पळसाला पाने तीन...

मारकुटे's picture
मारकुटे in काथ्याकूट
5 Feb 2014 - 10:02 am
गाभा: 

आमचे काही मित्र आमचे म्हणणे ऐकून घ्यायचे नाहीत. आम्ही समजावून सांगण्याचा खुप प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी. आमचे म्हणणे एवढेच होते की बाबांनो संधी मिळत असली की कुणी सोडत नाही. सत्ता माणसाला भ्रष्ट करतेच. कुणीही फायदा घेण्याचा प्रयत्न करतोच. फार थोडे असतात जे बरबटत नाहीत. आणि ही वृत्ती केवळ कुठल्या वंशाशी, देशाशी वा जातीशी संबंधित नाही. माणुस जिथे आहे तिथे ही वृती आहे. पण नाही. विचारवंती झूल अंगावर पांघरली की जे काही भारतीय असेल ते तुच्छ मानावेच लागते असा काही दंडक आहे की काय कळत नाही. पण आमचे काही मित्र विचारवंती झुली अंगावर पांघरत जे अकलेचे तारे तोडत आम्हाला आणि विशेषतः भारतीयांना दुषणे देतात त्यामुळे आम्ही मनातून अतिशय खंतावलो होतो. आणि खरोखर भ्रष्टाचार हा केवळ भारतीय उपखंडातील रोग असून जगात असल्या रोगाचा प्रादुर्भाव अजिबात नाही. जिथे कुठे ह्या रोगाची लागण आहे असा संशय होता तिथे विशेष कायदे, शिक्षण देऊन हा रोग मुळापासुन उखडून टाकलेला आहे हे आम्ही जवळपास मनाने मान्य केले होते. बुद्धी थोडी साशंक होती पण पंडीत लोकांनी जेव्हा ठासुन सांगितले असते तेव्हा ते मानायचेच असते ही परंपरा पाळणे गरजेचे होते ते आम्ही केले. असो. पण आमच्या ह्या मोहमयी निद्रेतुन आम्हाला खडबडून जागे करण्याचे कार्य एका बातमीने केले आणि आमच्या काही कल्पनांना धक्का बसला आहे. आता नक्की विश्वास कुणावर ठेवावा ही समस्या आमच्या पुढ्यात आली आहे. कुणाचे नक्की ऐकावे ? विचारवंतांचे की बातमीदाराचे की आपलीच आधीची भुमिका योग्य होती त्यानुसार वागावे ? काय नक्की करावे. असो.

बातमी फार मोठी नाही आणि विशेष लक्ष देण्याजोगती नाही असा निष्कर्ष विचारवंतांनी मांडावा असे मला मनापासून वाटते. कारण सरळ आहे माझा सर्व विचारवंतांवर त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर विश्वास आहे. श्रद्धाच आहे म्हणाना ! त्यांचा जरी श्रद्धेवर राग असला तरी माझा नाही. त्यामुळे मी विचारवंतांवर श्रद्धा ठेवतो ब्वा ! :)

बातमी : http://www.bbc.co.uk/news/world-europe-26014387

प्रतिक्रिया

अनिरुद्ध प's picture

5 Feb 2014 - 1:10 pm | अनिरुद्ध प

विचार्वंतांच्या/तज्ञांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत.

बाकी थोडा फरक आहे बुवा. असा प्रश्न भारतात विचारला तर उत्तर १००% येइल बर का.

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Feb 2014 - 6:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

भ्रष्टाचार आजिबात नाही असे ठिकाण या पृथ्वीवर नाही. मात्र भ्रष्टाचाराच्या प्रकारांत आणि तीव्रतेत जागोजागी लक्षणीय फरक आहे.

ज्यांना आपण भ्रष्टाचारमुक्त (म्हणजे बहुतेक पाश्चिमात्य) देश समजतो तेथे अजिबात भ्रष्टाचार नाही असे अजिबात नाही. तेथे नागरिकांना आपल्या सर्वसामान्य गरजा आणि हक्क (रस्ते, पाणी, वीज, कुकींग गॅस, इ) हे लाच न देता सहजपणे आणि नियमाप्रमाणे मिळतात; सरकारी नोकर ७/१२ च्या दाखल्यासारखे काम लाचेच्या अपेक्षेने रोखून घरेल असे होत नाही; पोलीस ५-१० डॉलर घेऊन रहदारीचे नियम तोडण्याकडे दुर्लक्ष करत नाहीत; इ. इ. येवढाच त्याचा अर्थ घ्यावा. थोडक्यात कायद्याने मिळणारे मूलभूत हक्क नागरिकांना सहज चिरीमिरीशिवाय मिळतात.

कायद्याने न मिळणार्‍या गोष्टी कायद्याला फाटा मारून मिळवण्याचे प्रयत्न करणे मानवी स्वभावाचे लक्षण आहे... कायद्याचे राज्य असलेल्या काही देशांत ते अगदी कमी किंवा नगण्य प्रमाणात (उद. नॉर्वे) तर इतर काहीत राजरोस चालते... परंतू उच्च स्तरावर अनेक दशलक्ष अथवा अधिक स्तरांच्या डॉलरच्या भ्रष्टाचारांपासून कोणताही देश सुटलेला नाही.

