श श क २०२२

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
3 Feb 2019 - 05:28

[शशक' १९] - कदाचित

नुकतेच इंजिनीअरींगच्या शेवटच्या वर्षाला आलेले दोन मित्र . कॉलेजमधल्या टिचींग , नॉनटिचींग स्टाफचे आवडते . एकमेकांचे रुमपार्टनर . आज उत्साहाने गप्पा मारत होते . करीअरची स्वप्ने रंगवत होते .

एका मित्राने सुचवले .

" मित्रा , मी ठरवलं आहे . यावर्षी प्रोजेक्टसाठी प्रिन्सीपॉल हजारशब्दे हेच आपले गाईड असणार . त्यांच्या ज्ञानाचा , अनुभवाचा आपल्याला चांगला उपयोग होईल . "

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
2 Feb 2019 - 17:18

[शशक' १९] - कोंडमारा

आज ऑफीसहुन तो लवकरच परतला.
प्रमोशनचा आनंद लपवता येत नव्हता.

हळुच दार उघडलं... नको त्या अवस्थेत 'तो आणि ती'

धक्काच बसला. शांतपणे बाहेर थांबला.
चल, तु येतेय का ? की त्याच्याबरोबर येणार ?

'मला माफ कर प्लीज'

हं, जाऊ देत. आज बाळाचा वाढदिवस.
काय घेऊन येऊत त्याला आपण ?

नाही, नको.

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
2 Feb 2019 - 12:07

[शशक' १९] - 'आई......' नावाची हाक

"तुमच्या शेजारचं घर घेतलंय. थोडी माहिती हवी होती?"

"मी एकटीच असते. चौकशा दुसरीकडे करा."

"आई....... मी या गावातच नवीन आहे. कुठे जाणार?"

"आई?!!! हम्म! कोण बरं हाक मारायचं ही??? कुठचा तू? घरी कोण असतं?"

"मुंबई. घरी फक्त आई. आता इथे सेट झालो की आणीन तिला."

"अरे? एकटाच आहेस इथे? ये आत!"

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
1 Feb 2019 - 23:37

[शशक' १९] - असेही होते कधीकधी

फंडात फायदा झाला म्हणून डोक्यात शेअर मार्केटचा किडा वळवळु लागला ..शेअर मार्केटमधलं 'शे'पण माहित नव्हतं . सर्व प्राथमिक तयारी झाल्यावर , मी शेअर्सची नावे बघू लागलो . एक मनात घर करून गेले ,वीर एनर्जी. आतून आवाज आला कि या नावात दम हाय भाऊ, घेऊन टाक . ५०००० हजार गुंतवून २५००० शेअर्स घेतले .आयुष्यातली पहिली गोष्ट सहसा कुणी विसरत नाही.

समीरसूर's picture
समीरसूर in स्पर्धा
1 Feb 2019 - 23:31

[शशक' १९] - ग्लास

केशवने चार ग्लास भरले. बाहेर सुंदर चांदणं पडलं होतं.

"आज जेवन झाल्यावर कोल्ड्रिंग पिऊ आपन...पोरांना आवडंल बघ. आपल्या गावात पानी नाय भेटत प्यायाला पण कोल्ड्रिंग लगेच भेटतयं! तेच पिऊन पाहू; कळंल तरी नुसतं प्यायासाठी आहे की पिकाला बी चालंल..." केशव किंचित खिन्नपणे गौरीशी बोलत होता. गौरीने केशवकडे नुसतं पाहिलं आणि मुलांना हाक मारली.

समीर वेगूर्लेकर's picture
समीर वेगूर्लेकर in स्पर्धा
4 Feb 2017 - 14:44

शतशब्‍दकथा स्‍पर्धा

ok

समीर१२३४५६'s picture
समीर१२३४५६ in स्पर्धा
11 Feb 2016 - 14:58

तांबडी माती- कथा

तांबडी माती
------------------------------------------------------------------------------------------
आपली मराठी भाषा खूप समृध्‍द आहे. याच समृध्‍द संस्‍कृतीवर कोकणी भाषेने आपला साज चढविला अाहे. कोकणात बहुतांशी लोक शेतीवर अवलंबून आहेत, आणि कोकणात जांभा दगडही मिळतो, अशाच या भूमित तांबडया मातीत दाजीसारख्‍या एका सामान्‍य मुलाची ही शिक्ष्‍णासाठी असणारी तळमळ........

नाखु's picture
नाखु in स्पर्धा
25 Aug 2015 - 10:43

निर्णय (शशक स्पर्धा कथा)

"वार्याने पण सकाळीच उच्छाद मांडलाय !" ती पुटपटली. पण खरंच वैताग बाहेरच्या घोंघावणार्याबद्दल का मनातल्या , नीट समजेना.
महिनाभरातल्या अनाकालनीय घडामोडी आणि हा असा ह्ट्टी..नको म्हटलं तरी कालची भेट आठवलीच.
"मग सांगीतेलस ना तुझ्या घरच्यांना ?"
.....
"धडाधडा बोल घुमेपणा सोड आता."
"मला धीरच होत नाही, सांगायला"

प्यारे१'s picture
प्यारे१ in स्पर्धा
24 Aug 2015 - 17:36

सुटका -२

सहा महिन्यापासून पोटाचा त्रास सुरु होताच पण बाईची जात नि मधलं वय म्हणून सोडून दिलं होतं.
चुकीचं पडलेलं दान, नशीबानं आयुष्यभर दिलेला त्रास नि जीवनसाथी म्हणवणाराची कसलीच नसलेली साथ. १५ वर्षात ना प्रेमाचा शब्द ना एखादी शाबासकीची थाप जगण्यात काय रस वाटायचा?
माहेरचे लोक ओरडतात म्हणून गेल्या महिन्यात दवाखान्यात दाखवलं.

