जेणेकरून संसदेत त्यांना हवा तो लोकपाल चा कायदा ते लवकरात लवकर अस्तित्वात आणू असा माझा अंदाज होता भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याचे स्वप्न असलेल्या केजरीवाल व त्यांच्या पक्षाचे प्रमुख ध्येय त्यांचे बहुसंख्य खासदार लोकसभेवर निवडून आणणे आहे.
ह्यासाठी त्यांनी स्वतः दिल्लीतून लढून निवडून यायला हवे जेथे नुकतेच विधानसभेत त्यांच्या पक्षाला यश मिळाले.
आजपर्यंत राजकारणातील राखी सावंत म्हणून ओळखल्या जाणार्या केजू ह्यांनी आता मोदी ह्यांच्या विरुद्ध लढण्याचे ठरवले आहे.
मुळात त्यांना असा राजकीय स्टंट करायचा होता तर त्यांनी अमेठी मधून उभे राहायचे होते ,तेथे त्यांची निवडून यायची खास शक्यता असती.२००४ वागलात ९२ पासून भाजपचा गड असलेल्या वाराणसी जेथे हिंदुत्वाचा शिक्का बसलेले नमो उभे आहेत त्यांच्या समोर आ देखे जरा ,कीस मे कितना हे दम अश्या फिल्मी पद्धतीत आव्हान देणे हायत राजकीय शहाणपण किती व स्टंटबाजी किती आहे
आता त्यांच्या ह्या निर्णयामुळे काही शंका मनात येतात.
केजू हे नेहमी व्यक्तीकेंद्रित टीका व आरोप करतात. कधी अंबानी तर कधी मोदी.राजकारणातील ते सुपारीबाज आहेत का
ते परकीय शक्तींचे हस्तक आहेत का
त्यांच्याकडे एक पक्ष स्थापन झाल्यावर भष्टाचार विरोधी मुद्दा सोडल्यास इतर काही मुद्दे आहेत का
विकासावर अर्थव्यवस्थेवर , त्यांची मते , भविष्यातील भारत
परराष्ट्र धोरण , संरक्षण धोरण आणि बरेच.....................
त्यांच्या पक्षातून काही त्यांना सोडून गेले व जातांना त्यांच्यावर टीका केली त्यात कितपत तथ्य आहे.
नुकतीच महाराष्टार्त गारपिटीने बळीराजा हैराण झाला असून केजू ह्यांना नागपुरात फंड रेजिंग सुचत आहे.राजकारणात केजरीवाल ह्यांचे नक्की काय चालले आहे
ते दुसरे जेपी होणार का जनतेच्या अपेक्षा उंचावून प्रत्यक्ष सत्तेवर आल्यावर त्यांना भ्रमनिरास करणे म्हणजे परत सत्तेच्या चाव्या गांधी घराण्याकडे.
केजरीवाल हे राजकारणातील राखी सावंत आहेत.
त्यांना नेहमी एक भीती असते उद्या अण्णा परत आंदोलनात उतरले आणि जनतेने त्यांना पाठिंबा दिला तर प्रसार माध्यमे ह्यांच्याकडे पाठ दाखवतील व परत आण्णाच्या मागे धावतील , प्रसार माध्यमांना काय नगाला नग हवा म्हणून ह्या ना त्या मार्गाने चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
उद्या जर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागले तर चर्चेत राहण्यासाठी बिग बॉस व झलक दिख ला जा असे पर्याय त्यांच्यासाठी नक्कीच उपलब्ध आहेत
माझ्यामते एक आंदोलक म्हणून एका मुद्यावर रान उठवणे सोपे असते पण राजकारणात एका पक्षाचा प्रमुख झाल्यावर पक्षाची अनेक विषयांवर धोरण सर्व सामान्य माणसापर्यंत पोहचवणे हे पक्षप्रमुखाचे काम आहे.
आतापर्यत आप हा पक्ष फक्त आरोपांच्या फैरी झाडत आहे व त्यांचे समर्थक त्याची री ओढत आहे.
भारताच्या बहुसंख्य जनतेचे गावातील व शहरातील मुलभुत प्रश्न , त्यावर उपाय ह्यावर बोलणे कटाक्षाने टाळले केले आहे.
सत्तेवर असतांना व बाहेरून नुसत्या आंदोलनाने देश चालवता येतो का
हेच कळत नाही आहे
ता.क
आता राहुल सुद्धा वाराणसी मधून आपली उमेदवारी घोषित करणार का
तुम्हाला काय वाटते
प्रतिक्रिया
18 Mar 2014 - 9:42 pm | मूकवाचक
Watch the too indignantly righteous. Before long you will find them committing or condoning the very offence which they have so fiercely censured.”
― Śrī Aurobindo
आक्रस्ताळ्या नीतीमूल्यसंरक्षकांकडे नीट लक्ष द्या. लवकरच तुमच्या लक्षात येईल की ज्या अपराधांविषयी मोठेच आकांडतांडव करत यांची निर्भत्सना चाललेली होती, नेमके तेच गुन्हे करताना किंवा त्यांच्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करताना हीच मंडळी दिसतील.
- योगी अरविंद
19 Mar 2014 - 7:27 am | प्रदीप
नेमके आणि अचूक.
धन्यवाद!
19 Mar 2014 - 10:36 am | मंदार दिलीप जोशी
साधो!!! साधो!!!
19 Mar 2014 - 9:09 pm | अर्धवटराव
आजच्या राजकीय धुळवडीत भान जागृत ठेवणारे.
उत्तम.
19 Mar 2014 - 9:40 am | विकास
आपच्या दृष्टीने काँग्रेसचे उमेदवारांवर गुन्हेगारी खटले चालू नसावेत... खालील बॅनर हे त्यांच्या संस्थळावरील आहे.