लेखात दिलेल्या आणि याप्रकारच्या इतर सर्व्हेंचे खरे अर्थ समजावून घेताना तो सर्व्हे कोणत्या देशात आणि कोणत्या परिस्थितीत घेतला आहे ही पार्श्वभूमी डोळ्यासमोर ठेवणे जरूर आहे. उदा. जर्मनीमध्ये बेजबाबदारपणे वागणार्‍या / लाच घेणार्‍या सरकारी कर्मचार्‍याविषयीची बातमी धक्कादायक मानली जाईल आणि ताबडतोप तक्रार आणि कारवाई केली जाईल; इटलीत त्या अधिकार्‍याची पोच वरपर्यंत असेल तर ते सहन केले जाईल आणि तक्रार केली तरी ते प्रकरण दाबून टाकले जाईल; तर भारतात त्या अधिकार्‍याची वरपर्यंत पोच (किंवा लाचेतील वाटणी) आहेच हे गृहीत धरून "कुठे उगाच वारंवार फेर्‍या मारत रहायचे" असा निर्णय करून त्या अधिकार्‍याचा कोणी एजंट आहे कां याची चवकशी सुरू होईल आणि काम झाल्यावर "चांगला साहेब आहे. पाचशे-हजार घेतो पण काम चोख करतो" असे सर्टिफिकेटही दिले जाईल. आता बोला.

मुक्त विहारि's picture

5 Feb 2014 - 9:14 pm | मुक्त विहारि

+ १

प्रकाश घाटपांडे's picture

7 Feb 2014 - 4:52 pm | प्रकाश घाटपांडे

नेमके मांडलेत. जे भ्रष्टाचार करतात परंतु भ्रष्टाचार असू नये असे मत असलेले लोक किती? हा सर्वे रोचक ठरेल.

विकास's picture

5 Feb 2014 - 9:10 pm | विकास

तुम्ही दिलेल्या दुव्यानुसार, युरोपिअन युनिअन मध्ये देखील भ्रष्टाचार? म्हणजे आता बोलणच खुंटलं की हो! पण म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे जे काही होत आहे त्यात काहीच अवाजवी नाही. उगाचच पब्लीक ओरडतयं, अण्णा उपोषणास बसतात आणि ते केरसुणीवाले भ्रष्टाचाराविरोधात बोंबलतयं.

खरचं आता सगळे डोळे विचारवंत काय सुचवणार आहेत याकडे लागले आहेत.

मारकुटे's picture

6 Feb 2014 - 1:42 pm | मारकुटे

पब्लिक स्वतः पैसे देउन काम करण्याच्या मागे लागते
अण्णा आणि त्यांचे उपोषण.... असो.
केरसुणीवाले... नव्याचे नौ दिवस

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Feb 2014 - 1:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जागतिक भ्रष्टाचार हा धाग्याचा विषय आहे की मा.श्री अण्णा आणि केजरीवाल हे विषय चर्चेला घ्यायचे आहेत ?

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Feb 2014 - 9:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्याला एक कबूल केलं पाहिजे की आपण आपलं झाकून ठेवण्यासाठी किती दिवस आपण दुस-याचं वाकू वाकू पाहणार आहोत ?

-दिलीप बिरुटे

प्यारे१'s picture

5 Feb 2014 - 9:48 pm | प्यारे१

नाना चेंगट?????????
कुडंय कुडंय?

च्यामारी, इक्ते दिस इचार कर्तोय, कुटे कवापास्नं वैचारिक हू र्‍हायले? आमच्याकडचे कुटे गुंता आपलं गुंटामंत्री हायती! त्ये आस्लं वैचारिक काय करु शकत न्हाईत.

बाकी माणसाच्या इंद्रियांच्या चार त्रुटींमध्ये
१. इंद्रियांचं अपटुत्व ,
२. चुका करण्याची शक्यता (पुढे जाऊन सवय बनू शकते)
३. भ्रम आणि
४. लोभीपणा ह्या गोष्टी असतातच.

लोभीपणा (लिप्सा) ही भ्रष्टाचाराला कारण आहे. चुका करण्याची सवय लोभीपणाला सहाय्यक असते.
भ्रष्टाचार संपणं अशक्य आहे.

मारकुटे's picture

6 Feb 2014 - 1:41 pm | मारकुटे

आमचे पुर्वज गुंठामंत्री झाल्यामुळे आमच्या हाती विचार करण्याखेरीज काही उरले नाही

बॅटमॅन's picture

5 Feb 2014 - 11:00 pm | बॅटमॅन

अगदी नेमके!!!!!

जे जे भारतीय ते ते टाकाऊ ही वृत्ती जितकी दृढमूल आहे तितकीच सगळ्यांनी शेण खाल्लं तर मी काय वाईट केलं ही वृत्तीही वाईट आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Feb 2014 - 11:38 pm | अत्रुप्त आत्मा

+१ टू खाटुकम्यान

मी मांडलेल्या प्रश्नांचा रोख कळला नसावा असे वाटते.

भ्रष्टाचार ही जागतिक समस्या असून तिचे निराकरण देशाधारीत समस्या असे वर्गीकरण
करुन होत नाही अशी आमची मनोधारणा आहे.

आम्हास असे मांडायचे होते ते कदाचित आम्हास आमच्या अल्पमतीमुळे जमले नसावे.

@ बिरुटे : प्रतिसादाचा विषय समजला नाही. कुणाला हाक मारत आहात तुम्ही?