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in स्पर्धा
24 Aug 2015 - 11:33

[शतशब्दकथा स्पर्धा] येक रुपाया! (पूर्वार्ध आणि उत्तरार्ध)

पूर्वार्ध - येक रुपाया!
नुस्ता गुंधूळ वर्गात. बाई कायतरी लिहीत व्हत्या, तेवढ्यात शिपाय आला नोटीस घिवून. सगळ्यान्ला वाटल उद्या सुट्टी!

बाईंनी वाचल, "सर्वांना कळविणेत येते की, पंधरा ऑगस्टनिमित्त शाळेत चित्रकला स्पर्धा आहे. भाग घ्यायचाय त्यांनी वर्गशिक्षकांकडे फी जमा करणे. नोटीस दिनांक १/८/१९९२."

खेडूत's picture
खेडूत in स्पर्धा
20 Aug 2015 - 22:00

मिसळपाव शतशब्दकथा स्पर्धा: पहिल्या फेरीचा निकाल !

शतशब्दकथा स्पर्धेचा पहिल्या फेरीचा संपूर्ण निकाल जाहीर करताना आनंद होत आहे.
सर्वप्रथम आयोजकांनी परीक्षणासंबंधी विचारणा केल्यावर काहीसं दडपण आलं होतं. कारण मी आधी बऱ्याच शतशब्दकथा लिहिल्या असल्या तरी परीक्षणाचं काम आव्हानात्मक आणि नवीनच होतं.

आदूबाळ's picture
आदूबाळ in स्पर्धा
18 Aug 2015 - 02:17

[शतशब्दकथा स्पर्धा] पहिल्या फेरीचा निकाल (मतदानानुसार)

पहिली शतशब्दकथा स्पर्धा
पहिली फेरी
१५ दिवस
८३ कथा
२४३८ मतं

शतशब्दकथा स्पर्धेला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल लेखकांचे आणि वाचकांचे अनेक आभार!

आणि....

वाचकांच्या पसंतीनुसार पहिले पाच क्रमांक आहेतः

शि बि आय's picture
शि बि आय in स्पर्धा
15 Aug 2015 - 16:13

[शतशब्दकथा स्पर्धा] "ती" चा विजय

आईमागून तीही चालत होती. अगदी सावधपणे पाऊले टाकत होती. रस्त्यावर चालण्याचा तीचा पहिलाच अनुभव....

आजपासून तीची शाळा सुरु होणार होती आणि गम्मत म्हणजे..... आईच शिक्षक होती.

अभ्यासक्रम सुरु झाला.... आता पुढे मात्र खरी कसोटी होती... तीने प्रत्याक्षिकाला सुरुवात केली.

संदीप डांगे's picture
संदीप डांगे in स्पर्धा
15 Aug 2015 - 14:05

सोबत...

सदर कथा स्पर्धेसाठी नाही. माझी स्पर्धेतली कथा दुसर्‍या कुणाच्या आधीच उपलब्ध असलेल्या कल्पनेवर आधारित आहे असे लक्षात आल्याने, पूर्ण 'ओरिजिनल' कथा देऊ शकलो नाही याची एक कलाकार म्हणून खंत लागून राहीली. त्यावर उपाय म्हणून ही कथा देत आहे. वाचकांना आवडेल अशी आशा.

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

त्रिवेणी's picture
त्रिवेणी in स्पर्धा
15 Aug 2015 - 10:01

[शतशब्दकथा स्पर्धा] माझिया प्रियाला प्रित कळेना----

ती एक स्वप्नाळू, स्वप्नांच्या दुनियेत रमणारी सामान्य मुलगी. करिअर, अभ्यास यापेक्षाही चारचौघांसारखा घर, संसार, आपण आणि आपली माणसं यातच आपला आनंद मानणारी.

टिल्लू's picture
टिल्लू in स्पर्धा
15 Aug 2015 - 07:59

[शतशब्दकथा स्पर्धा] बायकोचा फोन!

"हॅलो "
"..............."
"हा, हॅलो"
".................."
".. कुठे म्हणजे? ऑफिसमधे ! ", चिडलेला आवाज.
"..............."
" ..... पाहिला नाही, बिझी होतो"

"........" थोडावेळ शांतता.
"सॉरी राणी, आता ह्या वेळेला कुठे बर असणार आहे मी ",
"........"
" ... बरं"
"........"
"........"
" ..हो"

नीलांबरी's picture
नीलांबरी in स्पर्धा
14 Aug 2015 - 22:48

[शतशब्दकथा स्पर्धा] दोष कुणाचा?

घरात आज आनंदीआनंद होता. बर्‍याच प्रयत्नांनंतर कुलदीपकाला परदेशी जायची संधी मिळाली होती. जाण्याच्या तयारीबरोबरच रोजच्यारोज मेजवान्या झडत होत्या. नुकत्याच लग्न करून आलेल्या सूनबाईचा हा पायगुण असल्याचं काही नातेवाईक बोलत होते.

द-बाहुबली's picture
द-बाहुबली in स्पर्धा
14 Aug 2015 - 17:50

[शतशब्दकथा स्पर्धा] पित्रुत्व...

अतिशय व्यथीत अंतकरणाने तो घरी निघाला... डॉक्टरांचे शब्द घुमत होते, सॉरी रवी पण वैज्ञानीक प्रगती तुला वडील बनवण्यास असमर्थ आहे.

कपिलमुनी's picture
कपिलमुनी in स्पर्धा
14 Aug 2015 - 15:26

[शतशब्दकथा स्पर्धा] खाणांखुणा

शहरभर दंगलीचा वणवा पेटला होता.