येस ,वी आर ...

विनायक पाचलग's picture
विनायक पाचलग in जनातलं, मनातलं
10 Jun 2011 - 5:21 pm

MIT ,Symboysis किंवा अशाच एखाद्या कॉलेजचा कॅंपस.. देन तीन पोरे नेसकॅफे वर कॉफी पीत फाडफाड इंग्लिश बोलताना दिसतात. आपण, सहज जवळ जाऊन नाव विचारतो.. तर ते असतात जोशी, कुलकर्णी आणि पाटील .. दॅटस इट .. मराठी येत असूनही इंग्लिश बोलणारा, चांगल्या निदान बर्‍या घरातून आलेला.हाताशी मोबाईल आणि गाडी असणारा.. शरीराने भारतात आणि मनाने इंडियात राहणारा हा आमचा तरूण वर्ग.. अख्ख्या महाराष्ट्रभर पसरलेली ही आमची जनरेशन..सुशिक्षित,मॉडर्न असा हा वर्ग .. संख्येने कमी पण ब्युरोक्रॅट्स प्रमाणे मोस्ट इफेक्टिव्ह ... आणि, APJ अब्दुल कलामांच्या स्वप्नातील भारताचे शिलेदार देखील..

होय, आणि खरं सांगायचं तर उद्याच्या भविष्याच्या निर्मितीचा सर्वात जास्त भार खरोखरच आमच्यावर आहे. कारण, आम्ही असे तरूण आहोत की ज्यांना निदान पोटापाण्याची चिंता नाही.. चांगलं शिकायला मिळतयं ,घरातुन सेफटी आहे.. हे सगळं मिळत नसल तर काय डोंबलाचा जगाचा विचार करणार? पण, फक्त भारच नव्हे तर आम्ही यासाठी केपेबल देखील आहोत. कारण, We are different.. आमच्याकडे आमचा स्वत:चा ऍटीटयूड आहे. एखाद्या गोष्टीकडे बघायची ताकद आहे, दृष्टी आहे.. मग ती इमॅच्युअर का असेना, पण तरी तो आमच्याकडे आहे.. 23 व्या वर्षी आयआयटीत प्रोफेसर होण्यासाठी कष्ट लागतातच..पण, ते घ्यायची तयारी आमच्यात आहे, हे जास्त महत्वाचे...आणि, सर्वात महत्त्वाचे ''चला जग जिंकुया'' म्हणणारा Confidence. हा पुर्वी नव्हता ..

आमच्यात आयडॉलीजीम नाही , आम्ही कोणाशीही बांधलेलो नाही.. आम्ही फक्त आमच्याशी बांधलेलो आहेत. आणि, कोणी काहीही म्हणो, ही आमची ताकद आहे. कारण, आमचं विश्व आम्ही घडवायचयं ही जाणीव आम्हाला आहे. माईक वर बोलणारा राजकारणी किंवा टी व्ही स्टार कॅंपस इंटर्व्ह्यु च्या वेळेला मदतीला येणार नाही आहे हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे .. फार कशाला, अगदी परवाचीच गोष्ट आहे. आमचा FE चा Welcome Ceremony चाललेला.. प्राचार्यांना एक पोरगा दंगा करताना सापडला.. त्यांनी त्याला स्टेजवर बोलवुन शिक्षा दिली व परत पाठवले.. आता त्या मुलाची काय प्रतिक्रिया तुम्ही एक्स्पेकट करता? रडेल किंवा खुन्नस देइल वगैरे वगैरे ... पण जेव्हा Spontenious मनोगताची वेळ झाली. तेंव्हा तो डायस वर आला आणि आज इंजिनिअरींग लाही हे आपलेपण आहे. त्यामुळे मला शिक्षा मिळाली याबद्दल थ्यँक्स म्हणला.. आणि, हा डाग पुसणार असा निर्धार केला ( आणि नंतर वर्गाचा प्रतिनिधी बनुन त्याने तो पुसलादेखील) .. ही जिद्द, धाडस होतं की पुर्वी?

याहुन महत्वाचा म्हणजे आमच्या फ्रँकनेस.. माझा एक इंग्रजी लेख वाचून कोणती तामिळनाडूतली मुलगी माझ्याशी प्रचंड भांडते , तरीही आम्ही दोस्त होतो. दरवेळेला भांडतो आणि आता तिला तिचा ब्लॉग तयार करायला मदत करतोय . Doesent sound intresting ?? मुल-मुली ,राज्य -राज्य हा फरक तर केंव्हाचाच गेलाय.. आणि तसेही आज पोरीच पोरापेक्षा फॉरवर्ड असतात, बरोबर ना ??

आणि, लास्ट बट नॉट द लिस्ट.. आमची माध्यमांची जाण.. आम्ही संगणक चारदा बंद पाडु ,मोबाईल ची वाट लावु पण, दोन दिवसात त्यावर मास्टरी मिळवणारच.. आणि, नेट, फेसबुकमुळे तर काही विचारूच नका! आठवीतल्या माझ्या मित्राला शंका असेल तर तो फेसबुक वर टाकतो आणि १० मिनिटात त्याला उत्तर मिळते . ही एक खुप मोठी ताकद आहे .. आजुबाजुची परिस्थिती आणि आम्ही स्वत: याचं एक युनिक अफलातून प्रॉडक्ट आमची जनरेशन आहे , आणि, जरा आजुबाजुला नजर टाकली की आम्ही किती ताकदवान आहोत हे दिसून येतय.. So, be carefull..!