ही मांडणी तत्त्वतः ठीक असली तरी यावर इलाज करण्यासाठी जितके आपल्या हातात आहे तितके तरी सुधारावे असे वाटते. भ्रष्टाचार पूर्णपणे कधीच नष्ट होणार नाही, पण दैनंदिन कामकाजातला भ्रष्टाचार कमी करावयाचा असेल तर देशांतर्गत कंट्रोलच कामाला येणारे. म्हणजे असं बघा, पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पोलीस जे रुपडे खातो, ते ओबामा किंवा सौदीस जाता थोडीच? इतकं जरी थांबवता आलं तरी बास आहे.

मारकुटे's picture

7 Feb 2014 - 9:46 am | मारकुटे

टाळी एका हाताने वाजत नसते. पासपोर्ट वेरीफाय करणार्‍याला एक दमडा देणार नाही अशी भुमिका घेतली जात नाही. जाउ द्या ना शे पाचशे रुपये. डालरा डालरा मिळाले की होतील वसुल अशी भुमिका घेत पैसे दिले जातात. हेच जवळपास सर्व बाबींमधे होते. वेळ जाण्यापेक्षा सिग्नल तोडू अडवलेच तर पन्नास रुपडे टिकवू हातावर..

अनुप ढेरे's picture

7 Feb 2014 - 11:33 am | अनुप ढेरे

स्वतःचं काम लवकर व्हावं म्हणून पैसे द्यायला लागणं यासाठी सरकारी अधिकर्‍यांना नावं ठेवणं एकवेळ समजू शकतो. पण टॅक्स वाचवायला खोटी औषधांची बिलं लावणे, LTA साठी टॅक्स्यांची खोटी बिलं, HRA साठी बनावट घरभाड्याच्या पावत्या हे इतके 'सुशिक्षित' लोकं करताना दिसतात की कितीही लोकपाल आले तरी हा भ्रष्टाचार नाही घालवू शकणार.

पासपोर्ट वेरिफाय करणार्‍याला दमडाही न देण्याची भूमिका असेल तर हे पोलीस किती तंगवतात त्याचा अनुभव घेतला असेल तर या केसमध्ये मत पोलिसांच्या बाजूने जाणारच नाही.

जण्रल मताशी सहमत आहे, पण या केसमध्ये आजिबात नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Feb 2014 - 12:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अशा वेळी उपाय काय केले पाहिजेत ते सांगा ना राव. आपल्याला सर्वांना शॉर्ट कट आवडतात. (अपवाद असतात) या शॉर्टकटच्या नादात आपण आपला विवेक गमावून बसतो तेव्हा विवेक वगैरे आणि वृत्ती ब्रित्तीचा हा विषय आहे, असे नै का तुम्हाला वाटत.

अजून एक हल्ली लोक पैसे घ्यायला घाबरत आहेत, असे माझे एक निरिक्षण आहे, (आधार काही नाही, तर जरा जागृती होत आहे असे वाटते) आपलं मत काय आहे ?

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Feb 2014 - 6:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>> मी मांडलेल्या प्रश्नांचा रोख कळला नसावा असे वाटते.
ज़रा तपशीलवार स्पष्ट करून सांगाल का प्लीज ?

>>>>>>> भ्रष्टाचार ही जागतिक समस्या असून तिचे निराकरण देशाधारीत
समस्या असे वर्गीकरण
करुन होत नाही अशी आमची मनोधारणा आहे.

आमची मनोधारणा म्हणजे कोणाची मनोधारणा ? आणि आपल्या मनोधारणनेे
(जी मला अजिबात समजली नाही) भ्रष्टाचार या जागतिक समस्येवर काही प्रभाव पडणार आहे का ?

>>>>>>आम्हास असे मांडायचे होते ते कदाचित आम्हास
आमच्या अल्पमतीमुळे जमले नसावे.

विचारवंताच्या झूली हा शब्द जेव्हा आपण वापरला तेव्हाच मला फुल दाऊट होता त्याची खात्री झाली की आपण अल्पमतीने लिहित नाही.

>>>>>> बिरुटे : प्रतिसादाचा विषय समजला नाही. कुणाला हाक
मारत आहात तुम्ही?

आपण आपल्या धाग्यातील माझ्या प्रतिसादाच्या शिर्षकाकडे दुर्लक्ष करा. नाना चेंगट, अवलिया, अशा आयडीना मी हाक मारत होतो. त्यांचा चांगला अभ्यास आहे, अशा विषयावर. :)

-दिलीप बिरुटे

येडा बनके पेढा खानेको अच्छा जमता हय तुमको बिरुटेसाब... लेकीन गली चुकल्या तुमची

मदनबाण's picture

7 Feb 2014 - 11:20 pm | मदनबाण

नाना चेंगट, अवलिया, अशा आयडीना मी हाक मारत होतो.
त्यांचा नविन आयडी कोणता हाय हो ? ;)

विजुभाऊ's picture

6 Feb 2014 - 10:48 pm | विजुभाऊ

ब्याट्या श्रावणी म्हणून देखील लोक गोमय प्राशन करतात ना रे?

बॅटमॅन's picture

7 Feb 2014 - 11:51 am | बॅटमॅन

हो.

आयुर्हित's picture

5 Feb 2014 - 11:21 pm | आयुर्हित

इतर देशांमध्ये जरी भ्रष्टाचार असला तरी तो फक्त कॉर्पोरेट लेवेल व शासनच्या उच्च लेवल लाच होतो. साधारण लोकांना मुळीच त्रास होणार नाही ह्याची पुरेपूर काळजी शासन दरबारी व शासकीय अधिकारी/नोकरदार वर्गाकडून घेतली जाते.

