जेणेकरून संसदेत त्यांना हवा तो लोकपाल चा कायदा ते लवकरात लवकर अस्तित्वात आणू असा माझा अंदाज होता भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याचे स्वप्न असलेल्या केजरीवाल व त्यांच्या पक्षाचे प्रमुख ध्येय त्यांचे बहुसंख्य खासदार लोकसभेवर निवडून आणणे आहे.
ह्यासाठी त्यांनी स्वतः दिल्लीतून लढून निवडून यायला हवे जेथे नुकतेच विधानसभेत त्यांच्या पक्षाला यश मिळाले.
आजपर्यंत राजकारणातील राखी सावंत म्हणून ओळखल्या जाणार्या केजू ह्यांनी आता मोदी ह्यांच्या विरुद्ध लढण्याचे ठरवले आहे.
मुळात त्यांना असा राजकीय स्टंट करायचा होता तर त्यांनी अमेठी मधून उभे राहायचे होते ,तेथे त्यांची निवडून यायची खास शक्यता असती.२००४ वागलात ९२ पासून भाजपचा गड असलेल्या वाराणसी जेथे हिंदुत्वाचा शिक्का बसलेले नमो उभे आहेत त्यांच्या समोर आ देखे जरा ,कीस मे कितना हे दम अश्या फिल्मी पद्धतीत आव्हान देणे हायत राजकीय शहाणपण किती व स्टंटबाजी किती आहे
आता त्यांच्या ह्या निर्णयामुळे काही शंका मनात येतात.
केजू हे नेहमी व्यक्तीकेंद्रित टीका व आरोप करतात. कधी अंबानी तर कधी मोदी.राजकारणातील ते सुपारीबाज आहेत का
ते परकीय शक्तींचे हस्तक आहेत का
त्यांच्याकडे एक पक्ष स्थापन झाल्यावर भष्टाचार विरोधी मुद्दा सोडल्यास इतर काही मुद्दे आहेत का
विकासावर अर्थव्यवस्थेवर , त्यांची मते , भविष्यातील भारत
परराष्ट्र धोरण , संरक्षण धोरण आणि बरेच.....................
त्यांच्या पक्षातून काही त्यांना सोडून गेले व जातांना त्यांच्यावर टीका केली त्यात कितपत तथ्य आहे.
नुकतीच महाराष्टार्त गारपिटीने बळीराजा हैराण झाला असून केजू ह्यांना नागपुरात फंड रेजिंग सुचत आहे.राजकारणात केजरीवाल ह्यांचे नक्की काय चालले आहे
ते दुसरे जेपी होणार का जनतेच्या अपेक्षा उंचावून प्रत्यक्ष सत्तेवर आल्यावर त्यांना भ्रमनिरास करणे म्हणजे परत सत्तेच्या चाव्या गांधी घराण्याकडे.
केजरीवाल हे राजकारणातील राखी सावंत आहेत.
त्यांना नेहमी एक भीती असते उद्या अण्णा परत आंदोलनात उतरले आणि जनतेने त्यांना पाठिंबा दिला तर प्रसार माध्यमे ह्यांच्याकडे पाठ दाखवतील व परत आण्णाच्या मागे धावतील , प्रसार माध्यमांना काय नगाला नग हवा म्हणून ह्या ना त्या मार्गाने चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
उद्या जर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागले तर चर्चेत राहण्यासाठी बिग बॉस व झलक दिख ला जा असे पर्याय त्यांच्यासाठी नक्कीच उपलब्ध आहेत
माझ्यामते एक आंदोलक म्हणून एका मुद्यावर रान उठवणे सोपे असते पण राजकारणात एका पक्षाचा प्रमुख झाल्यावर पक्षाची अनेक विषयांवर धोरण सर्व सामान्य माणसापर्यंत पोहचवणे हे पक्षप्रमुखाचे काम आहे.
आतापर्यत आप हा पक्ष फक्त आरोपांच्या फैरी झाडत आहे व त्यांचे समर्थक त्याची री ओढत आहे.
भारताच्या बहुसंख्य जनतेचे गावातील व शहरातील मुलभुत प्रश्न , त्यावर उपाय ह्यावर बोलणे कटाक्षाने टाळले केले आहे.
सत्तेवर असतांना व बाहेरून नुसत्या आंदोलनाने देश चालवता येतो का
हेच कळत नाही आहे
ता.क
आता राहुल सुद्धा वाराणसी मधून आपली उमेदवारी घोषित करणार का
तुम्हाला काय वाटते
प्रतिक्रिया
25 Mar 2014 - 1:22 pm | निनाद मुक्काम प...
ह्यावर माझे मत मी आधीच दिले आहे.
आणि नुकतेच हर हर मोदी अश्या धाटणीच्या घोषणा उत्तर भारतात जाणीवपूर्वक परसारवून मोदींना विकासपुरुषासोबत अवतार पुरुष म्हणून येथील जनतेसमोर आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न चालला आहे, त्यावरून शंकराचार्य ह्यांनी केलेला विरोध पाहता
प्रत्यक्ष मोदी हिंदुत्वाचा शब्द आपल्या भाषणातून न काढता वाराणसी येथून उभे राहतात हे एकप्रकारे सिंबोलिक आहे. ८० खासदार असलेला उत्तर प्रदेश ,बाजूला बिहार व उत्तरांचल राज्ये अजूनही धार्मिक व पारंपारिक हिंदू मतदारांनी भरलेला आहे, हिंदुत्व व विकास अशी नवीन समानार्थी जोडी राजकीय शब्दकोशात भाजप व नमो आणू पाहत आहेत.
26 Mar 2014 - 6:48 pm | पैसा
राखी सावंतचं नाव दिलंय धाग्याला आणि तिचा उल्लेख असलेले फक्त २ प्रतिसाद?? :-/
26 Mar 2014 - 7:30 pm | विकास
मला पण ते खटकलेच. पण एकेंशी तिची तुलना केलेली मला लई लागली. त्यामुळे असुंदेत...
26 Mar 2014 - 7:48 pm | प्यारे१
आआपण (आयला हे चुकून झालंय बर्का. खर्रच्च!) तर- आपण राहुल गांधींद्वारे तिचं एम्पॉवरमेण्ट करुया काय?
सगळ्या दुष्ट मिपाकरांना एस्केप व्हेलोसिटीनं ज्युपिटरला पाठवू.
राखी सावंत जिंदाबाद !
26 Mar 2014 - 9:17 pm | विकास
राखी सावंत उत्तर-पश्चिम मुंबईतून स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणू़क लढवणार आहेत!
27 Mar 2014 - 3:10 pm | मंदार दिलीप जोशी
हे ढिंक चिका, ढिंक चिका, ढिंक चिका, ढिंक चिका, हे हे हे हे, हे हे हे हे
29 Mar 2014 - 3:28 am | निनाद मुक्काम प...
केजुला मिळालेले यश
व नुसत्या मुलाखती ,धरणे , आंदोलन , करून प्रशासन न करता येते ,महत्वाचे म्हणजे निवडून येता येते हे पाहून राखीचा आत्म विश्वास दुणावला असणार
सतत प्रसिद्धीच्या झोतात कसे राहायचे ह्याची ती जाणकार
आहे तेव्हा तिने निवडणूक लढण्याचा निर्धार केला
राखी तो झाकी हे , लिओनि, शर्लीन अभी बाकी आहे
2 Apr 2014 - 11:57 am | भाते
आत्ताच मटामध्ये ही बातमी वाचली. सुमारे १५ कोटी (!) मालमत्ता असलेल्या राखीकडे ७२ लाखांची इन्कम टॅक्सची थकबाकी आहे.