प्राचीन भारतः कार्ले लेणी

प्रचेतस's picture
प्रचेतस in कलादालन
8 Mar 2011 - 11:10 am

प्राचीन भारतः बेडसे लेणी

सुरुवातीच्या लेण्यांतील महायान काळातील बुद्धप्रतिमा व विहार

कार्ल्याचे तीमजली विहार-

वर जायला खोदून काढलेला अंगच्याच कातळातील जिना-

चैत्यगृहाच्या पुढील भागात असलेला विशाल सिंहस्तंभ

चैत्यगृहाच्या वरांड्यातील चैत्यकमानी, सज्जे, प्रासाद व मुर्ती-

भारतातील सर्वात मोठे चैत्यगृह

स्तूप, हर्मिका, लाकडी छत्र व छतावरील अजूनही शाबूत असलेल्या लाकडी फासळ्या

ओळींत असलेल्या कोरीव स्तंभ व त्यावर कोरलेली शिल्पे छतावरील फासळ्यांसह

बाहेरील सिंहस्तंभाची प्रतिकृती मध्यभागी स्तूप, उजवीक्डे सिंहस्तंभ व डावीकडे चक्रस्तंभ (हा चक्रस्तंभ कदाचित पुर्वी अस्तित्वात असावा)

ब्राह्मी लिपीतील इथल्या खांबावर कोरलेले विपुल शिलालेख (यातील बहुतेक दातृत्वाचे आहेत)

हा शिलालेख तर सगळ्यात महत्वाचा-


याचा अर्थ -
वेजयंतितो सेठीना भूतपालेन सेलघरम परिनिठापितम् जंबुदिपम्ही उतमम्’
वैजयन्तिचा श्रेष्ठी भूतपाल याने तयार केलेले हे लेणे जम्बुद्वीपात उत्कृष्ट आहे.
जम्बुद्वीप म्हणजे आपला भारत देश! वैजयंती गावचा हा भूतपाल सांगतो, की हे लेणे ‘जम्बुद्वीपात उत्तम’ म्हणजेच या साऱ्या भारतवर्षांत अपूर्व असे आहे. आज दोन हजार वर्षे उलटली पण त्याचा हा गौरव आजही खरा ठरतो.

विहारातून दिसणारे एकवीरा मातेचे मंदिर

जाता जाता-

संस्कृती

प्रतिक्रिया

जातीवंत भटका's picture

8 Mar 2011 - 12:14 pm | जातीवंत भटका

मस्तच आहेत सगळे फोटू ... भाजे आणि बेडसा या कार्ल्याच्या भावंडांपेक्षा इथे जास्त कोरीवकाम पहायला मिळते नाही ?? फ्रेश वाटले फोटू पाहून .... धन्यवाद !!

परिकथेतील राजकुमार's picture

8 Mar 2011 - 3:16 pm | परिकथेतील राजकुमार

जबरदस्त फोटू. लै भारी वल्ली शेठ.

गणेशा's picture

8 Mar 2011 - 3:46 pm | गणेशा

निशब्द ..

मस्त मस्त मस्त मस्त!
जागेवरुन न हलता अस तुमच्या दृष्टीन पहाय्ला मिळतय. काय साम्गाव वल्ली!

हेवा वाटतो तुमचा. पण फिरत रहा.

अवलिया's picture

9 Mar 2011 - 12:52 pm | अवलिया

मस्त !!

अरे वा.. वल्ली,
आत्ताच बघितले हे फोटू.. एकदम सुरेख....
एकदम A1 :)

५० फक्त's picture

9 Mar 2011 - 6:16 pm | ५० फक्त

फोटो आणि माहिती नेहमीप्रमाणॅच छान.

चला तुम्हाला सि++ ते ब्राम्ही व्ह्याया जावा (आणि सुमात्रा) अशा ब-याच भाषा येतात हे पण कळाले. आनंद जाहला.

