कल्पवृक्ष कन्येसाठी ....

पर्नल नेने मराठे's picture
पर्नल नेने मराठे in जनातलं, मनातलं
7 Dec 2009 - 2:20 pm

नोव्हेंबर डिसेंबर महिने जवळ आले की दत्तजयंतीचे वेध लागत, घरात बाबांचे गुरुचरित्राचे पारायण सुरु होत असे. घरात छान भक्तिमय वातावरण असे. तसेही ते वर्षाचे ३६५ दिवस असे कारण स्वामींचा जप करणे, जप लिहिणे, लघुरुद्र, सत्यनारायण, मेहुण, सवाष्ण काही ना काही घरात सुरुच असे. बाबा खुप भाविक होते. त्यांनी गुरुचरित्र सुध्दा हाताने लिहुन काढले होते. त्यांना गाण्याची सुद्धा आवड होती. ते उत्तम पेटी वाजवत असत. त्यामुळे अधेमधे घरी गाण्याचे कार्यक्रम होत असत. लहानपणापासुन संगीत कानावरुन गेल्यामुळे का कोण जाणे पण मी गाणे शिकले नसले तरी कोण बरोबर की चुकीचे गातेय हे नक्किच कळते. अधेमधे त्यांना गाण्याला साथ द्यायलाही बोलावले जात असे. ते आवड म्हणुन जात असत. कोणी काही मानधन विचारले कि ते नाही सांगत. कारण त्याची आवड वा छंद म्हणुन ते साथ करीत असत. पण मग खुपच आग्रह केला की त्यांना घ्यावे लागे. तसे ते भिडस्त स्वभावाचे, कोणाकडे जेवायला गेले तरी अर्धपोटी येत, ’वाढु का वाढु का’ असे विचारले कि ते नको म्हणत व मग आईला घरी येउन कुकर लावावाच लागे. त्यामुळे आमच्या घरी ’वाढु का’ असे विचारलेले चालत नसे, काय ते वाढुन मोकळे व्हायचे असा दन्डक होता. ही सवय मला असल्याने मी सुध्दा खुप आग्रह करुन वाढते पण माझा नवरा त्या पाहुण्यासमोर म्हणतो, ’अग, किती आग्रह, त्याना त्रास होइल ना... 8|

बाबा कायम आम्हाला त्यांच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत असत की लहानपणी त्यांना चपला पण नसत, कशीबशी वह्या पुस्तके मिळत. आम्ही दोघी बहिणी हे ऐकुन जाम बोअर व्हायचो, कदाचीत वयच तसे होते. आता मात्र विचार केला कि मात्र गलबलुन येते. भिडस्त स्वभावाबरोबर ते थोडे एकलकोंडेच असावेत. त्यांना खुप असे मित्र नव्हते, होते ते मोजकेच ३-४ होते. त्यांना सरकारी नोकरी लागली व ते त्यांचे गाव सोडुन मुंबईत आले. नोकरीत त्यांना सगळेच पट्त होते असे नाही. लाच, भेटी घेणे हे त्यांच्या तत्वात बसत नसे. दिवाळीच्यावेळी सुद्धा बाहेरच्या लोकाकडुन येणार्या भेटवस्तु, खाद्यपदार्थ ते ओफ़्फ़िसमधे वाटुन टाकत. त्यांच्या ह्या तत्वनिष्ट स्वभावाची आईला सुद्धा भिती वाटत असे आणी अनेक वेळेला ती बोलुन सुद्धा दाखवी.

भित्यापाठी ब्रम्हराक्षस म्हणतात ते मात्र खरेच. त्यांची सप्लाय डिपार्ट्मेन्टला बदली झाली. सप्लाय डिपार्ट्मेन्टचे काम म्हणजे रेशन दुकानांना जी धान्याची पोती लागतात ती इश्यु करणॆ. काहितरी एनक्व्यायरी झाली व अचानक कळले कि बाबा सस्पेन्ड झालेत. त्यावेळी आम्ही दोघी बहिणी कोलेजला होतो. आईला पायाखालची जमिन सरकलीये असे झाले. . घरातले वातावरण बद्लुन गेले. त्या दिवसात बाबा घरीच असत. ओफ़्फ़िसमधले बरेच लोक त्यांना भेटायला येत. सस्पेन्डचे कारण कळले तेव्हा मला जाउन ओफ़्फ़िसला आग लावुन द्याविशी वाटली. रेशन दुकानाना जी धान्याची पोती लागतात ति इश्यु केली गेली होती पण ९० ऐवजी १०० केली होती, पण पैसे १०० चे आलेले होते. मग काय चुक त्यान्ची, एवढ्यासाठी हि शिक्शा? हाताखालच्या क्लार्कने १०० आकडा टाकला व बाबाची सही घेतली, बाबानी ९० ची इश्यु ऑर्डर पाहिली नाही. अरे जर पैशांचा घोटाळा नाही ना मग का प्रकरण वाढवले. मग असे कळले की बाबा अगदी साधे होते, लाचलुचपत घेणार्याना ते तिकडे नको होते म्हणुन हे प्रकरण वाढवले गेले होते.

