एप्रिल फळ

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
7 Apr 2008 - 12:46 pm

एप्रिल फळ.......... हो एप्रिल फळ च
हे कळ फलकामुळे झाले नाही
मला एप्रिल फळ असेच म्हणायचे आहे
एप्रिल महीना म्हणजे वसंत आगमन........सर्वत्र फुलांचे सडे असतात्.नुकत्याच आलेल्या कोवळ्या पालवीमुळे झाडे रंगीबेरंगी झालेली असतात. प्रत्येक झाड जणु यजमान होउन वसंताचे स्वागत करतोय अशा मूड मधे असते. कोठे कोठे कोकीळा मजेत गात असते. अंब्याच्या मोहोराचे आता कैर्‍या रुपांतर होउन त्या हवेत मस्त झोके घेत असतात. त्यांच्या कडे असे लटकताना पाहीले की वाटते देवळ्यातल्या घण्टेचे लोलक काढुन हवेत अद्र्युश्य घण्टा वाजवुनसारी स्रूष्टी या ऋतुंच्या राजाला सलामी देत आहे.
किंची त लालसर सोनेरी पानात दडलेली ती कैरी.....मरणोन्मुख मनाला ही अल्लड लहानपण आठवुन देते. ती शान काही औरच.
झाडावरची थोडीशी उब्दार गरम कैरी ज्याने घरातुन चोरुन आणलेल्या तिखटामिठाच्या पुडीबरोबर खाली नाही तो माणूस कधीजगलाच नाही.
आंब्याचे जेवढे लाड होत नसतील तेवढे कैरीचे होतात......
शिवरात्रीलाच त्या कैरी बाळांची चाहुल लागते.....मोहोराच्या मधी दडलेली ती छोटीछोटी बाळे टपोरी मोत्यापेक्षाही गोड दिसतात............. ...आंब्याच्या झाडाचेही पहिलटकरीणी सारखी डोहाळे पुरवले जातात.
खते दिली जातात .....मग फवारणी केली जाते...गारा लागु नयेत म्हणुन पानांचा आडोसा केला जातो...द्रुष्ट लागु नये म्हणुन काळ्या बाहुल्या बान्ध्ल्या जतात्.....लिम्बु उतरले जाते.... कोणी धटिंगणाने दगड मारु नये म्हणुम जागता पहरा बसतो.....
दिसामासाने कैरी बाळे मोठी होतात.... षोडशेच्या गालावर तारुण्याने गुलाबी झाक यावी तशी कैरी बाळांच्या गालावर लाली चढु लागते....एका दैवी मुहुर्तावर कैरी बाळाला स्वतःच्या नव्हाळीची जाणीव होते.......प्रौढत्वाच्या परिपक्वपणाची गोडी अजून आलेली नसते...आणी बालपणाचा अवखळ आंबटपणा संपलेला नसतो...अशा अल्लड आंबट गोड पाडाच्या कैर्‍याना हलकेच झेल्याचा पाळणा करुन झाडावरुन उतरवले जाते...... त्यांच्या साठी मस्त गवताची उबदार दुलइ अंथरली जाते......त्यावर त्याना जाग न येईल ईतक्या हलकेच धक्का न लावता नाजुकपणे झोपवले जाते....पुन्हा त्यावर उबदर गवताचे पांघरुण घातली जाते......
घरातल्या ताइ दादाने बाळाला उठवु नये म्हणुन सगळ्य मोठ्यांचा सखत पहारा बसतो......
सगळ्यांच्या बोलण्यातले ईतर विषय संपतात्.......फक्त कैरी आणि कैरी......घरात .....आळीत्..गावत एकच विषय्........कैरी....
( क्रमशः)

हे ठिकाणविचार

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

7 Apr 2008 - 12:55 pm | विसोबा खेचर

किंची त लालसर सोनेरी पानात दडलेली ती कैरी.....मरणोन्मुख मनाला ही अल्लड लहानपण आठवुन देते. ती शान काही औरच.
झाडावरची थोडीशी उब्दार गरम कैरी ज्याने घरातुन चोरुन आणलेल्या तिखटामिठाच्या पुडीबरोबर खाली नाही तो माणूस कधीजगलाच नाही.