हा, आता तुम्ही म्हणाल की, ''साल्या ,एवढी पोर आहात तुम्ही शिकणारी, एवढी ताकद आहे, मग आत्तापर्यंत फार पुढं जायला हवा होता की तुम्ही?'' अगदी बरोबर बॉस, मलापण तोच प्रश्न पडतो. मग विचार केल्यावर अस वाटतय की आम्हाला आमची ताकदच माहित नाही आहे.. आम्ही काय करू शकतो तेच कळत नाही. म्हणुनच मग "जागो रे" चे कसेबसे लाखभर सदस्य होतात. किंवा नेटवर चालू असलेल्या ग्रेट पॉवर रेस मध्ये 2 महिन्यात एकाही कॅम्पस चे २० पण पॉईंट होत नाहीत.. कारण, आम्हाला यातुन आम्ही काय करु शकतो त्याची जाणीवच नाही..

याहुन डेंजरस गोष्ट आहे ती वेगळीच, माझा एक लेखक मित्र आहे हिमांशु, तो म्हणतो, ''एखादी गोष्ट ही संधी आहे का समस्या ?'' तेच कळत नाही आम्हाला. आणि हा आमचा प्रॉब्लेम आहे ...बरोबर आहे ते ..अगदी असेच आहे.. नेट आले मान्य, पण, आम्ही त्याचा वापर फेसबुक वर चॅट करण्यासाठीच फक्त करायला लागलो ना..
मोबाईल मिळाला, पण त्यावरून आम्ही गणपती, साईबाबांचे एसएमएस टाकत राहिलो.. माध्यमामुळे आणि घरच्या प्रगत राहणीमुळे पोरं-पोरी एकत्र बोलायला लागली.. वाटल चांगल झाले माझ्या सारखा पोरांचा शायनेस तरी गेला .. पण, त्यातुन गंमत झाली वेगळीच .. परवा, फेसबुकवर एकाचा स्टेटस होता.. In a relationship with ************ नाव कुठलं परदेशातलं, सहज टोकलं तर म्हणाला, अजुन मी तीला बघितलेलचं नाही.. च्यायला, मला तर काय कळलच नाही बाबा हे झेंगाट ..

आणि, हे कमी का काय, म्हणून आजुबाजूचा भवताल.. घरच्यांना आम्हाला द्यायला वेळ नाही.. ते दमलेल्या बाबाची कहाणी ऐकण्यात समाधान मानतात.. आणि, पोराला टीव्ही व पीसी वापरायला मिळतो.. मग आमच्याही नकळत आम्ही पोर्न बघु लागतो. सातवी आठवीतच .. कधीतरी कोणी C.S. आणुन टाकतो.. मग, एखाद्या दिवशी पीसी वर पोर्न सापडले की आई-बाप डोक्याला हात मारतात.. किंवा आज मी 4 हेड शॉट ने खुन केले,अस पोरगा म्हणतो जेंव्हा पोरगं नक्की काय म्हणतय.. तेच कळत नाही..आणि पालकांचा खुन व्हायचा बाकी राहतो ..

नेट वापरणे ही आमची ताकद आहे. पण, केंव्हा प्रमाणात असल्यावर हो..आम्ही नेटवर भांड-भांड भांडतो, पण, प्रत्यक्षात बोल म्हटल्यावर तोंड बंद.. ते व्हर्च्युअल आहे हेच विसरतो आम्ही.. हातातला पैसा, भाबड्या समजुती यामुळे जगाचे अनुभव घ्यायला बाहेरच पडत नाही. . फार्मविले वर शेती बघितली म्हणजे काय गरमागरम भाजलेले कणीस खायला मिळतं? वाचन बिचन तर दुरचचं. आपलं वाचनं काय तर.. "मी आज आजारी पडलेय" .. असले स्टेटस..

परिस्थिती अशी, आणि मग मानसिक गोंधळ.. जग जवळ आलं खरं.. पण,दुसर्‍याचं काय उचलायच आणि काय नाही ते विसरलो. मग त्याने बीअर घेतली, आपण घेतो.. पण इथे त्याची गरज नाही. ना . पण त्याने घेतली की आपण घेतो.. या सगळयात एखाद्या गोष्टीची खरी डेप्थ कोण हुडकणार?तेवढा वेळ आणि इच्छा आहे ?

बापरे, केवढं ते वाईट लिहिलं मी आमच्याबद्दल. हे वाचल्यावर मला कोण मारायचा सोडणार नाही.. पण, मला वाटतं हे कळायला पाहिजे आपल्याला.. आपल्याला आपले प्रश्न कोणते, आपल्या समस्या कोणत्या तेच माहित नाही आहे..आणि तोच आपल्या प्रगतीचा वेग कमी करतोय ... तेवढं कळालं की झालं की !! एवढी हत्तीएवढी ताकद आहे आपल्याकडे.. उगाचच, चिरीमिरीच्या गोष्टीवर वाद घालण्यात ती वाया घालावण्यापेक्षा ती योग्य जागी वापरलं की झालं, हाय काय आणि नाय काय? मग, कोणाची हिंमत आहे आम्हाला आवरायची?

बॉस, आणि एवढं काय टेन्शन घ्याची गरज नाही.. मूळ प्रॉब्लेम दोनच आहेत. एक म्हणजे आपल्याला जगण्याचं बेसिक माहित नाही, उदा. पैसा हे साधन आहे, साध्य नव्हे.. हे आपल्या आधीच्या पिढयावर बिंबवल गेलयं..आपल्यावर तेवढं राहिलय .. इतकच आणि .. ते मिळाल की योग्य दिशा घेणं.. मग, एमटीव्ही चा रिव्हेंज किंवा स्पार्टव्हिला जो संस्कार करतो. त्याला आपण नक्कीच पुरून उरू.

यावरून आठवलं, परवा मी ''बाकी शुन्य'' वाचलं, नाही आवडलं. . सगळं भारी होतं.. पण, मेन पात्राकडं बेस नव्हता आणि म्हणून तो भरकटला..सो, नाही आवडलं.. कारण, रखखरीत सत्य मांडण जस साहित्याच काम आहे, तसं वाट दाखवणही.. आज आम्हाला फक्त त्याची गरज आहे, बाकी कशाचीही नाही..ते कोण करणार ? मनस्विनी लता रविंद्र म्हणते तस ''का प्रश्न पडणचं आहे महत्वाचं?'' बरोबर ती एक बेसिक कन्सेप्ट आहे, पण त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण ही आपली खासियत.

