ताज्या घडामोडी - ९

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in राजकारण
7 Aug 2017 - 11:23 pm

१५०+ प्रतिसाद झाल्याने नवीन धागा.

प्रतिक्रिया

ताज्या घडामोडीत ह्या बातम्या नसतात . सोयीस्कर असतात .

अभिजीत अवलिया's picture

12 Aug 2017 - 12:56 pm | अभिजीत अवलिया

ऑक्सिजनअभावी मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता ६३ वर पोहोचली आहे. :(

औरंगजेब's picture

12 Aug 2017 - 9:57 am | औरंगजेब

गणपतीकिळात तेजसने प्रवास करणार्यांना चकटफू उकडीचा मोदक द्यायचा प्रस्ताव रेल्वेने दिला आहे. मागच्या वर्षी दिल्ली राजधानी एक्स. मधे दिले होते.

अभिजीत अवलिया's picture

12 Aug 2017 - 10:04 am | अभिजीत अवलिया

सत्तेवर आल्यास राज्यातील जनतेला टोल माफी असे आश्वासन भाजपाने निवडणुकीच्या वेळी दिले होते. त्यानंतर ५५ फुटकळ टोल नाक्यांवर खासगी मोटारी आणि एसटीच्या गाडय़ांना १ जून २०१५ पासून टोलमाफी दिली गेली. पण हा एक चुनावी जुमला होता हे उघडकीस आले आहे.

पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे याबाबतची माहिती मागितली असता टोलमाफी दिल्यानंतर शासनाकडून संबंधित ठेकेदाराला दरवर्षी भरपाई दिली जात असल्याचे समोर आले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाने १५ टोलनाक्यांबाबत आर्थिक वर्ष २०१५ पासून २०१७ पर्यंत ठेकेदारांना सुमारे ४५ कोटींची भरपाई दिली आहे. त्यात पहिल्या वर्षांच्या तुलनेत दुसऱ्या वर्षीची भरपाई दुप्पट आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या कालावधीत एकूण १५९ कोटी रुपयांची भरपाई दिली आहे. जरी टोलमाफी केली असली तरी कंत्राटदारांना २०४० पर्यंत किंवा संबंधित कंत्राट संपुष्टात येईपर्यंत प्रतिवर्ष नुकसान भरपाई देण्याचे सरकारने मान्य केले आहे. त्यामुळे पुढील किमान पंचवीस वर्षे सरकारी तिजोरीतून या कंत्राटदारांना टोलचे पैसे दिले जाणार असून पुढील २५ वर्षांत सरकार अशा प्रकारे ३८०० कोटी रुपये मोजणार असल्याचेही उघड झाले आहे असे वेलणकर यांनी सांगितले.

http://www.esakal.com/pune/pune-news-cheating-toll-naka-६५९७८

http://www.loksatta.com/pune-news/government-not-stop-yet-toll-naka-scam...

अनुप ढेरे's picture

12 Aug 2017 - 10:37 am | अनुप ढेरे

टोलमाफीची नक्की कल्पना काय होती लोकांची? रस्ते बांधल्याचे पैसे द्यायचेच नाहीत ठेकेदाराला अशी होती काय? कोणीच?

अभिजीत अवलिया's picture

12 Aug 2017 - 10:53 am | अभिजीत अवलिया

लोकांची काय होती माहीत नाही. पण माझी अपेक्षा अशी होती.
ज्या टोल नाक्यांवर वसुली पूर्ण झाली/होईल आहे ते त्वरित बंद होणे, सर्व टोल नाक्यांवर किती वाहने गेली, किती टोल जमा झाला त्याचा इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले लावणे, ज्या रस्त्यासाठी टोल वसूल केला जातो तो नेहमी सुयोग्य स्थितीत ठेवणे. पिण्याचे पाणी, शौचालय व अन्य सुविधा उपलब्ध करणे.

पूर्ण टोल बंद करावा हे आश्वासनच चुकीचे होते. पण आम्ही ते करू असे खोटे आश्वासन दिले गेले. जे कंत्राटदारांना भरपाई दिल्याशिवाय पूर्ण होणे शक्यच न्हवते. त्यामुळे अशी पूर्ण न होणारी आश्वासने देऊ नयेत.

मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर टोल वसुली पूर्ण झाली आहे तरी देखील टोल बंद नाही.
https://www.mumbailive.com/en/civic/expressway-toll-plaza-is-fleecing-yo...

पुणे सातारा रोडचे ६ पदरीकरणाचे काम गेली ४ वर्षे तरी सुरु आहे. ह्या कामाची डेडलाईन २०१६ ची होती. ती सतत वाढवली गेली. काम चालू करायच्या आधीच वाढीव टोल मान्य केला गेला (तत्कालीन काँग्रेस आघाडीच्या सरकारची चूक) आणि आता देखील काम पूर्ण नाही. ज्या भागात झाले आहे त्याचा दर्जा चांगला नाही पण टोल मात्र दर वर्षी वाढतच आहे. रस्ते बांधल्याचे पैसे द्यावेत की पण न बांधताच का दरवर्षी वाढीव टोल?

अभिजीत अवलिया's picture

12 Aug 2017 - 11:00 am | अभिजीत अवलिया

चुकीची दुरुस्ती.
पुणे सातारा रोडचे ६ पदरीकरणाचे काम मार्च २०१० ला सुरु झाले आणि डेडलाईन मार्च २०१३ ची होती.
http://timesofindia.indiatimes.com/city/pune/Pune-Satara-highway-widenin...

गामा पैलवान's picture

12 Aug 2017 - 12:52 pm | गामा पैलवान

श्रीगुरुजी,

इतक्या उच्च पदावर गेलेल्या काही व्यक्ती पद सोडताना इतक्या खुज्या का होतात हे एक गूढच आहे.

राष्ट्रपतीपद फक्त नावापुरतं उच्च आहे. खरंतर ते केवळ बुजगावणं आहे. जेव्हा माननीय अब्दुल कलाम राष्ट्रपती बनतात तेव्हा कलमांचा सन्मान होत नसतो. उलट राष्ट्रपतीपदाचा गौरव होत असतो.

आ.न.,
-गा.पै.

अभिजीत अवलिया's picture

12 Aug 2017 - 2:40 pm | अभिजीत अवलिया

सिंहगड रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी सिंहगड रोडला पर्याय म्हणून पुणे महापालिकेने विठ्ठलवाडी ते वारजे पूल दरम्यान नदीपात्राच्या कडेने १६ कोटी रुपये खर्च करून रस्ता तयार केला होता. नदीपात्रातून जाणारा हा अडीच किलोमीटरचा रस्ता तयार करताना पूररेषेच्या आत तब्बल ३५ हजार ट्रक राडारोडा टाकण्यात आला होता. यामुळे नदीची वहनक्षमता कमी होऊन नदीकाठच्या रहिवासी भागात पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाल्याने पर्यावरणवाद्यांनी एनजीटीमध्ये याचिका दाखल केली. ज्यावर कोर्टाने हा रस्ता उखडून टाकण्याचे आदेश पालिकेला दिले. रस्ता करताना पूररेषेच्या आत भराव टाकण्याचा मूर्खपणा केला जात असताना ह्या कामावर पालिकेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष न्हवते असा अर्थ निघतो.हा रस्ता तयार करण्यासाठी १६ कोटी रुपये, तर आता काढून टाकण्यासाठी ६ कोटी रुपये, असा २२ कोटी खर्च पूर्ण वाया गेलेला आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/pmc-starts-...

