झेंडा मराठीचा

गणेशा's picture
गणेशा in जनातलं, मनातलं
2 Feb 2011 - 8:53 pm

महाराष्ट्राच्या मातीमधुनी आवाज उठतो मराठीचा
सह्याद्रीच्या रांगामधूनी सूर्य उगवतो मराठीचा
कीतीही डोंगर पोखरले परक्यांनी तरीही
सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा
कण्हत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये
घुमतो आवाज मराठीचा
एकतेची साद घेवुनी
संवाद मराठीचा
शब्द चिंगार
आवाज मराठीचा
संस्कार दिसे खुलुनी
साजशृंगार माय मराठीचा
हाती तेजोमय तलवार तळपते
रणांगणात गर्जतो यलगार मराठीचा
गरजले परके सारे जरी घरात आपापल्या
नभी उठतो बुलंद आवाज हा ललकार मराठीचा
शिवबाची ज्योत ह्रदयी ठेवतो तेवत, बाणा मराठीचा
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

गणपा यांच्या विशेष सहाय्याने आणि माझ्या या कवितेमुळे हा झेंडा हाती धरता आला, कविता शब्द तेच ठेवुन झेंडा छान केला आहे,
पुन्हा तेच शब्द देत असल्या बद्दल क्षमस्व, आणि चित्र म्हणुन कलादालन की कविता म्हणुन जे न देखे रवी या मध्ये टाकु की त्याच कवितेला रिप्लाय देवु या घालमेल मध्ये सरळ येथे दिली आहे .. गोड माणुन झेंडा पाहुन घ्यावा .
जय महाराष्ट्र ..

कवितारेखाटनआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

2 Feb 2011 - 10:19 pm | आत्मशून्य

पण काव्यरस पाहीजे तसा झीरपला नाहीय असे वाटते. बाकी जाणकार स्तूती करतीलच.

मनापासुन खरा रिप्लाय असेन तर स्तुतीपेक्षा ही तो जास्त सरस असतो ..
पुढील कवितेत/चित्रकवितेत काव्यरस नक्कीच झिरपवेल ही खात्री देतो ...

आत्मशून्य's picture

3 Feb 2011 - 12:14 am | आत्मशून्य

मला कवीतेचा आशय व भगवा झेंड्याचे बनलेले चित्र मनापासून आवडले. माझ्या वैयक्तीक वाचनात हा प्रकार पहील्यांदाच आला म्हणून खूप कल्पक वाटला. पण कवीता थोडी अजून मोठी असावी असे वाटत होते, चटकन संपली म्हणून... तहान नाय भागली.

गणेशा, सकारात्मक प्रतीसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.

आत्मशुन्य शी काहि प्रमाणात सहमत.
गणेशा अजुन कविता येउ देत. टॅलेन्ट आहे तुझ्यात.

मस्तानी's picture

2 Feb 2011 - 11:47 pm | मस्तानी

आवडला हा झेंडा !

मुलूखावेगळी's picture

3 Feb 2011 - 10:24 am | मुलूखावेगळी

छान आहे झेंडा आनि कविता

नरेशकुमार's picture

3 Feb 2011 - 10:48 am | नरेशकुमार

संकल्पना आणि कविता छान आहे.

एक चौकशी,
आमच्या सार्वजनीक मंडळात हा झेंडा/कविता प्रिंट/फ्लेक्स करुन लावली तर चालेल का गणेशा भाउ ?
(खाली तुझे नाव टाकायला विसरनार नाहि)

बिंधास्त तुम्ही कविता वापरु शकता .. काही हरकत नाही.
आणि कोणास तेथे नाव लिहायला हरकत असेल तर नाव न लिहिता ही तेथे लिहिली तरी माझी काही हरकत नाहिये.

ही कविता येथील शब्द बरेच घाईत आले आहेत, थोडे बदल किंवा जे पटत नाहिये निटशे ते नको असेल तर शब्द बदलुन पण देवु शकतो ...

नरेशकुमार's picture

3 Feb 2011 - 1:57 pm | नरेशकुमार

धन्यवाद.

