गूढ कथा: कालग्रहांचे भविष्यआरसे (भाग २)

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
7 Sep 2010 - 9:11 pm

त्याच दिवशी मरिन ड्राईव्ह वर एक जोडपे बसलेले होते. त्यातल्या पुरुषाला त्या स्त्रीबद्दल कोणतेच आकर्षण अचानकच वाटेनासे झाले. स्त्रीलाही तसाच अनुभव येवू लागला. एकमेकांबद्दल त्यांना उलट एक प्रकारची घृणा वाटायला लागली. ही मनातली भावना नवीनच होती. त्या दिवशी लग्न झालेले एक जोडपे. त्यांना सुद्धा असाच अनुभव आला. त्यांच्या लग्नात हातावर मेंदी काढण्यासाठी लाख प्रयत्न करूनही कुणालाच मेंदी काढता येणे शक्य झाले नाही. नव वधूला साज शृंगाराचा कधी नव्हे एवढा तिटकारा वाटायला लागला.

त्या दिवशी भराभर अ‍ॅक्सिडेंट होवू लागले. जणू काही माणसांमधली सहनशक्ती संपली होती. रांगेत उभे राहाण्यास लोक नकार देवू लागले. रांगेतल्याच एकमेकांच्या जीवावर उठू लागले.

काही ठीकाणी उलट चित्र होते.

किरणला सकाळी सात वाजता एके ठीकाणी मुलाखतीस जायचे होते. सातची बेल वाजल्यानंतर बेडवरून उठून उभे राहाण्यासाठी तो प्रयत्न करायला लागला. आश्चर्याची गोष्ट अशी की त्याची हालचाल इतकी मंदावली की त्याला स्वतःवर विश्वास बसत नव्हता. साडेसात वाजून गेले तरी तो फक्त उठून उभे राहू शकला. अशा पद्धतीने त्याची हालचाल मंदावली होती की जणू काही एक चालते बोलते प्रेत. त्याला ब्रश पर्यंत पोहोचायला साडेआठ वाजले होते. त्याचे रूम मेट्स सकाळीच निघून गेलेले होते. कुणी त्याला असे हळू चालतांना पाहिले नाही....किरण पुढे रस्त्यावर दुपारी दिसायला लागला. बसमध्ये त्याला चढणे शक्य होते नव्हते....आणि मग व्हायचे तेच झाले....!!!

सार्वजनिक ठीकाणी घडलेल्या अशा विचित्र अजब गोष्टी राहुल टी.व्ही. वर बघत होताच.

राहुलः "डॅन, तिकडे अमेरीकेत काय चाल्लंय? सारखंच आहे का? "

डॅनः "थोड्या फार फरकाने असेच चित्र आहे. मित्रा. विधाता असे खेळ का खेळतो आपल्याशी? "

राहुलः "मित्रा आठव ते दोन घड्याळांचे चित्र. प्रत्येक आकड्याच्या ठीकाणी एकेक ग्रह. २०१२ चे माया सभ्यता चे लोक थोडेफार अंदाज बांधू शकले. पण त्यांचा काळाचा अंदाज चुकला. आणि त्यांनी फार संकुचीत विचार केला.

पण सातमन या साधूने अनेक भिंतींवर लिहून ठेवलेले ते सर्व्....त्याचा अर्थ लागतोय असे वाट्ते आहे. "

डॅनः "राहू! अजून निष्कर्षा पर्यंत पोहोचण्या आधी शास्त्रज्ञांचे अवकाश निरिक्षणाचे अहवाल येवू देत...."

*****

प्राचीन भारतात एका पर्वतरांगांजवळच्या गुहेत- १०११ च्या आसपासचा काळ..

दोन साधू तपश्चर्या करत होते. लोक म्हणत ते सिद्ध पुरुष होते. आजच्या विज्ञालाही शक्य नसेल एवढे वेगवेगळे शोध त्यांनी केवळ मनाने लावले होते असे ही ऐकीवात होते.

आपले मानवी मन मोठे अजब असते. क्षणत इथे तर क्षणात दुसरीकडे. त्यापैकी सातमन हा साधू कित्येक दिवसापासून ध्यान लावून बसला होता. अनेक म्हणत की तो भविष्य जाणतो. तो जेव्हा डोळे उघडेल तेव्हा नक्की सगळ्यांना काहीतरी अभूतपूर्व घडणार होते हे नक्की. अनेक दिवसांच्या तपश्चर्येनंतर त्याने डॉळे उघडले. त्याच्या डॉळ्यात भीतीदायक चमक होती. त्याच्या अंतर्मनाने जे पाहीले ते असे होते की त्यानंतर पुढे बघण्याची त्याची इच्छा उरली नव्हती. फक्त त्याचा शिष्य वाचनाम याला त्याने ते सांगितले. सातमन ने अशी सिद्धी मिळवली होती की तो विचारांद्वारे मनाला काही मिनिटांत अंतराळात कोठेही पोहोचवता येत असे. ती सिद्धी ते शिष्याला शिकवीतच होते, पण त्या दिवशी त्यांनी जे पाहिले त्यानंतर ते पाहिलेले शिष्याला सांगून ते समाधिस्थ झाले. वाचनाम याने ते प्रचंड मोठ्या नवग्रह मंदिरावर ते लिहून ठेवले. अनेक मजली दगदी मंदिर. त्याच्या अनेक भिंतींवर ते लिहिले गेले. भाषा सांकेतीक. जोडीला ते चिन्ह. दोन घड्याळ आणि प्रत्येक आकड्याचा ठीकाणी ग्रह.....
(क्रमशः )

--निमिष सोनार, पुणे

कथाविचार

प्रतिक्रिया

हर्षद आनंदी's picture

7 Sep 2010 - 11:54 pm | हर्षद आनंदी

भट्टी जमतीय.. पण पहिल्या भागाची लिंक दे

अजुन मजा येईल.

फुकटचा सल्ला :- स्वांतसुखाय लिहीत रहा.. प्रतिसाद को गोली मारो

भानस's picture

8 Sep 2010 - 12:09 am | भानस

वाचतेय. वाचायला मजा येतेय. येउ दे पटापट.

dipti's picture

8 Sep 2010 - 12:25 pm | dipti

मस्त...!!

निमिष सोनार's picture

8 Sep 2010 - 3:26 pm | निमिष सोनार

पहिल्या भागाची लिंक-
http://www.misalpav.com/node/14260

बर्‍यापैकी जमलंय, पुढचे भाग पण येऊदेत !!

कानडाऊ योगेशु's picture

8 Sep 2010 - 4:04 pm | कानडाऊ योगेशु

पुढचे भाग पण येऊदेत

अहो आधी मागचा भाग पण द्या म्हणावं...!

निमिष सोनार's picture

8 Sep 2010 - 4:56 pm | निमिष सोनार

इथे आहे मागचा भाग-
http://www.misalpav.com/node/14260

धमाल मुलगा's picture

8 Sep 2010 - 5:00 pm | धमाल मुलगा

लै भारी!

मजा येतेय वाचायला. येऊ द्या हो आणखी. :)

वेताळ's picture

8 Sep 2010 - 5:24 pm | वेताळ

आता साधु आलेमुळे मजा यायला लागली आहे.

अनिल हटेला's picture

8 Sep 2010 - 8:12 pm | अनिल हटेला

दोन्ही भाग एकत्र वाचले !!

और आने दो !!