केजरीवाल ,राजकारणातील राखी सावंत

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture
निनाद मुक्काम प... in राजकारण
16 Mar 2014 - 10:52 pm

जेणेकरून संसदेत त्यांना हवा तो लोकपाल चा कायदा ते लवकरात लवकर अस्तित्वात आणू असा माझा अंदाज होता भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याचे स्वप्न असलेल्या केजरीवाल व त्यांच्या पक्षाचे प्रमुख ध्येय त्यांचे बहुसंख्य खासदार लोकसभेवर निवडून आणणे आहे.

ह्यासाठी त्यांनी स्वतः दिल्लीतून लढून निवडून यायला हवे जेथे नुकतेच विधानसभेत त्यांच्या पक्षाला यश मिळाले.
आजपर्यंत राजकारणातील राखी सावंत म्हणून ओळखल्या जाणार्या केजू ह्यांनी आता मोदी ह्यांच्या विरुद्ध लढण्याचे ठरवले आहे.
मुळात त्यांना असा राजकीय स्टंट करायचा होता तर त्यांनी अमेठी मधून उभे राहायचे होते ,तेथे त्यांची निवडून यायची खास शक्यता असती.२००४ वागलात ९२ पासून भाजपचा गड असलेल्या वाराणसी जेथे हिंदुत्वाचा शिक्का बसलेले नमो उभे आहेत त्यांच्या समोर आ देखे जरा ,कीस मे कितना हे दम अश्या फिल्मी पद्धतीत आव्हान देणे हायत राजकीय शहाणपण किती व स्टंटबाजी किती आहे
आता त्यांच्या ह्या निर्णयामुळे काही शंका मनात येतात.
केजू हे नेहमी व्यक्तीकेंद्रित टीका व आरोप करतात. कधी अंबानी तर कधी मोदी.राजकारणातील ते सुपारीबाज आहेत का

ते परकीय शक्तींचे हस्तक आहेत का
त्यांच्याकडे एक पक्ष स्थापन झाल्यावर भष्टाचार विरोधी मुद्दा सोडल्यास इतर काही मुद्दे आहेत का
विकासावर अर्थव्यवस्थेवर , त्यांची मते , भविष्यातील भारत
परराष्ट्र धोरण , संरक्षण धोरण आणि बरेच.....................
त्यांच्या पक्षातून काही त्यांना सोडून गेले व जातांना त्यांच्यावर टीका केली त्यात कितपत तथ्य आहे.
नुकतीच महाराष्टार्त गारपिटीने बळीराजा हैराण झाला असून केजू ह्यांना नागपुरात फंड रेजिंग सुचत आहे.राजकारणात केजरीवाल ह्यांचे नक्की काय चालले आहे
ते दुसरे जेपी होणार का जनतेच्या अपेक्षा उंचावून प्रत्यक्ष सत्तेवर आल्यावर त्यांना भ्रमनिरास करणे म्हणजे परत सत्तेच्या चाव्या गांधी घराण्याकडे.
केजरीवाल हे राजकारणातील राखी सावंत आहेत.
त्यांना नेहमी एक भीती असते उद्या अण्णा परत आंदोलनात उतरले आणि जनतेने त्यांना पाठिंबा दिला तर प्रसार माध्यमे ह्यांच्याकडे पाठ दाखवतील व परत आण्णाच्या मागे धावतील , प्रसार माध्यमांना काय नगाला नग हवा म्हणून ह्या ना त्या मार्गाने चर्चेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
उद्या जर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ग्रहण लागले तर चर्चेत राहण्यासाठी बिग बॉस व झलक दिख ला जा असे पर्याय त्यांच्यासाठी नक्कीच उपलब्ध आहेत

माझ्यामते एक आंदोलक म्हणून एका मुद्यावर रान उठवणे सोपे असते पण राजकारणात एका पक्षाचा प्रमुख झाल्यावर पक्षाची अनेक विषयांवर धोरण सर्व सामान्य माणसापर्यंत पोहचवणे हे पक्षप्रमुखाचे काम आहे.
आतापर्यत आप हा पक्ष फक्त आरोपांच्या फैरी झाडत आहे व त्यांचे समर्थक त्याची री ओढत आहे.
भारताच्या बहुसंख्य जनतेचे गावातील व शहरातील मुलभुत प्रश्न , त्यावर उपाय ह्यावर बोलणे कटाक्षाने टाळले केले आहे.
सत्तेवर असतांना व बाहेरून नुसत्या आंदोलनाने देश चालवता येतो का
हेच कळत नाही आहे
ता.क
आता राहुल सुद्धा वाराणसी मधून आपली उमेदवारी घोषित करणार का
तुम्हाला काय वाटते

प्रतिक्रिया

मंदार दिलीप जोशी's picture

18 Mar 2014 - 6:21 pm | मंदार दिलीप जोशी

पक्षाच्या वेबसाईटवर भारताचा नकाशा काश्मिरविरहीत दाखविणे हा योगायोग नव्हे.

अमेरिकेच्या पाठींब्यावर आलेला दम आहे केजरीवालचा. बंदे मे है दम :D

प्यारे१'s picture

17 Mar 2014 - 7:35 pm | प्यारे१

>>>> बाय द वे, घंटीचंद आरती करता करता (अनेकदा) तोंडघशी पडलेत त्यामुळे त्यांची संपूर्ण हार्डडिस्कच फॉर्म्याट करायला लागणार आहे. त्यांना उत्तर समजणार नाही.

खिक्क्क! =))
- ( शब्दश्रेयः स्पा )

विवेकपटाईत's picture

17 Mar 2014 - 8:01 pm | विवेकपटाईत

दूरदर्शन पाहत असलाच. मध्यपूर्व देशांत काय झाले. शिवाय हिस्ट्री चनेल अमेरिकन धोरण बाबत पहा. केजारीवालच्या सभोभोवती जमलेलं लोक पहा. कुणी काश्मीरला स्वतंत्रता देण्याची गोष्ट करतो, कुणी बाटला encounter मध्ये शहीद झालेल्या इनस्पेक्टर मोहन चंद शर्मा यांचा अपमान करतो. नक्सली हितचिंतकाला पार्टीचे तिकीट देतो. 'मुझे चाहिये पूर्ण स्वराज्य' याचा अर्थ समजण्या इतके सुज्ञ असालच.

खिडकी एक्क्ष. मध्ये टाकलेली रेड 'नाजी पार्टीची' आठवण करून देते. उद्या कुठल्या आप कार्यकर्ता सोबत तुमचे भांडण झाले किती ही निजी असो एसएमएस वर शेकडो तुमच्या विरुद्ध उभे राहतील. देशात पूर्णपणे अराजकता पसरेल.

शिवाय दोन महिन्यात त्यांनी केलेले कार्य:

१. चोरांची वीज बिल माफ केली (कोर्टाने त्यावर पाबंदी लावली हे वेगळ). गेल्या आठवड्यात आमच्या कालोनीत वीज कंपनीची रेड पडली ६-७ चोर पकडल्या गेले. (नाक्यावर चर्चा: केजरीवाल मुख्यमंत्री असते तर वीज कंपनीची रेड टाकण्याची हिम्मत झाली नसती) असे राज्य आपल्याला चालेल का?
२. पाणी फक्त ३ महिन्यासाठी मुफ्त केल होतो (७०० ली पर्यंत), त्यानणार १५% वाढ ही होतीच. म्हणून त्या आधीच पळ काढला. पाणी माफिया बळावला. पाण्यासाठी आता जास्त पैशे मोजावे लागतात आहे. (दिल्लीत माझ्या घरी या खर कळेलच.)
३. अंतरिम बजेट मध्ये वीज सबसिडी (जी आधी पासून मिळत होती)करता कुठलीही व्यवस्था केली नाही.

संजय क्षीरसागर's picture

17 Mar 2014 - 9:26 pm | संजय क्षीरसागर

माझा मुद्दा फोर्ड फौंडेशनपुरता मर्यादित होता. जेवढं तुम्ही अवांतर करतायं त्यावरनं पुन्हा हेच दिसतं की यू हॅव नो आर्ग्युमंट ऑन दॅट. विषय संपला!

मंदार दिलीप जोशी's picture

18 Mar 2014 - 9:48 am | मंदार दिलीप जोशी

पण ह्या पैकी काही तुम्हाला माहिती नसेल किंवा माहिती करून ग्यायाचे नसेल तर अज्ञातात सुख असते हेच खरे

आयुर्हित's picture

17 Mar 2014 - 12:58 pm | आयुर्हित

आपले profile बघितले."विनोदी साहित्य सोडता इतर सर्व वाचन बंद करून कैक वर्ष झाली असावी"
साहजिक आहे आपला कल विनोदी वचनाप्रमाणे विनोदी बघण्याकडे असावा.
लगे रहो......!!!!
चांगली करमणूक होईल आपली.

मला वाटलं लोक मुद्याला धरुन विचार करत असतील. असू द्या.

आयुर्हित's picture

18 Mar 2014 - 12:36 am | आयुर्हित

हा हा हा....! अहो गंमत केली आपली.

खरा मुद्द्दा हा आहे.....
"You're looking for three things, generally, in a person," says Warren Buffett. "Intelligence, energy, and integrity. And if they don't have the last one, don't even bother with the first two."