कारण अगदी क्षुल्लक होते पण मानहानी झाली होती. त्यामुळे त्यांना टेन्शनमुळे डायबेटीस झाला. ते औषधे घ्यायचा कन्टाळा करत. पण आई खुप काळजी घेई. नातेवाईक विनाकारण सल्ले देत, मदतीचा साधा शब्द सुद्धा नाही. मी त्याकाळात छोटीशी नोकरी करत असे. त्यामुळे आईला मदत होई. शेजारच्या काकु त्यांच्या मुलीला आमचे उदाहरण देत असत की घरात असे वातावरण असुनही दोन्ही मुली बघा कश्या नीट वागतात. ह्या काळात तर त्यांचे स्वामींच्या जपाचे प्रमाण वाढले. स्वामींनीच त्यांना तरले व यथावकाश निकाल आमच्या बाजुने लागुन ते प्रकरण मिटले गेले आणी यथावकाश बाबांची रिटाय़र्मॆण्ट आली व ते रिटायर्ड झाले.आम्हीही दोघी शिक्षणे संपवुन चांगल्या नोकरीला लागलो. आता लग्ने तेवढी बाकी होती, ती सुध्दा कशी ठरली हे तुम्हाला माहितच आहे.
http://www.misalpav.com/node/8160
http://www.misalpav.com/node/10179
आम्ही आपापल्या नव्या घरात रुळाय़ला लागलो होतो. मी घरी फ़ोन केला की बाबांना काय कसे काय विचारुन आईला द्या सांगत असे. असेच एकदा मला ते म्हणाले कि तुम्हाला मी नको असतो, आईच हवी असते. मला जरा कसेतरीच वाटले पण मग मी ते विसरुन गेले. एकदा अचानक माझ्या मैत्रिणीचा फ़ोन आला ही चुचु काय ग हे, तुझे बाबा हॉस्पिटलमधे आहेत न तु का नाहियेस तिकडे. मला काहीच सुचले नाही. मी तडक आईला फ़ोन केला , आई म्हणाली अग काळजीचे कारण नाहिये म्हणुन तुला फ़ोन केला नाही. जरा शुगर वाढलीय व रुटिन चेकअप पण व्ह्यायचेय म्हणुन मीच डॉक्टरांना सांगितले की हॉस्पिटलमधेच ठेवुयात म्हणजे चेकअपला ये-जा नको व त्यांना त्रास नको. तरी का कोण जाणॆ मला राहावले नाही मी नवर्याला फ़ोन करुन सान्गितले, तो सुद्धा म्हणाला लगेच जाउयातच. आम्ही दोघे हॉस्पिटलमधे गेलो. बहिण आली होतीच. मला पाहुन ते हसले व म्हणाले कशाला आलीस धावत मी बरा आहे. मी काहीच बोलले नाही. सगळे घरी गेले. मी त्यांना पेपर वाचुन दाखवत होते तेवढ्यात क्लिनर आला व त्याने लादी पुसलीन. तो गेला तेवढ्यात हे बाथरुममधे जायला उठ्ले. मी त्याचा हात धरायला गेले तर म्हणाले नको मी बरा आहे. ते जाउन आले तोच लादी जराशी ओली असावी कारण नुकतीच पुसली होती, हे घसरुन पडले ते अर्धे कॉटखाली गेले. तरी ते मला म्हणाले मी उठतोय तु नको येउस मधे. स्वत ते उठ्ले व कॉटवर बसले. मी त्यांचे हातपाय पुसले व ते आडवे झाले. आई, बहिण व माझा नवरा घरुन जेवुन बाबांसाठी डबा घेवुन आले. थोड्यावेळाने मला आई म्हणाली कि तुम्ही दोघे (मी व माझा नवरा) घरी जा, आम्ही रात्री इथेच झोपु. काही लागले तर फ़ोन करेन मी. आम्ही घरी गेलो मी जेवले व लगेच झोपलो.

