जेणेकरून संसदेत त्यांना हवा तो लोकपाल चा कायदा ते लवकरात लवकर अस्तित्वात आणू असा माझा अंदाज होता भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याचे स्वप्न असलेल्या केजरीवाल व त्यांच्या पक्षाचे प्रमुख ध्येय त्यांचे बहुसंख्य खासदार लोकसभेवर निवडून आणणे आहे.
ह्यासाठी त्यांनी स्वतः दिल्लीतून लढून निवडून यायला हवे जेथे नुकतेच विधानसभेत त्यांच्या पक्षाला यश मिळाले.
आजपर्यंत राजकारणातील राखी सावंत म्हणून ओळखल्या जाणार्या केजू ह्यांनी आता मोदी ह्यांच्या विरुद्ध लढण्याचे ठरवले आहे.
मुळात त्यांना असा राजकीय स्टंट करायचा होता तर त्यांनी अमेठी मधून उभे राहायचे होते ,तेथे त्यांची निवडून यायची खास शक्यता असती.२००४ वागलात ९२ पासून भाजपचा गड असलेल्या वाराणसी जेथे हिंदुत्वाचा शिक्का बसलेले नमो उभे आहेत त्यांच्या समोर आ देखे जरा ,कीस मे कितना हे दम अश्या फिल्मी पद्धतीत आव्हान देणे हायत राजकीय शहाणपण किती व स्टंटबाजी किती आहे
आता त्यांच्या ह्या निर्णयामुळे काही शंका मनात येतात.
केजू हे नेहमी व्यक्तीकेंद्रित टीका व आरोप करतात. कधी अंबानी तर कधी मोदी.राजकारणातील ते सुपारीबाज आहेत का
ते परकीय शक्तींचे हस्तक आहेत का
त्यांच्याकडे एक पक्ष स्थापन झाल्यावर भष्टाचार विरोधी मुद्दा सोडल्यास इतर काही मुद्दे आहेत का
विकासावर अर्थव्यवस्थेवर , त्यांची मते , भविष्यातील भारत
परराष्ट्र धोरण , संरक्षण धोरण आणि बरेच.....................
त्यांच्या पक्षातून काही त्यांना सोडून गेले व जातांना त्यांच्यावर टीका केली त्यात कितपत तथ्य आहे.
नुकतीच महाराष्टार्त गारपिटीने बळीराजा हैराण झाला असून केजू ह्यांना नागपुरात फंड रेजिंग सुचत आहे.राजकारणात केजरीवाल ह्यांचे नक्की काय चालले आहे
ते दुसरे जेपी होणार का जनतेच्या अपेक्षा उंचावून प्रत्यक्ष सत्तेवर आल्यावर त्यांना भ्रमनिरास करणे म्हणजे परत सत्तेच्या चाव्या गांधी घराण्याकडे.
केजरीवाल हे राजकारणातील राखी सावंत आहेत.
त्यांना नेहमी एक भीती असते उद्या अण्णा परत आंदोलनात उतरले आणि जनतेने त्यांना पाठिंबा दिला तर प्रसार माध्यमे ह्यांच्याकडे पाठ दाखवतील व परत आण्णाच्या मागे धावतील , प्रसार माध्यमांना काय नगाला नग हवा म्हणून ह्या ना त्या मार्गाने चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
उद्या जर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागले तर चर्चेत राहण्यासाठी बिग बॉस व झलक दिख ला जा असे पर्याय त्यांच्यासाठी नक्कीच उपलब्ध आहेत
माझ्यामते एक आंदोलक म्हणून एका मुद्यावर रान उठवणे सोपे असते पण राजकारणात एका पक्षाचा प्रमुख झाल्यावर पक्षाची अनेक विषयांवर धोरण सर्व सामान्य माणसापर्यंत पोहचवणे हे पक्षप्रमुखाचे काम आहे.
आतापर्यत आप हा पक्ष फक्त आरोपांच्या फैरी झाडत आहे व त्यांचे समर्थक त्याची री ओढत आहे.
भारताच्या बहुसंख्य जनतेचे गावातील व शहरातील मुलभुत प्रश्न , त्यावर उपाय ह्यावर बोलणे कटाक्षाने टाळले केले आहे.
सत्तेवर असतांना व बाहेरून नुसत्या आंदोलनाने देश चालवता येतो का
हेच कळत नाही आहे
ता.क
आता राहुल सुद्धा वाराणसी मधून आपली उमेदवारी घोषित करणार का
तुम्हाला काय वाटते
प्रतिक्रिया
18 Mar 2014 - 12:52 pm | मंदार दिलीप जोशी
येक उमेद्वार म्हंतोय काश्मीर पाक्ड्यांना द्या, दुस्रा सीमी सार्क्या आतंक्वाद्याना सपोर्ट कर्तोय, एकाचे माओवाद्यांशी संबंद्ध आहेत, एक वकील असून काय्दा हातात घेऊन खुद्द दिल्लीत आप्च्या कम्रेचं फेड्तोय, एक मुंबैच्या बाई बिल्डर कंपनीच्या भ्रश्टाचारात गूंतल्यात.
देशद्रोही लोकांमध्ये दम असतोच. बंदे मे है दम :D
18 Mar 2014 - 5:51 pm | चिगो
हे एक सालं आणखी एक डोकं तापवणारं नाटक.. दुसर्यांच्या चुकांसाठी सरळ त्यांना चोर, देशद्रोही ठरवणारा, त्यासाठी धरण्यावर, उपोषणावर बसणारा हा सद्गृहस्थ जेव्हा आपल्या बगलबच्चांसाठी "तो होता है ना.. हो गयी गलती उनसे. इतनी क्या बडी बात हैं?" वगैरे बोलायला लागतो, तेव्हा 'आपला तो बाब्या..' म्हणजे काय ते कळतं..
