मुस्लीमच कां जिंकले ? एक अभ्यास

शरद's picture
शरद in काथ्याकूट
24 Aug 2013 - 12:15 pm
गाभा: 

मुस्लिमच कां जिंकले ? एक अभ्यास

भारतावर अनादी काळापासून आक्रमणे होत आहेत. भागवतात यांची सूची दिली आहे. उदा. किरात,हूण, पुलिन्द, आभीर,शुंग, यवन, खस, शक इत्यादी. पण इस्लामचे आक्रमण एक अभूतपूर्व आक्रमण होते. इतर आक्रमणांत व याच्यात काय फरक होता की फक्त इस्लामच यशस्वी झाले याची चिकित्सा करावयाचा हा एक प्रयत्न.

इ.स.पूर्व २००० ते इ.स.६०० हा कालखंड प्रथम बघू. या वेळी भारतात "हिंदू" नावाचा धर्म नव्हता पण श्रुति-स्मृति-पुराणोक्त वचनांवर विश्वास ठेवणारी एक समाजघडी प्रस्थापित होती. प्रथम तीन, नंतर चार व त्यानंतर ४+१ (चातुर्वर्णांबाहेरचा) अशी वर्णव्यवस्था प्रचारात होती. वर्णसंकराने निर्माण होणारी प्रजा निराळी जात म्हणून जन्मास येत होती. अशा शेकडो जाती निर्माण झाल्या पण त्या सर्व परत या समाजघडीतच सामावल्या जात होत्या. हा सर्वसंग्राहक विचार एका दृष्टीने कोता होता; पूर्वीसारखे आता कोणीही कोणत्याही प्रकारे वर्ण बदलू शकत नव्हता. पूर्वी क्षत्रीयाला वर्ण बदलून ब्राह्मण होता येत होते, तशी परवानगी आता नव्हती. पण दुसर्‍या दृष्टीने या सर्वसमावेशक व्यवस्थेने सर्वांना सामावून घेतले. जन्माला येणार्‍या कोणालाही मी या व्यवस्थेचा "भाग" नाही असे सांगावयाची सोयच ठेवली नाही. सिंहाच्या गुहेत आत गेला की गेलाच तसे तू जन्माला आलास की तू आमच्यातलाच, तुझे स्थान ठरलेच, भले ते वरचे असेल की खालचे. तुला बाहेर पडावयास जागाच नाही. आता या त्रयीवर अजिबात विश्वास न ठेवणारे, तिला झुगारून देणारे नव्हतेच कां ? होते की. बुद्ध होते, जैन होते, नाथपंथी, योगी, निरीश्वरवादी आदि होतेच. यांना ना श्रुति-स्मृति-पुराण मान्य होते ना वर्णव्यवस्था. पण शेवटी यांनाही गिळंकृत केले गेले. मान न मान, तुम हम एक.

हाच न्याय आक्रमकांना लावला गेला. या कालखंडातील आक्रमक सांस्कृतिक बाजूने इथल्या संस्कृतीपेक्षा डावे होते. त्यांना सामावून जातांना फारसे त्रास पडले नाहीत. त्यातही व्यवहार पाहिला गेलाच. आक्रमक योद्धा असेल तर त्याला क्षत्रीय म्हणा, गबर असेल तर वैश्यात ढकला आणि गौण असेल तर शूद्र म्हणा. संपलं. महाभारतातील युद्धात देखील हे उपरे "आपल्यातीलच" म्हणून दोनही बाजूंनी लढले. शेकडो वर्षे येणार्‍या या परदेशी नद्यांना येथील समाज सागराने आपल्यात सामावून घेतले. त्यांच्या चाली-रिती, निष्ठा स्विकारून त्यांनाही आपल्या जीवन पद्धतीत जागा देण्यास आली. तुझे +माझे = आपले ही उदार विचार धारा भारतात प्राचीन काळापासून प्रचलित होती.

या सर्व समावेशक पद्धतीमध्ये फायदे तसे तोटेही होते. सगळ्यांना वाव देतांना एकसंधीपणा नष्ट झाला. प्रथमत: देवतांची संख्या अतोनात वाढली. त्यांच्या उपासनेत विविधता आली. कर्मकांडे वाढली. आपलाच देव सर्वश्रेष्ठ असे म्हणता म्हणता एकमेकातील भांडणे विकोपाला गेली. त्यातही पुरुषार्थाची महती कमी होऊन दैववाद फोफावला. कलिनिषेध सारखा मूर्खपणा आपला अनिष्ट प्रभाव सर्व स्तरांवर गाजवू लागला. या सगळ्यामुळे मला माझ्या शेजार्‍याची काळजी वाटेनाशी झाली. तो माझ्या जातीचा नाही, त्याचा देव निराळा, त्याची भाषा निराळी असले निरर्थक वाद एकमेकांमध्ये भिंती उभ्या करू लागले. आता सिन्धवर हल्ला झाला तर त्याच्या मदतीला जायला पाहिजे असे मगधाला वाटेनासे झाले.. एका राष्ट्राच्या दृष्टीने ही एक फार भयानक गोष्ट होती. दुर्दैवाने यावर विचार करून त्याचे उत्तर शोधू शकेल असा महापुरुष त्या काळी निर्माण झाला नाही.

या व्यवस्थेत सगळे काही संतुष्ट नव्हते. एक तर माणुस कोणत्याही परिस्थीतीत संतुष्ट नसतोच व वर्णव्यवस्थेत खालच्या
वर्णांतील लोकांनी संतुष्ट असावयाचे कारणच नव्हते. पण त्यांना यातून बाहेर पडावयास मार्गच नव्हता. जाणार कुठे व कुणाकडे ? असंतुष्ट होते ते असहाय्य होते....... आणि या वेळीच इस्लामने भारतावर आक्रमणे केली