तसं बघायला गेलं तर आपण फार पुढे न जाण्यातही आपली चूक काहीच नाही. परिस्थिती, समाज, पालक बऱ्याच गोष्टी आहेत. पण, आपण कशाला त्यांना शिव्या घाला? शेवटी गरज आपली आहे कारण, आत्महत्या आपण करतो आणि प्रगती झाली तर आपलीच होणार आहे.. गंमत अशी आहे की, आपल्या बद्दल वेगळी अशी चर्चा झालेलीच नाही..असो, काय फरक पडतो.. प्रत्येकाने विचार केला, आजुबाजुला पाहिले, आणि स्वत:ला शोधायचा प्रयत्न केला की झाले.. देर हे लेकीन दुरूस्त है.. काळात आपल्याला शिव्या घालण्यापेक्षा आपण आपल्याला बदलु.. कारण काहीही झाले, तरी आपण भविष्यकाळ आहोत. आपण, फक्त शक्ती विसरलेले हनुमान आहोत.. तेवढी शक्ती कळालीय आता.. मग, जग बदलु आपण.. आणि म्हणूनच शेवटी म्हणावं वाटतं..
Yes…We are…..

(तळटीप - सदरचा लेख ऑल इज वेल या पौगंडावस्थेवर आधारीत असलेल्या विशेषांकात प्रकाशित झालेला आहे . खुप दिवसानी मिपा पुन्हा नीट चालु लागलेले दिसले .सो , हा लेख इथे प्रकाशित करण्यापासुन स्वतःला थांबवु शकलो नाही .. )

वाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

<थत्ते चाचा मोड ऑन>

हा लेख वाचला असल्यामुळे गप्प रहायचे ठरवले आहे

< थत्ते चाचा मोड ऑफ>

चेतन

विसुनाना's picture

10 Jun 2011 - 5:49 pm | विसुनाना

'सदर लेखक मिपावर नवे आहेत' हे भूतकाळातील वाक्य आहे. :) त्यामुळे उल्लेखलेला लेख (निवेदन) येथे लागू होत नसावा. ;)
लगे रहो, कोदाभाई.

विनायक पाचलग's picture

10 Jun 2011 - 6:10 pm | विनायक पाचलग

गेला बाजार २.५ वर्ष मिपावर आहे बघा ....
किंवा अस म्हणा की ,इथे जे काही कॉमेंट मधुन येते त्याची कीक बसल्याशिवाय नवे काही करावे वाटत नाही ...
बरेच दिवस ती किक बसली नव्हती, म्हणुन वरच लिहिलय अस समजायला काहीही हरकत नाही :)

गेला बाजार २.५ वर्ष मिपावर आहे बघा ....

तेंव्हा देखील ह्याच गुणवत्तेचा लेख लिहायचात बरं तुम्ही :) अगदी एवढाच छाण :) सुरुवातीपासुन सेम कॉलिटी मेंटेण आहे :)

किंवा अस म्हणा की ,इथे जे काही कॉमेंट मधुन येते त्याची कीक बसल्याशिवाय नवे काही करावे वाटत नाही ...

सगळ्याच वाचकांना तुमचा लेख वाचल्यावर किक बसते. काहिंना नुसतं नाव पाहुनही किक बसते .. :) :)
खिक :)

पिवळा डांबिस's picture

11 Jun 2011 - 12:19 am | पिवळा डांबिस

सुरुवातीपासुन सेम कॉलिटी मेंटेण आहे
मी चुकून सुरवातीपासून सेम कॉलिटी मटण आहे असं वाचलं!!!
काय करणार, वीकेन्ड जवळ आला ना!!!
:)

आत्मशून्य's picture

10 Jun 2011 - 5:37 pm | आत्मशून्य

बरच काही लिहलय, पण नक्की काय सांगायचय उमजलं नाही.

गोगोल's picture

10 Jun 2011 - 7:42 pm | गोगोल

नवीन ते काय?

श्रावण मोडक's picture

10 Jun 2011 - 5:58 pm | श्रावण मोडक

आपण, फक्त शक्ती विसरलेले हनुमान आहोत

काय विधान आहे हे! शक्ती विसरलेला हनुमान म्हणजे... जाऊदे...

टारझन's picture

10 Jun 2011 - 6:17 pm | टारझन

मेलो .. =)) =)) लेख वाचायचं अजुन तरी रिकामपण ( पक्षी धाडस) झालं नाही .. पण प्रतिसाद वाचुन मेल्या गेले आहे =)) =))

जेवढा लेख वाचला त्यात एवढे हास्य फवारे उडाले आहेत की एक विडंबण मनात रुळते आहे . खुप दिवसांनी इतका विनोदी लेख वाचला :)

सर्वात महत्त्वाचे ''चला जग जिंकुया'' म्हणणारा Confidence. हा पुर्वी नव्हता .

चुचु ने एक पातेलं जिंकलं होतं .. तिच्याकडे तो कॉन्फिडन्स पुर्वी पासुन होता ... तसेच लेखकाने पुर्वीच्या पिढीच्या कॉण्फिडन्स वर जे अपमानाचे शिंतोडे उडवले आहेत, त्यामुळे पुर्वीचे लोकं काय रिप्लाय देतात ते पहाणे रोचक ठरेल :)

असो .. कोद्या फक्त लेख गाळायला येत असला , आणि कधी कोणाचं वाचत नसला तरी त्याच्या विनोदी लेखांमुळे त्याला ते क्षम्य आहे :)

विनायक पाचलग's picture

10 Jun 2011 - 8:25 pm | विनायक पाचलग

आणि कधी कोणाचं वाचत नसला

आक्षेप ..

