श श क २०२२

नाव आडनाव's picture
नाव आडनाव in स्पर्धा
4 Aug 2015 - 22:22

[शतशब्दकथा स्पर्धा] ईवाईन

तसंतर विमान म्हणजे फक्त एक वाहतुकीचा प्रकार. पण खेड्यातल्या "त्या"च्या सारख्यांसाठी विमान म्हणजे एक मोठं आकर्षण. विमानाचा आवाज ऐकून एकदा तो त्याच्या आई-वडिलांना म्हणाला "मी मोठा व्हवून ईंजिनीअर झालो त आपन ईवाईनातून फिराया जावू".

प्रचेतस's picture
प्रचेतस in स्पर्धा
4 Aug 2015 - 21:34

[शतशब्दकथा स्पर्धा] नाईटमेअर

अंधार..गडद, काळाकुट्ट अंधार...डोळ्यात बोट गेलं तरी दिसणार नाही इतका.

त्याला जाग येते. खिडकीतला दिवा विझलाय. पेटवायला हवा. तो बिछान्यातून उठतो. काडेपेटी नेहमीच उशाशीच असते, पडली असेल कुठेतरी. अंधारातच तो इकडेतिकडे चाचपून बघतो. बहुधा खिडकीतच ठेवलीय मगाशीच. अंदाजानेच ठेचकाळत तो तिथे पोचतो. मंद झुळूक येतेय. वाऱ्यामुळेच विझलाय वाटतं.

प्यारे१'s picture
प्यारे१ in स्पर्धा
4 Aug 2015 - 21:05

[शतशब्दकथा स्पर्धा] सुटका

सहा महिन्यापासून पोटाचा त्रास सुरु होताच पण बाईची जात नि मधलं वय म्हणून सोडून दिलं होतं.
चुकीचं पडलेलं दान, नशीबानं आयुष्यभर दिलेला त्रास नि जीवनसाथी म्हणवणाराची कसलीच नसलेली साथ. १५ वर्षात ना प्रेमाचा शब्द ना एखादी शाबासकीची थाप जगण्यात काय रस वाटायचा?

शब्दबम्बाळ's picture
शब्दबम्बाळ in स्पर्धा
4 Aug 2015 - 20:46

[शतशब्दकथा स्पर्धा] शिवी

आजचा दिवस मह्याचा होता. एका साखळीचोराला त्याने पाठलाग करून पकडले होते! कॉलनीमधले सगळेजण मह्याच्याभोवती गोळा होऊन त्या प्रसंगाचं मसालेदार वर्णन त्याच्याकडून ऐकत होते.
"मस्त काम केलस रे! पण तो बरा सापडला तुला!" गर्दीतला एक जण म्हणाला.

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in स्पर्धा
4 Aug 2015 - 20:25

[शतशब्दकथा स्पर्धा] कबुली

शिकविताना सरांनी डोळ्याच्या कोपर्‍यातून पाहिलं तेव्हा पुन्हा एकदा नितीन शेजारी बसलेल्या विजयच्या कानात कुजबुजताना दिसला. दोघेही हसत होते.

सर भडकले. शिकवणं थांबवून ते संतापून दोघांच्या बाकाजवळ गेले.

"विजय, हसायला काय झालं?"

"मी हसत नव्हतो सर. मी वहीत लिहित होतो."

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in स्पर्धा
4 Aug 2015 - 20:04

[शतशब्दकथा स्पर्धा] वन नाईट इन द ट्रेन

रात्रीचे दोन वाजतायत. आता स्टेशन यायला हवं. कुणाला विचारणार? सगळे गाढ झोपलेत. ती दरवाज्यापाशी वाकून कुठे दिवे दिसतायत का पाहू लागली . इतक्यात मागे हालचाल जाणवली . कुणीतरी टोयलेटसाठी उठलं असावं. या आडगावी कोण उतरणार? काही वेळात हिरवा शर्ट घातलेला माणूस दरवाजा उघडून आत गेला. ती दरवाज्यात उभीच. थोडा वेळ गेला आणि पुन्हा दरवाजा उघडला. मगासचाच माणूस. काहीवेळ पसेजमध्ये थांबून आत गेला.