"गुढग्याला बाशिंग" गुजराथ मध्ये का गेले होते? विकासाची काय पाहणी केली त्यांनी? आणि तो अधिकार कोणी दिला त्यांना? आपले ठेवायचे झाकून, दुसऱ्याचे पहायचे वाकून! कशाला? जो अधिकार दिल्लीत स्वत:हून गमावून बसले, त्याने काय साधले? याने दिल्लीकरांची किती वाट लावली आहे हे एप्रिल मध्ये सर्व दिल्लीकरांना कळेलच, जेव्हा वीज व पाण्याचे खरे रेट लागू होतील तेव्हा.

"अधिकाऱ्यांची बदली करण्यासाठी काय रेट आहे?" ह्याचाच तपास करायला गेले होते असे स्पष्ट होते आपण दिलेल्या मुलाखतीत! फुशारकी करून वागळेलाच सांगतो, आआप ची चिंता तुम्हाला करायची आहे, म्हणजे नक्कीच पाणी मुरतेय IBN मध्ये.

चिरोटा's picture

17 Mar 2014 - 11:29 am | चिरोटा

विकासावर अर्थव्यवस्थेवर , त्यांची मते , भविष्यातील भारत
परराष्ट्र धोरण , संरक्षण धोरण आणि बरेच.....................

सत्तेवर येण्याआधी कॉन्ग्रेस्,भाजपा,तिसरी आघाडी ह्यांची या विषयीची मते काय होती? त्यांनी वरील विषयांबद्दलचे धोरण किती प्रमाणात राबवले सत्तेवर असताना?
ह्या विषयी मिडियात कितीही छापून आले तरी ह्या असल्या विषयात बहुतांशी राजकिय पुढार्‍यांना काडीचाही गंध नसतो, रसही नसतो.वरील खात्यातली पदे ही राज्यांतून जास्तीत जास्त खासदार निवडून आणणार्‍यांना,ज्यांचे उपद्रवमूल्य जास्त आहे अशा लोकांना दिली जातात. कधीतरी अपवाद असतात.

गादीवर येताच शीला दीक्षितच्या घोटाळ्यांची चौकशी करण्याचा दावा करणार्याने गादी वर आल्या वर या बाबतीत मौन पाळले

केजरीवाल भारतिय राजकारणात मुरत आहेत हे नक्की. ह्या आधी दावूदला महिनाभरात फरफटत आणणे,स्वीस बॅन्केतला पैसा परत आणणे,९० दिवसांत महागाई कमी करणे,पवारांच्या घोटाळ्याची चौकशी करणे... अनेक प्रयोग अनेक राजकिय पक्षांनी केले. सध्या केजरीवाल ते करत आहेत.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Mar 2014 - 3:06 pm | निनाद मुक्काम प...

सत्तेवर येण्याआधी कॉन्ग्रेस्,भाजपा,तिसरी आघाडी ह्यांची या विषयीची मते काय होती
भाजपा व कोन्ग्रेस ह्यांचे राव ह्यांच्या काळापासून चालत असलेले परराष्ट्र धोरण ज्यात लुक वेस्ट ,ज्यू राष्ट्राशी वाढते संबंध ,मुक्त अर्थ व्यवस्था अशी धोरण कायम होती. व ह्या सगळ्यांना व ह्या सगळ्यांना विरोध ही कम्युनिस्ट पक्षांची धोरण कायम होती.
देवयानी प्रकरणात सरकारची भूमिकेला भाजपचा विरोध नव्हता.
तात्पर्य एवढेच की फेस बुक वरील सुशिक्षित तरुणाई गावातील जनता ह्यांच्यापुढे एक पक्ष म्हणून समोर न येता अजूनही त्यांचा आव हा आंदोलक म्हणून आहे अश्यावेळी ते कोन्ग्रेज चे हस्तक ते परकीय यंत्रणेचे प्यादे ह्या दाव्व्यांना पुष्टी मिळते.
उद्या मोदी पंत प्रधान झाले तर त्यांच्या आघाडीत सामील होऊन परत परकीय यंत्रणेचा अजेंडा दामटायला हे मोकळे
त्यांच्या आतापर्यत राजकीय कारकीर्दीचा आढावा घेतला
तर ते इतर राजकारण्याच्या सारखे राजकारणी आहे हे दिसून येते.
अवांतर , उत्तर प्रदेश व बिहार मधील अनेक नेते भाष्टचारामुळे तुरुंगात गेले होते व आता बाहेर येउन निवडणुकांची तयारी करत आहेत उदा लालू , त्याच्या विरुद्ध त्यांच्या मतदारसंघात केजू का बरे भाषण देत नाहीत. तेथे त्यांचे खासदार निवडून यायची जास्त शक्यता आहे.
कदाचित त्यांना बाहेरून तसे आदेश आले नसावेत

चिरोटा's picture

17 Mar 2014 - 4:15 pm | चिरोटा

भाजपा व कोन्ग्रेस ह्यांचे राव ह्यांच्या काळापासून चालत असलेले परराष्ट्र धोरण ज्यात लुक वेस्ट ,ज्यू राष्ट्राशी वाढते संबंध ,मुक्त अर्थ व्यवस्था अशी धोरण कायम होती. व ह्या सगळ्यांना व ह्या सगळ्यांना विरोध ही कम्युनिस्ट पक्षांची धोरण कायम होती.

सत्तेवर येणारा/येणारे पक्ष सहसा हेच करतात. चालत आलेले धोरण राबवणे.अर्थव्य्वस्था,परराष्ट्र संबंध .. असल्या विषयातील निर्णय १८० कोनात बदलता येत नाहीत. केजरीवाल वा आणि कोणीही सत्तेवर आले तरी असल्या धोरणांत फार फरक पडणार नाही.(शिवाय ते कॉन्ग्रेसचे हस्तक आहेतच तेव्हा सत्तेवर आले तर राव ह्यांच्या काळापासून चालत आलेली धोरणे नक्की राबवतील.!!)

आत्मशून्य's picture

17 Mar 2014 - 6:45 pm | आत्मशून्य

आंदोलन चालु होते तेंव्हा झेंडे कसले घेता राजकारणात या अन लोकपाल मंजुर करुन घ्या हे आव्हान दिले. जनलोकपालला कात्रजचा घाट दाखवल्या गेल्याने शेवटी केजरीवाल राजकारणात आला, भरभरुन प्रतिसाद मिळाला की आता विरोधकांच्या पोटात दुखुन आरोप होउ लागले की म्हणे जनलोकपाल आंदोलन हाच केजरीच्या राजकीय प्रवेशासाठी स्टंट होता (तसा तो राहुलच्या लाँचीगसाठीचाही स्टंट आहे अशा वार्ताही फिरत होत्याच जसे राहुल लोकपाल मंजुर करणार व मग अन्न्णा उपोषण सोडणार ज्यामूले राहुलजींचा ट्यारपी सॉलीड होणार.. असो). मग तुमच्या हातात सत्ता असताना जनलोकपाल नक्कि मंजुर केले जाइल याचे लेखी आश्वासन उपोषण थांबावे म्हणुन दिले ते का पाळले नाही ? प्रकरण इथपर्यंत आलेच नसते ?

खरे तर केजरीचे सर्व उमेदवार जरी निवडुन आले तरी त्याला सत्ता मिळणार नाही हे स्व्च्छ असुनही त्याला टिकेचे धनी हे त्याच्या सॉलीड ट्यार्पीमुळे केले जाते आहे. कारण सत्ता हातात येउन जर ट्यार्पीच विरोधात असेल तर मोठी बोंब होइल हीच खरी भिती माध्यमे विकत घेणार्‍या अथवा न घेणार्‍यांना आहे. कुणालाही बाकी कशाचे काहीही पडलेले नाही. राहुलबाचा करिष्मा ट्यार्पी मधे नाही मग समानबळ असलेले प्रतिस्पर्धी कोण उरते ? अन निव्वळ ट्यारपीचा विचार केला तर तुल्यबळ कोन आहे ? तिथेच खरी पोटदुखी दडली आहे.

इष्टुर फाकडा's picture

17 Mar 2014 - 7:56 pm | इष्टुर फाकडा

प्रश्न फक्त केजुला मिळणाऱ्या फुटेज मुळे होणार्या पोटदुखीचा नाही. हा माणूस फक्त ५५ जागी लढणार आहे नव्हे, तेवढ्याच लोकसभेच्या जागांसाठी याने दिल्लीची विधानसभा फक्त राजकीय चमकोगिरी ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीने सोडली. तुम्ही आधी म्हटला तसे ५५ म्हणजे सगळेच्या सगळे खासदार जरी निवडून आले तरी आप प्रमुख विरोधी पक्ष बनू शकणार नाही. मग गेली दहा अकरा वर्ष जणू काही मोदिचीच सत्ता केंद्रात होती अशा थाटात केजुने मोदीविरोध सुरु केला आहे त्याचा उद्देश नक्की काय हा प्रश्न मनात येणे साहजिक नाही का ? मोदीला शिव्या घाला आणि फ़ेमस व्हा हि पारंपारिक पद्धत केजूंनी अवलंबिली असेल तर आम्ही वेगळे आम्ही वेगळे म्हणून टिर्या बडवून घेण्यात काय हशील आहे ?
फक्त उपद्रवमूल्य जाणवून द्यायचे हाच केजूंचा या निवडणुकीत उद्देश मला तरी दिसतो. त्यात चुकीचं असं काहीच नाही कारण त्यांनाही एक राजकीय पक्ष म्हणून जागा तयार करायचीये; पण त्यासाठी कोणती किंमत द्यायची याचा हिशोब केजूंचा एकतर्फी दिसतो. वास्तविक, पाच वर्षे एका जागी घट्ट बसून, आदर्श घालून देण्यासाठी तयार असलेला दिल्लीचा राजकीय मंच सोडून हे उडत्या पाखराच्या मागे नक्की कोणत्या प्रेरणेने लागले आहेत ? 'शेंडी तुटो व पारंबी मोदी आला नाही पाहिजे' हे काँग्रेस चे ब्रीद आहे, हे आप ने का आपलेसे केले आहे कळायला जागा नाही.
आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत हेच जर लोकांपर्यंत लोकसभेच्या माध्यमातून पोचवायचे होते तर लालूंच्या मतदारसंघात का नाही उभे राहत केजुजी ? उभे राहायचे सोडा लालूच्या सुटके बद्दल चकार शब्दहि नाही ! या गोष्टीच केजुंच्या उद्देशाबद्दल संशय निर्माण करतात. काँग्रेस ची कामं हा माणूस बिनपगारी किंवा फुलपगारी करत आहे असाच समज/भ्रम होतोय. हे दुर्दैवी आहे.

