हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा....भाग २

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
17 Nov 2009 - 3:40 pm

गेल्या लेखात आपण काही 'शोपीसेस' पाहीले. तीच मालिका आता पुढे चालवूया.

नुकतीच सच्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २० वर्ष पूर्ण झाली. नाय हो.. त्याचं कौतुक...त्याची आकडेवारी, महानता, नम्रपणा वगैरे गोष्टींबद्दल आपण बोलणारच नाहिये ! इथे आपल्याला काम आहे त्याच्या फटक्यांशी ! मैदानाबाहेरचा सचिन, फील्डिंग करतानाचा तेंडल्या आणि बॅटिंग करताना पूर्ण भरात असलेला सच्या ही तिन्ही मोठी अजब रूपं आहेत हो. पहिली दोन विलोभनीय आणि बॅटिंग करताना बोलरसाठी "विलो" भयनीय ! 'टॉप गियर' मधला तेंडल्या हा एकत्र तोफा डागणार्‍या ७३ रणगाड्यांपेक्षा संहारक असतो. कट्स, पुल, ड्राईव्ह, लेटकट्स, ग्लान्स, फ्लिक... प्रत्येक चेंडूसाठी किमान २ फटके भात्यात असणं हे परग्रहावरून आल्याचं लक्षण आहे. सच्याची अजून एक खूबी म्हणजे "इंप्रोव्हायझेशन".... पॅडल स्वीप मारायला गेला.. बॉल थोडा ऑफस्टंपच्या बाहेर पडला.. तर रिव्हर्सच काय करेल... पुल करायला गेला आणि वाटलं की बॉल तितका शॉर्ट नाहीये तर कमरेपासूनच फ्लिक काय करेल.. सगळंच अनाकलनीय !

आता हाच फटका बघा ना.... ह्याचे सगळे कॉपीराईट्स साहेबांकडे आहेत. अर्थात नसते तरी फरक पडला नसता म्हणा - कारण ह्या ग्रहावर असा शॉट अजून कोणी मारूच शकत नाही.

बॉल पायांत असूदे वा शॉर्ट... मधल्या यष्टीच्या रेषेच्या आत पडला की साहेबांची ही अदाकारी बघायला मिळतेच मिळते. उजवा हात डाव्याच्या वर येतो... अफलातून टायमिंग साधत चेंडू मिडविकेटच्या डावीकडून ते यष्टीरक्षकाच्या शेजारून.. अश्या मोठ्या "रेंज"मध्ये मन मानेल तिथे मारला जातो. बरं फटक्याचं टायमिंगही असं की शेवटपर्यंत बॉलमागे धावणार्‍या फील्डरला आशा वाटत राहावी. पण शर्यतीत जिंकतो शेवटी चेंडूच.

आमच्या अझ्झूभाईंचा फ्लिक पण असाच. लेझीम खेळतांना जसा हाताला हलका झटका देतात तसा भाईजान झटका द्यायचे आणि नजरेचं पारणं फिटायच ! कलकत्त्यात क्लूसनरची शिकवणी घेतलेली आठवतीये? फिक्सिंगचं शेण खाल्लं नसते तर अझ्झूभाई आमच्या गळ्यातले ताईत होते ! (फोटो जालावर मिळाला नाही). असो !

सच्याचीच क्रिकेटला अजून एक देणगी म्हणजे "अपर कट". स्लिप्स आणि डीप थर्डमॅन असताना गोलंदाजाचाच वेग वापरून चक्क षटकार मारायचा हा कट फक्त सच्याच शिजवू जाणे ! अहो समोरून येणारा चेंडू रेषेत येऊन टाईम करण ही सुद्धा तुमच्या क्रिकेटच्या कर्तबगारीची कसोटी असते. तिथे हे साहेब शरीरापासून लांब जाणारा चेंडू केवळ खत्तरनाक टायमिंग साधत प्रेक्षकांत पाठवतात !

अपर कट काय किंवा पॅडल स्वीप काय.. खेळावा तो आमच्या साहेबांनीच. गोलंदाजाच्या आग ओकणार्‍या वेगावर साहेब अपर कटने असं काही पाणी ओततात की ज्याचं नाव ते !

