नाईलच्या देशात - १ : "निघालो होतो कैरोला....."

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
24 May 2010 - 3:20 pm

प्रवास सूचीवर मुंबई ते कैरो उड्डाण ७३७-८०० विमानाने असल्याचे वाचून थोडा विरस झाला. ही ३ - ३ आसन रचनेची विमाने देशांतर्गत प्रवसाला ठिक असली तरी मोठ्या प्रवसाला थोडी अडचणीची वाटतात. मात्र तिथे पोहोचण्याची / तिथुन परत येण्याची सोयीस्कर वेळ आणि वाजवी किमतीत हव्या असलेल्या तारखांना असलेली उपलब्धता - तिही ऐन मोसमात या निकषांवर इजिप्त एअर हा सर्वोत्तम पर्याय होता. संपूर्ण प्रवास नियोजन करुन देणाऱ्या माझ्या मित्राने मला आगाऊ कल्पना दिलीच होती की ही विमानसेवा काही मोठी खास नाही पण वरील निकषांप्रमाणे योग्य आहे आणि वाइट नक्की नाही. आधी चौकशी केलेली बरी, नपेक्षा आयत्या वेळी उड्डाणे रद्द करणारी सेवा गळ्यात पडली तर सहलीचा बट्ट्याबोळ व्हायचा. रॉयल जॉर्डन चे विमान ठरलेल्या वेळेत निघतेच असे नाही आणि निघते तेव्हा ठरलेल्या स्थळी थेट जातेच असेही नाही; समजा मुंबईला निघालेल्या विमानाला अचानक कलकत्त्याचे घसघशीत मालवाहु भाडे मिळाले तर ते उड्डाण कलकत्तामार्गे मुंबई असे बदलण्यात येते असे ऐकुन होतो. बाकी एअर इंडियाने प्रवास केलेल्याला इतर कुठल्याही विमानसेवेबद्दल तक्रार असायचे काही कारण नसते म्हणा. असो.

मी, पत्नी व चिरंजीव असे तिघे होतो. तिघांना मिळुन साठ किलो बोजे सामानात नेता येत असतानाही (खांद्यावरचे ओझे वेगळे हो!)आपले सामान कमी आहे असे अनेकदा ऐकावे लागले. मी दुर्लक्ष केले. मात्र प्रवासात उगाच लोढणे नको म्हणुन मला माझी चित्रण तिपाई घेण्यास मनाई केली गेली होती. असो. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. दहाचे उड्डाण म्हणताना आम्ही नियमानुसार मुकाट्याने सातलाच दाखल झालो. खरेतर तिथे तीन तास ताटकळणे हा काही सुखाचा अनुभव नाही पण वेळ पाळलेली बरी. विमान आणि डॉक्टर यांची एकतर्फी शिस्त असते. तुम्ही उशीरा आलात तर तुमचे उड्डाण वा ठरलेली वेळ गेली. मात्र तुम्ही वेळेवर आल्यावरही तुम्हाला आपल्या सोयीने घेण्याचे अधिकार या दोहोंकडे असतात. त्यांची कारणे नेहमीच ’रास्त व अपरिहार्य’ असतात, आपण काय ते रिकामटेकडे. विमनतळावर सर्व सोपस्कार संपवुन आम्ही उड्डाणद्वारासमोर येऊन स्थिरावलो. दिवसाचे उड्डाण म्हणजे कंटाळवाणा प्रकार.

