७ 'कधीपण-कुठेपण' व्यायामप्रकार

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
18 Jun 2015 - 12:19 pm

ब्लॉग पोस्ट इंग्रजीत आहे. तिचा दुवा हा

खाली दिलेले ७ व्यायामप्रकार असे आहेत की जे कुठेही केले जाऊ शकतात. या व्यायामप्रकारांत शरिरातील अनेक सांधे, स्नायू कार्यत्यामुळे, त्यामुळे हे कंपाउंड एक्सरसाइजेस या वर्गात मोडतात. जिम लावेपर्यंत, लावायच्या आधी, किंवा लावायचं नसेल तर, हे व्यायामप्रकार तुमच्या दिनचर्येचा भाग होऊ शकतात.

आधी महत्वाचे:
- नेहमी निगेटिव मूव्हमेंट हळू करावी. ५ आकडे मोजत निगेटिव मूव्हमेंट होणे आदर्श. उदा. बैठकांमधे खाली बसताना ५ मोजत हळू बसावे.
- पॉझिटिव मूवमेंट नेहमी जलद आणि शक्तीपूर्ण असावी.
- स्नायू आकुंचित झालेली स्थिती १ सेकंद धरून ठेवावी व स्नायू फ्लेक्स म्हणजेच घट्ट करावेत.
- शक्ती लावताना श्वास जलद सोडावा व निगेटिव मूवमेंट मधे श्वास घ्यावा.
- व्यायामाच्या आधी किमान ५ मिनिटे वॉर्मअप गरजेचा आहे.

आता व्यायामांकडे वळू.

1) स्क्वॉट्स किंवा बैठका - व्यायामाचा श्रीगणेशा याने व्हायला हवा. बैठका हा एक परिपूर्ण व्यायाम असून फक्त पायाचाच नाही तर पूर्ण शरीराचा व्यायाम खरं तर याने होतो. पायाबरोबरच पाठ, कोअर मसल्स याने कार्यान्वित केले जातात. हा व्यायाम वजनाशिवाय, किंवा वजन घेऊन करता येतो. डंबबेल, बारबेल किंवा ते नसल्यास जड पुस्तकं भरलेली सॅक पाठीला लावूनही हा व्यायाम करता येतो.

पाय खांद्यांपेक्षा थोडे अधिक अंतरावर ठेवावेत. पावलं थोडीशी बाहेरच्या दिशेने असावीत. पाठ आर्चड (अंतर्वक्र) नजर समोर असावी.

1

२) पुश अप्स - सलमान खानचा आवडता व्यायामप्रकार. हा व्यायामप्रकार अतिशय लोकप्रिय असून त्याचे फायदे हेच त्याच्या लोकप्रियतेचं खरं कारण आहे (व्यायामाच्या; सलमानच्या नव्हे). छाती, खांदे आणि ट्रायसेप्स तसेच कोअर मसल्स यांना 'हिट' करणारा हा व्यायाम अतिशय जबरदस्त आहे. आणि तुम्ही जितके कल्पक असाल तितका हा व्यायाम रोचक होऊ शकतो. गूगल केलंत तर याचे किमान १०० प्रकार मिळतील. ३ मुख्य प्रकार असे
- हात खांद्यांच्या रुंदीपेक्षा लांब ठेवून (वाइड स्टान्स)
- हात खांद्यांच्या रुंदीइतके लांब ठेवून (नॉर्मल स्टान्स)
- हात जवळ ठेवून (डायमंड डिप्स)

याची काठीण्य पातळी ३ प्रकारे बदलता येते.
- हात टेबलावर्/बेंचवर आणि पाय जमिनीवर (ईझी)
- हात व पाय जमिनीवर (नॉर्मल)
- हात जमिनीवर पाय उंचावर (टेबल्/बेंच) (कठीण)

2
2-1

३) लंजेस - लोअर बॉडीचा आणखी एक परिपूर्ण व्यायाम म्हणून लंजेस चं नाव येतं. दिसताना सोपा पण करताना कठीण वाटणारा हा व्यायामप्रकार क्वाड्रासेप्स, हॅमस्ट्रिंग्स, ग्लूट्स, काव्ह्ज या सगळ्या स्नायूंना कार्यान्वित करतो. हाही व्यायाम वजनाशिवाय किंवा वजन घेऊन करता येतो.