अर्धवटराव's picture

17 Mar 2014 - 8:24 pm | अर्धवटराव

केजरीसाहेबांच्या कोड्यात टाकणार्‍या अनेक चालींपैकी हि देखील एक अगम्य चाल आहे माझ्याकरता. त्यांची राजकीय तत्वं प्रतिव्यवस्था उभी करण्याची आहेत तर राजकीय चाली व्यक्तीकेंद्रीत आहेत. अन्यथा नवव्यवस्था उभी करण्यासाठी मोदी किंवा इतर कुणी कुठल्या सीटवरुन निवडणुक लढवणार याच्याशी केजरींना कर्तव्य असता कामा नये. एका अट्टल राजकारण्यासारखी केजरींची कथनी आणि करनीमधे प्रचंड तफावत जाणवते. भारतीय लोकशाहिच्या ते पथ्यावर पडो हिच इच्छा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Mar 2014 - 8:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

उभे राहायचे सोडा लालूच्या सुटके बद्दल चकार शब्दहि नाही ! या गोष्टीच केजुंच्या उद्देशाबद्दल संशय निर्माण करतात. +१००

हे एक मोठे प्रश्नचिन्ह केजरींवालांबद्दल नक्कीच आहे. त्यांच्याबाबत मोठी आशा असलेल्यांनाही (किंवा विशेषतः त्यांना) हा मुद्दा नजरेआड करणे कठीण आहे ! शिवाय मेडियाला हा मुद्दा बातम्यांत अथवा मुलाखतींत चर्चेत येत नाही, यामागचे कारण समजून घेण्यास आवडेल.

सगळं केजरीवालांनी करायचं. आणि आम्ही काय करणार तर तो माणूस कसा खोटा आहे हे इकडून तिकडून सिध्द करायचा प्रयत्न! अजून निवडणूकीचा अर्ज भरला नाही तरी त्या आधीच माघार घेण्याची शक्यता वर्तवायची!

त्यानी जे केलंय त्याकडे समदृष्टीनं पाहणं आपल्याला मंजूरच नाही. जर माणूस खोटा वाटतोयं तर द्यानं सोडून. तुम्हाला धागे काढायला नको आणि समर्थकांना प्रतिसाद द्यायला नको!

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Mar 2014 - 10:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

नमस्कार !

केजरीवाल प्रकरणात अजून तरी मी कोणाचीही बाजू घेतली नाही हे तुमच्या ध्यानात आले नाही हे नक्की म्हणून ते इथे ते स्पष्टपणे सांगतो आहे.

पण भ्रष्टाचार हा सर्वात मुख्य मुद्दा घेऊन पुढे आलेल्या केजरीवालांना लालू प्रसाद या कोर्टाने शिक्षा देलेल्या राजकारणी माणसाबद्दल एकदाही मत सांगायला फुरसत मिळत नाही यात निष्पक्ष राहणार्‍या माणसाला काही संशय येतो हे जर तुम्हाला जर पटत नसेल तर वरचे समदृष्टी वगैरे शब्द पोकळ आहेत.

प्रतिसादात "समदृष्टी" हा शब्द वापरला नसता तर (कारण एकांगी राजकारणाचा इतका सुळसुळाट झाली आहे की) हा आताचा प्रतिसादही लिहीला नसता. कारण एकांगी व्यक्तीपुजा (मग ती केजरीवालांची असो वा इतर कोणाची) नवी नाही आणि मला ती पसंत नाही. आजकाल अश्या व्यक्तीपुजेला विरोध वगैरे न करता तिचा उपयोग मनोरंजनासाठी करतो आहे.

बाकी वर उपस्थित केलेल्या इतर मुद्द्यांचा माझ्या प्रतिसादातील एकुलत्या एका मुद्द्यांशी काडीचाही संबंद्ध नाही (काय संबंद्ध आहे असे इथे विचारले नाही... माझ्या एकुलत्या एका मुद्द्यांशी काडीचाही संबंद्ध नाही हे सांगितलेले आहे... त्यामुळे त्याबाबतीत उत्तर नको आहे). फक्त ती आणि केवळ तीच वस्तुस्थिती समजावी हाच उद्द्येश आहे.

बाकी चालू द्या.

प्यारे१'s picture

17 Mar 2014 - 11:03 pm | प्यारे१

>>> त्यानी जे केलंय त्याकडे समदृष्टीनं पाहणं आपल्याला मंजूरच नाही.

काय केलंय हे सांगा की !
इन्टरव्ह्यू देताना अमुक एक विचार सांगणं हे मान्य. त्या दृष्टीनं एखादं पाऊल उचलावं की! आधी आपला मोहल्ला, मग शहर, मग मतदारसंघ, मग राज्य (ह्याच सिक्वेन्स नं नाही) असं काही करता आलं असतं की.
लोकांनी दिल्लीमध्ये भरपूर सीट दिल्या. त्याचा वापर काय?
मनसे आणि आआप मध्ये तत्त्वतः काय फरक आहे?
मनसे वाले सेना भाजपच्या जागा कमी करत आहेत नि आआप भाजपच्या.

प्रशासन अथवा सुशासन ह्या मुद्द्यावर निव्वळ गफ्फा हाणण्यापेक्षा काही भरीव कार्य करता आलं असतं.
मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्या महिन्यात थोडा आशावाद दिसला होता पण सोमनाथ नि नंतर सो कॉल्ड लोकपाल नाकरणे वगैरे गोष्टींमुळं नेमका हेतू काय ह्याबाबत अगदीच बोंब दिसत आहे.

केजरीवाल हे नाव चार वर्षांपूर्वी फार कमी लोकांना माहिती होतं त्यामुळं त्याचा आकसानं सूड घेणं वगैरे प्रकार कुणाचाच नाही.

व्यक्तीगत स्कोअर सेटलिंग नंतर (टाईमपास करायचा मूड असल्यास) करत राहूच्च. वरच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करावं ही णम्र विणंती.

केजारीवालांचे जे होईल ते होईल, पण वर क्लिंटन म्हणत असल्याप्रमाणे प्रसार माध्यमातील अनेकांच्या मते वाराणसी हे सेफ मतदार संघ नाही. मग मोदींना इथुन निवडणूक लढवण्यासाठी भरीस कोणी पाडले? मला आधीपासून संशय आहे कि १९९९ साली निवडणुकीत राममंदिराच्या मुद्द्यावर देऊन नंतर घुमजाव करण्यात आली तसेच भाजपाचे दिल्लीतील साडेतीन शहाणे मोदींबरोबर पंतप्रधानपदाबाबतीत करतील.
शेवटी इंदीवर म्हणाला तसे 'देते है भगवान को धोका,इन्सान को क्या छोडेंगे'.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 Mar 2014 - 1:03 am | निनाद मुक्काम प...

