तुम्ही मोगरा माळला
असं वार्यानी सांगावे.
आम्ही फुलं घेउन यावं
तुम्ही केस मोकळावे.
हे असं काय होतं बुवा ?.......
तुम्ही केस मोकळावे
त्यात चांदणं गुंफावे.
आम्ही सोडून निश्वास
चार काजवे मोजावे.
अशी रात्र कशी जावी....
तुम्ही पान नखलावं
इथं लागावी सुपारी.
तुम्ही आळस मोडावा
आम्ही उसण धरावी.
कशी जीवघेणी अदा.....
आम्ही लपत छपत
लाडे सलगी करावी.
तुम्ही घेउन पदर
रात्र जाहीर करावी.
अस्सा जीव सुखावला......
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
9416
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
:-)
+१
In reply to :-) by धनंजय
+२
In reply to +१ by घाटावरचे भट
:-)
मला खूपच आवडली हि कविता
वेगळी
हम्म...
रामदास
एकदम सही -
कविता संग्रह
आणि पडिक? --
In reply to कविता संग्रह by विनायक प्रभू
सडिक
तुम्ही
रामदासराव!
भारी
मस्तच ---- सख
खूप सुंदर
झकास कवीत...
खरंच लाडिक कविता आहे
+१ सहमत
In reply to खरंच लाडिक कविता आहे by संदीप चित्रे
एक अप्रतीम कविता!
आयला
रामदास हा आयडी किती जणं मिळून