एक अद्भुतरम्य जागा

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in कलादालन
24 Jul 2011 - 1:54 pm

पॅरिसच्या गजबटापासून दूर, अतिशय शांत, निर्मनुष्य आणि अद्भुतरम्य जागा म्हणजे Parc de Saint Cloud.
सुमारे ११३६ एकर जागेत पसरलेल्या या उद्यानात हजारो मोठमोठी झाडे, हिरवळी, गच्च झाडीने झाकलेल्या पायवाटा, टेकड्या, पुतळे, कारंजी वगैरे आहेत.
सतराव्या शतकातील या जागेचे एक चित्र:

या चित्रात डावीकडे दिसणार्‍या भव्य प्रासादात सोळाव्या शतकापासून राजघराण्यातील लोकांचे वास्तव्य असायचे, मात्र १८७० सालच्या युद्धात हा प्रासाद आग लागून नष्ट झाला. १८७१ सालची भग्न प्रासादाची दृश्ये:

येथील कॅस्केड चे १८४५ मधील एक चित्र:

एक दोन दिवसात या ठिकाणी जाऊन मी तेथील फोटो काढून या धाग्यावर टाकणार आहे....

या प्रासाबद्दल दुवा:
http://chateausaintcloud.wifeo.com/les-ruines.php

कलासंस्कृतीप्रवासदेशांतरभूगोलछायाचित्रण

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

24 Jul 2011 - 2:51 pm | भडकमकर मास्तर

मस्त.. वाट पाहत आहे..
:) तिथे मूड बनला / वेळ असला / सामुग्री असली तर चित्रेही काढणार का? :)

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Jul 2011 - 10:38 pm | बिपिन कार्यकर्ते

+१

चतुरंग's picture

25 Jul 2011 - 8:00 am | चतुरंग

चित्ररंग

सहज's picture

24 Jul 2011 - 4:02 pm | सहज

वाट बघत आहे!

किसन शिंदे's picture

24 Jul 2011 - 5:01 pm | किसन शिंदे

सतराव्या शतकातले त्या जागेचे चित्र सुंदर आहे.

फोटोंची वाट पाहतोय. :)

सुरेख.

एक दोन दिवसात या ठिकाणी जाऊन मी तेथील फोटो काढून या धाग्यावर टाकणार आहे....

वाट पहातो आहे.

मदनबाण's picture

24 Jul 2011 - 9:29 pm | मदनबाण

मस्त... :)
वाट पाहतोय...

स्वानन्द's picture

25 Jul 2011 - 8:09 am | स्वानन्द

मस्तच!!

असेच आपल्या शनिवारवाड्याचे मुळचे चित्र कुठे पहायला मिळेल का?

किसन शिंदे's picture

25 Jul 2011 - 9:31 am | किसन शिंदे

हा पहा मुळ शनिवारवाड्याचा १८६० चा फोटो.. :)

स्वानन्द's picture

25 Jul 2011 - 9:51 pm | स्वानन्द

सह्हीच!! खाली चित्रगुप्त यांनी म्हटल्याप्रमाणे तो आगीत जळालेला सात मजली वाडा पूर्ण दिसेल असे चित्र पहायला मिळाले तर सोन्याहून पिवळं!!

किसनराव...खुप बरं वाटलं...खास त्या काळातलं चित्र पाहुन...

पाषाणभेद's picture

26 Jul 2011 - 9:49 am | पाषाणभेद

हं छान छायाचित्र आहे, फक्त तो पागोटे घातलेला मुलगा पर आहे की धमु आहे ते समजत नाही. जाणकारांनी खुलासा करावा.

सोत्रि's picture

27 Jul 2011 - 8:42 am | सोत्रि

हा धमुचा मागच्या जन्मीचा बाल्पणाचा फोटो असावा असा इतीहासकारांचा दावा आहे. संशोधन चालू आहे, ते पुर्ण झाल्यावर 'शनिवार बुद्रुक टाइम्स' मधे बातमी झळकवण्याची सोय केली आहे. तरीही रोज न चुकता 'शनिवार बुद्रुक टाइम्स' वाचण्याचे करावे. (विकत घेउन, मोफत वाचनालयात हा ठेवला जात नाही)

- (इतीहास संशोधक) सोकाजी

चित्रगुप्त's picture

25 Jul 2011 - 10:48 am | चित्रगुप्त

शनिवारवाड्याचे आणखी फोटो, खास करून विहंगम दॄष्य उपलब्ध आहे का कुठे? कोटाच्या आतील सातमजली वाडा होता, त्याचे?

कच्ची कैरी's picture

25 Jul 2011 - 8:21 pm | कच्ची कैरी

अगदी सुरेख !

चित्रगुप्त's picture

26 Jul 2011 - 5:02 am | चित्रगुप्त

तसे चांगले आहे, पण आधुनिक, काल्पनिक आणि बटबटीत...
टोपीकरांनी नाही एखादे त्याकाळी चित्र काढुन ठेवलेले? खरेतर हे काम पेशव्यांनीच करायला हवे होते...

निवेदिता-ताई's picture

26 Jul 2011 - 8:52 am | निवेदिता-ताई

:)

गणेशा's picture

26 Jul 2011 - 3:05 pm | गणेशा

सुरेख