18 Mar 2014 - 6:25 pm | क्लिंटन
एकही मारा लेकिन क्या सॉलिड मारा :)
काश्मीरात सार्वमत घ्यावे किंवा काश्मीरात हुर्रियत कॉन्फरन्सच्या नेत्यांमधील मतभेदांमुळे "इंडियन स्टेट" विरूध्द लढा कमजोर पडेल याची चिंता असलेल्या पक्षाला दरमहा १००-२०० रूपये लाईटचे बिल कमी यावे म्हणून मत देऊन मी तरी देशद्रोह करू इच्छित नाही.That's it.
18 Mar 2014 - 11:45 pm | निनाद मुक्काम प...
मी ह्यावेळी भारतात खास मतदानाला येणार आहे
.
केजू च्या विरोधात जमेल तितका प्रचार करणार
18 Mar 2014 - 11:47 pm | विकास
त्यांनी गांधी घराण्या विरुद्ध फारसं कधी न बोलल्यानी प्रबळ होत असावा..
सोनीयाजींबद्दल कदाचीत त्यांच्या मनात नितांत आदर असावा म्हणून ते बोलत नसावेत. तसे ते स्वभावाने खूप चांगले आहेत. ;)
18 Mar 2014 - 12:55 pm | संपत
माझ्या अल्प मतीनुसार काही उत्तरे
१. कॉंग्रेसने आआपच्या सर्व अटी मान्य करून पाठिंब्याचे पत्र उपराज्यपालाना दिले. भाजपने पाठींबा दिला नव्हता.
२. काही अंशी सहमत. पण ते कारवाई करणार होते असे दिसते. ह्याबद्दल माझे मत मी आआपच्या दिल्लीतील दुसऱ्या टर्म नंतर बनवीन. तेव्हाही त्यांनी काही केले नाही तर नक्कीच गडबड आहे,
३. निवडणुकीतील प्रमुख आश्वासन पूर्ण करण्याची काही शक्यता नसताना ते सत्तेवर राहिले असते तर त्यांच्यात आणि भाजपात फरक काय राहिला? त्यांना आपली क्षमता दाखवून दिली. आता पूर्ण बहुमताने येऊन आपली आश्वासने पूर्ण करणे नक्कीच योग्य आहे.
४. फिजिबिलिटी म्हणजे काय? योजना प्रत्यक्षात येण्यालायक नव्हती असे तुम्हाला का वाटते ? आर्थिक बोजा मान्य आहे. पण तो कुठल्याही सबसिडीत पडतो. पण सबसिडी हा भारताच्याच नव्हे तर जागतिक राजकारणाचा एक भाग आहे. सबसिडी द्यावी कि नाही हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे.
५. दिल्ली निवडणुकीत आणि त्याआधी आआपचा मुख्य रोख कॉंग्रेसच होती. रोबर्ट वध्रांवर त्यांनी केलेली टीकेचे वीडीओ युटूबवर मिळतील. आता भाजप सत्तेवर येणार असे दिसत असताना त्यांनी आपला रोख तिकडे वळवणे योग्यच आहे. हेच कारण मला आता ते लालूच काय पण इतर कोणावर फारशी टीका न करण्याचे वाटते. पण लालूंवर त्यांनी या आधी टीका केल्याचे आठवते.
18 Mar 2014 - 10:11 pm | आजानुकर्ण
पण भाजपाने 'आआपा'ला पाठिंबा देऊ केला होता असे वाचनात आले नाही. चूकभूल द्यावीघ्यावी.
18 Mar 2014 - 10:17 pm | क्लिंटन
हे घ्या.
बाकी चालू द्या.
18 Mar 2014 - 10:22 pm | आजानुकर्ण
धन्यवाद. नक्की आठवत नसल्यानेच चूकभूल द्यावीघ्यावी म्हटले होते.
18 Mar 2014 - 10:47 pm | संपत
बातमी पुन्हा वाचा. भाजपने सरकार स्थापन झाल्यास सहकार्य करू असे म्हटले आहे. पाठींबा दिला नव्हता. जनतेच्या हिताच्या मुद्द्यांवर सहकार्याचे आश्वासन प्रत्येक विरोधी पक्ष देतो. त्याला पाठींबा म्हणत नाहीत.
18 Mar 2014 - 10:55 pm | आजानुकर्ण
हम्म. इंटरेष्टिंग
19 Mar 2014 - 1:56 am | विकास
जनतेच्या हिताच्या मुद्द्यांवर सहकार्याचे आश्वासन प्रत्येक विरोधी पक्ष देतो.
इतके मर्यादीत नव्हते. त्याच बातमीतले हे वाक्य वाचा:, "..If AAP is really serious about fulfilling these promises, then it should go ahead and form a government and BJP will provide whatever cooperation is required," Goel said.
एकेंनी आधी म्हणले होते की मुलांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतो की भाजपा-काँग्रेसला सपोर्ट देणार नाही की घेणार नाही... त्यांनी ते अर्धवट पाळले. मला आठवते त्याप्रमाणे आणि त्यांच्या टिव्हीवरील म्हणण्याप्रमाणे त्यांना पाठींबा असल्याचे काँग्रेसने नायब राज्यपालांना कळवले पण ते आणि काँग्रेस कधीच बोलले नाहीत. त्यांना तसेच भाजपाकडून मिळाले असते तर हवे होते. भाजपाचे म्हणणे होते की ताकाचे भांडे पब्लीक करा, ताक मिळेल.