@संपत
मोदी ह्यांना कोणी भरीस पाडून काही करायला भाग पाडेल असे वाटत नाही.
माझ्या मते मोदी ह्यानी ह्या निवडणुकीत हिंदुत्वाचा मुद्दा हाती घ्यावा अशी भाजप व संघ प्रणीत संघटना ह्यामधील काही गटांची मागणी होती. केवळ ह्या कारणास्तव आडवाणी ह्यांचे नाव पुढे करण्यात येत होते.
माझ्यामते मोदी हे राजकारणात अत्यंत कोर्पोरेट डोक्याने आपली प्रत्येक चाल खेळतात.
हिंदुत्वाचा मुद्यांचा मोदी ह्यांना फायदा कमी व विरोधकांना एकगठ्ठा मते विनासायास मिळवून देणारा आहे ह्याची कल्पना आहे , स्वतः मोदी हे हिंदुत्वाचा मुद्दा भाषणात वापरणार नाही,
पण वाराणसी हे ९० च्या दशकात उत्तर प्रदेश मधील एक महत्वाचा मतदार संघ भाजपला केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विनासायास जिंकून देत होता ,प्रत्यक्षात त्या शहरात विकास म्हणावा असा झाला नाही तसा तो उत्तर प्रदेशात इतर शहरात सुद्धा विशेष झाला नाही , पण भाजपने गृहीत धरलेल्या वाराणसी मतदारांनी २००४ ला त्यांना झटका दिला व मागची निवडणूक सुद्धा जिंकण्यास भाजपला प्रयत्नांची शर्थ करावी लागली होती.
अश्यावेळी मोदी ह्यांनी गुजरात बाहेरून निवडणूक लढवणे व त्यासाठी संघ कार्याकार्यांचा बोलबाला असलेला वाराणसी हा मतदार संघ निवडणे हे सिंबोलिक आहे.
प्रत्यक्ष तेथून निवडणूक लढवताना भले त्यांनी हिंदुत्व हा शब्द उच्चारला नाही तरी त्यांच्या विरोधात विरोधी पक्ष नेते गुजरात दंगल व कट्टर हिंदुत्ववादी हे मुद्दे उगाळून मोदी ह्यांचा हिंदुत्वादी हा प्रचार आपसूकच करतील खुद मोदी गुजरात मध्ये केला तसा वाराणसी ते उत्तर प्रदेश चा कायापालट करू.व
भारतातून लोक उत्तर प्रदेशात कामाला येतील अशी परिस्थिती निर्माण करू असे दावे सादर करतांना गुजरातच्या प्रगतीचे आकडे सादर करतील.
सर्वसाधारपणे सामान्य जनता चेपू व मिपा वर नसल्याने हे दावे कसे खोटे आहेत हे त्यांना कळणार नाही.
त्यांच्या समोर भगव्या कपड्यात भगवा फेटा घालून विकासाची गोष्ट करणारे मोदी असतील.
७०च्य दशकात कोन्ग्रेज चे त्रिपाठी सोडल्यास राष्ट्रीय राजकारणातील भारतभर ओळखली जाणारी व्यक्ती तेथून उभी राहीलि नव्हती.
खुद मोदी ह्यांना वाराणसी मधून त्यांच्या जवळील आजमगढ मधून निवडणूक लढवणारे मुलायम व इतर अनेकांना लक्ष्य करता येईल , अखिलेश च्या सावळा गोंधळ मोदी ह्यांनी हेरून राजकारणात उतरण्याचा योग्य तो निर्णय घेतला आहे. ,
उगाच केजू सारखी चमको गिरी करायची असती तर बिहारात
नितीश कुमारांच्या उमेद्वारापुढे त्यांनी निवडणूक लढवायचे ठरवले असते.

निनाद, आभारी आहे. मोदींना नक्की काय सांगून पटवले असेल ह्याची कल्पना आली. :)

निनाद ह्यांनी हे जे काही लिहिले आहे त्याचा प्राकृत मराठीत कुणी तर्जुमा करेल का? कारण एकामागोमाग एक येणारी असंबद्ध वाक्ये अर्थभंग करतात. कारण पहिलेच वाक्य बघा-
जेणेकरून संसदेत त्यांना हवा तो लोकपाल चा कायदा ते लवकरात लवकर अस्तित्वात आणू असा माझा अंदाज होता नक्की काय म्हणायचे आहे? तसेच दुसरे वाक्य- भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न "बहुसंख्य खासदार निवडून आणून" अधिक सुकरतेने साध्य होईल असे नाही का वाटत? तुम्हाला नक्की प्रॉब्लेम कशाबद्दल आहे- भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न बघण्याबद्दल की अधिकाधिक खासदार निवडून आणण्याबद्दल? मला वाटते- दुसर्‍या गोष्टीबद्दल असावा कारण त्याने भाजपच्या उद्देशाला सरळ छेद जातो!
ह्यासाठी त्यांनी स्वतः दिल्लीतून लढून निवडून यायला हवे जेथे नुकतेच विधानसभेत त्यांच्या पक्षाला यश मिळाले. आता केजरीवालना कुठून उभे राहायचे आहे ते त्यांना ठरवू द्या की! नाही म्हणजे, केजरीवालांनी निनाद रा. जर्मनीखुर्द ता. युरोप यांजकडे याबाबत विचारणा केल्याचे आम्ही तरी काही वाचले नाही बुवा! "महानगरपालिका- उंदीर मारणे विभाग" इ.इ. मनात आले या निमित्ताने!
.२००४ वागलात ९२ पासून भाजपचा गड असलेल्या वाराणसी जेथे हिंदुत्वाचा शिक्का बसलेले नमो उभे आहेत त्यांच्या समोर आ देखे जरा ,कीस मे कितना हे दम अश्या फिल्मी पद्धतीत आव्हान देणे हायत राजकीय शहाणपण किती व स्टंटबाजी किती आहे या वाक्याचा अर्थ लावायचा यथाशक्ति प्रयत्न केला बराच वेळ- त्यातून जे कळलं त्याबद्दल लिहितो- वाराणसी हा तुम्ही म्हणता तसा भाजपाचा गड नाही- तुमचेच भाजपमित्र सहकारी श्री क्लिंटन यांनीच देलेल्या आकडेवारीनुसार भाजपाची मतांची टक्केवारी १९९१ सालापासून सातत्याने कमी होते आहे आणि गेल्या निवडणूकीत अवघा २.६% चाच फरक होता. त्यामुळे, आपण ज्याला "राखी सावंत" मानता त्याने काही एक विचार करुन वाराणसी निवडले आहे ते दिसते. पुढच्या वेळी अधिक अभ्यासाची अपेक्षा आहे आपल्या सारख्या तज्ज्ञांकडून! ;-)
बाकी तुमच्या या भोंगळ धाग्याची आणि त्याहूनही हास्यास्पद युक्तिवादाची धिंड काढायला चिक्कार जागा आहे पण तेव्हढा मजकडे वेळ नाही त्यामुळे तुम्हाला "मिपावरचे दिग्विजय सिंह" असा पुरस्कार घोषित करुन मी आपली रजा घेतो! :D

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 Mar 2014 - 2:58 am | निनाद मुक्काम प...

@आता केजरीवालना कुठून उभे राहायचे आहे ते त्यांना ठरवू द्या की
आता केजू आम आदमी साठी पक्ष काढतात तेव्हा आम आदमी म्हणून त्यांच्यावर मत केले तर बालकाला का बरे राग आला.
निमुपोज ह्यांनी सुद्धा बालकाकडे त्याने काय लिहावे , का लिहावे व कसे लिहावे ह्यांची विचारणा केल्याचे आम्ही तरी काही वाचले नाही बुवा! "महानगरपालिका- उंदीर मारणे विभाग" इ.इ. मनात आले या निमित्ताने!

@- भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न बघण्याबद्दल की अधिकाधिक खासदार निवडून आणण्याबद्दल?
केजू ने टीम अण्णा ची फारकत घेऊन राजकारणात प्रवेश घेतला आता ते लोकसभेची निवडणूक लढवत आहेत ,
त्यांना नुकतेच दिल्ली येथे मिळालेले यश पाहता त्यांनी दिल्ली येथून निवडणूक लढवली असती तर नुसती त्यांचीच नाही तर त्यांच्या पक्ष्याच्या विजयाची शक्यता वाढली असती.
पण त्यांनी दिल्लीकरांना वार्यावर सोडून राष्ट्रपती राजवट आणली ह्याचा विपरीत परिणाम त्यांना दिल्लीत दिसून येईल ,
ह्या आधी अनेक विषयावर मी जेव्हा मिपावर लेख लिहिले आहेत व त्यात भाकिते वर्तविली होती ,ती बहुतेक सर्व खरी ठरली आहेत.
@- भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न बघण्याबद्दल की अधिकाधिक खासदार निवडून आणण्याबद्दल?
केजू ने टीम अण्णा ची फारकत घेऊन राजकारणात प्रवेश घेतला आता ते लोकसभेची निवडणूक लढवत आहेत ,
त्यांना नुकतेच दिल्ली येथे मिळालेले यश पाहता त्यांनी दिल्ली येथून निवडणूक लढवली असती तर नुसती त्यांचीच नाही तर त्यांच्या पक्ष्याच्या विजयाची शक्यता वाढली असती.
पण त्यांनी दिल्लीकरांना वार्यावर सोडून राष्ट्रपती राजवट आणली ह्याचा विपरीत परिणाम त्यांना दिल्लीत दिसून येईल ,
ह्या आधी अनेक विषयावर मी जेव्हा मिपावर लेख लिहिले आहेत व त्यात भाकिते वर्तविली होती ,ती बहुतेक सर्व खरी ठरली आहेत.
असो
ह्या निमित्ताने तुम्ही वेळा वेळ काढून मिपावर लिखाण केले ह्याबद्दल एक आभासी मफलर आपणास मी घोषित करत आहे.
पुढील मिपा कट्टा आपण फंड रेजिंग इवेन्ट साठी लवकरात लवकर करूया.

निमुपोज ह्यांनी सुद्धा बालकाकडे त्याने काय लिहावे , का लिहावे व कसे लिहावे ह्यांची विचारणा केल्याचे आम्ही तरी काही वाचले नाही बुवा! निनाद- निदान टोमणे तरी स्वतःचे ओरिजिनल मारा राव! माझेच उसने घेउन मलाच काय मारतो!! :D आणि केजरीवाल/मोदी आणि कुणी फाटका निनाद एकच वाटतं- उंदीर मारणे विभाग म्हणायला!! असो- तुमचा दोष नाही तो- तुमच्या "पंचतारांकितनगरी"ला भेट दिली आणि सगळा उलगडा झाला! असो, असेच कष्ट करा आणि (कधीतरी) मोठे व्हा! तुम्हाला एकदा सुसंगत विचार करता यायला लागला आणि नीट मराठीत लिहिता यायला लागलं की आपण चर्चा करुच, तोपर्यंत तुमची भाकिते करत राहा. असो, आभार :D

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 Mar 2014 - 3:53 am | निनाद मुक्काम प...