आता पुढच्या कलाकाराचा फटका बघण्याआधी एक प्रसंग डोळ्यासमोर आणा. ऑस्ट्रेलियाची परिस्थिती तशी नाजूक आहे. ६ बाद १३७. .आणि जिंकण्यासाठी ५७ चेंडूंत ७९ धावा हव्या आहेत. एक ऑफस्पिनर चांगला मारा करतो आहे. तेव्हा काय होतं? अचानक ऑस्ट्रेलियाचा कर्णधार त्याला मिडविकेट क्षेत्रात पाठोपाठ ३ चौकार मारतो... धावगती आटोक्यात येते आणि ऑस्ट्रेलिया ४ गडी राखून सामना जिंकते ! ९० च्या दशकातली ही कथा. बर्‍याच वेळा घडलेली. पण प्रत्येकवेळी ते चौकार मारणारा एकच - स्टीव्हन रॉजर वॉ !

फिरकी गोलंदाज.. त्यातही ऑफस्पिनर जर डोईजड होऊ लागला तर थोरले वॉ हा फटका हमखास मारायचे. अगदी तणावाच्या परिस्थितीत, थंड डोक्याने जागा हेरून "काऊ कॉर्नर" ला क्षेत्ररक्षकांमधल्या गॅप मधून असा चौकार / षटकार मारणे... थोरल्यांच्या डोक्यातच एक रेफ्रिजरेटर होता ! Shrewd हा शब्द कदाचित ह्याच्याचसाठी बनवला गेला असावा ! We play to win matches, not to win friends ही मानसिकता नसानसांत भिनलेला... आर्मीमध्यी जायचा तो चुकून क्रिकेट खे़ळायला आला की काय असं वाटायला लावणारा - पहिल्या टेस्ट मध्ये मिळालेली "बॅगी ग्रीन" शेवटपर्यंत अभिमानाने वापरणारा, खिशात लाल रुमाल ठेवणारा, कधीही हार न मानणारा, पराकोटीच्या प्रेशरमध्येदेखील थंडपणे विचार करणारा चिवट आणि झुंजार संघाचा चिवट आणि झुंजार कर्णधार - स्टीव वॉ !

आणि मग हे त्यांचे बंधू... खरंतर जुळे... पण काही मिनिटं उशीर झाल्यामुळे 'ज्युनियर' ! ह्यांची वेगळीच तर्‍हा... म्हणजे जणू काही कॉलेजमध्ये ऑर्केस्ट्राच्या निवडीसाठी गेले.. आणि कोणीतरी व्हायोलिनच्या बो ऐवजी हातात बॅट देऊन बॅटिंगला पाठवला.... हा मनुष्य बॅटदेखील "बो" सारखीच वापरायचा. आणि म्हणूनच ह्याची फलंदाजी म्हणजे संगीत होतं ! ह्याच्या फटक्यांना "शॉट" म्हणणं म्हणजे सोज्वळ निशिगंधा वाडला अँजेलीना जोली म्हणण्यासारखं ! "अहिंसा परमो धर्मः" म्हणत हा चेंडूला कुरवाळायचा... थोपटायचा.. क्वचित कधीतरी प्रेमानी एक टपली मारायचा ! स्क्वेअर ड्राईव्ह असो वा लेग ग्लांस.. फ्लिक असो वा सरळ उचलेला षटकार... प्रत्येक फटका एक पेंटिंग असायचं - आणि खाली त्या कलाकाराची सही - मार्क एड्वर्ड वॉ !

पण मला जास्त भावतं ते ह्या धाकट्याचं झेल घेणं !

पहिल्या / दुसर्‍या स्लिपमध्ये गडी असा उभा जणू सवेरासमोरून जाणारी फर्ग्युसनची हिरवळ बघतोय ! पण चेंडू त्याच्या रडारवर दिसला रे दिसला की ह्या निवांत "पोलर बेअर" चं रूपांतर चपळ चित्त्यात व्हायचं ! He is undoubtedly the greatest natural catcher that I've ever seen - or that I've ever had the displeasure to be caught out by - असं गूच त्याच्याबद्दल म्हणाला ते उगाच नाही. अर्थात त्याच्या फलंदाजीतला नाजूकपणा त्याच्या झेल घेण्यातदेखील होता. अतिशय हलक्या हातांनी हा चेडू असा झेलायचा जसा प्रेयसीनी टाकलेलं गुलाबाचं फूल !

