गुढ (एक रहस्य कथा-भाग २)

चेतन677's picture
चेतन677 in जनातलं, मनातलं
26 Nov 2014 - 8:44 am

तीन दिवस झाले होते.कोणत्याच कंपनीचा काहीच रिप्लाय आला नव्ह्ता.ज्या कंपनीत इंटरव्हु दिला तिथुनही काहीच कळाले नव्हते.शेवटी शिवमने आपले बाडबिस्तर बांधले.
"शिवम,अरे कुठे चाललास? पुन्हा पिकनिकला जायचय का आपल्याला!!! व्वा मस्त..पण मग मला सांगितलं का नाही?"
अजिंक्यने विचारले.
शिवम एकदम शांत झाला.
"अजिंक्य, एवढ्या दिवस तु माझ्यासाठी जे काही केलंस त्याबद्द्ल धन्यवाद!!मी गावाला चाललोय परत." शिवम.
" तुला नेमक म्हणायचं काय?" कपाळावर आठ्या आणत अजिंक्यने विचारले.
" अजुन काय म्हणु....तीन दिवस झाले त्या कंपनीत इंटरव्हु देऊन त्याचा काहिच रिप्लाय नाही.जिथे रिस्युम दिलेत त्यांचा तर पत्ताच नाही. दोन वर्ष झालेत यार बी.ई. होऊन वाटल पुण्यात तरी जॉब मिळेल पण काय ऊपयोग त्या फस्ट क्लास डिस्टिंक्शन मार्कस मिळवुन....." शिवम एकदम शांत झाला.
"झालं तुझ बोलुन्??की अजुन काही बाकी आहे?अरे काय तु तुला आठवतं लहानपणी तुला झाडावर चढता येत नाही म्हणुन सगळी मुलं तुला चिडवायचे तेव्हा किती जिद्दीने तु प्रयत्न करायचास.आणि कोणत्याही गोष्टीत जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत धडपड करत राहायचास....आणि आता??" अजिंक्य त्याला समजावुन सांगत होता.पण त्याचे भाषण थांबले ते शिवमला आलेल्या फोनमुळे.
"हॅलो...." असं म्हणत शिवम एकदम शांत झाला
"शिवम काय झालं? कुणाचा फोन होता?" अजिंक्यने सवाल केला.
" याहू................त्या दिवशी इंटरव्हु दिलेल्या कंपनीत माझ सिलेक्शन झालंय..." शिवम आनंदाने ओरडला.
आणि ते उदास वातावरण अचानक सुखमय झाले.
सोमवारपासुन शिवमला कंपनीत बोलावले होते.
शेवटी तो दिवस आला.कंपनीत सगळ्या फॉरम्यालिटीज झाल्यानंतर त्याला डेव्हलोपमेंट डिपार्टमेंट देण्यात आले.
तिथल्या मॅनेजरने शिवमचे स्वागत केले.
"वेलकम मि. शिवम चला मी तुम्हाला तुमच काम समजुन देतो." मॅनेजर.
असं म्हणत तो शिवमला काहीतरी सांगत होता.इतक्यात एका मंजुळ आवाजाने शिवमचे लक्ष वेधले.
"सॉरी सर जरा उशीर झाला." ती तरुणी म्हणाली.
तिचे केस वार्‍यावर भुरभुर उडत होते.तिचे नाक पोपटासारखे लांबट होते चेहरा निमुळता होता.तिच्या निळ्या डोळ्यांकडे सारखे पाहावेसे वाटे. तिच्या गुलाबी गालाकडे शिवम पाहातच राहीला.ती तरुणी स्वर्गातुन आलेली अप्सराच वाटत होती.
"शिवम मी तुमची ओळख करुन देतो.ही स्वरांजली तुमच्याच टीममध्ये काम करेल.आणि स्वरा,हा शिवम.आजच नविन आलेत"
मॅनेजर ओळख करुन देत म्हणाला.
"हाय" शिवम लगेच बोलायला पुढे सरसावला. पण स्वरा तशीच निघुन गेली.
"शिवम, तिच्या वागण्याचं वाईट नको वाटुन घेऊस.तशी ती एकदम फ्री आहे.पण त्या घटनेनंतर ती अशी झालीये."मॅनेजर.
"अशी कोणती घटना घड्लीये तिच्यासोबत??" शिवमने सवाल केला.
" अ‍ॅक्चुअली तिची एक मैत्रीण होती.इथेच काम करत होती.जिच्या जागेवर आता तु काम करणार आहेस."
"तिचं काय झालं?" मॅनेजरचे बोलणे पुर्ण व्हायच्या आत न राहवुन शिवम ने प्रश्न केला.
" ती नाहीये या जगात.एका दुर्दैवी घटनेत तीच निधन झालं.तिच नाव........" इतक्यात मॅनेजरला कुणाचा तरी फोन आला.
आणि तो तसाच निघुन गेला....