बॅनरखालच्या निबंधात देखील काँग्रेसचे नाव नाही! बिच्चारे राष्ट्रवादी! :(
19 Mar 2014 - 12:41 pm | संपत
पहिली गोष्ट : हे आआपचे बॅनर नसून Association for Democratic Reforms ह्या संस्थेचे आहे जे आआपने त्यांच्या संस्थळावर दिले आहे.
दुसरी गोष्ट : हि लिस्ट ६ मार्चची आहे. तोपर्यंत कॉंग्रेसची लिस्ट प्रसिद्ध झाली .नव्हती म्हणून काँग्रेस त्यात नाही.
19 Mar 2014 - 9:34 pm | विकास
Association for Democratic Reforms च्या संस्थळावर आता फक्त भाजपा-काँग्रेसचेच विश्लेषण दिसत आहे..
19 Mar 2014 - 10:14 pm | संपत
आआपच्या संस्थळावर देखील आता भाजपा-काँग्रेसचे विश्लेषण दिसत आहे..
19 Mar 2014 - 11:09 pm | विकास
आपचे नाव देखील दिसत नाही! कदाचीत आपचा डेमोक्र्टीक रिफॉर्म वर भर नाही हे माहीत असल्याने त्यांचे विश्लेषण नसावे.
19 Mar 2014 - 12:53 pm | श्रीगुरुजी
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/No-funds-to-give-50-waiver...
केजरीवालांची स्वस्त वीज फार्सच?
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात वीजबिल निम्म्यावर आणण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रत्यक्ष सत्तेत येताच तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने तसा निर्णय घेतला खरा; मात्र, प्रत्यक्षात सन २०१३-२०१४च्या अर्थसंकल्पात त्यासाठीची तरतूदच नसल्याने या निर्णयाची अंमलबजावणी अशक्य असल्याचे दिल्ली सरकारने दिल्ली हायकोर्टाला सांगितले आहे. त्यामुळे केजरीवाल यांची ही स्वस्त वीज फार्सच ठरण्याची चिन्हे आहेत.
लोकांच्या रोजच्या आयुष्याशी निगडित प्रश्न हातात घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचा दावा करणाऱ्या केजरीवाल यांनी त्यावेळी भरमसाठी आश्वासने दिली होती. तत्पूर्वी दिल्लीतील वीज बिलांचा मुद्दा हाती घेत त्यांनी बिले न भरण्याचे आवाहन दिल्लीकरांना केले होते. सत्तेत आल्यानंतर, ऑक्टोबर २०१२ ते डिसेंबर २०१३ या कालावधीत वीजबिले न भरलेल्या दिल्लीकरांचे बिल निम्म्यावर आणण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला होता. हे प्रकरण पुढे दिल्ली हायकोर्टात आले.
मुख्य न्यायाधीश बी. डी. अहमद आणि न्या. एस. मृदुल यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी याप्रकरणी सुनावणी झाली. वीजबिल न भरलेल्यांना सवलत देण्यासाठी सहा हजार ८२१ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात अर्थसंकल्पात त्याची तरतूदच झालेली नाही, असे प्रतिज्ञापत्र दिल्ली सरकारतर्फे सादर करण्यात आले. वीज महामंडळ, दिल्ली सरकारने १४ फेब्रुवारी २०१४च्या पत्रामध्ये यासाठी सहा हजार ८२१ कोटींची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात यासाठी अर्थसंकल्पात तरतूदच केली नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाच्या या निर्णयाची अमलबजावणी करणे शक्य नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
वकील विवेक शर्मा यांनी याप्रकरणी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर सरकारने प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २२ मे रोजी होणार असून तोपर्यंत मंत्रिमंडळ निर्णयाच्या अमलबजावणीवरील स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. १२ फेब्रुवारीला दिल्ली मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयाला कोर्टाने प्रथम स्थगिती दिली होती. तसेच या निर्णयाबाबत सद्यास्थिती मांडण्यास सांगितले होते.
19 Mar 2014 - 3:00 pm | चौकटराजा
नमो आता गांधीनगर येथूनही उभे राहाणार आहेत.एक बातमी
आमची काल्पनिक कथा-- नमो नी आता पर्यंत ५०० ठिकाणी अर्ज भरला होता. तरी केजरी चक्रम राजाने आपला हट्ट सोडला नाही. तो सोगा देवीच्या मुक्कामी गेला त्याला आणखी ४३ कोरे अर्ज देण्यात आले. नमू साठी भापा ला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. शेवटच्या दिवशी उरलेले ४३ अर्ज भरायचे त्यासाठी जरूर लागल्यास नमो साठी चार्टर्ड प्लेन मुअ व अ यानी द्यायचे कबूल केले होते पण शिन्ची आसं आड आली. मग भा च्या वर्गणीतून खर्च कारायचा की कसे हे ठरले बर ते पुन्हा आसं मधे बसेल की नाही . वकत मोठा कठीण होता.पण तेवड्यात र प्र यानी एक कुठली तरी कोपर्यातली प्रोव्हीजन दाखवली. उरलेले सर्व अर्ज दिल्लीतही भरता येतील म्हणे ! मग नमो चा प्रश्न सुटला. नमो हळूच सर्व ४३ अर्ज घेऊन दाखल झाला. अर्ज भरले गेले. अनुमोदने झाली. सारे बाहेर आले . बाहेर पांढर्या टोप्या व त्यावर काळी अक्षरे असणारी गॅंग उभी होती. सो गा बाईकडून आणलेले अर्ज हातात घेऊन केजरी चक्रम राजा उभा होता. भा मा की जै इनकिलाब जिंदाबाद च्या घोषणानी गॅगने परिसर व्यापून टाकला.
