माझा ४० वर्षाचा नवरा प्रचंड हट्टी आणि नाटकी आहे. तो कुठलीही गोष्ट न सांगता, नीट करत नाही,शेवटी माझा संयम संपतो व त्याची परिणीती त्याला शाब्दिक फटके पडण्यात होते आणि ज्याचे मला नंतर फार वाईट वाटते.
त्याला म्हणे मी रागावते आणि शाब्दिक फटके देते याची भिती वाटते.हे अस बोलून तो त्याच्या आई-बाबांची सहानुभूती मिळवतो आणि शेवटी सगळं त्याच्या मनासारखे करतो.
मला वाटते माझा नवरा खरंच भयंकर नाटकी आहे.त्याला खरच भिती वाटली असती तर तो चांगल्या नवर्यासारखा वागला असता.
१.मी नक्की काय करावं की ज्यानी नवर्याचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल?
२. त्याच्या वागण्यात काय बदल घडवून आणू? की ज्यामुळे तो इतर बायकांच्या नवर्याप्रमाणे समजुतदार होईल?
आपली नम्र
जोशी पुण्यात पन्गा
प्रतिक्रिया
7 Aug 2016 - 6:38 pm | लालगरूड
फारच जास्त वैयक्तिक होतंय काय?बाळाचं वय 40
आहे हे आपण विसरला आहात काय?
7 Aug 2016 - 7:24 pm | जव्हेरगंज
षटकार
=))
8 Aug 2016 - 11:51 am | इरसाल
तुम्ही तीन वेण्यांऐवजी दोन किंवा एक वेणी बांधुन बघा ???
7 Aug 2016 - 6:40 pm | अजया
आपल्या त्रासाबद्दल सहानुभूती वाटत आहे.कधी पोकल बांबू ट्राय केलाय का तुम्ही? फार इफेक्टिव्ह आहे ऐकलंय.
लाटणं पण फार फायदेशीर या त्रासाला.
7 Aug 2016 - 6:41 pm | लालगरूड
तुम्हीच असा आयडी घेतल्यावर नवर्याने घरात दंगा
केला तर काय बिघडलं?
असो, मुलाला एखादी आंटी असल्यास तिच्याकडे हे
प्रकरण सोपवावे.
7 Aug 2016 - 6:46 pm | कैलासवासी सोन्याबापु
अभ्या _____/\______ =)) =))
कहर आहेस लगा तू =)) =)) =))
7 Aug 2016 - 6:55 pm | अभ्या..
अरे बापू, मी कुठं?
हे लालगरूड उडलेत.....
माझ्या सल्ल्याची कॉपी म्हनून मणून माझे नाव टाकलेत.
पण प्रतिसाद जबरीच.
7 Aug 2016 - 7:05 pm | कैलासवासी सोन्याबापु
रूपकात्मक अभ्या वर्जिनल अभ्याच्या लैच जवळ गेल्याची उस्फुर्त पावती म्हणून वर्ग करणेत यावा आमचा प्रतिसाद
7 Aug 2016 - 7:07 pm | अभ्या..
हेहेहेहेहे
पावती पावली.
7 Aug 2016 - 7:25 pm | लालगरूड
मी आपलं टाईमपास करत होतो ..... आंटी चा अर्थ कळलेला दिसतोय __/\___
7 Aug 2016 - 6:46 pm | त्रिवेणी
पोकल बांबुचा प्रयत्न करुन झाला पण बाळ बधत नै. बरीच लाटणीही धारातीर्थ पडलीत.
आणि मुलाची आंटी अता म्हातारी झालीय.दुसर्या एखाद्या आंटीच्या ताब्यात देवुन अजुन लेनेके देने पडायचे.
7 Aug 2016 - 6:54 pm | अजया
पण आजकालच्या नाटकी डायर्या लिहणार्या बायकांमध्ये तुम्ही एक वेगळी बायको दिसलात.
-फटके द्यावेच लागतात ( शाब्दिक सुद्धा))
8 Aug 2016 - 9:24 am | स्पा
खिक्क
8 Aug 2016 - 2:44 pm | सूड
माझा मुलगा २४ वर्षचा झाला आहे, गुडगांव येथे एका MNC नौकरी करतो. पण त्याला हि एकच खंत आहे, त्याला कधीच मारले नाही. जेवल्या नंतर त्याचे ताट धुतल्या तांदूळा सारखे स्वच्छ असते. (माझ्या ताटात कधी कधी एखाद दुसरा तांदुळाचा दाणा राहून जातो किंवा कधी थोड खाली सांडतो). दुधी, तोराई पासून ते पालक इत्यादी सर्व भाज्या आनंदाने खातो. फरक एकच आमची सौ. नौकरी करत नव्हती.