कथा

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

26 Nov 2014 - 9:19 am | टवाळ कार्टा

दोन वर्ष झालेत यार बी.ई. होऊन वाटल पुण्यात तरी जॉब मिळेल पण काय ऊपयोग त्या फस्ट क्लास डिस्टिंक्शन मार्कस मिळवुन

कंची युनीर्शीटी म्हन्हायची ही? महाराष्ट्रातल्या कोणत्याही इंजिनीरींग कॉलेजमधे फस्ट क्लास डिस्टिंक्शन मिळवणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असतात

be realistic

बाकी चालूदे :)

टवाळ कार्टा's picture

26 Nov 2014 - 9:20 am | टवाळ कार्टा

आणि फस्ट क्लास डिस्टिंक्शन हि द्विरुक्ती झालीय...का आणखी कोणत्या टाईपचे डिस्टिंक्शन असते :)

तुषार काळभोर's picture

26 Nov 2014 - 11:39 am | तुषार काळभोर

"फर्स्ट क्लास विथ डिस्टिन्क्शन" असं असतंय त्ये...

टवाळ कार्टा's picture

26 Nov 2014 - 2:15 pm | टवाळ कार्टा

मला म्हणायचे होते डिस्टिन्क्शन लिहिले की त्यातच फर्स्ट क्लास आलाच

तुषार काळभोर's picture

26 Nov 2014 - 5:14 pm | तुषार काळभोर

हॉपिशियली सर्टिफिकेटवर "फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन" असंच असतंय..

(रस्त्याच्या कडं-कडंनं, अर्थ बघितला तर तुम्ही बरोबर म्हणताय, पण फ्याक्ट असं हाये)

कपिलमुनी's picture

26 Nov 2014 - 1:52 pm | कपिलमुनी

@टवाळ कार्टा

महाराष्ट्रातल्या कोणत्याही इंजिनीरींग कॉलेजमधे फस्ट क्लास डिस्टिंक्शन मिळवणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असतात

आजकाल भरपूर मार्क्स वाटतात .
सध्या फस्ट क्लास विथ डिस्टिंक्शन एकाच कॉलेजमधे १०-१५ जण सहज असतात

टवाळ कार्टा's picture

26 Nov 2014 - 2:16 pm | टवाळ कार्टा

:(

आजकाल चांगले मार्कस असुनसुद्धा कंपनी घेत नाहीत.कारण त्यांना नो बॅकलॉग स्टुडंट पाहिजे असतात. पण एखाद्या तरी सेमेस्टरला बॅकलॉग राहतोच.मी मुद्दाम इथे computer engineering चा उल्लेख केलाय कारण त्याची सध्या अशीच परिस्थीती चालु आहे.आणि ktc सारख्या बर्‍याच कंपन्या खोट्या निघाल्या आहेत. I am realistic.आणि ६५ पेक्षा जास्त मार्कस मिळवणारे बरेच आहेत. बोटावर न मोजता येणारे....

टवाळ कार्टा's picture

26 Nov 2014 - 10:25 am | टवाळ कार्टा

एखाद्या तरी सेमेस्टरला बॅकलॉग राहतोच

याबाबतीत असहमत...कोणत्याही इंजिनीअरींगच्या विषयात पास होण्याइतपत गुण तो विषय समजून घेतला तर नक्कीच मिळतात...फक्त "समजून घेणे" याच्या व्याख्या प्रत्येक विद्यार्थ्याप्रमाणे बदलतात

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Nov 2014 - 1:19 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तुमच्या मताबद्दल आदर आहे. पुणे युनिव्हर्सिटीच्या गलथान कारभाराचा फटका कदाचित तुम्हाला माहित नसावा. मी स्वतः युनिव्हर्सिटी रँकर आहे. एका एम-३ मुळे वाय डी झालो मी. ७ व्या प्रयत्नाला निघाला. आक्ख्या ईंजिनिअरिंगमधे लागलेली एकमेव के.टी. आणि गमतीची गोष्ट अशी की माझं स्वतःचं गणित अतिशय उत्तम आहे. लायनीनी ६ अट्टेंम्प्ट्स मधे २७ मार्क्स होते. २६ नाही की २८ नाही. किती गलथान कारभार आहे ते फक्त अश्या अनुभवामधुन गेल्यावर कळतं फक्त.

