सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
11 Aug 2017 - 4:30 pm | मोदक
मोहितेंचे पण ट्रक फिरायला लागले मिपावर..! :))
11 Aug 2017 - 4:38 pm | वरुण मोहिते
का उगाच काहीतरी संदर्भ आणि बोलायचे ?
11 Aug 2017 - 4:48 pm | मोदक
तुम्हाला अडचण आहे ना भाजपाच्या बाजूने बोलणार्यांची..? मग भाजपाच्या ज्या गोष्टी आवडत नाहीत त्यावर एक धागा टाका इतके सोपे सुचवत आहे.
जमेल का..?
11 Aug 2017 - 4:57 pm | गॅरी ट्रुमन
मोदकराव,
तुम्हाला (आणि इतर सगळ्यांनाच) एक विनंती आहे. ताज्या घडामोडी या धाग्यावर १५० पेक्षा जास्त प्रतिसाद आल्यास नवा धागा सुरू केला जातो. त्यामुळे असल्या खोडसाळ आणि निरर्थक प्रतिसादांना उत्तरे देऊन अशा सदस्यांना अधिक उसकावून धाग्यातील खरोखर ताज्या घडामोडी आणि त्या अनुषंगाने होणार्या चर्चेतील १५० प्रतिसादांची जागा व्यापू नये ही विनंती. त्यातून निष्पन्न शून्य होणार आहे. आणि तसेही मुद्द्यावर आधारीत चर्चा करू शकणार्यांनाच उत्तरे देणे तसेही श्रेयस्कर आहे, नुसते हवेतले बुडबुडे सोडणार्यांना नाही.
11 Aug 2017 - 4:59 pm | वरुण मोहिते
उत्तरे द्या .ते खोडसाळ वैग्रे प्रतिक्रिया जुन्या झाल्या
18 Aug 2017 - 8:17 am | जेम्स वांड
तुमचे प्रतिसाद विलक्षण वाचनीय अन माहितीचा सातआवाजी बार असावा तसे खच्चून ज्ञान भरलेले असतात, मी तर बुआ फॅन आहेच तुमच्या लेखनाचा, मी काय म्हणतो, तुम्ही द्याच ह्या मोहितेंना उत्तरे, मुद्दा ती उत्तरे त्यांना पटतील की नाही हा नाही तर आम्हाला सकस काहीतरी वाचायला मिळेल ही आशा अन सुप्त मनीषा होय. :)
त्यासाठी मी एक सामान्य सभासद म्हणून धागाकर्ते श्री गुरुजी ह्यांना हात जोडून विनंती करतोय की ह्या धाग्यापुरते १५० कॉमेंट्सचा नियम तात्पुरता शिथिल करून ती सीमा २००-२२० प्रतिसाद इतकी करावी, असे झाल्यास आपला सर्वांचाच फायदा आहे, कारण आपल्याच ज्ञानात काहीतरी नवी भर पडणार आहे
ट्रुमनजींचा थेट चाहता
वांडो.
11 Aug 2017 - 5:20 pm | विशुमित
मिपावर सुद्धा गिनेचुनेच भाजप समर्थक राहिले आहेत आणि तेच फक्त प्रतिसाद देत असतात. इतर सन्मानीय सदस्य आणि वाचक (माझे ओळखीचे) फक्त ते वाचायला सुरवात करतात. ७-८ वाक्य वाचतात, तोच तोच पणा आढळला की वाचणे अर्धवट सोडून देतात. त्यावर कोणाचा उप प्रतिसाद आहे का हे तपासतात जे १-२ ओळीचेच असतात. एकंदरीत त्या पर्टिक्युलर विषयाबाबतची समरी. प्रतिसाद लेखकांकडे असणारे ज्ञान, माहितीचा प्रचंड साठा, उत्कृष्ट मांडणी, काही वेळा निष्पक्षता आणि सुसंस्कृत भाषेचा उपयोग या सर्व गुणांमुळे त्यांच्या बद्दल प्रचंड आदर आहे. कधी कधी शंका येते की हा त्यांचा व्यवसाय असावा (चूकभूल देणे घेणे). पण...
या लेखकांचे समर्थक २ ओळीचे प्रश्न घेऊन उप प्रतिसाद देणाऱ्यांच्या मागे मागे सायकल घेऊन फिरत असतात. उलट त्यांना प्रश्न विचारले की त्यांच्या कडे वेळ नसतो.
11 Aug 2017 - 5:57 pm | मोदक
गिनेचुनेच समर्थक आहेत मग इतका का त्रास होतो आहे..? तुम्हाला जे काही बोलायचे आहे ते मुद्द्यानिशी बोला इतकेच सांगत आहे.
तुम्हालाही हा शेवटचा प्रतिसाद.
11 Aug 2017 - 4:36 pm | वरुण मोहिते
भाजप विरोधी सहन होतच नाही काही .असो माधव चितळे ,रघुराम राजन ,पांघडिया इत्यादी अनेक लोक का त्याची साथ सोडत आहेत पहा . त्यावर उत्तर द्या .
11 Aug 2017 - 4:44 pm | वरुण मोहिते
४ दिवसांपूर्वीची गोष्ट आहे . महागाई संपवेन . पाकिस्तान प्रश्न सोडवेन ह्या घोषणा देऊन आले सत्तेवर अजून अनेक घोषणा दिल्या आहेत .काहीच पूर्ण करता आले नाही .बस आश्वासने . भाजप वाले तर कोणाचे काय असेल कि काय फालतू भाषा वापरतात सुशिक्षित लोक . असो . त्यावरून काय राग आहे कळते .
11 Aug 2017 - 4:50 pm | अनुप ढेरे
महागाई तर कमी झाली ब्वॉ. १.५% आहे सद्ध्या. २०११-१२ मध्ये १०% होती. (प्लीज टोमॅटो महागलेत म्हणु नका. )
11 Aug 2017 - 5:08 pm | arunjoshi123
बाकी मोदींना "पाकिस्तानची समस्या" सोडवण्यात का रस असावा?
