"डान्राव" व काही "मुक्ताफळे"........

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
13 Oct 2010 - 12:21 pm

नुकताच डान्रावांचा "रजनीकांत" व काही "मुक्ताफळे"...... हा लेख वाचायला मिळाला. मग मी व माझ्या एका विक्षिप्त मैत्रिणीने डान्रावांविषयीचीच मुक्ताफळं लिहायचं ठरवलं. अदिती आणि मी दोघांनी कोलॅबोरेशन करून लिहिलेली असली तरी खालील यादी अपूर्ण आहे. तेव्हा आपल्याला माहिती असलेली, नसलेली, मुक्ताफळं लिहून जरूर भर घालावी.

- डान्रावांच्या खरडी इतक्या मोठ्या असतात की एकदा त्यांनी लिहायला घेतलं तेव्हा कॉंप्युटरमधले १ आणि ० च संपले.
- एकदा डान्रावांनी 'तुमच्या प्रजातीचं रक्षण कसं करावं याबद्दल मी एक मोठा लेख लिहिणार आहे, काळजी करू नका' असा एक वायदा केला होता - डायनॉसॉरना.
- तुमची बोटं टंकून दुखतात, डान्रावांचा कीबोर्ड टंकून थकतो पण प्रतिसाद अर्धाच झालेला असतो.
- तुम्ही धागा वाचून, धाग्याला काय उत्तर द्यायचं याचा विचार करेपर्यंत डान्रावांचा मेगाबायटी, अभ्यासपूर्ण प्रतिसाद टंकून तयार असतो.
- फक्त डान्रावांना मोकळेपणाने विचारांची रूपरेखा मांडता यावेत म्हणून मिपाच्या सर्व्हरचं अपग्रेडेशन झालं.
- डान्रावांचे धागे वाचून आपल्याला डान्रावांच्याच आधीच्या धाग्यांची आठवण येते.
- डान्रावांचे केस इतके लांब आहेत की जोराचा वारा आला की पृथ्वीभोवती गुंडाळले जाऊन ते त्यांच्या नाकाला लागतात.
- पस्तीस रुपयांत केस कापून देणार, अशी पाटी असलेलं दुकान डान्रावांनी बंद पाडलं. तिथे काम करणाऱ्या न्हाव्याने खाली पडलेल्या केसांचाच गळफास करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 'केसाने गळा कापला' असं तो ओरडत होता असं ऐकणारे सांगतात. तेव्हापासून त्या शहरात कुठच्या पाट्या लिहायच्या याचे सर्वाधिकार डान्रावांना मिळालेले आहेत.
- पंजाब आणि राजस्थान यांच्या पाट्या देखील लिहू अशी धमकी दिल्याबरोबर बीसीसीआयने त्या टीम्स रद्द केल्या. दुर्दैवाने बीसीसीआयला डान्रावांच्या वायद्यांविषयी माहिती नव्हती....नाहीतर कायदेशीर तरतूदींचा अभ्यास करण्याची वेळच त्यांच्यावर आली नसती.
- तुम्ही वादविवादातात आपली बाजू कमकुवत असेल तर शेपूट घालता; इतरांना बोलण्याची संधी देण्यासाठीच डान्राव 'शेपूट घातले आहे' असा संक्षिप्त प्रतिसाद देतात.
- डान्रावांच्या बटांना इतका झगझगीत रंग लावलेला आहे की त्यांवरून परावर्तित होणारे किरण सूर्याचं तापमान वाढवतात.
- रजनीकांत मिपावर यायला घाबरतो, कारण तिथे डान्राव आहेत.

विनोदमौजमजासद्भावनाशुभेच्छा

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

13 Oct 2010 - 7:14 pm | नगरीनिरंजन

डान्राव इतके तेजस्वी आहेत की त्यांचे सगळे फोटो पांढरेफटक येतात.

मुक्तसुनीत's picture

13 Oct 2010 - 5:00 pm | मुक्तसुनीत

प्रस्तुत ठिकाणी डॉन्रावांबरोबर आमची देखील समाधी बांधावी. आम्ही या पुरात वाहून गेलेलो आहोत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Oct 2010 - 5:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आपण डान्रावांएवढेच प्रसिद्ध आणि कर्तबगार आहोत हे दाखवण्याचा एक क्षीण, ही&ही प्रयत्न!