काही वर्षांपूर्वी पुणे पालिकेने मगरपट्टा चौकात उड्डाणपूल उभारला. आणि तो इतका विचित्र उभारला की उड्डाणपुलाचे पिलर भर रस्त्यात मधेच आलेत. त्यामुळे स्वारगेटकडून येणाऱ्या आणि हडपसरला जाणाऱ्या वाहनांना समोरचा पिलर अडथळा करतो तर हडपसर वरून येणाऱ्या आणि चौकातून पुढे स्वारगेटकडे जाणाऱ्या तसेच खरेदी कडे जाणाऱ्या वाहनांना अतिशय शार्प टर्न मारावा लागतो. परिणाम खर्च वाया गेला कारण वाहतुकीची कोंडी होती तशीच आहे जवळपास. हा उड्डाणपूल उभारताना चूक झाली अशी कबुली बहुतेक अजित पवार ह्यांनी नंतर दिली होती. मग ज्यावेळी पुलाचे डिजाईन बनवले गेले तेव्हा ते कुणी तपासले न्हवते का?

शहरात सामान पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल १७०० कोटी रुपये खर्चाची योजना मंजूर केली गेली. त्यासाठी २०० कोटींचे कर्जरोखे उभारण्यात आले. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू झाल्यावर कर्जरोखे उभारायचे सोडून अगोदरच (कर्जरोखे उभारणारी देशातील पहिली महापालिका असा बिनकामाचा मान मिळविण्याच्या नादात) कर्जरोखे काढण्याची घाई करण्यात आली. आता ह्या सर्व प्रक्रियेला स्थगिती दिल्याने पुन्हा नव्याने निविदा मागवण्यापासून सुरवात करावी लागणार आहे. ज्याला ५-६ महिने जातील. तोपर्यंत ह्या २०० कोटींचे दरदिवशीचे ५ लाख व्याज महापालिकेला भरावेच लागणार. म्हणजे करदात्यांच्या पैशाचा अपव्यय.

जंगली महाराज रोडवर तो परदेशातल्या रस्त्यांसारखा करण्यासाठी मोठा फूट्पाथ करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे मूळ रस्त्याची रुंदी कमी झाली. भरीस भर म्हणजे ह्या रस्त्यावरून परत मेट्रोचे काम केले जाणार आहे ज्यावेळी हे फूटपाथचे काम बऱ्याच प्रमाणात तोडावे लागणार आहे. परिणाम -> खर्च वाया.

शहरात बरेच अंतर्गत रस्ते, गल्लीबोळ काँक्रीटचे केले गेले. पण ते करताना रस्त्याखाली गटार बांधणे वगैरे कामे केलीच नाहीत. त्यामुळे भविष्यात जेव्हा गटाराचे काम करायची वेळ येईल तेव्हा हे रस्ते परत खोदावे लागणार. परिणाम -> पैशाचा अपव्यय.

भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार किती भोंगळवाणा, भ्रष्ट असतो ह्याची ही उदाहरणे आहेत. भ्रष्ट राजकीय पक्ष आणि त्याला साथ देणारी नोकरशाही हे आपली शहरे, गावे व्यवस्थित विकसित न होण्याचे कारण आहे. आणि कुणीही सत्तेवर आले तरी ह्यात फरक पडत नाही. मग ते पुण्यासारखे मेट्रो शहर असो का एखादे छोटे शहर वा खेडे. ह्या असल्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे निव्वळ स्थानिक कार्यकर्त्यांची सत्तेची हौस फेडण्यासाठी असलेली कुरणे झालीत. कुठेतरी बाकडी बसावा, सोसायट्या रंगवून द्या, पेव्हिंग ब्लॉक काढून फूटपाथ वर फरश्या बसावा किंवा फरश्या असल्यास पेव्हिंग ब्लॉक बसावा, किंवा वर नमूद केलेली उफराटी कामे करा आणि त्यातून मलिदा खा ह्यापुढे ह्या नगरसेवकांची झेप नाही. ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका असल्या संस्था बंद करून प्रत्येक गोष्टींचे खाजगीकरण केले जावे असे मनापासून वाटते.

अनुप ढेरे's picture

12 Aug 2017 - 3:38 pm | अनुप ढेरे

बाकीबद्दल माहिती नाही पण जंगली महाराज रस्त्यावरचा नवा पदपथ अत्यंत उत्तम आहे. गांड्यांना आहे ती जागा भरपूर आहे. पादचार्‍यांचा विचार होतो ही उत्तम गोष्टं आहे. मेट्रो नक्की जाणारे का ज.म रस्त्यावर? मला वाटलं की नदी पात्रातून जाणारे.

arunjoshi123's picture

12 Aug 2017 - 4:55 pm | arunjoshi123

स्थानिक स्वराज्य संस्थाच काय राज्य सरकारं आणि केंद्र सरकार देखिल प्रायवेटाईज करावं वाटावं इतका गलथान मामला त्यांच्या कारभारात आहे. पण भ्रष्टाचार वा लाच म्हटलं कि वाहतूक पोलिस पहिल्यांदा आठवतो. वास्तविक एकूण भ्रष्टाचारात त्याचा रोल जवळजवळ नसतोच म्हणावा इतका कमी असतो.
===========
लोकल बॉडिजनी असे पैसे वाया घालवले तर फार काही फरक पडत नाही. शेवटी त्यांचं प्लॅन बजेटच किती असतं? मात्र राज्य सरकार वा केंद्र सरकारच्या कार्यप्रणालीत चांगले बदल झाले तर याच्या शेकडो पट पैसे वाचतील. पण भारतात हे संभव नाही. आपल्याकडे सगळ्या विद्वान लोकांना एन आर आय बनायची हौस आहे. उरलेल्या न जाऊ शकणारांना एम एन सींची हौस आहे. मग सरकार मधे काम करायला उरतंच कोण? सगळी मेंढरं!!!! म्हणून सरकारनं सगळी कामं ज्यात मेहनत, डोकं, तंत्रज्ञान, निर्णयक्षमता इ इ लागेल, ती स्वतः करणं पूर्णतः थांबवलं आहे. या सगळ्या तिन्ही पातळीवरच्या सरकारी यंत्रणांना फक्त योग्य काम ओळखणे, तिचे प्राधान्य ठरवणे, बजेटमधे अलोकेशन करणे, स्कोप निट लिहून काढणे आणि योग्य गुणवत्तेचा कंत्राटदार नेमणे इतकंच क्लर्कि काम आहे. पण ते तरी करतील (नीट असोच) तर शिंचे भारतीय कसचे?
त्यात कुणी काही केलं, पुढाकार घेतला कि भ्रष्टाचाराचे आरोप, सी बी आय, चौकश्या, बदनामी आणि जेल ठरलेले. कॉमनवेल्थ गेम्स झाले नसते तर शिलाबाईंने देशाचे शीलहरण केले असा आरोप झाला असता, फटाफट टेंडरे पास केली म्हणून भ्रष्टाचाराचा झाला.
========================
भारतीय लोकांची एकूण नैतिक लायकी पाहता त्यांना जे नेते लाभले आहेत ते त्यांच्याइतक्यात नैतिक वा अनैतिक लोकांच्या देशांतल्या नेत्यांपेक्षा १० पट छान आहेत. इथला मिडिया, इथली न्यायपालिका, इथले नोकर (शहा का म्हणायचं नोकरांना?) आणि इथले लोक यांच्यावर अधिक उत्तम टिका करता येईल.