12 Aug 2017 - 4:02 am | थिटे मास्तर
मि काय म्हणतो मोहिते साहेब
काहि लोक मिपावर असेहि आहेत कि जे सद्य सरकारच्या काहि निर्णयांचे जिथे समर्थन करतात तिथे त्यांना वाटतय कि सरकार काहि चुकिचे निर्णय घेते हेच लोक सरकार किंवा भाजप वर आगपाखड हि करतात. पण हे लोक सुद्धा तुमच्या माझ्या सारखे सामान्य मतदारच आहेत हो. कुठल्याहि प्रकारचे निष्पक्ष राहण्याचे ढोंग ह्या लोकांना जमत नाहिये आणि म्हणुन भाजपा चा झेंडा बिनदिक्कत खांद्यावर घेवुन हिंडतात.
पण तुम्हि वर जे मुद्दे मांडलेत....
1) महागाई :- सर अहो गेल्या किती तरी वर्षात ईतका कमि महागाई निर्देशांक नव्हता.
२) पाकिस्तान :- आपल्या एक्झँक्ट काय अपेक्षा आहेत ह्या बाबतित ? युद्ध ? अरे दादा ईतक्या बेकार पाचर मारल्यायत सद्द सरकारने कि पाकिस्तान तरी भारताशि युध्द सुरु करण्याच्या लायकिचा नाहि र्हायलाय. काश्मिर च्या बातम्यांवर लक्ष ठेवुन असाल तर तिथली प्रगती सुध्दा लक्षात येईल कसा आतंकवादि दिसला की ठोकतयत. हुर्रियत च्या चौकशीत तर बहोत पुराने पापीयो के राझ खुलनेवाले है. आणि चिन ची अवस्था तर अशी झालीय ना ऊगलते बन रहा है न निगलते.
मोहिते साहेब स्वकर्तुत्वाने तुम्हि नेहमि देश विदेश फिरता थोड्या आंतराष्ट्रिय घडामोडींवर हि लक्ष देत चला हि एक विनंति.
विरोध करायचा म्हणजे मुद्दे लागतात हो आणि त्याला तडिस नेणार नेत्रुत्व लागत. ढिगभर मुद्दे आयते दिले आहेत ३ वर्षात भाजप ने पण मैदानात असा कोणीच नाहि की किमान आठदिवस तरी एक मुद्दा धरून राहिला असेल. वेमुला झाल चला जेएनयु.......ते चला मध्य प्रदेश .... कि चले नानि के घर.
11 Aug 2017 - 4:56 pm | वरुण मोहिते
झाली नक्की ?
11 Aug 2017 - 8:33 pm | तुषार काळभोर
१. व्यापारी आस्थापना (दुकाने, रेस्टॉरंटस इ) २४ तास उघडे राहू शकतात.
२. सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदी गीतकार प्रसून जोशी यांची निवड झाली आहे.
11 Aug 2017 - 9:00 pm | तुषार काळभोर
पण ती महत्वाची आहे की नाही माहिती नाही. शिवाय त्या बातमीचा अर्थ स्वतः साहेबांनाही माहिती नसेल यावेळी.
युपीए च्या बैठकीला शरद पवार गैरहजर
11 Aug 2017 - 9:49 pm | अनुप ढेरे
पवार साहेब एन्डिएमध्ये गेले तर इथल्या पवारभक्तांची प्रतिक्रिया बघण्यासारखी असेल.
11 Aug 2017 - 10:22 pm | अभिजीत अवलिया
तसेच Naturally corrupt party असे ज्या पक्षाला पंतप्रधान २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात संबोधत होते त्याला कळपात घेतल्याबद्दल मोदीभक्तांची (कुणी असल्यास) प्रतिक्रिया बघण्यासारखी असेल.
11 Aug 2017 - 11:02 pm | श्रीगुरुजी
युपीए च्या बैठकीला शरद पवार गैरहजर
चर्चेत राहण्यासाठी पवार असे करीत असतात. त्यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. पूर्वी ते असेच अचानक बाळ ठाकरेंची भेट घ्यायचे. आता ते अचानक मोदींची भेट घेतात. अचानक ब्राह्मणविरोधी काडी टाकतात. काही तरी करून स्वतःचे महत्व वाढावे व आपण अजून संपलेलो नाही हे दाखविण्यासाठी त्यांना असे करावे लागते. ते बाहेर पडले तरी संपुआला फरक पडणार नाही व रालोआला त्यांची गरज नाही.
11 Aug 2017 - 11:21 pm | अमितदादा
महाराष्ट्रातील भाजप सरकार ला सुरवातीला राष्ट्रवादीने इंडिरेक्टली मदत केलेली विसरलात का की गुजरात मध्ये राष्ट्रवादीच्या आमदाराने भाजप ला राज्यसभे ला मदत केली हे विसरलात. पुण्या सारख्या अनेक शहरात राष्ट्रवादी चे बागलबच्चे भाजप घेऊन पोसतोय हे विसरलात. की मोदी जाहीर सभेत येऊन पवार हे माझे राजकीय गुरु आहेत हे म्हणलेलं विसरलात.
कदाचित आम्ही काही तरी विसरलोय ते म्हणजे भाजप ही वाल्याला वाल्मिकी बनविण्याची फॅक्टरी आहे.
11 Aug 2017 - 11:30 pm | श्रीगुरुजी
महाराष्ट्रातील भाजप सरकार ला सुरवातीला राष्ट्रवादीने इंडिरेक्टली मदत केलेली विसरलात का की गुजरात मध्ये राष्ट्रवादीच्या आमदाराने भाजप ला राज्यसभे ला मदत केली हे विसरलात. पुण्या सारख्या अनेक शहरात राष्ट्रवादी चे बागलबच्चे भाजप घेऊन पोसतोय हे विसरलात. की मोदी जाहीर सभेत येऊन पवार हे माझे राजकीय गुरु आहेत हे म्हणलेलं विसरलात.
१) भाजपने न मागता राष्ट्रवादीने पाठिंबा जाहीर केला होता. भाजपने तो स्वीकारला नव्हता.
२) गुजरातमध्ये तसेच घडले आहे.
३) पुण्यात राष्ट्रवादीचे कोणते बगलबच्चे भाजप पोसतोय?
४) मोदींच्या पवारस्तुतीमागील उपरोध लक्षात आलेला दिसत नाही.