गांधीवादी's picture

13 Oct 2010 - 5:12 pm | गांधीवादी

डान्राव जिथे उभे रहतात, लायिन तिथुनच सुरु होते.

प्रियाली's picture

13 Oct 2010 - 5:24 pm | प्रियाली

:)

घासकडवींचे काही खरे नाही, छोटा डॉन खर्‍याचे खोटे करू शकतो.

मिसळभोक्ता's picture

14 Oct 2010 - 7:00 am | मिसळभोक्ता

डान्रावांमुळे संदीप खर्‍यांचा विजू खोटे होतो.

इन्द्र्राज पवार's picture

13 Oct 2010 - 5:26 pm | इन्द्र्राज पवार

डॉनराव आणि सचिन तेंडुलकर यांच्या लोकप्रियतेचा आलेख सातत्याने चढताच आहे हे दिसून येते आणि दोघेही या क्षणी बंगलोरमध्येच आहेत हाही एक विलक्षण योगायोगच !!

(इथेही साम्य दर्शविताना सचिनच्या अगोदर डॉन यांचे नाव आपसुकच टंकले गेले आहे....)

इन्द्रा

केशवसुमार's picture

13 Oct 2010 - 6:24 pm | केशवसुमार

मला चिमटा काढा रे..
इंद्राने फक्क्क्त्त्त ३ ओळीचा प्रतिसाद दिला... हे कस शक्य आहे?
(अचंबीत)केशवसुमार
चोता दोन ह्याना समर्पीत धागा आहे आणि फक्क्क्क्क्त्त्त्त ३ ओळी.. इंद्रा हा चोता दोन ह्यांचा अपमान आहे..
चोता दोन तुझ्या कडे बघून घेतील.. (ते नुसत्या बघण्याने महाभारतातले अनेक चमत्कार करू शकतात हे.वे.सा.न.ला.)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Oct 2010 - 6:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

इन्द्राच्या प्रतिसादात माहितीतही चूक आहे. तेंडल्या बंगळुरूत असला तरीही डान्राव पुण्यात आहेत (अशी आतल्या गोटातली खबर आहे.)

इन्द्राचा आयडी हॅक होण्यात पराचा हात आहे असं डान्राव मला कालच सांगत होते.

केशवसुमार's picture

13 Oct 2010 - 6:46 pm | केशवसुमार

अदितीतै.. काय हे तुम्हाला इतक कस कळत नाही.. चोता दोन जिथे असतात ते बेंग्लोर अस इंद्राला सुचवायचे आहे..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Oct 2010 - 6:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वारी शक्तीमान, चुकले! मी 'शेपूट घातल्याचं' जाहिर करत आहे.

इन्द्र्राज पवार's picture

13 Oct 2010 - 7:31 pm | इन्द्र्राज पवार

"....इन्द्राच्या प्रतिसादात माहितीतही चूक आहे...."

~~ हे कसं शक्य आहे, मी स्वतः तेंडल्या मॅन ऑफ दि सीरिजची ट्रॉफी उंचावून डॉन्रावांना दाखवित होता ते आम्ही इथे कोल्हापुरात बसून पाहिलं ना.... आणि गॅलरीतील लांब केसाची ती व्यक्ती 'जया प्रदा' नक्कीच नव्हती.....आता तर्कशास्त्रानुसार जर 'ती दाट केशसंभारवाली व्यक्ती तिथे गॅलरीत उभे राहून सचिनला हातवारे करीत होती, अन् जर ती जयाप्रदा नसेल तर ती मग नक्कीच डॉन्रावच असणार यात संदेह नाही...मग जर ते डॉन्राव असतील तर मग पुण्यात आलेली व्यक्ती कोण? हे पाहणे अदितीचे काम !

इन्द्रा

परिकथेतील राजकुमार's picture

13 Oct 2010 - 7:38 pm | परिकथेतील राजकुमार

मग जर ते डॉन्राव असतील तर मग पुण्यात आलेली व्यक्ती कोण?

तो डान्रावांनी बनवलेला रोबो असु शकतो.

नितिन थत्ते's picture

13 Oct 2010 - 7:53 pm | नितिन थत्ते

निषेध !!!!

