आजारपण
लेखनविषय:
आजारपण
रुसलेत शब्द आज माझे
लाडक्या माझ्या लेखणी वर,
आहे त्रस्त आजारात म्हणूनी
उमटली नाही कविता कागदावर !
तयार झाल्या मनात रचना
शब्दांत मांडता आल्या नाही,
रूग्णालयी उपचार घेता घेता
कागदावर टिपता आल्या नाही !
होते भयाण चार दिवस ते
गेली थकून माझी भार्या,
पैसा वेळ झाला खर्ची
झाली दुबळी माझी काया !
नको रे, आजारपण देऊ कोणा
ताळमेळ सारा बिघडून जातो,
गेलेल्या वेळेची करता भरपाई
पुन्हा येथे जीव थकुन जातो !
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१६ एप्रिल २०१५
९८९२५६७२६४
वाचने
2048
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
हं
यल्लाप्पा दमानं घ्या जरा आता
In reply to यल्लाप्पा दमानं घ्या जरा आता by आदूबाळ
ठीक आहे साहेब
यल्लाप्पा येवु द्या
आता बरे आहात नां?
In reply to आता बरे आहात नां? by नूतन सावंत
खिक्क!
In reply to आता बरे आहात नां? by नूतन सावंत
हो, विष बाधा झाली होती
In reply to हो, विष बाधा झाली होती by यल्लप्पा सट्वज…
तुम्ही ...हसत-खेळत इथल्या प्रतिसादांना उत्तर देत आहात.....
In reply to तुम्ही ...हसत-खेळत इथल्या प्रतिसादांना उत्तर देत आहात..... by मुक्त विहारि
अभी तो पार्टी शुरु हुई है ;)
In reply to हो, विष बाधा झाली होती by यल्लप्पा सट्वज…
विष बाधा झाली होती
तुम्ही जरा दमान घेणारच नाही