फ़ोन वाजला व मला जाग आली पण ब्लँक कॉल होता. नवरा जागाच होता, तो म्हणाला अग मगाशी सुधा एक ब्लँक कॉल येउन गेला. मी परत झोपायचा प्रयत्न केला, ३.३० झाले होते. पण झोप येईना. काहीतरी हुरहुर, विचित्र वातावरण फ़िल होत होते. त्यातच कधीतरी झोप लागली असावी. जाग आली तोच फ़ोन वाजत होता. मीच घेतला बहिण होती, म्हणाली लगेच निघुन ये. आवाजावरुन घाबरलेली वाटली. माझे हातपाय थंड पडले. आम्ही दोघे तड्क निघालो बहुदा ४.३० झाले होते. रस्त्यात काका, काकुपण भेटले. हॉस्पिटलखालीच मला रडण्याचा आवाज आला. मी काकुचा हात जोरात दाबला, ती म्हणाली कि अग इथे मॅटर्निटी होमसुद्धा आहे ना , एखादे बाळ रडत असेल. पहिल्या मजल्यावर आलो. आई व बहिण रुमच्या बाहेर उभ्या होत्या. डॉक्टर बाहेर आले व म्हणाले ’काका गेलेत.’ आयुश्यात पाहिलेला पहिला मृत्यु, तो पण स्वतच्या जन्मदात्याचा . मी सुन्न झाले व आईला पाहुन डॊळ्यातुन अश्रु वह्यायला लागले. बहिणीला राहावले नाही ती लहान मुलासारखी हमसुन हमसुन रडायला लागली. डॉक्टरांनी जवळ घेवुन तीला समजावले. आईची अवस्था मी इथे लिहुच शकत नाहिये. आम्हाला डॉक्टरानी आत पाठवले आम्ही नमस्कार करुन बाहेर आलो.

घरी आलो, नातेवाईक जमले. मला भाऊ नसल्याने चुलत भावाने अन्त्यसंस्कार केले आणी जन्म झाल्यापासुन, कळायला लागले तेव्हा पासुन जवळ असलेला माणुस दुर निघुन गेला होता. १०-१२ दिवस गरुडपुराण वाचायला एक ग्रुह्स्थ येत होते. अनेक लोक भेटायला आले. आम्ही काहिना ओळ्खतही नव्हतो, कधी पाहिले सुध्हा नव्हते. आम्हाला भिडस्त स्वभावबरोबर थोडे एकलकोन्डे वाटणारे बाबा, मग आम्हीच त्याना ऒळ्खायला कमी पडलो होतो का? मग एवढे लोक कोण, कसे, कुठुन आले? सगळ्यांनी आम्हाला धीर दिला. त्यातली एक व्यक्ती तर म्हणाली कि दुक्ख कसले करताय, अशा सद्घुणी माणसाचा सहवास वडिल म्हणुन तुम्हाला लाभला म्हणुन ईश्वराचे आभार माना, त्यांच्या आठवणीवर जगा. १३वे झाले, त्या दिवशी आई परत आकांताने रडली. कारण आता आम्ही सगळे परत आपापल्या घरी जाणार होतो आणी तीला एकटीला रहायचे होते.

त्या रात्री काका, काकु आम्ही सगळॆच बोलत बसलो होतो. आम्हाला जे ब्लँक कॉल्स आले तसेच ब्लँक कॉल्स त्याचवेळी माझ्या काकाला व एक मित्र आहेत त्यांना आले होते. त्यामूळॆ बहिणीचा फ़ोन आला तेव्हा सगळे त्या ब्लँक कॉल्समुळे जागेच होते व लवकर हॉस्पिटलला पोहोचले. बहिणीला विचारले तर तीने ते केले नव्हतेच. मग कोणी केले होते? ती सांगत होती कि ४ वाजल्यापासुन बाबा म्हणत होते कि ’साई के पास जाना है’ आणी मग पुढे ते अस्वस्थ होत गेले. जेव्हा त्यांची बिफ़केस उघडली तेव्हा त्यात त्यांना जे मानधन दिले जायचे ती पाकिटे मिळाली, ती त्यानी फ़ोडुन सुद्धा पाहिली नव्हती, पिन्डाला कावळा पण पटकन शिवला होता, केवढा हा अलिप्तपणा.

