आपणाला दुसर्‍याचा नवरा आवडतो का?

भीडस्त's picture
भीडस्त in जनातलं, मनातलं
5 Sep 2010 - 5:48 pm

सध्या मिपावर खूप विनोदी चर्चा चालू आहेत. त्यात गंभीर म्हणा विचारप्रवर्तक म्हणा. एक वेगळा विषय.

बर्‍याच दिवसांनी आमचे बायकोबरोबर (नेहमीप्रमाणे) परत एकदा भांडण झाले. आज सकाळी मिपावर आलो आणि हा विषय सुचला
विषयाचे नाव आहे.

आमचा रिकामटेकडा धंदा एक छिद्रान्वेष.

भांडण मिटल्यानंतर,(आता हेसुद्धा नेहेमीचंच) बायकोने(आमच्या) काही दुसरया बायकांच्या (आमच्या नव्हे ,दुसरया माणसांच्या), आमच्या वतीने मुलाखती घेतल्या.

आम्ही स्वत: अशा प्रकरच्या मुलाखती घेण्याचा प्रयत्न केला असता तर या धाग्याचा प्रसव असंभव झाला नसता का?

मात्र दुसर्‍या बायकांशी झालेल्या चर्चेतून काही निष्कर्ष निघू शकला नाही. कारण प्रत्येक बाईचं मत, दर दुसरया मिनिटाला बदलत होतं. जणू काही मतपेटीतून बाहेर पडणार्‍या आणि कल सेकंदासेकंदाला बिघडवणार्‍या मतपत्रिकाच .

पण आमचं मत बुडापासून हलवणार्‍या काही गोष्टी या मुलाखतीतून समोर आल्या
तर

जी ज्या संसारात आहे तिथे ती काही सुखात नाही.आणि बायकांना दुसर्‍याच्या व्यवसायासारखा, शेजारणीचा नवरा अधिक चांगला वाटतो . अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे. थोड्या ओव्या,थोड्या शिव्या मिळवणारं.

आपणही विचार मांडा आपण ज्या नवर्‍याबरोबर संसार करतात त्याच्यावर खुश आहात का आपणाला दुसरीचा नवरा आवडतो.

वाङ्मयअनुभवआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

सुनील's picture

5 Sep 2010 - 5:50 pm | सुनील

हा धागा एकतर्फी वाटतो. दुतर्फी चर्चा व्हावी!

भीडस्त's picture

5 Sep 2010 - 5:59 pm | भीडस्त

सुनील
होऊन जाऊंद्यात.

अनामिक's picture

5 Sep 2010 - 6:31 pm | अनामिक

दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ...

अवांतर (?) - वापरून पाहिल्याशिवाय कसं कळणार चांगला की वाईट ते?

कशिद's picture

5 Sep 2010 - 6:34 pm | कशिद

होऊन जाऊंद्यात

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Sep 2010 - 6:38 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आपणाला दुसर्‍याचा नवरा आवडतो का?

धाग्याचे शीर्षक मनाला भिडले आणि डोळ्यातून घळाघळा पाणी आले!

पैसा's picture

5 Sep 2010 - 6:45 pm | पैसा

ह.ह.पु.वा. ह.ह. ग. लो. सगळं एकदम. काय राव करण जोहरचे सिनिमे बघून आलात काय?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Sep 2010 - 6:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ह.ह.पु.वा.?? पैसाताई, तुम्हाला हा विनोद वाटतो? किती ही अनास्था आणि दुसर्‍याच्या दु:खावर हसण्याची पद्धत??
'दुसर्‍याचा नवरा' कितीही आवडला तरी काय फायदा अशी हळहळ नाही का वाटत तुम्हाला?

शाहरुख's picture

5 Sep 2010 - 6:55 pm | शाहरुख

टेक इट अ‍ॅज चॅलेंज ! :D

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Sep 2010 - 6:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो सारुकभाई, 'दुसरीचा नवरा' आवडला तर च्यालेंज म्हणून (मला) घेता येईल, पण 'दुसर्‍याचा नवरा' आवडून आणि च्यालेंज घेऊन काय कप्पाळ फरक पडणार?

पैसा's picture

5 Sep 2010 - 7:01 pm | पैसा

ही हा हा

अग्गाग्गायाया!
ह. ह. पु. वा.