( होली का दुसरा दिन है ! नाराज नय होनेका )
19 Mar 2014 - 4:56 pm | संपत
बातमी खरी असेल तर भाजप समर्थक देशभर नमो लाट आहे असे जे बोंबलत फिरत आहेत त्यावर खुद्द नमोंचा विश्वास नाही असं दिसतंय :)
19 Mar 2014 - 6:19 pm | क्लिंटन
कशावरून? तुम्हा केजरीवाल समर्थकांचे तार्किक निष्कर्ष नेहमी बुचकळ्यात पाडणारे असतात. हे नक्की कोणत्या आधारावर म्हणता?
मोदींनी गुजरातमधून निवडणुक लढविणे यात काही नवल नाही.जर गुजरातबाहेरून निवडणुक लढवली नाही तर म्हणायला मोकळे की मोदींचा करिश्मा गुजरातबाहेर चालणार नाही. बाहेरूनपण निवडणुक लढवली तर म्हणणार की मोदींची लाट आहे यावर मोदींचाच विश्वास नाही. वाराणसीतून निवडणुक लढविणार असे म्हटले की विचारायचे 'सेफ मतदारसंघ' कशाला हवा (वाराणसी हा कितपत सेफ मतदारसंघ आहे हा प्रश्न आहेच).
सगळे मोठे नेते स्वतः (त्यांच्या मते) सेफ असलेल्या मतदारसंघातूनच लढत असतात. त्याचे कारण त्यांना स्वतःसाठी त्या मतदारसंघात वेळ घालवावा लागत नाही आणि ते देशभर पक्षाच्या इतर उमेदवारांचा प्रचार करत करू शकतात. शरद पवार १९६७ पासून निवडणुक लढवत आहेत.पण ते निवडणुक लढवायला बारामतीबाहेर पडले पहिल्यांदा २००९ मध्ये. सोनिया गांधी १९९९ मध्ये अमेठी (उत्तर प्रदेश) आणि बेल्लारी (कर्नाटक) मधून लढल्या. अमेठी मतदारसंघ त्यांनी का निवडला याचे कारण वेगळे सांगायलाच नको. १९५२ पासून १९९८ पर्यंत प्रत्येक निवडणुकीत बेल्लारीमधून काँग्रेसचा विजय होत होता. त्यामुळे १९९९ मध्ये बेल्लारी काँग्रेससाठी "सेफ सीट" होती. (त्या मानाने वाराणसी मोदींसाठी बरीच अनसेफ सीट आहे तरी ते तिथून लढत आहेत :) ) २००४ आणि २००९ मध्ये सोनिया गांधी घराण्याच्या परंपरागत रायबरेलीमधून तर राहुल गांधी अमेठीतून लढले. जगजीवनराम सासाराम (बिहार) बाहेरून कधी निवडणुक लढले नाहीत. बंगाराप्पा कधी शिमोगा सोडून लोकसभेची निवडणुक लढले नाहीत. (विधानसभेतही शिमोगा जिल्ह्यातीलच सागर आणि सोराब या जागा त्यांनी कधी सोडल्या नाहीत). अशी अनेक उदाहरणे देता येतील.
दुसरे म्हणजे एकापेक्षा जास्त मतदारसंघातून मोठ्या नेत्याने निवडणुक लढवायचा एक फायदा असतो. दोन्ही मतदारसंघांच्या आजूबाजूच्या प्रदेशात पक्षाला फायदा होतो आणि जास्त जागा जिंकायला मदत होते. वाराणसी उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात आहे. या प्रदेशातून मोदींनी निवडणुक लढविल्याचा फायदा पक्षाला उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात आणि बिहारच्या पश्चिम भागात होईल असे कॅल्क्युलेशन पक्षाचे कशावरून नसेल? मोदींनी दोन ठिकाणी निवडणुक लढवली म्हणजे ते घाबरलेच आहेत हा निष्कर्ष कशावरून काढलात?
आणि शेवटचे म्हणजे पुढील मोठ्या नेत्यांनी दोन मतदारसंघातून निवडणुक लढवली,दोन्ही ठिकाणी जिंकले आणि तरीही पक्षाला चांगले यश मिळाले (काही उदाहरणात पक्ष बहुमतात आला) अशी काही उदाहरणे:
१. अटलबिहारी वाजपेयी: १९९१- लखनौ (उत्तर प्रदेश), विदिशा (मध्य प्रदेश)-- पक्षाला उत्तर प्रदेशात ८५ पैकी ५१ जागा मिळाल्या. मध्य प्रदेशात तेवढे यश मिळाले नाही (४० पैकी १२ च)
२. लालकृष्ण अडवाणी: १९९१- नवी दिल्ली (दिल्ली), गांधीनगर (गुजरात)-- पक्षाला दिल्लीत ७ पैकी ५ तर गुजरातमध्ये २६ पैकी २२ जागा मिळाल्या
३. अटलबिहारी वाजपेयी: १९९६- लखनौ (उत्तर प्रदेश), गांधीनगर (गुजरात)-- पक्षाला उत्तर प्रदेशात ८५ पैकी ५१ तर गुजरातमध्ये २६ पैकी १६ जागा मिळाल्या.
४. इंदिरा गांधी: १९८०- रायबरेली (उत्तर प्रदेश), मेडक (आंध्र प्रदेश)-- पक्षाला दोन्ही राज्यांमध्ये चांगले यश मिळाले. मेडक हा इंदिरा गांधींसाठी 'सेफ' मतदारसंघ होता बरे का :)
विधानसभा निवडणुका--
१. एन.टी.रामाराव- आंध्र प्रदेश (१९९४): हिंदूपूर आणि तेक्काळी. तेलुगु देसम आणि मित्रपक्षांनी २९४ पैकी २५० पेक्षा जास्त जागा जिंकून काँग्रेसला जोरदार चोप दिला.
