कौस्तुभ "आयर्नमॅन" राडकर

श्रीरंग's picture
श्रीरंग in जनातलं, मनातलं
27 Jun 2011 - 7:12 pm

नाईस - फ्रांस येथे २६ जून रोजी पार पडलेली "आयर्नमॅन" ही ट्राएथ्लॉन स्पर्धा ११ तास ४६मि. इतक्या वेळेत पूर्ण करून पुण्याच्या कौस्तुभ राडकर याने ५०७ वा क्रमांक मिळवला. ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणारा तो आजपर्यंतचा एकमेव भारतीय ट्राएथ्लॉनपटू आहे. एवढेच नव्हे, तर ही अत्यंत कठीण स्पर्धा पूर्ण करण्याची ही त्याची चौथी वेळ आहे.

आयर्नमॅन विषयी :
आयर्नमॅन ही जगातील सर्वात कठीण स्पर्धांपैकी एक समजली जाते. जलतरण, धावणे, व सायकलिंग या तिन्हीचा समावेश असलेल्या ट्राएथ्लॉन या क्रीडाप्रकारातिल ही स्पर्धा युरोप व अमेरिकेतील विवइध ठिकाणी भरवली जाते. जगभरात या अत्यंत मानाच्या मानल्या जाणार्या स्पर्धेसाठी नामांकित ट्राएथलीट्स वर्षभर तयारी करत असतात. नुसते पार करायचे अंतर जरी लक्षात घेतले तरी या स्पर्धेच्या दर्जाची कल्पना येईल.
पोहणे : ३.८ किमी
सायकलिंग : १८० किमी
धावणे : ४२ किमी

कौस्तुभ राडकर विषयी :
पुण्यात टिळक तलावावर लहानपणापासून सराव करणार्या कौस्तुभने जलतरणात राष्ट्रीय पातळीवर अनेक पदके जिंकली आहेत. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत स्थाईक झाल्यानंतर तो ट्राएथ्लॉन या प्रकाराकदे वळला. त्यानंतर एकामागोमाग एक अशा ४ आयर्नमॅन स्पर्धा त्याने पूर्ण केल्या आहेत.
या वेळी तर स्पर्धेतील जलतरण या आपल्या आवडत्या प्रकारात त्याने नोंदवलेली वेळ ही २००० हून अधिक स्पर्धकांत सर्वोत्तम आठवी वेळ होती.
शिक्षण - नोकरी - सराव याचा योग्य समतोल सांभाळून त्याने केलेली ही कामगिरी खरोखरच कौतुकास पात्र आहे.

ट्राएथ्लॉन हा क्रीडाप्रकार भारतात फारसा लोकप्रीय नाही. तसेच, आपल्या प्रसारमाध्यमांमध्ये या कामगिरीस प्रसिध्दी मिळण्याची फारशी शक्यता नाही. म्हणूनच प्रचंड मेहनत घेऊन केलेल्ई ही कामगिरी लोकांसमोर तरी यावी यासाठी हा लेखनप्रपंच.

आयर्नमॅन स्पर्धेविषयी अधिक माहिती www.ironman.com येथे मिळेल.

क्रीडाशुभेच्छाबातमीसमीक्षा

प्रतिक्रिया

कौस्तुभ 'आयर्नमॅन' राडकरचं हार्दिक अभिनंदन!

त्याची कामगिरी आम्हाला कळवण्यासाठी श्रीरंग साहेबांचेही आभार!

पुस्पशु अर्थात कौस्तुभला पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा! :-)

झंम्प्या's picture

27 Jun 2011 - 8:20 pm | झंम्प्या

+१

शिल्पा ब's picture

27 Jun 2011 - 9:39 pm | शिल्पा ब

कौस्तुभचे हार्दिक अभिनंदन. एवढ्या अवघड स्पर्धेत भाग घेऊन ती पूर्ण करणे सुद्धा एक मोठ्ठी कामगिरी आहे. आम्हाला हि बातमी कळवल्याबद्दल धन्यवाद.

आत्मशून्य's picture

27 Jun 2011 - 10:02 pm | आत्मशून्य

प्रसंगच असा आहे की लाज वाटून घ्यावी की कौतूक करावे या संभ्रमात आहे, असो १०० कोटीच्या देशात अशा शोकांतीका घडण्याचे दुखः करण्यापेक्शा एवढ्या अवघड स्पर्धेत भाग घेऊन ती पूर्ण करणे सुद्धा एक मोठ्ठी कामगिरी आहे याबाबत दूमत नसल्याने वैयक्तीक पातळीवर कौस्तुभचे मनापासून हार्दिक अभिनंदन. आणी त्याच्या कामगीरीचा आलेख सातत्याने नजरेत भरावा असा उंचावत राहो हीच शूभेछ्चा.