इस्लामची स्थापना झाल्यावर लगेचच खलिफांनी सागरमार्गे भारतावर आक्रमण करायाचा प्रयत्न केला. तो फसला. मग खुष्कीमार्गे हल्ले केले पण त्यातही फार यश मिळाले नाही. सिन्धच्या राजाने प्रतिकार करून त्यांना पिटाळून लावले. पण काही फितुर, देशद्रोह्यांमुळे मुस्लिमांनी प्रथम सिन्धमध्ये आ॒पले पाय रोवले. (इ.स.७०८) पण सिन्धबाहेर प्रदेश जिंकावयाच्या प्रयत्नात प्रतिहार, चालुक्य वंशांच्या राजांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही. सिंधमधूनही यांना हुसकावणे शक्य होते. पण आड आले मुलतानमधील सूर्यमंदिर. यावर अनेकांची श्रद्धा होती. त्यामुळे भारतीयांचा हल्ला झाला की मंदिराचा नाश करू एवढी धमकीही पुरी होतसे.
दुसरी अवस्था गझनीच्या महमुदाच्या स्वार्‍यांची. त्यालाही कडवा प्रतिकार झाला. जथपाल राजाने तर गझनीवर स्वारीची सुरवात केली. केवळ वाटेतील प्रचंड हिमवृष्टीने गझनी वाचली ! १०२४ ला सौराष्ट्रातील सोमनाथ मंदिर लुटण्यात आले.. महमद घोरीची स्वारी ही तिसरी अवस्था. पृथ्वीराजाच्या पराभवानंतर मुसलमान भारतात स्थिरावले. भारतातील लोकांनी मदत केली नसती तर हे अशक्य होते.

आता आपण मुस्लिम यशस्वी कां झाले याचा विचार करू. आता "हिंदूधर्म" हा शब्द वापरावयास हरकत नाही. दोन धर्मातील सर्व फरक मी येथे विचारात घेणार नाही. पण इस्लाममधील काही महत्वाच्या गोष्टी प्रथम नोंदवू. (१) कोणताही मुसलमान दुसर्‍या कोणत्याही मुसलमानाचा भाऊ असतो.(२) कोणालाही मुसलमान होता येते किंवा करता येते.(३) अल्लावर श्रद्धा नसलेल्या ’काफिर" यांना येनकेन प्रकारेण धर्मात घ्या. धर्मप्रसाराकरिता तलवार वापरण्यास हरकत नाही. उलट हिंदू धर्मात (१) एकसंघता नव्हती, बंधूत्व सोडाच, पण एकमेकाची सावलीही वर्ज्य होती.(२) बाहेरच्याला हिंदूधर्मात येण्यास बंदी होती. (३) मतप्रवर्तन तलवारीने नव्हे तर विचारांनी व्हावे अशी अपेक्षा होती. (४) कलीयुगात "अधर्माचा’ प्रसार होणार" असे "धर्मच " सांगत होता.

आता इस्लामला हिंदुस्थानातील धर्माशी वैर होते व हिंदूंना त्यांना सामावून घ्यावयाचे नव्हते. दलितांना इस्लाममधील एकता आवडली व जातीच्या जाती इस्लामात सामील झाल्या. या परक्यांना मदत करावयास येथील लोक तयार झाले. इथे फितुर वा देशद्रोही ही विशेषणे जरा जपूनच वापरली पाहिजेत. एक हिंदू राजा दुसर्‍या हिंदू राजाचा पराभव करण्यास मुसलमानांना बोलवत होता. आणि आपल्या धर्मग्रंथांत सुग्रीव, बिभिषण, इ. उदाहरणे होतीच. थोडक्यात मुस्लीमांचा विजय अटळ होता. थोड्याफार फरकाने इंग्रजांच्या वेळीही हेच झाले.

शरद

प्रतिक्रिया

मराठीप्रेमी's picture

24 Aug 2013 - 12:50 pm | मराठीप्रेमी

इतिहासाची फारशी माहिती नाही पण "कोणताही मुसलमान दुसर्‍या कोणत्याही मुसलमानाचा भाऊ असतो" या बद्दल शंका आहे. भारताच्या बाबतीत बघायचे झाले तर मुघल साम्राज्य हे दिल्लीच्या सुलतानांना हरवूनच प्रस्थापित झाले होते आणी नंतरही नादिरशहा, अब्दाली वगैरे मुसलमान राजांनी मुघलांवर आक्रमण केले होते. मुघलांमध्येही जर सत्ताबदल बघितला तर शहाजहान आणी औरंगजेबनंतर सत्ता काबीज करण्यासाठी भाऊबंदकी झालीच होती.
मध्ययुगीन अरबस्तानात दोन मुसलमान राजे एकमेकांशी लढत नव्हते काय?

हाच मुद्दा थोडा पुढे नेताना .

शिया सुन्नी वाद तर जग जाहीर आहेत . आपल्या धर्म बांधवाला खरच बंधू मानणं . हा त्या धर्माचा नाही . तर वैयक्तिक विचारसरणीचा भाग असतो .
कोणी मानतो कोणी नाही . आपल्यातही (हिंदूमध्ये) असे कित्येक लोक आढळतील जे कोणताही धर्माचा माणूस असो . मदत करतातच .

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Aug 2013 - 12:36 pm | llपुण्याचे पेशवेll

जगभरात सगळे मुस्लिम बंधू एकमेकांशी भांडत आहेत. त्याना कोणी काफर मारत नाहीये. :) असो, आपले मुस्लिम बंधू एकमेकात कसे भांडत नाहीत याबद्दल आश्चर्य वाटत आहे.

रमेश आठवले's picture

26 Aug 2013 - 4:51 pm | रमेश आठवले

लखनौमध्ये दर वर्षी नियमितपणे शिया आणि सुन्नी या दोन पन्थामध्ये दंगे होतात. काही माणसे मरतात. मिळकतींचे आणि वाहनांचे नुकसान होते.
औरंगजेब दक्षिणेत फौज पाठवीत असे ते केवळ शिवाजी विरुद्ध नाही . निजामाच्यावर अंकुश ठेवण्यासाठी आणि मिळेल तर त्याचा मुलुख ताब्यात घेण्याचा ही उद्देश होता .
बंगालचा नवाब सिराज उद्दौला याचा सरदार मीर जाफर याने फितुरी करून इस्ट इंडीआ कंपनी ला लढाईत मदत केली होती.
स्वार्थ आणि राज्यविस्तार यांना मुस्लीमांनिसुद्धा धर्मापेक्षा जास्त महत्वाचे मानले आहे.

प्रचेतस's picture

24 Aug 2013 - 12:52 pm | प्रचेतस

मुस्लिम भारतात येऊन खरेच जिंकले का?