शाहिर's picture

10 Jun 2011 - 6:15 pm | शाहिर

भैसाट्लेला :)

गोगोल's picture

10 Jun 2011 - 7:49 pm | गोगोल

>> 23 व्या वर्षी आयआयटीत प्रोफेसर होण्यासाठी कष्ट लागतातच

याचा काय संदर्भ?
विनायक जन्माला येतानाच ४५ वर्षांचा माईंड सेट घेउन आला होता. प्रत्येक गोष्टीच निबंधीकरण केलच पाहीजे का?
कुठ्ल्याही गोष्टीचा फक्त आनंद घेण्यासाठीच म्हणून ती तु करू शकत नाहीस का?
कुठलाही नवीन अनुभव घेताना तुला याचा निबंध कसा पाड्ता येईल हेच फक्त डोक्यात चालू असत का रे?
उद्या तुझा हनिमून चालू असताना पण तुझ्या डोक्यात हेच चालू असणार का रे?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Jun 2011 - 8:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कोदा, हवंतर रोज एक निबंध पाडा पण निदान मराठी (आणि इंग्लिशचेही) शुद्धलेखन शिका. अजूनही वेळ टळलेली नाही.

टारझन's picture

10 Jun 2011 - 8:10 pm | टारझन

अजुनही डेट चुकलेली नाही. ... :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Jun 2011 - 10:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अच्रत बव्लत

विजुभाऊ's picture

11 Jun 2011 - 7:23 am | विजुभाऊ

सूद्द लेखण शिकायचे क्ळाशेस खुटे भेट्तील
फकस्ट टद्ण्याणी माग्रद्श्रन क्रावे

शिल्पा ब's picture

10 Jun 2011 - 7:54 pm | शिल्पा ब

तुमचं वय काय हो पाचलग आजोबा?

वेताळ's picture

10 Jun 2011 - 8:01 pm | वेताळ

कोदा बर्‍याच दिवसाने लेखन केले आहेस

राजेश घासकडवी's picture

10 Jun 2011 - 8:07 pm | राजेश घासकडवी

आपल्याला आपले प्रश्न कोणते, आपल्या समस्या कोणत्या तेच माहित नाही आहे.

मला वाटतं या वाक्यातच लेखाचा अर्क आहे. त्या वाक्याच्या अलिकडचे आणि पलिकडचे परिच्छेद व त्यांतील शब्द हाच संदेश अधोरेखित करण्यासाठी आहेत. प्रभावी कलाकृतीमध्ये माध्यम हाच संदेश म्हणून वापरला जातो. एकंदरीत आकारबंध मूळ संदेशाशी अनुरूप करणं हे थोर कलाकाराचं लक्षण आहे. त्याच खुबीने लेखकाने तरुण पिढीच्या मनातली विस्कळितता लेखातल्या विस्कळित विचारमांडणीतून दाखवली आहे. म्हणून ही उच्च कलाकृती आहे. थोडं यमक वगैरे साधलं असतं तर कविताच म्हणता आली असती.

धनंजय's picture

13 Jun 2011 - 9:03 pm | धनंजय

हाच सारांश शोधत होतो.

उत्तम.

प्रदीप's picture

10 Jun 2011 - 8:23 pm | प्रदीप

लेखातील भाव समजला. पण लेख बराच विस्कळीत झाला आहे, तो बंदिस्त केला असता तर बरे झाले असते असे वाटले.

,इथे जे काही कॉमेंट मधुन येते त्याची कीक बसल्याशिवाय नवे काही करावे वाटत नाही ...
बरेच दिवस ती किक बसली नव्हती, म्हणुन वरच लिहिलय अस समजायला काहीही हरकत नाही

लेखक म्हणून तुम्ही येथे काही लिहीणार, व तरीही येथील समस्त वाचकांविषयी इतकी छ्द्मी प्रतिक्रिया का असावी? हा आमचा अपमान आहे असे आम्हास वाटले तर ते गैर नाही.

विनायक पाचलग's picture

10 Jun 2011 - 8:27 pm | विनायक पाचलग

छद्मी ?????

आईला .. काहीही ...
असो..हा पुर्वेतिहासाचा भाग आहे ....

प्रदीप's picture

10 Jun 2011 - 8:57 pm | प्रदीप

इथे जे काही कॉमेंट मधुन येते त्याची कीक बसल्याशिवाय नवे काही करावे वाटत नाही ...

हे सरसकट विधान आहे, काही विशीष्ट सभासदांविषयी नव्हे, हेही तुम्हाला समजत नाही काय?

आणि भाषा जरा जपून वापरा. एकतर तुमचे drivel वाचायचे व नंतर तुमच्या उर्मट प्रतिक्रिया!

विश्वनाथ मेहेंदळे's picture

13 Jun 2011 - 12:50 pm | विश्वनाथ मेहेंदळे

त्या विधानाने तुम्ही इतके का उचकलात ते अजिबात कळले नाही. हे विधान सकारात्मक दृष्टीनेपण घेता येईल की :-)

त्या विधानाने तुम्ही इतके का उचकलात ते अजिबात कळले नाही

बहुतेक त्यांनी ते विश्वनात मेहेंदळे ह्यांना कळण्यासाठी लिहीलं नसावं :)

- रोटीनाथ गहुदळे

अनामिक's picture

10 Jun 2011 - 8:31 pm | अनामिक

या लेखातून तु फेसबुक सॅवी आहेस एवढंच कळलं.

आणि "येस, वुई आर..." ह्या उत्तराचा प्रश्न लेखात आहे का? कि ओबामाच्या 'येस, वुई कॅन'ची री ओढतोयेस? मी 'लास्ट बट नॉट द लिस्ट...' नंतरचा निबंध वाचला नाही म्हणून विचारतोय.