थिटे मास्तर's picture

12 Aug 2017 - 4:18 pm | थिटे मास्तर

चिनी व्रुत्तपत्र ग्लोबल टाईम्स व त्यांच्या ईंग्लिश न्युज (युट्युब) आणि पाकिस्तानि व्रुत्तपत्र Dawn आणि काहि सिलेक्टेड (क्वालिटि वाईज) न्युज चँनल्स मि रेग्युलरली पाहतो.
ऐक निरीक्षण म्हणुन सांगतो चिनि आणि पाक दोन्हिकडे ते भारत सरकार, हिंदोस्तानी Gov. , Government of India OR Indian Government न म्हणता मोदि कि Gov. Government of Modi असा उद्देश करतात. 2019 ला बहुधा जिनपिंग किंवा नवाज सुद्धा युपिए मध्ये येतिल बहुधा नानि के लाडले को कुर्सि पे बिठाने.

लिओ's picture

12 Aug 2017 - 10:44 pm | लिओ

Encephalitisमुळे गोरखपुरला बालकांचा बळी.

http://indianexpress.com/article/what-is/encephalitis-causes-prevention-...

Encephalitis वर जाणकारांनी अधिक माहिती द्यावी.

थिटे मास्तर's picture

12 Aug 2017 - 11:46 pm | थिटे मास्तर

वाईट आहे! विषण्ण !
खरच अजुन किति काळ हा चलता है attitude आपण सहन करणार आहोत. हिंदि न्युज बघण सोडलय राव....आज योगि सरकार के १०० दिन पुरे....आज योगिजि गोरखपुर मे गाय को चारा खिला रहे है.....च्यामारी ४ महिने झाला काव आणलाय नुसता. अन काय हे.... अरे मान्य आहे महाराज मुख्यमंत्रि काहि देव नाहि अंतर्यामि असायला. अरे पण त्याला काय खुर्चि ला उब मिळावि म्हणुन तिथे बसवलाय का ? ईतका भयानक कांड होउन सुद्धा कारवाई किति लोकांवर झालि आणि किति कडक ? प्रत्येक झण आपलि जबाबदारी दुसर्‍यावर ढकलणार, साला किति हा गलथान पणा चा कळस.
hospital employees who handle the storage plant at the hospital from where oxygen is piped to different wards, wrote २ letters to the Chief Medical Officer informing him that the stock of liquid oxygen was dangerously low and would not last the night. C.M.O. काय गांजा पिउन ड्युटि वर यायचा काय ? अबे भेंडि if it was clear to him that it is not within his powers or control about the pending amount / dues why did not he raise his hands and escalate it to D.M. or directly to C.M. अ‍ॅडल्ट पेशंट पासुन ते NICU मधले निष्पाप बालके मरे पर्यंत हा काय योगि च्या गाई ला चारा खाउ घालत होता. Medical Negligence, Fails to perform duty, Culpable homicide आणखि काय काय लावता येईल ते लाउन असल्या incompetent लोकांना आज अद्द्ल नाहि घडवलि तर हे होतच राहणार मग सरकार योगि चे असो कि भोगि चे. साला जे दोषि असतिल त्यांना तात्काळ बरखास्त करुन पेंशन सुद्धा खाउन टाका नालयकांचि. पण हे होणार नाहि हे सगळ्यांनाच ठाउक आहे जे खुर्चि उबवत होते त्यांनाहि आणि ज्या गरिबांचे लेकर अशि हकनाक गेलि त्यांनाहि.

मामाजी's picture

14 Aug 2017 - 4:58 pm | मामाजी

कृपया ह्या लिंक वर दिलेली माहिती पण वाचवी.
http://rightlog.in/2017/08/yogi-adityanath-japanese-encephalitis-01/

थिटे मास्तर's picture

13 Aug 2017 - 3:46 am | थिटे मास्तर

पाकिस्तानात मार्शल लॉ चे म्हणजेच पुन्हा एकदा COAS च्या हाती पुर्ण सत्ता जाण्याचे चांसेस वाढलेत. बहुधा लवकरच जनरल बाजवा सुत्रे हाती घेतील.

गॅरी ट्रुमन's picture

13 Aug 2017 - 2:25 pm | गॅरी ट्रुमन

भारत-चीन यांच्यातील तणावामुळे भारत आणि नेपाळची माऊंट एव्हरेस्टची उंची मोजायच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे अशा बातम्या आहेत.

काहीही संदर्भ नसताना आणि कसलीही गरज नसताना ६-७ वर्षे जुन्या धाग्यांचा महापूर आलेला आहे त्याला अटकाव घालण्यासाठी फालतू का होईना मिळाली ती बातमी इथे देत आहे.

नंदन's picture

14 Aug 2017 - 12:34 am | नंदन

घटनाक्रम १, जुलै २०१६:
- डॅलस शहरात 'ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर'चा (बीएलएम) निषेध मोर्चा निघाला.
- या मोर्चात सर्व वर्णांचे लोक सामील झाले होते. बव्हंशी कुठल्याही हत्यांराशिवाय.
- आर्मीतून निवृत्त झालेल्या एका माथेफिरू 'लोन वूल्फ'ने या मोर्चाच्या आडून पोलिसांवर हल्ला केला आणि पाच पोलिस अधिकारांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं.
- संबंधित 'लोन वूल्फ'ला पोलिसांनी एका रोबोटद्वारे ठार केलं. संबंधित 'लोन वूल्फ'चा 'बीएलएम' चळवळीशी वा त्या मोर्चाशी काही संबंध आढळून आला नाही. या हल्ल्याचा 'बीएलएम'ने तीव्र निषेध केला, पण चळवळीला असलेली सहानुभूती मोठ्या प्रमाणात घटली आणि पुढील काही दिवसांत आधीच विकेंद्रित, उत्स्फूर्त असलेले हे निषेध मोर्चे संपुष्टात आले.
- पोलिसांवरील या हल्ल्याचा सर्व थरातल्या, सर्वपक्षीय राजकारण्यांनी (यात ओबामाही आले) निषेध केला.
- यानंतर ओबामाने व्हाईट हाऊसमध्ये एक सर्वपक्षीय बैठक बोलावली. त्यात स्थानिक राजकारणी, राज्याचे गव्हर्नर, पोलिस अधिकारी, सुरक्षाविषयक सल्लागार आणि 'बीएलम'चे प्रतिनिधी होते. एकून ४० लोकांपैकी केवळ दोन व्यक्ती बीएलएमशी संबंधित होत्या.

काही रिपब्लिकन राजकारण्यांनी या घटनाक्रमाची मांडणी 'पोलिसांवर हल्ला करणाऱ्या बीएलएम मेंबर्सना ओबामाने व्हाईट हाऊसमध्ये बोलावले' अशी केली. फॉक्स न्यूजने इमानेइतबारे आपल्या धन्याचं काम करून ही विधानं सातत्याने आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोचत राहतील, याची दक्षता घेतली. आधीच फॉक्स न्यूजचा कोअर प्रेक्षकवर्ग म्हणजे ओबामाला 'केनियन मुस्लिम + सिक्युलर + अँटाय-ख्राईस्ट' समजणारा. या बातम्यांमुळे ओबामा हा देशद्रोही असून तो स्वत: जातीने कृष्णवर्णीय-श्वेतवर्णीय यांच्यातील तेढ वाढवण्याचे प्रयत्न करतो आहे, असाही काहींनी समज करून घेतला.

