मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आजारपण

यल्लप्पा सट्वजी कोकणे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आजारपण रुसलेत शब्द आज माझे लाडक्या माझ्या लेखणी वर, आहे त्रस्त आजारात म्हणूनी उमटली नाही कविता कागदावर ! तयार झाल्या मनात रचना शब्दांत मांडता आल्या नाही, रूग्णालयी उपचार घेता घेता कागदावर टिपता आल्या नाही ! होते भयाण चार दिवस ते गेली थकून माझी भार्या, पैसा वेळ झाला खर्ची झाली दुबळी माझी काया ! नको रे, आजारपण देऊ कोणा ताळमेळ सारा बिघडून जातो, गेलेल्या वेळेची करता भरपाई पुन्हा येथे जीव थकुन जातो ! यल्लप्पा सटवाजी कोकणे १६ एप्रिल २०१५ ९८९२५६७२६४

वाचने 2048 वाचनखूण प्रतिक्रिया 11

In reply to by यल्लप्पा सट्वज…

मुक्त विहारि Sun, 05/24/2015 - 12:27
ह बघून मस्त वाटले.... इथे बिंधास्त लिहा.... थोडी-फार (कधी-कधी जरा जास्तच) मस्करी होणारच. (विशेषतः नव्या सदस्यांबाबत). पण मन मोठे करा. कदाचित तुम्हाला पण मिपा आवडेल...