आपल्याकडे मात्र सर्रास चौकातल्या रहदारी, पार्किंग पासून तर बोफोर्स पर्यंत प्रत्येक लेवेलला भ्रष्टाचार होतोय. अगदी CAG ने भ्रष्टाचार उघड्यावर आणल्या नंतरही निर्लज्ज पणे "zero loss" म्हणून त्याची बोळवण होते, हेच तर भारताचे/भारतीय जनतेचे दुर्दैव आहे.

चांगला विषय घेतल्याबद्दल धन्यवाद.

सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेणार्‍या इतर देशातील सरकारी अधिकार्‍यांच्या पायाचे तीर्थ प्यावे म्हणतो.

>>>>> इतर देशातील सरकारी अधिकार्यांच्या पायाचे तीर्थ प्यावे म्हणतो.

इतर देशातील अधिका-यांना इकडे आणून आपल्या अधिका-याचे उद्बोधन प्रबोधन करावे, असे आपणास गंभीरपणे वाटते का ? आणि त्याच्यामुळे भ्रष्टाचार या जागतिक समस्येवर काही तोडगा निघू शकतो का ?

-दिलीप बिरुटे

मारकुटे's picture

7 Feb 2014 - 9:47 am | मारकुटे

तुमचे काय मत आहे यावर?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Feb 2014 - 10:42 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपलं मत सांगा ? आपण म्हणालात ना वर तीर्थ घ्यायला पाहिजे ?

-दिलीप बिरुटे

सुनील's picture

6 Feb 2014 - 2:57 pm | सुनील

इतर देशांमध्ये जरी भ्रष्टाचार असला तरी तो फक्त कॉर्पोरेट लेवेल व शासनच्या उच्च लेवल लाच होतो. साधारण लोकांना मुळीच त्रास होणार नाही ह्याची पुरेपूर काळजी शासन दरबारी व शासकीय अधिकारी/नोकरदार वर्गाकडून घेतली जाते

बरोबर. पण ती कशी घेतली जाते? तर वर गोळा होणारा मलिदा शासकीय नोकरदार वर्गाच्या खालच्या थरापर्यंत झिरपण्याची काळजी घेतली जाते. जेणेकरून निम्नस्तरीय सरकारी कर्मचार्‍यांना स्वतःची नवी सप्लाय्-चेन सुरू करण्याची आवश्यकताच भासू नये.

आपल्याकडे तेच नेमके होत नाही. वरचा मलिदा वरतीच राहतो. त्यामुळे रस्त्यावरील चौकात वा कचेरीतील खिडकीपाशी सुरू होऊन वर जाणारी एक दुसरी मालिका सुरू होते!

मदनबाण's picture

5 Feb 2014 - 11:54 pm | मदनबाण

सगळ्यात कमी भ्रष्टाचार डेन्मार्क आणि न्यूझिलॅंड यांचा नंबर अव्वल आहे. आपला नंबर कितवा ते पहायला हवे !
या विषयावर अगदी ताजे कलम :- JB says corruption a global phenomenon: Pledges to fight graft ‘to the bitter end’ in Malawi

पैसा's picture

6 Feb 2014 - 1:49 pm | पैसा

माणसाचा स्वभाव काय बदलायचा नाय कधी! खरे तर वैयक्तिक भ्रष्टाचारातून निर्माण होणारा काळा पैसा नगण्य असावा. आणि कॉर्पोरेट अन पुढार्‍यांनी केलेला प्रचंड. याला पुरावा काय तर जसे इन्कम टॅक्सचे सरकारी उत्पन्न नगण्य असते आणि कॉर्पोरेट टॅक्सचे महाप्रचंड तसेच! एखाद्या हवालदाराने आयुष्यभर चौकात ५०/१०० रुपये उकळत राहिले तरी तो २जी च्या घोटाळ्याची बरोबरी करू शकेल का? तसंच आहे ते. आपल्याकडे हा दोन्ही प्रकारचा भ्रष्टाचार सर्वसामान्य म्हणावा इतका आहे त्यामुळे चलता है असंच वाटतं. इतर देशांत वैयक्तिक भ्रष्टाचार कमी असेल पण एकूण आकड्यांमधे त्यामुळे फार फरक पडणार नाही.

याला काही उपाय आहे का? काल परवा नारायणमूर्ती म्हणाले की पुढार्‍यांना कॉर्पोरेटमधल्यासारखा पगार द्या म्हणजे ते पैसे कमी खातील पण हा भाबडा आशावाद वाटला. आपण जमेल तितके भ्रष्टाचारापासून लांब रहावे एवढेच आपण मध्यमवर्गीय लोक करू शकतो. आणखी काय होणारे? शशी थरूरच्या बायकोने आयपीएल चं नाव काढलं आणि ती संशयास्पदरीत्या मेली. पुढे काय? आत्महत्या म्हणून नोंद करून बहुधा फाईल बंद होईल. मग आम्ही तर किस झाड की पत्ती!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Feb 2014 - 11:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माणसाचा स्वभाव काय बदलायचा नाय कधी...!!!

मला तरी मान्य नाही बॉ. आपण मागे वळून आपल्याकडेच बघीतले तर लक्षात येईल की आपण बदललो आहोत. आपण अधिक बदललेलो असतो. विचार, काळ,आजूबाजूची परिस्थिती, विविध जाणीवा आणि आपल्यावर परिणाम करणारे घटक यामुळे आपला स्वभाग बदलतो असे माझे मत आहे.