11 Aug 2017 - 11:40 pm | अमितदादा
1. म्हणजे यात आतमध्ये काही गुप्तगु झाले नसतील असे म्हणायचे आहे का. काहीही हा श्री...गुरुजी
3. लक्ष्मण जगताप कोण आहेत?
4. उपरोध? काय सांगता. म्हणजे हे असे झाले की भाजप ची काही आश्वासने हे जुमले होते आणि काही टीका/स्तुती ह्या उपरोध होत्या. यापुढे भाजप ने आश्वासन किंवा टीका करताना disclaimer द्यावं एक मोठं स्टार करून, की आम्ही जे आता बोलतोय ते भविष्यात जुमला किंवा उपरोध म्हणून धरावा।
(हलके घ्या ही विनंती)
11 Aug 2017 - 11:59 pm | श्रीगुरुजी
१) नक्की काय गुप्तगु झाले?
३) लक्ष्मण जगताप म्हणजे अनेक बगलबच्चे? आणि राष्ट्रवादीतल्या भाजपच्या बगलबच्च्यांचं काय?
४) आयुष्यभर राजकारण करून ज्याला ४-५ जिल्ह्यांच्या पलिकडे अस्तित्व नाही, तो देशात बहुमत मिळविणाऱ्याचा गुरु असेल तर ईशांत शर्माला डेल स्टेनचा गुरु समजावे लागेल.
12 Aug 2017 - 12:38 am | अमितदादा
1. 1. मला नाही माहीत काय झाले म्हणून, मात्र काहीतरी गुप्तगु झाले असणार हे माझे मत आहे. याचा पुरावा काय तर काही नाही मग संशय का तर दोन्ही पक्षाचे परस्थितिजन्य एकमेकांना फायदा होईल असे वागणे. अजित पवार ना अटक करणार असे विनोद तावडे म्हणाले होते कधी होणार अटक, कधीच नाही कारण दोन्ही पक्षाचं एकमेकांना धरून असणे. या विधानाला पुरावा काय तर काही नाही माझे आतापर्यंत चे वाचनातून बनवलेलं मत, जसे भाजप बाबत तुमचं मत आहे तस.
2. 2. लक्ष्मण जगताप तुम्हाला छोटी असामी वाटली काय? राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड मधील कर्तेधरते होते ते, फक्त ते नाहीत आले भाजपात तर त्यांना मानणाऱ्या नगरसेवकांना घेऊन आलेत ते. हे आहेत राष्ट्वडीचे बच्चे. बरं हे एक उदाहरण आहे का तर नाही सांगलीचे खासदार संजय काका पाटील, नंदुरबार चे भ्रष्ट मंत्री विजयसिंह गावित आणि खासदार हिना गावित तसेच यांच्या कार्यकर्त्यांची फळी आहे अशी भाजप मध्ये आलीय। आठवल्यास आणखी उदाहरणे देतो।
3. 3. अचरेकरांची शतके सचिन पेक्षा जास्त आहेत काय? तुमचं अरगुमेन्ट अयोग्य आहे, परंतु मला हे माहीत आहे की पवार हे काय मोदींचे गुरू नाहीत पण यातून सांगायचा मुद्दा असा की मोदी त्यांचा दृष्टीने भ्रष्ट पक्ष किंवा त्यांचे प्रमुख याच्याशी राजकारणासाठी हातमिळवणी करू शकतात. BJP is no more a party with difference.
12 Aug 2017 - 8:55 am | श्रीगुरुजी
मला नाही माहीत काय झाले म्हणून, मात्र काहीतरी गुप्तगु झाले असणार हे माझे मत आहे. याचा पुरावा काय तर काही नाही
I rest my case.
लक्ष्मण जगताप तुम्हाला छोटी असामी वाटली काय? राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवड मधील कर्तेधरते होते ते, फक्त ते नाहीत आले भाजपात तर त्यांना मानणाऱ्या नगरसेवकांना घेऊन आलेत ते. हे आहेत राष्ट्वडीचे बच्चे. बरं हे एक उदाहरण आहे का तर नाही सांगलीचे खासदार संजय काका पाटील, नंदुरबार चे भ्रष्ट मंत्री विजयसिंह गावित आणि खासदार हिना गावित तसेच यांच्या कार्यकर्त्यांची फळी आहे अशी भाजप मध्ये आलीय। आठवल्यास आणखी उदाहरणे देतो
अशी येजा प्रत्येक पक्षातच सुरू असते. राष्ट्रवादीत तर सेना व भाजपच्या बगलबच्च्यांची भाऊगर्दी आहे.
अचरेकरांची शतके सचिन पेक्षा जास्त आहेत काय? तुमचं अरगुमेन्ट अयोग्य आहे, परंतु मला हे माहीत आहे की पवार हे काय मोदींचे गुरू नाहीत पण यातून सांगायचा मुद्दा असा की मोदी त्यांचा दृष्टीने भ्रष्ट पक्ष किंवा त्यांचे प्रमुख याच्याशी राजकारणासाठी हातमिळवणी करू शकतात. BJP is no more a party with difference.
आचरेकर म्हणजे ईशांत शर्मा! धन्य आहे.
मोदींनी पवारांशी नक्की कोठे व कशी हातमिळवणी केलीये ते सांगता का जरा (स्वत:चे मत नको. प्रत्यक्ष उदाहरणे द्या.).
परंतु मला हे माहीत आहे की पवार हे काय मोदींचे गुरू नाहीत
तेच सांगितले मी. मोदी जे म्हणाले ते उपरोधिक होते. काही भाबडे त्यास सत्य समजून आगपाखड करतात.
12 Aug 2017 - 9:26 am | अमितदादा
हे जर तुम्हाला माहित होतं तर पहिल्या प्रतिसादात का विचारलं की कुठे आहेत की बागलबच्चे म्हणून ? याचा अर्थ उघडे पडल्याशिवाय चूक मान्य करायची नाही. तुमचं वाक्य हेच सिद्ध करतंय जे मी म्हणतोय ते की bjp is no more party with difference.