ही कविता येथील शब्द बरेच घाईत आले आहेत,

हे हि नसे थोडके.

थोडे बदल किंवा जे पटत नाहिये निटशे ते नको असेल तर शब्द बदलुन पण देवु शकतो ...

तुर्तास हा बोर्ड करुन लावु, पुढे मागे आपन नविन कविता केलि कि ति लावु.

हर हर महादेव.

इन्द्र्राज पवार's picture

3 Feb 2011 - 11:46 am | इन्द्र्राज पवार

झेंडा तर कल्पक आहेच आहे, पण त्यातील काव्यमयता [जी वीररसाचे प्रबोधन करते] मराठी मनाला चटकन भावणारी आहे. कवितेतील "एकतेची साद घेवूनी...." हा पुकार केवळ वाच्यार्थाने नव्हे तर लौकिकार्थाने प्रत्यक्षात साकार झाला तर ज्या शिवबांचा कविने अखेरीस उल्लेख केला आहे त्यांचे खर्‍या अर्थाने पुण्यस्मरण केल्यासारखे होईल.

थोडेसे अवांतर ~~

१. "कण्हत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये".... इथल्या 'कण्हत्या' संबोधनाचे प्रयोजन काय? सह्याद्री तर कणखर आहे...आणि तुम्हीच म्हणता की, "कितीही डोंगर पोखरले..." तरी तो डगमगलेला नाही...मग कोणत्या कारणामुळे तो 'कण्हत' आहे?

२. "रणांगणात गर्जतो यलगार मराठीचा..." .... या ओळीतील 'यलगार' ही संज्ञा 'यल्गार' अशी जोडून घ्यावी. यल्गार = हल्लाबोल....पण 'यलगार' ही कोल्हापूर-बेळगांव सीमाभागात आढळणारी एक भटकी जमात आहे, जी नंदीवाले, कुडमुडे जोशी किंवा यल्लमाची कथा सांगत गावोगावी हिंडणारे चित्ररथी यांच्या उपगटात नोंद झालेली आहे.

इन्द्रा

इंद्रा जी प्रथमता मनापासुन धन्यवाद.. आपले रिप्लाय .. आपल्या अभ्यासपुर्ण विचारांचा मी फॅन आहे ..
-----------
मुळ मुद्दा :

१. "सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा"....

-> प्रथमता कवितेत ह्या दोन ओळी येतात

कीतीही डोंगर पोखरले परक्यांनी तरीही
सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा

जे परके आहेत त्यांनी कीती ही डोंगर पोखरत आणले .. कीती ही आमची माणसे तोडत आणली फितुर करत आणली .. तरीही मराठी माणसाने आपल्या मना मनात सह्याद्री सांधला आहे ('मना मनात' याचा अर्थ सह्याद्री जो विशाल आहे मग तो कोल्हापुर - पन्हाळ्याचा टोकदार असु द्या, पुरंधर चा विशाल छातीसम असलेला असु द्या नाही तर जुन्नर चा दिमाखदार असुद्या .. ही सगळी ठिकाणे आम्ही सांधली आहेत येथले सर्व माणसे त्यांचे मन एकच आहे).. सह्याद्रीच्या वेगवेगळ्या शिखरांना सेतु ने जोडले आहे .. आणि ह्या सेतु चे नाव आहे 'मराठी' ... म्हणुन सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा.

२. कण्हत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये

तुम्हीच म्हणता की, "कितीही डोंगर पोखरले..." तरी तो डगमगलेला नाही

असे नाहिये.