२. मुलायमसिंग यादव- उत्तर प्रदेश (१९९३): जसवंतनगर, निधौली कला, शिकोहाबाद. या निवडणुकांनंतर इतर पक्षांच्या पाठिंब्यावर मुलायमसिंग यादव मुख्यमंत्री झाले.
३. लालूप्रसाद यादव- बिहार (१९९५): दानापूर आणि राघोपूर. या निवडणुकांमध्ये लालूप्रसाद यादवांच्या जनता दलाने मित्रपक्षांसह ३२४ पैकी जवळपास २०० जागा जिंकल्या.
४. शिवराजसिंग चौहान- मध्य प्रदेश (२०१३): बुधनी आणि विदिशा. या निवडणुकांमध्ये भाजपने २३० पैकी १६५ जागा जिंकल्या.
५. कल्याणसिंग-उत्तर प्रदेश (१९९३): अतरौली आणि कासगंज. भाजप सगळ्यात मोठा पक्ष (१७७/४२५)
६. ओमप्रकाश चौटाला- हरियाणा (२०००): नरवाना आणि रोरी. आय.एन.एल.डी ९० पैकी ४७ जागा जिंकून चौटाला मुख्यमंत्री
सध्या इतकीच उदाहरणे आठवत आहेत. अजून आठवल्यास लिहेनच.
आता या सगळ्या उदाहरणांमध्ये संबंधित नेते घाबरले होते म्हणून दोन मतदारसंघांमधून निवडणूक लढवत होते का याचा निवाडा वाचकांवरच सोडतो :)
19 Mar 2014 - 6:51 pm | विकास
क्लिंटन साहेब, तुम्ही काही उलट सुलट बोला... पण वास्तव एकच आहे: फक्त केजरीवाल बंदेमेच (चहात ला "च") दम है! बाकी इंदीरा गांधी, वाजपेयी, अडवाणी, वगैरे त्यांच्यासमोर फारच चिल्लर आहेत. मग मोदींचे काय घेऊन बसलात? एकेंपुढे ते किस चाय की पत्ती! ;)
19 Mar 2014 - 9:43 pm | निनाद मुक्काम प...
केजू म्हणे कल्की चा अवतार
19 Mar 2014 - 7:03 pm | संपत
ह्यातल्या कुणाचाही त्यांची 'लाट' आहे म्हणून प्रसार झाला नव्हता. इंदिरा गांधींचा जेव्हा झाला होता त्यावेळी त्या एकाच ठिकाणाहून लढल्या. ८० च्या आधीच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता म्हणून त्यांनी दोन ठिकाणाहून लढण्याची दक्षता घेतली. दोन ठिकाणाहून लढणे हे अत्माविशासाला कुठेतरी तडा गेल्याचे दर्शवते.
19 Mar 2014 - 7:22 pm | क्लिंटन
रामारावांनी चार पंच्मांश बहुमत मिळवले, शिवराज आणि लालूंनी ६०%-७०% जागा जिंकल्या तरी त्यांची लाट नव्हती? आणि वर म्हटले तसे कॅल्क्युलेशन भाजपाचे कशावरून नसेल याला काय उत्तर आहे? अर्थात आत्मविश्वासाची कमी वगैरे गृहितच धरायचे असेल तर मात्र काही लिहिण्यात अर्थ नाही. अशी कमी कोणात असेल तर त्या केजरीवालमध्येच- महत्वाचे निर्णय स्वतः न घेता लोकांकडून एस.एम.एस मागवायचे. आताही हा मनुष्य तेच करत अहे. म्हणे तो वाराणसीतून लढणार की नाही ते जनता ठरविणार.आअरे रताळ्या जनता मतदानातून जे काही सांगायचे ते सांगेल. हा मानभावीपणा कशाकरता?
19 Mar 2014 - 7:31 pm | सव्यसाची
सहमत
19 Mar 2014 - 7:47 pm | संपत
रामरावाचा पक्ष आधीच्या निवडणुकीत सत्तेतून बाहेर गेला होता. तरीही त्यांची लाट होती? अहो ज्यांनी कधीही पराभव चाखला नाही अशा रामरावांचा आत्मविश्वास आदल्या निवडणुकीत पक्ष हरल्यावर किती कायम राहणार होता?
२ ठिकाणी निवडणूक - आत्मविश्वासाचा अभाव
19 Mar 2014 - 8:36 pm | संजय क्षीरसागर
ही एकच गोष्ट मोदींची पराभवाची भीती आणि सत्तालालसा दर्शवते.
19 Mar 2014 - 9:22 pm | क्लिंटन
बरं बाबा तुम्हीच खरे.आहे मोदींमध्ये आत्मविश्वासाचा अभाव. खूष?
बाकी वर विचारलेला प्रश्न परत एकदा--वाराणसीत मोदींनी निवडणुक लढवल्यास जवळपासच्या मतदारसंघांमध्ये फायदा होईल या कॅल्क्युलेशनने मोदी वाराणसीतून कशावरून उभे राहत नसतील? की अडचणीचे प्रश्न विचारल्यानंतर केजरीवाल-प्रशांत भूषण सोयीस्करपणे खोकतात त्याप्रमाणे तुम्ही प्रश्नाला बगल देणार? अर्थात आआप समर्थक आआप नेत्यांपेक्षा फार वेगळे काही करतील अशी अपेक्षा नाही.
बाकी चालू द्या
19 Mar 2014 - 9:34 pm | संपत
लढू द्या कि त्यांना वाराणशीत.. त्यामुळे भाजपला फायदा होईल असे कॅल्क्युलेशन असेलही. पण त्यांना वाराणशीतील विजयाची खात्री आहे तर वडोदऱ्यात कशाला लढवतात ते? म्हणजेच मोदी लाटेवर खुद्द मोदींचा एवढा विश्वास दिसत नाही अस दिसतंय.
