सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
15 Sep 2007 - 1:39 pm | नंदन
गणेशोत्सवाच्या शुभेच्छा.
Get this widget | Share | Track details
नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)
15 Sep 2007 - 6:23 pm | विसोबा खेचर
नंदनशेठ, या गाण्याचा दुवा इथे दिल्याबद्दल तुझे आभार..
दे धम्माल गाणं! ढोलकी सही वाजवली आहे. हे गाणं ऐकताना मला तर लालबागेतले, खेतवाडीतले गणपती पाहात, मस्तपैकी पिपाण्या वाजवत फिरतोय की काय असंच वाटलं! :)
आपला,
(बहुजनसमाजातला) तात्या.
अवांतर -
गणेशोत्सवाच्या काळात लहान लहान फिरस्त्या मंडळींचा रस्त्यावर जो बाजार भरतो त्यात लहान मुलांनी वाजवायच्या पिपाण्या आजही दोन-पाच रुपायाला मिळतात. आम्ही काही मित्रमंडळी एखाद दिवस ठरवून जेव्हा लालबाग, काळाचौकी, खेतवाडी, गिरगाव इथले गणपती बघत जेव्हा रात्रभर फिरतो तेव्हा चक्क या पिपाण्या विकत घेतो आणि भर रस्त्यावरून त्या मोठ्याने वाजवत, मजा करत रात्रभर अक्षरशः सगळा गिरणगाव पोळतो!
सगळीकडे उत्सवाचं वातावरण आणि धमाल असल्यामुळे आणि जो तो उत्सवाच्या मू़डमध्ये असल्यामुळे रस्त्यावरच्या इतर कुणाला त्यात काही वावगं वाटत नाही आणि या वयातदेखील रस्त्यावरून पिपाण्या वाजवत फिरायची हौस भागवता येते! आता काय सांगू तुला नंदनशेठ ती मजा! जाऊ द्या झालं! :)
साला बालपणीचा काळ सुखाचा हेच खरं!
पिपाणीचा विषय निघाला आणि,
"कावला पिपानी वाजिवतो,
मामा मामीला नाचिवतो"
हे लहानपणी ऐकलेलं गाणं उगाचंच आठवलं आणि जीव थोडास्सा झाला! :)
आपला,
(व्रात्य परंतु हळवा) तात्या.
15 Sep 2007 - 2:18 pm | गुंडोपंत
बाप्पा मोरया रे!
वा काय गाणं दिलंय...
वा वा वा!
साला मजा आला!
आपला
गुलाल उधळत धमाल नाचणारा
गुंड्या!
16 Sep 2007 - 10:11 am | प्रमोद देव
मस्त गाणं आहे.
तांदूळ अतिशय महाग होते आणि सामान्यांना परवडण्याच्या पलीकडे होते अशा काळातले हे गीत आहे. गाण्यात ह्याचा उल्लेख आहे.
'नाव काढू नको तांदळाचे,केले मोदक लाल गव्हाचे' ह्या ओळी कालमान दर्शक आहेत.
16 Sep 2007 - 5:16 pm | आजानुकर्ण
यांची गाणी मस्त असतात. सत्यनारायणाची कथा त्यांच्याच तोंडून ऐकावी. ;)
त्यांचं "चल गं सखे चल गं सखे पंढरीला" हे गाणंही धमाल आहे.
17 Sep 2007 - 8:29 am | वरदा
खरच खूप दिवसानि ऐकलं हे गाणं तिथे असताना रेडिओ वर ऐकायला मिळायचं
31 Oct 2007 - 9:27 am | देवदत्त
वा..गाणे ऐकून लहानपणीचे गणेशोत्सव आठवले. आता ही गाणी कमीच ऐकायला मिळतात.
ह्यावर्षी इथे पुण्यातही (?) गणपतीच्या समोर एकदम डिस्को वाली गाणी लावून चित्रविचित्र नाच (
नाहीऽऽऽऽऽ) करत असल्याचे बघून वाईट वाटले.
देवदत्त
(अर्जुनाचा शंख)