ते गेले त्याला एक वर्ष होणार त्याच्या आद्ल्या दिवशी बहिणीला दिवस गेले अशी गोड बातमी कळली आणी त्या दिवसापासुन आई एवढी बिझी झाली कि तीला दुख्ख करायला वेळच झाला नाही. आता आई नातीचे कौतुक, लाड करण्यात मग्न आहे. कोणी त्याच्या घरात असलेल्या स्वामींच्या फ़ोटोबद्दल विचारले की बोबड्या स्वरात म्हणते की ’हे स्वामी माझ्या मम्माला तीच्या बाबांनी दिलेत’. आजही त्यांच्यानंतर काहीही अडचणी आल्या की फ़क्त स्वामींसमोर उभे रहायचे !!! :)

जीवनमानलेख

प्रतिक्रिया

टारझन's picture

7 Dec 2009 - 2:31 pm | टारझन

:(

sneharani's picture

7 Dec 2009 - 2:50 pm | sneharani

:(
नि:शब्द

गणपा's picture

7 Dec 2009 - 3:02 pm | गणपा

______ :(

अवलिया's picture

7 Dec 2009 - 3:04 pm | अवलिया

प्रामाणिक अनुभव कथन मनाला भिडले.

--अवलिया

सायली पानसे's picture

7 Dec 2009 - 3:42 pm | सायली पानसे

अवलियांशी सहमत.

वल्लरी's picture

7 Dec 2009 - 7:02 pm | वल्लरी

>>प्रामाणिक अनुभव कथन मनाला भिडले.
---वल्लरी

वल्लरी's picture

7 Dec 2009 - 7:03 pm | वल्लरी

>>प्रामाणिक अनुभव कथन मनाला भिडले.
---वल्लरी

सुमीत भातखंडे's picture

7 Dec 2009 - 3:12 pm | सुमीत भातखंडे

काय बोलू?

सहज's picture

7 Dec 2009 - 3:24 pm | सहज

नियमीत लिहीत जा. छान लिहतेस.

मदनबाण's picture

7 Dec 2009 - 4:49 pm | मदनबाण

अगदी असेच म्हणतो...

मदनबाण.....

मेघवेडा's picture

7 Dec 2009 - 3:59 pm | मेघवेडा

छानच .. भिडलं अगदी....

सचोटीने काम करणार्‍या माणसाला त्रास झाला तरी श्रद्धेच्या बळावर तो तगून जातो असे बर्‍याचदा दिसते.
आपण आपल्याच जवळच्यांना ओळखायला कधीकधी फार उशीर करतो का असे वाटून जाते.

चतुरंग

वेताळ's picture

7 Dec 2009 - 4:15 pm | वेताळ

सदगुणी लोक देवाला आवडतात असे कुठे तरी वाचले आहे.परंतु अशा लोकांची आज खरी गरज आहे,खुपच छान लेखन....अगदी मनापासुन आवडले.
वेताळ

घाशीराम कोतवाल १.२'s picture

7 Dec 2009 - 4:56 pm | घाशीराम कोतवाल १.२

प्रामाणिक अनुभव कथन मनाला भिडले.
नानाशी रहमत
लिहित रहा चुचु मन मोकळ कर
बर वाटेल :( :(

**************************************************************
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराजकी जय

बाकरवडी's picture

7 Dec 2009 - 5:01 pm | बाकरवडी

:|

:B :B :B बाकरवडी :B :B :B

माधुरी दिक्षित's picture

7 Dec 2009 - 5:09 pm | माधुरी दिक्षित

:(

नेहमी आनंदी's picture

7 Dec 2009 - 5:56 pm | नेहमी आनंदी

:(
जो आवडतो सर्वांना, तो ची आवडे देवाला.....

चुचु, छान लिहितेस, अशीच लिहित रहा....

स्वाती२'s picture

7 Dec 2009 - 6:15 pm | स्वाती२

छान लिहिलय.

मीनल's picture

7 Dec 2009 - 6:21 pm | मीनल

+१
मीनल.

प्रशांत उदय मनोहर's picture

7 Dec 2009 - 6:35 pm | प्रशांत उदय मनोहर

एड्गर्ड अल्बर्ट गेस्ट यांच्या कवितेतल्या ओळी आठवल्या -

Miss me a little - but not for long
And not with your head bowed low.
Remember the love that we once shared,
Miss me, but let me go.

सहज आणि मनाला भिडणारे अनुभवलेखन आहे.

-प्रशांत

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Dec 2009 - 6:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखनातला प्रामाणिकपणा भावला.

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

7 Dec 2009 - 6:39 pm | यशोधरा

अतिशय आवडला लेख.

अनामिक's picture

7 Dec 2009 - 6:40 pm | अनामिक

निशब्द!

-अनामिक

भानस's picture

7 Dec 2009 - 6:47 pm | भानस

अनुभव कथन भिडले.

विकास's picture

7 Dec 2009 - 7:56 pm | विकास

खूप छान लेख. वर अवलीया, बिरुटे आदींनी म्हणल्याप्रमाणे प्रामाणिक आत्मकथन एकदम भावले.