19 Mar 2014 - 11:08 am | संपत
cooperation = सहकार्य. आणि हे सहकार्य आप सरकारला आहे.. सरकार बनवण्यासाठी नाही.
म्हणजे तुम्ही हे मान्य करताय कि भाजपने पाठींबा दिला नव्हता.
19 Mar 2014 - 5:34 pm | विकास
"...will provide whatever cooperation ..." ह्याचा अर्थ ज्याची गरज आहे तेथे. जर बहुमतासाठी गरज आहे म्हणून आप/एके अॅप्रोच झाले असते तर त्यात देखील अंतर्भूत होते असे म्हणता येईल. पण आपणहून आपच्या मागे जाण्याचा प्रश्नच नव्हता. गरज आप ला असल्यास ती बोलून भाजपाने कशाला दाखवा? काँग्रेसने दाखवली कारण त्यांना काही पर्यायच नव्हता. आणि कदाचीत त्याचा उपयोग लोकसभा निवडणूकात होऊन नंतर आप सरकार पाडता येईल असा काहीसा हिशेब त्याच्यात होता. पण या वाघ्याचा पागा झाला आणि काँगेसचे गाढव आणि ब्रम्हचर्य लंपास झाले! :(
19 Mar 2014 - 7:13 pm | संपत
तात्पर्य काय तर भाजपने आआपला पाठींबा दिला नव्हता.
19 Mar 2014 - 8:01 pm | विकास
आपला भांडे न दाखवता ताक हवे होते.
18 Mar 2014 - 11:38 am | ऋषिकेश
बाकी काही असो, येनकेनप्रकारेण या श्री.केजरीवाल यांनी भाजपाची झोप पुरेपूर उडवली आहे! एका व्यक्तीविरूद्ध इतकं स्लेजिंग केजरीवालांच्या आधी फक्त मोदींविरूद्ध झाले असेल. आता केजरीवाल त्याही बाबतीत मोदींना टफ फाईट देताहेत.
18 Mar 2014 - 12:13 pm | बॅटमॅन
यद्यपि केजरीवालांनी अजून सबुरीने घेतल्यास लाँग टर्म फायदा जास्त होईल.
(गॉथम मनपा मधील पार्टटैम मूषकमारू) बॅटमॅन.
18 Mar 2014 - 6:56 pm | अर्धवटराव
राजकारणी केजरीवाल फार उत्तम मुव्ह करतोय हे तर निर्वीवाद. भाजपाचं दुखणं असं कि केजरीवालांनी राजकारणात ल एण्ट्री केल्यानंतर त्यांना भाजपने पुरेसं सिरियसली घेतलं नाहि. आता पाणि गळ्याशी आल्यावर कुठलाच नवा डाव रचता येत नाहि...लोकसभा निवडणुक हाकेच्या अंतरावर आहे.
पण हा डाव केजरीसाहेबांवर देखील उलटु शकतो. आपली जनता जरा जास्तच महान आहे. जर अस्थीर केंद्राच्या झळा बसायला लागल्या आणि त्यावर आआप कडे उतारा नसला तर आआपला डोक्यावर घेणारी जनता त्यांना क्षणात पायदळी तुडवेल. नॉट गुड फॉर भारतीय पॉलिटिक्स.
18 Mar 2014 - 2:34 pm | निनाद मुक्काम प...
@पिलियन रायडर
तुम्ही मिपावर राजकारणात कधीच एका पक्षाचा कैवार घेत नाहीत. हे सुज्ञ मिपाकरांना अनुभवाने ठाऊक आहे.
पण सुरवातीला सर्व सामान्य जनतेच्या अपेक्षा उंचावणारे
केजू सध्या त्यांच्या संशयास्पद राजकीय चालीच्या मुळे
अनेकांच्या मनात त्यांच्या विषयी प्रश्न चिन्ह निर्माण करत आहेत.
तुम्हाला काही मुलभुत शंका मनात आल्या त्या तुम्ही मांडल्या
पण आप समर्थक व्यक्ती पूजेने एवढे आंधळे झाले आहेत की
त्यांना मुद्देसूद प्रतिसाद सोडा पण खरच हा माणूस आता आम आदमीसाठी लढत आहे का स्वतःच्या राजकीय पक्षाच्या अस्तित्वासाठी लढत आहे.ह्याबद्दल विचार सुद्धा करावासा वाटत नाही आहे.
व्यक्तीपूजेने आंधळे समर्थक दुसरे काय
18 Mar 2014 - 4:41 pm | विवेकपटाईत
शेरखानच्या सांगण्या वरून तवाकी, महाबली रेड्याविरुद्ध उतरला आहे. त्याच्या सांगण्यावरूनच इंद्रप्रस्थ नावाचा जंगलातून हद्दपार झाला.
बाकी आमच्या प. दिल्ली वरून उभे राहणारे जरनेल सिंह यांची योग्यता 'त्यांनी चिदम्बरम साहेबांच्या तोंडावर जोडा फेकला होता'. कल्पना करा संसदेत काय होईल.