टवाळ कार्टा's picture

26 Nov 2014 - 2:17 pm | टवाळ कार्टा

भेंडी...आयमाय स्वारी तुमच्या भावना दुखावल्याबद्दल :(

तुषार काळभोर's picture

26 Nov 2014 - 5:22 pm | तुषार काळभोर

पुणे विद्यापीठ
एस ई ला बाकी सगळं निघालं.
एम३ राह्यला.
टीईला पण सगळं निघालं.
एम३ राह्यला.
क्रिटीकल वायडी!!
(एसईला २+ टीईला२ + वायडीत १=५ अटेम्प्ट्मध्यी नाय निघला. ६व्यांदा नसता निघाला तर आणखी एक वर्ष गेलं असतं.)
मग सहाव्या अटेम्प्ट्ला पुस्तकच घेऊन बसलो!!
च्यायला!! ४० पडले ना भाऊ!!
(५अटेम्प्ट=३०,२६, २४, ०, १७)

कपिलमुनी's picture

26 Nov 2014 - 6:01 pm | कपिलमुनी

एम३ वर एक शतकी धागा निघेल ;)

आता धागा इंजिनीयरींग कडे झुकला आहे तर विचारतो.
कराड इं. कॉलेज मधुन 2006 ते 2011 मधुन पास औट कुनी हाय का ?

टवाळ कार्टा's picture

26 Nov 2014 - 7:20 pm | टवाळ कार्टा

०?????

तुषार काळभोर's picture

28 Nov 2014 - 2:00 pm | तुषार काळभोर

:)

टवाळ कार्टा's picture

28 Nov 2014 - 2:03 pm | टवाळ कार्टा

चायला लागोपाठ ३ फेल नंतर डायरेक्ट गैरहजर...लैच डेरिंगबाज हाय वो तुमी :)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Nov 2014 - 9:46 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

लायनीनी ६ अट्टेम्प्ट २७...हैट आहे. युनिव्हर्सिटीनी वर्ष खाल्लं एक. :(...!!!

कपिलमुनी's picture

26 Nov 2014 - 1:54 pm | कपिलमुनी

बाकी सर्व विषय पास होउन गणितात ० मार्क्स देण्याचा पराक्रम केला होता. कोर्ट कचेरीपर्यंत वेळ आणली होती.

टवाळ कार्टा's picture

26 Nov 2014 - 2:18 pm | टवाळ कार्टा

हायला .... साष्टांग नमस्कार तुम्हाला...

खटपट्या's picture

26 Nov 2014 - 9:33 am | खटपट्या

भाग थोडे मोठे येउद्यात. !!!
पु.भा. प्र.

स्पंदना's picture

26 Nov 2014 - 10:22 am | स्पंदना

बरं!
टाका पुढचा भाग.
अन टका जरा गप्प बसा. आधी सांगू तरी द्या कथा.

समीरसूर's picture

26 Nov 2014 - 11:44 am | समीरसूर

रहस्य चांगल्यापैकी विणलं जातंय. लिखाण थोडं तुटक वाटतंय. कथा लवकर संपवण्याची घाई तर नाहीये ना? :-) लिखाण थोडं मोकळं आणि विस्तृत होऊ द्यायला हरकत नाही. त्यामुळे कथेचा आनंद वाढेल. बाकी प्रसंगांची रचना जमली आहे. शुभेच्छा! :-)

चेतन677's picture

26 Nov 2014 - 11:55 am | चेतन677

कथा संपवण्याची थोडीशी घाई आहे...कारण थोड्याच दिवसांत काॅलेज सुरु होणार आहे..तरीही कथा विस्ताराने लिहायचा नक्कीच प्रयत्न करेन...

कॉलेज सुरु होणार आहे. कॉलेजात बसुन लीवा की !! कॉलेजची लायब्ररी तर उत्तम ठिकाण !!
बगा कसं जमतंय ते.

कविता१९७८'s picture

26 Nov 2014 - 12:16 pm | कविता१९७८

पण खुपच लहान भाग टाकताय तुम्ही , जरा मोठे भाग येउ द्या.

चेतन677's picture

26 Nov 2014 - 12:29 pm | चेतन677

मी प्रथमच काहीतरी लिहित आहे...म्हणुन सुरवात लहान कथेपासुन कराविशी वाटते....कथेचा अंतिम भाग लवकरच...ही कथा तुम्हाला आवडली तर लगेचच एका दुसरया मोठया कथेचे पुस्तक छापण्याचा विचारआहे!!!!!

कविता१९७८'s picture

26 Nov 2014 - 12:34 pm | कविता१९७८

कथा आवडली मस्तय..

मुक्त विहारि's picture

26 Nov 2014 - 9:53 pm | मुक्त विहारि

पुभाप्र.