डान्राव एकाच वेळी बेंगालूरु आणि पुणे या दोन्ही (किंवा अधिक) ठिकाणी असू शकत नाहीत असे म्हणणे हा डान्रावाचा अपमान आहे.

प्रियाली's picture

13 Oct 2010 - 6:28 pm | प्रियाली

यालाच डॉन्रावांची किमया म्हणतात. त्यांच्या केवळ नावानेच इंद्रा तीन ओळींचा प्रतिसाद देतो.

ऐकारे, पुढल्यावेळेस इंद्रराजकडून थोडक्यात उत्तर हवे असेल तर डॉन्रावांचे नाव तुमच्या प्रतिसादात किंवा प्रश्नात टाका.

इन्द्र्राज पवार's picture

13 Oct 2010 - 7:37 pm | इन्द्र्राज पवार

नाही ओ, प्रियालीताई....तसं काही मी करणार नाही. माझे प्रतिसाद हे नेहमीच्याच धाटणीचे राहतील. तुम्ही "थोडक्यात पाहिजे असेल तर...." असे म्हणता, पण हत्ती कितीही रोडावला तर गाढव कधीच होणार नाही. त्याच न्यायाने अन्य धाग्यावर माझे प्रतिसाद राहतील. आता डॉन-चालिसामध्ये माझ्याकडून आणखी किती भर घालायची ! मुळात गंगा दुथडी भरून वाहत चालली आहे हे तुम्ही पाहाताच.

इन्द्रा

प्रियाली's picture

13 Oct 2010 - 10:24 pm | प्रियाली

माझ्या प्रतिसादात डॉन्रावांचे नाव होते. इंद्राचा वरचा प्रतिसादही फक्त ३ ओळींचा. ;)

इन्द्र्राज पवार's picture

13 Oct 2010 - 7:23 pm | इन्द्र्राज पवार

अहो केशवराव....प्रतिसाद प्रदीर्घ झाला असता, पण या अगोदरचे "डॉन-महात्म्य" वाचून मी त्या प्रवाहात पुरता वाहून गेलो, गुदमरलो म्हणा ना....अशाने की एखाद्या सदस्याचा (जरी संपादक मंडळातील असला तरी...) टीआरपी इतक्या हाय लेव्हलचा असू शकतो, ही बुचकाळ्यात टा़कणारी सिच्युएशन होऊ शकते, नेमक्या त्याचवेळी तिकडे बेंगलोरात सचिनच्या नावाचा उदोउदो चालल्याचे नीओवर पाहातच होतो आणि दोन्हीतील प्रसिद्धीचे साम्य पाहून अंमळ चकितच झालो होतो. सबब तो योगायोग नोंद करण्याच्या दृष्टीनेच या अगोदरचा प्रतिसाद होता.

खुद्द डॉन्राव स्वतः हा कोणत्याही प्रकारचा अपमान समजत नसतील अशी आशा आहे, त्यामुळे तुम्ही म्हणता तसा महाभारतसदृश्य चमत्कार, निदान माझ्याबाबतीत तरी ते करण्याचा विचार करणार नाहीत.

इन्द्रा

मस्त कलंदर's picture

13 Oct 2010 - 5:34 pm | मस्त कलंदर

चोता दोनने डिझाईन केलेल्या इंजिनात त्यांचे गळलेले केस सापडतात!!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Oct 2010 - 5:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

डिझाईन नव्हे डिसाईन म्हणा!

राजेश घासकडवी's picture

13 Oct 2010 - 5:48 pm | राजेश घासकडवी

डान्राव इतके मुलखाचे वायदेआजम आहेत की नावातल्या 'मे' आणि 'कॅन' या शब्दांनी हुरळून जाऊनच त्यांनी 'मेकॅनिकल' ला अॅडमिशन घेतली. ते इंजिनिअरींग आहे हे त्यांच्या नंतर लक्षात आलं.