प्रभो's picture

7 Dec 2009 - 8:25 pm | प्रभो

मस्त गं..चुचे लिहित जा कायम...असं समजणार्‍या मराठीत लिहिलस ना की भिडतय बघ काळजाला...

बाकी तुझ्या बाबांवरून मला माझ्या आजोबांची आठवण झाली त्यांच्यावर पण असाच प्रसंग आला होता..

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

रेवती's picture

7 Dec 2009 - 9:05 pm | रेवती

छान लिहिलयस!
तुझ्या बाबांवर आलेले प्रसंग वाचून वाईट वाटले.
तसे ते लवकरच गेले म्हणायला हवं!
तुम्हा दोघींची लग्नं झालेली होती हीच काय ती जमेची बाजू!

रेवती

शब्देय's picture

7 Dec 2009 - 9:13 pm | शब्देय

:( नि:शब्द

संजय अभ्यंकर's picture

7 Dec 2009 - 10:00 pm | संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

पाषाणभेद's picture

7 Dec 2009 - 10:03 pm | पाषाणभेद

तुमच्या बाबांना आदरांजली.
------------------------
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

पासानभेद बिहारी

विचित्र विर's picture

7 Dec 2009 - 10:21 pm | विचित्र विर

ईतरांसारखाच मिहि नि:शब्द

लवंगी's picture

8 Dec 2009 - 2:41 am | लवंगी

:(

समिधा's picture

8 Dec 2009 - 3:22 am | समिधा

वाचुन डोळ्यात खुप पाणी आले चुचु.
अजुन काही नाहि बोलू शकत...... :(

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

क्रान्ति's picture

8 Dec 2009 - 8:13 am | क्रान्ति

समिधाशी सहमत! दुसरी काहीही प्रतिक्रिया देणं अशक्य!

क्रान्ति
अग्निसखा

टुकुल's picture

8 Dec 2009 - 3:26 am | टुकुल

..

--टुकुल

प्रिय चुचु,
अतीशय हृदयस्पर्शी स्वानुभवकथन!
तुझी लिहिण्याची लकब झकास व सहजसुंदर आहे. अशीच लिहीत जा. मला तुझं लिखाण वाचायला नेहमीच खूप आवडते.
काका
------------------------
सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम

शाहरुख's picture

8 Dec 2009 - 4:03 am | शाहरुख

:-(

उपास's picture

8 Dec 2009 - 7:54 am | उपास

जो आवडतो सर्वांना तोचि अवडे देवाला..
|| श्री स्वामी समर्थ ||
माझा ब्लॉग - उपास मार आणि उपासमार

मृगनयनी's picture

8 Dec 2009 - 11:30 am | मृगनयनी

:( का गं चुचु....... रडवलंस बघ!

नि:शब्द...

|| श्री स्वामी समर्थ ||

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

मृगनयनी's picture

8 Dec 2009 - 11:38 am | मृगनयनी

तू नेहमी हसत रहा.. गं चुचु!
तुझे बाबा जिथे कुठे असतील... तिथे त्यांना आवडेल... तुला आनंदी असलेलं पाहुन!!!!!

|| श्री स्वामी समर्थ ||

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

jaypal's picture

8 Dec 2009 - 11:54 am | jaypal

दिपक's picture

8 Dec 2009 - 12:10 pm | दिपक

मनातलं.. एकदम आतुन आलेलं लिखाण.. भावलं.

श्रावण मोडक's picture

8 Dec 2009 - 12:42 pm | श्रावण मोडक

चुचु म्हटलं की लेखनाविषयी निर्माण होणारी प्रतिमा मोडून काढणारं लेखन. लिहित रहा!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

8 Dec 2009 - 1:12 pm | भाग्यश्री कुलकर्णी

खरच ग रडायलाच आले एकदम्.खुप चांगले लिहलेस्.तुजे बाबा डोळ्यांसमोर उभे राहिले.

प्रकाश घाटपांडे's picture

8 Dec 2009 - 2:59 pm | प्रकाश घाटपांडे

भावपुर्ण लेखन. मनाच्या गाभार्‍यात आंदोलन चालु असतात. त्यावेळी ब्लॅन्क कॉल चे भास देखील अर्थपुर्ण वाटतात. आमचा बिट्टु भुभु गेला त्यावेळी मला उशीचा स्पर्श हा बिट्टूचाच वाटायचा.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

ज्ञानेश...'s picture

8 Dec 2009 - 3:27 pm | ज्ञानेश...

.................