@तेव्हढा मजकडे वेळ नाही
आपण जे लिहितो त्यावर जर ठाम राहता येत नसेल तर काही लिहिण्यापूर्वी किमान विचार करावा .
तुमच्याकडे किती फावला वेळ आहे हे ज्याला तुम्ही काहीवेळा पूर्वी दिग्गी राजा अशी उपाधी दिली त्याला परत एकदा प्रतिसाद देऊन सिद्ध केले ,
आणि मी तुम्हाला टोमणा नाही हो मारला
तुम्ही मला उद्देशून मूळ प्रतिसादात जे लिहिले की ते जसेच्या तसे तुम्हाला लागू पडते.
मी केजुला सल्ले देणे तुम्हाला आवडले नसेल तर तुमचे मला सल्ला देणे मला का बरे आवडेल हे तुमच्या ध्यानी तुमच्या शब्दात आणून दिले ,
@केजरीवाल/मोदी आणि कुणी फाटका निनाद एकच वाटतं
अहो पण केजरीवाल तर स्वतःला एकदम आम आदमी म्हणवतात ना
आणि लोकशाहीत मोदी व केजरीवाल व फटका निनाद ह्यांना आपली मते व्यक्त करण्याचा अधिकार आहेच की
आता तुम्ही केजू ची व्यक्ती पूजा करणार्यास एवढे गर्क आहात .त्यामुळेच तुमचा बहुमुल्य वेळ तुम्ही फाटक्या माणसावर खर्च करत आहात , त्यापेक्ष्या एखादा डिनर विथ कॉकटेल फंड रेजिंग इवेन्ट आयोजित करा की राव
आम्ही सुद्धा येऊ खाजगी विमानाने ,
आणि मी काही केजू ह्यांच्या पक्षात नाही की त्यांच्या विरुद्ध बोललो म्हणून पक्षातून काढून टाकायला.
मी दिलेला मफलर फाटका निघाला असेल म्हणून मला तुम्ही फाटका म्हणत असाल.
तुमच्यासारखे लोक जेव्हा असे वयक्तिक पातळीवर टीका करतात तेव्हा मनापासून आनंद होतो.
ह्या आधी ह्या लेखावर माझ्या मताशी अनकूल नसणारे
अनेक प्रतिसाद आहेत पण तुमचा प्रतिसाद खासच आहे.
अशीच विशेषण मला देत रहा.
आम आदमी समर्थकाचे खरे रूप तरी कळू दे.
माझ्याशी चर्चा करायचे राहू द्या आधी तुम्ही मिपावर लिहिते व्हा
स्वतः आधी एखादा लेख लिहा मग पुढचे पाहूया

संजय क्षीरसागर's picture

18 Mar 2014 - 7:07 am | संजय क्षीरसागर

प्रथम आयुर्हितांनी वॉरेन बफेचा क्वोट दिलायं, तो केजरीवालांना उमेदवार म्हणून बघायला अत्यंत जरुरी आहे :

You're looking for three things, generally, in a person," says Warren Buffett. "Intelligence, energy, and integrity. And if they don't have the last one, don't even bother with the first two."

केजरीवालांच म्हणणं असंय की कोणतही भ्रष्ट नेता सत्तेत न येण्याचे तीन पर्याय आहेत : त्याच्या विरुद्ध निवडणूक लढवून त्याला पराभूत करणं, जनतेला त्याला परत बोलावण्याचा अधिकार असणं (Right to Recall) किंवा जनलोकपालसारखा प्रभावी कायदा करणं.

त्यांच्या मते `जनलोकपाल' हा आआपाचा प्रथम विषय आहे आणि त्यावर एक काय शंभर मुख्यमंत्रीपदं कामी आली तरी चालतील. दिल्ली असेंब्लित त्याविषयी सत्ताधारी आणि विरोधी दोघांनी अनास्था दाखवली हे स्वतःच्या राजिनाम्याचं त्यांनी दिलेलं कारण आहे. ( राजिनाम्यानंतरची त्यांची मुलाखत).

दुसरी गोष्ट, जर मोदी आणि गांधी एकमेकांविरुद्ध आहेत तर ते परस्परांविरुद्ध निवडणूक का लढवत नाहीत? हा त्यांनी मांडलेला मुद्दा कुणाही सूज्ञ व्यक्तीला मंजूर होईल. ते स्वतः मोदींविरुद्ध निवडणूक लढवतील हा निर्णय त्यांची अंतरबाह्य एकवाक्यता दर्शवतो.

तिसरी गोष्ट, भारतीय मानसिकता मोठी मजेदार आहे. कुणी तरी अवतार घेईल आणि सगळं आबादीआबाद होईल अशी एक भ्रामक समजूत युगानुयुगे आपण केली आहे. त्यामुळे आपण सक्रिय होऊन काही करावं ही गोष्ट आपल्या गावीही नाही. आपण फक्त उलटसुलट चर्चा आणि नव्या विचारांचा बेभान विरोध इतकंच करतो. (थोडं आवांतर होईल पण युद्धाच्या निष्फळतेविषयी खफवर झालेली चर्चा पाहा! `युद्धही कल्पना माझ्या मनातून मी संपूणापणे निष्कासित करतो ' असं खुल्या दिलानं आपल्याला मान्य देखिल करता येत नाही)

आणि फायनली, केजरीवाल म्हणतात तसं, आआपा संपूर्ण नामशेष झाली तर व्यक्तिशः त्यांचं किती नुकसान होईल हा प्रश्न नाही. भारत भ्रष्टाचार मुक्त होऊ शकतो, आपल्या हयातीत ही गोष्ट घडू शकते, ही नव्यानं निर्माण झालेली आशा सर्वस्वी संपून जाईल. (आता या अँगलनं इथल्या सदस्यांचे प्रतिसाद पाहा)

चौकटराजा's picture

18 Mar 2014 - 8:54 am | चौकटराजा

केजरीवाल यांचे राजकारण परंपरागत राजकारणापेक्षा वेगळे आहे. कसे ? काही अपवाद असतील पण त्यांचे वेगळे पण असे आहे.
१. ते सहेतुकपणे आरक्षण, राज्यघटना, काश्मीर, नाटो., अमोरिका, रशिया, या नाजुक विषयापासून सध्या लांब आहेत. कारण सामान्य माणसाला तलाठ्याच्या कार्यालयात काय अनुभवाला येते हे महत्वाचे असते. ओव्हल ऑफिसमधे काय चालले आहे याचाशी त्याचे काही देणेघेणे नसते.
२.त्यानी आयारामना संधीसाधूना तिकिटे देण्याचे टाळले आहे. उदा पुणे येथे डी एस कुलकर्णी याना तिकिट देण्यात आलेले
नाही तर ते अगोदरचे कार्यकर्ते वारे याना देण्यात आले आहे. नाहीतर संधीसाधु शरद पवाराना काय केले आहे पहा.मावळात २४ तासात त्यानी उद्धवचा माणूस फोडून उभा केला आहे.
३.परंपरागत राजकारणात मोठे नेते एकमेकांविरूद्ध उभे रहात नाहीत. कारण निवडून येऊन वाटून वाटून शेत खाण्याची त्यात चाल असते. जिंकणारा ६५ टक्के हरणारा ३५ टक्के. केजरीवाल हे भारतातील पहिलेच नेते असावेत ज्यानी किमान
असा विचार तरी बोलून दाखविला आहे. मोदी विरूद्ध शरद पवार बारामतीत अशी निवडणूक मोदी व पवार दोघेही असून १०० जन्म मिळाले तरी कल्पू शकणार नाहीत.

धन्या's picture

18 Mar 2014 - 9:15 am | धन्या

नया हैं वह...

आपल्या लोकशाहीत लोकप्रतिनिधी जनतेचं रिप्रझेंटेशन करायला एखाद्या मतदारसंघातुन उभा राहातो, कोणा व्यक्ती विरुद्ध म्हणुन नाहि. हि आपल्या लोकशाहिची मूलभूत चौकट आहे. अर्थात, याला काहि अपवाद आहेत. पण ते अपवाद म्हणुनच... खासदारांना एका विशिष्ट मतदार संघाचं प्रतिनिधीत्व करायचं आहे, त्याला व्यक्ती विशेषाला रोखायचे नाहि.

केजरीवाल मोदिंविरुद्ध उभे राहताहेत ते दिल्लीची बेगमी पक्की करायला. जर मोदी हरले तर केजरीवाल बोटाच्या इशार्‍यावर दिल्ली आणि इतर काहि राज्यांचे सीएम निवडतील. आणि जर केजरीवाल हरले तर हि हार एखाद्या युद्धातल्या जखमेप्रमाणे दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत मिरवतील. बेसीकली केजरीवाल जनलोकपालाच्या तोडीचा मुद्दा शिजवत आहेत. दिल्ली आणि इतर विधानसभा निवडणुकीसाठी आआपची पाटि नव्याने कोरी करायची हि नामी संधी आहे.