महाराष्ट्रातील आणि गुजरात मधील पाठिंबा अजित पवार यांची चोकशी थंडावणे ही काय माझी उदाहरणे आहेत काय? या गोष्टी का होतायत हे सामान्य लोकांना कळतंय जरी बाहेर पुरावे नसले तरी, तुमच्या सारख्या भाजप समर्थकांना हे दैवी योगायोग वाटणार किंवा राष्ट्वडी स्वतःहून भाजप वर उपकार करतेय असे वाटणार यात काय शंका नाही.
याच थोडं स्पष्टीकरण देतो, मोदी नि पावरबाबत exagration केलं हे मान्य, परंतु पवार हे मोदी ना आदर्श आहेत हे नक्की याच करण जेंव्हा upa च सरकार होत तेंव्हा पवार सोडून सगळ्या केंद्रीय मंत्र्यांनी मोदी शी असहकार पुकारला होता. पवार यांनी मोदींची शेती आणि अन्न प्रशासन विभागाच्या संदर्भातील कामे केली होती, हे मोदी नि मान्य केलंय. तसेच गरज भासल्यास आपण पवारांचा सल्ला घेतो हे ही मान्य केलाय. पवार आणि मोदी यांचा असणार सौख्य चा भाजप आणि राष्ट्रवादी च्या love and hate relationzhip च गुपित आहे. लोक मोदींच स्टेटमेंट आहे असे घेऊन आगपाखड नाही करत तर त्यांचं निवडणुकी आधीच टीका आणि।निवणुकी नन्तर च सौख्य आणि जवळीक पाहून टीका करतायत हे कधी तरी लक्षात घ्या।
12 Aug 2017 - 9:49 am | अभिजीत अवलिया
भाजप राष्ट्रवादी संबंधावर ताज्या घडामोडी ८ ह्या भागात देखील माझी आणि श्रीगुरुजी ह्यांची चर्चा झाली होती. पण पडद्यामागे गुफ्तगु न होता आणि भाजपाने न मागता देखील राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता ह्या आपल्या भाबड्या मतावर ते ठाम आहेत. आणि जरी त्यांनी न मागता पाठिंबा दिला तरी भाजपाने का घेतला ह्याचे कोणतेही उत्तर त्यांच्याकडे नाही.
कोणतीही चर्चा करताना मी दोनच गोष्टी लक्षात ठेवतो. एक म्हणजे माणसाची मते शक्यतो कधीही बदलत नाहीत आणि दुसरी म्हणजे झोपलेल्या माणसाला उठवता येते झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही.
12 Aug 2017 - 10:07 am | अमितदादा
अगदी अगदी.
राजकारणामध्ये मोठी लोक आपल्यासारख्या सामान्य लोकांना फाट्यावर मारून स्वतःचा सोयीनुसार निर्णय घेत असतात हे वेळोवेळी सिद्ध झालाय (ताज उदाहरण नितीश कुमार), भाजप हि राजकारण्यांचे याच माजलेल्या मनोवृत्तीचा प्रतिनिधीत्व करणारा एक पक्ष आहे.
नितीश कुमारवर बिहार मध्ये टीका करताना मोदी नि त्यांचा dna मध्ये मिलावट आहे असे काहीतरी म्हंटले होते आणि मते मागितली होती, आता मोदी नि जेनेटिक science वापरून मिलावट दूर केली काय ? शेवटी सत्ता महत्वाची तत्वे आणि विचारसरणी हि बोलायची गोष्ट आहे भाजप साठी सुद्दा हे आता भाजपेयीनी मान्य करावे.
12 Aug 2017 - 10:33 am | अभिजीत अवलिया
हो शक्य आहे. तसे पण जेनेटिक science आपल्याकडे पूर्वीपासून होतेच म्हणा. कर्णाचा जन्म किंवा गणपतीला हत्तीचे तोंड बसवले गेले होतेच.
http://www.thehindu.com/todays-paper/tp-in-school/genetic-science-existe...
त्यामुळे रक्तातील मिलावट दूर करणे म्हणजे किस झाड की पत्ती.
12 Aug 2017 - 2:40 pm | श्रीगुरुजी
भाजप राष्ट्रवादी संबंधावर ताज्या घडामोडी ८ ह्या भागात देखील माझी आणि श्रीगुरुजी ह्यांची चर्चा झाली होती. पण पडद्यामागे गुफ्तगु न होता आणि भाजपाने न मागता देखील राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता ह्या आपल्या भाबड्या मतावर ते ठाम आहेत. आणि जरी त्यांनी न मागता पाठिंबा दिला तरी भाजपाने का घेतला ह्याचे कोणतेही उत्तर त्यांच्याकडे नाही.
यात भाबडे काय आहे? जर भाजपने स्वतःहून राष्ट्रवादीचा पाठिंबा मागितला होता अशी खात्रीशीर माहिती असेल तर त्याचे संदर्भ द्यावेत ही विनंती. जर त्यांच्यात काही गुप्तगु झाले असेल तर त्याची माहिती द्यावी ही विनंती. राष्ट्रवादीने स्वतःहून पाठिंबा दिला होता, तरीही भाजपने तो स्वीकारलेला नव्हता ही वस्तुस्थिती आहे. यापेक्षा काही वेगळे झाले असेल तर त्याचे संदर्भ द्यावेत ही विनंती.
कोणतीही चर्चा करताना मी दोनच गोष्टी लक्षात ठेवतो. एक म्हणजे माणसाची मते शक्यतो कधीही बदलत नाहीत आणि दुसरी म्हणजे झोपलेल्या माणसाला उठवता येते झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही.
माझे देखील हेच मत आहे.
12 Aug 2017 - 11:58 am | वरुण मोहिते
होते , अमेरिकेने व्हिसा नाकारलेले तेव्हा इस्राईल ला पवार साहेब त्यांना शिष्टमंडळातून घेऊन गेले , अदानी हे १९८८ पासून पवार आणि प्रफुल भाई पटेल ह्यांच्या संपर्कात होते . त्याची मदत मोदी ह्यांना झाली . उगाच नाही आल्या आल्या पदमविभूषण , अगदी बारामती ला जाऊन भेटी , दिल्लीत भेटी , पवार ह्यांचा सल्ला नेहमी घेतो हे जाहीर सांगितले . पवार ह्यांचा काही फायदा आहे का आता मोदींना . तरी सांगत आहेत . भाबड्या आशेवर ,संघ , मोदी कसे स्वच्छ ह्या विश्वासावर असलेल्याना शुभेच्छा .