19 Mar 2014 - 9:47 pm | विकास
जर मोदी लाट नसेल तर मोदी विरोधक आणि त्यातले अग्रगण्य (अगदी दिग्गीराजांपेक्षाही) केजरीवाल यांना उगाच घसेफोड करून अजून खोकायची काहीच गरज नाही.
राहता राहीला मोदींचा मोदी लाटेवर विश्वास आहे का नाही हा... स्वतः मोदी असे कधीच म्हणताना आढळलेले नाहीत की माझी लाट आहे म्हणून. त्यांना लोकांनी गुन्हा नसताना गुन्हेगार म्हणून झाले आहे, धर्मांध ठरवून झाले आहे, कम्युनिस्टांनी तर भांडवलशाही अमेरीकेच्या नाकदुर्या ओढत तत्कालीन बुश सरकारकडून त्यांना वाळीत टाकून झाले आहे... आता तुम्ही म्हणा त्यांना आत्मविश्वास नाही अथवा ते भित्रे आहेत म्हणून...
19 Mar 2014 - 9:55 pm | संपत
बाकी नेहमीचच आहे पण हे वाक्य गोंधळात टाकणारे आहे. थोडा खुलासा कराल तर बरे..
19 Mar 2014 - 10:32 pm | विकास
कम्युनिस्टांनी तर भांडवलशाही अमेरीकेच्या नाकदुर्या ओढत तत्कालीन बुश सरकारकडून त्यांना वाळीत टाकून झाले आहे.
यातील कम्युनिस्ट म्हणजे तुम्हाला कदाचीत कम्युनिस्ट पक्ष वाटला असेल तर तसे म्हणायचे नव्हते.. कम्युनिस्ट/डावी विचारधारा ठेवून हिंदू हा (एक त्या नावाचे वर्तमानपत्र सोडल्यास) द्वेष करणार्या अमेरीकेतील भारतीय विचारवंतांबद्दल बोलत आहे... त्यात अंगना चॅटर्जी सारख्या व्यक्ती येतात.
19 Mar 2014 - 10:40 pm | संपत
ओक्के
19 Mar 2014 - 10:14 pm | क्लिंटन
अगदी अगदी. तो केजरीवाल म्हणतो की देशात मोदींची लाट नाही. पण मग भाषणात वारंवार मोदींचा उल्लेख का येतो? त्याला नेमके गुजरातमध्ये जाऊनच तमाशा करावासा का वाटला?
गेल्या वर्षभरापासून एक गोष्ट वारंवार बघायला मिळालेली आहे. भाजपवाल्यांनी काय करावे याची चिंता इतरांनाच जास्त. पहिल्यांदा भाजपवाल्यांनी आपला नेता म्हणून कोणाला निवडावे यावर दळण सुरू होते.शिवराजसिंग चौहान का नाहीत? अडवाणी का नाहीत? उत्तर प्रदेश ८० खासदार निवडून देतो मग उत्तर प्रदेशातील कोणी नेता का नाही असले प्रश्न विचारले जात होते. मोदींना निवडल्यानंतर पुढचे प्रश्न सुरू झाले-समजा आघाडीच्या राजकारणासाठी मोदी सोडून इतर कोणाला पंतप्रधान म्हणून स्विकारावे लागले तर मोदी समर्थकांची अवस्था कशी होईल? असल्या ढोंगी लोकांना सांगायची एकच गोष्ट--आमचे जे काही व्हायचे ते होईल.त्याची चिंता तुम्ही करायची काहीही गरज नाही.ते होते न होते तोच मोदींनी कुठून लढावे किती ठिकाणहून लढावे हे पण हेच बाहेरचे लोक सांगणार.काय करणार. शेवटी स्वभावाला औषध नाही हे खरेच.तेव्हा याउपर अशांकडे दुर्लक्ष करण्याशिवाय फारसे माझ्यातरी हातात राहिलेले नाही. आणि असे झाल्यानंतर मला वादविवादांमध्ये कोणीच हरवू शकलेले नाही असे म्हणूनही कॉलर ताठ केली जाईलच. :) )
19 Mar 2014 - 10:17 pm | संपत
असे नका करू हो.. तुम्ही नाही तर चर्चेत गम्मत नाही :)
19 Mar 2014 - 11:12 pm | आजानुकर्ण
सहमत. वाराणसीतून उभे राहिल्यास आजूबाजूच्या २५-३० मतदारसंघांमध्ये हर हर मोदी करत हिंदू मतांचे पोलरायझेशन करण्याची युक्ती असावी असे वाटते. अर्थात जोपर्यंत दंगली वगैरे पेटवल्या जात नाहीत तोपर्यंत त्यात काही गैर आहे असे वाटत नाही. फक्त स्ट्रॅटेजी काय असावी याचा हा अंदाज आहे.
19 Mar 2014 - 11:31 pm | संपत
बरोबर. आणखीन एक कारण मी ऐकले आहे. मोदींच्या विकास पुरुष प्रतिमेवर इतका भर दिला गेला कि त्यांची हिंदुत्ववादी भूमिका मागे पडली. तिची अप्रत्यक्ष आठवण करून देण्यासाठी त्यांना वाराणशीत उभे केले गेले असे म्हणतात (निनादने देखील वर हेच सांगितले आहे.). अयोध्येनंतर मथुरा आणि काशीचा नंबर आहे असे विहिपने मागेच सांगितले होते त्यामुळे वाराणशी हिंदुत्ववादी अजेन्द्याशी जोडली गेली आहे.
वाराणशी बाबतीत एक मुद्दा मात्र ह्या चर्चेत आला नाही जो मी टीवीवर ऐकला. वाराणशीत २ लाख मुसलमान मतदार आहेत ज्यांचे एक गठ्ठा मतदान झाले तर निवडणुकीचा निकाल बदलू शकतो.