अवांतर आज घरात धिंडवडे व सोबतीला बैरी पुदिन्याची चटणी आणि लाल भोपळ्याचा रायता असा बेत आहे. (नाग पंच मी टुडे).
-अनेकतिर्हाईत
7 Aug 2016 - 6:55 pm | पैसा
=)) =)) =))
7 Aug 2016 - 6:59 pm | पियुशा
बाब्बो,,, मरतेय हसून:)
7 Aug 2016 - 7:01 pm | मनिमौ
वागण्या कडे संपूर्ण दुर्लक्ष करून आपल्या सुचना सतत देत रहा.आणी नवरे लोकाकडे जन्म जात नाटकीपणा असल्याने तो कमी होईल की नाही हे सांगु शकत नाही
7 Aug 2016 - 7:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> १.मी नक्की काय करावं की ज्यानी नवर्याचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल?
स्वतःवर कंट्रोल ठेवा.
-दिलीप बिरुटे
7 Aug 2016 - 7:25 pm | जव्हेरगंज
कहर
7 Aug 2016 - 7:07 pm | सामान्य वाचक
झेन यांनी 5 वर्ष साठी सांगितलेला उपाय चालणार नाही ना ?
7 Aug 2016 - 7:08 pm | पियुशा
अस सतत मारल्याने णवरे निगर गट्ट होतात त्यांच्या कला कलाने घ्या;)
7 Aug 2016 - 7:47 pm | अत्रुप्त आत्मा
=))
7 Aug 2016 - 8:10 pm | रेवती
तुला काय अन्भव आहे गं?
7 Aug 2016 - 9:10 pm | पियुशा
रेवती ताई अग यु नो समाजकार्य ,सुपारी घेते मी ईथे पोकळ बांबूचे फटके देऊन मिळतील ( मला पडायच्या आत पळते मी;) )
7 Aug 2016 - 7:13 pm | अभ्या..
आजकाल हा उपाय करायला लोक्स फार घाबरतात पण रिझल्ट पक्का.
त्याला एका भाईची गरज आहे.
7 Aug 2016 - 7:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>> की ज्यामुळे तो इतर बायकांच्या नवर्याप्रमाणे समजुतदार होईल?
अभ्या आपल्या कोनाडा या शाळेत घेऊ किमान समजूतदार तरी होतील ते..... ;)
-दिलीप बिरुटे
(कोनाडा संस्थापक अध्यक्ष) ;)
7 Aug 2016 - 7:23 pm | अभ्या..
शाळा??? कॉलेज??? विद्यापीठ?????
सर तुम्ही स्वतः चालते बोलते विश्वविद्यालय आहात. साक्षात वाचस्पती की बृहस्पती काय ते आहात. शाळा म्हणून डिमोशन नका ओ करु.
(मी परमनंट ना आता?)
7 Aug 2016 - 7:24 pm | कैलासवासी सोन्याबापु
सहमती
चपराशी पदोत्सुक
बापू
8 Aug 2016 - 9:18 am | भीडस्त
त्याला एका भाईची गरज आहे
मा अभ्याजी
टंकलेखन करता करता ब ऐवजी चुकून भ तर नाही ना टाईप केलात ;) ;)
7 Aug 2016 - 7:14 pm | कैलासवासी सोन्याबापु
१.मी नक्की काय करावं की ज्यानी नवर्याचा हट्टी आणि नाटकीपणा कमी होईल?
जमल्यास नवऱ्याला स्वतःहून गिफ्ट म्हणून (वाडधीव्हस, यानवर्सरी साधून) जब्रा, बोस, क्रिएटिव्ह चे हेडफोन द्यावे, (किंवा स्वतःला तरी ते विकत घ्यावे), अगदीच हमखास उपाय हवा असल्यास सरळ एक प्ले स्टेशन किंवा एक्सबॉक्स गेमिंग कन्सोल द्यावा, हे सगळे जर धोंड्याच्या वाणात जमवून आणलेत तर नवरा नुसता प्यासीवच होणार नाही तर "आपल्या मम्मी पप्पांचा" कमरेत वाकवाकून आदर ठेवेल, हे निश्चित समजा, शिवाय हा उपाय पर्मनंट आहे, नवरा जरा आऊट ऑ लाईन जाताना दिसला की सरळ कन्सोलची रिमोट किंवा साऊंड सिस्टिमचा ऑडिओ केबल वगैरे लपवून ठेवावा, शून्य मिनिटात परत तुमचा आज्ञाधारी टॉमी होईल.!