पर्शिया पूर्ण इस्लाममय झाला, रोमनांचा सिरिया, इजिप्त इस्लाममय झाला, पाऊण अफ्रिका जवळजवळ इस्लामी झाला. पण भारत त्यांच्यासाठी अजूनही दार उल हरब आहे.

लॉरी टांगटूंगकर's picture

24 Aug 2013 - 1:02 pm | लॉरी टांगटूंगकर

वल्ल्या, प्रतिसाद आवडला

इतकं सरळ निष्कर्षापर्यंत जाणं अवघड आहे, अजून वाचण्यासाठी उत्सुक आहे...

मन१'s picture

24 Aug 2013 - 8:41 pm | मन१

बराचसा सहमत.
तपशील, त्याचे दुवे खालील प्रतिसादात दिले आहेत.
बादवे, भारताला "दारुल हरब" किंवा "दारुल इस्लाम" दोन्ही न मानता "दारुल अमन" मानावे असेही एक प्रपोजल मुस्लिम विचारवर्तुळात मागील शतकात चर्चिले जात होते.

भारताला "दारुल हरब" किंवा "दारुल इस्लाम" दोन्ही न मानता "दारुल अमन" मानावे असेही एक प्रपोजल मुस्लिम विचारवर्तुळात मागील शतकात चर्चिले जात होते.

ही दारुल प्रकरणं काय आहेत?

दार अल इस्लाम म्हणजे इस्लामची भूमी. जिथे इस्लाम पूर्णपणे त्यांच्या धर्मानुसार वागू शकतो. उदा. सौदी अरबिया, मध्यपूर्वेतील देश, पाकिस्तान इत्यादी.

दार अल हरब म्हणजे युद्धभूमी. जिथे इस्लामी अनुयानांची संख्या कमी आहे आणि ती भूमी अनुकूल वेळ येताय इस्लाममय बनवायची आहे. म्हणजेच भारत.

वल्ली साहेब भारत, बांग्लादेश व पाकिस्तान ह्यांची मुस्लिम लोकसंख्येचा ऐकत्रित विचार केला तर अस लक्ष्यात येइल की त्यांची लोकसंख्या ५० कोटीच्या वर जाते. व ह्यातले बहुसंख्य मुसलमान हे आधी हिंदु होते. तेव्हा ते आपल्या देशाला मोठ्या प्रमाणात मुस्लिम करण्यात यशस्वी झाले. ही गोष्ट लगेच लक्ष्यात नाही येत कारण ऐका देशाचे तीन तुकडे झाले व त्यांची लोकसंख्या तीनही देशात विभागली गेली.

उद्दाम's picture

28 Aug 2013 - 9:08 am | उद्दाम

हेच मी खाली लिहिले आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Aug 2013 - 10:20 am | llपुण्याचे पेशवेll

असहमत. जालावरची आकडेवारी तपासून पाहीली तरी पाक + बांग्ला + भारत यातील मुसलमानांची संख्या हिंदूंपेक्षा जास्त भरत नाही.

मुळात हिंदुपेक्षा जास्त भरत नसली तरी त्यांच प्रमाण हे साधारण २ च्या हिंदुमागे १ मुसलमान (३ देशातील मुसलमानांची संख्या धरुन). हिंदुपेक्षा जास्त भरत नसली तरी त्यांच प्रमाण लक्षात घ्या. भारत हा हिंदुंचा देश होता व ह्यात आता मुंसलमानांची संख्या किती आहे हे बघुन व त्यातील बहुसंख्य मुसलमान हे आधीचे हिंदु होते. मग आपल्या लक्षात येईल की हिंदुंवर किती अत्याचार झाले असावेत ते मुसलमान होण्यासाठी .

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Sep 2013 - 9:02 pm | llपुण्याचे पेशवेll

>>आपल्या लक्षात येईल की हिंदुंवर किती अत्याचार झाले असावेत ते मुसलमान होण्यासाठी .
सहमत.

दत्ता काळे's picture

24 Aug 2013 - 12:55 pm | दत्ता काळे

दलितांना इस्लाममधील एकता आवडली व जातीच्या जाती इस्लामात सामील झाल्या.

.. माझ्या मते हे धर्मांतर मोठ्या प्रमाणात स्वखुषीने झाले नाही, तर ते स्वतःचा जीव वाचवावा ह्या उद्देशाने झाले असावे. माझ्या वाचनात अनेकपुस्तकातूनही असे उल्लेख आले आहेत. बाकी मुस्लिमच कां जिंकले ह्याची अजूनही कारणे आहेत.

आशु जोग's picture

24 Aug 2013 - 7:57 pm | आशु जोग

इथे काही चर्चा करण्याचा प्रयत्न केला आहे
धर्मांतरे सक्तीने, स्वखुशीने की फसवून

अद्द्या's picture

24 Aug 2013 - 1:03 pm | अद्द्या

जिंकले ? कधी ? कुठे ?

मला वाटलं आपल्या देशात हिंदू "बहुसंख्य" आहेत .

कि मी वेगळ्या काळात जगतोय :o

अग्निकोल्हा's picture

26 Aug 2013 - 11:47 pm | अग्निकोल्हा

सत्ताकेंद्रे बराचकाळ मुस्लिम बहुल का बनलि होती एव्हडच या अभ्यासमय लेखात उहापोहित केले आहे असं भासतेय.

वामन देशमुख's picture

24 Aug 2013 - 1:16 pm | वामन देशमुख

थोडक्यात मुस्लीमांचा विजय अटळ होता.

अजिबात नाही. जगभरात मुस्लिम कुठे हरले असतील तर ते केवळ हिंदुस्थानातच!

आजवर पन्नासावर देशांत मुस्लिम बहुसंख्य आहेत (जिथे दीड हजार वर्षांपूर्वी त्यांचे,अस्तित्वही नव्हते). भारतीय उपखंडात (पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश, श्रीलंका, अफगाण, नेपाल, भूतान इ. ) मात्र हजार-आठशे वर्षांच्या सतत आक्रमणातूनही त्यांची संख्या वीस टक्क्यांवर जाऊ शकली नाही. चूभूदेघे.
तथापि,

तथापि,
"हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत."
आणि
"अजून शे-दीडशे वर्षांत हिंदू धर्म (किंवा ज्याला हिंदू धर्म म्हणतात ते) नष्ट होईल."