शाहरुख's picture

5 Sep 2010 - 9:13 pm | शाहरुख

'दुसरीचा नवरा' पेक्षा 'दुसर्‍याचा नवरा' पटवणे हे स्त्री-वर्गासाठी जास्त "चॅलेंजिंग" नाही का ?

आमच्या भिडस्त स्वभावामुळे प्रतिसाद देणार नव्हतो तसा, पण म्हटले चेंडू आपल्या कोर्टात पडून रहायला नको :-)

पैसा's picture

5 Sep 2010 - 9:14 pm | पैसा

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं!

सूड's picture

5 Sep 2010 - 10:10 pm | सूड

ह.ह.पु.वा. आता होऊन जाऊद्या... :D

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Sep 2010 - 10:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझ्या मोकळ्याढाकळ्या स्वभावामुळे संपादकांचं काम वाढायची भीती वाटते म्हणून प्रतिसाद देणार नव्हते. पण चेंडू माझ्याच कोर्टात पडून रहाण्यापेक्षा मी कोर्टाबाहेर पाठवते. दोघांनाही टोलवाटोलवी नको करायला! ;-)

'आव्हानात्मक' लोकांवर माझा जीव नाही हो; तो प्रांत* दुसर्‍या प्रकारच्या लोकांचा! ;-)

*हे आपले प्रांतांच्या गोष्टीतले प्रांत नव्हेत.

नगरीनिरंजन's picture

6 Sep 2010 - 11:15 am | नगरीनिरंजन

'दुसर्‍याचा' नवरा पण चालू शकतो बरे... काही काही तलवारी दुधारी असतात असं ऐकून आहे. ;-)

पैसा's picture

5 Sep 2010 - 6:55 pm | पैसा

वाटते ना! पण कधी कधी दुष्टपणा करावासा वाटतोच!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Sep 2010 - 6:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

या वृत्तीचा मी साफ निषेध करते. पैसा ताई, हाय हाय!!

मी-सौरभ's picture

5 Sep 2010 - 11:21 pm | मी-सौरभ

पैसा बाई, हाय :)

मस्त कलंदर's picture

5 Sep 2010 - 7:17 pm | मस्त कलंदर

'दुसर्‍याचा नवरा' कितीही आवडला तरी काय फायदा अशी हळहळ नाही का वाटत तुम्हाला?

अगदी हेच म्हणायला आले होते.. तर आधीच आमची मैत्रिण म्हणून गेलीसुद्धा!!! :(

पैसा's picture

5 Sep 2010 - 6:59 pm | पैसा

भीडस्तसाहेब, ते लेखाचं शीर्षक बदला बॉ. बाकी एवढ्या गंभीर विषयावर चर्चा करायला बरेच लोक तयारीत असतील!

सुनील's picture

5 Sep 2010 - 7:01 pm | सुनील

१) दुसर्‍याचा नवरा
२) दुसरीची बायको
३) दुसरीचा नवरा
४) दुसर्‍याची बायको

अशी एकूण चार गटात चर्चा करता येईल. (मी झाडावर आहेच!)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Sep 2010 - 7:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

(मी झाडावर आहेच!)

कोणाच्या, आपलं कोणत्या झाडावर?

सुनील's picture

5 Sep 2010 - 7:10 pm | सुनील

चारही झाडांवर आलटून पालटून! (पॉपकॉर्न खाताना) टैम्पास झाल्याशी मतलब!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Sep 2010 - 7:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हां, मग ठीक आहे. त्या वरून पाचव्या झाडावर थोडी जागा ठेवा माझ्यासाठी!

प्रीत-मोहर's picture

5 Sep 2010 - 8:27 pm | प्रीत-मोहर

हॅ हॅ हॅ

प्रीत-मोहर's picture

5 Sep 2010 - 9:16 pm | प्रीत-मोहर

आम्च्याकडे हर तर्हेचे पॉप्कॉर्न मिळतील......::D

चतुरंग's picture

5 Sep 2010 - 11:37 pm | चतुरंग

थोडी ह्या शब्दावर आक्षेप आहे! ;)

(थोडाथोडका)चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Sep 2010 - 11:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चालू द्यात तुमचं आक्षेप घेणं. तेवढ्यात मी आजूबाजूच्या चिंट्यापिंट्या डॉनांना ढकलून जागा करून घेते!