एकदा या स्लिपरी स्लोपवर गाडी गेली की, ओबामा तिसऱ्यांदा निवडणूक लढवायच्या तयारीत आहे (वास्तव: 'घटनेनुसार ते शक्य नाही. अर्थात, अमेरिकन सिटिझन्सना आपल्याच देशाची घटना कितपत माहीत असते, हा प्रश्नच आहे') किंवा फ्लोरिडात ज्या १७ वर्षीय ट्रेवन मार्टिनला राहत्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये गोळी घालण्यात आली, तोच कसा या बाबतीत दोषी होता आणि ओबामाने कसं बिचाऱ्या झिमरमनला यात अडकवलं (वास्तव: 'प्रस्तुत खटला फ्लोरिडा राज्यात तेथील स्थानिक ज्युरींच्या समोर चालला. पोलिस डिस्पॅचने कारमधून बाहेर न पडण्याचा सल्ला दिल्यानंतरही झिमरमनने तो धुडकावून ट्रेव्हन मार्टिनचा पाठलाग केला होता; मात्र तो पुराव्याअभावी सुटला. या खटल्यानंतरही त्याला दोनदा त्याच्या मैत्रिणींवर हल्ला करण्याबद्दल आणि एकदा 'रोड रेज'च्या केसमध्ये अटक झाली आहे.') यासारख्या कपोलकल्पित गोष्टींवरही काही लोकांचा विश्वास बसू लागला.

घटनाक्रम २, ऑगस्ट २०१७:

- शार्लट्सव्हिल, व्हर्जिनिया शहरात व्हाईट सुप्रिमसिस्ट्स निओनाझींचा निषेध मोर्चा निघाला. या मोर्चात ओबामा आणि ज्यू धर्मीयांविरुद्ध* घोषणा देण्यात आल्या. (*निओनाझींचा इस्त्रायलला पाठिंबा असतो, तो ख्रिस्तजन्माने पुनीत झालेली धरती म्हणून. अमेरिकेतल्या ज्यूद्वेषी घटनांची संख्या ही मुस्लिमद्वेषी घटनांहून कितीतरी अधिक आहे.)
- या मोर्चात फक्त श्वेतवर्णीय सामील झाले होते. बव्हंशी हत्यारांसह आणि पेटते पलिते घेऊन.
- आर्मीतून निवृत्त झालेल्या एका माथेफिरू 'लोन वूल्फ'ने मोर्चाच्या विरोधकांवर गाडीने हल्ला केला. त्यात एक महिला ठार आणि वीसहून अधिक लोक जखमी झाले.

- जेम्स ॲलेक्स फिल्डला पोलिसांनी दुसऱ्या दिवशी अटक केली.
- जेम्स ॲलेक्स फिल्ड 'व्हॅनगार्ड अमेरिका' ह्या व्हाईट सुप्रिमसिस्ट, निओनाझी संघटनेतर्फे मोर्चात सामील झाला होता.
- या हल्ल्याचा सर्व थरातल्या, सर्वपक्षीय राजकारण्यांनी निषेध केला. एरवी ट्विटरवर ॲक्टिव्ह असणारे प्रेसिडेंट ट्रम्प मात्र बराच काळ शांत होते. बहुधा आपल्याच मालकीच्या गोल्फकोर्सची तुंबडी करदात्यांच्या पैशातून भरली जात असताना, २०२० सालच्या रिइलेक्शनची ॲड शूट करण्यात व्यग्र असावेत!
- मग अगदी मुळमुळीत शब्दांत, ट्रम्पने या घटनेचा जनरल टर्म्समध्ये निषेध व्यक्त केल्यावर अनेक रिपब्लिकन सिनेटर्सनी या शिखंडी वृत्तीचे वाभाडे काढले आहेत.

U.S. President Donald Trump's reelection campaign released its first television advertisement on Sunday...The ad's release comes amid intense criticism of Trump's response to the events in Charlottesville, Virginia, where a planned rally by white supremacists led to violence that killed a counter-protester.

Speaking on Saturday from his golf resort in Bedminster, New Jersey, Trump stopped short of calling the demonstrators "white supremacists" and instead criticized groups on "many sides." Even members of his own party said he had failed to adequately condemn those behind the violence.

हा वॉल स्ट्रीट जर्नलमधल्या (मर्डॉकच्या मालकीचे) घरच्या अहेराचा दुवा:
https://www.wsj.com/articles/gop-leaders-criticize-trumps-response-to-ch...

बाकी फॉक्स न्यूजवर हे प्रकरण डाऊनप्ले करण्याचा जो केविलवाणा प्रयत्न चालला आहे, तो प्रेक्षणीय आहे.

. . . . . . .

ट्रम्पच्या काळात कायदा-सुव्यवस्थेचे रामराज्य अवतरणार होते आणि अमेरिका ग्रेट होणार होती. कुणी सांगावं, कदाचित काही ट्रम्पसमर्थकांचा हाच निकष असेल!

गामा पैलवान's picture

14 Aug 2017 - 6:45 pm | गामा पैलवान

नंदन,

घटनाक्रमांच्या माहितीबद्दल आभार! :-)

त्यावरून अशीच एक घटना आठवली. १२ जून २०१६ रोजी ओर्लांडो येथे उमर मतीन नावाच्या एकांड्या माथेफिरूने गे नाईटक्लबात गोळीबार करून सुमारे पन्नास जणांना कंठस्नान घातलं. पोलिसांनी केलेल्या कारवाईत मतीन ठार झाला. इथवर ही घटना वरील दोहोंप्रमाणेच आहे.

मात्र नंतर जेम्स वेस्ली हॉवेल म्हणून एक युवक पुढे आला आणि त्याने आपण मतीनचा साथीदार असल्याचं सांगितलं. ओर्लांडो गोळीबार हा गे लोकांवर करण्याच्या अनेक हल्ल्यांच्या मालिकेतला पहिला हल्ला असून तो सी.आय.ए. ने योजला आहे असंही म्हणाला. मतीन मरणार नाही म्हणून आपल्याला आश्वस्त केलं होतं, पण प्रत्यक्षात मतीन मारला गेला. म्हणून मला सी.आय.ए. कडून संरक्षण हवंय असा हॉवेलने पोलिसांत अर्ज केला.

सांगण्याचा मुद्दा काय आहे की लोन वूल्फ म्हणजे साधारणत: सी.आय.ए. वा एफ.बी.आय.चा कोणीतरी चमचा असतो.

आ.न.,
-गा.पै.

पिलीयन रायडर's picture

18 Aug 2017 - 6:29 am | पिलीयन रायडर

मी ह्या संदर्भातल्या न्युज फॉलो करत आहे. मला खरंच माहिती नव्हतं की अजुनही जगात उघडपणे नाझी आणि व्हाईट सुप्रीमसीचा पुरस्कार करणारे लोक आहेत. ट्रम्पने तर ज्या पद्धतीने "दोन्ही बाजुंची चुक होती" असे म्हणलेय, ते पाहुन जाम आश्चर्य वाटलं.

रोज नवीन लेव्हलचे कारनामे करतो हा माणुस...

जेम्स वांड's picture

18 Aug 2017 - 7:58 am | जेम्स वांड

पण परवाच एका प्रतिसादावर इथलेच एक सभासद असलेले 'कॅप्टन जॅक स्पॅरो' ह्यांनी सगळ्यात शेवटी 'हाईल फ्युहर्रर' असे लिहिलेलं वाचल्याचे आठवते आहे लख्ख. असो.

जेम्स वांड's picture

18 Aug 2017 - 8:00 am | जेम्स वांड

त्याच प्रतिसादात हुकूमशाहीचा थेट चाहता वगैरे पण होतं लिहिलेलं, ते 'सारकॅजम' असल्यास माहिती नाही पण लिहिलं होतं खरं.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Aug 2017 - 8:14 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

It was Sarcasm.

इकडच्या मनमानी हुकुमशहांना उद्देशुन होतं ते.

