विज्ञान आणि आधुनिक अंधश्रद्धा!

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
20 Aug 2017 - 6:59 am

विज्ञान आणि आधुनिक अंधश्रद्धा!
मागे एकदा कुठेतरी ज्ञानेश्वरी तले विज्ञान किंवा असेच काहीतरी भन्नाट लिहिलेला लेख वाचला होता. त्यात म्हणे ज्ञानेश्वरांना ऋतुचक्र, मानसशास्त्र, ते अगदी प्रसूतिशास्त्र यांची साद्यंत माहिती कशी होती आणि त्याचे संदर्भ ज्ञानेश्वरीत कसे ठायी ठायी सापडतात याचे रसभरीत वर्णन केलेले होते. तसाच काहीसा लेख समर्थ रामदासांवर सुद्धा वाचण्यात आला. मला वाटतं पावसाळ्यात जशा रोगाच्या साथी येतात हा तसाच काहीसा हा प्रकार असावा...एक पुण्यात राहणारे लेखक(?) जे चांगले mbbs डॉक्टर आहेत त्यांनी तर अशा विषयांवर भरपूर पुस्तकं लिहिली आहेत. माणूस डॉ आहे म्हणून आमच्या वडलांनी ती घेतली आणि भयंकर निराशा झाली. रामायणात जम्बो जेट काय, महाभारतात अण्वस्त्र काय, सूक्ष्मदर्शक आणि टेस्ट ट्यूब बेबी काय.राम राम राम ....हे म्हणे स्वतः योग सामर्थ्याने मंगळावरगेले होते आणि त्यांची निरीक्षणं चक्क नासाने खरी मानली आहेत.(नासाला कामधंदे नाहीत) ...असो
माझा एक मित्र आहे-देवधर म्हणून ... त्याची बायको भांडारकर संस्थेत जुन्या संस्कृत ग्रंथांचे भाषांतर करायचे काम करते. माझी तिची नुकतीच चर्चा झाली कि बुवा हे जे वेदकाली विमान ,अंतराळ यान , ब्रह्मास्त्र म्हणजे atom bomb अशा गोष्टी होत्या असं आम्ही ऐकतो, वाचतो त्यात काही तथ्य आहे का? यावर तिने सांगितलेली माहिती उद्बोधक ठरेल.
एक तर काय असत कि जुने ग्रंथ, जुने ग्रंथ असे जे महणतात ते फार फार तर ८ व्या किंवा ९ व्या शतकातले असतात ते सुद्धा अत्यंत जीर्ण आणि तुटक. त्या आधी चे ग्रंथ असे मिळत नाहीत, शिलालेख, ताम्रपत्र मिळतात आणि ते अत्यंत महत्वाचे पण ते म्हणजे ग्रंथ नाही त्यातली माहिती त्रोटक आणि मुख्य म्हणजे फक्त मथळे(NOTICE BOARD) स्वरुपाची असते. आता यावरून प्राचीन भारतात उच्च तंत्रज्ञान होते अशी खातरजमा करता नाही आली तरी ह्या गोष्टी निखालस खोट्या आहेत असंही काही खात्रीलायकरित्या म्हणता येत नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे हे ग्रंथ जरी जुने असले तरी ते अस्सल असतात असे नाही म्हणजे त्यात प्रक्षेप असतात उदा महाभारत या ग्रंथाचे घेतले तर महाभारताची जी चिकित्सक आवृत्ती आहे की जी अनेक थोर इतिहास संशोधकांनी ( सुखटणकर, कोसंबी, मिश्र वगैरे )अनेक वर्षांच्या अनंत परिश्रमांन्द्वारे सिद्ध केली आहे तिच्या मध्ये सुद्धा प्रक्षेप आहेत पण ते साधारणतः २ रया किंवा ३ रया शतकातले. म्हणजे आपण असे म्हणू शकतो कि हि महाभारताची चिकित्सक आवृत्ती आपल्याला साधारण ई स १५० च्या सुमारास प्रचलित असलेल्या महाभारतकथे कडे घेऊन जाते. आता तुम्ही विचार करा इतक्या महान इतिहास संशोधकांना इतक्या प्रचंड मेहनती नंतर जर सर्वांना माहित असलेल्या महाभारत कथेच्या त्यातल्या त्यात अस्सल प्रती पर्यंत पोहोचायला एवढा त्रास होत असेल तर आजकाल उठ सुट कोणीही लुंगासुंगा प्राचीन भारतात विमाने , अंतराळ याने, अण्वस्त्रे आणि काय काय शोधून काढतात त्यांच्या विश्वासार्हते बद्दल आपण काय बोलावे.
आता रामायणात येणारा पुष्पक विमानाचा उल्लेख घ्या, एक तर हा एक प्रक्षेप आहे. तो नंतर कुणीतरी घुसडला आहे पण चला घटकाभर पुष्पक विमान होते असे गृहीत धरले तर ते कोणत्या इंधनावर चालायचे ते इंधन कुठून मिळायचे ? ते शुद्ध कुठे आणि कसे करायचे ? जिथे बनवले तिथून विमानापर्यंत कसे आणायचे? रथातून कि गाढवावर लादून?कि आजच्या सारख्या रेल्वे गाड्या , मोटारी डांबरी सडका होत्या तेव्हा? असतील त्याचे उल्लेख कसे कुठे नाहीत? कसे असतील कुणा शहाण्या माणसाने आपल्या गोष्टीवेल्हाळ स्वभावाला अनुअसरुन एक छान गोष्ट रचून दिले घुसडून झाले, अन काय? आणि एकच विमान बनवले विमानांचा ताफा नाही? कमाल आहे
तीच गोष्ट अण्वस्त्रांची, अण्वस्त्र म्हणजे काय दिवाळीचे आपट बार आहेत का? ती अण्वस्त्र काय घोडागाडी(रथ) किंवा बैल गाडीतून तीर कामठ्याने हात दोन हात दूरवरच्या शत्रूवर मारायचे, एव्हढा मोठा अणुबॉम्ब असा टाकायचा, तर काही क्षेपणास्त्र वगैरे नाही ? कमाल आहे? अण्वस्त्र बनवायला लागणारे तंत्रज्ञान होते मग क्षेपणास्त्र बनवायचे नव्हते ते सोडा सध्या तोफा सुद्धा नव्हत्या तेव्हा.
आता मूळ मुद्दा, त्याचं असं आहे कोणी ऋषी मुनी तप:सामर्थ्याच्या जोरावर एखादे विमान किंवा तत्सम गोष्ट बनवू शकत नाही (तसच ते बनवत असतील असं कुणाच म्हणण असेल तर मग प्रश्नच मिटला)विमान सोडा एक साधा विजेचा दिवा बनवायचा म्हटला तर काय गोष्टी लागतात बघा . १) विजेचा शोध, उत्पादन आणि खात्रीशीर असा पुरवठा / वितरण करणारी यंत्रणा(नुसता दिवा पेटवायला नव्हे तर बनवायला सुद्धा) २) अत्यंत पातळ आणि स्वच्छ पारदर्शक काच बनवण्याची परिष्कृत पद्धती. ३) Tungston सारख्या धातूंचा शोध उत्पादन तसेच त्यांच्या गुणधर्माची छाननी करणारी सुसज्ज प्रयोग शाळा आणि metallurgy सारख्या शास्त्राचा पुरेसा विकास.शिवाय त्याचे अत्यंत पातळ तंतू (फिलामेंट) बनवण्याची पद्धत. ते सोडा, दिवा बनवण्याच्या निरनिराळ्या विभागात द्यायला drawings च्या असंख्य प्रती काढण्यासाठी छपाईचे तंत्र.ते लागेल कि नाही? (वेदामध्ये काचेचा उल्लेख नाही तसाच लोखंडाचा हि नाही, कोळशाचा हि नाही . वेदाइतक्याच जुन्या आणि कदाचित त्यांची जन्मभूमी असलेल्या सिंधू संस्कृतीच्या अवशेषात काच, लोखंड, कोळसे सापडत नाहीत. आपल्या पुराणांमध्ये विमानाचे विविध अस्त्रांचे उल्लेख आहेत पण तुम्ही अनेक आधुनिक विज्ञानकथाकारांच्या गोष्टी वाचल्या तर तुम्हाला त्या सुद्धा तशाच खऱ्या वाटतील पण त्या माणसाच्या कल्पनेच्या भराऱ्या आहेत, खऱ्याखुऱ्या नाही.) आणि या सगळ्या पेक्षा महत्वाच म्हणजे प्रयोजन आणि बाजारपेठ. जर साधे तेलाचे दिवे पेटत असतील तर विजेच्या दिव्याच्या साह्याने उजेड पाडायचा कशाला? एव्हढे उपद्व्याप करून विजेचे दिवे बनवून जर घ्यायला खात्रीची बाजारपेठ नसेल तर कोण हा धंदा करेल. रामायण महाभारत या चांगल्या, मनोरंजक कथा आहेत असच नाही तर तो आपला इतिहास सुद्धा आहे हे खर पण इतिहास इतिहास म्हणून शिवाजी महाराजांना भवानी माता खरोखर प्रसन्न झाली आणि भवानी तलवार दिली यावर विश्वास ठेवण वेडेपणाच नाही का? ( खरच भवानी प्रसन्न झाली असती तर तिला महाराजांना एखादी AK47 द्यायला काय हरकत होती? भवानी मातेला काय अशक्य आहे?)
एक नीट समजून घ्या, तंत्रज्ञानाचा विकास आणि समाजात सर्वदूर त्याचा प्रसार सरंजामशाही कधीच करत नाही. त्यांना सर्वसामान्य लोकांना गुलाम करण्यासाठी त्यांना अज्ञानात आणि मागास ठेवण भाग असतं. भांडवल शाही जरी सरंजामशाहीशी हातमिळवणी करून मजूर गुलाम वर्गाला सुरुवातीला वेठीला धरते, त्यांचे शोषण करते असे दिसले तरी त्यांच्या स्वतःच्या फायद्या साठी तरी त्यांना एका मर्यादे नंतर लोकांचे राहणी मान उंचावण्यासाठी/ त्यांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी अनिर्बंध शोषणाला आळा घालावा लागतो. लोकांची क्रयशक्ती अचानक घटली तर कसा हाहाकार उडतो ते मी काय वेगळ सांगायला हवं का ? समजा एक शाम्पू विकत घ्यायची लोकांची ऐपत नसेल तर कुणी धंदा करावा कसा? आणि खायची प्यायची भ्रांत असलेला गरीब गुलाम माणूस शाम्पू का विकत घेईल? त्याची, त्याच्या बायकोची चार लोकात उठ बस आणि किमान प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता असेल तर तो हा खर्च करून स्वतःला/ स्वतःच्या बायकोला सुंदर दाखवायचा प्रयत्न करेल.त्याची दोन वेळची खायची प्यायची सोय झाली तर तो पुढे पुढे काही जास्त खरेदी करू लागेल आणि उद्योग धंद्या शिवाय हे शक्य आहे का? सरंजामशाहीत मोठ मोठे शोध लागून त्याची उपयुक्तता पटल्यावर सरंजामशाही सरकार त्यांना स्वीकारते आधी संशोधकांना पदरमोड करून शोध लावावे लागतात. भांडवलशाहीत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कमी खर्चात जास्त उत्पादन करण्यासाठी संशोधकांना उद्योग प्रोत्साहन देतात. आपले वेद , रामायण, महाभारत, हे सरंजामशाही समाजव्यवस्था दाखवतातच पण तेव्हा उद्योग आणि औद्योगीकरण हा प्रकारच नव्हता.तो काळ एकवेळ, सोडा आपल्या पेशवाईच्या शेवटी शेवटी म्हणजे १९व्या शतकाच्या सुरुवातीला सुद्धा आपल्याकडे छापील नकाशे बनवायचे तंत्र , होकायंत्र , दुर्बिणी नव्हत्या आपण त्या इंग्रज, पोर्तुगीजांकडून विकत घ्यायचो. साधे शेतातले नगराचे फाळ लोखंडी करायाल २० वे शतक उजाडावे लागले. अन सुरुवातीला लोकांनी आगगाडी मध्ये बसावे म्हणून ब्रिटीश सरकार पैसे देत असे. आपल्याकडे औद्योगीकरण सुरु झालं तेच मुळी १९ व्या शतकाच्या शेवटी आणि ते सुद्धा जुजबी.
तेव्हा आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान असावा पण असं उगाच कुणी सुबुद्ध माणूस टर उडवेल असे काही करू नये त्याने या वारशाचाच अपमान होतो. असं नाही वाटत तुम्हाला .
हा प्रश्न नास्तिक, आस्तिक, पुरोगामी, मूलतत्ववादी असा नाही. साधा बुद्धी आणि तर्काचा आहे.
आदित्य---

मांडणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

बहुतेक माझी मानसिकता फार सुस्पष्ट शब्दांत सांगितल्याशिवाय कळणार नाही. - "ज्या निकषांवर गीता एक गाढवपणा आहे, अगदी त्याच निकषांवर विज्ञान १० गाढवपणा आहे."
=================
हो, पण दिवस डोके बाजूला ठेऊन धर्माला पिटायचे आणि आधुनिक विज्ञानाला गोंजारायचे आहेत.

तसंही अजून काही लोक फक्त केसाने ट्रक ओढतात किंवा अंगावरुन टेंपोचे चाक जाऊन देतात. तेही भारतात. आता आपण ते बघतो म्हणून निदान खरे मानतो. आणि ही अचाट कला(?) की आंतरशक्तीचा प्राचीन भारतीयांचा शोध मानावा की भाकडकथा मानावी?

पगला गजोधर's picture

23 Aug 2017 - 8:50 am | पगला गजोधर

तसंही अजून काही लोक फक्त केसाने ट्रक ओढतात किंवा अंगावरुन टेंपोचे चाक जाऊन देतात. तेही भारतात.

ते तस, मंत्रोच्चारण करुन व प्राचीन ग्रंथात उल्लेखल्याप्रमाणे स्वर्गातिल दैवी शक्तिन्ना आवाहन करुन, त्या दैवीशक्ति आपल्या देहात धारण करुन, ट्रक ओढतात वैगरे वैगरे

प्रत्यक्ष डोळयासमोर घडलेले पाहीले ते लिहीले.

आदित्य कोरडे's picture

25 Aug 2017 - 7:01 am | आदित्य कोरडे

<<आमच्या मते जपानवर टाकलेला बाँम्ब फक्त काही ग्रॅम्सचा होता. (मंजे बाँब असेल मोठा, पण युरेनियम इतकंच होतं. आता जुन्या काळात "युरेनियमला आग लावायची" जर कै सोप्पी रित असेल, तर तामझामाची गरज नाही.) त्यातलाही प्रत्यक्ष "जळला" तो अजूनच कमी.>>
हे लय भारी आहे ....वाद घालणे उत्तम पण थोडी माहिती काढून तरी घालावा ....अहो त्या म्हणजे(लिटल बॉय) हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्ब च वजन होत ४.४ टन म्हणजे ४४०००००ग्रॅम्स ....तर नागासाकी वर टाकलेल्या बॉम्ब चे(फॅट मन) वजन होते ४.७ टन त्यांच्यात युरेनियम नव्हते तर प्लुटोनियम वापरले होते व त्याचे वजन होते प्रत्येकी ६.५ किलो म्हणजे ६५०० ग्रॅम्स पण त्याचे स्फोटक क्षमता २१किलो टन (२१००० टॅन = २१००००००किलो=२१०००००००००ग्राम)टी एन टी एवढी होती ....त्यामुळे रथ धनुष्य बाण किंवा गोफण वगैरे पौराणिक हाय फाय तंत्रज्ञान वापरून टाकणे शक्य झाले नाही अमेरिकेला ....

arunjoshi123's picture

28 Aug 2017 - 11:17 am | arunjoshi123

लिटल बॉय

https://en.wikipedia.org/wiki/Little_Boy

Little Boy was developed by Lieutenant Commander Francis Birch's group of Captain William S. Parsons's Ordnance (O) Division at the Manhattan Project's Los Alamos Laboratory during World War II. Parsons flew on the Hiroshima mission as weaponeer. The Little Boy was a development of the unsuccessful Thin Man nuclear bomb. Like Thin Man, it was a gun-type fission weapon, but derived its explosive power from the nuclear fission of uranium-235, whereas Thin Man was based on fission of plutonium-239.

पहा इथे तरी युरेनियम लिहिलं आहे.
आणि वजन

It contained 64 kg (141 lb) of enriched uranium, of which less than a kilogram underwent nuclear fission.

इथे चूक झाली. मान्य. एक किलो पेक्षा कमी आणि काही ग्राम मधे फारच फरक आहे.

इतक्या महान इतिहास संशोधकांना इतक्या प्रचंड मेहनती नंतर

अगदी अलिकडचा इतिहास (गेल्या १०० वर्शांतला) पण पाहिजे तसा शिजवून वाढला जाऊ शकतो.