वैयक्तिक भ्रष्टाचारातून निर्माण होणारा काळा पैसा नगण्य असावा.
असं काही नाही. विविध खात्यातील पदाधिकारी आणि त्यांच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या वाचल्यावर लक्षात येते की यांनी थेंबे थेंबे तळे साचे प्रमाणे पैसे कमावले आहेत. कॉर्पोरेट अन पुढार्‍यांनी केलेला भ्रष्टाचार हा अशाच व्यक्तिगत भ्रष्टाचारातून पुढे येतो असे मला वाटते, आणि मग त्याचे स्वरुप मोठे होऊन जाते.

बाकी, पैसे किती देऊ केले तरी तो उपाय मला तोकडा वाटतो. समाधानी राहण्याची मानण्याची वृत्ती राहीली नाही, सर्व जगाच्या असतील नसतील तितक्या गोष्टी माझ्या दारात उभ्या पाहिजे असे प्रत्येकाला वाटते. हे हवे, ते हवे, आणि गरजा पूर्ण होत नाहीत असे वाटले की माणसं मग अन्य सोर्स शोधायला लागतात.

-दिलीप बिरुटे

अनुप ढेरे's picture

8 Feb 2014 - 2:12 pm | अनुप ढेरे

खच्चुन टाळ्या ! पूर्ण समहमत या प्रतिसादाशी.

माहितगार's picture

8 Feb 2014 - 1:12 pm | माहितगार

पुढार्‍यांना कॉर्पोरेटमधल्यासारखा पगार द्या म्हणजे ते पैसे कमी खातील पण हा भाबडा आशावाद वाटला.

खर आहे रोमानीया (यांच्या अध्यक्षाचे नाव आता आठवत नाही) आणि फिलीपाईन्सचे मार्कोस पगार काय कमी असतील पण घरातील पाण्याची प्रत्येक तोटी सोन्याची लावण्यापर्यंत मजलही जाऊ शकते.

एखाद्या व्यक्तीने दहा रूपायांचे हवे असलेले अधिकचे उत्पन्न भ्रष्टाचार करून घेण्यापेक्षा अधिकृत मार्गाने घेतले तर अधिक चांगले नाही उपयोग त्यावर टॅक्स मिळतो हा नाही. काळा पैसा किती आहे ह्याचा एक्झॅक्ट अदमास काढणे कठीण असल्याने हा काळा पैसा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हेलपमेंट एवजी कंझुमरीझम वर खर्च होत असल्याने एकतर चलनवाढीवर सेंट्रल बँकेला नियंत्रणात चलनवाढ नियंत्रणात अडथळा असतो.

जपान मध्ये भ्रष्टाचार आहे मग आपल्याकडे असल्यास काय बिघडले अशी एक सारवा सारव बर्‍याचदा ऐकण्यात येते पण सगळ्यात महत्वाचे भ्रष्टाचाराने विकास प्रकल्पांच्या प्रिऑरिटीज बदलणे प्रकल्प वेळेत पूर्ण न होऊन कॉस्ट एस्कलेशन आणि अगदीच बिहार किंवा आपल्याकडील जि.प. मधील विकास प्रकल्प असतील एकाच प्रकल्पावर चार चारदाही खर्च दाखवला गेल्यास आश्चर्य नको. हे या अर्ग्युमेंट्स मध्ये कंसीडर केलेले नसते.

आपल्याकडील राजकीय भ्रष्टाचारा मागे निवडणूकीचा खर्च आणि घोडेबाजाराचा खर्च हे ही महत्वपुर्ण आहेत हे खर्च पुढार्‍यांचे वेतन वाढून भागवले जाणे शक्य नाही.त्यावर मार्ग काढला जाणे गरजेचे आहे. विचीत्र प्रकार म्हणजे इलेक्ट्रॉनिक माध्यमे सर्वांना सारखी स्वस्तात आणि मुबलक उपलब्ध करून निवडणूणक खर्च डिव्हाईड करण्या एवजी इलेक्ट्रॉनिक माध्यमांचाच गळा दाबण्याची भाषाही केली जाते.

विनायक प्रभू's picture

6 Feb 2014 - 2:54 pm | विनायक प्रभू

@ प्रा. डॉ.
कशाला मरलेल्या आय. डी. ला हाका मारताय?
झाकणे शक्यच नाही तिथे वाकायला काय हरकत?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Feb 2014 - 6:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>>>> प्रा. डॉ.
कशाला मरलेल्या आय. डी. ला हाका मारताय?

जाल आयडी कभी मरता नही, उसका बार बार पुनर्जन्म होता है. भारतीय दर्शनात आत्मा नावाची एक संकल्पना आहे. आत्म्याने नव जीव धारण जरी केला तरी मागील जन्माचे संस्कार त्याच्यावर येत असतात.

'आत्मा को शस्त्र से काटा नहीं जा सकता,
अग्नि उसे जला नहीं सकती, जल उसे गला नहीं सकता और
वायु उसे सुखा नहीं सकती।[ जिस प्रकार मनुष्य पुराने
वस्त्रों को त्याग कर नये वस्त्र धारण करता है,
उसी प्रकार आत्मा पुराने शरीर को त्याग कर नवीन शरीर
धारण करता है (Thanks to wiki)

>>>>>झाकणे शक्यच नाही तिथे वाकायला काय हरकत?

सहमत आहे सर...!!! सर, येत जा हो आपली लय आठवण येत असते. सर, व्हेलेंटाइन डे चं काही स्पेशल ?