12 Aug 2017 - 12:27 pm | अनुप ढेरे
सो पवारांशी संबंध असणे हे स्वच्छ नसल्याचं प्रतीक आहे?
12 Aug 2017 - 12:52 pm | वरुण मोहिते
असतील तर गेल्या ५० वर्षांपासून पवार ह्यांच्या विरोधात पुरावा द्या .
12 Aug 2017 - 2:56 pm | श्रीगुरुजी
अमेरिकेने व्हिसा नाकारलेले तेव्हा इस्राईल ला पवार साहेब त्यांना शिष्टमंडळातून घेऊन गेले , अदानी हे १९८८ पासून पवार आणि प्रफुल भाई पटेल ह्यांच्या संपर्कात होते . त्याची मदत मोदी ह्यांना झाली . उगाच नाही आल्या आल्या पदमविभूषण , अगदी बारामती ला जाऊन भेटी , दिल्लीत भेटी , पवार ह्यांचा सल्ला नेहमी घेतो हे जाहीर सांगितले . पवार ह्यांचा काही फायदा आहे का आता मोदींना . तरी सांगत आहेत . भाबड्या आशेवर ,संघ , मोदी कसे स्वच्छ ह्या विश्वासावर असलेल्याना शुभेच्छा .
२००६ मधील त्या भेटीत सर्वपक्षीय शिष्टमंडळ होते. त्यात अनेक राज्यांचे प्रतिनिधी होते. त्यात पवारांबरोबर तत्कालीन राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, मोदी, सिब्बल, कमलनाथ, ओरिसा/नागालँड सह अनेक राज्यांचे मंत्री व वरीष्ठ अधिकारी होते. इस्राईली नेत्यांसमोर वसुंधरा राजेंनी एक पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनसुद्धा केले होते. त्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात पवारांबरोबर मोदी होते म्हणजे त्यांचे साटेलोटे होते असा अर्थ काढायचा असेल तर सिब्बल, कमलनाथ इ. चे सुद्धा मोदींबरोबर व वसुंधरा राजेंसहीत अनेक पक्षांबरोबर साटेलोटे होते असा बादरायण संबंध लावावा लागेल.
बारामतीला भेट दिलेले मोदी हे एकमेव मोठे नाहीत. यापूर्वी माजी पंतप्रधान चंद्रशेखर, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी इ. नी सुद्धा पवारांच्या आमंत्रणावरून बारामतीला भेट दिलेली आहे. राष्ट्रीय नेत्यांना बारामतीला आमंत्रण देऊन त्यांचा पाहुणचार करणे व शिष्टाचार म्हणून ते यजमानाबद्दल ४ शब्द बरे बोलतात ते माध्यमातून छापून आणून आपले महत्त्व वाढविणे हा पवारांचा जुना छंद आहे. मी पवारांचा सल्ला घेतो इ. सांगणे हे उपरोधिक आहे हे लक्षात आलेले दिसत नाही.
12 Aug 2017 - 2:36 pm | श्रीगुरुजी
हे जर तुम्हाला माहित होतं तर पहिल्या प्रतिसादात का विचारलं की कुठे आहेत की बागलबच्चे म्हणून ? याचा अर्थ उघडे पडल्याशिवाय चूक मान्य करायची नाही.
मुळात तुम्ही लिहिलंत की भाजपने अनेक शहरात राष्ट्रवादीचे
बगलबच्चे घेतलेले आहेत. मी विचारल्यावर फक्त एक बगलबच्चा सांगितलात. पुन्हा विचारल्यावर अजून ३-४ बगलबच्चांची नावे दिलीत. फक्त ३-४ नावे म्हणजे अनेक शहरातील अनेक बगलबच्चे होतात का? असले २-४ चिल्लर बगलबच्चे भाजपमध्ये किंवा इतर कोणत्याही पक्षात गेले तर पक्षाला फारसा फरक पडत नाही. असे चिल्लर नेते इकडून तिकडे ये-जा करीत असतातच.
तुमचं वाक्य हेच सिद्ध करतंय जे मी म्हणतोय ते की bjp is no more party with difference.
बरं नसू देत.
महाराष्ट्रातील आणि गुजरात मधील पाठिंबा अजित पवार यांची चोकशी थंडावणे ही काय माझी उदाहरणे आहेत काय? या गोष्टी का होतायत हे सामान्य लोकांना कळतंय जरी बाहेर पुरावे नसले तरी, तुमच्या सारख्या भाजप समर्थकांना हे दैवी योगायोग वाटणार किंवा राष्ट्वडी स्वतःहून भाजप वर उपकार करतेय असे वाटणार यात काय शंका नाही.
अजून किती वेळा सांगायचं की हा पाठिंबा भाजपने मागितला नव्हता व राष्ट्रवादीने तो स्वतःहून दिला होता व भाजपने तो स्वीकारलेला नव्हता. अजित पवारांची चौकशी अजिबात थंडावलेली नाही. २०१४ पासून राष्ट्रवादीवर भरपूर वेळा कुर्हाड चाललेली आहे. गुगलल्यास त्याविषयी माहिती मिळेल.
याच थोडं स्पष्टीकरण देतो, मोदी नि पावरबाबत exagration केलं हे मान्य, परंतु पवार हे मोदी ना आदर्श आहेत हे नक्की याच करण जेंव्हा upa च सरकार होत तेंव्हा पवार सोडून सगळ्या केंद्रीय मंत्र्यांनी मोदी शी असहकार पुकारला होता. पवार यांनी मोदींची शेती आणि अन्न प्रशासन विभागाच्या संदर्भातील कामे केली होती, हे मोदी नि मान्य केलंय. तसेच गरज भासल्यास आपण पवारांचा सल्ला घेतो हे ही मान्य केलाय. पवार आणि मोदी यांचा असणार सौख्य चा भाजप आणि राष्ट्रवादी च्या love and hate relationzhip च गुपित आहे. लोक मोदींच स्टेटमेंट आहे असे घेऊन आगपाखड नाही करत तर त्यांचं निवडणुकी आधीच टीका आणि।निवणुकी नन्तर च सौख्य आणि जवळीक पाहून टीका करतायत हे कधी तरी लक्षात घ्या।
पवार यांनी मोदींची शेती आणि अन्न प्रशासन विभागाच्या संदर्भातील कामे केली होती, हे मोदींनी कधी मान्य केलंय? पवारांनी मोदींची नक्की कोणती कामे केली?