आता असं करा तुम्ही सगळे फिरे मिळुन एक वेगळा विभाग करा मिपावर, म्हणजे मी तिथं कधिमधिच येत जाईन, अरे काय रे इथं तिथं जाता, फोटो काढता ते इथं आणुन दाखवता, आमची जळवायला का रे ?

असो

प्रचेतस's picture

9 Mar 2011 - 6:20 pm | प्रचेतस

ते सी++ ते ब्राम्ही व्ह्याया जावा बिवा काही आपल्याला येत नाहिच.पण ब्राह्मी जाणणार्‍यांनी आधीच अर्थ लावून ठेवलाय ना त्या शिलालेखांचा. त्यामुळे तसं माहित असतं थोडंफार.

विकास's picture

9 Mar 2011 - 11:24 pm | विकास

एकदम मस्त फोटो आले आहेत! सिंहस्तंभ एका अर्थी अशोकस्तंभासारखाच वाटतोय. चौथ्या, सहाव्या आणि शेवटच्या छायाचित्रात दिसणारे, एकवीरा देवीचे देऊळ आहे ना?

प्रचेतस's picture

10 Mar 2011 - 9:00 am | प्रचेतस

सिंहस्तंभ एका अर्थी अशोकस्तंभासारखाच वाटतोय

नक्कीच. सम्राट अशोकाने उभारलेल्या 'सारनाथ' येथील सिंहस्तंभासारखाच (जी भारताची राजमुद्रा पण आहे) हा एक स्तंभ आहे. इथल्या लेण्यांवर मौर्य शिल्पकलेचा प्रभाव होताच.

एकवीरा देवीचे देऊळ आहे ना

एकवीरा देवीचेच देऊळ आहे ते. ते केव्हातरी मध्ययुगात बांधले गेले. कदाचित शिवकालीन असावे आणि अगदी चैत्यगृहाच्या तोंडाशीच असल्याने त्या विशाल चैत्यगृहाचे सौंदर्य निश्चितच उणावले आहे.

प्राजु's picture

10 Mar 2011 - 12:51 am | प्राजु

सुरेख चित्रे..!

निनाद's picture

10 Mar 2011 - 5:23 am | निनाद

फारच सुंदर छाया चित्रे आहेत!
ही चित्रे तुम्ही कृपया विकीवरील लेखासाठी विकि कॉमन्सवर चढवाल काय?
तसेच कार्ले या लेखात भर घातलीत अजून चांगले.

प्रचेतस's picture

10 Mar 2011 - 9:01 am | प्रचेतस

प्रयत्न करेनच तसा.

चित्रा's picture

10 Mar 2011 - 10:22 am | चित्रा

सुंदर चित्रे, आणि स्तुत्य उपक्रम. शुभेच्छा.

प्रास's picture

10 Mar 2011 - 10:47 am | प्रास

येव्हढे म्हणणे पुरेसे आहे......

सहज's picture

10 Mar 2011 - 11:21 am | सहज

कार्ले-भाजे लेणी असे एकत्र नाव आठवते.

आणि असेच सुंदर फोटो असल्याने, मिपाकर झकासराव यांच्या भाजे लेणी धाग्याचा लुत्फ लुटुया!

प्रचेतस's picture

10 Mar 2011 - 11:41 am | प्रचेतस

तिथे पण त्याच वेळी जायचे होते. पण सूर्य मावळल्यामुळे जाता नाही आले. आता पुढच्या विकांताला जाउन ही त्रिधारा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.

अवांतरः आजकाल झकासराव कुठे दिसत नाहीत?

योगेश आलेकरी's picture

8 Dec 2015 - 10:44 pm | योगेश आलेकरी

नेहमीप्रमाणेच माहितीपुर्ण ...छा.चि. उ.

सतिश गावडे's picture

8 Dec 2015 - 11:12 pm | सतिश गावडे

नुकताच या लेण्याला भेट देण्याचा योग आला.