उघड्या पुन्हा जहाल्या... असं काहीसं होत आहे का बिरुटे तुम्हाला?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Feb 2014 - 10:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या
फुलवी तुझ्या स्मृतींच्या कलिका मनातल्या
येऊ कशी निघोनी पाऊल अडखळे
विरहात वेचिताना घटना सुखातल्या
उठता तरंग देही हळुवार भावनांचे
स्मरतात त्या अजूनी भेटी वनातल्या
हासोनिया खुणावी ती रात रंगलेली
तू मोजिल्यास होत्या तारा नभांतल्या

रसग्रहण होऊ दे नाना.....!!! (नाना चेंगाताला म्हणतोय हं)

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

7 Feb 2014 - 2:21 pm | माहितगार

तू मोजल्या होत्या तारा नभांतल्या
मी-ना वेचले हिरेमोती त्यातऱ्हा आरोपातल्या
भूलवतात त्या अजूनी भेटी खणातल्या
जाणोनिया मानवी मतांची चांदीकेली
अविरत वेचिताना शेठांना चैनीतल्या
जाऊ कसा निघोनी पाऊल अडखळे
जनी-मी मलंग व्यवहार देही भावनांचे

पायघड्या पुन्हा पडल्या त्याच नेत्याला
झुलवी जन स्मृतींना वतनी मनातल्या

(हे रसग्रहण/विडबंन धागा प्रस्तावाच्या विषयास धरून केवळ उपरोक्त काव्यपंक्तीचे आहे. विडबंन करताना उपरोक्त काव्यपंक्ती संबंधी इतर चर्चा लक्षात घेतलेली नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Feb 2014 - 11:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त....!!! आपण इतके रसिक असाल असे वाटले नव्हते.

-दिलीप बिरुटे
(माहितगार यांचा फ्यान)

माहितगार's picture

8 Feb 2014 - 9:14 am | माहितगार

"अविरत वेचिताना शेठांना चैनीतल्या" च्या जागी "अविरत झेलताना श्रेष्टींना चैनीतल्या" अशी ओळही कदाचित चालली असती असे नंतर वाटले.

प्रतिसादाकरिता धन्यवाद

(खरी! माणस नव्हे :) ) वन्यप्राणि असलेल्या जंगलात जर हिरे पाचू सोने जडजवाहीर पोत्यांनी नोटांच्या थप्प्या अलिशान बंगले अस सर्व जरी दिल तरी बहुसंख्य प्राणी त्याकडे डुंकूनही पहाणार नाहीत. मानव या प्राण्याची जी काही अनुवंशशास्त्रीय वैशीष्ट्ये आहेत त्यात चकाकत्या गोष्टींच आणि संपत्तीच (आप्पलपोटेपणासहीत) आकर्षण का आहे हे अनुवंशशास्त्रास अद्याप व्यवस्थीत न उलगडलेल कोड आहे. आणि याला खंड राष्ट्र देश प्रांत वर्ण धर्म जात भाषा वय आणि लिंग या कशाचही अपवाद नाही. लिंग ? होय महिला सुद्धा ! धार्मिक ? होय धार्मिक सुद्धा ! (प्रत्यक्ष अनुभवावरून सांगतोय ह. घ्या माणसाच्या वृत्तीचा धर्माचा आणि धर्म ग्रंथाचा बर्‍याचदा काही एक संबंध नसावा असे अनुभवही येतात. आपाआपल्या धर्माच धर्म ग्रंथाच नाव आल म्हणुन नाराज होऊ नका कान धरून सार्‍यांची अ‍ॅडव्हान्स माफी मागतो )

मी जे सांगतोय त्याचा व्यवसाय आणि विपणन क्षेत्रातल्या कुणालाही सहसा आश्चर्य वाटणार नाही. लेखा आणि विपणन क्षेत्रातील लोकांना २० वर्षांच्या अनुभवा नंतर उदरनिर्वाहाची आणि सुरक्षिततेची पुर्ण व्यवस्था मोफत मध्ये पुरवली आणि बदल्यात फक्त वस्तुस्थितीची वर्णन लिहा म्हणून सांगितल तर आंतरजालावरील सध्याचे सर्वरची मेमरी क्षमता कितपत पुरेल हा वेगळ्या अभ्यासाचा विषय असेल एवढे हिमनग वितळतील यात शंका नसावी. पण ऑदरवाईज तेरी चूप मेरी चूप हा तसा नियम आणि मंत्र

एका वर्षाची एप्रिलची ७ तारीख त्या एप्रिल आणि मे महिन्याची माझी (आणि माझ्या बॉसची मी उसनवारी केल्या मुळे) सॅलरी घरी पोहोचावयास जून उजाडला इथे काय कारण सांगणार हे काही आश्चर्य नाही योगायोग ऐकुन अंचंबित व्हाल. मार्च महिन्यात तीन्ही महि'लाच' एक कॉर्पोरेट ऑफीस केव्हाही जा मॅडम कुराण वाचण्यात मग्न. एक (केंद्र)सरकारी ऑफीस हातात बायबल (इथेही मॅडमच) आणि एक एन जी ओ हातात भागवत (अर्थातच मॅडम). सर्वच इनकम व्हाईट आणि चेकने येणार्‍या लिमीटेड कंपन्यांमध्ये अ‍ॅडस्टमेंट करून ज्याचे त्याचे देणे जरासे वेळखाऊ असते आणि विशेषतः तुम्ही ब्रँचला असाल तर अजूनच जिकिरीचे होते आणि ऑफीसमध्ये १ तारखे पासून तब्बल तीन लोचट महिलांचा सातत्याने राबता शेवटी सात तारखेला आलेल्या आपली आणि बॉसची सॅलरी वाटून दोघींपासून सुटका तिसरीची मे महिन्याची सॅलरीतून. महिलांनानमुद करतोय म्हणजे पुरुष वेगळे असतात असे नाही पण तीन महिलांनी 'त्या' करता (लोचट्ट) वैताग दिला तो सर्वार्थाने कळस होता. आणि सांगण्याचा उद्देश महिलांना रिझर्वेशन वगैरेचा मी समर्थक असलो तरी इतर (चांगल्या) कारणांनी पण माध्यमातून महिला आल्या म्हणजे अर्थाचार कमी होतो ह्या जाहिरातबाजीवर स्वप्नात सुद्धा विश्वास ठेवणार नाही शेवटी घरोघरच्या चुलीही मातीच्याच (गॅसच्या/माय्क्रोवेव्हच्याच) ! (अर्थात कार्यालयात धर्मग्रंथ हातात ठेवणारी सर्वच माणस तशी होती असे नाही पण अजब योगा योग इजा बिजा तीजा असे काही म्हणतात तसे घडते कधी कधी)