चन्द्रशेखर सातव's picture

10 Jun 2011 - 11:21 pm | चन्द्रशेखर सातव

१० पैकी ७ १/२ गुण या निबंधाला !

भडकमकर मास्तर's picture

11 Jun 2011 - 12:27 am | भडकमकर मास्तर

तरूण गरीबांचे दवणे आठवले....

कुंदन's picture

11 Jun 2011 - 12:39 am | कुंदन

>>So, be carefull..!

घाबरलो ना भौ.....

सहज's picture

11 Jun 2011 - 6:03 am | सहज

फक्त एकच उणीव भासली, कमतरता जाणवली. ..नाही म्हणजे लेखात काहीही कमतरता नाही.
तेवढं फक्त मिपाच्या लेखन प्रकारात 'पौगंड' प्रकार पाहीजे. तेवढा दिसला असता की फिट्ट आहे लेख!!

पुलेशु!

अभिज्ञ's picture

11 Jun 2011 - 6:05 am | अभिज्ञ

हाण्ण्.....

सहज रावांशी सहमत.

;)

अभिज्ञ.

मैत्र's picture

13 Jun 2011 - 12:56 pm | मैत्र

+१११

बा़की काही नाही...

कुळाचा_दीप's picture

11 Jun 2011 - 7:06 am | कुळाचा_दीप

अशा प्रकारच्या लेखन शैलीला ' मुक्तछंद ' असे म्हणतात . सहीये !!

अशा प्रकारच्या लेखन शैलीला ' मुक्तछंद ' असे म्हणतात
ढण्यवाद हो भौ. तो "मुक्त्छन्द " हा शब्द नीट टायपल्याबद्दल. शब्द मागे फुडे जाले आस्ते तर लेइ घ्वाटाळा जाला आस्ता

रणजित चितळे's picture

11 Jun 2011 - 10:31 am | रणजित चितळे

आपला लेख वाचला. छान आहे .............

आपली पिढी ही 'कॉन्फिडन्ट' आहे व जग जिंकायची ताकद आहे हे सांगायचे आहे आपल्याला असे वाटते. माझे मत मी देत आहे, वाचून बघावे पटते का आपल्याला.

......23 व्या वर्षी आयआयटीत प्रोफेसर होण्यासाठी कष्ट लागतातच..पण, ते घ्यायची तयारी आमच्यात आहे, हे जास्त महत्वाचे...आणि, सर्वात महत्त्वाचे ''चला जग जिंकुया'' म्हणणारा Confidence. हा पुर्वी नव्हता.............

प्रत्येक पिढीला तरुण वयात आपली पूर्वीची पिढी बुद्धू वाटते. थोड्या अजून (जिवन जगण्याच्या) वर्षांच्या अनुभवानंतर खरे चित्र लक्षात येते. असो आपल्या पण येईल. कदाचित कॉन्फिडन्स व स्ट्रिट स्मार्ट ह्या दोन शब्दांमध्ये गफलत तर होत नाही हे बघावे.

...............आणि, हे कमी का काय, .................. कधीतरी कोणी C.S............ ..आणि पालकांचा खुन व्हायचा बाकी राहतो .....................

हे काही अंशी बरोबर वाटते .............
ह्या सगळ्याचे नकळत शिक्षण देणा-या व चांगले संस्कार करवणा-या शाळेबाहेरील शाळा अजुनही आहेत पण त्यांचा आपण वापर फार कमी करायला लागलो आहे. धकाधकीचे आयुष्य ह्या नावाखाली आपण सगळ्यांनी ह्या शाळेबाहेरील शाळां मधुन आपल्या मुलांचे नाव काढले आहे. आपल्या लहानपणी सुद्धा धकाधकीचे आयुष्य होते. प्रत्येक पिढीला आयुष्य धकाधकीचेच वाटत आलेले आहे. पण आता ग्राऊंड घेणारे काका सहसा सापडत नाहीत. सभेत कसे बोलावे हे शिकवणारे आजोबा स्वतःच वृद्धाश्रमात दाखल आहेत. वेगवेगळे छंद व कला शिकवणारी काकु – का कु करायला लागली आहे. तिला दुरदर्शन वर दिसणा-या ‘सास बहु’ मालिकांमधुन उसंत मिळत नाही. वाचनालये आता गेम्स व ईंटरनेट पार्लर्स मध्ये बदलली आहेत त्यात मुले, नाही नाही ते ज्ञान सर्रास मिळवतात. आपल्या सभोवारचे निरिक्षण करायचे सोडुन स्वतःच्या मोबाइलवर तासनतास बटनं दाबत तल्लीन झालेली मुले आपण हमखास पाहतो. अशाने आपल्या भोवतीची एक प्रकारची जागरुकता असायला हवी ती कमी कमी होऊ लागली आहे. हल्ली आपले काँप्युटर मित्र फार व आसपासच्या ख-या लोकांशी आपल्याला बोलायला वेळ नाही अशी परिस्थिती झाली आहे. मुले फुटबॉल व इतर मैदानी खेळ खेळतात पण पि एस् ३ वर! अशाने जिवाभावाचे मित्रगण व नेत्रुत्व गुण विकसात होण्या पेक्षा मुलांमध्ये माणुसघाणी व विकृत मनोवृत्ती आणि पुढे नैराष्यवादी मनोदशा तयार होते. एवढेच काय पण गणकयंत्रावरच्या काही खेळ सारखे खेळल्याने मुलांमध्ये चुक झाल्यावरच्या पश्चातापाची नैसर्गिक भावना असते ती बोथट होते व चुक होऊन सुद्धा पश्चाताप होईनासा होतो. मुल बिघडण्यामागचे हमखास कारण म्हणजे त्यांच्यातली पश्चातापाची नैसर्गिक भावना नाहिशी होणे. ।।। पुर्ण लेख येथे आहे वाचून बघा वेळ मिळाला तर .. http://www.misalpav.com/node/15453

...................बॉस, आणि एवढं काय टेन्शन........... .. ते मिळाल की योग्य दिशा घेणं.. मग, एमटीव्ही चा रिव्हेंज किंवा स्पार्टव्हिला जो संस्कार करतो. त्याला आपण नक्कीच पुरून उरू.,....................