18 Mar 2014 - 5:50 pm | गब्रिएल
बाकी आमच्या प. दिल्ली वरून उभे राहणारे जरनेल सिंह यांची योग्यता 'त्यांनी चिदम्बरम साहेबांच्या तोंडावर जोडा फेकला होता'. कल्पना करा संसदेत काय होईल.लई ब्येष्ट इचावंताना इचारा ना. त्येंच्या म्हनन्यापर्मानं हे "एकसोएक क्रेडेंशियल्स" (लय कटीन श्यब्द बर्का, कापी पेष्ट क्येलय) हैती बर्का. आता बगा तुम्च्या या चुकीवर १०,००० शबुदांचा लई भारी (मंग दुस्र काय म्हनन्याचि बिशाद हाय काय कोनाची :) ?) पर्तीपर्तीसाद येतोय बर्का. ढाल घेउन तयारित र्हावा +D18 Mar 2014 - 8:40 pm | संपत
जरनेल सिंह संसदेत गेले तर काय होईल ह्याची काळजी वाटणे साहजिकच आहे. तुमची चिंता दूर करेल अशी ही बातमी वाचा.
भाजप काँग्रेसच्या ३० % उमेदवारावर गुन्हेगारी खटले
18 Mar 2014 - 10:26 pm | आजानुकर्ण
http://indianexpress.com/article/india/politics/the-numbers-story-list-o...
येथेही माहिती आहे. महाराष्ट्रातील ४८ टक्के सध्याच्या लोकप्रतिनिधींवर खटले दाखल आहेत.
18 Mar 2014 - 11:59 pm | विकास
तुम्ही दिलेल्या हिंदूस्तान टाईम्सच्या बाबतीत काँग्रेसला बिचार्यांना उगाचच गोवले आहे... आप च्या संकेतस्थळावर जर पाहीले असते तर समजले असते की काँग्रेस त्यातली नाही म्हणून...

19 Mar 2014 - 10:15 am | संपत
ही लिस्ट ६ मार्चची आहे. तोपर्यत काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर केले नव्हते. आणि आम्ही कधी म्हटले कि आम आदमी पार्टीत गुन्हेगार नाहीत म्हणून? प्रतिक्रिया जर्नेल सिंग सारखे क्रूरकर्मा संसदेत जातील या चिंतेला उत्तर म्हणून दिले होते.. कि काँग्रेस आणि भाजप देखील तयारीत आहे केजरीवाल आणि जर्नेलसिंगना तोंड देण्यासाठी.
19 Mar 2014 - 5:22 pm | विकास
आम्ही कधी म्हटले कि आम आदमी पार्टीत गुन्हेगार नाहीत म्हणून?
याला मराठीत म्हण आहे: "आपलं ठेवायचे झाकून आणि दुसर्याचे पहायचे वाकून"!
19 Mar 2014 - 1:02 am | विकास
भाजपा काँग्रेसच्या ३०% उमेदवारांवर गुन्हेगारी खटले? मग या केजरीवाल मधे खरेच दम आहे! दिल्ली विधानसभा निवडणुक अर्जाप्रमाणे त्या वेळेस एकट्या केजरीवालांवरच ९ गुन्हेगारी खटले चालू होते! त्याव्यतिरीक्त आता नवीन चालू झालेले खटले वेगळेच. खालील काही दुवे पाहीले तर समजेल.
मराठीकरण करण्याचा कंटाळा करत आहे...
Arvind Kejriwal gets summons in Nitin Gadkari case
... Metropolitan magistrate Gomati Manocha summoned Kejriwal as an accused on April 7, saying, "In these circumstances, this court is prima facie satisfied that there is sufficient material on record to proceed against the accused for the offence under section 499/500 (defamation) IPC." ...
Court imposes fine of Rs 2,500 each on Arvind Kejriwal, Manish Sisodia
A court here today imposed a fine of Rs 2,500 each on top AAP leaders Arvind Kejriwal and Manish Sisodia for their failure to appear before it... (कारण काय तर केजरीवाल बंगलोरमधे आपच्या प्रचारात व्यस्त होते! त्यामुळे कोर्टात जाणे शक्य नव्हते. अर्थात टाळाटाळ करत खटला निवडणूकीच्या नंतर येईल हे बघायचे)
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळेसचः Arvind Kejriwal among five AAP candidates facing criminal cases
Arvind Kejriwal declares nine criminal cases against him and assets worth Rs.2 crore
(९ आणि ५ मधील फरक माहीत नाही. त्यांच्या उमेदवारी अर्जाप्रमाणे ५ गुन्हेगारी खटले आहेत).
आता एके व्यतिरीक्त इतर काही सन्मान्य स्पेशल आम आदमी बघुयात!
Delhi LG seeks President's assent for criminal case against Somnath Bharti
Delhi law minister Somnath Bharti was once unethical spammer
Somnath Bharti was indicted for 'tampering with proof'
----------------
आता शेवटी अजून एक गोष्ट बघूयात... मोदी आणि केजरीवाल यांच्या (अनुक्रमे गुजरात आणि दिल्ली विधानसभा) उमेदवारी अर्जातील प्रमुख गोष्टींची तुलना. (source: myneta.info)
Candidate
Constituency
Party
Criminal Case
Education
Total Assets
Liabilities
Narendra Modi
MANINAGAR
BJP
0
Post Graduate
Rs 1,33,42,842
0
Arvind Kejriwal
NEW DELHI
Aam Aadmi Party
5
Graduate Professional
Rs 2,10,48,389
Rs 41,23,550
18 Mar 2014 - 6:26 pm | श्रीगुरुजी
मोदींविरूद्ध उभे राहणार्या केजरीवालांनी कमालीची चतुराई दाखविली आहे. आपण २३ तारखेला निर्णय घेऊ असे २ दिवसांपूर्वी सांगून त्यांनी इतरांची उत्कंठा वाढविली आहे. आता २३ तारखेपर्यंत वाहिन्या केवळ ते उभे राहणार की नाही हाच विषय चघळत बसतील. तिथल्या जनतेला विचारून आपण ठरवू असे सांगून केजरीवाल उमेदवारीचा देखील इव्हेंट करतील. फोकस सतत आपल्यावर राहील याची पुरेपूर काळजी ते घेत आहेत.