(स्वानुभव नाही, भोचकपणे करणाऱ्या विरुद्ध शिस्तीत डिटेल धावा पोजिशन घेऊन बसलोय ह्याची नोंद घ्यावी ही विनंती)
आपल्या शिव्या हाच आमचा आहेर!
अजिबात कळवू नये!
7 Aug 2016 - 7:26 pm | अभ्या..
आण्भवाचे बोल काय बाप्पू???
जियो वहीनी. क्या तरीका ढून्ढा है. ;)
7 Aug 2016 - 7:32 pm | कैलासवासी सोन्याबापु
जौ द्या नको तोंड उघडायला!
(तोंडाला कुलूप स्मायली)
8 Aug 2016 - 12:44 pm | महासंग्राम
कौन वाहिनी बी हायेत का मिपावर.... खिक्क
8 Aug 2016 - 5:36 pm | कैलासवासी सोन्याबापु
मधेच येऊन वाचते! आता गपा!
8 Aug 2016 - 5:38 pm | अभ्या..
बर. तुम्ही हिते लै चांगले चांगले लिहता आणि बायकोला बिल्कुल घाबरत नाहित असेच सांगतो. (आल्या तर) ;)
8 Aug 2016 - 3:42 pm | भुमन्यु
कालच विचारत होती कि वाढदिवसाला गिफ्ट काय पाहिजे.
7 Aug 2016 - 7:15 pm | यशोधरा
=)))
7 Aug 2016 - 7:22 pm | मितभाषी
माई मोड ऑन
४० म्हणजे लहान च की . बाकी तुझ्या खोडी सांगितल्या नाहीत नेहमीप्रमाणे .
माई मोड ऑफ
7 Aug 2016 - 7:23 pm | तिमा
एकांगी सल्ले देणे सोपे आहे. पण बायको, सासू,सासरे यांची एकजूट पाहिजे. बायकोने फटकारल्यावर नवर्याने आई, बाबांकडे अभय मागायचे, असे झाले तर कठीण आहे. शाब्दिक फटके देणे चुकीचे आहे. पण सर्वांनी एकत्र येऊन पोकल बांबूचे फटके दिले तर हे बाळ ताळ्यावर येईल.
7 Aug 2016 - 7:31 pm | लालगरूड
एक पुस्तक विकत घ्या आणि घरात देवाच्या फोटोच्या जागी लावा. (हा
वाक्प्रचार आहे.शब्शः अर्थ शोधत बसू
नका.आमच्या देव्हार्यात पुस्तकेच असतात.)
"आमचे हे माझ्या मुठीत" लेखक माई
7 Aug 2016 - 7:32 pm | एस
बदला.
7 Aug 2016 - 7:34 pm | अभ्या..
अरेरेरेरेरे
मराठी की हिंदी?
7 Aug 2016 - 10:38 pm | एस
व्हॉटेव्हर वर्क्स! ;-)
8 Aug 2016 - 10:42 am | सस्नेह
=)))
8 Aug 2016 - 11:29 am | चतुरंग
आठवलं!! ;)
7 Aug 2016 - 7:34 pm | लालगरूड
तुमच्या नवर्याचा दिवसातला किती वेळ मित्र मैत्रिणीं
बरोबर जातो? मला असं वाटतं की तो त्याचा स्टॅमिना
कुठे गुंतवत नसल्याने असे होत असावे.
पूर्णतः अननुभवी
सौरभ
7 Aug 2016 - 7:39 pm | मितभाषी
=)म)))
=))
=))))
7 Aug 2016 - 7:38 pm | लालगरूड
१. नवर्याची जिद्द पूर्ण करू नका आणि मारू हि नका.
पहिल्यांदा थोडा त्रास होईल. पण एकदा त्याला
कळले कि जिद्द करून काही फायदा नाही. तो
आपसूक शांत होईल.