कधी इंटर्नल कधी एक्सटर्नल काँपीटीशनच्या चढा ओढीत कधी किमान टार्गेट लेव्हल गाठून स्वतःवरची टांगती तलवार दूर ठेवण्यासाठी कधी ऑफीस मधला इतर स्टाफचा संसार या ऑर्डर्सच्या गाड्यावर अवलंबून आहे म्हणून तडजोड. या तडजोडी स्विकारल्याच्या बदल्यात विपणनातल्या लोकांना वस्तुतः आर्थीक मोबदला फारही मोठा असतो असे नाही कारण जे काही दिले जाईल ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष (अधिकृत) कमिशन मधन वजावट धरूनच मोजले जाणार असते. हां फक्त तुम्हाला मोठच घबाड मिळाल तर काँपिटीशननी चांगली रिलेशन असलेला माणूस उचलू नये म्हणून कौतूक आणि स्वलतींचा पाऊस पाडला जाउ शकतो पण यातही देखावा अधिक असतो. लेखाविभागातील कर्मचार्‍याला तेवढाही लाभ होत नाही (पण हे सर्व पाहून त्याची लॉयल्टी भविष्यात कुठे तरी डळमळणार नाही याची शाश्वती नसते) स्वतःच स्वतःला अभिमान देवघेव न करता झालेल्या व्यवसायाचाच वाटतो हे मात्र खर.

ज्या गोष्टी बाहेर येतात त्या हिमनगाच टोक असतात हे खर पण हिमनगही सागरातल्या एकुण पाण्याच्या ५ % पेक्षा जास्त जागा वस्तुतः व्यापत नाहीत हि वस्तुस्थिती सामान्यतः माध्यमांच्या भडीमारापुढे सामान्यतः दुर्लक्षली जाते. बाहेर गाजावाजा केल्या जाणार्‍या सर्वच गोष्टी सत्यही असतात असेही नाही. पुणे महापालिके बाबत एका वर्षी राजकिय पक्षांकडून आयूक्ता बाबत तसाच आहे म्हणून प्रचंङ गाजावाजा केला जात होता प्रत्यक्षात चार वेग वेगळ्या विभागात मी तीस एक लाखांचा धंदा केला असेल आणि मला उपायूक्तांच्या नावाचा बोर्डही पहावा लागला नाही खाल पासून वर पर्यंत अगदी क्लिअर व्यवहार पुरवठा तपासणी व्यवस्थीत चेक चक्क ऑफीसवर एकही अधिकची दमडी न देता घेता पोहोचते झाले. मी त्या आयूक्ताच्या नावाचा बोर्डच पाहीला नसल्यामुळे चक्क विसरूनही गेलो होतो नंतर काही वर्षांनी एका दुसर्‍या राज्यसरकारी खात्यात काही कोटींच टेंडर होत बोर्डवरच्या नावा बद्दल बहुधा तो जुना आयुक्त असावा इकडे आला असावा अशी शंका आली. बॉसलाच तंबी देऊन ट्रेन कराव लागल की इथे चुकून एकही शब्द अधिकचा बोलू नका म्हणुन बॉस कसा बसा मानला. काँपिटीशनची माणस केबीनच्या आत जाताहेत आणि चेहरे पाडून बाहेर. आम्ही फक्त ऑर्डरवर सही मिळाल्या नंतर धन्यवाद म्हणण्या पुरतेच केबीन मध्ये गेलो. पुरवठा देऊन पेमेंट आल्या नंतर केवळ थँक यू हे दोनच शब्द कोर्‍या कागदावर लिहून सोबत व्हिजीटींग कार्ड त्यांच्या टेबलवर कारकुना सोबत पाठवल.