ते वाराणशीतून उभे राहणार हे नक्की. त्याआधी जनतेच्या आग्रहामुळे आपण उभे आहोत हे सांगण्याचा पुरेपूर ड्रामा ते करणार. त्यानंतर मतदानाच्या दिवसापर्यंत बहुतेक दिवस ते वाराणशीतून प्रचाराच्या अभिनव कल्पना लढवतील व सतत प्रकाशझोतात राहतील. कदाचित ते निवडून सुद्धा येतील कारण वाराणशी भाजपसाठी अवघड मतदारसंघ आहे आणि जर इतर सर्व पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला तर मोदी पडतील.
पण वाराणशीत अडकून पडल्यामुळे त्यांना आपल्या पक्षाच्या इतर उमेदवारांसाठी प्रचाराला फारसा वेळ मिळणार नाही. पक्षासाठी प्रचार करायचा का स्वतःसाठी पूर्ण वेळ द्यायचा हा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे असेल. पण ते प्रसिद्धीसाठी हपापलेले असल्याने पक्षाकडे दुर्लक्ष करून केवळ स्वतःच्या विजयासाठी जिवापाड प्रयत्न करतील. केजरीवाल जिंकतील पण त्यांच्या पक्षाची वाढ फारशी होणार नाही.
18 Mar 2014 - 6:51 pm | संपत
डरना जरुरी है :) करून जातील अडवाणी राव आणि केजरीवालांचे नाव. जूनमध्ये मिपावर केजरीवाल हे अडवानींचे हस्तक कसे आहेत ह्याचे लेख आले नाही म्हणजे मिळवलं.
19 Mar 2014 - 1:18 am | विकास
अडवाणी - मोदी लांब राहूंदेत... एक फरक नक्की सांगतो. आज जे कोणी मोदींना आणि भाजपाला पाठींबा देत आहेत ते सद्यस्थितीने त्रस्त झालेल्यातला एक भाग आहेत. त्यांना असे वाटते की मोदी-भाजपा-एनडीए ला संधी देण्यात काहीच हरकत नाही.
उद्या खरेच मोदी-भाजपा-एनडीए सत्तेवर आले आणि त्यांनी अगदी केजरीवालांसारख्या माकडचेष्टा लांब राहूंदेत पण जे अपेक्षित आहे तसा राज्यकारभार चालवला नाही, व्यवस्था सुधारली नाही तर ते त्याच मोदी-भाजपा-एनडीए वर जाहीर टिका करायला कमी करणार नाहीत आणि पुढच्या निवडणुकात त्यांना घरी बसवायला देखील मागे पुढे पहाणार नाहीत.
केजरीवाल समर्थकांचे उलटे आहे. त्यांच्या चुका देखील झापडे लावल्याने दिसत नाहीत अशी अवस्था आहे असे म्हणता येईल. दिल्लीतल्या तमाशानंतर हे सिद्ध झालेले आहे...
कारण काही असुंदेत पण, "मोदी समर्थक हे वरकरणी मोदी वाटले तरी देशाचा जास्त विचार करणारे वाटतात तर केजरीवाल समर्थक हे देशापेक्षा त्या व्यक्तीचे समर्थक वाटतात" असे म्हणले तर चुकीचे ठरेल का?
19 Mar 2014 - 1:51 am | अर्धवटराव
एकदा केजरीवालांना (किंवा इतर कुणालाही) चारित्र्याचं, पावित्र्याचं, अंतर्बाह्य शुद्धतेचं सर्टीफिकेट दिलं कि जनतेला आंधळेपणाची मजा भोगायला मोकळीक मिळते... व कालांतराने वास्तव समोर आलं कि कलियुग/लोकांची लायकी/सिस्टीम मधले दोष इत्यादींच्या नावे शिमगा करायला जनता तयार असते.
19 Mar 2014 - 5:52 am | विकास
सहमत आणि त्यापुढे सतत "I am a small man..." म्हणायचे. खरे म्हणजे त्यांचे ते "मी किती साधा, लहान माणूस आहे" असले भंपक बोलणे ऐकले की चालबाज मधील "मै ऐक नन्हासा छोटासा, प्यारासा बच्चा हूं" या शक्ती कपूरच्या डायलॉगची आठवण होते,
एक होतकरू नेता ज्याला राष्ट्रीय नेतृत्वाची स्वप्ने पडत आहेत त्याने असले बाष्कळ बोलणे ऐकले की शिवरायांचे कैसे बोलणे... बदलून म्हणावेसे वाटते:
केजरीवालांचे कसले बोलणे, केजरीवालांचे कसले खोकणे, केजरीवालांचे मफलर गुंडाळणे... अरेरे...
19 Mar 2014 - 10:36 am | संपत
एक सांगू का.. आपाच्या यशाबद्दल अवास्तव अपेक्षा आआप समर्थांकापेक्षा मोदी भक्तांच्याच जास्त आहेत. आआप केवढी, तिचा जीव केवढा.. आआपला ३० च्या वर जागा मिळाल्या तर तो चमत्कार ठरेल. आआप पार्टी म्हणून जगली पाहिजे, वाढली पाहिजे आणि तिच्या धसक्याने इतर पक्षांनीही आपली राजकारण अधिक लोकाभिमुख, स्वच्छ केले पाहिजे इतकीच सध्याची अपेक्षा आहे.
