देवा......एवढी दया नको रे दाखवू...

सागर's picture
सागर in जे न देखे रवी...
23 May 2008 - 5:34 pm

१३ मे, २००८ ला जयपूरला बाँबस्फोट झाले.
त्याच शोकांतिकेतून मनात उमटलेली ही कविता....

खरेतर ही कविता नाही... भावना आहेत.... त्यातून समाजप्रबोधन झाले आणि लोकांनी कोणाला जवळ करावे ....करु नये याचा बोध घेतला.... तर ती अतिरेक्यांच्या कारवायांना बळी पडलेल्या प्रत्येक आत्म्याला श्रद्धांजली असेन.

हे देवा,

एकच मागणे तुझिया चरणी
एवढी दया नको रे दाखवू...

होवोत अजुनि स्फोट, वाहोत अश्रूंचे लोट
मरो कुणाचा बाप, मरो कुणाची आई
जोपर्यंत स्वत:चा आत्मा जळत नाही
तोपर्यंत मुर्दाड लोकांना कसली आहे घाई?

स्वतःची मुलगी पडलेली असेल
प्रेतांच्या ढिगार्‍यात बेवारशी
स्वतःच्या रक्ताचे वाहणारे पाट दिसेल
तरच धमनी फुगेन जराशी

धावा-मारा हा गोंधळ ऐन वेळी कशाला?
शेजारी अतिरेकी उभा केला
तेव्हा का बेसावध राहिला?
तुमच्या तळतळाटाने का तो मेला?

तुमच्या रक्ताचे पाणी करुन
सीमेपार तो गेला
उंच्या हॉटेलात उंची खाना खाऊन
त्याच्याच मस्तीत तो जिरुन गेला

आभाळ फाटले ते आपले,
काळीज कापले गेले ते आपले
तो 'अफजल्या' रोज ज्या रोट्या तोडतो
त्यासाठी पैसे खिशातले गेले ते आपले

म्हणूनच म्हणतो रे देवा, एवढी दया नको रे दाखवू...
होऊ देत अजून काही स्फोट...उडु देत रक्ताची कारंजी...
तरच कधीतरी रक्तात अंगार फुलेल, डोळ्यांत रक्त उतरेन...
अवघा भारत एक होईन, तेव्हा मात्र पानिपत अतिरेक्यांचे होईन.....

(भारताचे उज्वल भवितव्याचे स्वप्न उरी असलेला...)- सागर

कलाकवितासमाजप्रकटनविचार

प्रतिक्रिया

मनिष's picture

23 May 2008 - 5:40 pm | मनिष

होवोत अजुनि स्फोट, वाहोत अश्रूंचे लोट
मरो कुणाचा बाप, मरो कुणाची आई
जोपर्यंत स्वत:चा आत्मा जळत नाही
तोपर्यंत मुर्दाड लोकांना कसली आहे घाई?

अंगावर शहारा आला....अतिशय प्रभावी!

सागर's picture

24 May 2008 - 3:15 pm | सागर

प्रतिसादाबद्दल धन्यवाद मनिष...

सागर

मदनबाण's picture

23 May 2008 - 6:12 pm | मदनबाण

तो 'अफजल्या' रोज ज्या रोट्या तोडतो
त्यासाठी पैसे खिशातले गेले ते आपले

आणि आमचे मंत्री-संत्री त्याची तुलना सरबजीत सिंगशी करतात !!!!!
त्या गोळीबारात कोणताही राजकारणी नेता मेला असता तर अशी विधाने या लोकांनी केली असती?
कसल्या समझोत्याच्या गप्पा हाणताय तुम्ही पाकिस्ताना बरोबर.....
कारगिल होऊन सुद्दा अजुन ह्यांच आंधळेपण दुर झालेले नाही !!!!!
सगळे अतिरेकी हे तिथे तयारी करुनच आमच्या या हिंदूस्थानात हा रक्तपात घडवून आणतात हे आपण पुराव्यानिशी नुसत दाखवुन देत बसायच ?
या पाकिस्तानाला कायमची अद्दल घडेल अशी पावल आपले सरकार का नाही उचलत ?
अजुन किती जवानांना तुम्ही विनाकारण शहीद करणार?
आणि त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या स्त्रीयांना पदके देणार...
आपल्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतींना त्या दिवशी अशाच एक वीर योध्याच्या विधवेला पुरस्कार देताना मी पाहिल......
ती हमसाहमशी रडत होती....आणि शेवट पर्यन्त ती रडतच राहिली.....
हेच चित्र अजुन आपण किती दिवस पाहणार ?