एखाद्या मतदारसंघातुन उभा राहातो, कोणा व्यक्ती विरुद्ध म्हणुन नाहि.....त्याला व्यक्ती विशेषाला रोखायचे नाहि.

व्यक्तीपेक्षा मुद्दा महत्त्वाचायं आणि तो व्यक्तीशिवाय साध्य होऊ शकत नाही. तस्मात व्यक्ती विरुद्ध व्यक्ती (किंवा एका मतप्रणाली विरुद्ध दुसरी) असा लढा असतो. मग ती निवडणूक असो की इथली चर्चा.

बाकी पुढचा सर्व प्रतिसाद निव्वळ कल्पनाविलास आहे.

अर्धवटराव's picture

18 Mar 2014 - 6:26 pm | अर्धवटराव

मतप्रणालीविरुद्ध लढायला केजरीवालांना मोदिंचा मतदार संघ ठरायची वाट बघावी लागु नये. व्यक्तींविरुद्ध लढायचं असल्यास ए राजा, सोनीया गांधी वगैरे मंडळी देखील रिंगणात आहेत. मोदिंची निवड केजरीसाहेबांच्या भावी राजकारणाची निकड आहे.

बाकी पुढचा सर्व प्रतिसाद निव्वळ कल्पनाविलास आहे.

आय विश. मी राजकारणाला राजकारण म्हणुनच बघतो. व्यक्तीविशिष्टाचं महात्म्य त्याच्या बोलण्याच्या स्टाईलवरुन जोखण्यापेक्षा त्याच्या कृतींचे पडसाद कसे उमटतात हे माझ्या दृष्टीने जास्त महत्वाचं आहे. असो.

चला, एकाला तरी मुद्दा समजला!

केजरीवाल यांचे राजकारण परंपरागत राजकारणापेक्षा वेगळे आहे.

अनभिज्ञ लोकांन केजरीवालांना `नया है वो' वगैरे म्हणू द्या. `लेकीन वह सच्चा और नेक है.... और बंदेमे दम है!'

मंदार दिलीप जोशी's picture

18 Mar 2014 - 10:13 am | मंदार दिलीप जोशी

`लेकीन वह सच्चा और नेक है.... और बंदेमे दम है!'

:D
इतकी विनोदी सकाळ कधीच गेली नसेल

अनभिज्ञ लोकांन केजरीवालांना `नया है वो' वगैरे म्हणू द्या.

"वो" नाही, "वह" आहे ते.
मय क्या बोल रहा हुं, तुम क्या बोल रहा हय.

क्लिंटन's picture

18 Mar 2014 - 10:26 am | क्लिंटन

कारण सामान्य माणसाला तलाठ्याच्या कार्यालयात काय अनुभवाला येते हे महत्वाचे असते. ओव्हल ऑफिसमधे काय चालले आहे याचाशी त्याचे काही देणेघेणे नसते.

आणि म्हणूनच तलाठ्याच्या ऑफिसमध्ये काय चालले आहे ते सुधारण्यासाठी ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत.माझ्या घरच्या बाजूला रस्त्यावर असणारा कचरा दररोज उचलला जात नाही हा मुद्दा महापालिकेच्या निवडणुकीत मत देताना विचार करायला लक्षात घेतला तर ते योग्य आहे पण लोकसभेत मतदान करताना हा मुद्दा लक्षात घेणे कितपत योग्य आहे?तेव्हा म्हणणे तेच तर आहे की आआपने स्वतःला लहान पातळीवर सिध्द करून दाखवावे आणि मग मोठ्या गमज्या माराव्यात. इथे दिल्लीतून ४९ दिवसात काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला नसतानाही केजरीवाल पळून गेला (सॉरी अशा माणसाला आदरार्थी बहुवचन यापुढे मला तरी लिहिता येणार नाही)--कारण काय तर म्हणे कोअर अजेंड्यातील लोकपाल बिलाला समर्थन मिळणे शक्य नव्हते. भारतासारख्या देशात कोणत्याही मुद्द्यावर असे निर्विवाद समर्थन मिळेल असे नंबर विधानसभेत/लोकसभेत मिळणे फारच कठिण आहे.मग प्रत्येक वेळी तो असाच पळून जाणार का? तेव्हा आधी दिल्ली (किंवा अन्य कोणतेही राज्य), एखादी मोठी महापालिका इथे स्वतःला त्याने सिध्द करून दाखवावे. मुलाखतीमध्ये आपण किती सेन्स बाळगतो असे नाटकी बोलण्याला काहीही अर्थ नाही. मुलाखतीत/भाषणात जे काही बोलले जात असेल ते बाबावाक्य प्रमाणम म्हणून सिरियसली घ्यायचे झाले तर हुरियत कॉन्फरन्सवाले काश्मीरात अत्याचार होत आहेत असे म्हणतात किंवा आआपचा नेता कमल मित्र चिनॉय म्हणतो की काश्मीरात 'इंडियन स्टेट' विरूध्द लढायला हवे असे काही बरळतो ते ही सिरियसली घ्यायला हवे. तेव्हा तो मुलाखतींमध्ये नक्की काय बोलतो याला माझ्या लेखी तरी शून्य महत्व आहे.(तुम्ही हे लिहित आहात असे म्हणत नाही.पण एक जनरल गोष्ट लिहित आहे).

मंदार दिलीप जोशी's picture

18 Mar 2014 - 10:46 am | मंदार दिलीप जोशी

इथे दिल्लीतून ४९ दिवसात काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला नसतानाही केजरीवाल पळून गेला

आहो, पळून जायला सुद्धा दम लागतो. बंदे मे है (भागनेका) दम. आहात कुठे?? *mosking*

चौकटराजा's picture

18 Mar 2014 - 1:59 pm | चौकटराजा

आपल्या देशात फेडरल रचना आहे. त्याप्रमाणे आपले म्हणणे ठीक असेलही.पण आज भारताचा नेता म्हणून नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी अशीच नावे पुढे येतात. फेडरल आहे म्हणून एखाद्या मुख्यमंत्र्याचे वा जि प अध्यक्षाचे नाव पुढे येत नाही.
सबब अगदी तलाठी कार्यालय ते पी एम ओ कार्यालय येथील गव्हर्नन्स बाबत पंतप्रधानाचे स्वप्न काय आहे ते महत्वाचे असते. लाल किल्यावरचे भाषण त्या अर्थाने महत्वाचे असते. युनो मधील भाषणासारखे भाषण तेथे करून चालणारच नाही.
तरीही ते तसेच केले जात असते. भारतातील लोकशाही आज तरी लोकांचे दैनदिन प्रश्नच महत्वाचे धरले जातात. म्हणूनच काही वेळेस त्यावरून लक्ष उडविण्यासाठी राम मंदिरासारखे अनावश्यक मुद्दे उपस्थित केले जातात. ( व बाबरी पाडावा सारखे अनावश्यक ही) .मी काश्मीर मधे गेलो असताना महाराष्ट्र कुठे आहे असा एकाने मला प्रश्न विचारला होता. मी चाटच पडलो. बहु असोत सुंदर वगैरे तिथे म्हणून काही उपयोग नव्हता. केजरीवाल यानी काही मुद्दे घेतलेले नाहीत याचा अर्थ त्याना त्याचे महत्व कळत नाही असे नाही. काश्मीर चा तलाठी व कन्याकुमारीचा तलाठी ही एकाच आईची एकाच प्रवृतीची दोन जुळी मुले आहेत त्याना प्रथम सरळ करायला पाहिजे त्यांचे बोलाविते धनी घरी पाठवायला पाहिजे याचा त्यानी विचार केलेला आहे .तो जाणता राजा यानी केलेला आहे असे मला तरी गेल्या चाळीस वर्षात आढळलेले नाही. नुसता कांदा, उस शेती पाणी व साहित्य संमेलनाचे राजकारण करून द्रष्टेपण मिळविता येत नाही. शिक्षण, न्यायव्यवस्था व निवडणुका यातील घाण कोणी व कधी काढायची ?

संजय क्षीरसागर's picture

18 Mar 2014 - 2:14 pm | संजय क्षीरसागर

सबब अगदी तलाठी कार्यालय ते पी एम ओ कार्यालय येथील गव्हर्नन्स बाबत पंतप्रधानाचे स्वप्न काय आहे ते महत्वाचे असते.

बरोब्बर! आणि सामान्य माणसाची प्रार्थमिक गरज `लोकल' (मोहोल्ला) आहे.

भारतातील लोकशाही आज तरी लोकांचे दैनदिन प्रश्नच महत्वाचे धरले जातात. म्हणूनच काही वेळेस त्यावरून लक्ष उडविण्यासाठी राम मंदिरासारखे अनावश्यक मुद्दे उपस्थित केले जातात

हे इथल्या विद्वजनांना कळत नाही याचं आश्चर्य आहे!

केजरीवाल यानी काही मुद्दे घेतलेले नाहीत याचा अर्थ त्याना त्याचे महत्व कळत नाही असे नाही.

पुन्हा एकदा अभिनंदन!

काश्मीर चा तलाठी व कन्याकुमारीचा तलाठी ही एकाच आईची एकाच प्रवृतीची दोन जुळी मुले आहेत त्याना प्रथम सरळ करायला पाहिजे त्यांचे बोलाविते धनी घरी पाठवायला पाहिजे याचा त्यानी विचार केलेला आहे .