19 Mar 2014 - 11:32 pm | विकास
जर एनडीटिव्हीमधील विश्लेषण संदर्भ म्हणून वापरले तर: असे दिसते आहे की मोदींना तिथल्या मुस्लीम जनतेकडून पण काही अंशी मते मिळतील. त्यांच्या विरोधात जर मुस्लीमांनी मते दिली तर ती गैर काँग्रेस/सपा/बसपा मुस्लीम उमेदवार असल्यास मिळण्याची शक्यता जास्त. काही प्रमाणात केजरीवालांना पण मिळतील कारण एकूणच तिथली मुस्लीम जनता देखील स्युडोसेक्यूलॅरिझमला आणि सतत व्होटबँकचे प्यादे होण्याने त्रासलेली आहे...
तत्कालीन सरसंघचालक कै. सुदर्शनजींच्या इच्छेनुसार २०००च्या पहील्या काही वर्षात मुस्लिम राष्ट्रीय मंच स्थापन केला गेला होता. त्याचा परीणाम म्हणून मुस्लीम समाजचा संघाशी सुसंवाद झाला आहे. त्याचा देखील वाराणसीतील कारागिर मुस्लीमांवर झालेला असला तर नवल नाही... खालील फोटो आत्ता चेपूवर मुस्लीम राष्ट्रीय मंचच्या पानावर मिळाला तो वाराणसीतील मुस्लीम महीलांचा आहे...
बाकी मोदींनी वाराणसी का निवडले याला तुम्ही दोघांनी दिलेल्या निवडणूकीच्या दृष्टीने स्ट्रॅटेजिक कारणांशी सहमतच.
20 Mar 2014 - 3:40 am | बाळकराम
वाराणसीत मोदींनी निवडणुक लढवल्यास जवळपासच्या मतदारसंघांमध्ये फायदा होईल या कॅल्क्युलेशनने मोदी वाराणसीतून कशावरून उभे राहत नसतील?किंबहुना, म्हणूनच ते तिथून उभे राहतायत असाच माझा अंदाज आहे आणि नेमका मोदींना तो लोकेशन चा फायदा होउ नये म्हणून त्यांच्याविरुद्ध वाराणशीतून उभे राहून मोदींना तिथे अडकवून टाकायचा केजरीवालचा इरादा स्पष्ट दिसतो आहे. मोदींनी उ,प्र.मधून निवडणूक लढवणे आणि त्यायोगे उप्र मधल्या जागा वाढवायचा प्रयत्न करणे ही चांगली सामरिक खेळी आहे यात वादच नाही. कारण २७३ चा जादुई आकडा गाठण्यासाठी उप्र आणि बिहार हीच दोन आशास्थाने भाजपासाठी आहेत. त्यामुळे, आआप ने ह्या दोन राज्यांतून जास्तीत जास्त उमेद्वार उभे करुन भाजपाची ही खेळी निष्फळ ठरवायचा प्रयत्न नाही केला तरच नवल. मला वाटतं- भाजपा, कॉग्रेस आणि आआप ह्या तीन पक्षांमध्ये गमविण्यासारखे काहीच नसल्यामुळे आआप एक डार्क हॉर्स ठरून काही अपसेट नक्कीच देऊ शकतात.20 Mar 2014 - 3:41 am | बाळकराम
वाराणसीत मोदींनी निवडणुक लढवल्यास जवळपासच्या मतदारसंघांमध्ये फायदा होईल या कॅल्क्युलेशनने मोदी वाराणसीतून कशावरून उभे राहत नसतील?किंबहुना, म्हणूनच ते तिथून उभे राहतायत असाच माझा अंदाज आहे आणि नेमका मोदींना तो लोकेशन चा फायदा होउ नये म्हणून त्यांच्याविरुद्ध वाराणशीतून उभे राहून मोदींना तिथे अडकवून टाकायचा केजरीवालचा इरादा स्पष्ट दिसतो आहे. मोदींनी उ,प्र.मधून निवडणूक लढवणे आणि त्यायोगे उप्र मधल्या जागा वाढवायचा प्रयत्न करणे ही चांगली सामरिक खेळी आहे यात वादच नाही. कारण २७३ चा जादुई आकडा गाठण्यासाठी उप्र आणि बिहार हीच दोन आशास्थाने भाजपासाठी आहेत. त्यामुळे, आआप ने ह्या दोन राज्यांतून जास्तीत जास्त उमेद्वार उभे करुन भाजपाची ही खेळी निष्फळ ठरवायचा प्रयत्न नाही केला तरच नवल. मला वाटतं- भाजपा, कॉग्रेस आणि आआप ह्या तीन पक्षांमध्ये गमविण्यासारखे काहीच नसल्यामुळे आआप एक डार्क हॉर्स ठरून काही अपसेट नक्कीच देऊ शकतात.20 Mar 2014 - 12:48 am | बाळकराम
मी जरी आआप चा समर्थक असलो तरी मला मोदींनी दोन ठिकाणी उभे राहाणे हा आत्मविश्वासाचा अभाव वाटत नाही, उलट ही एक चांगली खेळी आहे. कारण मोदी फक्त वाराणशीमधूनच उभे राहिले तर तिथे अडकून पडतील- जो की केजरीवालांचा उद्देश असावा- त्यामुळे ते गुजरातमधूनही उभे राहिले असावेत. मोदींनी केजरीवालना कमी घ्यावे यातच केजरीवालांचा फायदा आहे कारण त्यामुळे मोदी गाफिल राहण्याची शक्यता आहे. कुठलाही हुशार नेता शत्रूला कमी लेखण्याची चूक करु शकत नाही. आणि केजरीवालनी ज्या तर्हेने गेल्या वर्षभरात आपल्याकडे लक्ष वेधून घेतले आहे ते पाहाता त्यांना कमी लेखण्याची चूक मोदींसारखा धूर्त नेता तरी करणार नाही.