अमितदादा's picture

14 Aug 2017 - 2:14 am | अमितदादा

India's Soaring Space Ambitions
इसरो चे भविष्यातील महत्वकांक्षी प्रोजेक्ट.. आदित्य-1 (सूर्य मिशन), चंद्रयान-2 (चंद्र मिशन), शुक्र orbitar.
भारताचे तसेच इतर देशांचे उपग्रह इसरो यशस्वी रित्या पाठवत आहे अभिमानाची गोष्ट आहे, कमीत कमी किंमतीत उपग्रह पाठवण्यासाठी भारत एक उत्तम बाजारपेठ बनत चाली आहे. आता एक इच्छा आहे की जसे एलॉन मस्क च्या स्पेसक्स ने advance reusable rocket falco-9 हे विकसित केले आहे तसे इसरो ने तयार करावे, अर्थात इसरो सुद्धा एका reusable vehicle वर काम करतेय पण त्याच design खूप वेगळं आहे. खलील दिलेल्या लेखात स्पसेक्स आणि इसरो च्या reusable रॉकेट आणि वेहीकल याची उत्तम माहिती दिली आहे।

SpaceX Falcon 9 vs ISRO’s Reusable Launch Vehicle

अभिजीत अवलिया's picture

14 Aug 2017 - 8:55 am | अभिजीत अवलिया

एम.पी.मिल झोपू योजनेच्या फाईलमध्ये गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता ह्यांनी 'मुख्यमंत्र्यांना अवगत केले' असा शेरा मारला होता असे समोर आले आहे. त्यामुळे जर मुख्यमंत्र्यांना अवगत केले होते तर ह्याचे दोन अर्थ निघतात.

एक जर मुख्यमंत्र्यांना माहीत होते तर ह्या योजनेतील अनुचित गोष्टी थांबवण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत?
किंवा दुसरी जर त्यांना योजनेतील अनुचित गोष्टी माहीत न्हवत्या तर प्रकाश मेहता ह्यांनी कशाच्या आधारावर मुख्यमंत्र्यांना अवगत केले असा शेरा मारला ?

ही जमीन संरक्षण खात्याची असल्याने वाढीव FSI देता येणार नाही हे माहीत असूनही तो देण्याचा निर्णय २००९ साली तत्कालीन आघाडी सरकारने दिला. त्यामुळे ह्या योजनेच्या बाबतीत ४*१०० रिले शर्यतीसारखे भ्रष्टाचाराचा बॅटन आघाडी सरकारने युती सरकारच्या हातात दिला असे म्हणावे लागेल.

http://www.loksatta.com/mumbai-news/devendra-fadnavis-orders-lokayukta-p...

अभिजीत अवलिया's picture

15 Aug 2017 - 9:39 am | अभिजीत अवलिया

श्रीलंकेचा एक डाव आणि १७१ धावांनी पराभव करून भारताने कसोटी मालिका ३-० ने जिंकली. परदेशात ३ किंवा जास्त सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याची बहुतेक ही पहिलीच वेळ भारताची. लंकेचा संघ भारताच्या तुलनेत कमजोर होता. तरी देखील मायदेशात सामने असल्याने लंका एक तरी सामना जिंकेल असे मला वाटत होते. पण ह्या पूर्ण सिरीज मध्ये श्रीलंकेने आपल्यापुढे सपशेल शरणागती पत्करली.

अत्रे's picture

16 Aug 2017 - 10:05 am | अत्रे

तुकाराम मुंढेंच्या कारकिर्दीवर एक मोठा इंग्रजी लेख https://yourstory.com/2017/08/tukaram-mundhe-ias-officer/

आनंदयात्री's picture

16 Aug 2017 - 8:30 pm | आनंदयात्री

लोकसत्तेने दिलेल्या रोचक शीर्षकामुळे इथे नोंद घ्यावीशी वाटली. अर्थात केलेला दंड हा सरकारच्या आणि रिलायन्सच्या कारातल्या तरतुदींचे एक्झेक्युशन असणार त्यामुळे मोदींचे इथे काही क्रेडिट नसायला हवे, नाहीका?

अंबानींच्या रिलायन्सला मोदी सरकारचा दणका; १७०० कोटींचा ठोठावला दंड

श्रीगुरुजी's picture

16 Aug 2017 - 9:46 pm | श्रीगुरुजी

http://indianexpress.com/article/india/us-designates-hijbul-mujahideen-a...

अमेरिकेने पाकिस्तानस्थित हिजबुल मुजाहिदीनला परकीय अतिरेकी संघटना असे अधिकृतरित्या जाहीर करून या संघटनेची खाती गोठविण्यात आली आहेत. दोन महिन्यांपूर्वी मोदी अमेरिकेला भेट देण्याच्या आदल्या दिवशी या संघटनेचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीनला आंतरराष्ट्रीय अतिरेकी असे अमेरिकेने घोषित केले होते. त्याच्या संघटनेवर बंदी घातल्याने त्याच्या अतिरेकी कारवायात नक्की किती फरक पडेल याविषयी साशंक आहे.

भाजप ची सरशी . भाजप २६ ,काँग्रेस १४ आणि अपक्ष ३ अश्या नगरपालिका ताब्यात . तरी भाजप च्या मागील वेळेपेक्षा ३ जागा घातल्या . मंदसौर येथे जे शेतकरी आंदोलन झाले होते आणि ५ शेतकरी दुर्दैवाने मृत्युमुखी पडले होते तेथे काँग्रेस निवडून आलेली आहे ३ हि जागांवर .

अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्डतात्या ट्रम्प यांनी अ‍ॅमॅझॉनवर पुढील ट्विट केले:

मोबाईल फोनमध्ये कॅमेरे आल्यामुळे कोडॅक कंपनी गाळात गेली त्याबद्दल मोबाईल फोनमध्ये कॅमेरे आणायच्या प्रकाराला दोष देणे जितके हास्यास्पद आहे तितकेच अ‍ॅमॅझॉनने रिटेल क्षेत्राला धक्का पोहोचवला हे म्हणून अ‍ॅमॅझॉनला दोष देणेही हास्यास्पद आहे. अ‍ॅमॅझॉनने नव्या बदलत्या काळानुरूप स्वतःचे वेगळे बिझनेस मॉडेल आणले. बिझनेसच्या जगतात नवीन कल्पना येणे, नवीन बिझनेस मॉडेल आणली जाणे आणि जुनी मॉडेल कालबाह्य होणे हे चालूच असते. किंबहुना अमेरिकेने इतकी वर्षे या प्रकाराला प्रोत्साहन दिले म्हणूनच अमेरिका ही 'Land of opportunities' बनली. आणि आता हा यडबंबू त्यालाच आव्हान देत आहे.

ट्रम्पतात्यांच्या या टिवटिवाटानंतर काल अ‍ॅमॅझॉनचा शेअरही आपटला.

>>> नवीन बिझनेस मॉडेल आणली जाणे आणि जुनी मॉडेल कालबाह्य होणे हे चालूच असते. किंबहुना अमेरिकेने इतकी वर्षे या प्रकाराला प्रोत्साहन दिले म्हणूनच अमेरिका ही 'Land of opportunities' बनली. आणि आता हा यडबंबू त्यालाच आव्हान देत आहे.
--- =)) =))
पण ट्रम्पतात्या एवढा खोलवर विचार करत नाहीत हो! 'वॉशिंग्टन पोस्ट'चा मालक बेझोस हाच अ‍ॅमेझॉनचाही मालक. वॉशिंग्टन पोस्ट दर आठवड्याला रशियन भेटीगाठींचा आणि एकंदरीत व्हाईट हाऊसमध्ये चाललेल्या सावळ्या गोंधळाचा पंचनामा करते; म्हणून पर्यायाने अ‍ॅमेझॉनवर राग!