२. त्याने मागितलली आवाक्यात असलेली वस्तू नंतर
काही दिवसांनी त्याला आणून द्या.
३. खाण्याचे नखरे मुळीच सहन करू नका. ताटात
वाढलेले संपवण्याची सवय याच वयात लावावी
लागते. सुरवातीला तास भर वाट तरी काही हरकत
नाही.
१०-१५ दिवस त्रास होईल. नंतर हा हट्टीपणा कमी
होईल.
१००% ग्यारंटी वाला हा उपाय आहे. माझ्या सौ.
ने हाच वापरला होता. आज मी ताटात कधी एक कण
टाकत नाही.
7 Aug 2016 - 7:40 pm | तिमा
नवरा जर लेफ्टिस्ट (डावरा) असेल तर त्याला लाल गरुडाची भीति घाला.
7 Aug 2016 - 7:45 pm | लालगरूड
निषेढ....
7 Aug 2016 - 7:44 pm | लालगरूड
एकांगी उपदेश करणे सोपे आहे. पण नवर्याला शिस्त
लावायची असेल तर सगळ्या वडिलधार्यांची एकजूट
पाहिजे. नाहीतर बायकोने मारल्यावर सासू/
सासरे यांच्याकडे अभय मिळते, हे कळले की नवरे जास्त
हट्टी होतात.मारणे चुकीचे आहे पण हट्ट केल्यावर
सगळ्यांनी समजावणीचा एकच सूर लावला पाहिजे.
7 Aug 2016 - 8:04 pm | श्रीगुरुजी
तुम्हाला होणारा त्रास आऊटसोर्स करा. म्हणजेच स्वतःहून नवर्याचं दुसरं लग्न लावून द्या. तुमचा त्रास वाचेल.
7 Aug 2016 - 8:23 pm | त्रिवेणी
धन्यवाद मंडळी तुमचे अमुल्य सल्ले असल्यामुळे नक्कीच मदत होईल.
@श्रीगुरुजी हा तर रोगापेक्षा इलाज भयंकर आहे.
7 Aug 2016 - 8:39 pm | आदूबाळ
लौल! लालगरूड यांनी बंदुकीला नवं म्यागझीन घातलेलं दिसतंय.
7 Aug 2016 - 9:24 pm | लालगरूड
ल्लू ल्ल्लू ल्लू ल्लू म्हणलं जरा दंगा करावा
7 Aug 2016 - 8:47 pm | अजया
काहीही करा, पण मारू नका नवर्याला.
(किंवा मोठं भांडण झाल्यावर मग त्याने कानाखाली जाळ काढल्यास वाईट वाटून घेऊ नका.)
- रडूबाळ
7 Aug 2016 - 8:59 pm | माम्लेदारचा पन्खा
हे वयच आहे त्यांचं दंगामस्ती करायचं....जरा समजून घ्या की !
7 Aug 2016 - 9:12 pm | कंजूस
मुल कोडगं झालंय का?
7 Aug 2016 - 9:27 pm | उडन खटोला
त्रि काकूंनी 'ए क अ क्ष र क ळे ल त र श प थ' मोड वरून जी प्रगती केली आहे ती निच्छित च कवतुकास्पद आहे. ;)
7 Aug 2016 - 9:27 pm | उडन खटोला
त्रि काकूंनी 'ए क अ क्ष र क ळे ल त र श प थ' मोड वरून जी प्रगती केली आहे ती निच्छित च कवतुकास्पद आहे. ;)
7 Aug 2016 - 9:39 pm | लालगरूड
नवरा हट्टाला पेटला तर बायको सरळ होते अक्षरांचं काय घेऊन बसला :-D
7 Aug 2016 - 9:51 pm | अजया
अशा रितीने धाग्याने पन्नाशी गाठल्यामुळे त्रिवेणी यांचा लाटणं आणि पोकळ बांबू मारुन देऊन सत्कार करण्यात येत आहे
7 Aug 2016 - 10:07 pm | रेवती
धाग्याची शंभरीही गाठून देता येईल पण 'धागा खरा आहे की गंमत म्हणून काढलेला?' हा प्रश्न पडलाय म्हणून गप्प बसण्यात येत आहे. धागाकर्तीने घाईघाईने आभार मानल्याने कन्फूजन वाढले आहे.