अशी माझी अभ्यासांती ठाम मते बनलेली आहेत.

आण्णा, मुसलमानानी भारत कधीच जिंकला होता. भारत - पाक -बांग्ला मिळूण अखंड हिंदुस्तानात ४० % मुसलमान होते. ४० % हिंदु आणि उअरलेले इतर.

भारतातून दोन देश देश फुटून २० % मुसलमान बाहेर गेले.

आणि आता तुम्ही म्हणताय आमच्या देशात हिंदु बहुसंख्य आहेत म्हणून ... :) समजले का?

--- मुसलमान न झाल्याबद्दल पश्चात्ताप करणारा

उद्दाम खान

आशु जोग's picture

24 Aug 2013 - 2:07 pm | आशु जोग

शरद यांनी निवडलेला विषय आणि त्याचा घेतलेला मागोवा कौतुकास्पद आहे. विशेषतः शेवटचे २ परिच्छेद तर अप्रतिम आहेत.

शशिकांत ओक's picture

24 Aug 2013 - 4:37 pm | शशिकांत ओक

सर, खरे आहे...

कोणताही मुसलमान दुसर्‍या कोणत्याही मुसलमानाचा भाऊ असतो.

फक्त खरा मुसलमान कोण आहे किंवा नाही हे ठरत नाही तोवर भावाभावात भांडणे होतात... तशी त्यांच्या ही होतात.
अरब मुस्लिम गैर अरबांना खरा मुस्लिम मानत नाहीत. अश्रफ अन्सारी असे उच्च वर्णीय अन्य हलक्या कुळातील मुस्लिमांशी भावाप्रमाणे वागतात का? हैद्राबादी मुस्लिम लखनवी किंवा देवबंदीना मुस्लिम भाऊ मानतात का? सुन्नी शियांना, अहमदियांना, आगाखानींना, दाऊदी बोहरांना खरे मुस्लिम मानतात का? ते पाकिस्तानच्या विविध मुस्लिम विचारकांच्या मुलाखतीतून पहावे...
मुस्लिम्स रूल्ड इंडिया
Paki Punjabi and Urdu
BBC Urdu service on 14 Aug
Saudi Arabia insults Paki Comic person

मुस्लिम धर्म निर्मितीच्या आधीपासून ज्या ज्या जमातींच्या, विविध प्रदेशातील टोळ्या वा सैन्याने खैबर खिंडपार करून भारतात प्रवेश का केला त्याची त्या त्या भौगोलिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी पाहिली तर आक्रमक सैन्याला लढाईत क्रूर व्हावेच लागते. काही हस्तगत करायच्या उद्देशाने घर फोडायला आलेला साधा चोर ही हाती शस्त्र घेऊन प्रतिकार करणाऱ्याला वेळ पडली तर मारण्याच्या तयारीनेच आलेला असतो. आक्रमकपणातून क्रूरता निर्माण होते किंवा क्रूर असल्याशिवाय आक्रमक बनता येत नाही. या मापाने ते क्रूर आक्रमक होते. नंतर मुस्लिम धर्माची तत्वे वा वागणुकीच्या तऱ्हा त्या टोळ्यांना आनंदाने वा बळजबरीने मान्य झाल्या म्हणून ते एकमेकांना पुरक व पथ्यावर पडल्यासारखे झालेले दिसते. अशा क्रूर लोाकांचा धर्म तो होता म्हणून त्या धर्मातील लोकांनी वागणुकीचे ते आदर्श मानायला सुरवात केली. (पाकिस्तानच्या मिसाईलची नावे आठवा) भारतातरील हिरव्यागार सुपीक धनधान्य उगवणाऱ्या जमिनीचे मालक किंवा राजसत्ता खैबरखिंड पार करून तेथील अती थंडी व वैराण भागावर अधिपत्य करायला कसा उत्सुक असेल? तसा असता तर त्याला तो प्रदेश जिंकायला साहसी व क्रूर व्हावेच लागले असते. मग तो हिन्दू असता तरी... पण आपल्या देशाच्या सेना अजूनही आपल्याच बळकावलेल्या प्रदेशात चाल करून जाऊ शकत नाही अशी मानसिकता आहे. तेथे आज ही असे होत नाही म्हणून मुस्लिम जिंकतात...

अनिरुद्ध प's picture

24 Aug 2013 - 4:44 pm | अनिरुद्ध प

सहमत

आशु जोग's picture

24 Aug 2013 - 7:11 pm | आशु जोग

इथले काही प्रतिसाद पाहीले. सौदी धर्मीय लोकांमधील भांडणे शोधून समाधान मानण्याचा प्रयत्न काही जणांनी चालवला आहे.
पण सौदी धर्मीय आपापसात भांडत असले तरी विजय त्यांचाच होत आहे हे आधी मान्य करायला शिकले पाहीजे.

वल्लीशेटशी सहमत. माझ्याकडील माहिती संक्षिप्त रुपात लिहिलेली आहे. त्याचे दुवे देत आहे.
भाग १
http://www.misalpav.com/comment/419491#comment-419491
.
भाग२
http://www.misalpav.com/comment/419494#comment-419494
.
भाग३
http://www.misalpav.com/comment/419497#comment-419497
.
भाग४
http://www.misalpav.com/comment/419517#comment-419517
.
भाग५
http://www.misalpav.com/comment/419519#comment-419519
.
भाग ६(संकिर्ण)
http://www.misalpav.com/comment/419744#comment-419744
.
हे सर्व दुवे प्[रामुख्याने भारतावर झालेल्या आक्रमणांबद्दल आहेत.
मुळात मध्यपूर्वेत इस्लामच्या उदयाच्या आसपासचा काळ संक्षिप्त रुपात तीन भागात लिहून ठेवला होता. तो पुढे आहे:-
http://www.misalpav.com/node/21744#comment-399275
http://www.misalpav.com/node/21744#comment-400231
http://www.misalpav.com/node/21744#comment-400256
.
बाकी, ही चर्चा वाचतो आहेच, पण सध्या व्यस्त असल्याने एकूणातच प्रत्यक्ष लॉगिन करणे जमेलच असे नाही.