सध्या मोदींना धोका त्यांच्या पक्षातर्गत विरोधकांचा आणि अमित शहासारख्या सल्लागारांचा आहे, आआपचा नाही.
दुसरी गोष्ट भाजप समर्थक नंतर भाजप वर टीका करण्याचे.. तर बाजपेयी सरकारने निवडणुकीतील प्रमुख आश्वसानापैकी (राम मंदिर, समान नागरी कायदा, काश्मीरचा विशेष दर्जा रद्द) एकही पाळले तर नाहीच पण फारसे प्रयत्नही केले नाहीत. त्याबद्दल अनेकांना काय बाजपेयी आणि अडवाणींची मुत्सद्देगिरी कि सत्ता तर टिकवली असे कौतुक करताना पाहिले आहे. अर्थात भाजप समर्थकांनी नाही पण लोकांनी त्यांना घरी बसवलेच.
19 Mar 2014 - 11:09 am | संजय क्षीरसागर
अत्यंत योग्य निरिक्षण!
ये बात! बाकी दोन मुद्यांच सोडा पण राम मंदिर हा एकमेव बालिशच मुद्दा बिजेपीला सत्तेत घेऊन आला. त्यामुळे बिजेपीच्या सत्ताकालात देशांतर्गत जातीय तेढ कमालीची वाढली.
काँग्रेस काय की बिजेपी काय, जातीय दुफळी माजवून सत्ता काबिज करणं हीच त्यांची `मुत्सद्देगिरी' !
19 Mar 2014 - 7:16 pm | अर्धवटराव
आआपचे ते 'समर्थक आणि मोदिंचे 'भक्त' हा दृष्टीकोनच मुळी चुकीचा आहे. मोदिंच्या मागे निदान सामान्य माणसाची सुशासनाची आशा आणि धनदांडग्यांचा अमाप पैसा मिळवायचा लोभ तरी आहे. पण केजरीसाहेबांकडे व्यक्तीगत करिश्म्याशिवाय विकायला काहिच नाहि. भक्तीचं लिंपण कुठे जास्त आहे मग?
आआपचा धोका मोदिंना अजिबात नाहि असं नाहि. डॉ. हर्षवर्धन ला पोचलेली झळ ताजी आहे. पण तो एकमेव धोका नाहि; किंबहुना आणखी मोठे धोके मोदिंच्या मार्गात आहे हे ही खरं. पण म्हणुन मोदिंचं राजकारण आआप केंद्रीत होणार नाहि. तेव्हढी दक्षता मोदि नक्की घेतील. स्वतः केजरीवाल मोदिंचा प्रचार करताहेत तो मोदिंच्या पथ्यावर नक्की पडेल.
वाजपेयी सरकारने अयोध्या, समान नागरी कायदा वगैरे मुद्दे का बाजुला ठेवले हे खरच तुम्हाला माहित नाहि का? नरसिंहरावांनंतर भारताच्या राजकारणाची चाललेली ससेहोलपट थांबवणं, आघाडीचं कडबोळं सांभाळत स्थिर सरकार देंणं, नव्या आर्थीक नितीची जोपासना करणं, हि कामं वाजपेयींनी प्राथमिकतेने केली. भाजपा शासनात अल्पसंख्यकांना सुरक्षीत जीवन जगता येणार नाहि हा गैरसमज वाजपेयींनी दूर केला. अपेक्षेच्या अगदी विपरीत अस सामाजीक सहोदर्याचं वातावरण निर्माण केलं. गोधरा कांड झालच, पण त्याची मिमांसा वेगळी आहे. हि केवळ मुत्सद्देगिरी नव्हती, तर ति वाजपेयी-अडवाणिंची समजुतदारी होती. २००४ ला भाजप सत्तेत का आला नाहि याची कारणं त्या निवडणुकीत एन.डी.ए च्या नंबर गेममधे आहे. शिवाय कम्युनिस्ट आणि काँग्रेसच्या आघाडीचा प्रयोग म्हटल्यावर त्यानंतरचं भाजपाचं भविष्य सांगायला ज्योतिष नको.
आआपचा एक संभाव्य धोका भाजपला नाहि तर भारताच्या राजकारणाला आहे. आआपचं राजकारण शिवसेनेच्या मराठी माणसाच्या राजकारणाच्या रुळावर जायचे चान्सेस आहेत. दोन्हिकडे जनसामान्यांचा दबल्यागेल्याचा आक्रोष आहे. भावनीक, प्रामाणिक वाटावं असं पण आक्रास्ताळलेलं, समर्थकांना विवेकाधिष्टीत मार्ग दाखवण्याऐवजी ठोकशाही वापरणारं नेतृत्व आहे. जर शिवसेनेने खरच मराठी माणसाचं भलं केलं असेल तर आप कडुन देखील आशा आहे.
19 Mar 2014 - 7:50 pm | आजानुकर्ण
ही वाक्यरचना आवडली.
19 Mar 2014 - 7:52 pm | प्यारे१
अर्ध्या लेका शिकला असतास तर बॅलिस्टर झाला असतास !
>>>जर शिवसेनेने खरच मराठी माणसाचं भलं केलं असेल तर आप कडुन देखील आशा आहे.
ह्या एका वाक्याबद्दल लई लई वेळा पार्टी नि प्यार्टी पण!