क्या बात है!

अशा अल्लड आंबट गोड पाडाच्या कैर्‍याना हलकेच झेल्याचा पाळणा करुन झाडावरुन उतरवले जाते...... त्यांच्या साठी मस्त गवताची उबदार दुलइ अंथरली जाते......त्यावर त्याना जाग न येईल ईतक्या हलकेच धक्का न लावता नाजुकपणे झोपवले जाते....पुन्हा त्यावर उबदर गवताचे पांघरुण घातली जाते......

आढीकरता 'गवताची उबदार दुलई' हे शब्द आवडले!

सुंदर लेख.. पुढील भागाची वाट पाहात आहे!

तात्या.

प्रमोद देव's picture

7 Apr 2008 - 1:21 pm | प्रमोद देव

मस्तच लिहिलंय. तुमच्या कल्पना शक्तीला दाद देतो.
येऊ द्या अजून!

मदनबाण's picture

7 Apr 2008 - 5:01 pm | मदनबाण

Hapus Mango Tree
विजुभाऊ :-- हे माझ्या घरासमोरील हापुस चे झाड आहे.
कोण्या ऐके काळी या सुट्टी च्या दिवसांमधे आम्ही पोरे जबरदस्त कैर्‍या तोडीत असु......दीड गोणी कैर्‍या घरी अल्यावर त्याचे लोणचे,पन्हे इ. प्रकार आई करत असे.....
(सध्या कोकीळ कुजन ऐकतो आहे.)
आत्ताची लहान-मुले मात्र फक्त व्हिडीओ-गेम खेळण्यात दिवस घालवतात !!!!!

चोरुन कैर्‍या तोडाची मजा मात्र काही औरच.....

(कैरी प्रेमी)
मदनबाण

विजुभाऊ's picture

7 Apr 2008 - 5:07 pm | विजुभाऊ

तात्या चित्र मस्त आहे.....लेखाच्या सुरुवातिला हे सरकावता येइल का?

तसे केले आहे!

-- कर्झन वायली.

आवडली तर जरुर कळवा !!!!!

(हापुस प्रेमी)
मदनबाण

वा विजुभाऊ!
काय सुरेख लेख लिहिला आहे ,भाषाशैली ओघवती आहे .
आंब्याच्या झाडाचे व कैरीचे इतके सुंदर रेखाटन माझ्या वाचनात नाही. कसं काय जमतं बुवा तुम्हाला?
त्यात मदनबाण यांच्या चिञामूळे "चारचांद" लागले.

डॉ.प्रसाद दाढे's picture

7 Apr 2008 - 6:06 pm | डॉ.प्रसाद दाढे

आत्ताची लहान-मुले मात्र फक्त व्हिडीओ-गेम खेळण्यात दिवस घालवतात !!!!!

दुर्दैवी पिढी :(

चोरुन कैर्‍या तोडाची मजा मात्र काही औरच.....

एकदम खरे :) आणि त्यावर ढसाढसा थ॑ड पाणी ढोसायचे व गल्लीत क्रिकेट खेळायला पळायचे..हर हर..गेले ते दिवस..
विजुभाऊ..झक्कास बर॑ का..