लेख रोचक तदपि अंमळ सरसकटीकरण केलेय. फुरसतीत परततो.

पैसा's picture

24 Aug 2013 - 9:33 pm | पैसा

पण मुस्लिम जिंकले असे म्हणण्यापेक्षा मुस्लिम राज्यकर्ते जिंकले असे म्हटले पाहिजे. कारण अगदी शिवाजी महाराजांसारख्याला सुद्धा प्रत्यक्ष मुस्लिम सरदारांपेक्षा बादशहाच्या हिंदू सरदारांशी जास्त लढावे लागले. तत्कालीन समाज हा मुस्लिम्/ब्रिटिश्/पोर्तुगीज कोणीही असो, ते इतर हिंदू राजांप्रमाणेच हे वेगवेगळे राजे असेच समजत असे. एक देश, धर्माधारित राज्य वगैरे कल्पना तेव्हा रुजल्या नव्हत्या.

मुस्लिम बादशहांनी राजपूत मुलींबरोबर लग्ने लावून त्याना आपले नातेवाईक करून घेतले. पण अशा लग्नातील मुले ही हिंदू नव्हे तर मुस्लिमच असत. मुसलमान बादशहाला दिल्लीश्वर म्हणण्याइतकी लाचारी तेव्हा बहुसंख्य समाजात होती. भले ते जिझिया कर लावू देत किंवा शेंडी कर बहुसंख्य हिंदू हे जमेल तसे आपला धर्म टिकवून नांदत होते असे दिसते.

धर्मांतरे ही आपखुशीने क्वचित होत असतीलही. पण मोठ्या प्रमाणात झालेली धर्मांतरे ही छळ, बळ, कपट अशा मार्गांनीच झालेली आहेत. अपवाद एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर दलितांनी केलेल्या धर्मांतराचा. पण त्याला धर्मांतर म्हणावे का हा प्रश्न पडतो. कारण हिंदू धर्माने बौद्ध हा पंथ म्हणून सामावून घेतला होता. मुस्लिमांनी तलवारीच्या जोरावर पूर्ण हिंदुस्तानचे धर्मांतर घडवून आणणे केवळ अशक्य होते कारण प्रचंड लोकसंख्या. पोर्तुगीजांनी तसे प्रयत्न केले तरी गोव्यात ख्रिश्चन लोकसंख्या हिंदूपेक्षा जास्त होऊ शकली नाही. शिवाय ही आक्रमणे महाराष्ट्राने थोपवून धरली. त्यामुळे दक्षिण भारत एवढा चिरडला गेला नाही.

एकूणातच भारतात येऊन आक्रमक असल्याच्या जोरावर राज्य ताब्यात घेण्यात मुस्लिम यशस्वी झाले तरी संपूर्ण हिंदुस्तानचे धर्मांतर घडवून आणणे त्यांना शक्य कधीच नव्हते. इतर सर्व आक्रमकांप्रमाणे कालांतराने बरेचसे सुजाण मुस्लिमही भारतात मिसळून गेले आणि जेव्हा मुस्लिम बहुसंख्येने असलेले पाकिस्तान तयार झाले तरी स्वखुशीने भारतात राहिले. भारतात त्यांना जेवढ्या संधी होत्या तेवढ्या पाकिस्तानात नव्हत्या हे स्पष्टच आहे. त्यामुळे "हँस के लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान" या वल्गनाच राहिल्या. आणि राहतील.

"हँस के लिया पाकिस्तान, लडके लेंगे हिंदुस्तान" या वल्गनाच राहिल्या. आणि राहतील.

नक्की?

वाक्यातला पूर्वार्ध वल्गना राहिला नसून साठ वर्षांपुर्वीच वस्तुस्थिती बनलीय (आणि म्हणून) उत्तरार्धही केवळ वल्गना राहील या समाजाला आधार काय?

पैसा's picture

24 Aug 2013 - 10:31 pm | पैसा

http://www.globalfirepower.com/countries-comparison-detail.asp?form=form...

या लिंकवर दोन्ही देशांची तुलना बघा. पाकिस्तान उपद्रव करत राहील पण पाकिस्तानपेक्षा क्षेत्रफळाने चौपट, लोकसंख्या ६ पट असलेला भारत देश सैन्याचा हल्ला करून जिंकून घेणे पाकिस्तानला कदापि शक्य नाही. अगदी अण्वस्त्रे वापरली तरीही.

धर्मराजमुटके's picture

24 Aug 2013 - 10:44 pm | धर्मराजमुटके

विषयांतर होतेय याची जाणिव आहे पण तुम्हीच दिलेल्या लिंकवर भारत आणि चीनची तुलना केल्यावर उरात धडकी भरली आणी पोटात गोळा आला.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Aug 2013 - 1:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

केवळ संख्येवर उपद्रवमुल्य तर अवलंबून नसतेच पण बर्‍याचदा विजयही अवलंबून नसतो... जुन्या काळची मराठी गनिमी कावा विरुद्ध दिल्लीतील सत्ता यांची जुगलबंदी आठवा. तसेच आधुनिक जगातली व्हिएतनाम-चीन, व्हिएतनाम-अमेरिका, अफगाणिस्तान-यु एस एस आर या युद्धांची उदाहरणेही आहेतच!

हल्लीच्या काळात युद्धात पूर्ण विजय शक्य नाही... अगदी खर्‍या सामरीक महासत्तेलाही. मग दुसरा परिणामकारक आणि कमखर्चीक उपाय म्हणजे शत्रूला चर्चेच्या गुर्‍हाळात गुंतवून त्याचा छुपेपणाने (आर्थिक, सामाजीक, धार्मीक, राजकीय उपाय वापरून) शक्तीपात करत राहणे आणि योग्य वेळ येताच मोठा घाव घालणे. अण्वस्त्रे ही "केवळ आणि केवळ डिटरंट" आहेत... त्यांचा प्रथम वापर करणार्‍या राष्ट्राविरूद्धा इतर सगळे जग एकत्र होईल. हे नीट समजून त्यांचा गर्भित धमकीसारखा उपयोग करणारे राष्ट्र तात्वीकदृष्ट्या वरचढ असते. ह्या बाबतीत आतापर्यंत पाकिस्तान जास्त हुशारीने वागून भारतापेक्षा जास्त गुण मिळविले आहेत असेच खेदाने म्हणावे लागते.