ह्यानंतर मार्क वॉचाच कुंभमेळ्यात बिछडलेला भाऊ ! त्यामुळे ह्याला ऑस्ट्रेलियाबद्दल विशेष जिव्हाळा.... २४ सामन्यांत ६ शतकं आणि १० अर्धशतकांच्या सहाय्यानी त्यानी ऑस्ट्रेलियाविरुद्ध २२०४ धावा केल्या आहेत. कलकत्त्यात भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत अविस्मरणीय खेळी खेळल्यावर खुनशी ऑझीजनी त्याचं बारसं केल - व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण ! लेग ला ५ क्षेत्ररक्षक लावून वॉर्न लेगस्टंपच्या बाहेर मारा करत होता. आणि हा बहाद्दर त्याला बाहेर येऊन Inside out खेळत कव्हर्स मधून सीमापार धाडत होता.. आणि एकदा नाही.. अनेक वेळा ! ह्या लक्ष्मणचे ड्राईव्हस सुद्धा असेच प्रेक्षणीय. टायमिंगची दैवी देणगी असल्यामुळे त्याचे ड्राईव्हस बघणे हे नयनरम्य सुख असतं. केवळ अप्रतीम !

लक्ष्मण काय किंवा मार्क वॉ काय - दोघांच्या हातातली बॅट म्हणजे त्यांचा कुंचला होता... क्रिकेटचं मैदान हा त्यांचा कॅनव्हास आणि त्यांची प्रत्येक खेळी एक सुंदर चित्रकृती !

आता "व्हाईट लाईटनिंग" अर्थात अ‍ॅलन डोनाल्ड !

त्याच्या गोलंदाजीपेक्षा मला नेहेमीच आवडायची ती त्याची मैदानावरची देहबोली. मला तर ह्याला बघून नेहेमी बोरिस बेकरची आठवण व्हायची. सामन्याची परिस्थिती कशीही असो - डोनाल्ड नेहेमीच विजेत्याच्या आवेशात. जणू "सामन्याचा निकाल काहीही लागो, विजेता मीच आहे" असा सगळा मामला.

तांत्रिकदृष्ट्या अतिशय सोपी आणि 'करेक्ट' धाव आणि गोलंदाजीची पद्धत. झेप घेताना डाव्या खांद्यावरून फलंदाजावर रोखलेली भेदक नजर. "हाय आर्म" आणि सरळ हाताची दिशा आणि अपार कष्टाने कमावलेल्या तगड्या शरीराच्या साहाय्याने निर्माण होणारा तुफान वेग! ह्या अ‍ॅलन डोनाल्डने भल्या भल्यांची भंबेरी उडवली होती. किंग्समीड डर्बनच्या एकदिवसीय सामन्यात सचिन आणि द्रविडशी झालेलं त्याचं द्वंद्व आठवा. आधी सचिननी त्याला मिडविकेटवरून षटकार मारला आणि मग द्रविडनी हल्ला चढवला. तेव्हाच्या डोनाल्डचं वर्णन 'चवताळलेला' ह्याच एका शब्दात करता येईल.

९८ साली ट्रेंटब्रिज कसोटीत इंग्लंडला जिंकायला २४७ धावा करायच्या होत्या. १ बाद ५० वगैरे परिस्थितीत नासिर हुसेन आणि माईक आथरटन निवांतपणे लक्ष्याचा पाठलाग करत होते. जिंकण्यासाठी इरेला पेटलेला डोनाल्ड गोलंदाजीसाठी आला आणि सुरू झालं कसोटी क्रिकेटमधील एक अभूतपूर्व द्वंद्व. चेंडूनी आग आणि तोंडानी गरळ ओकणारा डोनाल्ड आणि त्याला तितक्याच धैर्याने तोंड देणारा आथरटन ! आथरटनच्या बॅटची कड घेऊन गेलेला कॅच बाऊचरनी सोडला तेव्हा डोनाल्ड अक्षरश: धुमसत होता. नंतर बॅटच्या कडेवर उठलेल्या बॉलच्या शिक्क्याभोवती गोल करून आथरटननं तिथे डोनाल्डची सही घेतेली. तेव्हा मला बॉल धूसर दिसत होता असं आथरटनच कबूल करतो. इंग्लंड सामना जिंकलं आणि नंतर ड्रेसिंग रूम मधे आथरटन आणि डोनाल्ड एकत्र बीअर पीत गप्पा मारतानाचं चित्र टीव्हीवर दिसलं ! कसोटी क्रिकेट अंगावर काटा आणतं ते अश्या खेळाडूंमुळेच !