ह्या वयात हाच तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो... ह्या वर मला एक अनंत फंदींचा फटका आठवतो तो वाचून बघा आपल्याला आवडेल.

बिकट वाट वहिवाट नसावी , धोपट मार्गा सोडू नको
संसारामधि ऐस आपुल्या , उगाच भटकत फिरू नको ||....................छान आहे

..................तसं बघायला गेलं ...............होणार आहे.. गंमत अशी.......... आपण, फक्त शक्ती विसरलेले हनुमान आहोत.. तेवढी शक्ती कळालीय आता.. मग, जग बदलु आपण.. आणि म्हणूनच शेवटी म्हणावं वाटतं..

शेवटी रबिंद्रबाबूंनी लिहिले तसे ..एकला चालोरे ... आपणच असतो आपल्याला सावरणारे. शक्ती हरवलेल्या हनुमानाला जांबूवंता सारखी दिशा दाखवणारी आधीची पिढी आहे असे माझे म्हणणे आहे.

बाकी अवांतर
मराठी लेख लिहिताना इंग्रजी शब्द कमी आले तर वाचायला आवडेल जास्ती.

श्रावण मोडक's picture

11 Jun 2011 - 10:52 am | श्रावण मोडक

जाताजाता एक महत्त्वाचे - विशिष्ट मुद्याला धरून विशिष्ट अंकासाठी केलेले लेखन असे इतरत्र बेधडक प्रसिद्ध करताना किमान लेखनाच्या शेवटी दिलेली सूचना सुरवातीलाच द्यावी हे उत्तम (आत्ताची सूचना म्हणजे सिगरेटच्या पाकिटावरील इशाऱ्यासारखी आहे).
हा लेख पौगंडावस्थेविषयीच्या विशेषांकासाठीचा आहे. त्या वयातील घालमेल अशीही असते हे आहेच. पण अशा लेखांचे स्थान त्याच अंकात असते. ते इतरत्र आणू नये. क्रिकेटचा बॉल घेऊन फुटबॉल खेळत नसतात. तू कोल्हापूरचा आहेस, हे तुला लगेच कळेल.

दुसरीकडे प्रसिद्ध केलेले इथे चिकटवायचे का नाही ते माहित नाही पण तरीही प्रतिसाद रोचक वगैरे काय म्हणतात तसा वाटला.

विनायक भावड्या, लिव रे तू रिफिल संपेस्तोवर !

श्रावण मोडक's picture

11 Jun 2011 - 12:56 pm | श्रावण मोडक

दुसरीकडे प्रसिद्ध केलेले इथे प्रसिद्ध करू नये, असे माझ्या लेखनातून वाटत असेल तर माफी असावी. अशा लेखनाबाबतचा निर्णय या संस्थळाचे व्यवस्थापन करेल.
माझा (काहीसा आगाऊ) सल्ला फक्त विनायक पाचलग यांच्यासाठी होता. ती धोरणात्मक टिप्पणी नव्हती.

शाहरुख's picture

11 Jun 2011 - 3:04 pm | शाहरुख

सर, माफी नको..तुम्ही मिपा धोरणावर टिपण्णी करताय असे अजिबात नव्हते मला म्हणायचे.

तुम्ही पाचलगला दिलेला सल्ला (...ते इतरत्र आणू नये...) वाचूनच मला प्रतिसाद द्यावासा वाटला..

विनायक पाचलग's picture

11 Jun 2011 - 11:55 am | विनायक पाचलग

संपुर्णतः सहमत ....
यापुढे काळजी घेईन :)

धन्या's picture

11 Jun 2011 - 11:01 am | धन्या

नमस्कार दोस्ता,

मागे तू तुझ्या आय आय टी च्या जे ई ई परिक्षेबद्दल लिहून जो गायब झालास तो आता उगवलास. बहुतेक अभ्यासात गुंतला असावास. बरं वाटलं, खुप दिवसानंतर तुझा लेख पाहून.

असो. तुझ्या या निबंधाच्या सुरुवातीचेच दोन ईंग्रजी शब्द पाहून तुझा जे ई ई मध्ये निकाल लागला असावा असं वाटतं. तू पुण्यात बहुतेक सिम्बायोसिसला प्रवेश घेतला असावास असंही असावं कदाचित. या तुझ्या लेखाला निबंधच म्हणावंसं वाटलं. बारावीच्या मराठीच्या (तेच ते युवकभारतीच्या) पेपराला जो पहिला निबंधाचा प्रश्न असतो ना, त्यातल्या "आम्ही कोण म्हणूनी काय पुससी?" या विषयावर लिहिलेला निबंध. पहिल्याच परीच्छेदात अगदी भारदस्त शब्दरचना करुन जबरदस्त टेम्पो आणला आहे. (मायबाप वाचकांनी एकापेक्षा एक प्रतिक्रिया देऊन तुझ्या निबंधाला त्याच टेम्पोत बसवला ही गोष्ट वेगळी.) अगदी लेखाचं शिर्षकच ओबामांच्या "येस वी कॅन" ची नक्कल आहे. सुरुवातीलाच एमायटी, सिम्बायोसिस या पुण्यातल्या नामवंत शिक्षणसंस्थांची नावे, जोशी, कुलकर्णी आणि पाटील अशा अभिजनांमध्ये मोडणार्‍या (निदान तुला तरी इथे तेच अभिप्रेत असावं) आडनावांचे उल्लेख, "APJ अब्दुल कलामांच्या स्वप्नातील भारताचे शिलेदार" तसेच "संख्येने कमी पण ब्युरोक्रॅट्स प्रमाणे मोस्ट इफेक्टिव्ह" सगळंच भारी...