20 Mar 2014 - 12:53 am | आजानुकर्ण
राजकीय नेत्यांनी दोनदोन ठिकाणावरुन उभे राहून नंतर एका ठिकाणचा राजीनामा देण्यावर कायद्याने बंदी आणली पाहिजे. निवडून आल्यावर हे नेते त्या ठिकाणांना भेट देत असतील असे वाटत नाही.
20 Mar 2014 - 1:12 am | बाळकराम
पण ही एक धोरणात्मक चाल आहे हे नक्की. मला प्रश्न पडला आहे की- समजा वाराणसीमधून मोदी वा केजरीवाल निवडून आले आणि त्यांनी राजीनामा दिला. तर रिकाम्या जागेवर पुन्हा जो पराभूत झालेला उमेदवार होता तो परत उभा राहिल का? मला नाही वाटत मोदी/केजरीवाल असं करतील. केजरीवालसाठी निवडणुकीचा निकाल फारसा महत्त्वाचा नाही- जरी वाराणसी भाजपासाठी सुरक्षित मतदारसंघ नसला तरी. मोदींविरुद्ध उभे राहून केजरीवाल ला एक मेसेज द्यायचा होता त्यामुळे निकालाची पर्वा इल्ले.
20 Mar 2014 - 1:18 am | अर्धवटराव
+१
20 Mar 2014 - 11:55 am | संपत
मोदी मुळात वाराणशीमधून निवडणूक लढवण्यास फार उत्सुक होते असे वाटत नाही. त्यांना तिथून लढण्यात धोका आहे हे ठाऊक आहे. केजरीवालशिवाय देखील अनेक घटक त्यांच्या विरुद्ध आहेत. त्यामुळे त्यांनी वडोदरामधून देखील निवडणूक लढवणे त्यांच्या दृष्टीने ठीक आहे. दोन ठिकाणाहून निवडणूक लढवण्यात काहीच वावगे नाही. तो घटनेने दिलेला हक्क आहे. पण ह्यावरून हे सिद्ध होते कि मोदींना भारतभर पाठींबा आहे असे जे म्हटले जाते त्यावर खुद्द मोदींचा विश्वास नाही. इंदिरा गांधी, रामाराव, राजीव गांधी ह्यांच्या जेव्हा लाटा होत्या असा प्रचार झाला तेव्हा ते एकाच ठिकाणाहून उभे राहिले. लक्षात घ्या कि ह्यावेळी प्रचार भाजप लाट आहे असा होत नसून मोदी लाट आहे असा होत आहे. तरीही ते दोन ठिकाणाहून उभे आहेत ह्याचा अर्थ त्यांना समजलेले जे वास्तव आहे ते भाजपच्या प्रचारापेक्षा वेगळे आहे. कदाचित खरेच मोदी लाट असेलही पण मोदींचा त्यावर पुरेसा विश्वास नाही ह्याबद्दल माझी खात्री आहे.
20 Mar 2014 - 12:12 pm | मंदार दिलीप जोशी
:D
20 Mar 2014 - 1:18 pm | श्रीगुरुजी
>>> इंदिरा गांधी, रामाराव, राजीव गांधी ह्यांच्या जेव्हा लाटा होत्या असा प्रचार झाला तेव्हा ते एकाच ठिकाणाहून उभे राहिले.
१९८३ साली एन टी ड्रामाराव प्रथमच मुख्यमंत्री झाले होते. १९८४ मध्ये त्यांनी विधानसभा बरखास्त करून लोकसभेबरोबरच परत विधानसभेची निवडणुक घेतली. त्यावेळी ते एकूण ३ वेगवेगळ्या मतदारसंघातून उभे होते व तीनही ठिकाणाहून निवडून आले होते. त्यांची १९८३ साली लाट होती व १९८४ साली पण त्यांची लाट होती. तरीसुद्धा ते ३ ठिकाणाहून उभे राहिले होते. रायलसीमा, तेलंगण व उर्वरीत आंध्र अशा आंध्रच्या तीनही भागात मला पाठिंबा आहे हे दाखविण्यासाठी ते उभे होते.
>>> लक्षात घ्या कि ह्यावेळी प्रचार भाजप लाट आहे असा होत नसून मोदी लाट आहे असा होत आहे. तरीही ते दोन ठिकाणाहून उभे आहेत ह्याचा अर्थ त्यांना समजलेले जे वास्तव आहे ते भाजपच्या प्रचारापेक्षा वेगळे आहे.
मोदी लाट आहे किंवा अमुकतमुक नेत्याची लाट आहे असे प्रचारात सांगणे हा अभिनिवेश असतो. प्रत्यक्षात मोदी असोत वा वाजपेयी, तामिळनाडू + केरळ + आंध्र + प. बंगाल या चार राज्यातील एकूण १४४ जागांपैकी १४ जागासुद्धा भाजपला मिळत नव्हत्या व मिळणार नाहीत हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. परंतु उत्तर व पश्चिम भारतात मोदींच्या उमेदवारीमुळे निश्चितच फरक पडलेला आहे असे दिसून येते. जून २०१३ पर्यंत झालेल्या मतदान चाचणीमध्ये रालोआची संभाव्य संख्या १८० पर्यंत दिसत होती. मोदी जर पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील तर भाजपाला किमान ४० जागांचा फायदा होईल असे चाचणीकर्त्यांचे मत होते. सप्टेंबर २०१३ मध्ये मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर केल्यावर हीच संभाव्य संख्या २३० पर्यंत पोचलेली आहे. हा मोदी इफेक्टच आहे.