उड्डाणपत्र, बहिर्गमन, सुरक्षा तपासण्या वगैरे सोपस्कार संपवुन आम्ही आमच्या निर्दिष्टीत उड्डाणदरवाज्या समोरील जागेत आसनस्थ झालो. पलिकडील खुल्या उपहारगृहात कर्मचार्‍यांची जमवाजमव सुरू होती. आमच्याच उड्डाणदरवाज्याने एअर ईंडियाच्या परदेशातुन आलेल्या उड्डाणाचे आता चेन्नाईला प्रस्थान होते. आता यांचे उड्डाण कोणत्या दरवाज्यावर लावले आहे ते जाहिर केले नव्हते की ते त्यांनाच आगाऊ माहित नव्हते हे तेच जाणोत, पण दर पाच मिनिटांनी होणार्‍या उद्घोषणेबरोबर दारावरचे तसेच आसपास वावरणारे कर्मचारी तोंडाने 'चेन्नै, चेन्नै' असे कोकलत होते. मला माझ्या लहानपणचे ठाणे स्थानक आठवले. स्थानका बाहेरील टॅक्सी अड्ड्यावर लाकडी बांधणीच्या डॉज, प्लायमाउथ गाड्या उभ्या असायच्या आणि चालक व त्यांचे अडते स्थानकाबाहेर पडणार्‍या उतारुंकडे पाहत 'भिवंडी एक शीट' असे ओरडत असायचे. गाडीची क्षमता वा उपस्थित उतारूंची संख्या काहीही असो, 'भिवंडी एक शीट' हे परवलीचे वाक्य होते.

कुठे घरी संपर्क साध, कुठे कॉफी घे, कुठे आपल्या बरोबर कुठले उतारू आहेत ते आजमावुन कुणी बोलका दिसल्यास नमस्कार चमत्कार कर, असे करीत वेळ काढत असताना अखेर आमचे उड्डाण जाहिर झाले आणि आम्ही सरसावलो. सुरक्षा रक्षकांबरोबर विमनसेवेचा सेवकवर्गही आत शिरणार्‍यांच्या तपसणीत तैनात होत. कर्मचारी वर्ग हसतमुखाने वावरत होता हे पहुन बरे वाटले. विमानात शिरलो आणि आसन व्यवस्था बरी वाटली. दोन रांगांमध्ये बर्‍यापैकी अंतर होत. अगदी ऐसपैस नाही तरी गुडघे समोरच्या आसनाच्या पाठीला घासत नव्हते ही जमेची बाजु. जवळ पास सहा तास एकाच जागी बसायचे म्हणताना खरेतर बोईंग ७७७ श्रेणी वा एअर बस ३३० श्रेणी हवी. जनता दर्जाची आसनेही मोकळी व सुखद असतात. योगायोगाने आमच्या रांगेतील पलिकडच्या तीनही आसनांवर कुणीच न आल्याने ती ओस पडलेली लक्षात आली. चिरंजीवांनी विमानाचे दरवाजे बंद होण्याची उद्घोषणा होताच आम्हाला सोडुन त्या आसनांपैकी मधल्या आसनावर टोपी, जाकीट वगैरे टाकत स्वत: खिडकी ताब्यात घेतली. डोळ्यावर भगभगीत प्रकाश नको वाटत असला तरी खिडकीच्या झापा काही वेळ तरी उघड्या ठेवणे अनिवार्य होते. साधारण अर्ध्या तासाच्या खोळंब्यानंतर विमान आकाशात झेपावले. थोड्या वेळाने सेवक वर्ग न्याहरी घेउन आला. पलिकडील एका षौकिनाने ’फक्त खायलाच’ का? अशी उघड विचारणा केली तेव्हा सेवकाने हॅ हॅ करीत साळसूदपणे सांगितले की आजकाल लोक फार पितात आणि मग इतर प्रवासींना त्याचा उपद्रव होतो त्यापेक्षा आम्ही अपेयपानाला थाराच देत नाही! सकाळी सकाळी कुणी पीत नसावे असा माझा समज मागे एकदा दुबई हून पहाटे साडेचारच्या उड्डाणात दूर झाला होता. उड्डाणानंतर पाउणेकतासात सेविका ढकल गाडी घेउन अवतरताच अनेक भाविकांनी पहाटे पाच सव्वा पाचला काकड आरती केलेली पाहुन मी थक्क झालो होतो. इथे पिण्याच्या आनंदापेक्षा 'फुकट आहे तर का सोडा?' हा भाव अधिक प्रबळ असावा.