ओबामाच्या काळात ब्रिटिश पेट्रोलियमला समुद्रातल्या तेलगळतीबद्दल दंड ठोठावला गेला; म्हणून त्याला बिझनेसद्वेष्टा म्हणणारे रिपब्लिकन्स आता कसे चिडीचूप आहेत.

अमितदादा's picture

17 Aug 2017 - 11:29 am | अमितदादा

आवरा यांना
पुष्पक विमान कवी कल्पना नसून वास्तव
एरवी ह्या बातमीची दखल घेतली नसती परंतु हे व्याख्यान एका अभियंत्याने एका अभियंत्याच्या संघटनेपुढं दिले आहे. काही बुलेट पॉईंट्स
१. रामाकडे हे विमान होते ते होतेच पण अलीकडच्या (रामाच्या तुलनेत) राजा भोज कडे हे विमान होत, त्यामुळे महमंद गझनीने आक्रमण केलं नाही
२. विमान एकदम ३६० अंशामध्ये वळू शकत होत. (कसे ते विचारू नका, जुने ग्रंथ काढा आणि वाचा )
३. जमिनीतील स्फोटके शोधण्यासाठी ग्रहगर्भ यंत्र
४. पॅराशूट सुद्धा होते
५. विषारी वायूपासून वाचण्यासाठी सत्याकर्षण यंत्र

विनोदी व्याख्यान होत बहुतेक :)

अभिजीत अवलिया's picture

17 Aug 2017 - 11:59 am | अभिजीत अवलिया

सकाळी हे पेपरमध्ये वाचले होते आणि भयानक हसलो.
तरी अजून रामसेतू, हनुमाने उचलून आणलेला द्रोणगिरी पर्वत यांच्यावर काही पुड्या आलेल्या नाहीत याचेच नवल वाटते.

गामा पैलवान's picture

17 Aug 2017 - 12:02 pm | गामा पैलवान

अमितदादा,

ते १८० अंश आहे. ३६० अंश मूळ लेखात म्हंटलंय ते चुकीचं आहे!

असो.

समरांगणसूत्रधार आणि वैमानिकशास्त्रात विमानांचे आराखडे दिले आहेत. शिवशंकर बापूजी तळपदे नामक विद्वानाने त्यानुसार विमान बनवून ते मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर १८९५ साली उडवलेलंही आहे. हो, राईट बद्च्या तब्बल दहा वर्षं आगोदर. या प्रसंगास बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड उपस्थित होते.

विनोदाचं म्हणंत असाल तर आज शाळाकॉलेजांत ढगांतल्या विजेविषयी जे काही शिकवलं जातं, ते एक ठार विनोद आहे.

आ.न.,
-गा.पै.

अमितदादा's picture

17 Aug 2017 - 12:40 pm | अमितदादा

@अभिजित अवलिया
:)
@गामा पैलवान
तुम्हाला आमची पूर्ण सहमती आणि अनुमोदन आहे याची खात्री बाळगा।

ते १८० अंश आहे. ३६० अंश मूळ लेखात म्हंटलंय ते चुकीचं आहे!

180 तर 180, फार मामुली चूक आहे हो ही, 360 अंशात फिरण्यासाठी बटन दोनदा दाबत असतील (180+180). हाय काय आणि नाय काय:)

कपिलमुनी's picture

17 Aug 2017 - 3:36 pm | कपिलमुनी

गणपतीचा हेड प्लांटेशन राहिला की ओ

श्रीगुरुजी's picture

17 Aug 2017 - 8:43 pm | श्रीगुरुजी

http://m.indiatoday.in/story/india-today-mood-of-the-nation-poll-10-big-...

'इंडिया टुडे'च्या षण्मासिक सर्वेक्षणानुसार आज निवडणूक झाली तर रालोआला ३४९ जागा (त्यात भाजपला २९८) व संपुआला ७५ (त्यात खांग्रेसींना ४७) जागा मिळण्याची शक्यता आहे.

http://www.loksatta.com/thane-news/dahi-handi-2017-organisers-reduce-pri...

दहीहंडी उत्सवावर गतवर्षी आलेले निर्बंध यंदा बऱ्याचप्रमाणात कमी झाले असले तरी ठाण्यात उत्सवाचा उत्साह कमी असल्याचे चित्र आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून कोटीच्या बक्षिसांची लयलूट करणाऱ्या आयोजकांनी यंदा हात आखडता घेतला आहे. त्यामुळे ठाण्यात मोठमोठय़ा दहीहंडय़ा दिमाखात लागणार असल्या तरी, यानिमित्ताने रंगणारी आर्थिक दिखाऊपणाची चढाओढ कमी झाल्याचे चित्र आहे.
पाचपाखाडी भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामार्फत उभारली जाणारी हंडी गेल्यावर्षीपासून आवरती घेण्यात आली आहे. शिवसेना नेत्यांनी उत्सव आयोजनातील स्पर्धा कायम ठेवली असली तरी यंदा मात्र बक्षिसांचे थर कमी केले आहेत.

हा नोटबंदीचा परिणाम असू शकेल काय ? मुख्य हंडी फोडणाऱ्या पथकाला काही लाखात आणि सलामी देणाऱ्या प्रत्येकाला काही लाख/हजार रुपयांचे बक्षीस दिले जात असे, तसेच रस्ता अडवून ध्वनिक्षेपकाच्या भिंती, दूरदर्शनवरील कलाकार, रशियन नृत्यांगनांचे 'सात्विक' नृत्य.... ह्या सगळ्याला पैसे उरले नाहीत की काय ?

अभिजीत अवलिया's picture

17 Aug 2017 - 10:22 pm | अभिजीत अवलिया

सध्या कोणतीही निवडणूक नाही हे मुख्य कारण असेल असे होण्यामागे.

कुठं असायच्या या????

- (सात्विक) मयुरेश

डँबिस००७'s picture

17 Aug 2017 - 10:57 pm | डँबिस००७

अभिजित अवलिया , कपिलमुनी , अमितदादा ,

तुम्हां महानुभाव लोकांनी विमान शास्त्र , गणपतीचे शीर, १०० कौरव वैगेरे सारख्या कल्पनांवर हसण एकदम मान्य,

पण काही उदाहरण तुमच्या समोर आहेत ज्या वर भारतातील कोणीही महानुभाव आपल तोंड उघडत नाही.
बेलुर कर्नाटकातील होयसाळ मंदिरात १०० च्या आसपास मोठे स्तंभ लावलेले आहेत, जे स्तंभ लेथ मशिनवर मशिनींग केल्याप्रमाणे
दिसतात . १००० वर्षांपुर्वी असे स्तंभ कसे बनवले असतील ह्यावर प्रकाश टाकावा !!

ह्याच मंदिरात काही मुर्त्या आहेत ज्याच्या एका कानातुन धागा टाकला तर तो दुसर्या कानातुन , तोंडातुन बाहेर येऊ शकतो, ह्याचे कारण ह्या मुर्त्या आतुन पोकळ आहेत.
त्या दगडी मुर्त्या आतुन पोकळ कश्या बनवल्या असतील ? आजच्या विज्ञानाला हे शक्य आहे का ?

Hoysala Temples

तुम्ही लिंक दिलेला व्हिडीओ Published on 9 Aug २०१७ म्हणजेच आत्ताच आलेला आहे. त्यामुळे "पण काही उदाहरण तुमच्या समोर आहेत ज्या वर भारतातील कोणीही महानुभाव आपल तोंड उघडत नाही." छाप वाक्ये टाकायचे काहीही कारण नाही.

"अमुक अमुक के बारमे मीडिया कुछ नही बोलता " टाईपची वाक्ये डोक्यात जातात!