विजुभाऊ's picture

14 Oct 2010 - 11:27 am | विजुभाऊ

मे ,कॅन ,आणि निकाल

एका शेतकर्‍यावर देव प्रसन्न झाला, म्हणाला ३ वर माग. शेतकरी म्हणाला मला लाख एकर जमीन दे , लाख गाई गुरं दे आणि त्यांची देख्भाल करण्यास आवश्यक नोकरबळ दे. देव म्हणाला तथास्तु. झालं शेतकरी श्रीमंत झाला. पण त्याला एकच राक्षस नोकर म्हणून मिळाला. त्या राक्षसाची ही खूबी होती की तो कामाशिवाय बसू शकत नसे. शेतकरी म्हणाला ही लाख एकर जमीन नांगर आणि क्षणात त्या राक्षसाने ती नांगरली. राक्षस म्हणाला "मला काम दे नाहीतर मी तुला खाणार" अशा रीतीने कोणतच काम त्या राक्षसाला पुरं पडेना.
मग शेतकरी गेला डान्रवांकडे. डान्राव म्हणाले "चिंता करू नकोस" त्यांनी केसाची बट दिली. राक्षसाला तिची लांबी मोजायला सांगीतली. तो राक्षस कवाचा लांबी मोजतूया मोजतूया..........पन बट काही केल्या संपतच नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

13 Oct 2010 - 5:50 pm | परिकथेतील राजकुमार

कोण डान्राव ?

परा भयंकर

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Oct 2010 - 5:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =))
पर्‍या म्हणजे ना :-)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
तरी कर्कु तोचि अक्षु। आय्डीभेदु बदलु।
मिपांतु तो मनोगतु।मोडकु मिरवे॥

परिकथेतील राजकुमार's picture

13 Oct 2010 - 5:56 pm | परिकथेतील राजकुमार

मिपांतु तो मनोगतु।मोडकु मिरवे॥

इथे 'शिष्य मोडकु' असा बदल सुचवतो. हा खास शब्द का सुचवला आहे ते मोडक सांगतीलच ;)

परिकथेतील राजकुमार's picture

13 Oct 2010 - 5:59 pm | परिकथेतील राजकुमार

पर्‍या म्हणजे ना

अगं खरंच..!

मी नाही ओळखत कुणा डान्रावाल! कोण हा???

परात्या.

गांधीवादी's picture

13 Oct 2010 - 5:52 pm | गांधीवादी

डान्राव संगनकातिल तबकडि स्वतः हाताने फिरवीतात. खुप जोरात फिरवितात त्यामुळे डाटा खुप पटापटा वाचला जातो.

गांधीवादी's picture

13 Oct 2010 - 5:55 pm | गांधीवादी

न्युटनचा तिसरा नियम त्यांना लागु होत नाहि. त्यांनी कितिहि जोरात गुद्दा दिला तरी समोरच्याकडुन कधिच काहिहि प्रतिक्रिया येत नाहि.

गांधीवादी's picture

13 Oct 2010 - 5:57 pm | गांधीवादी

डान्राव एकाच वेळेस, एकाच हाताने, एकाच कळफलकावर, ४ वेगवेगळ्या संस्थाळावर टंकन करतात.

डान्राव फुग्यामध्ये व्हॅक्युम दाबुन दाबुन भरुन फुगवितात.

गांधीवादी's picture

13 Oct 2010 - 6:22 pm | गांधीवादी

डान्रावांच्या गाडिचे टायर्स कधिच पंचर होत नाहित, कारण ते कधी गाडि वापरतच नाहित, ते सगळि कामे बसल्याबसल्याच करतात.

गांधीवादी's picture

13 Oct 2010 - 6:28 pm | गांधीवादी

डान्राव इकडे तिकडे हालचाल करतात त्यामुळे समुद्राला भरति आणि ओहोटी येते. (प्रतिसाद क्र. ९९)

गांधीवादी's picture

13 Oct 2010 - 6:35 pm | गांधीवादी

डान्राव हे छोटे का आहेत महित आहे का ? जर का मोठे झाले तर ह्या विश्वात त्यांना जागा पुरनार नाहि.
(हा १०० वा. प्रतिसाद. डान्राव राग मानुन घेउ नये, हि विनंती)

राजेश घासकडवी's picture

13 Oct 2010 - 7:03 pm | राजेश घासकडवी

परा-नाना प्रोत्साहन मंडळाच्या नव्या पॅकेजमध्ये गांधीवादींचाही समावेश करावा अशी मी शिफारस करतो.