कसोटी क्रिकटचा विषय निघाला आणि आमच्या "ग्रेट वॉल" चा उल्लेख झाला नाही असं होईल का? आपल्या पहिल्याच कसोटीत आणि ते ही लॉर्डस वर पदार्पणात शतक करण्याचा त्याची संधी केवळ ५ धावांनी हुकली. आणि तेव्हापासून बिचार्‍याल नेहेमीच पाच धावा कमीच पडत आल्या आहेत. आपल्या खूप जास्ती टेलेंटेड सहकार्‍यांमध्ये त्याच्या अतुलनीय कामगिरीच्या मानानी द्रविड नेहेमीच झाकोळला गेलाय. एकदिवसीय सामन्यांत ३०० पेक्षा जास्ती धावा झालेल्या दोन्हीही भागीदार्‍यांमध्ये द्रविडचा मोठा वाटा आहे. परदेशात - विशेषतः कसोटीमध्ये द्रविड म्हणजे संघाची लंगोटी असतो. तो गेला की अब्रू गेली ! परदेशातल्या भारताच्या कसोटी विजयांत त्याचा नेहेमीच सिंहाचा वाटा असतो. शिवाय स्लिपमधल्या झेलांचा बोनस आहेच. तरीही हा सर्वार्थानी भारतीय क्रिकेटचा "अनसंग हीरो" आहे.

आमच्या राहुल्याचा हा डिफेन्स बघा ! उसळलेला चेंडू त्याच्या वर जाऊन हलक्या हाताने आपल्याच पायाशी दाबणारा तो राहुल द्रविडच. राहुल "द वॉल" द्रविड काय उगाचच म्हणतात?? कोणत्याही प्रकारच्या पिच वर कोणत्याही गोलंदाजांपुढे, कोणत्याही परिस्थितीत - बिनचुक तंत्र, भक्कम बचाव आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर तासनतास अभेद्य तटबंदी उभारून खिंड लढवणारा राहुल शरद द्रविड ! भारताच्या कसोटी संघाचा "रॉक ऑफ जिब्राल्टर" !

ह्यानंतरच्या माणसानं क्रिकेट खेळण्याची पद्धतच बदलली. गदेसारखी आपली बॅट परजत आपल्या कातळात कोरलेल्या सोट्यासारख्या हातांनी तो चेंडू मारत नाही तर फोडतो ! जवळपास चाळीसाव्या वर्षीदेखील घारीसारखी तीक्ष्ण नजर आणि चपळ रीफ्लेक्सेसमुळे सनथ जयसुर्या आज देखील क्रिकेटमध्ये दबदबा ठेऊन आहे.

जयसुर्याच्या अफलातून फ्लिक इतकाच त्याचा प्रचंड ताकदीनी मारलेला स्क्वेअर कट अतिशय प्रेक्षणीय ! डावाच्या सुरुवातीला बॉस कोण आहे ते दाखवणारा त्याचा फटका ! शॉर्ट आणि ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू पडला की कचकचीत कट सगळेच चांगले फलंदाज मारतात. पण म्हणून पॉईंटवरून सिक्स?? ती केवळ जयसूर्याच मारू जाणे !

हे म्हणजे शोकेस मधले अजून काही हिरे ! क्रिकेटनं आम्हाला दिलेले... आमची आयुष्य समृद्ध केलेले... आम्हाला आनंदाचे.. जोषाचे...जल्लोषाचे आणि उद्विग्नतेचेही... पण अविस्मरणीय क्षण दिलेले. क्रिकेट आमचा जीव की प्राण आहे ते उगाच नाही. नैराश्य, भ्रष्टाचार, संताप, शोक, असहायता, फसवणूक, ढासळलेली नीतिमूल्य, गरीबीनी बरबटलेल्या आमच्या आयुष्यात आम्हाला उत्तम उदात्त आणि उन्नताचं दर्शन घडवणारा आमचा हा खेळांचा राजा.... आणि आपल्या कष्टांनी, कौशल्यानं आणि करिष्म्यानं आम्हाला हे आनंदाचे क्षण देणारे ही आमच्या खेळाचे राजे ! जोपर्यंत असे खेळाडू हा खेळ खेळत आहेत तोपर्यंत आम्हीही देहभान विसरून ह्या खेळाचा आनंद घेणार !

क्रीडाप्रकटनआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

फ्रॅक्चर बंड्या's picture

17 Nov 2009 - 4:09 pm | फ्रॅक्चर बंड्या

लय भारी...

