एकमेकांना सोडून जातांना...!
लेखनविषय:
काव्यरस
एकमेकांना सोडून जातांना
एक गोष्ट माझ्यासाठी करशील,
आयुष्याच्या सायंकाळ पर्यंत
माझी आठवण जपून ठेवशील,
जातांना फक्त शेवटी मला
तुझा चेहरा मन भरुन बघू देशील,
स्मरणात तो न मिटण्यासाठी...
जाता जाता तुझा हात
माझ्या हातात देशील,
तुझ्या स्पर्शाची ऊब जपून ठेवण्यासाठी...
जाता जाता तुझ्या डोळ्यातील
अश्रु मला वेचायचे आहेत
पुढील जीवनात विस्तवाच्या निखार्यावर
.....शिंपडण्यासाठी.....
वाचने
1700
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
एकमेकांना सोडून जातांना
करशील, ठेवशील , देशील पेक्षा
In reply to करशील, ठेवशील , देशील पेक्षा by मराठी कथालेखक
मस्तच ...