आदित्य कोरडे's picture

25 Aug 2017 - 8:30 am | आदित्य कोरडे

तेच तर ....

राही's picture

22 Aug 2017 - 5:26 pm | राही

आणखीही काही लोहस्तंभ संशोधकांना माहीत आहेत . ढार, मूकांबिका मंदिर कोडाचड्री, मांडु, माउंट आबु या ठिकाणी ते आढळले आहेत. त्यांच्या मेटॅलर्जीविषयी आर. बालसुब्रमण्यम या शास्त्रज्नांचे शोधनिबंध प्रसिद्ध आहेत. मूकांबिका मंदिरातला स्तंभाचा काही भाग हा महाकाय बांगडीसारखी लोहकंकणे फोर्ज आणि फ्यूज करून बनवलेला आहे असे निदर्शनास आले आहे. या तंत्रातल्या थोड्याफार फरकाने बनवलेल्या बांगडीतोफा अनेक गडकिल्ल्यांच्या कोनाकोपऱ्यात पडलेल्या आहेत हे असंख्य गिरिप्रेमींनी पाहिले असेलच. ईकूणच या तंत्रज्ञानाविषयी बरेच संशोधन होऊन ती माहिती जालावर उपलब्ध आहे.

राही's picture

22 Aug 2017 - 5:28 pm | राही

वरती ढार च्या ऐवजी धार वाचावे . मध्यप्रदेशातले धार.

विशुमित's picture

22 Aug 2017 - 8:50 pm | विशुमित

छान चर्चा चालू आहे.

अरुण जी लगे रहो...
धन्यवाद..!

धर्मराजमुटके's picture

22 Aug 2017 - 9:39 pm | धर्मराजमुटके

जुन्या आणि नव्यावर चर्चा चालली आहे तर एक प्रश्न विचारुन घेतो. आताच्या काळातला मानव एवढा हुशार आहे.
रामायण आणि महाभारत हे केवळ काव्य आहे (असे तात्पुरते मानू). मग आज जगात असा एकही मानव का नाही जो या तोडीचे काव्य / कथा रचू शकतो जी लोक पिढ्यान पिढ्या लक्षात ठेवतील ?

मग खरे प्रगत कोण ? आजचा माणूस की अगोदरचा ?

पगला गजोधर's picture

23 Aug 2017 - 7:16 pm | पगला गजोधर

काका, पूर्वीच्या मानवाला मनाच्या रंजनासाठी करमनुकिसाठी फार कमी पर्याय होते, त्यामुळे थोड्स साहित्य उपलब्ध होत, त्यामुळे त्याच पेनिट्रेशन जास्त व दिर्घ काल झाल.

काही वर्षापूर्वी नाटकाचे प्रयोग रात्र रात्रभर चालायाचे,
मग आताच्या कलाकारांना काय कमी स्टैमिना आहे म्हणून आज कालचे प्रयोग 2-3 तासांचे नसतात, तर रात्रभर चालणारे प्रयोगानां डिमांड उरली नाही,

बाकी रामायण महाभारताची फुटपटटी तुम्ही मनात गच्च पकडून ठेवली तर
टागोरांचे गीतांजलि, टॉलस्टॉयच वॉर अंड पीस वर तुमची नजर जाणार नाही..

डँबिस००७'s picture

22 Aug 2017 - 9:55 pm | डँबिस००७

पितळ नावाच अॅलॉयचा वापर भारतात कित्येक शतकापासुन होत आहे. पितळ बनवण्यासाठी जस्त (Zinc) लागत . भारतात झिंक स्मेल्टींग इ स १२०० च्याही आधीपासुन वापरात होत्या ! अॉफीशीयल झिंकचा शोध ऐका जर्मन शास्त्रज्ञ्याच्या नावाने नोंदलेला आहे !! त्याप्रमाणे झिंकचा शोध 1746 साली लागला. मार्ग्राफ नावाच्याह्या शास्रज्ञाला झिंक धातु वेगळा केल्याबद्दल श्रेय दिल जात, पण प्रत्यक्षात झिंक धातुच शुद्धीकरण व त्याचा वापर भारतात १२०० साला पुर्वीपासुन होत होता .
पितळ अॅलॉय असल्याने त्याची क्वॉलीटी त्यात असलेल्या जस्ताच्या व तांब्याच्या प्रमाणावर ठरते ! पितळ बनवणे म्हणजे तांबे व जस्त ऐकत्र असलेला मिश्र धातु !! वाचायला सोप्प वाटत असल तरी बनवायला महा कठीण !! तांब्याच्या वितळ बिंदु तापमानावर जस्ताच बाष्पीभवन होत. म्हणजे फक्त तांबच उरत !!
पितळ बनवायला ऐका नविन पद्धतीचा विकास केला गेला !! ज्यात ३६% जस्ताच प्रमाण पितळात साध्य झाल.

राजस्तान मध्ये झिंक स्मेल्टींग च्या १२०० वर्षांपुर्वीच्या साईटस वर संशोधन केल गेल आहे !!

डँबिस००७'s picture

22 Aug 2017 - 10:02 pm | डँबिस००७

कोणार्क मंदिरावर ऐका परदेशी प्रवाश्याने बनवलेल्या डॉक्युमेंट्रीत दाखवल्याप्रमाणे लोखंडी तुळईंचा वापर केला गेला होता! त्या लोखंडाच्या तुळई ऐकत्र करण्या साठी फोर्जींग सारखी पद्धत वापरलेली होती !!

ट्रेड मार्क's picture

22 Aug 2017 - 10:39 pm | ट्रेड मार्क

एक उदाहरण घेऊन बघू.

इथे शिवाजी महाराजांइतके दुसरे चांगले उदाहरण डोळ्यासमोर येत नाही. साधारण ३५०-४०० वर्षांपूर्वी त्यांनी बऱ्याच अचाट गोष्टी करून दाखवल्या आहेत. एका राजा पासून त्यांचा दैवत बनण्याचा प्रवास याआधीच झाला आहे आणि आता दैवतापासून देव बनण्याचा प्रवास सध्या सुरु झालेला आहे. महाराज आग्र्याहून किंवा किल्ल्याला असलेल्या वेढ्यातून कसे निसटले याची तपशीलवार माहिती उपलब्ध आहे.

आता अजून ८००/ १००० वर्षांनंतरचा विचार करा. त्यावेळी मोडी येणारे तर दूरच मराठी येणारे पण किती शिल्लक असतील काय माहित. असतील तरी मराठी बरीच वेगळी झालेली असू शकते. तर मध्यंतरीच्या किंवा त्या काळात असा प्रसार काही मंडळींकडून केला जाऊ शकतो की शिवाजी महाराज एक देव होते. त्यांना अदृष्य होण्याची कला अवगत होती. आग्र्याला शत्रूच्या संपूर्ण ताब्यात असताना ते अचानक गायब झाले आणि त्याचा शत्रूला पत्ता सुद्धा लागला नाही. हाच चमत्कार त्यांनी पन्हाळ्याच्या वेढ्यातून गायब होताना आणि लाल महालात शाहिस्तेखानाची बोटे तोडताना पण दाखवले होते. एवढेच नव्हे तर त्यांच्या सैन्याला सुद्धा एका ठिकाणी अचानक हल्ला करायची कला त्यांच्या शिवाजी नावाच्या देवामुळे अवगत झाली होती. हे सैन्य अचानक शत्रूच्या गोटात प्रकट होऊन हल्ला करायचे आणि नंतर गायब व्हायचे. अश्या सुरस आणि चमत्कारिक कथांनी भरलेली पुस्तके (?) वाचायला मिळतील.

असाच प्रकार रामायण/ महाभारत आणि इतर लिखितांच्या बाबतीत घडला असेल का? कुठेतरी वाचल्याचं आठवतंय की असे चमत्कार आणि कर्मकांड वगैरे प्रकार हे अलीकडच्या काळात (म्हणजे काही शे वर्षांपूर्वी) घुसडले गेले. खखोदेजा.

रामायण/ महाभारत आणि इतर लिखितांच्या बाबतीत घडला असेल का?

अर्थातच.

