेचर

गोळेसाहेब,

आजपर्यंत तुम्ही केलेला हिंदी गीताचा मराठी अनुवादच वाचनात आला. आज प्रथमच एक हिंदी अनुवाद वाचला आणि तो मला आवडला..

मी मराठी आहे, मराठी भाषेचा अभिमान मला आहेच, परंतु हिंदी भाषेवरही माझे अतिशय प्रेम आहे आणि मला ती मराठीइतकीच आवडते! असो..

आपण अजूनही काही मराठी गीतांचा हिंदी अनुवाद करावा ही विनंती...

मूळ 'मराठी' कविता/गाणे अनुवादासोबत प्रसिद्ध केल्यास हिंदी अनुवाद प्रकाशीत करण्यास हरकत नाही.
- मिसळपाव पंचायत

मी व्यक्तिश: पंचायत समितीच्या वरील निर्णयाचे स्वागत करतो...

तात्या.

धन्यवाद मिसळपाव पंचायतन! धन्यवाद तात्या!

अनुवादाच्या कलेचे रहस्य मूळ आणि अनुवाद दोन्हीही सोबत पाहता येण्याने उकलते.
ह्याची फार सखोल जाण आपल्या ह्या अभिप्रायांतून अभिव्यक्त होत आहे.

आपण अजूनही काही मराठी गीतांचा हिंदी अनुवाद करावा ही विनंती...>>

तात्या, "चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा" ह्या मराठी गीताचा
मी हिंदीत आणि प्रवासींनी संस्कृतात केलेला सुरस अनुवाद मनोगतावर अजूनही आढळून येतो आहे,
त्यावर पुन्हा एकदा नजरे करम करा.