एकदा औरंगाबादच्या विद्यापीठातील बॉटनी विभागातील प्राध्यापक मंडळींनी माझ्या कंपनीची एवढी खात्री करून घेण्याकरता खुपसा ताण दिला तरी सर्व शंकांच निरसन करताना मनाला समाधान होत ते हे की ती प्राध्यापक मंडळी डुप्लिकेट मंडळींची चाळीस एक हजाराची ऑफर आल्याने साशंकीत झालेली होती आम्हाला शोधत शोध बर्‍याच कष्टाने ऑफीसवर पोहोचली होती.आणि ऑफिशियली मिनीमम किमतीच्या ऑर्डर्स दाखवताना कमीत कमी किमतीवर व्यवहार करताना स्वतःकरता कमीशनही सुटल नाही पण अशावेळी समाधानच बकळ असत. पुरवठा सुरळीत झाल्या नंतर आमच्या ऑफीसबॉयला त्यांना सर्वीस देण खूप आवडत असे. कारण दुसरीकडे कुठेतरी सानेगुरूजींच नाव घेऊन उघडलेल्या संस्थेच्या लोकांच्या लोचट अपेक्षा हृदयाला आतन कुठेतरी खुपत असतात. शिक्षण क्षेत्रात खूप दिल अस नाही पण जे काही कधी द्यावलागल ते नेहमीच आतन बोचल. मराठी विकिपीडियावर काम करण्याच्या मागे कुठेतरी हे आतल खुपण असतं.

एखाद्या वस्तुच्या सेवेच्या पुरवठ्या करता खुपकमी पुरवठादार असण किंवा अनहेल्दी स्वरूपात पुरवठादार संख्या मार्केट मध्ये असण हि दोन्हीही कारण भ्रष्टाचाराच्या करता कारणीभूत ठरू शकतात. पुरेशी काँपीटीशन असेल तर अवाजवी किमतींना आळा परस्परातील काँपीटीशनने आपोआपच येतो एकमेकांचे पाय कसे ओढायचे हे पुरवठादारांना व्यवस्थीत माहीत असत. मुख्य म्हणजे निवीदा प्रत्येक पुरवठादाराकडे किती वेळेच्या आत पोहोचते का हे पहाण महत्वाच असत. अशा वस्तु सेवा ज्यात काँपिटीशन अत्याधिक असते तिथे व्यवसाय आर्थीक टेंशनच्या मागे प्रत्येकजण साठमारीकरत वेगवेगळे मार्ग शोधतो त्यामुळे कॉंपीटीशन नसेल अशा व्यवसायांच सक्तीच्या कायद्यांनी विभाजनीकरण आणि ज्या व्यवसायात कॉंपीटीशन अनहेल्दी अनप्रॉफीटेबल झाली आहे त्या व्यवसायांच वेगाने कंसोलीडेशनचे अधिक चांगले मार्ग उपलब्ध असावयास हवेत.

दुसरं शासकीय यंत्रणा मला जिथपर्यंत कल्पना होती सिंगल अकाऊंटीग एंट्री डिपेंडंट होती (डबल एंट्री अकाऊंटींग नव्हत) त्यात काही आता फरक झाला असल्यास कल्पना नाही. परस्पर कंपन्याच्या व्यवहारांच्या अकाऊंट्सच क्रॉसटॅलींग आपल्याकडे फार कमी होत. रोजच्या व्यवहारातल उदाहरण टॅक्स कटू नये म्हणून भाडेकरू घरमालका कडून लिहून घेतो तो कागद इनकम टॅक्स डिपार्टमेंट्ला पोहोचतच असतो पण घरमालक भाडेकरू आहे हे दाखवतच नाही दोन्ही स्टेटमेट इनकम टॅक्सकडे असतात (हे केवळ उदाहरणा दाखल) पण त्या प्रमाणात ती क्रॉस टॅली होत नाहीत. कॉम्प्युटराईज्ड बिलींग नसलेल्या रिटेल काऊंटर्सना इलेक्ट्रॉनीक बिलींग मशिन्स कंपलसरी करणे . या बाबी गरजेच्या आहेत असे वाटते. केवळ लोकपाल बील हे पुरेस साधन आहे अस वाटत नाही.

पळसाला पाने तीनच च्या निमीत्तानेकाही आठवणी जाग्या झाल्या मनमोकळ लिहिता आल या करता मारकुटेंना धन्यवाद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Feb 2014 - 1:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद आवडला.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Feb 2014 - 1:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज जरा बरा मूड होता वैचारिकझुली पांघरुन काही अधिक उणे चर्चा करता येतात का त्याच्या ? भ्रष्टाचाराची काही लेटेष्ट अधिकृत आकडेवारी मिळाले पाहिजे राव चर्चेला. कोणत्या वर्षी अधिक भ्रष्टाचार दिसून येतो. त्याची कारणे सरकारकडून केले गेलेले उपाय. व्यक्तिगत जनजागृतीचा परिणाम. मग मजा येईल असे वाटते.

-दिलीप बिरुटे
(झुली बिली अंगावर मिरवायचा नाद असलेला) ;)

मारकुटे's picture

9 Feb 2014 - 1:16 pm | मारकुटे

तुम्हाला वेळ असला म्हणजे आम्हाला असतोच असे नाही. कामधंदे असतात आम्हाला आणि ते करावे लागतात.
सहावा वेतन आयोग नाही लागू आम्हाला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Feb 2014 - 6:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=))

>>> सहावा वेतन आयोग नाही लागू आम्हाला.
अरे लेका, सातवा वेतन आयोग म्हणा..हल्ली तुम्ही माहितीच्या बाबतीत अपडेट राहीले नै राव.

बाकी, आपले कामधंदे आवरल्यावर इकडे गप्पा टप्पांना यायचं हं....

अवांतर : आजच कुंद्याचा (कुंदन) ऑफलाईन मेसेज होता. लै मोबाईलवर खर्च करु राह्यले म्हणून. :)

-दिलीप बिरुटे

प्यारे१'s picture

9 Feb 2014 - 10:18 pm | प्यारे१

खा त री पटली! =))

नाना, टुम किधर गायब था ? ;)