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in स्पर्धा
4 Aug 2015 - 19:34

[शतशब्दकथा स्पर्धा] द लॉस्ट रेलिक्स

द लॉस्ट रेलिक्स

1

"खरेतर अशोकानंतर लगेचच मौर्यसाम्राज्याची पडझड झाली , त्याआधी बांधलेल्या लेण्यांपैकी ही एक !" प्रो.लँग्डन तल्लीनतेने सांगत होते.

"पण मग अशोकाने जमावलेल्या बुध्दिस्ट रेलिक्सचे काय झाले ? " स्तुप न्याहाळत सोफीने विचारले.

शब्दानुज's picture
शब्दानुज in स्पर्धा
4 Aug 2015 - 18:51

[शतशब्दकथा स्पर्धा] वड्यांवरची मालकी

सकाळी नाष्ट्यासाठी एका वड्याच्या गाड्यावर थांबलो होते. त्याच्याकडुन प्लेट घेताना नेमकी ती खाली मातीत पडली.

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in स्पर्धा
4 Aug 2015 - 16:44

[शतशब्दकथा स्पर्धा] लोकमान्य

आम्च्या बाई मस्स कड्डक
मारत्यात, अंगठे बी धराया लावत्यात
अतल्याने बोरं खाल्ली आनि बिया टाकल्या बाकाखाली.
मी बी खाल्ली पन बिया घातल्या खिशात. झाड लावनार.

मंग बाई आल्त्या वर्गात इंस्पेक्टर सोबत.
कचरा बघुन भडकल्याच. पन बोलाल्या नाहित साहेबासमोर.

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in स्पर्धा
4 Aug 2015 - 16:33

[शतशब्दकथा स्पर्धा] बंटी आणि भोलू

बंटी ससुल्या आणि भोलू माकडोबा एकमेकांचे जिवलग मित्र. बंटी तिथे भोलू हे सगळ्या जंगलाला ठाउक होते.

बंटी कोवळी गाजरे तोडत असला की भोलू झाडावरुन आजूबाजूला लक्ष ठेवायचा. जरासा धोका दिसला तरी बंटीला सावध करायचा.

काळू कोल्हाने बंटीला पकडायचे अनेक प्रयत्न केले होते. प्रत्येकवेळी भोलू मुळे बंटी त्याच्या तावडीतून अलगद निसटत असे.

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in स्पर्धा
4 Aug 2015 - 14:59

[शतशब्दकथा स्पर्धा] अर्थस्य पुरुषो दासः

काल पण परत सतराव्यांदा का अठराव्यांदा त्यांचा फोन आला.तसा तो गेल्या आठवड्यापासून येत होताच.पण गेले ३-४ दिवस मात्र त्याची वारंवारता वाढली होती.

त्यांच्या राज्यातील, आमच्या नविन कामासाठी, त्यांचे पण काही मजूर घ्यावेत, अशी त्यांची विनंती होती.

हप्ता हेच त्या मागचे खरे कारण.

तुडतुडी's picture
तुडतुडी in स्पर्धा
4 Aug 2015 - 14:52

[शतशब्दकथा स्पर्धा] माफी

गणेश विसर्जन सकाळीच करून झालं होतं . दुपारी जेवण झाल्यावर तो निघणार होता त्याच्या नोकरीच्या ठिकाणी जायला .रात्रीच्या जागरणाचा त्रास व्हायचा म्हणून तो दिवसाच प्रवास करायचा .

चिगो's picture
चिगो in स्पर्धा
3 Aug 2015 - 21:16

[शतशब्दकथा स्पर्धा] शीर्षकविहीन

आज त्याला प्रोजेक्टवर निघायचं होतं. ती त्याचं सामान आवरत होती. कधी चिवचिवत तर कधी अगदीच उदासपणे.. तो कौतुकानं तिची सगळी लगबग बघत होता.

तिचंही मन थार्‍यावर नव्हतंच. कल्पना होतीच तशी, मात्र जरा तातडीनंच ठरलं होतं सगळं..