सह्याद्री आता घायाळ झाला आहे, या सह्याद्रीला ज्यांनी वैभव प्राप्त करुन दिले .. या सह्याद्रीचे लाडके सुपुत्र कधीच अनंतात विलीन झाले आहेत ... अआणि त्या नंतर येथे अनेक स्थितंतरे आली त्यामुळे हा सह्याद्री कण्हत आहे .. अजुनही त्या आठवणींमुळे सह्याद्री भावविव्हळ होतो आहे.. . तरीही त्या लाडक्या सुपत्रांनी रोवलेल्या स्वराज्याचे बीज आम्ही संभाळत आहोत, सह्याद्री डगमगलेला आहे असे बोलायचे नाहिये येथे, सह्याद्री येथे पिता आहे आणि तो सज्ज आहे सर्व गोष्टींसाठी म्हणुनच कण्हत्या सह्याद्रीचय पोटामध्ये घुमतो आवाज मराठीचा तो त्या आठवणी मध्ये कीतीही भावनावश झालेला असला तरी त्यामध्ये आवाज जो घुमतो आहे तो मराठीचा आहे स्वराज्याचा आहे

३. "रणांगणात गर्जतो यलगार मराठीचा.

खरे तर हा शब्द यल्गार असाच लिहायचा होता, चुक झालेली मान्य आहे,
पण तरीही त्यामुळे 'यलगार ' ही जमात आहे हे माहिती झाल्याने छान वाटले, चुक दुरुस्त केली जाईन.

---

आपल्याला मुद्दे पटले नसले तरी असेच योग्य मत -मार्गदर्शन होत राहो ही इच्छा ..

- गणेशा

कच्ची कैरी's picture

3 Feb 2011 - 11:29 am | कच्ची कैरी

मी पवार यांच्याशी पूर्णपणे सहमत आहे .झेंड्याची संकल्पना खूपच छान आहे ,कविता मनापासुन आवडली .

विश्वनाथ मेहेंदळे's picture

3 Feb 2011 - 11:49 am | विश्वनाथ मेहेंदळे

असा प्रकार पहिल्यांदा पाहिला. चमत्कृतीपूर्ण रचना आणि तरीही मनाला भावणारे शब्द.
कविता खूप आवडली. फ्लेक्स वर टाकली तर त्याचे छायाचित्र पाहायला नक्की आवडेल :-)

गणेशा's picture

3 Feb 2011 - 1:42 pm | गणेशा

सर्व प्रथम सर्व मित्र-मैत्रीणींचे मनापासुन आभार ...

काही प्रश्नांची उत्तरे त्या त्या प्रश्नांखाली देत आहे..

---

आणखिन एक हेल्प हवी आहे ...

समजा मला

....... टेक्स्ट लिहायचे आहे
तर पहिले ...... न लिहिता हे टेक्स्ट लेफ्ट साईड पासुन तितक्याच अंतरात आणता येते का ?
मी प्रयत्न केला असता ते लेफ्ट साईड लाच राहते.
असे होत असतील तर नक्कीच आवडेल कविता लिहायला..

- गणेशा

प्रतिसादाच्या/लेखनाच्या खिडकीत डावी कडुन सहावा चौकोन निवडलात,
तर गणेशा तुझ लेखन उजवी कडे सरकेल.
हे अस .:)

गणपा's picture

3 Feb 2011 - 1:55 pm | गणपा

की तुला
______अश्या प्रकारे

_______________लिहायचय ?

मला असे हवे आहे मित्रा.
हेच मला काल विचारायचे होते.. नेमके खुप काम आले आणि राहुन गेले होते.

तुझे मनापासुन आभार .. हे असे करता येते हे पाहुन मला खुपच आनंद झाला आहे ...
आताच काही तरी चित्र काडावे असे झाले आहे

वाहीदा's picture

3 Feb 2011 - 2:35 pm | वाहीदा

पण ,
कण्हत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये
घुमतो आवाज मराठीचा

यात कण्हत्या हा शब्द काढून दुसरा छान सह्याद्री ला साजेसा शब्द घातलात तर उत्तम !!
यल्गार ऐवजी एखादा मराठी रांगडा हल्लाबोल शब्द घालावा .
इन्द्राच्या प्रतिसादास सहमत .

वाहिदा जी आभार .