१. भाषा: आपल्या आजूबाजूला दिसणार्‍या वस्तूंना, संकल्पनांना "नाम" द्यावे ही कल्पना ज्याला प्रथम सुचली त्याचा मेंदू खत्तरनाक हुशार असला पाहिजे. भाषेत जो एकेक शब्द आणि एकेका शब्दाचं एकेक रुप अ‍ॅड होत गेलं आहे तो एकेक जबर्‍या शोध आहे. तो आज बिना आय पी उल्लंघनाचा वापरायला मिळतो म्हणून त्याची कदर नाही हा भाग वेगळा. (हा उत्क्रांतीचा रेटा आहे हे आधुनिक अज्ञान आणि मूर्खपणा अजूनच वेगळा भाग, पण असो.)
२. ईश्वर: हे जग रँडम उत्पाद आहे असे काही शहाणे मानतात. जर हे जग (देवाच्या) इंटेलिजेंट डिझाइनने बनले नसेल, तर जगात बुद्धिमत्ता निर्माण कशी झाली? शून्यातून? जगात बुद्धिमान (इ इ) देव नाही असे मानले तर आपोआप जगात कोणालाच बुद्धिमत्ता नाही हे सिद्ध होते. बहुतेक असं नसावं. नै का? सबब ईश्वर हा मनुष्याचा दुसरा तगडा शोध आहे.
३. धर्म: जेव्हा घटना, संविधान इ इ प्रकार नव्हते तेव्हा मनुष्यांच्या आत्मजिवनासाठीची वा सामूहिक जीवनासाठी जी मूल्ये, तत्त्वे, नियम, संकेत आहेत ती प्रस्थापित करणे आणि त्याच वेळि मनुष्यास आपले जीवन आनंदमय मार्गाने जगू देणे असा दुष्कर हेतू धर्म नावाच्या शोधाने आणि त्यातील सातत्याने होण्यार्‍या डिटेलींगनी साधला गेला.
४. व्यापारः मालकीचा हक्क, वस्तू वा सेवेचे मूल्य, चलन, विनिमयाच्या वस्तूंतील साम्य यांच्यापैकी एकही गोष्ट नैसर्गिक नाही. तरिही या सगळ्या गोष्टी बेमालूमपणे मनुष्याने खूप प्राचीन काळी शोधल्या आणि बिनधास्त वापरल्या. (आजचे दिडशहाणे पुरोगामी म्हणतील व्यापार हे उत्क्रांतीचे फलित आहे. जुन्या लोकांना अक्कल नव्हती हे सिद्ध करायला ते काहीही म्हणतील.)
५. राजकारणः काही सांगायची गरज नाही.
६. कला: काही सांगायची गरज नाही.
७. न्यायपालिका: काही सांगायची गरज नाही.
८. कायदा: देव, धर्म, व्यापार, राजकारण यांतिल इतक्या संकल्पना मानवी (अनैसर्गिक, अनावश्यक, अशास्त्रीय) आहेत कि भौतिकशास्त्राच्या नियमांवर जग सोडलं तर सगळ्या व्यवस्था कोलमडतील. म्हणून निसर्गात नसलेल्या नियमांना नियमांचे स्वरुप देण्याचा अनोखा शहाणपणा पूर्वजांनी करून व्यवस्था कायम राखल्या.
९. विज्ञानः काही सांगायची गरज नाही.
============================
सारांशः
नाटक करावं, त्यात वाजवावं, गावं, टाळ्या वाजवाव्या, अ‍ॅक्ट करावं, फलानं ढिमकानं हे शोधणारे (शून्यातनं हे शोधणं क्लिष्ट आहे हे माना.) पूर्वज होते, तिथे तुम्ही स्पिकर लावला आणि लाईट्स लावल्या म्हणून फार उर बडवून घेऊ नका.

arunjoshi123's picture

23 Aug 2017 - 11:55 am | arunjoshi123

यातल्या कोणत्या एका शोधाबाबत आजच्या पिढिने काय केले आहे हे पाहू.
भाषा:
१. आजच्या सगळ्या भाषा जुनाट आणि त्याज्य आहेत. याची जाणिव पसरवली जात नाही.
२. भाषिक संवादाचा शास्त्रीय अभ्यास करायला जगात एकही संस्था नाही.
३. एका भाषेचे किती अस्पेक्स्ट्स असतात यावर काहीही प्रमाण संशोधन नाही.
४. भाषांच्या एकूणच उणिवा आणि त्यांतून होणारे नुकसान (आणि त्यावर उपाय) यावर काहिच संशोधन नाही.
५. नवी सर्वगूणसंपन्न अशी भाषा डिझाईन करायचा (राबवायचा असोच) कोणताही प्रयत्न नाही.
====================
मात्र माझी जास्त लाल कि तुझी यावर सर्व भाषिकांस सिद्धी प्राप्त आहे.
असो.

१. आजच्या सगळ्या भाषा जुनाट आणि त्याज्य आहेत. याची जाणिव पसरवली जात नाही.
२. भाषिक संवादाचा शास्त्रीय अभ्यास करायला जगात एकही संस्था नाही.
३. एका भाषेचे किती अस्पेक्स्ट्स असतात यावर काहीही प्रमाण संशोधन नाही.
४. भाषांच्या एकूणच उणिवा आणि त्यांतून होणारे नुकसान (आणि त्यावर उपाय) यावर काहिच संशोधन नाही.
५. नवी सर्वगूणसंपन्न अशी भाषा डिझाईन करायचा (राबवायचा असोच) कोणताही प्रयत्न नाही.

घोर अज्ञान. गुगल तुमचा मित्र आहे.

राही's picture

23 Aug 2017 - 1:11 pm | राही

थोर आणि ठार घोर अज्नान.
भाषांची उत्पत्ती, वाढ . प्रगती, अधोगती , शब्दसंचय, व्याकरण अभिव्यक्तिक्षमता, यांवर जगात सर्वत्र आणि भारतातही भरपूर संशोधनात्मक असे खूप काम चालू आहे. तसेच anient Indian art, science and culture हा विषय भारतातील सर्वच विद्यापीठांतल्या कला शाखांमध्ये शिकवला जातो. हा अभ्यासक्रम खूपच समावेशक आहे. या लेखात आणि प्रतिसादांत उमटलेल्या बहुतेक शंकांची स्पष्टीकरणे तर त्यात असतातच पण प्राचीन कला, स्थापत्य, नगरविकास, धर्म, गणित, रसायन, भौतिकी इत्यादि क्षेत्रांतील अनेक प्राचीन संकल्पनांचा समावेश त्यात असतो. पण होते आहे काय की भाषा, इतिहास, कला यांकडे गेल्या दोन तीन युवा पिढ्यांनी ढुंकूनही पाहिलेले नाही . सगळे आपले इंजीनियरींगकडे धावताहेत. त्यामुळे या क्षेत्रांतले ज्नान , संशोधन हे फक्त त्या त्या क्षेत्रातल्या विद्वद्वर्तुळापुरतेच मर्यादित राहिले आहे. आणि आपण सारे सामान्यजन उगीचच भुई धोपटीत राहिलो आहोत .

भाषांची उत्पत्ती, वाढ . प्रगती, अधोगती , शब्दसंचय, व्याकरण अभिव्यक्तिक्षमता, यांवर जगात सर्वत्र आणि भारतातही भरपूर संशोधनात्मक असे खूप काम चालू आहे.

चांगली गोष्ट आहे. उदाहरणार्थ?
============
मी ज्या अनुषंगाने भाषांचा शास्त्रीय अभ्यास हा मुद्दा मांडला आहे त्यात मला आजपावेतो फक्त उच्चारांचे वर्गीकरण यावरच काही वाचायला मिळालं आहे. ते ही मला काही शास्त्रीय वाटलं नाही.

अभ्या..'s picture

23 Aug 2017 - 2:42 pm | अभ्या..

anient Indian art, science and culture हा विषय भारतातील सर्वच विद्यापीठांतल्या कला शाखांमध्ये शिकवला जातो. हा अभ्यासक्रम खूपच समावेशक आहे. या लेखात आणि प्रतिसादांत उमटलेल्या बहुतेक शंकांची स्पष्टीकरणे तर त्यात असतातच पण प्राचीन कला, स्थापत्य, नगरविकास, धर्म, गणित, रसायन, भौतिकी इत्यादि क्षेत्रांतील अनेक प्राचीन संकल्पनांचा समावेश त्यात असतो.

अगदी अगदी, आणि ते असे शिकवले जाते हेही यच्च्यावत इंजिनिअरांना माहीत नसते.

इंजिनिअरांना त्यांचा स्वतःचा सिलॅबस माहीत नसतो, तेव्हा त्या पार्श्वभूमिवर ही अपेक्षा फार झाली.
===========================
पण विषय तो नाही.
=========================
कोणत्याही एका हिंदू धर्मावरील शैक्षणिक संस्थेची, आणि सिलॅबसची लिंक (जसे मेकॅनिकल इंजिनिअरिंग) देता का? भारतात एक तरी असायला पाहिजे.

