माझ्या तीर्थरूप वडिलांचे अकस्मात निधन झाले. वयाच्या नव्वदीतही शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्यरत आणि आत्मनिर्भर होते.
त्यांच्या जाण्याने हरवल्यागत झालेली ही विकल मनोवस्था...................... ते समाधानाने भाग्यवंतासारखे अनंतात विलीन झाले. त्यांना सद्गती मिळेलच. त्यांची तत्परता, प्रमाणिकपणा, स्वावलंबन या आदर्श संस्कारांद्वारे ते आम्हा सर्व भावंडांत वास्तव्य करून असले तरी त्यांच्या सहवासाची पोकळी आता आमच्या अखेरपर्यंत रितीच राहील.........
मळभ खळे ना श्वास दाटले मेघांनी,….
खळबळले, ढवळल्या कथा पुनवेस उसवल्या लाटांनी
अंदाज कसे चुकले बावरले ऋतू कोंडल्या वाऱ्यांनी
आभाळ कडे कोसळले कढ झेलले पोरक्या हातांनी
कोणास न कळले मरण जिंकले केंव्हा, …
मावळले सण आवळल्या सावल्या कराल पाशांनी
थरथरले नभ सहवास नि माया मूढ जाहली काया
धावले जीव परतले रिते भिजवीत चंदनी छाया
…………………… अज्ञात
प्रतिक्रिया
27 Nov 2013 - 10:46 am | मिसळलेला काव्यप्रेमी
आदरांजली!!
शेवटी हेच खरं!
27 Nov 2013 - 11:51 am | सुहास..
आदराजली !!
27 Nov 2013 - 12:26 pm | ज्ञानोबाचे पैजार
आदरांजली!!
तुम्ही खरोखर भाग्यवान आहात आणि तुमचे वडिल सुध्दा
28 Nov 2013 - 2:25 am | प्यारे१
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि....
श्रद्धांजली!
28 Nov 2013 - 2:35 pm | वेल्लाभट
_/\_..............
28 Nov 2013 - 2:53 pm | प्रभाकर पेठकर
अज्ञातकुल,
तुमच्या वडिलांना आदरपूर्वक श्रद्धांजली.
ह्या सर्वातून एकेकाळी गेलो आहे. तुमची भावना, विशेषतः आयुष्यात अचानक निर्माण होणारी पोकळी अनुभवली आहे. आज गेली १७ वर्ष मनांत गाडलेली ,पितृछत्र हरपल्याची, भावना तुमच्या हळूवार शब्दांनी पुन्हा चाळवली गेली.
ह्या कठीण प्रसंगास धीराने सामोरे जाण्यास ईश्वर तुम्हांस आणि तुमच्या कुटुंबियांस मनोबळ देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना.
28 Nov 2013 - 3:04 pm | राजेंद्र मेहेंदळे
ह्या कठीण प्रसंगास धीराने सामोरे जाण्यास ईश्वर तुम्हांस आणि तुमच्या कुटुंबियांस मनोबळ देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना.
28 Nov 2013 - 6:30 pm | सुमीत भातखंडे
आदरांजली.
28 Nov 2013 - 6:31 pm | यशोधरा
अज्ञातकुल,
तुमच्या वडिलांना आदरपूर्वक श्रद्धांजली. वडिलांचे छत्र हरपण्याचे दु:ख काय असते ह्याचा अनुभव घेतला आहे :(
28 Nov 2013 - 7:47 pm | हरवलेला
_/\_