उड्डाण बव्हंशी आखाती देशांवरुन जात होत; कधी भूभाग तर कधी समुद्र. मी कॅमेरा काढला आणि मांडीवर घेउन बसलो. काही बरे दिसले तर टिपु असे म्हणत असतानाच खाली निळ्याशार पाण्याच्या कडेने पांढऱ्या वाळुच्या भूमीवर वसलेले कुठलसं शहर दिसलं.
मग बराच वेळ खाली निळं पाणी आणि वर निळशार आकाश, मधेच कुठेतरी पोह्यांवर नारळ भुरभुरल्यागत विखुरलेले पांढरे तुरळक ढग असे दृश्य दिसत होते.
काही वेळातच एक मजेशीर चाळा मिळाला. खाली सागरात निळे पाणी आणि लाटा यांवर तरंगत एक मालवाहु जहाज आपला मार्ग आक्रमीत होते. लवकरच आम्ही त्याला ओलांडले. आता ते जहाज अगदी बरोबर खाली होते. पुढे निळे पाणी आणि त्याला भेदत जाणारे जहाज व त्याच्या मागे फेसाचा शुभ्र पिसारा असे सुरेख दृश्य दिसत होते. आणि बघता बघता आमचे विमान वाळवंटी भूभागाकडे वळले तर ते जहाज उजव्या अंगाने निघुन गेले. आता नजर पोचेल तिथे फक्त वर आकाश आणि खाली वाळु होती. वाळुच्या टेकड्या म्हणताच आपल्या डोळ्यापुढे एक विशिष्ठ दृश्य उभे राहते. मात्र इथे जवळपास ३५ हजार फूट उंचीवरुन सरळ रेषेत खाली बघताना मात्र वेगळेच रुप दिसत होते.
आणि अचानक वाळवंटतातील तिरकस सरपटणाऱ्या सापासारखा एक काळाशार रस्ता खालुन उलगडत गेला. रस्ता दुभजकावर जमलेल्या वाळुच्या कणांमुळे दुतर्फा पसरलेला तो रस्ता खरोखरच पाठीवर सोनेरी रेघ असलेल्या सर्पासारखा भासत होता.
तो देखणा रस्ता नजर खिळवुन ठेवणारा होता. मात्र पुढच्याच क्षणी मनात विचार आला, की आपण अशा रस्त्याने जात असताना मोटारीतले इंधन संपले वा यंत्रात बिघाड झाला तर???? अंगावर काटा आला.

वाळवंटात हिरवळ हा शब्दप्रयोग ऐकला होता, पण खाली अक्षरश: ओसाड वाळवंटात वर्तुळाकार वा अर्धवर्तुळाकार हिरवळी पाहुन मी थक्कच झालो. नक्कीच या हिरवळी गोलाकार भागात खास निर्माण केलेल्या असाव्यात आणि त्यांना विशिष्ठ आकार दिलेला होता. घड्याळात वेळ दाखविणारे काटे सरकताना सरकलेल्या भागात जर तबकडीचा रंग वेगळा झाला तर कसे दिसेल तदवत चतकोर, सव्वा चतकोरांसारखे अनेक वर्तुळाकार सलग दिसत होते.
सध्या जोमाने जाहिरात करत असलेल्या टाटा डोकोमो ला आपली अक्षर रचना या हिरवळीकडे पाहुन सुचली असावी का असा एक मजेशिर विचार मनात येउन गेला. हा काय प्रकार असावा हे कुतुहल अद्यापही मनात आहे. कुण्या आखातस्थाने यावर माहिती द्यावी ही नम्र विनंती. अशा हिरवळी अनेक ठिकाणी दिसल्या, माझ्या निरिक्षणानुसार त्या हिरवळी साधारण मोठ्या रस्त्याच्या आसपास होत्या.