तुम्हाला `विनम्र प्रशासन' या आआपाच्या मॅनिफेस्टोचं मर्म कळलंय.

नुसता कांदा, उस शेती पाणी व साहित्य संमेलनाचे राजकारण करून द्रष्टेपण मिळविता येत नाही.

चौरा, आता फक्त तुमची स्वाक्षरी बदला!

चौकटराजा's picture

18 Mar 2014 - 4:31 pm | चौकटराजा

आताच एक कार्यक्रम एका चानल वर चालला होता. तरूणाना खासदारपद म्हणजे नक्की काय माहिती आहे' असा विषय होता. बहुतेकानी खासदाराला चार पाच आमदार रिपोर्ट करतात व एकेका आमदाराला त्याच्या हाताखालचे नगरसेवक रिपोर्ट करतातअशी हायरार्की आहे असे उत्तर दिले. फक्त एकाने खासदाराचे मुख्य काम कायदा करणे असे दिले. यावरून आपली द्विस्तरीय वैधानिक व्यवस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांचे परस्पर संबंध काय आहेत याचे किती प्रगाढ अज्ञान आहे हे कळून येते.
म्हणूनच भारातातील पुढील मूलभूत समस्या प्रशासन, शिक्षण, न्यायदान व निवडणूक कायदा या आहेत. या सोडविल्या तर गोल्डन हाय वे नदी जोड, बेळगाव प्रश्न, शेतमालाची किंमत. आयकर, काळा पैसा या समस्या सुटतीलच. पण त्या सुटल्या तर राजकारण्याना मग अजेंडा काय राहिला. एका कामगार पुढार्याने मी तरूण असताना सांगितलेले एक वाक्य आठवते. कामगार नेत्याने सगळेच प्रश्न कधीच सोडवायचे नसतात. सोडवले तर युनियनचे पावती पुस्तक गटारात फेकून द्यावे लागेल.

चिगो's picture

18 Mar 2014 - 2:37 pm | चिगो

वरील प्रतिसादातले मुद्दे कळले, पण पटले नाही.. पहील्या मुद्द्याचा प्रतिवाद क्लिंटन यांनी खाली केला आहे..

मोदी विरूद्ध शरद पवार बारामतीत अशी निवडणूक मोदी व पवार दोघेही असून १०० जन्म मिळाले तरी कल्पू शकणार नाहीत.

हा मुद्दापण तसाच.. जनरली जी व्यक्ती जिंकण्यासाठी म्हणून निवडणूक लढवते, ती व्यक्ती अश्याच जागेतून उभी राहते, जिथून तिच्या जिंकण्याची शक्यता जास्त आहे.. उगाच शहीद व्हायला सगळेच थोडी "हआआपलेले" आहेत? "सी.एम. बनने को थोडी आया था मै? देश के लिए / संविधान के लिए जान हाजीर है" म्हणत मतदारांच्या विश्वास, आकांक्षा आणि अपेक्षांना तेल लावून कांगावा करुन पळपुटेपणा करणार्‍यांना एकतर अराजकता हवी असते, किंवा "अभ्भी के अभ्भी" सगळ्यात वर पोहचायचे असते आणि त्यासाठी त्यांच्या बोलबच्चनवर विश्वास ठेवणार्‍या मतदात्यांकडून "एसेम" मागवून निर्णय घेण्याची वाट पहायची त्यांना गरज भासत नाही..( तसेही तो "टॅग" केजरीवाल अभिमानाने मिरवतातच. ;-) )

देशासाठी मोठ्यामोठ्या गफ्फा मारणार्‍या ह्या "संयत आणि सच्चे" इंटर्व्ह्यू देणार्‍यांचे कॅमेर्‍यामागचे सेटींग आणि आपल्या कार्यकर्त्यांसमोरची मुजोरी, आणि नाटकी आक्रस्तळेपणा जर कोणाला अवतारी माणसाची लक्षणे वाटत असतील तर तो आशावाद त्यांनाच लखलाभ..

ह्यावरुन २०११च्या आसाम निवडणूकांच्या वेळची एक गोष्ट आठवतेय.. निकालाच्या दिवशी जसाजसा निकाल लागत गेला, तसा तसा एका अपक्ष उमेदवाराच्या चेहर्‍यावरील आनंद आणि हावभावांमधली अधीरता वाढत होती. मला आश्चर्य वाटले, कारण की हा पठ्या प्रत्येक राऊंडमधे अधिकाधिक मागे पडत होता. शेवटी जेव्हा विजयी उमेदवाराची घोषणा झाली तेव्हाच्या ह्याचा आनंद, आणि विजयी उमेदवाराशी दाखवलेली "गर्मजोशी" डोक्यात लख्ख उजेड पाडून गेली.. ;-)

बोला, केजरीवाल महाराज की जय !!

मंदार दिलीप जोशी's picture

18 Mar 2014 - 3:08 pm | मंदार दिलीप जोशी

है शाब्बास

चौकटराजा's picture

18 Mar 2014 - 4:10 pm | चौकटराजा

व्यक्ति नुसती जिकण्यासाठी निवडणूक लढत नाही तर नको त्या माणसाने सत्तेवर येउ नये म्हणून देखील निवड्णूक लढली गेली पाहिजे. आपल्या लोकसभेतच अटलबिहारी यांचे मंत्रीमंडळ पाडण्यासाठी काय काय खटाटोप कशी भाषणे झाली त्याचा इतिहास विसरलात काय ? आजही "जातीय वादी शक्तीना सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठी " असा चावून चोथा झालेल्या शैलीत प्रचार असतो. म, गांधींचे वा लो टिळकांचे स्वप्न साकार करण्यासाठी" असा प्रचार असतो काय ?
जनरली जी व्यक्ती जिंकण्यासाठी म्हणून निवडणूक लढवते, ती व्यक्ती अश्याच जागेतून उभी राहते..
अशा व्यक्ती नी नेता होउन नये फार तर " होयबा" खासदार व्हावे. त्यानी मेजर होउन नये सार्जंटची त्यांची लायकी !

मंदार दिलीप जोशी's picture

18 Mar 2014 - 4:18 pm | मंदार दिलीप जोशी

बरोबर ओळखलेत. मी याच छुप्या अजेंड्याबाबत बोलत होतो. :)

पिलीयन रायडर's picture

18 Mar 2014 - 11:03 am | पिलीयन रायडर

मला राजकारणातलं काहीही कळत नाही.. वाचन नाही.. अभ्यास नाही..
जेवढं बातम्या, पेपर, चेपु आणि मिपा ह्यातुन समजतं तेवढचं काय ते माझ ज्ञान..
तरीही मला केजरीवाल ह्यांच्या संदर्भात काही प्रश्न आहेत.. जमल्यास कुणी उत्तरे द्यावीत..

१. दिल्ली मध्ये निवडुन आल्यानंतर आप कडे भाजप आणि काँग्रेस असे दोन्ही पर्याय होते. आप जनरली निर्णय जनाधारावर घेते असं वाटलं (एस्.एम्.एस मागवणे वगैरे..) मग अशावेळी भाजपचा पाठींबा घेतला असता तर जे सरकार आले असते ते बहुतांश जनतेच्या पसंतीचे आले नसते का? मग काँग्रेस ज्यांना जनतेनेच अत्यंत कमी जागा देऊन कौल दिला होता, त्यांच्या सोबत सरकार का बनवले?

२. मी शीला दिक्षितांविरुद्ध माझ्याकडे खुप पुरावे आहेत वाला केजरीवालांचा व्हिडिओ पाहिला होता, आणि नंतर "हर्षवर्धन ह्यांनी पुरावे आणुन दिले की कारवाई करु" हा ही.. असे का?

३. आप ला बदल आणायचा आहे. लोकशाही मध्ये मतदानातुन विवडुन येऊन, घटनात्मक / कायदेशीर पद्धतीनी बदल आणायचा मार्ग आहे. अशावेळी सरकार स्थापायला मिळाले असताना ते २ महिनेही न चालवणे मला अयोग्य वाटते. शिवाय केजरीवाल समर्थक त्यांच्या राजीनामा देण्याला "लाथ मारली मुख्यमंत्रीपदाला... किती निर्मोही.. त्यांना कशाचाच लोभ नाही.." वगैरे सुर लावतात तो ही मला योग्य वाटत नाही. मुख्यमंत्रीपद हे एक मोठे पद आहे.. ज्यात तुम्ही खरच महत्वाचे निर्णय घेऊ शकता. त्याला लाथ मारणं आणि परत रस्त्यावर जाऊन आंदोलनं करणं हा मला मुर्खपणा वाटतो.. आप ला संधी होती.. १ वर्ष तरी किमान सरकार चालवायला हवे होते म्हणजे जनतेला त्याम्चे कामकाज पहाता आले असते आणि आप लाही अनुभव मिळाला असता. सध्या तरी आप बद्दल जे काही मत आहे ते निव्वळ वरवरचे आहे कारण सरकार चालव्ण्याच्या बाबतीत कुणाला काही कल्पनाच नाही.. त्यामुळे उद्या त्यांचे सरकार नक्की कसे काम करेल ह्याबद्दल सगळेच अंदाजच आहेत..