सगळंच अवांतरः
न्यूनगंड नि निव्वळ न्यूनगंड दिला राव ह्या नि अशा लोकांनी मराठी माणसाला. वडापावच्या गाड्यां वर पोरं खुश, बेकार मिलकामगार कामधंद्याला पोरं लागली म्हणून तर्रर्र.
महत्त्वाकांक्षा कॉलेजात जाण्याची नाही तर त्या भोवतालचा कामगार वर्ग बनून राहण्याची. फारच भलं झालंय मराठी माणसाचं.
असोच्च.
19 Mar 2014 - 8:42 pm | अर्धवटराव
:D
19 Mar 2014 - 8:39 pm | संपत
मग आश्वासने का दिली? खरी गोष्ट ही आहे कि भाजप बहुमतात असता तरी हि आश्वासने पाळली गेली नसती. ह्या निर्णयांमुळे निर्माण होणारे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सोडवण्याची त्यांच्यात धमकच नव्हती. त्यांचा भ्याडपणा बाबरी मस्जिद पडल्यावर जे 'तो मी नव्हेच' चे प्रयोग झाले तेव्हाच सिद्ध झाला होता. थोडक्यात भाजपने ती आश्वासने दिली होती जी पाळण्याचा त्यांचा कधीही विचार नव्हता.
माझा विरोध त्यांनी ह्या गोष्टी केल्या नाहीत ह्याला नसून त्यांच्या खोटेपणाला आहे. वाजपेयीन्बद्दल मला आदर असला तरी ह्या खोटेपणात तेही मूकपणे सामील होते.
चान्सेस आहेत म्हणजे अजून गेलेले नाही. जर जाईल तर दाखवेल कि जनता त्यांची जागा त्यांना.
उम्मीदपे दुनिया कायम है..
19 Mar 2014 - 8:45 pm | अर्धवटराव
"योग्य" वेळ येताच भाजपा (काँग्रेस, जनता दल, आप... सर्वच पक्ष) हि आश्वासने पाळतील.)भाजप म्हणाल, तर ते एका पायावर आजही या गोष्टी करायला तत्पर असेल. इथे भ्याडपणा वा शुरपणाचा मुद्दाच नाहि. इट्स अबौट टाईम.
19 Mar 2014 - 8:25 pm | विकास
आपाच्या यशाबद्दल अवास्तव अपेक्षा आआप समर्थांकापेक्षा मोदी भक्तांच्याच जास्त आहेत.
आज मोदी/एनडीए जिंकले तर ते त्यांच्या भक्तांमुळे जिंकणार नसून समर्थकांमुळे जिंकणार आहेत. आपच्या नेत्यांनी, विशेष करून केजरीवाल यांनी स्वतःच दिल्लीत सरकारस्थापनेनंतर जो तमाशा केला, मर्कटलीला केल्या त्याची तिडीक मोदी समर्थकांना आहे. जर त्यांचे आज दिल्लीत सरकार राहीले असते आणि काही प्रमाणात सुशासन दाखवले असते तर अनेक मोदी समर्थक आज आप कडे वळले असते. किमान विचार केला असता. केजरीवाल यांनी ती संधी घालवली आहे.
आआप केवढी, तिचा जीव केवढा.. आआपला ३० च्या वर जागा मिळाल्या तर तो चमत्कार ठरेल.
बरोबर आहे, पण ही बेडकी बैलाएव्हढे फुगण्याचा प्रयत्न करत आहे हे वास्तव आहे आणि त्यात झाला तर काँग्रेसला फायदा होणार आहे... अर्थात तुम्हाला आजचे सरकार अजून पुढे चालू रहावे असे वाटत असेल तर गोष्ट वेगळी...
सध्या मोदींना धोका त्यांच्या पक्षातर्गत विरोधकांचा आणि अमित शहासारख्या सल्लागारांचा आहे, आआपचा नाही.
कुठलाही खरा नेता हा अनेकार्थाने एकाकी असतो. त्यात पक्षांतर्गत पूर्ण हुकूमशाही ठेवणार्या इंदिराजी देखील आल्या... आजच्या घडीस किमान पक्षांतर्गत भाजपामधे हुकूमशाही नाही असे वाटते. थोडक्यात मोदींना इतरांच्या महत्वाकांक्षांमुळे धोका असणे साहजिक आहे. पण तो अधिक असेल का कमी होईल हे निवडणूक निकालांवर अवलंबून राहील.
तर बाजपेयी सरकारने निवडणुकीतील प्रमुख आश्वसानापैकी (राम मंदिर, समान नागरी कायदा, काश्मीरचा विशेष दर्जा रद्द) एकही पाळले तर नाहीच पण फारसे प्रयत्नही केले नाहीत.
हे म्हणजे वेड पांघरून पेडगावला जाणे झाले. अर्थात ज्या पद्धतीने आपण आधी भाजपा-काँग्रेसमधे गुन्हेगारी खटले असलेल्यांना तिकीटे दिली दाखवली आणि नंतर आपचे रेकॉर्ड दाखवल्यावर हळूच, "आम्ही कधी म्हटले कि आम आदमी पार्टीत गुन्हेगार नाहीत म्हणून?" असे म्हणायचे अणि शक्य तितकी दिशाभूल करत रहायचे, त्यातला प्रकार आहे... असो. १९९९ ची निवडणूक ही भाजपाने जिंकलेली नव्हती तर एनडीएने जिंकली होती. त्यात कॉमन मिनिमम प्रोग्रँम जो त्यातील सर्व पक्षांना मान्य होता. त्यावर आधारीत एनडीएचा म्हणून 'An Agenda For a Proud, Prosperous India' असा निवडणुकीचा जाहीरनामा तयार केला गेला होता. थोडक्यात तो भाजपाचा जाहीरनामा नव्हता.