लेखन आवडले

ज्ञानेश...'s picture

17 Nov 2009 - 4:23 pm | ज्ञानेश...

निव्वळ अप्रतिम लिखाण.
मॉर्गनबुवा, या क्रिकेटदैवतांचे दर्शन करून दिल्याबद्दल आभारी आहे.
शेवटच्या परीच्छेदातील शब्दाशब्दाशी सहमत आहे!

"Great Power Comes With Great Responsibilities"

मोहन's picture

17 Nov 2009 - 4:30 pm | मोहन

अप्रतीम. थांबू नका.

( पुढल्या भागाच्या प्रतिक्षेत)
मोहन

परिकथेतील राजकुमार's picture

17 Nov 2009 - 4:45 pm | परिकथेतील राजकुमार

मालक सर्वांग सुंदर लेखन हो :)

फक्त असे 'चटावरचे श्राद्ध' उरकु नका. एकदम येव्हडे 'प्रेक्षणीय फटके' एकाच षटकात मारण्यापेक्षा, एक एक खेळाडु घेउन त्याला 'कुरवाळायचा... थोपटायचा.. क्वचित कधीतरी प्रेमानी एक टपली मारायचा' उपक्रम राबवलात तर खुप आनंद वाटेल.

©º°¨¨°º© परादादा गांगुली ©º°¨¨°º©
आमचे राज्य

शक्तिमान's picture

17 Nov 2009 - 4:58 pm | शक्तिमान

प.रा.शी सहमत..

बाकी लेख अफलातून झाला आहे!

गणपा's picture

17 Nov 2009 - 8:47 pm | गणपा

परा शी सहमत.
सुंदर वर्णन, लाजवाब फोटो.

झकासराव's picture

18 Nov 2009 - 9:19 am | झकासराव

मस्त सुरु आहे लेखमाला.
आता पुढच्या लेखात मॅग्रा येवु दे.
त्याने टाकलेला प्रत्येक बॉल नेम धरुन टाकल्यासारखाच. बिलकुल चुकायचा नाही.

आशिष सुर्वे's picture

17 Nov 2009 - 5:03 pm | आशिष सुर्वे

सुंदर्र वर्णन!
'मार्क वॉ' चे वर्णन करताना 'व्हायोलिनच्या बो' ची दिलेली उपमा अप्रतिम!!

-
कोकणी फणस

मी_ओंकार's picture

17 Nov 2009 - 5:39 pm | मी_ओंकार

लेख अतिशय सुंदर.

- ओंकार

मदनबाण's picture

17 Nov 2009 - 5:04 pm | मदनबाण

सह्ही लिहले आहे...मालिका अशीच सुरु ठेवावी. :)

मदनबाण.....

The Greatest Gift You Can Give Someone Is Your Time,Because When You Are Giving Someone Your Time,You Are Giving Them A Portion Of Your Life That You Will Never Get Back.

नंदन's picture

17 Nov 2009 - 5:08 pm | नंदन

बॉल पायांत असूदे वा शॉर्ट... मधल्या यष्टीच्या रेषेच्या आत पडला की साहेबांची ही अदाकारी बघायला मिळतेच मिळते. उजवा हात डाव्याच्या वर येतो... अफलातून टायमिंग साधत चेंडू मिडविकेटच्या डावीकडून ते यष्टीरक्षकाच्या शेजारून.. अश्या मोठ्या "रेंज"मध्ये मन मानेल तिथे मारला जातो.

--- अगदी, अगदी. यष्टीरक्षकाच्या शेजारून अशाच रवाना केलेल्या एका शॉटचा हा फोटो पहा:

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

घाटावरचे भट's picture

17 Nov 2009 - 5:10 pm | घाटावरचे भट

भारीच!!

श्रावण मोडक's picture

17 Nov 2009 - 5:26 pm | श्रावण मोडक

लेखन चालू राहू द्या. जमून येतंय.

सुमीत भातखंडे's picture

17 Nov 2009 - 6:24 pm | सुमीत भातखंडे

क्या बात है यार.
लक्ष्मणचा रिस्टचा वापरपण अफलातून असतो.
स्ट्रेट ड्राईव्ह मारण्यासाठी लेफ्ट एलबोचा परफेक्ट वापर फार महत्वाचा असतो.
पण ह्या माणसानी एका मॅचमधे चक्क रिस्टी स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे.
अ‍ॅक्शन फ्लिकची, आणि बॉल जातो थेट बॉलरच्या मागे सीमापार.