जसजसे आम्ही अफ्रिकेकडे, खुद्द इजिप्तकडे जवळ सरकु लागलो, तसे खालचे वाळवंटही बदलले. वाळुच्या टेकड्या व पठारांची जागा आता मोठ्या खडकाळ पर्वतांनी घेतली होती. पर्वत म्हणजे जणु थिजलेला लव्हारस! एखाद्या मुशितुन साच्यात ओतुन एकसंध पाडावे असे कडे पर्वत माथ्यांवर पसरलेले होते.
एकुण पसरलेल्या पर्वतरांगा पाहताना आपल्या सह्याद्रीच्या पर्वतमाथ्यांवरील दुर्गांची आठवण न झाली तरच नवल. फरक इतकाच की कुठे हिरवळ वा मृदु जमिनीचा थांगपत्ताही नव्हता सगळा मामला दगडाचा. जणु खडक छिन्नीने फोडुन हा पर्वत कोरला असावा. या पर्वतांवरुन जलौघ वाहायचे दूरच, मात्र प्रवाही वाटांवरुन वाळु वाहत होती. अशाच वाळुच्या झऱ्यांनी सजलेल्या एका पर्वताच्या पायथ्याशी सोसाट्याच्या वाऱ्याने धुरळा उडवायला सुरूवात केलेली दिसली.
वाळुचे लोट आसमंतात पसरत टेकड्यांच्या माथ्यापलिकडे उधळताना दिसत होते.

मात्र एकाएकी या उदी तपकिरी निसर्गदृश्यात निळा रंग अवतरला!
ते अविस्मरणीय दृश्य मी कधीच विसरू शकत नाही. अलिकडे मऊसूत भासणाऱ्या वाळुचे गालिचे, पुढे जेरी माउसच्या चीजसारखे दिसणारे व वाळुचे प्रवाह अंगावर वागवणारे पर्वत व त्या पलिकडे निळेशार पाणी!

आता प्रवास संपत आला होता असे घड्याळ सांगत होते. सेवकवर्गाचीही आवरासावर सुरू झाली. विमानातील चित्रपटलावर कैरोचा मार्ग दिसत होता, ठिपका जवळ येत होता. अचानक विमान डावीकडे झुकले व एक झोकदार वळण घेत विमान पुढे निघाले. विमान आता उंची कमी करीत बऱ्यापैकी खाली आले होते. एव्हाना वाळवंट गायब होऊन तिची जागा देखण्या निळ्याशार सागराने घेतली होती. मंचकावर भरल्यापोटी पसरून विश्रांती घेणारे ते समुद्रदेवतेचे रूप मोठे विलोभनिय होते. निळ्या रंगाच्या अनेकानेक छटांनी नटलेले जणु ते निसर्गदृश्यच. संथ हलक्या लाटा, मधेच नितळ पाण्यातुन दिसणारा भूभाग तर किनाऱ्याला जमिन व पाण्याचा तरंग असलेला काठ यांच संगम असे ते दृश्य होते. विमान आणखी खाली झेपावले आणि तो क्षण अचूक साधत मी लाटांनी साय धरलेले जलपृष्ट व त्यावर परावर्तित होऊन चकाकणारे उन हे दृश्य टिपले.