तू पुढे जे म्हणतोयस ते अगदी खरं आहे. आजचा युवा वर्ग हेच देशाचं उदयाचं भवितव्य आहे. वादच नाही. आज देश भ्रष्टाचाराने अंतर्बाह्य पोखरला आहे त्यामुळे तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार झालेल्या तुझ्या पिढीकडून खुप अपेक्षा आहेत यातही शंका नाही. मेणबत्ती लावून का होईना, ही फेसबुक आणि ट्वीटरवाली पिढी आपण जागे आहोत हे दाखवून देत आहे. खरं तर असं चौकाचौकात मेणबत्त्या लावून काहीच होणार नाही. ही व्यवस्था खुप निबर झाली आहे (मला असं म्हणायचं होतं की ही सिस्टीम नॉन रीस्पॉन्सिव झाली आहे. :) ) आता गरज आहे ती या देशात सुजाण नागरीक घडण्याची. सुजाण नागरीकांचा देशही सुजाणच असेल...

पण... याचा अर्थ असा नाही की तुम्ही भूतकाळाला नावे ठेवाल. जगाच्या ईतिहासाला अश्मयुगापासून फेसबुकयुगात आणण्यात प्रत्येक पिढीचा छोटा मोठा वाटा आहे. मागच्या पिढीला "ही धमक तुमच्यात होती का?" असा प्रश्न विचारणे हा उर्मटपणा झाला. आणि हे सुजाणपणाचे लक्षण नाही... प्रत्येक पिढीला काळाची बंधने पाळावी लागतात, निदान ही बंधने झुगारुन देणारे महामानव समाजात जन्म घेत नाहीत तोपर्यंत तरी...

"कोहं..." हा प्रश्न तुझ्याही पिढीला पडला आहे, चांगली गोष्ट आहे. "चिदानंद रुपोशिवोहम..." हे उत्तर मिळायला तुम्हाला आयुष्याची अजून बरीच वर्ष घालवावी लागतील. सध्या हे सगळे प्रश्न बाजूला ठेवून फक्त एक सुजाण नागरीक कसं बनता येईल हे पाहा, या देशाचं कल्याण होईल...

हा लेख किंवा निबंध वरवर वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती की आजची युवा पिढी अर्ध्या हळकुंडाने पिवळी झाली आहे. आज ब्लॉगर आणि वर्डप्रेससारख्या मोफत सुविधा उपलब्ध झाल्यामुळे काही गोष्टींची जाणिवच नाही असं वाटत आहे. जुन्या लेखकांच्या प्रस्तावना वाचताना त्यांचे पुस्तकासाठी प्रकाशक मिळवण्यासाठी जी दिव्यं पार केली ती वाचली की अंगावर काटे येतात. आज मात्र बडव कीबोर्ड आणि पाड लेख असं झालंय. फेसबुकवरचं एखादं पेज, एखादी कम्युनिटी जॉईन केली की आपण फार मोठं देशकार्य केलं असं ज्याला त्याला वाटू लागलं आहे...

मित्रा, तुझ्या आजच्या पिढीच्या युवकाने एखादा दोन चार पानांचा लेख लिहिला, तो साधनामध्ये वगैरे छापून आला की आपण कुणीतरी खास आहोत असं त्याला वाटू लागतं...

जरा ज्ञानदेवाचं चरीत्र वाचा. त्याच्याबद्दल सांगितल्या जाणार्‍या रेडयामुखी वेद बोलविले, भिंत चालवली वगैरे चमत्कार कथा बाजूला ठेवा. समाजाने आईवडीलांना वाळीत टाकलेलं, त्यानंतर आई वडीलांच्या आत्महत्या, समाजाने "संन्याशाची पोरं" म्हणून केलेली हेटाळणी हे सारं बाजूला ठेवलं त्याने. वयाच्या सोळाव्या वर्षी या मुलाने भगवदगीतेवर निरुपणात्मक अशी नऊ हजार ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहिली. आज आठशे वर्षानंतरही हा उभा महाराष्ट्र त्याला माऊली म्हणतो, त्याच्या ज्ञानेश्वरीची "एक तरी ओवी अनुभवावी" म्हणतो...

या बाललेखकाने ज्ञानेश्वरी संपवताना जी फलश्रुती लिहिली ती तोंडात बोटे घालायला लावणारी आहे.

दुरीतांचे तिमिर जावो । विश्वस्वधर्मे सुर्ये पाहो ।
जो जे वांछिल तो ते लाहो । प्राणिजात ॥

... हा महाराष्ट्र तुमच्यात त्याच्या आठशे वर्षांपूर्वी होउन गेलेल्या ज्ञानदेवाला पाहतोय.

तुम्ही कोदेश्वराचा अपमान करत आहात . कोदा हे जालिय ज्ञानेश्वर आहेत , असे वक्तव्य ह्या पुर्वी संस्थळावर कोणी करुन गेला आहे. कोदा ह्यांचे मराठी भाषेवर , साहित्यावर एवढे उपकार आहेत की त्यांना सगळ्या जगाला कमी लेखण्याचा अलिखीत अधिकार आहे असे जाता जाता णमुद करावेसे वाटते.