एखाद्या हिंदू धार्मिक शिक्षणाच्या संस्थेने ( पाठशाळा, वेदशाळा) वगैरे ) असा अभ्यासक्रम सुरू केला नसेल किंवा करीत नसेल तर ते दुर्दैवी आहे. पण ' धार्मिक' असे लेबल नसलेल्या अनेकानेक संस्थांमधून हे शिकवले जाते. देशात आणि कदाचित त्याहूनही अधिक परदेशात. शिवाय प्राचीन भरतखण्डात बौद्ध, वैदिक आणि जैन हेच धर्म होते. त्यामुळे प्राचीन भारताचा अभ्यास म्हणजे या तीन समूहांचा अभ्यास हे ओघानेच आले .
आता उपरोल्लेखित अभ्यासक्रमाचे नाव बदलून ' प्राचीन हिंदू कला शास्त्र आणि संस्कृती ' असे ठेवावे असे काही सुचवायचे असल्यास गोष्ट वेगळी. पण तेही ' फॅक्चुअली करेक्ट ' ठरणार नाही.

arunjoshi123's picture

24 Aug 2017 - 12:35 pm | arunjoshi123

हे शिकवले जाते.

प्रश्न वेद, इ इ शिकण्याचा नाही. मी त्याबद्दल बोलतच नाहीय. पुन्हा विचारतो हिंदू धर्म हाच (वा हा) सिलॅबस असलेली मान्यताप्राप्त सरकारी वा खासगी संस्था आहे का?

त्यामुळे प्राचीन भारताचा अभ्यास म्हणजे या तीन समूहांचा अभ्यास हे ओघानेच आले .

असं अजिबात होत नाही. दोन प्राचीन राज्यांचे वा राजांचे संबंध (जे इतिहास म्हणून शिकवले जातात.) आणि प्राचीन भारत यांचा फार काही संबंध नाही. लोकजीवन तर अजिबात कळत नाही.
================
आणि आत्ता देखिल हे तीन धर्म आहेतच. मंजे आधुनिक भारताचा इतिहास हा या तीन धर्मांचा "अभ्यास" झाला कि काय?
===================================
आणि या अभ्यासाचा, असा काही अभ्यास नावाचा प्रकार असेलच तर, दर्जा अत्यंत हिन होता. उदा. उगाच उपटसूंभासारखी पसरवलेली आर्य आक्रमण थेरी.

हिंदू धार्मिक शिक्षणाच्या संस्थेने ( पाठशाळा, वेदशाळा) वगैरे ) असा अभ्यासक्रम सुरू केला नसेल किंवा करीत नसेल तर ते दुर्दैवी आहे.

पहा, कोणी अभ्यासक्रम चालू केला हा मुद्दाच नाही. हिंदू संस्थेनंच करायला पाहिजे असं काही नाही. मुस्लिम, पारशी, सरकार, एम एन सी, एन जी ओ, एस्थिस्ट - कोणीही अशी संस्था चालू करू शकतं. आणि पाठशाळा वैगेरे काय लावलंय, मदरशात कुराण घोकणे म्हणजे इस्लामचा अभ्यास नव्हे.
========================================

उपरोल्लेखित अभ्यासक्रमाचे नाव बदलून ' प्राचीन हिंदू कला शास्त्र आणि संस्कृती ' असे ठेवावे असे काही सुचवायचे असल्यास गोष्ट वेगळी.

असे सुचवले वा न सुचवले तरी त्यात कंटेंट काय आहे त्याप्रमाणे हिंदू शब्द वापरता येईल वा गाळता येईल. पण तो विषय नाही. असा अभ्यास होतो? मग तो होऊन प्राचीन शास्त्रे निरुपयुक्त आहेत असा निष्कर्ष काढण्यात आला आहे काय? या अभ्यासांचि रिकमेंडेशन्स कुठे आहेत. त्यावर सरकारने काय पावले उचलली आहेत?
-----------
प्राचीनचं जाऊच द्या, आजचंच पाहू. जात इ हिंदू धर्माचा खूप महत्त्वाचा (मंजे आवश्यक या अर्थाने नव्हे, ....) भाग आहे. या जातींचं काय होतंय, काय व्हावं, त्यांचे आंतरसंबंध, भारतीय व्यवस्थांवर त्यांचा परीणाम, त्यांचे इष्टानिष्ट अस्पेक्ट्स, फायदे, तोटे, भविष्य, सांखिकी, पकड, प्रथा याच्या काय संशोधन करतं सरकार? आज समाजात इतकी ढवळाढवळ चालू आहे, सगळं देवावर सोडून सरकार, शहाणे झोपले आहेत.
--------------------
थोडक्यात, जे आधुनिक नाही, त्याबद्दल खूप अनास्था आहे.

आदित्य कोरडे's picture

25 Aug 2017 - 8:24 am | आदित्य कोरडे

अगदी बरोबर... अरुणजोशी साहेब एकदम भरमसाट आणि बिन बुडाचे दावे का करत आहेत तेच कळत नाहीये...

arunjoshi123's picture

28 Aug 2017 - 1:49 pm | arunjoshi123

उदाहरणार्थ?
==============
हेतू तरी तसा नाही.
============================
आता आपण दोघे मराठीत लिहितोय. ती एक भयंकर जुनाट भाषा आहे हा बिनबुडाचा दावा नाही.

पिशी अबोली's picture

31 Aug 2017 - 8:07 pm | पिशी अबोली

बाकी सगळं जाऊदे, मला तुमच्या आत्मविश्वासाचं अपार कौतुक वाटतं!

आजपासून मराठी नामक जुनाट आणि त्याज्य भाषा वापरायचं सोडा बघू... आणि एखादी सर्वगुणसंपन्न भाषा शोधून काढा आणि तिचा प्रसार करा.. मज्जा येईल.

अत्रे's picture

23 Aug 2017 - 1:00 pm | अत्रे

https://en.wikipedia.org/wiki/Straw_man

तुम्हाला या धाग्यात कोणीतरी असे म्हटले आहे का किती पूर्वज बावळट होते म्हणून? उगाच कोणी उपस्थित न केलेल्या मुद्द्याला उत्तर देत आहात असे वाटते.

आम्हाला तर इतिहासात नसलेले विज्ञान त्यात लादणारे लोक बावळट वाटतात.

तुम्हाला या धाग्यात कोणीतरी असे म्हटले आहे का किती पूर्वज बावळट होते म्हणून? उगाच कोणी उपस्थित न केलेल्या मुद्द्याला उत्तर देत आहात असे वाटते.

माझ्यामते पुराणकालिन भारतीय विमान बनवूच शकणार नाहीत इतके बावळट होतेच्च हाच धाग्याचा विषय आहे.
नै का?
=============================
त्यामागची गृहितके अशी आहेतः
१. विमान किंवा उडणारी वस्तू बनवायला आज जी तत्त्वे वापरली जातात त्यापेक्षा अन्य काही असूच शकत नाही.
२. हवाई वाहतुकीसाठी रिफाईन्ड ऑयल, एअरबेस, इंजिन्स हे मस्ट आहे.
३. प्रत्येक गोष्ट पुरावा ठेऊनच नष्ट होते. आज जिचा पुरावा नाही अशी गोष्ट मागे नसतेच.
४. एक सिविलायशेन १०० वर्षांत एक्सपोनेंशियल प्रगती करू शकते मात्र मागे ते २ लाख वर्षे थंडच असले पाहिजे.
५. विमाने होते हे जाऊ द्या, "तेव्हा असू शकतात का?" असा चिकित्सक विचार देखिल दडपून टाकणे हेच पुरोगामीपणाचे लक्षण आहे.

माझ्यामते पुराणकालिन भारतीय विमान बनवूच शकणार नाहीत इतके बावळट होतेच्च हाच धाग्याचा विषय आहे.
नै का?

याचे उत्तर आदित्य कोरडे योग्य प्रकारे देऊ शकतील.

माझ्या मते धाग्याचा उद्देश पुरावा नसताना काही लोक "पूर्वी असेच असले पाहिजे" टाईपची विधाने करतात त्यांचे डोळे उघडणे असा असावा.

विमाने होते हे जाऊ द्या, "तेव्हा असू शकतात का?" असा चिकित्सक विचार देखिल दडपून टाकणे हेच पुरोगामीपणाचे लक्षण आहे.

तेव्हा असू शकतात का - हा अतिशय रास्त प्रश्न आहे! असा कुतूहलपूर्वक दृष्टिकोन ठेवणाऱ्या प्रत्येकाला उत्तेजनच दिले पाहिजे. त्याचबरोबर 'या प्रश्नाचे शास्त्रशुद्ध उत्तर कसे शोधावे' यावर चर्चा झाली तर उत्तमच.