बाकी लेखातल्या वाक्या-वाक्याशी सहमत.
सचिन काय, वॉ बंधू काय, सनथ काय, किंवा द्रविड काय, क्रिकेट मधले देव आहेत सगळे.

प्रभो's picture

17 Nov 2009 - 8:08 pm | प्रभो

आमच्या आवडत्या खेळावरचा एक नितांत सुंदर लेख....
लिहीत रहा भौ.....लवकर टाक पुढचा भाग...

--प्रभो
-------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Nov 2009 - 8:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त लेखन. अजून येऊ दे..!

सच्या केवळ ग्रेटच. डीप थर्डमॅनच्या डोक्यावरुन शोयब अख्तरला थेट प्रेक्षकात भिरकावल्याचे मला स्मरते. त्याचा फोटो आहे का ?

पण सच्याच्या फील्डींगवर माझा काय विश्वास नाय राव. म्हणजे हातात येणारे, थोडेफार पळत जाऊन घेणारे झेल, स्लीपमधील झेल तसे अवघडच पण तिथेही तो उत्तमच. पण कधी झेप घेऊन झेल पकडल्याचे स्मरत नाही. पार फरफट जावून चेंडू अडवल्याचेही आठवत नाही.

-दिलीप बिरुटे

जे.पी.मॉर्गन's picture

18 Nov 2009 - 12:12 pm | जे.पी.मॉर्गन

हा बघा !

संदीप चित्रे's picture

17 Nov 2009 - 8:40 pm | संदीप चित्रे

>> मधल्या यष्टीच्या रेषेच्या आत पडला की साहेबांची ही अदाकारी बघायला मिळतेच मिळते.
१००% सहमत. बरेचदा आपल्या काळजाचा ठोका चुकतो पण चेंडू सुसाटतो :)

अपर कटबद्दल सांगायचं तर तेंडल्या आणि सेहवागने ह्या फटक्याला पूर्णत्व दिलं. विशेषत २००३ च्या विश्वचषकात पाकिस्तानविरूद्ध पहिल्या ५ षटकांत ५० ठोकताना ह्यांनी अगदी, "च्यायला ! तुला काय वाटलं रे, तुला एकट्यालाच अपर कट येतो? हा बघ मी कसा सणकवतोअ ते" असं जणू एकमेकांना म्हणत षटकार खेचले.

बाकी थर्ड मॅनच्या डोक्यावरून षटकार मारणारा (निदान माझ्या आठवणीतला) पहिला फलंदाज म्हणजे पुण्याचा रियाज पूनावाला :)

जे.पी.मॉर्गन's picture

18 Nov 2009 - 10:23 am | जे.पी.मॉर्गन

मी ढोपराएवढा असताना क्रिकेट खेळायची सुरुवात पूनावाला सरांकडे केली होती. ते आक्रमक बॅटिंग करायचे आणि नंतर यू ए ई ला स्थाईक झाले हे आठवतंय. सुलतान झरवानीच्या ९६ विश्वचषक संघात ते बहुधा होते !

हर्षद आनंदी's picture

17 Nov 2009 - 8:40 pm | हर्षद आनंदी

अगदी प्रत्येक चेंडुवर षटकार..

पहिल्या ओळी पासुन लेख संपुच नये असे वाटत होते...अजुनही त्याच धुंदीत आहोत.

पण साहेब, असे तुटक तुटक नका लिहु!

द वॉल ला अन्संग हीरो म्हणता आणि तुम्ही पण त्याला उपेक्षित ठेवता... नाही त्याच्यावर पुर्ण भाग टाका .. अगदी कॉपी बुक ड्राईव्ह मारणार, यशस्वी कॅप्टन बॅटसमन, स्लिप मधला उत्कृष्ठ कॅचर, विकेट कीपर अजुन काय काय? मी तर म्हणीन २०-२० मध्ये सचिन \ कुणाही पेक्षा द्रवीड चांगला खेळतो आणि हे त्याच्या क्रीकेटला वाहुन घेण्याचे आणू काळानुसार खेळ बदलण्याचे सर्वात मोठे यश आहे.

खरेच येऊ दे द्रविडी स्पेशल ...

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

ही शोकेससुद्धा मनासारखी झाली आहे.