या वेळेस देखील भाजपाचा जाहीरनामा नसेल तर एनडीएचाच जाहीरनामा असेल. प्री-इलेक्शन अलायन्स हा प्रकार त्यावेळेपासून म्हणजे १९९९ पासून अस्तित्वात आला असे वाटते. असो.
19 Mar 2014 - 8:42 pm | संपत
"
धरणे, आंदोलन आणि खून, बलात्कार सारखेच? तुमच्यावर उपहास व्यर्थ आहे.
19 Mar 2014 - 9:32 pm | विकास
मुद्दा सिंपल आहे... प्रत्येक पक्षांच्या काही टक्के उमेदवारांवर गुन्हेगारी खटले आहेत. खटले असणे अर्थात आरोप असणे आणि ते आरोप सिद्ध होऊन गुन्हेगार ठरणे यात फरक आहे. मोदींवर तर आरोप नसताना देखील गुन्हेगारासारखे वागवले गेले ते योग्य होते असे म्हणायचे आहे का?
20 Mar 2014 - 3:29 am | बाळकराम
आआप पार्टी म्हणून जगली पाहिजे, वाढली पाहिजे आणि तिच्या धसक्याने इतर पक्षांनीही आपली राजकारण अधिक लोकाभिमुख, स्वच्छ केले पाहिजे इतकीच सध्याची अपेक्षा आहे.टाळ्या !! नेमकं आणि चपखल! आणि केवळ याच कारणाने भाजपा आणि काँग्रेस आआप ला इतका विरोध करताहेत- कारण आआपमुळे त्यांचे राजकारण स्वच्छ करावे लागेल त्यांना. तसे झाले तर संघ वगैरेंची दुकाने बंद होतील ना!19 Mar 2014 - 12:06 am | विकास
आपण २३ तारखेला निर्णय घेऊ असे २ दिवसांपूर्वी सांगून त्यांनी इतरांची उत्कंठा वाढविली आहे.
कदाचीत आपच्या कार्यकर्त्यांना दगड गोळा करायचे असतील. मग ते केजरीवालांच्या सभेत लुटूपुटीची लढाई करतील आणि मोदी-भाजपा वर आरोप करायला मोकळे. तेव्हढे जमले नाहीतर गेला बाजार किमान गाडीची काच तरी नक्की फोडता येईल.
19 Mar 2014 - 10:17 am | क्लिंटन
तांत्रिकदृष्ट्या जर इतर सर्व पक्षांनी पाठिंबा दिला तर मोदींना निवडणूक जड जाईल असे दिसते. तरीही त्यांचा पराभव होईल असे तरी मला वाटत नाही.तरी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे इतर सगळे पक्ष केजरीवालला पाठिंबा देतील का. तसे करणे इतर पक्षांना परवडेल का? काँग्रेसने केजरीवालला पाठिंबा देणे म्हणजे मोदींपुढे पक्षाने शरणागती पत्करली आहे असा त्याचा सरळसरळ अर्थ होईल.काँग्रेसकडे मोदींना लढत देऊ शकेल असा उमेदवार नाही म्हणून केजरीवालला समर्थन दिले असा त्याचा अर्थ होईल.हे काँग्रेसला देशातील इतर भागांमध्ये परवडेल का?त्यातूनही केजरीवालने चांगली लढत दिली (किंवा अगदी तो जिंकला) तर भाव कोण खाणार तर केजरीवाल. काँग्रेसने आपला उमेदवार उभा केला नाही म्हणून त्याला फायदा झाला ही गोष्ट नजरेआडच होणार.मुळात काँग्रेसची स्थिती उत्तर प्रदेशात फार चांगली आहे असे नाही.आणि असे करून काँग्रेस आपण होऊन स्वतःची स्पेस आआपला मोकळी करून स्वतःच्या पायावर कुर्हाड मारायला तयार होईल का हा प्रश्नच आहे. तीच गोष्ट कमी-अधिक प्रमाणात बसपची. गेल्या निवडणुकीत बसपने मुरली मनोहर जोशींना बर्यापैकी चांगली लढत दिली होती.बसपला आपली हक्काची मते सोडून तिसर्या पक्षाला देणे कितपत परवडेल? सपची या मतदारसंघात तितकी ताकद नाही त्यामुळे त्या पक्षाला केजरीवालला पाठिंबा देणे परवडेल.पण काँग्रेस आणि बसपला ते परवडेलच का याविषयी मी साशंक आहे.
19 Mar 2014 - 11:08 pm | विकास
बातम्या जर खर्या धरल्या तर दिग्विजय सिंग हे मोदींच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे असे दिसतयं...
18 Mar 2014 - 7:22 pm | शिद
खुजलीवाल एक नं. चा बंडल व धुर्त मनुष्य आहे... ते नाटकीपणाचे खोकणे पाहुन तर डोक्यात तिडीक उठते.
आता ह्या निवडणुकीत भाजपाची मते खाऊन काँग्रेसचे सरकार येण्यास मदत करण्यावाचून बाकी काही विधायक कामे दिसत नाही आहेत साहेबांची...पाहुया पुढे काय-काय होते ते.
18 Mar 2014 - 7:39 pm | जोशी 'ले'
अहो सध्या 1बिएचके फ्लॅट चे रिनोव्हेशन करायला मला दोन महिने लागले त्यात बाथरुम च्या प्लंबिग साठी 6/7 दिवस ...अन् याला सिस्टम चेंज करायचय, अभ्भी के अभ्भी