अघोषीत शत्रूबद्दल तर सांभाळून असायला हवेच... पण इथेतर स्वंयघोषीत (उघड उघड) छुपे युद्ध चालू आहे !

पैसा's picture

25 Aug 2013 - 2:11 pm | पैसा

त्याशिवाय उद्या पाकिस्तानने सर्वंकष युद्ध सुरू केलेच तरी एवढे सगळे प्रदेश जिंकत कन्याकुमारीपर्यंत आणि आसामपर्यंत जाणे त्यांना शक्य नाही. दुसरे म्हणजे अमेरिका भारत किंवा पाकिस्तान दोघांनाही निर्णायक विजय मिळवू देणार नाही. दोघांना झुंजत ठेवण्यात त्यांचा फायदा आहे ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे.

अघोषीत शत्रूबद्दल तर सांभाळून असायला हवेच... पण इथेतर स्वंयघोषीत (उघड उघड) छुपे युद्ध चालू आहे !

अगदी अगदी सहमत! पण म्हणूनच आमच्यासारख्या सामान्यांना कळत नाही की आपण तरी चर्चेचे गुर्‍हाळ कशाला घालत बसायला हवे. बरे गुर्‍हाळ घालायचे तर घाला, संरक्षण खर्च कमी करताना आधीच कठीण अवस्थेत काम करणार्‍या सैनिकांच्या सोयी सुविधा कमी का करता? त्यांना लॉजिस्टिक सपोर्ट कमी पडला असे का ऐकावे लागते? आपल्या सैनिकांना पाकिस्तानी सैनिक भारतीय सीमेत येऊन धरून नेतात, त्यांचे हाल हाल करून मारतात, डोकी कापतात, तरी शांततेच्या गप्पा कशाला? सगळे संबंध तोडून टाका ना! "मोस्ट फेव्हर्ड नेशन" चा दर्जा कशाला?

आशु जोग's picture

24 Aug 2013 - 11:51 pm | आशु जोग

अपवाद एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर दलितांनी केलेल्या धर्मांतराचा. पण त्याला धर्मांतर म्हणावे का हा प्रश्न पडतो. कारण हिंदू धर्माने बौद्ध हा पंथ म्हणून सामावून घेतला होता.

इथे याचा संबंध काय ?

पैसा's picture

25 Aug 2013 - 8:31 am | पैसा

धर्मांतरे ही आपखुशीने क्वचित होत असतीलही. पण मोठ्या प्रमाणात झालेली धर्मांतरे ही छळ, बळ, कपट अशा मार्गांनीच झालेली आहेत. अपवाद एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर दलितांनी केलेल्या धर्मांतराचा.

हे आधीचं वाचलं नाय का?

सुबोध खरे's picture

25 Aug 2013 - 11:42 pm | सुबोध खरे

लष्करी इतिहास शिकवताना आम्हाला असे शिकवले होते कि मध्ययुगात मुस्लीम राजे जिंकले याचे प्रमुख कारण त्यांचे वेगवान घोडदळ होते त्याची सुरुवात चंगीझ खानाने केली जो मुळात एक मंगोल होता (अरब नव्हे). चंगीझ खानाने उत्तम घोड दळ वापरून आपल्या शत्रूंच्या बलाढ्य पायदळाचे पानिपत केले त्यःचे उदाहरण घेऊन मुघलांनी उत्तम अरबी घोड्यांची पैदास करून आपले वेगवान घोडदल बनवले जे भारतीय राजांच्या हत्ती आणी पायदला पेक्षा चपळ आणी वेगवान होते. हीच स्थिती जर्मनीने दोन्ही महायुद्धात रणगाडे आणून करून दाखवली आणी महायुद्ध जवळ जवळ जिंकले होते. त्यांचे ब्लिट्झ क्रीग हे तत्वज्ञान अत्यंत कीर्तीचे आहे. आजही बहुतांश युद्धात वायुदलाचे काम अतिशय महत्त्वाचे ठरत आहे.
डॉक्टर बाबासाहेबआंबेडकर यांचे विचार काळाच्या फार पुढे होते त्यांनी इस्लाम का स्वीकारला नाही याचे कारण त्यांच्याच शब्दात ISLAM AS A RELIGION DEMANDS MORE LOYALTY TO RELIGION THAN THE NATIONI CAN NOT ACCEPT MY PEOPLE TO BE MORE LOYAL TO RELIGION THAN NATION. त्यांनी संत गाडगेबाबा यांना विचारले असता गाडगेबाबा नि सांगितले कि तू दुसर्या धर्मात जा तिसर्या धर्मात जाऊ नको.
डॉक्टर बाबासाहेबांना इस्लाम मध्ये असणारी स्त्रियांवरील बंधने पूर्णपणे अमान्य होती. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे स्त्रिया आणी शुद्र या पीडितांचा उद्धार झाल्याशिवाय राष्ट्राचा उद्धार होणे शक्य नाही.
त्यांचा राखीव जगणं सुद्धा पूर्ण विरोध होता. त्यांच्याच शब्दात IF YOU GIVE RESERVATION TO BACKWARD PEOPLE THEY WILL NEVER STRIVE TO BECOME FORWARD.
शेवटी इतर सर्वांच्या विरोधामुळे त्यांनी अनिच्छे ने राखीव जागांना मान्यता दिली पण फक्त दहा वर्ष साठी.
त्यांनी असे लिहिले आहे कि राखीव जागांमुळे एक नव पुढारलेला मागासवर्ग जन्माला येईल जो आपल्या बांधवांपासून फारकत घेईल. दुर्दैवाने त्यांचे विचार सार्वत्रिक प्रसार करणे हे कोणत्याही सरकारला परवडणारे नाहीत. फार कशाला मागासवर्गाच्या आजच्या पुढार्यांना पण झेपणारे नाहीत.