अझ्झूभाई आमचाही आवडता खेळाडू होता. लोभापायी करियर घालवून बसला बिचारा, दैवदुर्विलास!
ह्या दुव्यावर १९९८ साली न्यूझीलंड विरुद्ध काढलेलं त्याचं शतक पहाता येईल.
ऑफसाईडच्या ३ स्लिप्स, पॉइंट, कवर्स मधून ह्या अवलियाने जे काही स्क्वेअरकट, लेटकट आणि ड्राईव्जचे अफलातून दर्शन दिले आहे ते केवळ नयनरम्य! प्रत्येक वेळी चेंडू क्षेत्ररक्षकाच्या जवळून खिजवत खिजवत, जमिनीशी लगट करत सीमारेषेकडे आणि टायमिंग असे की क्षेत्ररक्षकाला आशा लागून रहावी की आत्ता गाठेन, मग गाठेन, आत्तातरी गाठेन पण नाहीच! केवळ लाजवाब.
मला आणखी एक आवडणारी गोष्ट म्हणजे ह्याचा सिंगल अ‍ॅक्शन फील्ड आणि थ्रो. अझ्झू एक उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक होता. चेंडूवर नजर इतकी पक्की की वेगाने मारलेला चेंडू एका हाताने अडवून, उचलून त्याच वाकलेल्या अवस्थेत यष्टींवर किंवा यष्टिरक्षकाकडे अचूक फेकणे हे येरागबाळ्याचे काम नोहे!

तुमचा संपूर्ण लेखच इतका सुंदर आहे की काय काय म्हणून वर्णन करु?
(पण लिखाण अजून थोडे मोठे चालेल राव! हे म्हणजे एक पुरणपोळी खाऊन पुढच्याची वाट बघत बसावं तर एकदम उठून आंचवायलाच गेल्यासारखं वाटतं! ;) )

चतुरंग

ही इनिंग तर ग्रेटच. शिवाय अझ्झूभाईंनी पाकिस्तानविरुद्ध टोरोंटोच्या मालिकेत २ मॅचेस मध्ये अक्रम वकार ला फोड फोड फोडला होता. शिवाय एकदा डर्बन ला भाई आणि साहेबांनी ५ बाद ५८ वरून ६ पेक्षा जास्त रनरेटनी २३० धावांची भागीदारी केली होती. डोनाल्ड, क्लूसनर, पोलॉक, मॅकमिलन, अ‍ॅडम्स.. कोणीच दोघांच्या तडाख्यातून सुटलं नव्हतं. अझर ११० चेंडूंत ११५ आणि सच्या २५३ चेंडूंत १६९. हाहाकार माजवला होता !

तेव्हाचा एक किस्सा आठवतो. अझरने अ‍ॅडम्सला फ्लिकची फोर मारली तेव्हा समालोचक म्हणाला Can’t understand how he can play that shot with such a light bat. आणि पुढच्या ओव्हरला सच्यानी फ्लिक मारल्यावर म्हणाला Can’t understand how he can play that shot with such a heavy bat !

उमराणी सरकार's picture

18 Nov 2009 - 10:47 am | उमराणी सरकार

अझहर चे स्क्वेअर कट्स निव्वळ बिनतोड आणि कलाईचा सुरेख उपयोग करुन केलेले फ्लिक्स म्हणजे ब्रह्मानंदी टाळीच बघा.
उमराणी सरकार

न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे

अनिल हटेला's picture

17 Nov 2009 - 9:45 pm | अनिल हटेला

द्रवीड आणी लक्ष्मण प्रमाणेच सदागोप्पन रमेश नावाचा कसोटी खेळाडू होता.
लेझी बॅट्समन म्हणता येइन त्याना,पण अक्रम ,अख्तर सारख्या द्रुतगती गोलंदाजांना रडू आणलेले त्याने...:-)

पू भा प्र......:-)

बैलोबा ६+४ = १० डुलकर !!!
Drink Beer,
Save Water !!

;-)

भडकमकर मास्तर's picture

18 Nov 2009 - 12:03 am | भडकमकर मास्तर

खतरनाक जमलाय लेख...

अजून येऊद्यात...

शिवाय डोनाल्ड आथरटन लढाई , किंवा गूचचे मार्क वॉबद्दलचे वाक्य
या गोष्टींनी तर फार मजा आली

फारएन्ड's picture

18 Nov 2009 - 4:01 am | फारएन्ड

हा ही लेख एकदम आवडला. मजा आली वाचायला. फोटोंची निवडही एकदम अचूक!