3
3-1

४) जोर / नमस्कार / भारतीय पुशअप्स - या पूर्वापार चालत आलेल्या प्राचीन भारतीय व्यायामप्रकाराला हवी ती नावं जगभर देऊन झालेली आहेत. जोर, नमस्कार ही आपल्याकडली नावं झाली. डाईव्ह बॉम्बर्स, इंडीयन पुशअप्स, हिंदू पुश अप्स इत्यादी बाहेरची. असो. याची महती सांगायलाच नको. एकेकाळी कुस्तीगीरांच्या वर्काउट रेजिम मधे जोर बैठका हे दोनच प्रकार असायचे. एक अपर बॉडीचा एक लोअर बॉडीचा. अपर बॉडीचा प्रत्येक स्नायू जोरांमुळे कार्यान्वित होतो. शिवाय भुजंगासनात गेल्यावर पोटाचे स्नायू स्ट्रेच होतात, क्वाड्रासेप्स स्ट्रेच होतात. सुरुवातीच्या स्थितीत हॅमस्ट्रिंग्स, काव्ह्ज स्ट्रेच होतात. एकंदरितच सर्वांगसुंदर !

4

५) स्टेप अप्स - हा जोशपूर्ण व्यायाम प्रकार बैठकांप्रमाणेच तुमच्या संपूर्ण लोअर बॉडीला व्यायम देतो. वजनाशिवाय किंवा वजन घेऊन करता येतो. कोअर मसल्स कार्यान्वित होतात. एकच खबरदारी यात घ्यावी ती म्हणजे पाठीला बाक येऊ देऊ नये. पाठ सरळ असावी.

5

६) थ्री फोल्ड अ‍ॅब्स - हा मला सुचलेला एक व्यायामप्रकार आहे. पोटाच्या स्नायूंचे एकापेक्षा अधिक व्यायाम एकत्र करून हा व्यायामप्रकार बनवला आहे.

१-पाठीवर झोपावे. हात डोक्यामागे घ्यावेत.
२-गुडघ्यात न वाकवता दोनही पाय वर उचलून जमिनीशी काटकोनात आणावेत.
३-ही स्थिती धरून खांदे-छाती उचलून क्रंच किंवा सिटअप ची कृती करावी.
४-पुन्हा २ च्या स्थितीत यावे व दोनही पायांसकट कमरेचा भाग वर उचलावा. (किक द सीलिंग)
५-स्थिती १ मधे यावे.

७) बर्पीज - हे वाचा

7

हे सप्तर्षीसारखे सात व्यायाम तुम्ही केलेत तर व्यायामाच्या आकाशगंगेतले तारे तुम्ही तोडू शकाल.
(हे असं उगाचच काहीतरी वाक्य लिहायचं म्हणून)

विनोद नव्हे, पण हे इतके ७ व्यायाम जरी केले तरी संपूर्ण शरीराला व्यायाम होऊ शकतो.

एक राहिलं, जोडीला दणदणीत गाणी हवीत. टेम्पो येण्यासाठी ! आणि पुढे जबर आहार हवा. झीज भरून येण्यासाठी. ते आलंच ओघाने.

सो; गेट गोइंग !

जीवनमानराहणीविचार

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

18 Jun 2015 - 12:28 pm | टवाळ कार्टा

वाखू साठवलेली आहे :)

कंजूस's picture

18 Jun 2015 - 12:42 pm | कंजूस

यावरून " Perfect Workout " हे अॅप ( windows) आठवले. अॅनमेटेड आहे.

वेल्लाभट's picture

18 Jun 2015 - 12:49 pm | वेल्लाभट

बघायला हवे.
मीही विंडोजकर

एस's picture

18 Jun 2015 - 1:12 pm | एस

सोपे दिसताहेत. मला गुढगेदुखीचा त्रास आहे आणि वजनही जरा जास्त आहे (चांगलंच जास्त आहे असे कुटुंब म्हणते, पण मी तिचे बोलणे जास्त मनावर घेत नाही!) मला यातील कोणते व्यायामप्रकार करता येतील? मला वाटतं जोर जमतील आणि विशेष त्रास होणार नाही.