प्रभाकर पेठकर's picture

26 Aug 2013 - 1:14 am | प्रभाकर पेठकर

राजा शिवछत्रपती ह्या बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या कादंबरीत मोघलांच्या पराभावाचे एक मुख्य कारण त्यांचे हत्तीदळ होते असे म्हंटले आहे. उत्तरभारतात सपाट प्रदेश जास्त असल्याने हत्तीवरून, उंच सुरक्षीत जागी बसून, सैन्याच्या हालचाली करणे त्यांचा सुलभ वाटत असे परंतू महाराष्ट्रात, अत्यंत कठीण अशा डोंगराळ प्रदेशात हत्ती आणि तोफांचा वापर अडचणीचा ठरत होता. घोडा चटकन कसाही वळविता येतो पण हत्तीला पूर्ण १८० डिग्रीत वळविण्यास प्रयास पडतात आणि ते अत्यंत वेळखाऊ काम असते. हत्ती वळे पर्यंत घोडेस्वार त्याच्या पायावर वार करून त्याला जायबंदी करायचे आणि शत्रूशी दोन हात करायचे.
महाराष्ट्रात डोंगराळ भागात गनिमी काव्यासाठी जंगलातून अत्यंत अरूंद जागेतून घोड्यावरून येऊन मोंगली सैन्यावर महाराजांनी अगदी तुटपुंज्या सैन्यानिशी हल्ला करून मोंघलांच्या फौजांना बेजार केले होते. जंगलातून अंधार्‍यारात्री अचानक ५-२५ घोडेस्वार यायचे आणि सपासप कापाकापी करून झटकन जंगलात पळून जायचे. महाराजांनी हत्तीदलापेक्षा घोडदळावरच जास्त भर दिला होता. कोसकोसाच्या जलद हालचाली (जसे सुरतेची लूट, लाडाचे कारंजे इ.इ.) घोड्यावरूनच शक्य व्हायच्या.

हत्ती आपल्या सोंडेने घोड्यांना फटकारतो आणि खाली पाडतो. (हतींना, युद्ध प्रसंगी भरपूर दारू पाजली जायची). राजस्थानात मोंघलांच्या हत्तीला संभ्रमात पाडण्यासाठी घोड्यांच्या तोंडाला चामड्याच्या सोंडा बांधल्या जायच्या. त्यामुळे ते छोट्या हत्ती सारखे दिसायचे. दांडगट हत्ती समोर दिसणार्‍या लहानग्या हत्तीवर(?) हल्ला करायला काकू करायचे. ह्याचा फायदा घोड्यावरच्या सैन्याला मिळायचा. आजही जयपूरच्या म्युझीअम मध्ये असे हत्तीची सोंड लावलेले घोड्यांचे पुतळे पाहायला मिळतात.

प्रभाकर पेठकर's picture

26 Aug 2013 - 1:17 am | प्रभाकर पेठकर

क्षमा असावी. जयपूर नाही उदयपूर म्युझीअम.

शिल्पा ब's picture

26 Aug 2013 - 1:27 am | शिल्पा ब

<<<राजस्थानात मोंघलांच्या हत्तीला संभ्रमात पाडण्यासाठी घोड्यांच्या तोंडाला चामड्याच्या सोंडा बांधल्या जायच्या.

हे माहिती नव्हतं.

उद्दाम's picture

26 Aug 2013 - 11:36 am | उद्दाम

घोड्यांच्या तोंडाला चामड्याच्या सोंडा बांधल्यावर हत्ती त्याला हत्ती समजत असेल तर हत्ती हे मूर्ख जनावर आहे, असेच म्हणावे का?

योगी९००'s picture

26 Aug 2013 - 1:40 pm | योगी९००

घोड्यांच्या तोंडाला चामड्याच्या सोंडा बांधल्यावर हत्ती त्याला हत्ती समजत असेल तर हत्ती हे मूर्ख जनावर आहे, असेच म्हणावे का?

हत्तीला दारू पाजली असेल तर...??? संदर्भ : (हतींना, युद्ध प्रसंगी भरपूर दारू पाजली जायची).

हत्तीला दारु पाजण्याच्या उल्लेखाने काही संकीर्ण विचार आले:

१. घोड्याला चामड्याची सोंड लावल्यावर त्याला हत्ती समजण्यासाठी मूळ हत्तीला किती दारु पाजावी लागत असेल.
२. युद्धप्रसंगी वापरल्या जाणार्‍या दारुगोळा या शब्दातल्या "दारु"चा उगम इथे असेल का?
३. दारु पिऊन हत्ती युद्धात धुमाकूळ करु शकत असेलही, पण नंतर हत्तीचा हँगओव्हर हा किती जबरदस्त असेल. अशावेळी त्याला डोके गच्च दाबून गप आडवे पडावे असे वाटत असतानाही (आणि मुळात स्वहस्ते डोके दाबणेही शक्य नसताना) पुन्हा युद्धाला जुंपत असतील तर त्यावेळच्या "पेटा"ने याची दखल घ्यायला हवी होती. (की अशा वेळी किल्ल्याचे दरवाजे तोडण्यासाठी हत्तीला डोक्याने धडका द्यायला लावत असत?)
४. पुरेश्या प्रमाणात दारु पिऊन हत्ती घोड्याला हत्ती समजत असू शकेल हे मान्य होण्यासारखं आहे. काही मनुष्यांबाबत दारु पाजल्यानंतर "लिफ्ट"ला बाथरुम समजणं हे घडलेलं पाहिलं आहे.

प्रभाकर पेठकर's picture

26 Aug 2013 - 4:13 pm | प्रभाकर पेठकर

'दारू पाजल्यामुळे हत्ती, घोड्याला हत्ती समजतो' असे म्हणायचे नसून समोर दिसणारा 'प्राणि' हत्तीसदृष आहे ह्या विचाराने हत्ती संभ्रमात पडतो आणि हल्ला करत नाही. हि एक रणनिती आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Aug 2013 - 10:28 am | llपुण्याचे पेशवेll

हत्तीलाच नव्हे तर घोड्यालाही पाजत असावेत. त्यामुळे घोड्याला आपण हत्तीइतकं मोठं झाल्यासारखं वाटण्याची शक्यता आहे. :)

दादा कोंडके's picture

27 Aug 2013 - 10:46 am | दादा कोंडके

हत्ती दारू स्वतःहून पीत असेल का? सापाला तोंडात नळी खुस्पू खुस्पू दूध पाजतात तस काहीतरी करत असतील का?