(जाडजूड) अदिती

पैसा's picture

6 Sep 2010 - 8:54 am | पैसा

समस्त "झाडे वाचवा, भुते जगवा" महामंडळातर्फे झाडांचा दुरुपयोग करणार्‍यांचा णिशेध!

नितिन थत्ते's picture

6 Sep 2010 - 8:53 pm | नितिन थत्ते

का ब्बॉ?

झाडावर सगळी भुतंच तर चढून बसतायत. :)

पैसा's picture

6 Sep 2010 - 9:07 pm | पैसा

असं होय? मला वाटलं.......

दत्ता काळे's picture

5 Sep 2010 - 7:07 pm | दत्ता काळे

जगात सगळी झाडं सारखीच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Sep 2010 - 7:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर चर्चा. आधुनिक स्त्रीयांचे विचार वाचायला आवडतील. :)

- दिलीप बिरुटे

आधुनिक स्त्रियांचे की मुक्त स्त्रियांचे?

मस्त कलंदर's picture

5 Sep 2010 - 7:34 pm | मस्त कलंदर

आधी स्त्रिया विचार करू शकतात हे सिद्ध करा!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Sep 2010 - 7:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आधुनिक आणि मुक्त अशा दोन्ही स्त्रियांचे काय मनोगत आहे त्याची प्रचंड उत्सुकता आहे.
लग्न करुन एखाद्या आवडत्या पुरुषाशी किंवा नावडता असला तरी आयुष्यभर त्याच्याशी संसार करायचा ? हॅ ...कब्बी नही....! वगैरे...असे काही अपेक्षित आहे.

-दिलीप बिरुटे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Sep 2010 - 7:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लग्न करुन एखाद्या आवडत्या पुरुषाशी किंवा नावडता असला तरी आयुष्यभर त्याच्याशी संसार करायचा ? हॅ ...कब्बी नही....! वगैरे...असे काही अपेक्षित आहे.

अशा स्त्रियांना तुम्ही मुक्त आणि/किंवा आधुनिक समजता का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Sep 2010 - 7:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> अशा स्त्रियांना तुम्ही मुक्त आणि/किंवा आधुनिक समजता का ?
हो....! अशा प्रकारच्या [विचित्र] विचार करणा-यांना स्त्रीयांच्या बाबतीत मी तसेच समजतो.
आपलं काय मत आहे ?

-दिलीप बिरुटे

मस्त कलंदर's picture

5 Sep 2010 - 8:03 pm | मस्त कलंदर

मी तर त्यांना तुमच्या-माझ्यासारख्याच माणूस समजते.इतर लेबलं कोणालाच लावायला मलातरी आवडत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Sep 2010 - 8:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अशा स्त्रियांना स्त्री मुक्तीवाले नक्कीच आधुनिक आणि मुक्त म्हणणार नाहीत.

अशा पुरूषांना मराठी लोक सामान्यतः लखोबा लोखंडे किंवा तत्सम नावं ठेवतात!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Sep 2010 - 8:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

”अशा स्त्रियांना स्त्री मुक्तीवाले नक्कीच आधुनिक आणि मुक्त म्हणणार नाहीत.”
आपण काय म्हणाल ?

पुरुषांचे जाऊ द्या हो. पुरुष संस्कृतीत पुरुषांनी कसेही वागले तरी चालते.

-दिलीप बिरुटे

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Sep 2010 - 8:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माणूस!

इतर लेबलं लावायला जमत नाही.

पैसा's picture

5 Sep 2010 - 8:22 pm | पैसा

पुरुष हा जात्याच "लखोबा लोखंडे" असतो असं म्हणतात ना!!!!!!!!!!!

उपेन्द्र's picture

5 Sep 2010 - 8:15 pm | उपेन्द्र

दुसर्‍याच काय तिसर्‍या, चौथ्या, पाचव्याच्या पण बायका आवड्तात..
पण नुसतं आवडुन काय उपयोग..त्यांना आम्ही आवडलो पाहिजे ना...