"गरज भासल्यास आपण पवारांचा सल्ला घेतो" हे सुद्धा उपरोधिक वाक्य आहे. हे खरे समजणे म्हणजे आपण चौथी नापासाची शिकवणी लावलीये असे एखाद्या विद्यावाचस्पतीचे म्हणणे खरे समजण्यासारखे आहे. निवणुकीपूर्वी किंवा नंतर आजतगायत भाजप व राष्ट्रवादीची जवळीक कोठेही दिसलेली नाही. मागील ३ वर्षात झालेल्या सर्व निवडणुकीत राज्यात व राज्याबाहेर दोन्ही पक्ष एकमेकांविरूद्ध लढले आहेत. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादीने रालोआच्या उमेदवाराला मत दिलेले नाही. राष्ट्रवादीचे काही नेते तुरूंगात आहेत. लवासाची विशेष परवानगी काढून घेण्यात आली आहे. राज्य सहकारी बँक व इतर सहकारी संस्थावरील राष्ट्रवादीचे वर्चस्व मोडून काढण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत.
12 Aug 2017 - 2:52 pm | अमितदादा
खलील लिंक वाचा बातमी
मोदींच्या तोंडून डायरेक्ट
"I keep talking with Pawar at least twice or thrice a month and we exchange notes on various issues faced by the country. We need to use Pawar’s more than five decades (of) experience in the public life.”
Whenever the UPA (United Progressive Alliance) government used to block schemes and projects related to Gujarat, as the chief minister I used to always seek help from Pawar and...he used to help me sort out my issues with the central government,”
आता कृपया मोदींना खोटे ठरवू नाका.
12 Aug 2017 - 3:02 pm | श्रीगुरुजी
तुमच्या भाबडेपणाचे कौतुक वाटते. पवारांनी मोदींना बारामतीला आमंत्रित केल्यानंतर बारामतीत मोदींनी हे सांगितले होते. आपल्याला एखाद्याकडे आमंत्रण दिले व तिथे आपला पाहुणचार केला तर आपण शिष्टाचार म्हणून त्या व्यक्तीबद्दल दोनचार बरे शब्द बोलतो. त्याच्या घराचे, मुलांचे वगैरे कौतुक करतो. शिष्टाचार या पलिकडे त्यात अर्थ नसतो. इथेही तसेच आहे. शिष्टाचार म्हणून मोदींनी मावळते राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्यावरही स्तुतीसुमने उधळली आहेत. ज्या व्यक्तिणे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशात आपली प्रतिमा निर्माण करून बहुमत मिळविले ती व्यक्ती एखाद्या राज्यात ४-५ जिल्ह्यांच्या पलिकडे अस्तित्व नसणार्याचा काय कप्पाळ सल्ला घेणार? असे करणे म्हणजे सचिन तेंडुलकरने फलंदाजीसाठी एखाद्या शाळकरी मुलाकडून टिप्स घेण्यासारखे आहे.
12 Aug 2017 - 3:14 pm | अमितदादा
अवघड आहे, जेंव्हा आपण कुणाचे कौतुक करतो तेंव्हा ते वस्तुस्थितीचा विचार करून करतो, जी लोक वस्थुस्थितीचा विचार न करता बोलतात किंवा कौतुक करतात त्यांना मूर्ख, खोटारडे, आणी लालघोटे करणारे समजले जाते. आता मान्य करा की एकतर मोदी खरं बोलले किंवा ते खोटारडे/ थापडे आहेत ते.
नाहीतर असे म्हणा मोदी खोटी स्तुती करतात आणि खरी टीका करतात ते.
असो आम्ही भाबडी लोक, आम्हीच थांबतो आता.
12 Aug 2017 - 3:22 pm | श्रीगुरुजी
अहो, एखाद्याच्या निमंत्रणावरून आपण त्याच्याकडे गेलो आणि त्याने आपला पाहुणचार केला तर त्याच्याबद्दल चार शब्द चांगले बोलणे हा सर्वसंमत शिष्टाचार असतो. त्याच्या घरी काही खटकले किंवा चुकीचे वाटले तरी त्याकडे फारसे लक्ष न देता आपण त्याचे तोंडभरून कौतुक करतो. जेवणात काही कमीजास्त असले तरी त्याबद्दल टिप्पणी न करता गृहिणीच्या स्वयंपाकाचे कौतुक करतो. इथे खर्याखोट्याचा संबंधच नाही. हा शिष्टाचार आहे. असल्या कौतुकाच्या शब्दांना फारसे गांभिर्याने घ्यायचे नसते. यापूर्वी जेटली, प्रणव मुखर्जी, चंद्रशेखर इ. नी सुद्धा पवारांच्या आमंत्रणावरून बारामतीला भेट देऊन त्यांचे कोडकौतुक केले आहे. ते फक्त एका कानाने ऐकून घेऊन दुसर्या कानाने सोडून द्यायचे असते. त्यावर फार विचार करायचा नसतो.
12 Aug 2017 - 3:26 pm | श्रीगुरुजी
४-५ दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेत पवारांच्या राजकीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला गेला. दुसर्याच दिवशी साम्यवादी नेते गणपतराव देशमुख व इंदिरा गांधींबद्दलही असाच ठराव मंजूर केला गेला. दोन्ही दिवशी तिन्ही नेत्यांबद्दल सर्वपक्षीय नेत्यांनी गौरवोद्गार काढले. त्यांच्यावर भरपूर स्तुतीसुमने उधळण्यात आली. त्यांच्याबाबत असलेल्या कटु गोष्टींचा चुकुनही उच्चार केला नाही. विधानसभेतील ती भाषणे त्या ठरावापुरतीच मर्यादीत होती. त्यावर जास्त विचार करण्याची गरज नव्हती.
12 Aug 2017 - 3:53 pm | थिटे मास्तर
गुरुजी तो एक शिष्टाचार असतो.