अवांतर: हे पुरोगामी प्रकरण काय आहे? आमच्यापैकी कोणीही इथे कसले लेबल घेऊन आलेलो नाही.

त्यामागची गृहितके अशी आहेतः
१. विमान किंवा उडणारी वस्तू बनवायला आज जी तत्त्वे वापरली जातात त्यापेक्षा अन्य काही असूच शकत नाही.
२. हवाई वाहतुकीसाठी रिफाईन्ड ऑयल, एअरबेस, इंजिन्स हे मस्ट आहे.
३. प्रत्येक गोष्ट पुरावा ठेऊनच नष्ट होते. आज जिचा पुरावा नाही अशी गोष्ट मागे नसतेच.
४. एक सिविलायशेन १०० वर्षांत एक्सपोनेंशियल प्रगती करू शकते मात्र मागे ते २ लाख वर्षे थंडच असले पाहिजे.

हा तुमचा मुख्य मुद्दा आहे ना, मग हाच सुरवातीला टाकला असता तर बरे झाले असते. माझे उत्तर -

  • आज आपल्याला पूर्णपणे अज्ञात असे एखादे तंत्रज्ञान वापरून पूर्वजांनी विमान तयार केले असू शकते का?

- होय!

  • आज आपल्याला पूर्णपणे अज्ञात असे एखादे तंत्रज्ञान वापरून पूर्वजांनी विमान तयार केले आहे असे काही पुरावे आहेत का

- माझ्या मते नाही!
पुराणातले विमान या विषयावर माझा अभ्यास नाही - म्हणून मी धागालेखक याना विनंती करतो की या मुद्याचे खंडन करावे.

बाय द वे - मी तुम्हाला सांगीतले की माझ्याकडे असे विमान आहे तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल का? समजा मी असे म्हटले की याचे तांत्रिक डिटेल्स मी कोणाला दिले तर ते विमान नष्ट होईल, तर? ठेवाल माझ्यावर विश्वास? नाही ना ..

arunjoshi123's picture

23 Aug 2017 - 2:23 pm | arunjoshi123

बाकीचा सर्व प्रतिसाद १००% मान्य.
=========================

पुरावा नसताना

समाधानकारक पुरावा नसताना... (प्रत्येकाचे समाधान वेगवेगळ्या प्रतलाला होते. संजय निरुपम यांचे समाधान करणे असा निकष लावला तर अवघडच आहे. हा हा.)
तेव्हा आदित्यजींचे समाधान करून घ्यायचे एक प्रतल आहे आणि त्याखालचे त्यांना अमान्य दिसते.
उदाहरणार्थ माझ्यामते कपडे बनवणे फार अवघड आहे. हजारो बारके धागे बनवणे, मग ते उभे आडवे विणणे आणि वस्त्र उत्पन्न करणे हे सूचणे आणि प्रत्यक्ष करणे ४००० वर्षांपूर्वी संभवच नाही. म्हणून दरबारात राम, इ कपडे घालून बसले असे रामायणात लिहिले असले तरी प्रत्यक्षात ते नग्नच बसले असणार. जसे विमान तसे कपडे. रामायणातल्या कपड्याचा कोणता पुरावा आता आहे? म्हणून.
============================

हे पुरोगामी प्रकरण काय आहे? आमच्यापैकी कोणीही इथे कसले लेबल घेऊन आलेलो नाही.

हे मान्य आहे. मी हा शब्द टाळायचा प्रयत्न करायला हवा. (व्यक्तिशः तुमच्या बाबतीत तर शतशः खरं आहे.)

arunjoshi123's picture

23 Aug 2017 - 2:34 pm | arunjoshi123

मी तुम्हाला सांगीतले की माझ्याकडे असे विमान आहे तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल का? समजा मी असे म्हटले की याचे तांत्रिक डिटेल्स मी कोणाला दिले तर ते विमान नष्ट होईल, तर? ठेवाल माझ्यावर विश्वास? नाही ना ..

इथे मात्र मी जाणिवपूर्वक उल्लेख करत आहे. मी पुरोगामी असतो तर , आणि फेअर असतो तर, मी विश्वास न ठेवायचं कारणच नाही (अज्यूमिंग एरवी तुम्ही विश्वासपात्र व्यक्ति आहात.) आता का? तर उत्क्रांती, बिग बँग, अर्थशास्त्र, क्वांटम फिजिक्स, इ इ गोष्टींत एक पुरोगामी म्हणून मी ज्या प्रकारे विश्वास ठेवतो अगदी त्यापेक्षा खूप कमी चटकन विश्वास ठेवायची प्रवृत्ती वापरून अशा विमानावर आरामात विश्वास ठेवेन. खर्र्र्र्र्च!!! पण लक्षात घ्या विश्वास ठेवायच्या बाबतीत मी फेअर असणं महत्त्वाचं आहे, नैतर उगाच जमाने के साथ चलने के चक्कर मे गडबडी हो जाएगी.
=======================
विज्ञान एरवी जेव्हा मला काहीही फालतू गोष्टी स्वीकारायला शिकवत नाही तरच माझी काहिही गोष्टि न स्विकारण्याची प्रवृत्ती दृढ होईल. विज्ञानच मला १०० फालतू गोष्टी सांगेल, तेव्हा १०१ वी फालतू गोष्ट स्वीकारायला मला अजिबात त्रास होणार नाही.

arunjoshi123's picture

23 Aug 2017 - 11:47 am | arunjoshi123

या धाग्यावर अजोंचे न वाचायचे प्रतिसाद सोडून बाकीचे वाचले, खूप उत्तम चर्चा होती असे लिहायचे राहिले आहे. कृपया वेळ झाल्यावर ती उणिव भरून काढा.

गामा पैलवान's picture

23 Aug 2017 - 12:38 pm | गामा पैलवान

arunjoshi123,

सारांशः
नाटक करावं, त्यात वाजवावं, गावं, टाळ्या वाजवाव्या, अ‍ॅक्ट करावं, फलानं ढिमकानं हे शोधणारे (शून्यातनं हे शोधणं क्लिष्ट आहे हे माना.) पूर्वज होते, तिथे तुम्ही स्पिकर लावला आणि लाईट्स लावल्या म्हणून फार उर बडवून घेऊ नका.

अगदी मनातलं बोललात!

हाच न्याय तथाकथित उत्क्रांतीलाही लावता येतो. उत्क्रांतीची सुरुवात सध्या एकपेशीय जिवापासून झाली असं शिकवतात. हिला सिम्पल सेल अशी संज्ञा आहे. प्रत्यक्षात ही पेशी साधीसोपी अजिबात नसते. मानवी शरीरात दहाएक जैवसंस्था (पचनसंस्था, मज्जासंस्था वगैरे) असतात. उदा. : एखाद्या मानवी काळजातल्या पेशीचा डीएने केवळ काळीजाचं काम करण्यापुरता सक्रीय असतो. याउलट एकपेशीय जिवात या सर्व संस्थांची कार्ये एकमेव पेशीत एकवटलेली असल्याने ती पेशी प्रचंड गुंतागुंतीची बनते. तिच्या केंद्रातला डीएने उच्च प्रमाणावर सक्रीय असतो. जर हा एकपेशीय जीव आणि मानवी शरीरातली कोणतीही पेशी यांची फायटिंग लावली तर एपेजी ताबडतोड प्रतिस्पर्ध्यास खाऊन, ढेकर देऊन वर हा#न देखील टाकेल.

तर मग उत्क्रांती कशाला म्हणायचं? शरीरातल्या पेशींना बावळट बनवणे?

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

23 Aug 2017 - 12:44 pm | गामा पैलवान

वर एकपेशीय जिवासाठी दिलेला दुवा चुकीचा आहे. इतिहे अमिबाचा दुवा द्यायचा होता : https://en.wikipedia.org/wiki/Amoeba
चुकीबद्दल क्षमस्व.

-गा.पै.

उद्या जर पुरोगाम्यास एक हाय स्पेक लॅपटॉप दाखवला व म्हणालो कि मला हा एका कोरड्या नदीच्या पात्रात सापडला व त्याला कोणत्या कंपनीने बनवलेला नाही, तो उत्क्रांत झालेला आहे तर तो पुरोगामी अजिबात विश्वास ठेवणार नाही, भले मी त्याला लाख समजावेल कि अरे तू जी निसर्गात उत्क्रांती झाली आहे असे जे मानतोस त्यापेक्षा हा अत्यंत साधा, ३ महिने वयाचा लॅपटॉप उत्क्रांत होणे मानणे हे पेटालियनच्या पेटालियन पट सुज्ञपणाचे आहे.
==================
लोक उत्क्रांति मानतात आणि पुराणातली विमाने मानत नाहीत हा महामूर्खपणाचा कळस आहे.