मितभाषी's picture

13 Oct 2010 - 6:37 pm | मितभाषी

हा १०१

आदिजोशी's picture

13 Oct 2010 - 6:49 pm | आदिजोशी

अरे किती माराल डाण्याची???????????????????

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Oct 2010 - 6:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आधी स्वतः होलसेलमधे त्याचा बाजार उठवल्यावर मग हे पुन्हा .... अल्लाऽऽऽ जीव गेला.

गांधीवादी's picture

13 Oct 2010 - 6:52 pm | गांधीवादी

बदनाम हुये तो क्या हुआ आखिर नाम तो हुआ.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Oct 2010 - 6:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

डान्रावांबरोबर आपलं नाव छापून आलं की आपली प्रसिद्धी होते.

(डान्रावांची राको)

गांधीवादी's picture

13 Oct 2010 - 6:58 pm | गांधीवादी

डान्रावांनां बुद्धिबळात कोनिहि हरवु शकत नाहि. कारण, त्यांच्या प्रत्येक सोंगटि मध्ये वजिरा इतकिच पॉवर असते.

आप्पा's picture

13 Oct 2010 - 7:29 pm | आप्पा

सॉरी मि. शिवाजीराव ऑफ कोल्हापुर (व्हाया बेंगरुलु टु चेन्नाई) तुम्ही दुसर्‍या नंबरवर आहात.
एक नंबर अर्थातच छोटा डान
पण कुणीतरी त्यांचा फोटु टाका राव.

छोटा डॉन's picture

13 Oct 2010 - 7:33 pm | छोटा डॉन

चेष्टा , मज्जा, थट्टा, विरंगुळा, टाईइमपास आदी शब्दांचा अर्थ मला उत्तम समजतो.
अर्थात काही लिमिट्समध्ये माझी त्याला ना नाही.

पण "फोटो" वगैरे गोष्टी अती होतात.
हे माझ्या वैयक्तिक आवडीच्या व प्रायव्हसीच्या विरोधात आहे, अशा बाबी मला अजिबात आवडणार नाहीत हे निक्षुन सांगतो.

सदर धाग्यात कुणीही कसलेही फोटो टाकण्याचा प्रयत्न करु नये ही नम्र विनंती.
मस्करीची कुस्करी होऊ नये हीच सदिच्छा !!!

धन्यवाद !

- छोटा डॉन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Oct 2010 - 8:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे पहा आमचे डान्राव:

अरे येऊन येऊन येणार कोण, डान्राव, डान्राव!!

गुगलबाबाला "chhota don" विचारलं असता हे दिसलं:

आणि "छोटा डॉन" विचारलं तेव्हा हे दिसलं:

अर्थातच डान्राव सर्वज्ञानी, सर्वव्यापी (स्वारी प्राजु) आणि सर्वसर्चेबल असल्यामुळे हे तिन्ही फोटो डान्रावांचेच आहेत यात मला अजिबात सौंशय नाही.

अवांतरः 'चोता दोन' अशी चौकशी केल्यावर (मीच केलेल्या) पोळ्यांचा (मीच काढलेला) फोटो दिसला.

एक पोळी केली की .. दुसरी साठी तुमच्याकडे तवा पण बदलतात का ?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Oct 2010 - 10:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

त्या दोन्ही चित्रांमधे एकच पोळी आहे. फक्त डावीकडे ती पोळपाटावर आहे आणि उजवीकडे तव्यावर! :-)

मुक्तसुनीत's picture

13 Oct 2010 - 10:26 pm | मुक्तसुनीत

आणि ताटात कुस्करली की मस्करीची कुस्करी होते.

एक पोळी केली की .. दुसरी साठी तुमच्याकडे तवा पण बदलतात का ?

आमच्याकडे एक पोळी झाली की खाणार तोंडच बदलतात. :(

प्रियाली's picture

13 Oct 2010 - 10:32 pm | प्रियाली

आमच्याकडे एक पोळी झाली की खाणार तोंडच बदलतात.

धडावरचं की पाट/डायनिंग खुर्चीवरचं (म्हणजे जेवायला बसलेलं)?

खुर्चीवरचं हो. ते दहा तोंडे असलेले मानव की दानव फक्त तुमच्या रामायणात. ;-)

प्रियाली's picture

13 Oct 2010 - 10:40 pm | प्रियाली

दहा तोंडे असलेले मानव की दानव फक्त तुमच्या रामायणात

दहा तोंडी मानव/दानव रामायणापेक्षा मराठी संकेतस्थळांवर मुबलक आढळतात.