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in स्पर्धा
3 Aug 2015 - 18:35

[शतशब्दकथा स्पर्धा] "सृजनचौर्य"

साल १९७०. पाक्षिक कार्यालय.

“तुझी कथा एकदम भंगार आहे. तू दहा वेळा बदल केलास तरी त्यात जीव येत नाही!” संतापलेले संपादक माधव अनुबंधला म्हणाले.

त्याच्या डोळ्यातून मागच्या वेळेपेक्षाही जास्त दु:खाने जडावलेला अश्रू तरळला.

“पुन्हा येऊ नकोस. तू लेखन बंदच केलेले बरे!”

त्यांनी कथा न फाडता कचरापेटीत भिरकावली.

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in स्पर्धा
3 Aug 2015 - 16:02

[शतशब्दकथा स्पर्धा] मोलाची माया

“अग आटोप!”

“झालंच! दीपच्या आवडीचा शिरा भाजतेय.”

दीप यायच्या आधीच उरकले पाहिजे. तान्हा असतांना मुलाच्या विनंतीमुळे सपोर्टसाठी त्यांच्या घरीच रहायचो. सासूसासऱ्यांचे रहाणे आवडत नसल्याचे सुनेने आडवळणांने सुचविले. आधी- “तुम्हाला त्रास होतो, सगळ्यांचे करावे लागते”, मग- “आजकाल प्रत्येकाला स्पेस पाहिजे असते!”

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in स्पर्धा
1 Aug 2015 - 16:10

[शतशब्दकथा स्पर्धा] स्वाभिमानी मुलगा

गजाभाऊ काय करतो रे मुलगा तुझा?
फारेनला आहे आजकल.

कुठे दुबई ला?
आपली छाती ३६ इंचाची छाती ५६ इंची फुलवत गजा म्हणाला, छे छे, साहेब कनाडात सेटल झाला आहे.

काय करतो तिथे?
मजे मारतो आहे तिथे, रहायला एसी जागा आहे. सकाळचा नाश्ता, लंच, डिनर सर्व टाइम टू टाइम मिळते. मेडिकल फेसिलिटी पण पुण्या-मुंबईपेक्षा बेस्ट आहे.

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in स्पर्धा
1 Aug 2015 - 13:12

[शतशब्दकथा स्पर्धा] पदार्पण

संपलाचकी खेळ आता, शेवटचीच विकेट, शेवटचे दोन चेंडू, चारच धावा जिंकायला.... बॉलर शॉर्ट टाकणार अशी
शंका येऊनच फलंदाजाने मारलेला हुक हुकलाच! चेंडू बॅटच्या टोकाला लागून उंच उडाला, पहिल्यापासून चेंडूवरचं नजर
खोवलेला तो, डीप लाँग ऑनसर्कलवरून पुढे पळत येताना मैदानावरची सर्वात महत्त्वाची व्यक्ती झालेला, निदान त्या

मित्रहो's picture
मित्रहो in स्पर्धा
24 Feb 2015 - 19:07

सेंटर पिच (मराठी दिन लघुकथा स्पर्धा)

“आई उद्या मला लवकर उठवशील का?”
“कशाला?”
“मला खेळायला जायच आहे”
“बर”

आतिवास's picture
आतिवास in स्पर्धा
22 Feb 2015 - 19:53

उलगडा (‘मराठी-दिन लघुकथा स्पर्धा’ )

“आई गं, तू छोटी होतीस; म्हणजे खूप खूप पूर्वी; तेव्हा माझ्यासारखीच होतीस?” दीपिकाचा प्रश्न ऐकून श्वेता हसली. ही प्रश्नमालिका हे तिच्या लेकीचं मागच्या आठवडाभरातलं एक नवं खूळ होतं.

Maheshswami's picture
Maheshswami in स्पर्धा
19 Feb 2015 - 12:12

वक्त ने किया...(मराठी दिन लघुकथा स्पर्धा )

"सहाला पाच कमी आहेत, आणि अजून इथेच आपण. शार्प साडे सातला सगळे येतील. आपण काय पार्टी संपल्यावर पोचायचे का? आटप तुझी रंग रंगोटी लवकर." शौमिकचा पारा थोडा चढला होता.