स्वाती दिनेश's picture

7 Apr 2008 - 6:14 pm | स्वाती दिनेश

आंब्याच्या आढी 'साठी गवताची उबदार दुलई' ही शब्दयोजना फार आवडली.आणि मदनबाण ह्यांनी सुरेख आणि उचित चित्रे चढवून आणखी मजा आणली.
स्वाती

सुधीर कांदळकर's picture

7 Apr 2008 - 7:46 pm | सुधीर कांदळकर

षोडशेच्या गालावर तारुण्याने गुलाबी झाक यावी तशी कैरी बाळांच्या गालावर लाली चढु लागते....एका दैवी मुहुर्तावर कैरी बाळाला स्वतःच्या नव्हाळीची जाणीव होते.......प्रौढत्वाच्या परिपक्वपणाची गोडी अजून आलेली नसते...आणी बालपणाचा अवखळ आंबटपणा संपलेला नसतो...अशा अल्लड आंबट गोड पाडाच्या कैर्‍याना हलकेच झेल्याचा पाळणा करुन झाडावरुन उतरवले जाते...... त्यांच्या साठी मस्त गवताची उबदार दुलइ अंथरली जाते......त्यावर त्याना जाग न येईल ईतक्या हलकेच धक्का न लावता नाजुकपणे झोपवले जाते....पुन्हा त्यावर उबदर गवताचे पांघरुण घातली जाते......
घरातल्या ताइ दादाने बाळाला उठवु नये म्हणुन सगळ्य मोठ्यांचा सखत पहारा बसतो......
सगळ्यांच्या बोलण्यातले ईतर विषय संपतात्.......फक्त कैरी आणि कैरी......घरात .....आळीत्..गावत एकच विषय्........कैरी....

व्वा. क्या बात है!
सुधीर कांदळकर.

मदनबाण's picture

7 Apr 2008 - 8:21 pm | मदनबाण

झाडावरची थोडीशी उब्दार गरम कैरी ज्याने घरातुन चोरुन आणलेल्या तिखटामिठाच्या पुडीबरोबर खाली नाही तो माणूस कधीजगलाच नाही.विजुभाऊ अगदी माझ्या मनातल बोललात बघा !!!!!
अतिशय सुंदर लिहिता तुम्ही.....
आपल्या पुढील भागाची आतुरतेने वाट पाहतोय.....

(वसंत प्रेमी)
मदनबाण

मदनबाण's picture

7 Apr 2008 - 9:43 pm | मदनबाण

अत्ताच माझ्या आईला आपला हा लेख दाखवला,आणि तिने मला चांदोबा मधे आलेल्या कैरीच्या चित्राची
आठवण सांगितली,चांदोबा मधे असेच एका झाडाला लटकलेल्या कैर्‍यांचे चित्र देण्यात आले होते,आणि त्याच्या खाली लिहिले होते
"वसंत समयी आम्ही लटकतो कैरी होऊनी वृक्षी"
कैरी पाहिली की तिला अजुनही या ओळीची आठवण होते.

(मोरांबा खाणारा)
मदनबाण

छोटा डॉन's picture

7 Apr 2008 - 10:49 pm | छोटा डॉन

"झाडावरची थोडीशी उब्दार गरम कैरी ज्याने घरातुन चोरुन आणलेल्या तिखटामिठाच्या पुडीबरोबर खाली नाही तो माणूस कधीजगलाच नाही."
एक नंबर वाक्य राव. एकदम लहानपणाची आठवण करून दिलीत ...
च्यायला ह्या 'मोठेपणाने ' ज्या ज्या गोष्ती मिस कराय लावल्या त्यातली ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ...

"दिसामासाने कैरी बाळे मोठी होतात.... षोडशेच्या गालावर तारुण्याने गुलाबी झाक यावी तशी कैरी बाळांच्या गालावर लाली चढु लागते....एका दैवी मुहुर्तावर कैरी बाळाला स्वतःच्या नव्हाळीची जाणीव होते.......प्रौढत्वाच्या परिपक्वपणाची गोडी अजून आलेली नसते...आणी बालपणाचा अवखळ आंबटपणा संपलेला नसतो...अशा अल्लड आंबट गोड पाडाच्या कैर्‍याना हलकेच झेल्याचा पाळणा करुन झाडावरुन उतरवले जाते...... त्यांच्या साठी मस्त गवताची उबदार दुलइ अंथरली जाते......त्यावर त्याना जाग न येईल ईतक्या हलकेच धक्का न लावता नाजुकपणे झोपवले जाते....पुन्हा त्यावर उबदर गवताचे पांघरुण घातली जाते......"
आयाया ... काय ते इमॅजीनेशन ... जबरा ...