तेव्हा पाहिलेल्या मुख्य स्तुपासमोर अंगात आलेल्या बायांनी घुमणे, बापे लोकांनी होळीला बोंब मारावी तशी आरोळी ठोकणे, लेकुरवाळ्या स्त्रीने कडेवर मुल आणि डोक्यावर फुलांनी सजवलेला पाळणा ठेवून फेरे मारणे या प्रकारांनी मन उदविग्न झाले.

भानिम's picture

9 Dec 2015 - 7:52 am | भानिम

छान फोटो! कार्ले बद्दल तुम्ही लेख पण लिहिला आहे का? शोधून वाचतो...

प्रचेतस's picture

9 Dec 2015 - 10:16 am | प्रचेतस

कार्ले लेणीवर लिहिलं नाही अजून.
कदाचित लवकरच काहीतरी लिहिन.

प्रचेतस's picture

9 Dec 2015 - 10:16 am | प्रचेतस

कार्ले लेणीवर लिहिलं नाही अजून.
कदाचित लवकरच काहीतरी लिहिन.

शशिकांत ओक's picture

10 Dec 2015 - 11:53 am | शशिकांत ओक

प्रचेतस,
दोन हजाराच्यावर वर्षांच्या काळाच्या थपडा खाऊन ही वास्तू खूपच ताठपणे उभी आहे असे जाणवते.
सचित्र माहितीपटाबद्दल धन्यवाद... अन्य प्राचीन भारतीय वास्तूंचे आलेखांच्या प्रतीक्षेत...

एक एकटा एकटाच's picture

10 Dec 2015 - 10:21 pm | एक एकटा एकटाच

मस्त फ़ोटो आहेत

यानिमित्ताने एक प्रश्न विचारावासा वाटतो; मंदिरांचे रूपांतर मशिदीत केल्याबद्दल ओरडणारे, तक्रार करणारे आपण हिंदू धर्मीय हे हिंदू धर्मियांनी बौद्ध उपासनास्थळांवर केलेल्या अतिक्रमणांबद्दलही तशीच भूमिका घेऊ का?

लेण्याद्री असो वा कार्ला वा घोरावडेश्वर. वा अगदी बुद्धगया असो. हिंदू धर्मातल्या अंगभूत सहिष्णुतेचे उदाहरण देणार्‍या व्यक्ती ही उदाहरणे का विसरतात? असो.

प्रचेतस's picture

10 Dec 2015 - 11:12 pm | प्रचेतस

अगदी सहमत.

मात्र हे अतिक्रमण थोडेसे वेगळे आहे. ह्या लेण्यांचे हिंदू स्थळांत रूपांतरण बौद्ध धर्म भारतातून पूर्ण नामशेष झाल्यानंतरचे आहे. साधारणत: १६ ते १८ व्या शतकांत ही स्थित्यंतरे तोड़फोड़ न होता बेवसाऊ ठिकाणी झाली. ब्राह्मी लिपि तेव्हा अगम्य असल्याने मूळचे कर्ते कोणाला उगमलेच नाहीत.

अर्थात हल्लीचे हिंदू अतिक्रमण मात्र पूर्णपणे रोखलेच पाहिजे ह्यात काहीच शंका नाही.

या मुद्द्याशीही सहमत.

सतीश कुडतरकर's picture

19 Dec 2015 - 11:29 am | सतीश कुडतरकर

मलाही एकवीरेचे देऊळ तिथे पाहून कसेसे होते. ज्या बुद्धाने अहिंसेचा संदेश दिला त्यालाच समर्पित वास्तूसमोर बळी देताना पाहताना खूप यातना होतात. खरतर एकविरेच्या भक्तांनीच पुढाकार घेऊन या देवळाचे स्थानांतरण केले पाहिजे.

लॉरी टांगटूंगकर's picture

19 Dec 2015 - 11:33 am | लॉरी टांगटूंगकर

मजा आली.