थोडे थांबा, याबाबद्दल सुद्धा नेट वर माहिती सापडेल किंवा कोणीतरी एक्सप्लेनेशन देईल.

अभिजीत अवलिया's picture

18 Aug 2017 - 10:03 am | अभिजीत अवलिया

व्हिडिओ बघितला.
व्हिडिओ मध्ये जे मंदिर आहे ते स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे ह्यात वाद नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे भारतातील स्थापत्य कला ही पूर्वीपासून उत्तम विकसित होती. अगदी पुण्याजवळ सासवड परिसरात २-३ अतिशय पुरातन उत्तम मंदिरे आहेत ही स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानली जावीत. ९०० वर्षांपूर्वी मशीन वापरून काम करायला वीजच उपलब्ध न्हवती. त्यामुळे हे सर्व काम हाताने आणि कोणतेही यांत्रिक साधन न वापरताच केले गेले असणार.

अमितदादा's picture

18 Aug 2017 - 10:13 am | अमितदादा

माझं मत मांडतो , विस्कळीत असेल कदाचित, असो.
१. मी अध्यात्म आणि विज्ञान ह्या गोष्टी वेगवेगळ्या ठेवण्याचा प्रयत्न करतो, एखाद्या हार्डकोर विज्ञानवादी लोकांप्रमाणे (जे अध्यात्म, धर्म, चालीरीती मानत नाहीत अशे लोक ) माझी मते कठोर नाहीत. याला माझी सोय म्हणा हवेतर काही हरकत नाही, याला मी पूर्णपणे नास्तिक नसणे हे कारण आहे, पण नास्तिकवादाकडे झुकलेलो आहे. एखादा अध्यात्मिक मनुष्य जेंव्हा एखादी गोष्ट अध्यात्म किंवा धार्मिक म्हणून प्रेसेंट करतो तेंव्हा मी सहसा त्याला विरोध करत नाही (जो पर्यंत ती गोष्ट कुणाला हानी पोहचवत नाही तोपर्यन्त), मात्र तीच गोष्ट पुरावे नसताना विज्ञान म्हणून जेंव्हा प्रेसेंट केली जाते तेंव्हा मात्र मी विरोध करतो आणि करणारच.

२. आपल्या सगळ्या जुन्या गोष्टी थोथांड आहेत आणि खोट्या आहेत असे माझे म्हणणे किंवा विचार अजिबात नाहीत. आपल्या अनेक प्राचीन गोष्टी उदारणार्थ योग विद्या, काही आयुर्वेदिक गोष्टी, शिल्पकला, मंदिरे, प्राचीन लेणी, नालंदा विध्यापिठासारखी महाकाय विद्यापीठे, इत्यादी इत्यादी गोष्टी ह्या खऱ्या आहेत, याला पुरावे आहेत, आणि ह्या मी मान्य करतो. परंतु लक्षात घ्या ह्या गोष्टी मानवनिर्मित आहेत, त्या काळाच्या लोकांच्या तंत्रञान चे प्रतीक आहेत, हे विज्ञान आहे अध्यात्म न्हवे. यावर अधिक संशोधन होऊन गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत. तुम्ही दिलेलं उदाहरण ह्या कॅटेगरी मध्ये बसत.

३. आता काही अध्यात्मिक/धार्मिक गोष्टी ज्याला कोणतेही पुरावे उपलब्द नाहीत, उदारणार्थ पुष्पक विमान, जेनेटिक सायन्स, प्लास्टिक सर्जरी ह्या गोष्टी लोक विज्ञान म्हणून प्रेसेंट करणार असतील तर हे साफ चुकीचं आहे. मी मूळ प्रतिसादात उल्लेख केलेली गोष्ट ह्या कॅटेगरी मध्ये बसते. जे लोक प्राचीन भारतीय विमांनाचं design ग्रंथ वाचून सांगतात तस विमान बनवलं तर ते उडणार सुद्धा नाही हे अनेक शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे (मी स्वतः यावरती एक प्रदीर्घ लेख खूप वर्षांपूर्वी वाचला आहे).

४. फक्त ग्रंथात उल्लेख आहे म्हणून ती गोष्ट अस्तित्वात होती असे मानण्याचे काही कारण नाही जोपर्यन्त इतर पुरावे सापडत नाहीत तोपर्यत. उदारणार्थ लिओनार्डो दा विंची ने। हेलिकॉप्टर चे चित्र बनवलेलं म्हणून त्या काळी हेलिकॉप्टर होत किंवा तो हेलिकॉप्टर मधून फिरलेला असें दावे कोण करत नाही.

सरळ रेघ (प्रेरणा:संजय पवार) : सरसकट जून्या गोष्टींना विरोध नाही अध्यात्मातील किंवा धर्मातील काही गोष्टी पुरावे नसताना विज्ञान म्हणून मांडतात त्याला विरोध आहे.

तिरकी रेघ (प्रेरणा:संजय पवार) :जे पुष्पक विमानाचे दावे करतायत त्यांनी ते ग्रंथ वाचून हे विमान बनवून दाखवावं, मी माझा विरोध माघे घेइन. इतकेच काय पुष्पक विमानातून प्रवास सुद्धा कारेन करण शेवटी ते विमान वनस्पती तेल किंवा सूर्यप्रकाश यावर उडणारे असल्यामुळे त्याच तिकिट कमीच असणार.

श्रीगुरुजी's picture

18 Aug 2017 - 9:54 am | श्रीगुरुजी

विशाल सिक्कांनी राजीनामा दिला.

http://m.ndtv.com/india-news/vishal-sikka-resigns-as-managing-director-a...

गॅरी ट्रुमन's picture

18 Aug 2017 - 1:44 pm | गॅरी ट्रुमन

विशाल सिक्कांनी राजीनामा दिला याबद्दल कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी नारायण मूर्तींना दोष दिला आहे.

मूर्तींनी विशाल सिक्कांविरूध्द चालवलेले कॅम्पेन योग्य माहितीवर आधारीत नव्हते (मिसगाईडेड) असे कंपनीच्या बोर्डाने म्हटले आहे. विशाल सिक्कांच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या बोर्डाने खालील पत्रक जारी केले आहे. त्यातील काही निवडक मुद्दे पुढीलप्रमाणे :

१. Mr. Murthy’s letter contains factual inaccuracies, already-disproved rumours, and statements extracted out of context from his conversations with Board members.

२. The Board declines to speculate about Mr. Murthy’s motive for carrying out this campaign, including the latest letter. The Board believes it must set the record straight on the false and misleading charges made by Mr. Murthy because his actions and demands are damaging the Company and misrepresent its commitment to good corporate governance.

३. Mr. Murthy has demanded that the Board adopt certain changes in policy, else he will attack board members in the public, which threat was carried out when the Board did not acquiesce;

४. He has demanded that the Board appoint specific individuals onto the Board under similar threat, without appropriate disclosure and without regard to basic determinants of appropriateness or fit of the candidate for the role as a Board member;

५. He has demanded operational and management changes under the threat of media attacks;

६. Notwithstanding that the remuneration package of senior management was approved overwhelmingly by shareholders (including members of the promoter group), Mr. Murthy preferred his dictat to prevail with no place or tolerance for the outcomes of shareholder democracy.