7 Aug 2016 - 10:15 pm | उडन खटोला
नवऱ्याला सिरीयस घेतात? काहीही हा रे ;)
7 Aug 2016 - 10:28 pm | नूतन सावंत
माझं ऐकशील तर तुला राग आवरायला शिकलं पाहिजे.
7 Aug 2016 - 10:49 pm | चतुरंग
मुळात तुम्हाला या गृहितकात काहीच चूक वाटत नाही? ;
समजूतदार नवरा हे ऑक्सीमोरॉन आहे! ;)
8 Aug 2016 - 2:52 pm | सूड
आधीच मोरॉन तशातच ऑक्सीमोरॉन झाला. ;)
7 Aug 2016 - 10:58 pm | palambar
हसुन हसुन पुरेवाट :) :) हा हा हा हा हा हा हा हा
7 Aug 2016 - 11:30 pm | ज्योति अळवणी
दोन्ही प्रश्न फारच बेसिक आहेत. त्यामुळे उपाय असे काही असूच शकत नाही. मुल मोठ होण्याची वाट बघा. सर्वसाधारणपणे आईने शिक्षा केली की मुलं soft corner मिळेल अशा ठिकाणी धावतात. ते या केसमध्ये देखील दिसत आहे. तरी soft corner नसताना शिक्षा करा.
नाहीतर... वयात आल्यावर आपणहून अक्कल येईल याची वाट बघा.
7 Aug 2016 - 11:41 pm | लालगरूड
चुकुन इकडे आला आपण. इथल्या बाळाचे वय 40 आहे.
7 Aug 2016 - 11:55 pm | अभ्या..
जरा लेट झाला असेल गरुडसाब. तुम्हाला एक नसेल ट्रॅफिक जाम.
8 Aug 2016 - 12:11 am | साती
भारी विडंबन!
लालगरूडाचे प्रतिसादही भारीच!
8 Aug 2016 - 9:35 am | इशा१२३
अहो त्रिवेणी ताई नवर्याच वय ना लग्न कीति वर्षाच झाल यावर ठरवावे हो.म्हणजे बघा लग्नाला दहा वर्ष झाली असेल तर नवरा दहा वर्षाचा.ना धड लहान ना धड मोठा.हे वय कठीणच.यापुढच वय असेल तर अजुनच कठिण होत म्हणे.(जुन्या जाणत्यांकडुन ऐकलय म्हणुन म्हणे)
एकुणात धाग्यावरून वय दहाच्या आत असाव वाटतय.आताच हतबल होउ नका.बाकी उपाय काय सुचवु?त्यासाठी मीच धागा वाचत रहाणार आहे.
8 Aug 2016 - 9:35 am | इशा१२३
अहो त्रिवेणी ताई नवर्याच वय ना लग्न कीति वर्षाच झाल यावर ठरवावे हो.म्हणजे बघा लग्नाला दहा वर्ष झाली असेल तर नवरा दहा वर्षाचा.ना धड लहान ना धड मोठा.हे वय कठीणच.यापुढच वय असेल तर अजुनच कठिण होत म्हणे.(जुन्या जाणत्यांकडुन ऐकलय म्हणुन म्हणे)
एकुणात धाग्यावरून वय दहाच्या आत असाव वाटतय.आताच हतबल होउ नका.बाकी उपाय काय सुचवु?त्यासाठी मीच धागा वाचत रहाणार आहे.
8 Aug 2016 - 11:03 am | लालगरूड
म्हणजे जेव्हा लग्न लागतं तेव्हा तो पाळण्यात असतो म्हणायचयं का आपल्याला .
अ.भा.गुडघ्यात मेंदु संघटना विरोधक
8 Aug 2016 - 11:11 am | उडन खटोला
विरोधक ऐवजी सदस्य असं लिहा.
मुलाचं वय जेवढं तेवढं माणसाचा बाप या पदवी चं वय असतं तसंच लग्न झाल्या पासून तो माणूस नवरा या पदवी ला पात्र होत असल्याने जेवढी वर्षं लग्नाला तेवढी नवरेपदाला.
8 Aug 2016 - 11:24 am | लालगरूड
अच्छा असे कनेक्शन आहे तर.
8 Aug 2016 - 9:37 am | विनायक प्रभू
प्रर्थमतः उशीर झाल्याबद्दल क्षमस्व.
काय करणार?
पाणी तुंबलेले होते.
निचरा होता होता उशीर झाला.