आपला मुलगा आपल्या जवळ नाहिये
या अर्थाने बापाचे मन धुमसत आहे, त्याची ती अवस्था दाखवण्याचा एक प्रयत्न येथे 'कण्हत्या' ह्या शब्दातुन व्यक्त केला होता .
शब्द छान वाटत नसल्यास बदलतो , बदलण्या पेक्शा कोणी सुचवला तरी जास्त आनंद वाटेन
परंतु तरीही तो शब्दच जास्त न्याय देतो आहे असे मला राहुन राहुन वाटत आहे.

अवांतर :

'कण्हता' ही कल्पना आपल्या लाडक्या सह्याद्रीला कदाचीत योग्य वाटत नाहिये असे वाटते आहे ना सर्वांना ?.. त्याचा बाणेदार पणा .. कणखर पणा आपण पाहिलेला आहे मान्य .. पण या शब्दामुळे त्याचे शौर्य नक्कीच धोक्यात नाही आले पाहिजे.
या शब्दामुळे ते झाकोळले जाते आहे का ?

डावखुरा's picture

3 Feb 2011 - 5:28 pm | डावखुरा

खुप छान्न्न...

सहज बघितलं तर 'झेंडा मराठीचा' ही कविता त्याच्या खालच्या कॉमेंट सकट (गणपांचा उल्लेख सुद्धा) जशीच्या तशी छापली आहे.
http://www.marathiadda.com/profiles/blogs/2437740:BlogPost:338494

गणेशा, वरिल दुव्यातला ब्लॉग तुमचा आहे का?

गणेशा's picture

4 Feb 2011 - 11:04 am | गणेशा

नाहि वरील ब्लॉग माझा नाहिये.
..
बाकी येथे तरी कवी चे नाव लिहिले नाहिये .. बर्‍याच ठिकाणी दुसर्‍या नावानेच असतात कविता आणि लेख .
चालायचेच ..
आपण लिहिण्याचा आनंद घ्यायचा .. वाचायचा आनंद घेत रहायचा.. बस्स.

तुम्ही मुग गिळून गप्प बसलात तर हे प्रितम सारखे लोक आणखिन बोकाळतिल
प्रितम प्रभाकर थाळे आहे त्या माणसाचे नाव
शोधून काढा आधी त्याला अन सणसणित उत्तर द्या

अमोल केळकर's picture

4 Feb 2011 - 9:28 am | अमोल केळकर

कवितेतून केलेली झेंड्याची रचना आवडली

अमोल केळकर

यशोधरा's picture

4 Feb 2011 - 9:36 am | यशोधरा

असेच म्हणते.

ज्ञानराम's picture

5 Feb 2011 - 5:10 pm | ज्ञानराम

हो फार छान रचना .. कवितेची आणी झेंड्याचीही...

नमस्कार गणेशा, कविता व कला या दोन्ही तु उत्तम सांभाळल्या आहेत. कुणा संगणक हस्ताक्षर तज्ञाकडुन अक्षरे थोडी तिरपी करुन घेता येतील का पाहा.

आणि तुमचं लिखाण चोरीला जात असेल तर गप्प बसु नका, इथे http://www.valuemyweb.com/ तुमच्या ब्लॉगची व लिखाणाची किंमत किती आहे ते पहा आणि मग बोला लिखाणाच्या आनंदाबद्दल वगैरे. माझ्या फेसबुकच्या ग्रुप मध्ये असे चोरलेले लिखाण मी सरळ सरळ उडवतो मग भांडणं झाली तरी चालतील.

४ महिन्यांत माझा ब्लॉग $ ४३७ एवढा झाला आहे, ही कींमत मला आज कुणी देणार नसेल, पण इतर देशांत व भाषांत असे ब्लॉग खरेदी विक्रीचे पण व्यवहार चालतात, पण तुमचं स्वःताच्या लिखाणाची किंमत एवढी उतरवु नकोस की त्याचा कचरा होईल.

तुझा ब्लॉग कॉपिराईट प्रोटेक्ट करुन घे तसेच राईट क्लिक डिसेबल करुन घे.

हर्षद.

खूप आवडली.
बहुमताप्रमाणे "कण्हत्या" ऐवजी "धुमसत्या" "उसासत्या" "घायाळ" असा एखादा शब्द बसेल का?