आणि अचानक डोक्यात किडा वळवळला. नकाशात कैरो सरळ पुढे दिसत असताना आमचे विमान मात्र डावीकडे वळले होते आणि बराच वेळ तसेच जात होते. आतातर उंचीही घटत होती. वाईट शंका सहसा खोट्या ठरत नाहीत. मी उठुन काही विचारायच्या आतच उद्घोषणा झाली ’ खराब हवामानामुळे कैरो विमानतळावर उतरण्याची परवानगी नाकारण्यात आल्यामुळे विमान आता कैरो ऐवजी हुर्घाडा येथे उतरविण्यात येत आहे’ क्षणभर सन्नाटा आणि मग सर्वत्र एकच गलका उठला. ’आता काय?’ या प्रश्नाने सर्वांना चिंतित केले होते. मुंबईहून निघालेल्या विमानात बहुसंख्य उतारु भारतिय होते, सगळेच पर्यटक होते. जर आज कैरोला पोहोचलोच नाही तर न्यायला आलेले सहल आयोजक कुठे भेटणार? आपले विमान आता येत नाही तर ते कधी येईल हे त्यांना कसे समजेल? प्रत्येकाचा मुक्काम एकेका ठिकाणी नेमका ठरलेला. जर पहिलाच दिवस बुडाला तर सगळेच ओंफस! बोंबला! जरा वातावरण निवळल्यावर कर्मचाऱ्यांनी खुलासा केला की ईजिप्तचे हवामान अत्यंत लहरी अहे. हवा कधी पलटेल काही नेम नाही. बरोबरच आहे, अगदी अर्धा तास आधी आम्हालातरी कुठे माहित होते? मनात अनेक प्रश्न होते पण उत्तर नव्हते. जेजे होईल तेते पाहणे यापलिकडे हातात काहीच नव्हते. असो. आता जे आहे त्यांत बरे शोधा हे खरे. मी अर्चनाला म्हणजे माझ्या पत्नीला व चिरंजीवांना उसने अवसान आणीत म्हणालो, 'चला रे आपल्या रुपरेषेत हुर्घाडा नव्हते ते अनायासे फुकटात पाहायला मिळतयं तर बघुन घ्या'. हुर्घाडा हे लाल समुद्राकाठचे ठिकाण, पर्यटनासाठी प्रसिद्ध. आता पुढची चिंता करण्यापेक्षा हुर्घाडाचे सौंदर्य दिसतेय तितके टिपुन घ्यायला मी सज्ज झालो. विशाल सागरात मधेच पसरलेली बेटं आणि पांढऱ्या-बदामीसर वाळुवर निळ्या रंगाच्या पाण्याने रंगवलेल्या छटा टिपताना मी रंगुन गेलो. कुठे किंचित माथा वर असून बाकी पाण्याखाली गेलेली बेटे तर कुठे वाळुचे बेट असा खेळ चालला होता.
अखेर हुर्घाडा विमानतळ आला आणि किनाऱ्याची वस्ती दिसु लागली. ज्या वेळेस आम्ही कैरो गाठणार त्या वेळी आम्ही शेकडो मैल दूर हुर्घाडा येथे उतरून पडलो होतो.

क्रमशः

हे ठिकाणआस्वादअनुभव

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 May 2010 - 3:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्त लिखाण आणि छायाचित्रंही. पुढच्या भागाची वाट पहात आहे.

अदिती

श्रावण मोडक's picture

24 May 2010 - 3:44 pm | श्रावण मोडक

+१.
कॅमेरा कुठला असावा?

छोटा डॉन's picture

24 May 2010 - 5:25 pm | छोटा डॉन

अदिती आणि मोडकांशी सहमत.
मस्त खुसखुषीत लेख, मजा आली वाचुन, एकदम फ्रेश झालो !

पुढचा भाग लवकर येऊद्यात शेठ !

------
( पहाटे ३.३० ला काकडआरतीला बसणारा ) छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

मस्त कलंदर's picture

24 May 2010 - 10:06 pm | मस्त कलंदर

अदिती, श्रामो नि डॉन शी सहमत..
फोटो क्लासच!!! :)

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

भडकमकर मास्तर's picture

26 May 2010 - 1:41 am | भडकमकर मास्तर

सर्वाशी सहमत
वाचतोय

सहज's picture

24 May 2010 - 3:48 pm | सहज

फोटो व वर्णन दोन्ही मस्त.

वाचतोय. :-)

जे.पी.मॉर्गन's picture

24 May 2010 - 5:49 pm | जे.पी.मॉर्गन

....वाचतोय. इजिप्त सफरीच्या प्रतीक्षेत

जे पी

धनंजय's picture

25 May 2010 - 3:54 am | धनंजय

असेच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 May 2010 - 10:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो व वर्णन दोन्ही मस्त.
वाचतोय.

