मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक लाडीक कविता

रामदास · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
तुम्ही मोगरा माळला असं वार्‍यानी सांगावे. आम्ही फुलं घेउन यावं तुम्ही केस मोकळावे. हे असं काय होतं बुवा ?....... तुम्ही केस मोकळावे त्यात चांदणं गुंफावे. आम्ही सोडून निश्वास चार काजवे मोजावे. अशी रात्र कशी जावी.... तुम्ही पान नखलावं इथं लागावी सुपारी. तुम्ही आळस मोडावा आम्ही उसण धरावी. कशी जीवघेणी अदा..... आम्ही लपत छपत लाडे सलगी करावी. तुम्ही घेउन पदर रात्र जाहीर करावी. अस्सा जीव सुखावला......

वाचने 9413 वाचनखूण प्रतिक्रिया 23

अरुण मनोहर Sat, 12/27/2008 - 07:06
एकदम आगळी वेगळी आणि ताजीतवानी वाटणारी कविता. पाचव्या ओळींमधे काव्यरंजना मधून अचानक वास्तवात आणुन सोडल्यामुळे रोलकोस्टर सारखी मजा आली. तुम्ही पान नखलावं हा शब्दप्रयोग नखांनीच गुदगुल्या करून गेला. आणखी असे प्रयोग येउ द्यात.

प्राजु Sat, 12/27/2008 - 07:40
काही खरं नाही... सह्हीच. लाडीक म्हणजे किती लाडीक! लाडे लाडे आदबीनं तुम्हा विनवते बाई... अशीच अगदी. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसुनाना Sat, 12/27/2008 - 10:32
तुम्ही केस मोकळावे त्यात चांदणं गुंफावे. आम्ही सोडून निश्वास चार काजवे मोजावे. अशी रात्र कशी जावी....
ये सही है, भिडू!
रात्र जाहीर करावी.
हे पण. चांगली कविता.

विनायक प्रभू Sat, 12/27/2008 - 11:36
सडिक म्हणायाचे आहे का तुम्हाला. १६६ प्रतिसाद घेणा-या. निरुद्योगी लोकांना तेवढेच काम. वादपटु खुश.

मदनबाण Sat, 12/27/2008 - 13:57
तुम्ही घेउन पदर रात्र जाहीर करावी. अस्सा जीव सुखावला...... च्यामारी,, लय लाडीक बरं का... :) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

सखाराम_गटणे™ Sun, 12/28/2008 - 13:11
मस्तच ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

राघव Mon, 12/29/2008 - 12:24
खूप सुंदर कविता. तुमच्या कविता नेहमीच वेगळ्या असतात.. नानांच्याही तशाच असतात! मस्त लिहिलेत!! येऊ द्यात अजून :) मुमुक्षु

संदीप चित्रे Tue, 12/30/2008 - 02:40
>> तुम्ही मोगरा माळला असं वार्‍यानी सांगावे. आम्ही फुलं घेउन यावं तुम्ही केस मोकळावे. >>हे असं काय होतं बुवा ?....... आय हाय... क्या बात है ! (तुम्हाला हे कसं सुचलं बुवा !!) :) ------------ 'मोकळावे', 'रात्र जाहीर करावी' आणि' नखलावं' ह्या शब्दरचना तर खूपच आवडल्या.....

In reply to by संदीप चित्रे

चतुरंग Tue, 12/30/2008 - 03:52
'मोकळावे', 'रात्र जाहीर करावी' आणि' नखलावं' ह्या शब्दरचना तर खूपच आवडल्या..... अगदी असेच म्हणतो! (खुद के साथ बातां : रंगा, हा रामदास भलताच लाडिक खिलाडी दिसतोय बरं का! ;) ) चतुरंग