आता ह्यांच्या कडे किंवा ज्याना हे नेत्रुत्व मानतात त्यांच्याकडे ना तर मुद्दे कुठले असतात हे ओळखता येतात ना त्या मुद्दाना त्यांना जनतेच्या मध्ये नेउन ऐका आंदोलनाच रुप देउन त्या मुद्दांना न्याय मिळवुन देण्याची कुवत कुठल्या विरोधि नेत्यांमध्ये राहिलिय. मोदि दर आठ पंधरा दिवसाला एक खुळखुळा देतात बसा वाजवत लेको.
ऐ सर्किट बता ऐसे रोतलु से कौन शादि करेगा ;)
12 Aug 2017 - 11:31 pm | श्रीगुरुजी
एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या समारंभात शिष्टाचार म्हणून चार बरे शब्द बोलले तर लगेच त्या दोघांचे साटेलोटे आहे, त्यांचे डील झाले आहे असा निष्कर्ष काढणार्यांची गंमत वाटते. २००१ मध्ये पवारांच्या ६१ व्या वाढदिवसादिवशी दिल्लीत एका जाहीर समारंभात सर्वपक्षीय नेते हजर होते व त्या सर्वांनी त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली होती. २०१५ मध्ये पवारांच्या ७५ व्या वाढदिवशी पुन्हा एकदा एका सर्वपक्षीय जाहीर समारंभात पवारांबद्दल स्तुतीसुमने उधळली गेली. त्या समारंभात सोनिया गांधी, येचुरी, मोदी, कराट असे डावीकडून उजवीकडील सर्व नेते हजर होते. दस्तुरखुद्द सोनिया गांधींनी देखील पवारांचे कौतुक केले होते. म्हणजे सर्व पक्षाच्या सर्व नेत्यांबरोबर पवारांचे डील झाले होते असा अर्थ काढायचा का? वाढदिवस समारंभात कितीही कौतुक केले (शिष्टाचार म्हणून) तरी प्रत्यक्षात त्यांचे एकमेकांशी संबंध वेगळेच असतात. असल्या औपचारिक कार्यक्रमातून कोणतेही निष्कर्ष काढता येत नाहीत व तसे काढूही नयेत.
12 Aug 2017 - 5:17 pm | गॅरी ट्रुमन
२०१४ मध्ये राष्ट्रवादीची पडद्याआड मदत घ्यायचा प्रकार तेव्हा आवडला नव्हता आणि आताही आवडलेला नाही. तसेच त्यावेळी कुठलेही डिल न होता (भले ते दिशाभूल करायला केलेले खोटे डिल असले तरी) राष्ट्रवादीने महाराष्ट्रात स्थिर सरकार यावे या 'उदात्त' हेतूने भाजपला पाठिंबा नक्कीच दिला नसणार हे तर नक्कीच कळते. आपल्याला काही मिळाल्याशिवाय राजकारणात कोणीही काहीही दुसर्यासाठी करत नसतो. आणि पवार तर नक्कीच नाही.
तरीही हा दोन पक्षांमध्ये डिल होते हे दर्शविणार नाही. अमेरिकेचे माजी अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचे १९९४ मध्ये निधन झाले आणि ते तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी व्हाईट हाऊसमध्ये जाहिर केले. त्यावेळी बिल क्लिंटन यांनीही रिचर्ड निक्सन यांच्या अनुभवाचा आपल्याला फायदा झाला असे म्हटले होते.
या व्हिडिओमध्ये साधारण ३ मिनिटे ४० सेकंदांनंतर बिल क्लिंटन यांचे स्टेटमेन्ट येईल.
सत्तापदावर गेलेल्या व्यक्ती इतरांशी सल्लामसलत करत असतात. तोच प्रकार मोदी-पवार यांच्या बाबतीत म्हणता येईल. या दोन पक्षांत डिल झाले नाही असे नाही पण हा त्यासाठी पुरेसा आधार आहे असे वाटत नाही.
12 Aug 2017 - 11:23 pm | श्रीगुरुजी
सल्लामसलत करणे म्हणजे डील झाले असे कसे म्हणता येईल? दुसरं म्हणजे निक्सन आणि क्लिंटन हे एकाच पदावर होते. वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हा सुद्धा नरसिंहरावांनी आपल्याला आयत्यावेळी रद्द कराव्या लागणार्या अणुचाचणीची माहिती देऊन आता तुम्ही ही चाचणी पूर्ण करा असे सांगून युक्तीच्या चार गोष्टी सांगितल्या होत्या असे वाचनात आले आहे. नरसिंहराव व वायपेयी हे सुद्धा एकाच पदावर होते. एकच समान पद भूषविणार्या आजी-माजी व्यक्तींमध्ये सल्लामसलत होणे समजू शकते कारण तेच पद भूषविणार्या माजी व्यक्तीच्या अनुभवाचा फायदा विद्यमान व्यक्तीला मिळू शकेल. परंतु दोन असमान पदावर असणार्या व्यक्तींमध्ये अशी सल्लमसलत होणे खूपच अवघड वाटते.
13 Aug 2017 - 11:09 am | गॅरी ट्रुमन
तेच म्हटले आहे. सत्तेवर जाऊन निर्णय घ्यायची जबाबदारी असलेल्या व्यक्ती सल्लामसलत करतच असतात. याचा अर्थ त्यांच्यात डिल झाले असा नक्कीच काढता येणार नाही.