कोदेश्वरांचा अपमान म्हणजे मिसळपाव वरच्या सगळ्या रेड्यांचा अपमाण आहे :)

- रेडेश्वर
कोदामुखी निबंध वदविला || रेडेश्वरु नामे प्रसिद्ध जाहला ||
जग जि़कण्या असे सामर्थ्य || येस वी आर ||

रणजित चितळे's picture

11 Jun 2011 - 12:09 pm | रणजित चितळे

.................हा लेख किंवा निबंध वरवर वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती की आजची युवा पिढी अर्ध्या हळकुंडाने पिवळी झाली आहे

मी असे म्हणेन की प्रचंड अवाजवी घाईत आहे आजची पिढी

दत्ता काळे's picture

11 Jun 2011 - 11:59 am | दत्ता काळे

श्रामोंशी सहमत.

छोटा डॉन's picture

11 Jun 2011 - 12:15 pm | छोटा डॉन

बहुत काय लिहणे ?
वरचे बहुसंख्य प्रतिसाद बरेच बोलके आहेत, विनायकाने त्यावर सिरियसली विचार करावा असे सांगतो.

लिहण्याची ताकद आहेच, मात्र ती विचार करुन योग्य त्या प्रकारे वापरावी, अभिनिवेष टाळावाच असा सल्ला देऊ इच्छितो :)
पुलेशु

- छोटा डॉन

परिकथेतील राजकुमार's picture

11 Jun 2011 - 12:29 pm | परिकथेतील राजकुमार

साला आमचा विनायक म्हणजे आंतरजालावरचा चेतन भगत आहे.

विन्या अबे भोसडीच्या स्वतःच्या हातानी लेखाचे मातेरे केले आहेस रे. विषय छान होता पण तू तो इतका रटाळ केला आहेस की काय सांगावे. प्रत्येक विषयात, प्रत्येक कृतीत तू काहीतरी 'लै भारी' का शोधत असतोस ? जरा साध्या सरळपणे, तुझ्या वयाची पोरं लिहितात तसे लिही ना सोन्या. चार शिव्या लिही, दोन पाचकळ जोक लिही .. ते पण एकवेळ क्षम्य आहे. पण असले काही तरी लिहू नको. नै तर हाणतो बघ तिकडे येऊन.

च्यायला मी म्हणले अलिबागला जाउन आलाय काहितरी रोंमॅटिक किंवा पावसाळ्यावर वैग्रे लिहिल असशील ... तर कसल काय ! च्छ्या !!

विनायक पाचलग's picture

11 Jun 2011 - 1:54 pm | विनायक पाचलग

च्यायला मी म्हणले अलिबागला जाउन आलाय काहितरी रोंमॅटिक किंवा पावसाळ्यावर वैग्रे लिहिल असशील ... तर कसल काय ! च्छ्या !!

अरे, हे अलिबाग कालच ...ह्यो लेख आधीचा आहे ...आल्यापासुन मिपा नीट चालु दिसल ...पण नवीन काहीच लिहित नव्हतो ..अंक समोर होता.. म्हटले हा लेख नेटवर लिहिलेलाच नाही ..तुर्तास हा लेख तरी प्रकाशित करु ..बाकी विचार केला नाही ..असो , आता करीन ....

डॉ.श्रीराम दिवटे's picture

11 Jun 2011 - 2:03 pm | डॉ.श्रीराम दिवटे

छान लेख. विचार करायला प्रव्रुत्त करणारे लिखाण झाले आहे. उत्तम. पुलेशु...

चतुरंग's picture

13 Jun 2011 - 9:57 am | चतुरंग

मस्त लेख आहे रे विनायका!
एकदम सुम्माट सुटलीये गाडी तुझी पहिल्या ओळीपासून ते शेवटी येस वी आर म्हणतच थांबली!
ओबामाला त्याचं जिंकल्यानंतरचं भाषण तूच का रे लिहून दिलं होतंस?
जळ्ळं ते मिपा. मधे मधे बंद पडत होतं त्यामुळे इतका सुंदर निबंध वाचायला किती वेळ की रे गेला!
लोक ते काय अर्धं हळ्कुंड वगैरे म्हणताहेत ना, नकोस लक्ष देऊ तू! अरे थोर माणसं का कधी टीकेकडे लक्ष देतात?
तू ते मोबाईल, अन फेस्बुक, अन नेट अन काय काय सांगत बसलास ना कसलं गरगरलायला लागलं मला, अरे काय करणार जरा मागल्या पिढीचा ना रे मी. काय कपॅकिटीच नाय रे आमची. तुम्ही नवीन जमान्याची मुलं कसली फास्ट रे १० मिन्टात उत्तर काढता नेटवरुन! काय सक्सेस्फुली गोंधळवून टाकलायस रे तू वाचणार्‍याला? जवाब नहीं! लेखात काय म्हणायचंय याचा शेवटपर्यंत पत्ता लागत नाही ह्याला म्हणतात निबंध. नाहीतर ते निबंधमाला वाले कोणी भोपटकर की कोण होते ना, त्यांचे कसले रे निबंध ते छ्या! अर्थ समजतो रे, प्रश्न काय मांडायचाय ते कळतं रे त्यांच्या निबंधातून. तसं उपयोगाचं नाय, हे असं हवं!
लिहीत रहा बाबा, नाहीतर ह्या जगाचं कसं होणार? इतके प्रचंड प्रश्न आहेत ते कोण आणि कसे सोडवणार? उद्या ५० वर्षांनतर आंतरजालाचा इतिहास जर लिहिला तर त्यात तुझे हे निबंध सोन्याहून पिवळे ठरतील ह्यात शंका नाही!

-(येस, वी गार...)चतुरंग

साबु's picture

13 Jun 2011 - 10:43 am | साबु

विनायक (वयाने लहान आहे म्हणुन एकेरी उल्लेख) चे लेख छान असतात. पण का कुणास ठाउक त्याचे लेख वाचले कि पु. ल. न्च्या गटणे ची आठवण होते.

बोळा निघुन पाणी कधी वाहते होणार कुणास ठाउक?

धनंजय's picture

13 Jun 2011 - 9:05 pm | धनंजय

लेखकाची प्रगती प्रशंसनीय आहे.