लोक उत्क्रांति मानतात आणि पुराणातली विमाने मानत नाहीत हा महामूर्खपणाचा कळस आहे.

तुम्ही या दोघांपैकी कोणाला "मानता"?

दोघांचे बिट्स अँड पिसेस मानतो.

आदित्य कोरडे's picture

24 Aug 2017 - 6:42 am | आदित्य कोरडे

सर्वसाधारणपणे चर्चेचा किंवा प्रतिसादातल्या मुद्द्यांचा एक सूर म्हणजे आमचे पूर्वज बावळट होते असे तुम्हाला म्हणायचे आहे का? त्याना काहीच येत नव्हते का? अशा प्रकारे चालला आहे. त्यात दिल्लीच्या लोह्स्ताम्भाने अनेकाना( मला सुद्धा ) बुचकळ्यात टाकलेले आहे. पण मग फक्त तो लोह स्तंभ च का दमास्कस स्टील( हे मुळचे भारतीय स्टीलच होते)जपान्यांच्या कताना तलवारी अशा अनेक गोष्टी आहेत. प्राचीन भारतीयांनी खगोलशास्त्रात बरीच प्रगती केली होती तशीच धातुशास्त्रात , स्थापत्य शास्त्रात ही केली होती . पण एक लक्षात ठेवण्याचा मुद्दा असा कि प्रगती केल्यानंतर एका विशिष्ट उंची पुढे त्या शास्त्राचा विकास साधायचा असेल तर इतर अनेक शास्त्राची मदत आणि त्याकरता सहजिकच त्या शस्त्रांचा विकास होणे गरजेचे असते हा मुद्दा आपण दुर्लक्षित करू शकत नाही. आपल्याप्राचीन भारतीयाना खगोल शास्त्राची कितीही चांगली माहिती असली तरी जोपर्यंत काचेची उत्तम भिंग आणि त्यापासून दुर्बीण बनवणे , त्याकरता साहजिकच प्रकाश शास्त्र तसेच इतर तांत्रिक बाबीत सिद्धता होत नाही तोपर्यंत खगोल शास्त्राच्या पुढच्या प्रगतीला खिळ बसते....
आता एवढेच पुरे ...उद्या जरा सविस्तर लिहितो

arunjoshi123's picture

24 Aug 2017 - 12:55 pm | arunjoshi123

त्यात दिल्लीच्या लोह्स्ताम्भाने अनेकाना( मला सुद्धा ) बुचकळ्यात टाकलेले आहे.

भाषेचा शोध लावण्यासाठी आणि लोहस्तंभ बनवण्यासाठी या दोनपैकी कशासाठी जास्त बुद्धिमत्ता (आणि इतर गोष्टी) लागतात असे तुम्हाला वाटते? तुमच्या बुचकळ्यात पडण्याच्या स्टाइलने मला बुचकळ्यात पाडले आहे.

पण एक लक्षात ठेवण्याचा मुद्दा असा कि प्रगती केल्यानंतर एका विशिष्ट उंची पुढे त्या शास्त्राचा विकास साधायचा असेल तर इतर अनेक शास्त्राची मदत आणि त्याकरता सहजिकच त्या शस्त्रांचा विकास होणे गरजेचे असते हा मुद्दा आपण दुर्लक्षित करू शकत नाही.

इतिहासात इतर अनेक शास्त्रांची प्रगती होणारच नाही आणि त्यांचा समन्वय होणारच नाही याला कारण काय होते? आज (मंजे अलिकडे) व्हायलाच पाहिजे याला कारण काय आहे? तुमचा मुद्दा दुर्लक्षित नाही केला तरी मागे सगळी शास्त्रे एकत्र प्रगती करणार नाहीतच याला आधार काय?

त्याकरता साहजिकच प्रकाश शास्त्र तसेच इतर तांत्रिक बाबीत सिद्धता होत नाही तोपर्यंत खगोल शास्त्राच्या पुढच्या प्रगतीला खिळ बसते....

प्रकाशशास्त्राला आज बसलेली खीळ कमी मोठी आहे का? जितकं मला कळतं तितकं मांडायचं झालं तर मानवी अक्कल आणि प्रकाशाचं स्वरुप हे दोन्ही एकत्र स्वीकारलं जाऊ शकत नाही. हे फारच क्रूड झालं, पण आहे तर असंच.

आदित्य कोरडे's picture

25 Aug 2017 - 7:53 am | आदित्य कोरडे

<<प्रकाशशास्त्राला आज बसलेली खीळ कमी मोठी आहे का? जितकं मला कळतं तितकं मांडायचं झालं तर मानवी अक्कल आणि प्रकाशाचं स्वरुप हे दोन्ही एकत्र स्वीकारलं जाऊ शकत नाही. हे फारच क्रूड झालं, पण आहे तर असंच.>>
जरा मुद्धा स्पष्ट कराल का ...काय खीळ बसली आहे ते....म्हणजे अजून संशोधन चालूच आहे आणि ते चालूच राहील पण खीळ बसल्याचे आपण काय म्हणता आहेत ते समजले नाही
<<इतिहासात इतर अनेक शास्त्रांची प्रगती होणारच नाही आणि त्यांचा समन्वय होणारच नाही याला कारण काय होते? आज (मंजे अलिकडे) व्हायलाच पाहिजे याला कारण काय आहे? तुमचा मुद्दा दुर्लक्षित नाही केला तरी मागे सगळी शास्त्रे एकत्र प्रगती करणार नाहीतच याला आधार काय?>>
तुमच्याकडे काय नि:संदिग्ध पुरावा आहे ? किह्या सगळ्या शास्त्रात पूर्वी प्रगती झालीच होती....

पण खीळ बसल्याचे आपण काय म्हणता आहेत ते समजले नाही

ड्यूएल नेचर ऑफ लाईट बद्दल म्हणत होतो. पार्टिकल वेगळे. वेव वेगळी. प्रकाश पार्टिकल आणि वेव दोन्ही "एकदाच" असतो असं विज्ञानानं स्वीकारलं आहे. हे कसं काय असू शकतं? हे कमी की काय म्हणून स्ट्रींग थेरि आणि तशा बर्‍याच थेर्‍या मांडल्या जात आहेत. आम्ही नक्की काय मानायचं?

सतिश गावडे's picture

24 Aug 2017 - 11:29 am | सतिश गावडे

काही महान लोकांना सिद्धी प्राप्त होत्या. ते या सिद्धींच्या जोरावर कोणत्याही बाह्य साधनांशिवाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी उडत जायचे. काही वेळा हे उडणे दृष्य स्वरूपात असायचे तर काही वेळा अदृष्य स्वरुपात. या दुसऱ्या प्रकारात व्यक्ती एका ठिकाणी अंतर्धान पावून दुसऱ्या ठिकाणी अवतीर्ण व्हायची.

कलियुगात दुराचार माजल्यामुळे या सिद्धी लुप्त झाल्या. हिमालयातील काही योग्याकडे या सिद्धी आहेत मात्र ते योगी आपणासमोर येत नाही. जर ते बाहेरच्या जगात आले तर त्यांना दुराचाराचा संसर्ग होऊन त्यांच्याही सिद्धी लुप्त होतील.

कलियुगात दुराचार माजल्यामुळे या सिद्धी लुप्त झाल्या.

आणि तरीही आधुनिक विज्ञान या सिद्धि टेलिपोर्टेशन च्या नावाखाली पुन्हा प्राप्त करू इच्चित आहे हे काय बरोबर नाय गावडे सायेब. एक तर दुराचारी आन वर सिद्धि पायजे मंजे आपण इरोध केला पायजे.
=============
हे जे नवे महामहान लोक आहेत (नवे असल्याने साधे महान थोडेच असणारत, ते म्हणे क्वांटम पार्टिकलशी कपल होणार. हे जगात मने पार्टिकल आणि अँटी पार्टिकल असतात. ते मने हिंदी सिनेमातल्या जुळ्या भावासारखे असतात. आणि प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने (खरे तर वेगाने नव्हेच, तत्क्षणी) ते कनेक्ट होतात. कितीही पापं करणारे प्रवास करू शकतात असा या स्किमचा स्पेशल फायदा आहे.
====================
टेलिपोर्तेटेशन वर मी अजून एक पोस्ट टाकली आहे.