जिन्क्स's picture

18 Jun 2015 - 1:18 pm | जिन्क्स

आणि पुढे जबर आहार हवा. झीज भरून येण्यासाठी.

याच्यावर पण काही तरी लिहा. ते protein च गणित प्रत्येक आहारतज्ञ वेगवेगळे सांगतो.

चिगो's picture

19 Jun 2015 - 9:54 am | चिगो

उपयुक्त धागा.. (खरोखर उपयोग करुन घेईन की नाही, ही शंकाच आहे म्हणा.. ;-) ) वाखु साठवली आहेच, पण हे जरा सांगाच.. त्यातल्या त्यात आपल्या घरगुती आहारात, ज्यात शाकाहारी/मासाहारी दोन्ही आला, त्यात प्रोटीन्सचा कोटा वाढवायला काय घ्यावे, हे कृपया सांगा. (मी सप्लिमेंट्सच्या अंमळ विरोधात आहे)

मस्त माहिती वेल्लाकाका!!

श्श्या! माझा व्यायाम गेले धा दिवस बंद पडलाय याची वैट्ट जाणीव झाली. ही अधलीमधली आजारपणं आली ना, की सगळं वेळापत्रक बिनसतं राव!

रेवती's picture

18 Jun 2015 - 5:17 pm | रेवती

वरील व्यायामप्रकार सूर्यनमस्कारसारखे दिसतायत.

जोर = अर्धा सूर्यनमस्कार :)

वेल्लाभट अरनॉल्डसारखे बावडी बिल्डर आहेत याची खात्री पटलेली आहे!

म्हंजे काय!! आमचा व्हाट्सअ‍ॅप ग्रूप पण आहे 'Health Freaks' म्हणून!!

स्पा's picture

18 Jun 2015 - 5:56 pm | स्पा

=))

खटपट्या's picture

18 Jun 2015 - 8:18 pm | खटपट्या

अच्छा !!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Jun 2015 - 8:27 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

गरिबाले एंट्री मिळलं काय? आमीबी फिटनेस फ्रीक्स मधे मोडतो.

कपिलमुनी's picture

19 Jun 2015 - 4:13 pm | कपिलमुनी

ऐकल कोणीतरी :)

टवाळ कार्टा's picture

19 Jun 2015 - 9:17 am | टवाळ कार्टा

मला परत अ‍ॅडवा रे...आधीचा कायप्पाचा नंबर आता बंद अस्तो

माझीही शॅम्पेन's picture

19 Jun 2015 - 4:47 pm | माझीही शॅम्पेन

ह्या ग्रुप च्या वर्ष श्राद्ध असेल तेंव्हा आम्हाला बोलवा बरका !

आता अग्नी द्यायला या, नंतर श्राद्धाचं बघू!!

वेल्लाभट's picture

19 Jun 2015 - 12:00 am | वेल्लाभट

झालं ! म्हणून मी असे धागे काढताना संकोच करतो. कळालं ना फ्रीकांनो? असे गैरसमज होतात मग.

मुक्त विहारि's picture

19 Jun 2015 - 7:40 am | मुक्त विहारि

मिपावर "टवाळ-गिरी" होणारच.

आणि मित्रांमध्ये थोडी-फार टवाळगिरी करायची नाही, तर मग कुठे करायची?

वेल्लाभट's picture

19 Jun 2015 - 4:05 pm | वेल्लाभट

गंमतच आहे हो ती आमची! मजेत म्हणतोय. चिल्ल!

मुविकाकांना मिपाचा 'मैत्री आणि शांतता' पुरस्कार देण्यात यावा असा प्रस्ताव ठेवणार आहे मी!! ;)

उलट आम्हाला माहिती मिळते काका. तो पीनट बटरचा धागा अजून पण प्रमाण बघायला मला उपयोगी पडतो. आणि ते सकाळी खाऊन गेलं की संबंध वर्कआऊट मस्त होतो.

कंजूस's picture

18 Jun 2015 - 5:58 pm | कंजूस

ते अॅप विंडोजवर----

Perfect Workout

मस्त.. आणि आजच पुन्हा व्यायाम सुरु केल्याने आनखिनच आवडला

वेल्लाभट's picture

19 Jun 2015 - 12:01 am | वेल्लाभट

आभार्स सगळ्यांचे :)

स्रुजा's picture

19 Jun 2015 - 12:20 am | स्रुजा

छान माहिती, वा. खु. साठवली आहे.