सहज's picture

18 Nov 2009 - 6:38 am | सहज

मॉर्गनसर मिपाचे स्पोर्ट्स डायरेक्टर!!! [ पिटी मास्तर ]

जय हो!

जे.पी.मॉर्गन's picture

18 Nov 2009 - 10:34 am | जे.पी.मॉर्गन

तुमच्या प्रतिसादांनी मिपा किती क्रिकेट आणि क्रीडाप्रेमी आहे हेच दाखवून दिलं. विस्ताराने लिहिण्याची सर्वांची सूचना सर आँखोंपर ! खरंच हे सगळेच खेळाडू इतके महान आहेत की प्रत्येकावर एक पुस्तक लिहून होईल. असे अनेक सामने, प्रसंग असे आहेत की जे काल घडल्यासारखे आठवतात. त्यातल्या काहींबद्दल लिहायला नक्कीच आवडेल. अजून लाराचा पुल, मॅक्ग्राचा गुडलेंग्थ बॉल, मुरलीचा दूसरा... लई मोठी लिस्ट आहे राव ! नक्की लिहायचा प्रयत्न करीन.

हा प्रयत्न तुम्हाला आवडला ह्याचा आनंद आहे. पुनश्च धन्यवाद !

जे. पी.

चेतन's picture

18 Nov 2009 - 11:10 am | चेतन

मस्त लेख

अजुन काही स्टायलिश खेळाडु (जरुर वाचायला आवडेल)

भारतीयः के श्रिकांत, सिद्धु , युवराज
ऑस्ट्रेलियनः गिली, हेडन, ब्रेट ली, सायमंड्स
वेस्टंडिजः चंद्रपॉल, गेल, लारा
न्युझिलंडः अ‍ॅस्ट्ल, केर्न्स, हॅरिस
श्रिलंका: जयवर्धने, अरविंद डिसिल्व्हा, रणतुंगा, दिलशान, मलींगा, वास
साउथ आफ्रिका: कॅलिस, क्लुसनर, कर्स्टन,पोलॉक
इग्लंड: पिटर्सन्,फ्लिंटॉफ
पाकिस्तान: अन्वर, अक्रम, इंजमाम

चेतन

विजुभाऊ's picture

18 Nov 2009 - 1:22 pm | विजुभाऊ

संदीप पाटील हा भारतीय क्रिकेट मधला सर्वात स्टायलीश खेळाडू.
त्याच्या बद्दल थोडे लिहिता आले तर बघा ना बॉ

जय महाराष्ट्र.....

सुमीत's picture

19 Nov 2009 - 4:40 pm | सुमीत

काय खुमासदार फटकेबाजी वाचायला मिळाली आहे आज :)
हा लेख, प्रतिसाद आनी अजून काही पूरक जोडून एक नवी कोष बनवता येईल क्रिकेट साठी मिपा वर.

बाबा पाटील's picture

15 Jul 2015 - 8:51 pm | बाबा पाटील

एकच वाक्य बोलाव वाटतय्,सचिन जन्माला आला आणी राहुल घडत गेला.स्वतःला घडवत गेला.__/\_

राघवेंद्र's picture

15 Jul 2015 - 9:08 pm | राघवेंद्र

एकच वाक्य बोलाव वाटतय्,सचिन जन्माला आला आणी राहुल घडत गेला.स्वतःला घडवत गेला.__/\_

एकदम बरोबर मित्रा !!!

स्पार्टाकस's picture

16 Jul 2015 - 6:21 am | स्पार्टाकस

डोनाल्ड आणि आर्थरटन यांच्यासंदर्भात एक महत्वाचा उल्लेख म्हणजे ट्रेंट ब्रिज टेस्टमध्ये डोनाल्डचा बॉल आर्थरटनच्या ग्लोव्हला लागून गेला होता आणि बाऊचरने एकदा कॅच घेतला होता! डोनाल्डने जोरदार अपिल केल्यावरही अंपायर स्टीव्ह डन याने आर्थरटनला नॉटाऊट दिल्यावर डोनाल्डचा विश्वास बसला नाही. आर्थरटन जागचा हललाही नव्हता.

डोनाल्डच्या मते तो आर्थरटनला म्हणाला, "You better be f****** ready for what's coming because there'll be nothing in your half."

आर्थरटनच्या मते डोनाल्ड म्हणाला, "You f****** cheat."

या सर्वाचं साद्यंत वर्णन करणारा मार्टीन विल्यमसनचा लेख - http://www.espncricinfo.com/magazine/content/story/144135.html