सतिश गावडे's picture

24 Aug 2017 - 9:40 pm | सतिश गावडे

आपल्याकडे पूर्वी अक्खाच्या अक्खा माणूस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचा आणि हे येडे आता फक्त एका कणाची सद्यःस्थितीची माहिती (सद्यःस्थितीची माहिती, तो कण नव्हे बरं का) एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी जीवाचा आटापिटा करत आहेत.

स्पा's picture

24 Aug 2017 - 8:02 pm | स्पा

अरुण जोशींचे सगळे प्रतिसाद आवडले

स्मिता.'s picture

26 Aug 2017 - 7:30 pm | स्मिता.

मला तर प्रतिसादांपेक्षाही त्याची चिकाटी जास्त आवडली, शिकण्यासारखं आहे.

arunjoshi123's picture

28 Aug 2017 - 1:25 pm | arunjoshi123

दोघांचे धन्यवाद.

आदित्य कोरडे's picture

25 Aug 2017 - 7:46 am | आदित्य कोरडे

सर्वसाधारणपणे चर्चेचा किंवा प्रतिसादातल्या मुद्द्यांचा एक सूर म्हणजे आमचे पूर्वज बावळट होते असे तुम्हाला म्हणायचे आहे का? त्याना काहीच येत नव्हते का? अशा प्रकारे चालला आहे.तसे मला तरी मुळीच म्हणायचे नाही. त्यात दिल्लीच्या लोह्स्ताम्भाने अनेकाना(मला सुद्धा) बुचकळ्यात टाकलेले आहे. पण मग फक्त तो लोह स्तंभ च का दमास्कस स्टील( हे मुळचे भारतीय स्टीलच होते)जपान्यांच्या कताना तलवारी अशा अनेक गोष्टी आहेत. प्राचीन भारतीयांनी खगोलशास्त्रात बरीच प्रगती केली होती तशीच धातुशास्त्रात, स्थापत्य शास्त्रात ही केली होती. सिंधू संस्कृती ने वापरलेले स्थापत्य आणि नगर रचना शास्त्रे आणि पाण्याचे नियोजन पाहून तर आजही लोक चकित होतात.सांडपाण्याचा निचरा करायची पद्धत जी ते वापरत ती तर बलाढ्य रोमनसाम्राज्यातले लोकही वापरत नसत.चाकाचा शोध लागलेला नसताना इंका संस्कृतीने आपली प्रचंड मोठी आणि सुनियोजित नगरे उभारली आणि भरभराटीला आणली. प्राचीन काळातली भारतीय संस्कृती थोर/ महान (किंवा इतर अशी कोणतीही संस्कृती समाजव्यवस्था )होती हे सांगायला आजच्या काळातले सर्व शोध आम्ही आधीच लावले होते हे सांगण्याची जी चढ ओढ सध्या सगळीकडेच सुरु आहे ती हास्यास्पद आहे.
कुणीतरी प्रश्न विचारला कि आजची जी विमान उडतात ती जे तंत्राद्यान वापरतात त्यापेक्षा वेगळे तंत्रज्ञान वापरून विमान उडू शकतच नसेल का? नक्कीच तसे होऊ शकते, माणसाने उदयाचा प्रयत्न करण्या आधी जवळपास ६ वेळा निसर्गाने उडण्याचे निरनिराळे यशस्वी प्रयोग केले आहेत.आज आपण सर्रास वापरणारे जेट इंजिन आधी पूर्वी वापरत असलेले IC इंगीने ह्यात जमीन अस्मानचा फरक आहे. मग? त्याचे काय. ह्या सगळ्या बरोबर त्याकाळातली समाजव्यवस्था तिच्याकडे आपण बघुयात का? रामाने आणि रावणाने विमान प्रवास केला त्यांच्या काळातले सर्व सामन्य नागरिक असे किती जण विमान प्रवास करीत? काही उल्लेख आहेत का?
रामायण महाभारत व्यास आणि वाल्मिकी कशाला त्यामानाने अगदी अर्वाचीन अशा लिओनार्डो द विन्ची चे उदाहरण घ्या. त्याने आजचे हेलीकॉप्तर सदृश उड्डाण यंत्र कसे बनवता येईल ह्याचे अगदी डिटेल रेखाचित्र केले होते. तशा त्याने आधुनिक काळातले रणगाडे/ आर्मर्ड वाहन जसे असतात तसे चिलखती वाहनसुद्धा डिझाईन केले होते पण इंजिन वगैरे सोडा, अलुमिनियाम सारख्या हलक्या धातूचा शोध लागला नसल्याने ते त्याला प्रत्यक्षात नाही आणता आले. एखादा पुराण मताभिमानी अजून १००० वर्षाने हे असले रणगाडे हेलीकॉप्तर आमच्या हुशार पूर्वजांनी आधीच बनवले होते असे म्हणेल त्याला काय करणार?
इथे एक लक्षात ठेवण्याचा मुद्दा असा कि कोणत्याही शास्त्रात प्रगती केल्यानंतर एका विशिष्ट उंची पुढे त्या शास्त्राचा विकास साधायचा असेल तर इतर अनेक शास्त्राची मदत आणि त्याकरता सहजिकच त्या शास्त्रांचा विकास होणे गरजेचे असते हा मुद्दा आपण दुर्लक्षित करू शकत नाही. आपल्याप्राचीन भारतीयाना खगोल शास्त्राची कितीही चांगली माहिती असली तरी जोपर्यंत काचेची उत्तम भिंग आणि त्यापासून दुर्बीण बनवणे,त्याकरता साहजिकच प्रकाश शास्त्र तसेच इतर तांत्रिक बाबीत सिद्धता होत नाही तोपर्यंत खगोल शास्त्राच्या पुढच्या प्रगतीला खिळ बसते.एक प्रचंड मोठी दुर्बीण बनवायची असेल तर अभियांत्रिकी क्षेत्रातल्या सर्वच शाखांची मदत लागेल कि नाही तीच गोष्ट वैद्यक शास्त्राची.
पहा विचार करा आणि मग मत बनवा ...

चौकटराजा's picture

28 Aug 2017 - 1:24 pm | चौकटराजा

१९६७ च्या दरम्यान मी आठवीत असताना " चंद्रावर स्वारी" नावाची गोष्ट लिहिली होती. त्यात १९६७ पर्यम्त ज्या तंत्राने याने वर आकाशात जात होती त्या पद्धतीनेच मी यान सोडले होते. चंद्रावर एक सफेद रंगात " ससा" दिसतो . तो आपल्या दक्षिण धूवासारखा बर्फाळ प्रदेश आहे त्यावर आमचे यान गेले असे लिहिल्याचे आजही आठवत आहे. त्यात माझी एक चूक अशी झाली की हे माझे साहित्य मी ताम्रपटावर लिहून पुरायला हवे होते. तसे झाले नाही . जर मी ही चूक केली नसती तर एखाद्या इतिहास संशोधकाला तो ताम्रपट सापडला असता व त्याने काही निष्कर्ष काढले असते त्यात एक असा असता की ..
अगदी १९६७ पर्यंत चंद्रावर बर्फ होते. १९६९ साली मानव ज्यावेळी चंद्रावर उतरला त्यावेळी त्याला बर्फ आढळले नाही. तरी दोन वर्षात अशी काही घटना घडली असावी की सर्व बर्फ नाहीसे झाले.

चंद्रावर बर्फ (हो, बर्फच, द्रव नाहि.) आहे हे आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी शोधले आहे. त्यासाठी त्यांचे कौतुक पण झाले आहे. बाय द वे, अजून कोणते कोणते ताम्रपट लिहायचं सुचलं आहे तुम्हाला?
https://www.theguardian.com/world/2009/sep/24/water-moon-space-explorati...

चौकटराजा's picture

29 Aug 2017 - 10:42 am | चौकटराजा

त्या लेखात बर्फाचा उल्लेख असल्याचा शोध तुम्हाला कसा लागला ते सांगा बरे ! मी फाईन्ड वापरून आईस व स्नो दोन्ही शब्द देऊन पाहिले !

किलवर गुल्ल्याला देखिल माहित आहे कि चंद्रावरचं पाणी तिथल्या क्रेटरांत आहे, आणि उधर बस बरफ हि हो सकता है.
मी इथे लिहिलेली विधाने अश्शीच आहे असं वाटतं की काय?
==============
तुम्ही लहानपणी लिहिलेल्या गोष्टी सांगा ना.

चाैकटकडुन असल्या प्रतिसादाची अपेक्षा नव्हती ;)