लिहीत रहा. मी वाचत आहे [ आणि प्रतिसाद पण देत आहे ]

अवांतर : विजूभाउ, ह्या क्रमशः लिहण्यावर सध्या आमचा "कॉपीराईट" आहे ... तुमचे लेखन अखंड येऊद्यात ...
तुम्ही असल्या अळशीपणाच्या नादाला नका लागू भाउ ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भडकमकर मास्तर's picture

7 Apr 2008 - 10:58 pm | भडकमकर मास्तर

मस्त लेख आहे विजुभाऊ....
आणि फोटो पण झकास आहेत मदनबाण यान्चे.... त्यात त्या फोटोच्या कडेला मिसळ्पाव डॊट कॊम / मदनबाण हे सुद्धा भारीच

प्राजु's picture

8 Apr 2008 - 12:55 am | प्राजु

छान शब्दयोजना. आणि चित्र तर अप्रतिमच.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

इनोबा म्हणे's picture

8 Apr 2008 - 1:23 am | इनोबा म्हणे

"झाडावरची थोडीशी उब्दार गरम कैरी ज्याने घरातुन चोरुन आणलेल्या तिखटामिठाच्या पुडीबरोबर खाली नाही तो माणूस कधीजगलाच नाही."
अगदी बरोबर बोललात विजूभाऊ....

लहानपणी शाळेला सुट्या लागल्या की आमची १०-१२ जणांची गँग प्रभात रोडच्या बंगल्यांतील कैर्‍या तोडत फिरायची. मग घरातून आणलेल्या तिखट मिठा बरोबर या आंबट- गोड कैर्‍यांची पार्टी व्हायची. साला प्रभात रोडचे सुखवस्तू पांढर पेशे जाम वैतागायचे आम्हाला.

|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे

चतुरंग's picture

8 Apr 2008 - 1:31 am | चतुरंग

आंबटगोड गाभुळलेल्या कैरीसारखे एकदम चटपटीत शब्दचित्र! आवडले!
चतुरंग

विजुभाऊ's picture

8 Apr 2008 - 9:23 pm | विजुभाऊ

एका मित्रा साठी त्याला हे दोन्ही भाग एकत्र पहायचे आहेत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Apr 2008 - 8:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजूभाऊ,एप्रिल फळाचे काय सुंदर वर्णन केले हो !!!
अंब्याच्या मोहोराचे आता कैर्‍या रुपांतर होउन त्या हवेत मस्त झोके घेत असतात. त्यांच्या कडे असे लटकताना पाहीले की वाटते देवळ्यातल्या घण्टेचे लोलक काढुन हवेत अद्र्युश्य घण्टा वाजवुनसारी स्रूष्टी या ऋतुंच्या राजाला सलामी देत आहे.
क्या बात है, आपल्या या सुंदर  कल्पनेला आमची मनापासून दाद आहे.
षोडशेच्या गालावर तारुण्याने गुलाबी झाक यावी तशी कैरी बाळांच्या गालावर लाली चढु लागते....एका दैवी मुहुर्तावर कैरी बाळाला स्वतःच्या नव्हाळीची जाणीव होते.
ओहो, क्या  कहने, कैरीला पालखीत बसवून आणल्यासारखे वाटले.कैरी या विषयावर वाचतांना  हळूवार फुलणा-या प्रेमाची अवस्था व्यक्त करत आहेत असे वाटले. सुंदर लेखन..........!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विजुभाऊ's picture

14 Apr 2008 - 10:16 pm | विजुभाऊ

हे घ्या सगळे भाग एकत्र