अन्या दातार's picture

27 Jun 2011 - 10:20 pm | अन्या दातार

कौस्तुभचे अभिनंदन!

Dhananjay Borgaonkar's picture

28 Jun 2011 - 12:10 pm | Dhananjay Borgaonkar

कौस्तुभचे अभिनंदन.
रंगोबा बातमी कळवल्याबद्दल धन्स.

कौस्तुभचे हार्दिक अभिनंदन..

- पिंगू

श्रीरंग's picture

28 Jun 2011 - 3:22 pm | श्रीरंग

तपशीलात थोडीशी चूक झाली. २६ जून रोजी नाईस-फ्रांस, आणी सिएटल-अमेरिका, अशा दोन ठिकाणी आयर्नमॅन स्पर्धा होत्या. त्यापैकी कौस्तुभ सिएटल येथे सहभागी झाला होता.

इंटरनेटस्नेही's picture

28 Jun 2011 - 9:38 pm | इंटरनेटस्नेही

कौस्तुभ 'आयर्नमॅन' राडकरचं हार्दिक अभिनंदन!

अभिनंदन कौस्तुभ 'आयर्नमॅन' राडकर चे. !!

स्वाती दिनेश's picture

30 Jun 2011 - 6:06 pm | स्वाती दिनेश

कौस्तुभचे अभिनंदन आणि ही बातमी येथे पोहोचवल्याबद्दल श्रीरंग यांना धन्यवाद.
स्वाती

नगरीनिरंजन's picture

30 Jun 2011 - 6:07 pm | नगरीनिरंजन

कौस्तुभचे अभिनंदन आणि ही बातमी येथे पोहोचवल्याबद्दल श्रीरंग यांना धन्यवाद.

सहज's picture

30 Jun 2011 - 7:20 pm | सहज

कौस्तुभचे अभिनंदन आणि ही बातमी येथे पोहोचवल्याबद्दल श्रीरंग यांना धन्यवाद.
असेच म्हणतो.

सुनील's picture

24 Jul 2012 - 12:22 am | सुनील

कौस्तुभचे अभिनंदन आणि ही बातमी येथे पोहोचवल्याबद्दल श्रीरंग यांना धन्यवाद.
हेच म्हणतो.

श्रीरंग's picture

23 Jul 2012 - 2:04 pm | श्रीरंग

कालच 'लेक प्लॅसिड - अमेरिका" येथे पार पडलेली आयर्नमॅन शर्यत पूर्ण करण्यात कौस्तुभ राडकर पुनः एकदा यशस्वी ठरला आहे. तब्बल वेळा ही अतिशय कठिण स्पर्धा पूर्ण करण्याची कौतुकास्पद कामगिरी कौस्तुभने केली आहे.
अशी कामगिरी करणारा हा एकमेव भारतीय आहे.
३५०० च्या जवळपास स्पर्धक असलेल्या या शर्यतीत त्याने ३००वा क्रमांक मिळवला आहे. यातील जलतरण प्रकारात त्याचा क्रमांक ३रा, तर amateur गटात प्रथम आहे.
कौस्तुभच्या कारकिर्दीचा आलेख असाच सदैव चढता राहो ही सदिच्छा!

http://bleacherreport.com/articles/1262815-ironman-lake-placid-2012-rout...

www.ironman.com

या संकेतस्थळांवर आयर्नमॅन विषयी माहिती मिळेल.

आत्मशून्य's picture

23 Jul 2012 - 2:27 pm | आत्मशून्य

कौस्तुभचे मनापासुन अभिनंदन.

ऋषिकेश's picture

23 Jul 2012 - 2:42 pm | ऋषिकेश

रूपाळी रेमाळे ही अनेक सागर पोहून पार करणारी युवती नंतर ट्रायथ्लॉन खेळत असे. नंतर लग्न झाल्यावर खेळणे बंद केले असे वाचल्याचे आठवते.

कौस्तूभने मोठाच पराक्रम केला आहे. अभिनंदन

समांतरः योगाने ट्रायथ्लॉनच्या व T ने सुरू होणार्‍या खेळांबद्दलचा धागा आजच ऐसीअक्षरेवर प्रकाशित केला (दुवा)

पराक्रमी कौस्तुभला बहुत बहुत शुभेच्छा!!!!! वळखीचा लेख आवडला.

अर्धवटराव's picture

23 Jul 2012 - 9:00 pm | अर्धवटराव

काय स्टॅमीना म्हणावा राव... तेव्हढाच उत्साह आणि जीगर. गजब.
आर्यनमॅन चे अभिनंदन.

अर्धवटराव