मदनबाण,

त्या गोळीबारात कोणताही राजकारणी नेता मेला असता तर अशी विधाने या लोकांनी केली असती?

अगदी खरे बोललात. हे सगळे नेते संसदेत मेले असते तर 'अफजल्या'वर राजकारण केले नसते कोणीच.
फाशीच काय पण जागच्या जागी त्याला गोळ्या घातल्या असत्या...

म्हणूनच मी म्हटले आहे की स्वत:च्या रक्ताचे पाणी होताना जोपर्यंत पहात नाही.. तोपर्यंत रक्त पेटून उठणार नाही....
तुमच्या मतांतूनही तेच विचार प्रतित होतात हे पाहून अभिमान वाटला..

आपल्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतींना त्या दिवशी अशाच एक वीर योध्याच्या विधवेला पुरस्कार देताना मी पाहिल......
ती हमसाहमशी रडत होती....आणि शेवट पर्यन्त ती रडतच राहिली.....

ही मात्र शोकांतिका आहेच... या स्त्रियांनी आयुष्यभर रडतच रहायचे का? राजकारणी नेत्यांच्या चुकीच्या शिक्षा सर्वसामान्यांनी का भोगायच्या? .... यासाठी तुम्ही-आम्ही...सर्वांनीच मतदानाकडे खूप गांभिर्याने पाहण्याची गरज आहे. आपण आपापसातच भांडत बसतो... संसदेवर चुकीचे नेते जातात आणि सत्तेचा दुरुपयोग करतात. हातात शस्त्र असून ह्या टोपीवाल्यांमुळे गोळी चालवता येत नाही. सर्वांनी दूरदॄष्टीने देशाचे हित पाहून आपापसातील वाद-मतभेदांना केवढे महत्त्व द्यायचे हे ठरवले पाहिजे.... तरच योग्य लोक सत्तेवर येतील....अन्यथा मागे आपली मुंबई... काल जयपुर ... उद्या परत मुंबई,पुणे वा एकाच वेळी सगळीकडे आगीचा कल्लोळ उसळेल....
-सागर

प्राजु's picture

23 May 2008 - 7:58 pm | प्राजु

अंतःकरण विदिर्ण करणारी कविता..
वेदेनेला महत्वाकांक्षेचे धुमारे फुटले तरच अवघा भारत एक होऊन, अतिरेक्यांच पानिपत होईल.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सागर's picture

24 May 2008 - 3:32 pm | सागर

वेदेनेला महत्वाकांक्षेचे धुमारे फुटले तरच अवघा भारत एक होऊन, अतिरेक्यांच पानिपत होईल.

आज वेदेनेला महत्वाकांक्षेचे धुमारे फुटणेच गरजेचे आहे...तरच हे चित्र बदलेन.
- सागर

शितल's picture

24 May 2008 - 3:14 am | शितल

खर॑च मनाला सुन्न करणारी परिस्थीती दर्शक कविता.

सागर's picture

24 May 2008 - 3:33 pm | सागर

प्रतिसादाबद्दल धन्यवाद शितल....

-सागर

विसोबा खेचर's picture

24 May 2008 - 6:04 am | विसोबा खेचर

प्रिय सागर,

तुझ्या भावना इतक्या प्रामाणिक आहेत, इतक्या आतून आलेल्या आहेत की त्याना कुठल्याही शब्दात दाद देणं हा केवळ एक उपचारच ठरेल!

आणि म्हणूनच या कवितेला कुठलीही दाद न देता केवळ 'सुन्न झालो' एवढंच म्हणतो...!

तात्या.

सागर's picture

24 May 2008 - 3:37 pm | सागर

तात्या,

तुमचा अभिप्राय माझ्यासाठी मार्गदर्शक आहे.
पण खरेच तात्या, आपण सर्वांनीच अन्यायाविरुद्ध आवाज मोठा केला पाहिजे.
तरच ही परिस्थिती बदलेल.
छोट्याशा चुकीकरिता पण जर मोठा आवाज ऐकायला यायला लागला तर हे पांढरे कावळे मनमानी करण्यापूर्वी १० वेळा विचार करतील.
आणि देशद्रोहाच्या ह्या मोठ्या चुका करण्याचे धाडसच होणार नाही ह्या नेत्यांना.

धन्यवाद
सागर