स्वप्नातले कोंकण

राजेंद्र देवी's picture
राजेंद्र देवी in जे न देखे रवी...
28 Oct 2016 - 8:32 am

स्वप्नातले कोंकण

साधेच घर माझे , छोटेसे अंगण
त्यात अवतरले, सारे वृक्षगण

अंगणात माझ्या, तुळशी वृंदावन
माथ्यावर दूर्वा, दुडदुडतो गजानन

अंगणात माझ्या, कर्दळीचे पान
घालतो मांडव, संतुष्ट होई सत्यनारायण

नारळ सुपारी डुले, आहे त्यास मान
नैवेद्याला सजते, केळीचे पान

परसदारी फुलती फुले, दारी आंब्याचे तोरण
शंकरास वाहते, बेलाचे पान

स्वप्न माझे साधे, सदाहरित कोंकण
त्यात असावे घरकुल माझे छान

राजेंद्र देवी

कविता माझीमुक्त कविताकवितामुक्तक

प्रतिक्रिया

सौन्दर्य's picture

28 Oct 2016 - 8:42 am | सौन्दर्य

कोकणात आपले एक घर असावे असे फार फार वाटते.

प्रचेतस's picture

28 Oct 2016 - 8:47 am | प्रचेतस

धन्यवाद...

अत्रुप्त आत्मा's picture

28 Oct 2016 - 9:51 am | अत्रुप्त आत्मा

+१

शार्दुल_हातोळकर's picture

28 Oct 2016 - 12:56 pm | शार्दुल_हातोळकर

रात्रीस खेळ चाले..... :-)

सोहम कामत's picture

28 Oct 2016 - 4:10 pm | सोहम कामत

खूप सुंदर... कोकणातल्या घराचे स्वप्न आणि कवितेतल्या कोकणाचे सौंदर्य फार आवडले...

पाटीलभाऊ's picture

28 Oct 2016 - 5:27 pm | पाटीलभाऊ

खरंच कोकणात एक घर असावं अशी सुप्त इच्छा आहे.

अनन्न्या's picture

28 Oct 2016 - 6:00 pm | अनन्न्या

सासरचे आणि माहेरचे!

सौन्दर्य's picture

28 Oct 2016 - 7:35 pm | सौन्दर्य

खरंच भाग्यवान.