स्वाती२'s picture

24 May 2010 - 4:05 pm | स्वाती२

मस्त!

टारझन's picture

24 May 2010 - 4:12 pm | टारझन

एक्सलंट !!!!! मनमोहक फोटो !!

वेताळ's picture

24 May 2010 - 5:18 pm | वेताळ

;;)

वेताळ

चित्रा's picture

24 May 2010 - 5:51 pm | चित्रा

पाण्याचा फोटो सुंदरच आला आहे. पुढचे वर्णन वाचायलाही उत्सुक.

Manoj Katwe's picture

24 May 2010 - 5:56 pm | Manoj Katwe

मी स्वतः प्रवास केला असे वाटले जणू.

Manoj Katwe's picture

24 May 2010 - 5:57 pm | Manoj Katwe

मी स्वतः प्रवास केला असे वाटले जणू.

प्राजु's picture

24 May 2010 - 7:27 pm | प्राजु

या प्रवासवर्णनाबद्दल काही बोलायला माझ्याकडे शब्द नाहियेत.
फार्फार आवडलं. खूप दिवसांनी इतकं सुंदर लेखन वाचायला मिळालं.
फोटंबद्दल तर काय बोलू?
दंडवत साक्षीदेवा.. :)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

सर्वसाक्षी's picture

24 May 2010 - 7:36 pm | सर्वसाक्षी

सर्व वाचकांचे आभार. लिहिन लिहिन म्हणताना अनेक दिवस गेले. का आणि कसे पण राहात गेले खरे.
शेवटी एकदाचा आळसातुन बाहेर आलो.

(स्वगत - आता पुढील भाग वेळेवर आले पाहिजेत न पेक्षा जोडे बसतील.)

पुन्हा एकदा आभार, कलोअ॑.

साक्षी

स्पंदना's picture

24 May 2010 - 8:08 pm | स्पंदना

विमानाच्या काचेतुन हे फोटो घेतले? धन्य आहात. अतिशय सुंदर .....

:)

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

पाषाणभेद's picture

24 May 2010 - 8:25 pm | पाषाणभेद

मस्त फटू
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

माझी जालवही

फटू's picture

24 May 2010 - 8:35 pm | फटू

लेख निवांत वाचेनच परंतू चित्रे अगदी भन्नाट आहेत. पाहून डोळ्यांचे पारणे फीटले.

- फटू

jaypal's picture

24 May 2010 - 9:25 pm | jaypal


***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

मदनबाण's picture

24 May 2010 - 9:31 pm | मदनबाण

सुंदर फोटु... :)

मदनबाण.....

Hi IQ doesn't guarantee Happiness & Success in Life.

भारद्वाज's picture

24 May 2010 - 9:34 pm | भारद्वाज

मस्त मस्त मस्त मस्त.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

अमोल खरे's picture

24 May 2010 - 10:15 pm | अमोल खरे

आणि अप्रतिम लेख. स्वतःचे अनुभव शेअर करण्याची शैली तर झकासच आहे. बाकी मिपाकरांप्रमाणे पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.....

पिंगू's picture

24 May 2010 - 10:34 pm | पिंगू

प्रतिक्रिया काय देऊ? अतिशय अप्रतिम..

शिल्पा ब's picture

24 May 2010 - 10:43 pm | शिल्पा ब

सहज, जे.पी.मोर्गन आणि चित्रशी सहमत...
छायाचित्र आणि लिखाण मस्तच !!!! :-)

फस्त कलिंगड
विस्कटलेल घर हे संगणक चालू असण्याची खुण आहे !!!