अशी सल्लामसलत करायला त्याच पदावर असलेल्या व्यक्तीशी करायला पाहिजे असे बंधन नक्कीच नाही. शेतीविषयक प्रश्नांवर पंतप्रधान आणि कृषीमंत्री गेल्या ५०-६० वर्षांपासून एम.एस.स्वामीनाथन यांच्याशी सल्लामसलत करत आलेले आहेत. स्वामीनाथन अर्थातच पंतप्रधान किंवा कृषीमंत्री नव्हते. पण त्यांचा शेतीविषयक प्रश्नांचा दांडगा अभ्यास असल्यामुळे ते चांगला सल्ला देऊ शकतील अशी खात्री वाटल्यामुळे त्यांच्याशी सल्लामसलत करणार्या सत्ताधार्यांना वाटत असल्यामुळेच ते त्यांचा सल्ला घ्यायला जात असतील. १९९८ मध्ये अणुचाचण्या झाल्यानंतर २-३ महिन्यांनंतर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी माजी परराष्ट्रमंत्र्यांना असेच सल्लामसलतीसाठी बोलावले होते. त्यात चरणसिंग सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री असलेले श्यामनंदन मिश्रांपासून प्रणव मुखर्जी, विद्याचरण शुक्ला हे पण माजी परराष्ट्रमंत्री सामील झाले होते. वाजपेयी त्यावेळी पंतप्रधान असल्यामुळे केवळ माजी पंतप्रधानांशीच सल्लामसलत करावी असे नक्कीच नव्हते. त्याचप्रमाणे शरद पवार १० वर्षे कृषीमंत्री असल्यामुळे ते काहीतरी सल्ला देऊ शकतील असे वाटल्यामुळेच मोदींनी तसे म्हटले असावे (हा माझा तर्क).
12 Aug 2017 - 11:46 pm | श्रीगुरुजी
२०१४ मध्ये राष्ट्रवादीची पडद्याआड मदत घ्यायचा प्रकार तेव्हा आवडला नव्हता आणि आताही आवडलेला नाही. तसेच त्यावेळी कुठलेही डिल न होता (भले ते दिशाभूल करायला केलेले खोटे डिल असले तरी) राष्ट्रवादीने महाराष्ट्रात स्थिर सरकार यावे या 'उदात्त' हेतूने भाजपला पाठिंबा नक्कीच दिला नसणार हे तर नक्कीच कळते. आपल्याला काही मिळाल्याशिवाय राजकारणात कोणीही काहीही दुसर्यासाठी करत नसतो. आणि पवार तर नक्कीच नाही.
बरोबर आहे. भाजपने न मागता पाठिंबा जाहीर करण्यामागे पवारांचा नक्कीच काहीतरी हेतू असणार. परंतु प्रश्न असा आहे की भाजपने त्यांचा पाठिंबा स्वीकारला होता का? आणि ज्या हेतूने पवारांनी स्वतःहून पाठिंबा जाहीर केला ते हेतू साध्य झाले का? पहिल्या प्रश्नाचे उत्तर "नाही" असे आहे. भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा स्वीकारला नव्हता, पण तो नाकारला पण नव्हता. त्यांनी त्यावर फक्त मौन पाळून आपले पत्ते उघडे केले नाहीत. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या पाठिंब्यामुळे सेनेची बार्गेनिंग पॉवर एकदम संपुष्टात आली आणि तसे होणार हे ओळखून फडणविसांनी चातुर्याने त्याचा वापर करून शेवटी सेनेला स्वतःच्या अटींवर पाठिंबा देण्यास भाग पाडले. दुसर्या प्रश्नाचे उत्तर देणे अवघड आहे, कारण पवारांनी नक्की कोणत्या हेतूने स्वतःहून पाठिंबा जाहीर केला होता हे बाहेर आलेले नाही. सर्वसाधारणपणे असे समजले जाते की आपल्या पक्षाच्या नेत्यांना भ्रष्टाचाराच्या कारवाईपासून वाचविण्यासाठी त्यांनी पाठिंबा दिला होता. हा हेतू असेल तर तो फारसा साध्य झालेला दिसत नाही. दुसरा हेतू असा असू शकतो की पवारांना रालोआत जाऊन मंत्रीपद मिळवायचे असावे. हा हेतू असेल तर तो अजिबात साध्य झालेला नाही. माझ्या मते मूळ हेतू वेगळाच होता (हे माझे मत आहे. यावर माझ्याकडे कोणताही पुरावा नाही.). तो हेतू म्हणजे निवडणुकपूर्व काळात सेना-भाजप संबंध इतक्या विकोपाला गेले होते की निकालानंतर ते परत एकत्र येतील असे पवारांना वाटले नसावे. अशा परिस्थितीत त्यांना एकत्र येण्याची बारीकशी संधी सुद्धा मिळू नये यासाठी त्यांनी घाईघाईने भाजपला पाठिंबा जाहीर केला. त्यांचे गणित असे असावे की आपण पाठिंबा जाहीर केल्यानंतर सेना विरोधात बसेल. आपला पाठिंबा घेतल्याने भाजपची पुरेपूर नाचक्की होईल व पाठिंब्याचा दडपणामुळे आपल्या पक्षाच्या आमदारांवरील भ्रष्टाचाराची कारवाई टाळता येईल. काही महिने पाठिंबा सुरू ठेवून नंतर पाठिंबा काढून घेतल्यावर सरकार पडेल व नंतर नव्याने जुळणी होऊन सत्तेत परतण्याची संधी मिळेल किंवा मुदतपूर्व निवडणुक झाल्यास भाजपला जोरदार फटका बसेल व त्यावेळी आपल्याला संधी निर्माण होईल. परंतु भाजपने पाठिंब्याबाबत मौन पाळून शेवटी सेनेला सत्तेत येण्यास भाग पाडले व पवारांची खेळी अयशस्वी ठरली.
13 Aug 2017 - 12:03 am | विशुमित
मला आमच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये येणाऱ्या काही कीर्तनकारांची आठवण आली. ३-४ गोष्टी (ते दृष्टांत म्हणत) त्यांच्या कडे असत. मग कोणता पण अभंग घ्या त्या अभंगाचे विवेचन करत असताना तेच ते दृष्टांत फिरवून फिरवून चपखल वापरायचे. काम चालून जायचे.
तसे काहीतरी शरद पवारांबद्दलच्या प्रतिसादावरून दिसते...!!
13 Aug 2017 - 11:13 am | गॅरी ट्रुमन
अगदी शक्य आहे. पण सुरवातीला पडद्याआड राष्ट्रवादीची मदत घेतली हे चित्र उभे राहिल्यामुळे भाजप समर्थक मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली होती हे पण तितकेच खरे आहे.
12 Aug 2017 - 2:47 am | थिटे मास्तर
गोरखपुरला 30 निष्पाप लहान मुले दगावले हो सरकारी / दवाखान्याच्या गलथान पणाने.
निशब्द :(
12 Aug 2017 - 12:05 pm | arunjoshi123
योगी तर केजरिवालपेक्षा गलथान निघाला.