>>> कदाचित खरेच मोदी लाट असेलही पण मोदींचा त्यावर पुरेसा विश्वास नाही ह्याबद्दल माझी खात्री आहे.
काहीवेळा अज्ञानात सुख असतं. मोदींच्या बाबतीत तसेच असेल.
20 Mar 2014 - 4:01 pm | संपत
ड्रामाराव :) माझा मुद्दा लाट होती कि नाही हा नसून नेत्याला तसे वाटत होते का हा आहे. १९८४ साली निवडणुकी आधी रामाराव ह्यांच्याविरुद्ध बंडाळी झाली होती आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. (ते पुन्हा मुख्यमंत्री झाले हे वेगळे. )
19 Mar 2014 - 7:23 pm | विकास
नमो आता गांधीनगर येथूनही उभे राहाणार आहेत.एक बातमी
तुम्ही कुठे वाचलीत ते माहीत नाही. पण एनडीटिव्हीवरील बातमीत उलटेच सांगितले गेले आहे...
BJP leaders request LK Advani to run again from Gandhinagar: sources
19 Mar 2014 - 8:47 pm | विकास
मोदी गांधीनगर मधून नाही तर वडोदरामधून पण लढणार आहेत. आता केजरीवाल, "मी पण, मी पण " म्हणत तेथे पण येतात का ते बघूयात! ;)
तेथे म्हणल्याप्रमाणे: Similarly, the BJP's decision to have Mr Modi run for the Lok Sabha from Varanasi is designed to enthuse voters in India's largest state to support the party.
19 Mar 2014 - 5:24 pm | रमेश आठवले
केजरिवालाचे सर्व चाळे हेतुपूर्ण आहेत. त्यांचा मुख्य उद्देश सर्व न्यूज चानेल वर असणे एवढाच वाटतो. सुचारू आणि संयमी शासन करण्याची कुवत नसल्याने ते पायउतार होण्यासाठी निमित्त शोधत होते. त्यांच्या या वागण्या वरून एक मराठी वचन आणि एक संस्कृत सुभाषिताची आठवण होते.
आधी होता वाघ्या (NGO )
त्याचा झाला पाघ्या ( घोड दलातील सैनिक ) येथे अर्थ मूख्य मंत्री
त्याचा येळकोट राहिना
त्याचा मूळ स्वभाव जाईना
Ghatam bhindyat, :Patam chhindyat, Kuryat Rasabh Arohanam, Yen Ken Prakaren Prasiddho Purusho Bhavet
घागर फोडा, ( अथवा) अंगावरचे कपडे फाडा, (किंवा ) गाढवा वर बसा
(असे करून) या किंवा त्या प्रकारांनी प्रसिद्धीत रहा.
19 Mar 2014 - 5:38 pm | पिलीयन रायडर
ते पुर्ण पॉवर्ने सत्तेत येऊन मगच आश्वासन पुर्ण करायचं हे कळालं.. (पटलं नाही फारसं..)
पण सोनिया गांधी आणि रागां बद्दल का बोलत नाहीत केजरीवाल? (की बोलले आहेत पण मला माहित नाही..)
19 Mar 2014 - 6:01 pm | संपत
अहो सोनियाचे जावई आणि प्रियांकाचे पती रोबर्ट वाध्रांबद्दल बोलले आहेत कि ते खास पत्रकार परिषद घेऊन .. ही घ्या लिंक. शिवाय अण्णांच्या आंदोलनात आणि दिल्ली निवडणुकीत त्यांनी सोनिया आणि राहुल दोघांवरही टीका केली. इतकी कि काँग्रेस त्यांना भाजपची बी टीम म्हणाली होती :)
19 Mar 2014 - 6:10 pm | पिलीयन रायडर
चांगलय बरं का हे.. मला माहिती मिळत आहे तसं माझं मत सुद्धा थोडं निवळलं आहे.. म्हणजे केजरीवाल फार भारी माणुस आहे असं मला कधीच वाटलं नाही.. वाटणारही नाही.. पण किमान चुकीची गुहीतकं तरी नाहीत आता..
पण का कोण जाणे पण मला तो माणुस नाटकी वाटतोच.. त्याची परवा गुजरात दौर्यानंतर मुलाखत ऐकली होती.. ठिकच होती.. (तसं मला मोदींचं भाषण सुद्धा ठिक्च वाटलं होतं..)
19 Mar 2014 - 8:29 pm | विकास
तुम्हाला माहीत नसावे, ;) पण त्यांनी दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दिक्षित यांच्या भ्रष्टाचारावर ३००+ पानांचा अहवाल तयार केला होता. नंतर काय झाले कोणास ठाऊक! एके मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना दिक्षितबाईंवर आरोपपत्र कधी ठेवणार म्हणून विचारले तर म्हणाले की भाजपाच्या हर्ष वर्धनना पुरावे आणूंदेत मग २ तासात आरोप पत्र ठेवेन! :(
19 Mar 2014 - 9:51 pm | निनाद मुक्काम प...
प्रियांका व तिचा नवरा हे राजकारणात नाहीत,त्यांच्यावर आरोप करून केजू ने काय साध्य केले.
आरोप करून कार्यभाग संपला का
तुम्ही तुमचे पुरावे घेऊन कोर्टात गेलात का
आणि केंद्रातील भ्रष्टाचार व त्यात गुंतलेले मंत्री व ह्याबद्दल न्यायायालाने सुद्धा ताशेरे ओढले आहेत अनेक मंत्र्यांना तुरुंगवास झाला होता , आता जामिनावर सुटून आलेल्या ह्या महाबली नेत्याच्या विरुद्ध आप कधी बोलणार
19 Mar 2014 - 7:27 pm | मृगजळाचे बांधकाम
केजरीवाल जर राजकारणातील राखी सावंत असेल तर दिग्गीराजा सनी लिओन आहे =))