४. आपने ज्या काही योजना (वीज बिल, पाणी पट्टी बाबतीत) जाहीर केल्या, त्याम्चे नक्की काय होणार? म्हण्जे त्या प्रत्य्क्षात येऊ शकत होत्या का (फिजिबिलिटी?), त्याचा आर्थिक बोजा कुणावर पडत होता नक्की? वगैरे प्रश्नांची उत्तरं मिळणारच नाहीत का? म्हणजे ह्यांनी फकत कागदोपत्री योजना जाहिर केली.. पण ती प्रत्यक्षात येण्यालायक होती का नव्हती हे जनतेला कधीच कळणार नाही का?

५. केजरीवालांचा सगळ्यात मोठा मुद्दा "भ्रष्टाचार" आहे. पण मग ते नेहमी फक्त मोदींविरुद्ध बोलतानाच का दिसतात? मी कधीही त्यांना "सोनिया गांधी" "राहुल गांधी" अशी मोठी नावं घेऊन घणाघाती हल्ले करताना पाहिलं नाहीये जेवढे ते मोदीं विरुद्ध बोलतात. त्यांनी गुजरातचा दौरा केला. चांगलय... आता ते काँग्रस शासित राज्यांचा दौरा करणार का?
आता हे केजरीवालांनीच का करायच हा प्रश्न येऊ शकेल.. त्यांना काँग्रेस चे हस्तक समजल्या जाते.. अशावेळी जर ते फक्त मोदींविरुद्ध बोलत राहिले तर ते काँग्रेसच्याही विरोधात आहेत हे कसं कळणार? "मी काँग्रेस्चा एजंट नाही" हे ते म्हणतात.. प्रत्य्क्ष कृतीमध्ये मात्र त्यांनी कोंग्रसचा पाठींबा घेतला.. काँग्रेसच्या सर्वेसर्वांविरुद्ध बोलताना ते दिसत नाहीत.. मग नक्की समजायचे काय?

~~~ परत एकदा.. माझा काहीहि अभ्यास नाही.. काही शब्द खाली वर झाले असतील तर चु.भु.द्या.घ्या...

पण तुमचा मूळ सूर :

त्यांना काँग्रेस चे हस्तक समजल्या जाते..

चूक आहे. आआपानी काँग्रेसविरोधात आपले खंदे उमेदवार उभे केलेत.

1. Kumar Vishwas from Amethi, Rahul Gandhi’s seat

2. Social activist Medha Patkar from North East Mumbai

3. TV journalist-turned-politician Ashutosh from Chandni Chowk, seat held by Union Minister Kapil Sibal

4. Former CEO and Chairperson of RBS India, Meera Sanyal from South Mumbai, seat represented by Union Minister Milind Deora

5. Former scribe Mukul Tripathi from Farukhabad in Uttar Pradesh, constituency of Union Minister Salman Khurshid

6. Advocate H S Phoolka from Ludhiana, seat held by I and B Minister Manish Tewari

7. Activist Anjali Damania from Nagpur, against former BJP National President Nitin Gadkari.

8. Activist Hardev Singh has been given ticket in Mulayam Singh Yadav’s stronghold Mainpuri.

9. AAP leader and founder member Yogendra Yadav from Gurgaon

10. Peasant leader Somendra Dhaka from Baghpat in Uttar Pradesh, seat represented by Union Minister Ajit Singh

11. Jarnail Singh is AAP nominee for West Delhi seat

12. Scientist Jiya Lal, a scientist from Lalganj seat, which is at present with BSP’s Bali Ram

13. Educationist Khalid Pervez from Moradabad, which former cricketer Mohd Azharuddin currently represents in Parliament

14. Yogesh Dahiya, a peasant leader from Uttar Pradesh, will be the AAP candidate for Saharanpur

15. Senior AAP leader Mayank Gandhi from the North West Mumbai seat, which is held by former Union Minister Gurudas Kamat

16. AAP leader Subhash Ware from Pune, a seat held by Congress MP Suresh Kalmadi

17. Former engineer Vijay Pandhare from Nashik

18. Senior activist of the Narmada Bachao Andolan Alok Agarwal from Khandwa in Madhya Pradesh

19. Habung Pyang, a former Information Commissioner in Arunachal Pradesh, will be the AAP contestant in the northeastern state.

20. Lingraj, an activist who took part in the agitation against Posco, will lead AAP’s challenge for the Bargarh seat in Odisha.

पिलीयन रायडर's picture

18 Mar 2014 - 11:25 am | पिलीयन रायडर

बरं..
असु शकेल.. मी म्हणलच आहे की माझा काही अभ्यास नाही.. पण माझा मुद्दा इतकाच होता की हा जो समज आहे तो त्यांनी गांधी घराण्या विरुद्ध फारसं कधी न बोलल्यानी प्रबळ होत असावा.. त्यावरही मत द्या..

आणि बाकी मुद्द्यांवरही..

संजय क्षीरसागर's picture

18 Mar 2014 - 12:23 pm | संजय क्षीरसागर

माणुस कसा आहे ते आपण ओळ्खायच असतं.. अनेकद हे गट फिलिंग खुप उपयोगी असतं.. डॉक्टरला माणुस म्हणुन पारखुन घेतलं की मग एक डॉक्टर म्हणुन त्याच्यावर निर्धास्त अवलंबुन रहावे.. स्वतःचे डोके चालवु नये.

ही गोष्ट रिक्षावाल्यापासून लग्नाच्या जोडीदारापर्यंत सर्वांच्या बाबतीत एकसारखी आहे. अरविंदनी उभे केलेले उमेदवार पाहा. एकेकाची क्रेडेंशियल्स एकसोएक आहेत. कधीही राजकारणात रस न घेणारे आज त्याच्यासाठी रिंगणात उतरलेत. आणखी काय हवं?

बव्हंश सदस्यांनी चालवलेल्या किरकोळ मुद्यांवरच्या फुटकळ चर्चा आणि सादर केलेली बाण्यो, शहाण्योची भंकस आकडेवारी यावरुन निर्णय होऊ शकणार नाही.

पिलीयन रायडर's picture

18 Mar 2014 - 12:31 pm | पिलीयन रायडर

तुम्ही पॉईंट टु पॉईंट उत्तर देणार आहात का? मला भावनिक उत्तरं नको आहेत..
मी काही मुद्दे मांडलेत, त्याची रोख ठोक सरळ उत्तरं अपेक्षित आहेत...

बाकी टीव्ही वर बोलताना फार प्रामाणिक वाटतो.. हे काही कारण असु शकत नाही माणुस चांगला आहे हे मानण्याचं..
त्यांनी दिलेली आश्वासनं वगैरे नी काही मत बनवु शकत नाही.. आणि त्यांनी कधीहि सरकार चालवलेच नसल्यानी आप कामकाज कसे करते हे ही गुलदस्त्यात आहे.. सो.. माणुस म्हणुन ओळखणं वगैरे इथे लागु पडत नाहि..

संजय क्षीरसागर's picture

18 Mar 2014 - 12:52 pm | संजय क्षीरसागर

मग गट फिलींग म्हणजे काय?

बाकी टीव्ही वर बोलताना फार प्रामाणिक वाटतो.. हे काही कारण असु शकत नाही माणुस चांगला आहे हे मानण्याचं

माणसातली एकवाक्यता जोखण्याचा सहवास हा एकमेव पर्याय आहे. पण तो उपलब्ध नाही म्हटल्यावर त्याचं बोलणं, लेखन आणि कृतीतली एकसंधता ही परिमाणं वापरावी लागतील.

त्यांनी कधीहि सरकार चालवलेच नसल्यानी आप कामकाज कसे करते हे ही गुलदस्त्यात आहे..

म्हणून तर आआपाला एक संधी द्यावी असं वाटतं.

सो.. माणुस म्हणुन ओळखणं वगैरे इथे लागु पडत नाहि.

तुमच्या लक्षात येत नाहीये....प्रत्येक प्रसंगी शेवटी माणूसच ओळखता यावा लागतो!

गब्रिएल's picture

18 Mar 2014 - 12:42 pm | गब्रिएल

अरविंदनी उभे केलेले उमेदवार पाहा. एकेकाची क्रेडेंशियल्स एकसोएक आहेत.

येक उमेद्वार म्हंतोय काश्मीर पाक्ड्यांना द्या, दुस्रा सीमी सार्क्या आतंक्वाद्याना सपोर्ट कर्तोय, एकाचे माओवाद्यांशी संबंद्ध आहेत, एक वकील असून काय्दा हातात घेऊन खुद्द दिल्लीत आप्च्या कम्रेचं फेड्तोय, एक मुंबैच्या बाई बिल्डर कंपनीच्या भ्रश्टाचारात गूंतल्यात.....................इकड उमेव्दार ख्योळ कर्त्यात नी केजरीवाल बेचारा हॅ हॅ हॅ करत मापी मांगतोय, लय ताप बेच्यार्याचा डोस्क्याला !

हायला, लईच ब्येष्ट्म्ब्येश्ट "क्रेडेंशियल्स एकसोएक" (लय कटीन श्यब्द बर्का, कापी पेष्ट क्येलय) वालं उमेव्दार बर्का...

आता लईच ब्येष्ट आसलेले इचावंत (भवतेक दुसर कोन काय वाच्त नाय, त्येन्ला कायबी आक्कल नाय आसा (बिन)डोस्क्याचा इचार करुन) आस कायबाय लिवायला लाग्लं कि मंग काय म्हनावं बाबा आमी आडान्यानी ?

लई ब्येष्ट इनोद ! गब्रिएल खुस हुवा !!