एकमेकांना सोडून जातांना
एक गोष्ट माझ्यासाठी करशील,
आयुष्याच्या सायंकाळ पर्यंत
माझी आठवण जपून ठेवशील,
जातांना फक्त शेवटी मला
तुझा चेहरा मन भरुन बघू देशील,
स्मरणात तो न मिटण्यासाठी...
जाता जाता तुझा हात
माझ्या हातात देशील,
तुझ्या स्पर्शाची ऊब जपून ठेवण्यासाठी...
जाता जाता तुझ्या डोळ्यातील
अश्रु मला वेचायचे आहेत
पुढील जीवनात विस्तवाच्या निखार्यावर
.....शिंपडण्यासाठी.....
प्रतिक्रिया
7 Nov 2016 - 6:30 pm | कवि मानव
एकमेकांना सोडून जातांना
एक गोष्ट माझ्यासाठी करशील - इथे - "तुला मला सोडून जाताना" हे वाक्य/भावना जास्त योग्य वाटतं. पटलं तर बघा
8 Nov 2016 - 11:47 am | मराठी कथालेखक
करशील, ठेवशील , देशील पेक्षा कर , ठेव, दे जास्त चांगलं वाटेल. एकतर कवितेच्या दृष्टीनेही लय चांगली पकडता येईल आणि अर्थाच्या दृष्टीने बघताही - प्रेम केलं आहे तर हक्क आहे आणि प्रेमिका प्रियकराकडे हक्काने मागेल , विचारणार नाही.
9 Nov 2016 - 10:14 am | सच६४८६
मस्तच ...
करशील, ठेवशील , देशील पेक्षा कर , ठेव, दे जास्त चांगलं वाटेल.>> हे टाकल्यानंतर अजून छान वाटतेय कविता ..