यातील सहावा मुद्दा महत्वाचा आहे. विशाल सिक्का आणि टॉप मॅनेजमेन्टला वाजवीपेक्षा जास्त पॅकेज मिळते अशी टिका नारायणमूर्तींनी केली होती. तर त्यांना मिळणारे पॅकेज हे या क्षेत्रातील या आकारमानाच्या कंपन्यांच्या टॉप मॅनेजमेन्टला इतर कंपन्यांमध्ये मिळते तेवढेच पॅकेज आहे असे कंपनीचे म्हणणे होते. आणि अर्थातच असे लठ्ठ पॅकेज सुखासुखी मिळणार्‍यातले नव्हते तर विशाल सिक्कांना तशीच टारगेट दिली होती असे हीकंपनीचे म्हणणे आहे. तसेच विशाल सिक्कांचे फेब्रुवारी २०१७ मध्ये पॅकेज वाढविले ते शेअरधारकांनी मान्यता दिल्यावरच वाढविले होते. असे असताना 'मी म्हणेन तेच खरे' असे नारायणमूर्तींनी म्हणणे म्हणजे दुराग्रह झाला.

एकूणच नारायणमूर्तींची अवस्था लालकृष्ण अडवाणींसारखी झालेली दिसते. मी अगदी पहिल्या दिवसापासून पक्षाला वाढविले आहे म्हणून मी म्हणतो तसेच व्हायला हवे असे अडवाणी म्हणतात . तर या म्हणण्यातत पक्षाऐवजी कंपनी लिहिले तर ते म्हणणे नारायणमूर्तींचे आहे असे दिसते.

अभिजीत अवलिया's picture

18 Aug 2017 - 2:10 pm | अभिजीत अवलिया

हेच म्हणणार होतो.

अत्रे's picture

18 Aug 2017 - 2:22 pm | अत्रे

कम्पन्या आपली धुणी पब्लिकमध्ये का धुतात? मागे त्या टाटा प्रकरणातही असेच झाले होते. सामान्य माणसाला काय फरक पडतो हे सगळं जाणून घेऊन ?

श्रीगुरुजी's picture

18 Aug 2017 - 3:31 pm | श्रीगुरुजी

एकूणच नारायणमूर्तींची अवस्था लालकृष्ण अडवाणींसारखी झालेली दिसते. मी अगदी पहिल्या दिवसापासून पक्षाला वाढविले आहे म्हणून मी म्हणतो तसेच व्हायला हवे असे अडवाणी म्हणतात . तर या म्हणण्यातत पक्षाऐवजी कंपनी लिहिले तर ते म्हणणे नारायणमूर्तींचे आहे असे दिसते.

या दोन्ही परिस्थितीत थोडा फरक आहे. अडवाणी शेवटपर्यंत पक्षाच्या व्यवस्थापनात होते. अगदी २०१३ मध्ये मोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केले तेव्हा सुद्धा ते पक्षाच्या कार्यकारीणीत होते. त्यामुळे आपले मत मांडण्याचा त्यांना अधिकृत अधिकार होता. त्यावेळी त्यांनी पूर्वानभावरून काही मते मांडली व काही सावधगिरीचे इशारे दिले, त्यात तसे काही चुकीचे नव्हते.

मूर्तींची परिस्थिती वेगळी आहे. ते सध्या (किंबहुना ऑगस्ट २०१४ पासून) इन्फोसिसमध्ये कार्यरत नाहीत. ते आता फक्त एक भागधारक आहेत, जसे इतर अनेक जण आहेत. ते संचालक मंडळ किंवा सल्लागार अशा कोणत्याही भूमिकेत नाहीत. त्यांनी स्वतःहून अध्यक्षपद सोडून आपले पद सिक्कांना दिले होते. त्यामुळे सिक्कांनी कंपनी कशी चालवावी हे त्यांनी बाहेरून सांगणे चुकीचे होते. भागधारक या नात्याने इतर भागधारकांना जेवढे अधिकार असतात तेवढे त्यांना आहेतच. परंतु भागधारकांना कंपनीची धोरणे ठरविण्याचा अधिकार नसतो. मूर्तींना आपले आक्षेप मांडण्यासाठी भागधारकांची वार्षिक सभा उपलब्ध होती. स्वतः कंपनीच्या कोणत्याही पदावर नसताना बाहेरून सल्ले देणे हे चुकीचे होते. यालाच "उंटावरून शेळ्या हाकणे" असे म्हणतात. एकतर तुम्ही कंपनीत एखादे पद स्वीकारा व ते स्वीकारून आपल्या मताप्रमाणे कंपनी चालवा किंवा जर तुम्ही कंपनी स्वत:हून सोडली आहे तर कंपनीच्या कारभारात बाहेरून हस्तक्षेप करू नका. त्यांचे वागणे हे सोनिया गांधींसारखे होते. सरकारमध्ये जायचे नाही पण पंतप्रधानांना स्वतः सांगेल ते करायला लावायचे.

मूर्ती व इतर संस्थापक-संचालक हे फारशी उधळपट्टी करणारे नव्हते. परंतु सर्व संस्थापक-संचालकांनी कंपनी सोडल्यानंतर सिक्का व जे इतर नवीन संचालक आले ते बर्‍यापैकी खर्चिक आहेत. सिक्का काही वेळा चार्टर्ड विमानाने हिंडायचे. कायम सप्ततारांकीत हॉटेलमध्ये वास्तव्य असायचे. हे मूर्तींना खटकत होते. एक वरीष्ठ अधिकारी राजीव बन्सल मागील वर्षी सोडून जाताना सिक्कांनी त्याला ३० कोटी रूपयांचे सिव्हिअरन्स पॅकेज दिले होते ज्याला मूर्तींनी आक्षेप घेतला होता. त्यांच्यातील बर्‍याच मतभेदांचा आज कळस झाला. त्यातूनच सिक्कांनी राजीनामा दिला. सिक्का बरोबर वागत होते असे मी म्हणत नाही. परंतु एकदा कंपनीतून पूर्णपणे बाहेर आल्यानंतरसुद्धा आपल्या मताप्रमाणेच इतरांनी वागावे ही मूर्तींची अपेक्षा योग्य नव्हती. त्यांचा सिक्कांबद्दल इतका आक्षेप होता तर वार्षिक बैठकीत त्यांनी नवीन अध्यक्ष आणण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते किंवा पुन्हा एकदा स्वतः अध्यक्षपदाची धुरा स्वतःच्या खांद्यांवर घ्यायला हवी होती.

आजच्या राजीनाम्यानंतर सर्व संचालक मंडळ मूर्तींविरोधात एक झाले होते. काही वर्षांपूर्वी अ‍ॅपलचा संस्थापक असलेल्या स्टीव्ह जॉब्जची स्वतःच्याच कंपनीतून हकालपट्टी झाली होती. आजची परिस्थिती साधारणपणे तशीच आहे.

सिक्कांच्या जागी कोण येईल हे सांगता येणे अवघड आहे. त्यांच्या जागी पुन्हा एकदा नंदन निलेकणी यावेत अशी माझी इच्छा आहे. त्यांचे वयही फार जास्त नाही (मूर्ती ७१ वर्षांचे आहेत तर नंदनचे वय ६२ आहे). २०१४ पासून नंदनकडे फारशी नवीन जबाबदारी नाही. त्यामुळे ते परत आल्यास चांगले होईल.

आज इन्फोसिसच्या समभागाची किंमत १०% अधिक किंमतीने घसरली आहे. कालचा बंद भाव १०२० होता. आज तो ९०३ पर्यंत खाली जाऊन पुन्हा ९२० पर्यंत आला आहे. ९२० ला हा समभाग अत्यंत आकर्षक किंमतीत आहे.

उद्या इन्फोसिसचे समभाग बायबॅक करण्याबद्दल संचालक मंडळाची सभा होणार आहे. आजच्या घडामोडींमुळे ती सभा कदाचित पुढे ढकलली जाईल.

इन्फोसिसमध्ये ७-८ वर्षे काम केल्याने व इन्फोसिसचा समभागधारक असल्याने या घडामोडींमध्ये खूप रस आहे.