नभी उठतो बुलंद आवाज मराठीचा

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
29 Dec 2010 - 5:48 pm

-------------------नभी उठतो बुलंद आवाज मराठीचा---------------------------

महाराष्ट्राच्या मातीमधुनी आवाज उठतो मराठीचा
सह्याद्रीच्या रांगामधूनी तेजसूर्य उगवतो मराठीचा

नजरेच्या तीराने ही घायाळ होतो दुश्मन येथे
शिवबाची ज्योत ठेवतो तेवत, बाणा मराठीचा

कीतीही डोंगर फोडले परक्यांनी तरीही
सह्याद्री सांधतो मनात, हा मान मराठीचा

गरजले सारे जरी घरात आपापल्या
नभी उठतो बुलंद आवाज मराठीचा

कण्हत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये
घुमतो आहे आवाज मराठीचा
तेजोमय तलवार तळपते
येथे ललकार मराठीचा

विवेधतेतला नाद
साज मराठीचा

एक चिंगार
मराठीचा

गणेशा

वीररसकविताभाषा

प्रतिक्रिया

गणेशा's picture

29 Dec 2010 - 5:52 pm | गणेशा

वरती शब्दांच्या झेंड्याला भगवा कलर दिला होता , पण प्रकाशित केल्यावर तो दिसत नाहिये .
कसे देतात टेक्स्ट ला कलर ? मंडळ देवु शकेन का तसा रंग.

अवलिया's picture

29 Dec 2010 - 5:54 pm | अवलिया

भगव्या रंगाला बंदी असावी ;)

प्रकाश१११'s picture

29 Dec 2010 - 5:54 pm | प्रकाश१११

नजरेच्या तीराने ही घायाळ होतो दुश्मन येथे
शिवबाची ज्योत ठेवतो तेवत, बाणा मराठीचा

कीतीही डोंगर फोडले परक्यांनी तरीही
सह्याद्री सांधतो मनात, हा मान मराठीचा

वा ..!! क्या बात !!..मस्त ..आवडला मराठी बाणा .

डावखुरा's picture

1 Feb 2011 - 4:28 pm | डावखुरा

मस्त शब्द्च्छल....

स्वानन्द's picture

1 Feb 2011 - 7:48 pm | स्वानन्द

शब्दसंख्येचा उतरता क्रम ही कल्पना छान. कविता ही छान :)