पैसा's picture

19 Jun 2015 - 12:36 am | पैसा

चांगली माहिती. येऊ द्या अजून.

मुक्त विहारि's picture

19 Jun 2015 - 7:38 am | मुक्त विहारि

वाखूसा

श्रीरंग_जोशी's picture

19 Jun 2015 - 7:49 am | श्रीरंग_जोशी

उपयुक्त माहिती. इथे प्रकाशित केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
अंमलात आणण्याचा प्रयत्न करीन.

सुचेता's picture

19 Jun 2015 - 10:55 am | सुचेता

फोटु दिसत नाहीयेत, काइ कराव?

आनंदी गोपाळ's picture

19 Jun 2015 - 12:22 pm | आनंदी गोपाळ

उत्तम लेखन.
तुमच्या परवानगीने ४ पैसे अ‍ॅड करू का?

१. व्यायाम सुरू करण्याआधी वॉर्म अप व संपवतानाचे स्ट्रेचेस इन्क्लुड केल्यास रूटीन पूर्ण होईल.
२. गुडघेदुखीला स्क्वॅट्स कठीण. ऑर्थोवाल्या डॉक्टरला विचारून मग करावेत.
३. अप्पर बॉडी व लोअर बॉडी अल्टरनेट करावेत. म्हणजे स्क्वॅट - पुशप - लन्जेस - डम्ब बेल्स इ.
४. प्रत्येक प्रकारचा १५-२० चा सेट पुरेसा असतो. आपल्या वय व क्षमतेनुसार पुन्हा सायकल रिपीट करावी. जास्तीत जास्त ३ सायकल्स प्रतिदिवस.

५. प्लँक्स हा प्रकार मला आवडतो. १५ सेकंद प्लँक माझ्या रूटीनमधे आहे.

वेल्लाभट's picture

21 Jun 2015 - 2:04 pm | वेल्लाभट

१. व्यायाम सुरू करण्याआधी वॉर्म अप व संपवतानाचे स्ट्रेचेस इन्क्लुड केल्यास रूटीन पूर्ण होईल.

बरोबर. वॉर्मप बद्दल लिहिले आहे. स्ट्रेच चे राहिले पण ते अध्यारुत आहे

२. गुडघेदुखीला स्क्वॅट्स कठीण. ऑर्थोवाल्या डॉक्टरला विचारून मग करावेत.

बरोबर. गुडघेदुखी असल्यास दाराचा आधार घेऊन स्क्वॉट्स करता येतात किंवा मागे स्टूल ठेवून फक्त उठण्याबसण्याची क्रीया केली तरीही स्क्वॉट्स सोप्या होतात.

अप्पर बॉडी व लोअर बॉडी अल्टरनेट करावेत. म्हणजे स्क्वॅट - पुशप - लन्जेस - डम्ब बेल्स इ.

हे फुल बॉडी रुटीन झाले. तेही जिम लावलेले नसेल तर घरी करण्याजोगे. घरी मर्यादित साधनांमधे फुल बॉडी वर्काउट करणं सोयीचं जातं म्हणून. बाकी स्प्लिट बॉडी आहे, एकेका मसल ग्रूप चं आहे, पुश पुल आहे, अनेक प्रकारची शेड्यूल्स करता येतात.

प्रत्येक प्रकारचा १५-२० चा सेट पुरेसा असतो. आपल्या वय व क्षमतेनुसार पुन्हा सायकल रिपीट करावी. जास्तीत जास्त ३ सायकल्स प्रतिदिवस

डिपेंड्स. गोल काय आहे त्यावर अवलंबून आहे. वेट गेन हवं असेल तर कमी रेप्स जास्त वेट, झालंच तर... सुपरसेटिंग असतं, ड्रॉपसेटिंग असतं. ओव्हरट्रेनिंग होत नाही ना इतकं बघावं मात्र.

५. प्लँक्स हा प्रकार मला आवडतो. १५ सेकंद प्लँक माझ्या रूटीनमधे आहे.