मूळ प्र्श्न नवरा आधी पासुन ह्ट्टी होता का?
का आत्ता आताशी झाला.
असो.
इलाजः तुम्ही एक स्ट्राँग इंसेंटीव डिसइंसेंटीव कार्यक्रम हातात्य घ्या.
ह्ट्ट केला की डिसेंसेंटीव, हट्ट सोडला की इंसेंटीव.
आणि ह्यात सुद्धा कायम बदल ठेवा. तोच तोच पणा आला तर प्रॉब्लेम पुन्हा येण्याची शक्यता असते.
किंवा "क्रेल" वापरा.
त्याने हट्ट केला तर त्याच्यापेक्षा मोठा हट्ट तुम्ही करा.(तो तुमचा हक्क आहे) ह्या पद्धतीने सर्व "तुंबाजी खोत" सुतासारखे सरळ होतात.
8 Aug 2016 - 9:42 am | ज्ञानोबाचे पैजार
भारी विडंबन आणि त्यावर लालगरुड सरांनी मारलेल्या भरार्या आवडल्या.
एकदम अचुक लक्षवेध
पैजारबुवा,
8 Aug 2016 - 9:45 am | दिपुडी
केवळ शाब्दिक फटके देऊ नका त्याने नवरूबाळ निगरगट्ट होतात
बाळ झोपले की फॅन बंद करणे भांडी चुकून पाड़ने .बातम्या बघतना मिक्सर लावणे
पोरांवर जोरात ओरड़ने.लेकि बोले छाप टोमने पोराना मारने याने फरक पड़तोय का बघा
8 Aug 2016 - 9:45 am | तिमा
लालगरुड सरांनी ?
सर हे फक्त प्रा.डॉ. यांनाच म्हणतात, अशी समजूत होती.
8 Aug 2016 - 10:56 am | लालगरूड
नाय ओ काका मी तर आजुन विद्यार्थी आहे.......
8 Aug 2016 - 9:53 am | पैसा
बाळाला पाठिशी घालणार्या त्याच्या आईबाबांना इटलीच्या प्रवासाला पाठवून देणे. तुलाही पुण्य घडेल. आणि तुझ्या साबा इटलीमधे हरवल्या तर दुधात साखर पडेल.
8 Aug 2016 - 11:23 am | अजया
साबांना आता फ्रेंच रिव्हिएराची स्वप्नं पडत आहेत म्हणे.तिथे हरवाल का असं त्या विचारत असताना इशाने ऐकुन पियुला सांगितलं असं भुमी म्हणत होती. खखो मोनु जाणे ;)
8 Aug 2016 - 11:29 am | पैसा
तरी सौदा स्वस्तात पडेल.
8 Aug 2016 - 11:49 am | उडन खटोला
क्रावे त्से भ्रावे
- एक जापनीज म्हण
8 Aug 2016 - 11:51 am | पैसा
अगदी अगदी!
8 Aug 2016 - 12:48 pm | त्रिवेणी
पै तै अग काय सांगु तुला. त्या जर्मनीला हरवल्या होत्या पण आल्या परत घरी. तिथल्या पोलिसांच,लोकांच कामच तत्पर न.
8 Aug 2016 - 12:50 pm | पैसा
म्हणूनच यावेळी इटलीला पाठवून बघ म्हटलं!
8 Aug 2016 - 10:29 am | देशपांडे विनायक
भूमिका तपासा
@ माझा ४० वर्षाचा नवरा प्रचंड हट्टी आणि नाटकी आहे. तो कुठलीही गोष्ट न सांगता, नीट करत नाही,शेवटी माझा संयम संपतो व त्याची परिणीती त्याला शाब्दिक फटके पडण्यात होते आणि ज्याचे मला नंतर फार वाईट वाटते.
जग हि रंगभूमी आहे . तुमचा नवरा '' हट्टी आणि नाटकी '' नवऱ्याची भूमिका करत आहे
तुमची भूमिका समजून घ्या . भूमिका रंगवताना आनंद झाला पाहिजे
संयम संपणे आणि शाब्दिक फटके मारून आनंद होत नसून वाईट वाटत असेल तर
भूमिका समजली नाही हे उघड आहे
अलका कुबल चे सिनेमे वारंवार पाहून बायकोची निराळी भूमिका समजू शकेल असे
तज्ञ् लोक सांगतात