चतुरंग's picture

5 Sep 2010 - 8:19 pm | चतुरंग

'ग्रास इज अल्वेज ग्रीनर ऑन दि अदरसाईड!' ही मानवी वृत्ती नवीन नाही. आपण सगळेच कधीनकधी थोड्याफार फरकाने वेगवेगळ्या संदर्भात असा विचार करतही असू.
नवरा-बायकोचे नाते म्हणजे नक्की काय आहे हे समजले नाही तर 'दुसर्‍याची बायको, दुसरीचा नवरा' आवडली/ला अशी विचारधारा होऊ शकते की काय असे वाटले.
परंतु आपल्या जोडीदारात काय नाही आणि त्याचवेळी ते दुसर्‍या कोणात आहे, फक्त हे आणि हेच बघणे अशी मनोवृत्ती ठेवली तर ती माणसे कुठे सुखी होऊ शकतील असे वाटत नाही. जोडीदारात काय आहे आणि आपल्याला ते भावते का? त्याचे एप्रीसिएशन आपण करतो का? आणि कसे करतो? तसेच आपल्यामधे काय आहे आणि ते जोडीदारा समोर आपण आणतो का? आपल्यात जे नाही ते यावे यासाठी प्रयत्न करतो का? ते येणे शक्य नसले तर ते प्रांजळपणे स्वीकारतो का? अशा अनेक बाबीतून विचार करता दुसर्‍या व्यक्तीचा जोडीदार आवडणे हे तात्कालिक ठरावे!

(बाकी दुसरा/री जोडीदार आवडणे हे काही आधुनिक वगैरे नसावे ना.सी.फडके ह्यांचा 'बौद्धिक कारणासाठी' केलेला दुसरा विवाह प्रसिद्ध होता! ;)

(सनातन)चतुरंग

चिंतामणी's picture

5 Sep 2010 - 8:21 pm | चिंतामणी

एव्हढ्याश्या विषयाला एव्हढा प्रतिसाद बघून मन भरून आले.

पण एक किडा वळवळ्ला. कितीची सुपारी? असे वाटण्याचे कारण पहीले वाक्य.

असो.

आमचा रिकामटेकडा धंदा एक छिद्रान्वेष.

हे वाक्य वाचुन, आपला प्रामाणीकपणा बघून खरोखरच भरून आले.

सूड's picture

6 Sep 2010 - 12:23 am | सूड

हितं पण खंडानं सुपारी दिलेली दिसते राव :D, इतिहासाच्या पुनर्लेखनाची (२२७ सध्या तरी) तोड नक्की.

शिल्पा ब's picture

5 Sep 2010 - 10:18 pm | शिल्पा ब

आम्हाला Tom Cruze , Brad Pitt , Tom Hanks , Ben Affleck , Matt Demon , Leonardo DeCaprio , Mathew Fox , Josh Holloway वगैरे आवडतात...आता ते दुसऱ्या कोणाचे नवरे आहेत का नाहीत ते माहित नाही.

मस्त कलंदर's picture

5 Sep 2010 - 10:30 pm | मस्त कलंदर

म्हणजे??? देशी आवडत नाही का?

शिल्पा ब's picture

5 Sep 2010 - 10:42 pm | शिल्पा ब

देशी फार showoff करतात असे आमचे मत आहे..
तरी त्यातल्या त्यात अमीर खान आवडतो..बाकी नाही कोणी.
पण त्याचा काडीमोड झाल्याचे ऐकून आहे त्यामुळे कदाचित या धाग्यावर त्याचे नाव नको..इथे फक्त "दुसऱ्याच्या" नवऱ्यांचाच विचार केलेला आहे. ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Sep 2010 - 9:48 am | llपुण्याचे पेशवेll

काडीमोड परत? किरणला पण सोडलेनी की काय? मध्यंतरी २-३ दा तिचा गर्भपात झाल्याचे चुकून वाचले गेले होते . असो. :)

मी-सौरभ's picture

5 Sep 2010 - 11:27 pm | मी-सौरभ

आज हे कुणाचे नवरे
उद्या परत कुमार (सिंगल)
परवा परत कोणाचे तरी मित्र असतात...:)

राजेश घासकडवी's picture

5 Sep 2010 - 11:55 pm | राजेश घासकडवी

जी ज्या संसारात आहे तिथे ती काही सुखात नाही.आणि बायकांना दुसर्‍याच्या व्यवसायासारखा, शेजारणीचा नवरा अधिक चांगला वाटतो .