परिकथेतील राजकुमार's picture

13 Oct 2010 - 7:38 pm | परिकथेतील राजकुमार

....

चित्रा's picture

13 Oct 2010 - 11:03 pm | चित्रा

हसून हसून पुरेवाट.

विजुभाऊ's picture

14 Oct 2010 - 11:31 am | विजुभाऊ

हा धागा खरडफळा आहे असे डिक्लेअर करावा आशी इनन्ती समपादक मंडळाला

सुत्रधार's picture

14 Oct 2010 - 12:28 pm | सुत्रधार

जन्गलात ढाण्या वाघ...
जालात डॉन्या राव...

भाऊ ठाकुर's picture

14 Oct 2010 - 1:42 pm | भाऊ ठाकुर

१.डॉन्राव जेवल्यावर 'केळीच्या पानाचा' विडा खातात

२.त्यांच्यासाठी विडा बनवण्यात पानवाल्याच्या तीन पिढ्या पान लावता लावता 'कामी' आल्या

३.त्यांच्या विड्यात 'सुपारी' नाही , अख्खा 'नारळ' घालतात.

भाऊ ठाकुर's picture

14 Oct 2010 - 1:48 pm | भाऊ ठाकुर

डॉन्राव कशाला फोटूची काळजी करताय

तुमचा फोटू 'मावेल' अस्सा क्यामेराच बनाला नाहीये.

म्हणजे मेगाबाईट्,गिगाबईट्,टेराबईटींपेक्षा , आपलीच 'बाईट' लई 'मोठ्ठी' असते....
कसं...;)

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Oct 2010 - 4:17 pm | llपुण्याचे पेशवेll

डानरावांवर हीन दर्जाची चिखलफेक केल्याबद्दल मिपाकरांचा तीव्र निषेध.
(आम्ही चांगल्या दर्जाची चिखलफेक केली होती हो)
ज्याना डानरावांचा फोटो बघायचा आहे त्यानी मिपावर शोध घ्यावा कट्ट्याच्या धाग्यांवर त्यांचे फोटो मिळतील. .

इंटरनेटस्नेही's picture

15 Oct 2010 - 1:27 am | इंटरनेटस्नेही

डान्राव दारु पेग ने नाही टँकर ने पितात!

३०,००० लिटर स्मॉल पेग,

६०,००० लिटर लार्ज पेग,

१,८०,००० लिटर म्हणजे एक क्कॉर्टर असते त्यांची!

(डॉन्रावां बरोबर आयुष्यात एकदा तरी बसण्याची मनिषा असलेला) इंट्या.

मी-सौरभ's picture

15 Oct 2010 - 7:07 pm | मी-सौरभ

या धाग्यावरील सर्व प्रतिसाद आणि सर्व उप प्रतिसाद ही डॉनरावांनीच टंकले आहेत.

दिसणारे आय डी वेगळे आहेत ही पण त्यांचीच कला आहे. :)

- एक उपरा संपादक

गांधीवादी's picture

15 Oct 2010 - 7:45 pm | गांधीवादी

सर्व चराचरात डान्राव , सर्व व्यापी विश्वात डान्राव,
अणूत डान्राव, रेणूत डान्राव, न्युट्रॉन्स मध्ये डान्राव, प्रॉटॉन्स मध्ये डान्राव, ईलेक्ट्रॉन्स मध्ये डान्राव, ब्लॅक होल मध्ये डान्राव, व्हाईट होल मध्ये डान्राव, जिकडे अजुन कुठ्ले होल (म्हणजे पिवळे, लाल, नारंगी) तिकडे डान्राव, hydrocolloid मध्ये डान्राव
मिपा डान्राव, बकि इतर संकेत स्थळ डान्राव, त्यांचे प्रतिसाद डान्राव,
windows डान्राव
C डान्राव
C++ डान्राव
drupal डान्राव
hard disk डान्राव
RAM डान्राव
CPU डान्राव
CPU FAN डान्राव
डान्राव डान्राव डान्राव डान्राव

ब्बास अजून काही ?