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

बेसनलाडू's picture

24 May 2010 - 11:35 pm | बेसनलाडू

प्रवासवर्णन आणि प्रकाशचित्रे दोन्ही मस्त!
(आस्वादक)बेसनलाडू

भाग्यश्री's picture

25 May 2010 - 12:27 am | भाग्यश्री

कुठला कॅमेरा ते सांगाच.. कसले भारी फोटो आले आहेत!!
सगळे रंग इतके फ्रेश दिसतायत ! :)

मराठमोळा's picture

25 May 2010 - 1:21 am | मराठमोळा

अप्रतिम छायाचित्रे.
वर्णन करायला शब्दच नाहीत. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

नंदन's picture

25 May 2010 - 2:02 am | नंदन

वर्णन आणि फोटो दोन्ही उत्तम. पुढील भागांची वाट पाहतो आहे.

>>> लाटांनी साय धरलेले जलपृष्ट व त्यावर परावर्तित होऊन चकाकणारे उन
--- छायाचित्र तर सुरेखच. पण 'साय धरलेलं' हे त्याचं विशेषणंही फार आवडलं.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मिसळभोक्ता's picture

25 May 2010 - 3:08 am | मिसळभोक्ता

वाचतोय. लवकर येऊ द्या.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

ऋषिकेश's picture

25 May 2010 - 9:19 am | ऋषिकेश

वा! लेख व छायाचित्रं खूपच छान!
मी आखातीय हुशार नसलो (म्हंजे कसाही हुशार नसलो) तरी गोल हिरवळी न्यूयॉर्क - वेगास प्रवासात खाली दिसल्या होत्या. त्यावेळी अमेरिकायणातही मी हे काय असे विचारले होते. त्यावत प्रियालीतैने सांगितले होते की ती गोलाकर शेतेच आहेत. तुषारसिंचनाच्या "स्प्रिंकलर्स" (मराठी?)मुळे असे गोल आकार निर्माण झाले आहेत.

बाकी सव्वापाचची काकड आरती, सत्तेपुढे न चालणारे शहाणपण वगैरे नर्मविनोदही भन्नाट.

पुढील भागाची वाट पहतोय

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

पाषाणभेद's picture

26 May 2010 - 2:35 am | पाषाणभेद

>>> पण खाली अक्षरश: ओसाड वाळवंटात वर्तुळाकार वा अर्धवर्तुळाकार हिरवळी पाहुन मी थक्कच झालो.

वरील फोटो मध्ये ते गोल निळे का दिसतायेत? अन 'पीकांमधले गोल' (crop circles) हा असलाच प्रकार असावा काय?

हा प्रश्न तुम्हाला अन सर्वसाक्षी यांनाही.

The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

सन्जोप राव's picture

25 May 2010 - 10:04 am | सन्जोप राव

वरील सर्व प्रतिसादांशी सहमत.
सन्जोप राव
ठोकर ना लगाना हम खुद है
गिरती हुई दीवारों की तरह

आनंदयात्री's picture

25 May 2010 - 10:07 am | आनंदयात्री

वर म्हटल्याप्रमाणे छायाचित्रे डोळ्याची पारणे फेडुन गेली !!

स्मिता_१३'s picture

25 May 2010 - 11:04 am | स्मिता_१३

छान

स्वाती दिनेश's picture

25 May 2010 - 11:48 am | स्वाती दिनेश

वावा, फार सुंदर चित्रे आणि वर्णन..
इजिप्त पहायची सुप्त इच्छा परत वर डोकावायला लागली आहे हे वाचून..:)
(बर्‍याच दिवसांनी लिहिलेत ,पण लिहिलेत तो एकदम षटकार मारलात..:))
स्वाती

सुमीत भातखंडे's picture

25 May 2010 - 12:49 pm | सुमीत भातखंडे

प्रवास घडवताय.
लौकर टाका पुढचा भाग.

सुवर्णमयी's picture

27 May 2010 - 8:04 pm | सुवर्णमयी

तिन्ही भाग आवडले. फोटो सुद्धा सुरेख आहेत.

विसोबा खेचर's picture

31 May 2010 - 5:57 pm | विसोबा खेचर

छान रे साक्षी..