हे त्या मुलाखतींतून निष्पन्न झालं असं म्हणता. मग तुम्ही तुमच्या पत्नीला असं विचारलं नाहीत का की त्यांच्यापैकी कुठचीला तुम्ही आवडता? इथे मिपावर कौल टाकण्याऐवजी तुम्ही, तुमची बायको, तिच्या मैत्रिणी व त्यांचे नवरे यांना प्रेफरन्स लिस्ट करून जोड्यांची (जोड्या हे जोडी चं अनेकवचन, जोडे चं नाही) अदलाबदल का करत नाहीत? देर से आये पर दुरुस्त आये होईल. आणि अशीच अदलाबदल दर वर्षभराने करण्याची व्यवस्था केली तर सगळेच सुखी होतील.

ही लग्नसंस्था फार माजली आहे साली.

अर्धवट's picture

6 Sep 2010 - 9:31 am | अर्धवट

घासुगुर्जींना दणदणीत अनुमोदन.. ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Sep 2010 - 9:50 am | llपुण्याचे पेशवेll

हम्म. पूर्वी घटकंचुकी नावाचा प्रकार तेव्हाच्या उच्चभ्रू समाजात होत असे. :)

अप्पा जोगळेकर's picture

6 Sep 2010 - 10:20 am | अप्पा जोगळेकर

या प्रकाराबद्दल अत्र्यांच्या एका पुस्तकात वाचलं होतं. का हो पेशवे तुमच्या आमदानीत असे प्रकार खूप चालायचे असे ऐकून आहोत. खरं आहे का ? आमच्या पाहण्यातल्या एकाही सीडीमध्ये हा भुरळ घालणारा प्रकार आम्हाला सापडला नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

6 Sep 2010 - 4:01 pm | llपुण्याचे पेशवेll

खोटं आहे. घटकंचुकी हा प्रकार नंतर आंग्लभाषा शिकून उच्चविद्याविभूषित झालेल्यांमधे चालायचा. :)

खरं आहे का ? आमच्या पाहण्यातल्या एकाही सीडीमध्ये हा भुरळ घालणारा प्रकार आम्हाला सापडला नाही.

तो प्रकार म्हणजे एक अवस्था अथवा आसन नसून एक व्यवस्था आहे. अत्र्यांच्या पुस्तकाचा उल्लेख तुम्ही करत आहात तर त्याच पुस्तकात त्या प्रकाराचं साद्यंत वर्णनही आहे ते वाचले नाहीत का? असो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Sep 2010 - 9:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तो सात वर्ष वगैरे काही लेख तुम्ही वाचला होतात का शुचिताईंचा?

बाकी गुर्जी म्हणतील ते प्रमाण!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Sep 2010 - 9:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>ही लग्नसंस्था फार माजली आहे साली.
हं ! आता चर्चा मूळ विषयावर येईल असे वाटते. म्हणजे, कशाला हवी लग्नसंस्था.
लग्नाशिवाय स्त्रीयांना नै राहता येणार का ? एखाद्या पुरुषाबरोबर आयुष्यभर राहून आयुष्याचं वाटोळं का करुन घ्यायचं नै का ? त्यामुळे दुसरा कोणताही पुरुष आवडला तर पहिला नवरा सोडणेच चांगलेच असे वाटते.

-दिलीप बिरुटे
[नारद]

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

6 Sep 2010 - 10:01 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

छे छे, संपादकांकडून असे कळलावे प्रतिसाद अपेक्षित नव्हते!

दिपक's picture

6 Sep 2010 - 10:03 am | दिपक

त्यासाठी आधी दुसरा शोधायचा अन मग पहिल्याला सोडायचे...नाहीतर हा नाही अन तोही नाही..

पैसा's picture

6 Sep 2010 - 9:33 pm | पैसा

हातात असलेला एक पक्षी झुडुपात असलेल्या १०० पेक्षा बरा!

नितिन थत्ते's picture

6 Sep 2010 - 9:59 pm | नितिन थत्ते

>>त्यासाठी आधी दुसरा शोधायचा अन मग पहिल्याला सोडायचे...नाहीतर हा नाही अन तोही नाही.

