आजारपण

यल्लप्पा सट्वजी कोकणे's picture
यल्लप्पा सट्वजी... in जे न देखे रवी...
23 May 2015 - 5:27 pm

आजारपण

रुसलेत शब्द आज माझे
लाडक्या माझ्या लेखणी वर,
आहे त्रस्त आजारात म्हणूनी
उमटली नाही कविता कागदावर !

तयार झाल्या मनात रचना
शब्दांत मांडता आल्या नाही,
रूग्णालयी उपचार घेता घेता
कागदावर टिपता आल्या नाही !

होते भयाण चार दिवस ते
गेली थकून माझी भार्या,
पैसा वेळ झाला खर्ची
झाली दुबळी माझी काया !

नको रे, आजारपण देऊ कोणा
ताळमेळ सारा बिघडून जातो,
गेलेल्या वेळेची करता भरपाई
पुन्हा येथे जीव थकुन जातो !

यल्लप्पा सटवाजी कोकणे
१६ एप्रिल २०१५

९८९२५६७२६४

कविता

प्रतिक्रिया

म्हया बिलंदर's picture

23 May 2015 - 6:26 pm | म्हया बिलंदर

हं २

यल्लाप्पा दमानं घ्या जरा आता दोन दिवस.

यल्लप्पा सट्वजी कोकणे's picture

23 May 2015 - 9:57 pm | यल्लप्पा सट्वजी...

ठीक आहे साहेब

म्हया बिलंदर's picture

23 May 2015 - 6:36 pm | म्हया बिलंदर

यल्लाप्पा येवु द्या. माझ्याकडे भरपुर "हं" तयार आहेत. उगाच वाया जातिल.

नूतन सावंत's picture

23 May 2015 - 9:17 pm | नूतन सावंत

आता बरे आहात नां?

अत्रुप्त आत्मा's picture

23 May 2015 - 9:28 pm | अत्रुप्त आत्मा

खिक्क!

बहुतेक संपादकीय ऑक्सीजन लागेल,असं दिसतय! :-D

यल्लप्पा सट्वजी कोकणे's picture

23 May 2015 - 9:56 pm | यल्लप्पा सट्वजी...

हो, विष बाधा झाली होती

ह बघून मस्त वाटले....

इथे बिंधास्त लिहा....

थोडी-फार (कधी-कधी जरा जास्तच) मस्करी होणारच. (विशेषतः नव्या सदस्यांबाबत).

पण मन मोठे करा.

कदाचित तुम्हाला पण मिपा आवडेल...

टवाळ कार्टा's picture

24 May 2015 - 2:33 pm | टवाळ कार्टा

अभी तो पार्टी शुरु हुई है ;)

अत्रुप्त आत्मा's picture

24 May 2015 - 11:29 pm | अत्रुप्त आत्मा

विष बाधा झाली होती

>> मग लवकर बरे व्हा आता.

तुम्ही जरा दमान घेणारच नाही का?