एप्रिल फळ
लेखनप्रकार
एप्रिल फळ.......... हो एप्रिल फळ च
हे कळ फलकामुळे झाले नाही
मला एप्रिल फळ असेच म्हणायचे आहे
एप्रिल महीना म्हणजे वसंत आगमन........सर्वत्र फुलांचे सडे असतात्.नुकत्याच आलेल्या कोवळ्या पालवीमुळे झाडे रंगीबेरंगी झालेली असतात. प्रत्येक झाड जणु यजमान होउन वसंताचे स्वागत करतोय अशा मूड मधे असते. कोठे कोठे कोकीळा मजेत गात असते. अंब्याच्या मोहोराचे आता कैर्या रुपांतर होउन त्या हवेत मस्त झोके घेत असतात. त्यांच्या कडे असे लटकताना पाहीले की वाटते देवळ्यातल्या घण्टेचे लोलक काढुन हवेत अद्र्युश्य घण्टा वाजवुनसारी स्रूष्टी या ऋतुंच्या राजाला सलामी देत आहे.
किंची त लालसर सोनेरी पानात दडलेली ती कैरी.....मरणोन्मुख मनाला ही अल्लड लहानपण आठवुन देते. ती शान काही औरच.
झाडावरची थोडीशी उब्दार गरम कैरी ज्याने घरातुन चोरुन आणलेल्या तिखटामिठाच्या पुडीबरोबर खाली नाही तो माणूस कधीजगलाच नाही.
आंब्याचे जेवढे लाड होत नसतील तेवढे कैरीचे होतात......
शिवरात्रीलाच त्या कैरी बाळांची चाहुल लागते.....मोहोराच्या मधी दडलेली ती छोटीछोटी बाळे टपोरी मोत्यापेक्षाही गोड दिसतात............. ...आंब्याच्या झाडाचेही पहिलटकरीणी सारखी डोहाळे पुरवले जातात.
खते दिली जातात .....मग फवारणी केली जाते...गारा लागु नयेत म्हणुन पानांचा आडोसा केला जातो...द्रुष्ट लागु नये म्हणुन काळ्या बाहुल्या बान्ध्ल्या जतात्.....लिम्बु उतरले जाते.... कोणी धटिंगणाने दगड मारु नये म्हणुम जागता पहरा बसतो.....
दिसामासाने कैरी बाळे मोठी होतात.... षोडशेच्या गालावर तारुण्याने गुलाबी झाक यावी तशी कैरी बाळांच्या गालावर लाली चढु लागते....एका दैवी मुहुर्तावर कैरी बाळाला स्वतःच्या नव्हाळीची जाणीव होते.......प्रौढत्वाच्या परिपक्वपणाची गोडी अजून आलेली नसते...आणी बालपणाचा अवखळ आंबटपणा संपलेला नसतो...अशा अल्लड आंबट गोड पाडाच्या कैर्याना हलकेच झेल्याचा पाळणा करुन झाडावरुन उतरवले जाते...... त्यांच्या साठी मस्त गवताची उबदार दुलइ अंथरली जाते......त्यावर त्याना जाग न येईल ईतक्या हलकेच धक्का न लावता नाजुकपणे झोपवले जाते....पुन्हा त्यावर उबदर गवताचे पांघरुण घातली जाते......
घरातल्या ताइ दादाने बाळाला उठवु नये म्हणुन सगळ्य मोठ्यांचा सखत पहारा बसतो......
सगळ्यांच्या बोलण्यातले ईतर विषय संपतात्.......फक्त कैरी आणि कैरी......घरात .....आळीत्..गावत एकच विषय्........कैरी....
( क्रमशः)


वाचन
14403
वाचनखूण
प्रतिक्रिया
19
सुंदर लेख..
वा! विजुभाऊ!
एप्रिल फळ - हापुस चे
तात्या
विजुभाऊ ही घ्या अजुन दोन,,,,,
अप्रतिम विजुभाऊ व मदनबाण,
आत्ताची
सुंदर लेख..
झकास .............
कैर्या !!!!!
कैर्या +
लै भारी ...
अहाहा
सुंदर लेख..
:)
अरे वा, विजुभाऊ
एका मित्रा
अरे वा !!! क्या बात है
एप्रिल फळाचे काय सुंदर वर्णन केले हो !!! अंब्याच्या मोहोराचे आता कैर्या रुपांतर होउन त्या हवेत मस्त झोके घेत असतात. त्यांच्या कडे असे लटकताना पाहीले की वाटते देवळ्यातल्या घण्टेचे लोलक काढुन हवेत अद्र्युश्य घण्टा वाजवुनसारी स्रूष्टी या ऋतुंच्या राजाला सलामी देत आहे. क्या बात है, आपल्या या सुंदर कल्पनेला आमची मनापासून दाद आहे. षोडशेच्या गालावर तारुण्याने गुलाबी झाक यावी तशी कैरी बाळांच्या गालावर लाली चढु लागते....एका दैवी मुहुर्तावर कैरी बाळाला स्वतःच्या नव्हाळीची जाणीव होते. ओहो, क्या कहने, कैरीला पालखीत बसवून आणल्यासारखे वाटले.कैरी या विषयावर वाचतांना हळूवार फुलणा-या प्रेमाची अवस्था व्यक्त करत आहेत असे वाटले. सुंदर लेखन..........!!!
हे घ्या