नवरा पण आणि जॉब पण

प्रकाश घाटपांडे's picture

6 Sep 2010 - 10:04 am | प्रकाश घाटपांडे

ही लग्नसंस्था फार माजली आहे साली.

तरी वि का राजवाड्यांनी इतिहास लिहुन ठेवला आहे याचा.
बाजारी संस्कृतीत एक्सचेंज ऑफर कशी झटकन रुळली. 'हव' ते मिळाल्यावर 'नको' त्याची विल्हेवाट लावण्याची 'सोय' पण झाली जागेवरच. पुन्हा 'हवहवस' वाटणार मार्केट मधे नवनवीन 'माल' आल्यावर'नकोनकोस' झाल्याने परत एक्सचेंज ऑफर असतेच. तुम्हाला 'नकोनकोसा' झालेला 'माल' 'हवाहवासा' वाटणारा एक वर्ग असतोच. त्यांना 'परवडणार्‍या' किंमतीत देणारी विपणन व्यवस्था बाजारु यंत्रणेचा अविभाज्य अंग आहेच.
जुन्या बाजारात काही 'जुना' माल 'नव्या' माला पेक्षा 'जास्त' किंमतीत घ्याव्या लागत्यात. कारण त्याची किंमत दुर्मिळतेवर ठरते.तुम्हाला त्यावेळी 'नकोनकोसा' झालेला 'माल' आता दामदुमटीने किंमत मोजुन घ्यावा लागतो. तुमची 'भावनिक गरज' ही आधुनिक 'मालात 'पुर्ण होउ शकत नसते. ती 'जुन्या' मालातच पुर्ण होणारी असते. जुना 'माल' नवीन मार्केट मधे उपलब्ध नसतो. मग तुम्ही दुर्मिळतेची किंमत मोजता.
अवांतर- ते अमेरिकेत का कंच्या देशात म्हने गराज सेल का काय भानगड असतीया. थित म्हने जागेव नकोसा झालेल्या मालाला हवस वाटनार गिर्‍हाईक भेटत म्हने.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Sep 2010 - 10:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>अवांतर- ते अमेरिकेत का कंच्या देशात म्हने गराज सेल का काय भानगड असतीया. थित म्हने जागेव नकोसा झालेल्या मालाला हवस वाटनार गिर्‍हाईक भेटत म्हने.

हा हा हा. घाटपांडे साहेब, ते वस्तूंबद्दल असतं मान्सांबद्दल नै !

पण, रस्त्याच्या कडेला वस्तूंबरोबर एका रांगेत श्री घाटपांडे,श्री विनायकप्रभु, श्री प्रमोद देव, श्री मिसळभोक्ता, असे सगळे काका लोक. टापटीप आवरुन बसवले आहेत. आणि रस्त्यावरुन येणार्‍या जाणार्‍या खरेदीदार महिला म्हणताहेत. हल्ली मार्केटमधे 'लै ओल्ड व्हर्जन' असलेल्या वस्तू येत आहेत. हा हा हा

-दिलीप बिरुटे

परिकथेतील राजकुमार's picture

6 Sep 2010 - 2:48 pm | परिकथेतील राजकुमार

मी चुकुन 'ओल्ड व्हर्जीन' असे वाचले.

विनायक प्रभू's picture

6 Sep 2010 - 3:22 pm | विनायक प्रभू

मला इतरांबद्दल माहीत नाही.
पण त्या रांगेत मला बसवुन अन्याय करताहात प्रा.डॉ.
सौ. रागावतील हो माझ्या.(किती ते विचाराय्चे काम नाही)

कर्ण's picture

8 Sep 2010 - 3:06 pm | कर्ण

नुसता फालतुपणा आहे ... असा विषय ज्याला तोन्ड आणि ( ) सुदधा नाही ...

इंटरनेटावर असे एकमेकांचे जोडीदार ट्राय करायची सोय आहे म्हणतात, पहा जॉईन करुन.

-शिंगल माल्'ट

विकास's picture

8 Sep 2010 - 4:02 pm | विकास

चर्चेत विचारलेल्या प्रश्नासंदर्भातः मला कुणा दुसरीचा नवरा आवडत नाही हे आधी स्पष्ट करतो!

पण सगळे(ळ्या) थोडेच (थोड्याच) भीडस्त असणार! ;)