वे टू गो ! मस्त प्रकार. खतरनाक.

प्रत्येकालाच जिम मधे जायला जमतेच वा आवडते असे नाही, शिवाय अनेकदा/अनेक ठिकाणी तिथे पैसे घेऊन अर्धवट डोक्याचे पहिलवान उगंच कुथवून घेण्याचे उद्योग करतात असा अनुभव आहे.

तुम्ही माहितगार व अनुभवी दिसता. रफली वयानुसार ग्रूप करून म्हणजे, <२०, २०-४०, ४०-५०, ५०-६० घरीच करण्याचे विदाऊट मशीन्स, वा विथ जुजबी मशीन्स उदा. डम्बबेल्स इ. अशी रूटीन्स दिलीत तर आवडेल.

कार्डिओ टाईपच्या व्यायामप्रकारांशी याची सांगड सांगितलीत तर अधिक चांगले.

जाता जाता.
स्त्रियांनी व्यायाम केल्यास स्त्रीसुलभ सौंदर्य नष्ट होते, पुरुषी लुक येतो, असा एक गैरसमज आढळून येतो, त्यामुळे अनेकदा स्त्रिया व्यायाम करीत नाहीत. दुसरा गैरसमज म्हणजे माझे घरातच १० किमी चालणे होते.

पहिल्या बाबतीत, स्त्रियांची हॉर्मोन्स पुरुषी लुक येऊ देणार नाहीत.
दुसर्‍या बाबतीत, थकणे = व्यायाम नव्हे. संपूर्ण शरीराचे इंजिन रेव्ह्ह करून पुन्हा थंड करणे, याला व्यायाम म्हणावे. रोजच्या थकण्यात, अगदी हापिसात खुर्चीत बसून, मानेला डोकं तोलण्याचा बुडाला वजन तोलण्याचाही व्यायाम होतोच की ;)

आनंदी गोपाळ's picture

21 Jun 2015 - 10:32 pm | आनंदी गोपाळ

वरचा प्रतिसाद पोस्ट करताना,

तुम्ही माहितगार व अनुभवी दिसता. रफली वयानुसार ग्रूप करून म्हणजे, less than २०, २०-४०, ४०-५०, ५०-६० घरीच करण्याचे विदाऊट मशीन्स, वा विथ जुजबी मशीन्स उदा. डम्बबेल्स इ. अशी रूटीन्स दिलीत तर आवडेल.

कार्डिओ टाईपच्या व्यायामप्रकारांशी याची सांगड सांगितलीत तर अधिक चांगले.

यातले मधले शब्द लेस दॅन चे चिह्न वापरल्याने एच्टीएमेलात हरवलेत वाटते.

वेल्लाभट's picture

21 Jun 2015 - 11:31 pm | वेल्लाभट

गैरसमजांबद्दल पूर्ण सहमत. असे असंख्य गैरसमज ठामपणे मनाशी कवटाळून लोकं आनंदात राहतात. रुजुता दिवेकरांच 'डोन्ट लूज आउट, वर्क आउट' हे पुस्तक चांगलं आहे. अशा ब-याच गैरसमजांवर प्रकाश टाकतं.

हो; कार्डियो किंवा एरोबिक भाग हवाच. धाग्यातील व्यायाम हे बहुतांशी अ‍ॅनारोबिक आहेत (बर्पी वगळता. तोही अ‍ॅरोबिक अ‍ॅनारोबिक कॉम्बो आहे) पण त्याबरोबर आठवड्यातून २ दिवस तरी अ‍ॅरोबिक व्यायाम हवा. धावणं, स्किपिंग, स्टेपिंग, सायकलिंग इत्यादी.

मी प्रामाणिक पणे सांगतो मी अनुभवी नाही. केवळ व्यायामाबद्दल आवड आहे त्यामुळे माहिती गोळा करणं चालू असतं. इतकच. :) तुम्ही सुचवल्याप्रमाणे काही शेड्यूल मिळाली तर प्रयत्न करतो इथे देण्याचा.

सस्नेह's picture

19 Jun 2015 - 3:41 pm | सस्नेह

अगदी निवडक आहेत व्यायाम-प्रकार.
सूर्यनमस्कार सर्वात आवडता प्रकार !