प्रभाकर पेठकर's picture

27 Aug 2013 - 11:58 am | प्रभाकर पेठकर

सर्कशीतल्या हत्तीला सर्दी झाली की ब्रँडी पाजतात. पुढे त्याला ब्रँडीची एवढी सवय (व्यसन) लागते की ब्रँडी मिळावी म्हणून कधी कधी हत्ती सर्दी झाल्याचे नाटक करतो. हे, एका सर्कशीतील जनावरांना सांभाळणार्‍या व्यक्तीने आपल्या सर्कस जीवनावर लिहीलेल्या पुस्तकात नमूद केले आहे.

दादा कोंडके's picture

27 Aug 2013 - 12:25 pm | दादा कोंडके

कुठल्याश्या खेड्यात एका बकर्‍याला काही रिकामटेकड्या लोकांनी बिडीची सवय लावली होती. तुनळीवर बघितलं होतं.

मालोजीराव's picture

27 Aug 2013 - 12:01 pm | मालोजीराव

त्यामुळे घोड्याला आपण हत्तीइतकं मोठं झाल्यासारखं वाटण्याची शक्यता आहे.

सामान्य सैनिकालाही भरपूर दारू पाजण्यात येत असावी त्यामुळे तो स्वतःला अफझलखान समजत असण्याची शक्यता आहे ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Aug 2013 - 4:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

(की अशा वेळी किल्ल्याचे दरवाजे तोडण्यासाठी हत्तीला डोक्याने धडका द्यायला लावत असत?)

हत्तीने किल्ल्याच्या दरवाजावरच्या खिळ्याला न घाबरता जोरदार धडक द्यावी म्हणून उंटाला मध्ये ठेवत असत. मात्र यात हत्ती सुरक्षित रहात असला तरी उंट चिरडला जात असल्याने "पेटा" ने त्या उंटांच्या वंशजांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून लढा उभारायला वाव आहे ;)

रमेश आठवले's picture

26 Aug 2013 - 4:29 pm | रमेश आठवले

खूप खुमासदार . वाचून मजा आली.

श्रीगुरुजी's picture

27 Aug 2013 - 12:31 pm | श्रीगुरुजी

>>> काही मनुष्यांबाबत दारु पाजल्यानंतर "लिफ्ट"ला बाथरुम समजणं हे घडलेलं पाहिलं आहे.

इंग्लंडचे क्रिकेटपटू (जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, केव्हिन पीटरसन यांना तर २ दिवसांपूर्वी ओव्हलची खेळपट्टी "बाथरूम" वाटली होती. मधूसूदन पानसरेला सुद्धा १ महिन्यापूर्वी क्लबची गच्ची "बाथरूम" वाटली होती. %)

बाथरूम, बेसिन, सगळे काही आले त्यात.

बॅटमॅन's picture

27 Aug 2013 - 1:06 pm | बॅटमॅन

(मद्यजनित वमनकहाण्यांचा साक्षीदार आणि तिटकारक) बॅटमॅन.

सुधीर मुतालीक's picture

30 Aug 2013 - 2:03 pm | सुधीर मुतालीक


"त्यांनी संत गाडगेबाबा यांना विचारले असता गाडगेबाबा नि सांगितले कि तू दुसर्या धर्मात जा तिसर्या धर्मात जाऊ नको."

तिसरा धर्म कुठला ? आनि तो तिसरा का ?

अहो, म्हणजे आता ज्या नव्या धर्मात जाणार, त्याचा व्यवस्थीत अभ्यास करुन मग त्यातच रहा असा त्याचा अर्थ.

पहिला पटला नाही, तर दुसरा केला.

आता दुसराही पटला नाही, म्हणून तिसरा केला, असे करु नको.

काळा पहाड's picture

24 Aug 2013 - 11:17 pm | काळा पहाड

मुस्लिमच कां जिंकले याचं कारण फार सोपं आहे. कारण हिंदू त्या वेळी सुद्धा सेक्युलर होते. आणि आता सुद्धा मुसलमानांच्या विरुद्ध खरे बोलल्यावर मिपा वरील पोस्ट जशा उडवल्या जातात तसेच त्या वेळी सुद्धा मुसलमानांच्या बद्दल घातक उदारपणा दाखवणारे शहाणे होतेच!

प्रसाद१९७१'s picture

25 Aug 2013 - 12:00 am | प्रसाद१९७१

मुसलमानांच्या विरुद्ध खरे बोलल्यावर मिपा वरील पोस्ट जशा उडवल्या जातात तसेच त्या वेळी सुद्धा मुसलमानांच्या बद्दल घातक उदारपणा दाखवणारे शहाणे होतेच!>>>>>>>>>>>>>>+१०००००००००००००००००००००००

चेतनकुलकर्णी_85's picture

25 Aug 2013 - 12:32 am | चेतनकुलकर्णी_85

नाही हो ।जो पर्यंत ईद ला ईद मुबारक अशी बांग दिली जात नाही मिपा च्या मुखपृष्टावरून तो पर्यंत मिपा सेकुलर आहे असे मी मुळीच म्हन्टणार नाही!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

25 Aug 2013 - 4:51 am | निनाद मुक्काम प...

तो लाल माकडटोपी घालणारा पाकिस्तानी झैद हमीद
पाकिस्तानी वाहिन्यांवर संधी मिळेल तेव्हा हमने म्हणजे मुस्लिमांनी हिंदू ओ पे हजारो साल राज किया हे
असे घसा फाडून बोंबलत असतो.
त्याच्या दाव्यात तथ्य असावे असे हा लेख वाचून माझे मत बनले आहे.

अत्रन्गि पाउस's picture

25 Aug 2013 - 9:46 am | अत्रन्गि पाउस

बिशनसिंग बेदी म्हणाला होता कि भारतात fast बोलर्स तयार होत नाहीत कारण समोरच्याला शारीरिक इजा करणे हि भारतीयांची मानसिका नाही....
हत्या रक्त कुर्बानी वगैरे गोष्टी लहानपणापासून शिकविण्याचा सर्वसाधारण हिंदू माणूस विचारही करू शकत नाही...त्यामानानी आपण हळवेपणा दाखवतो....अहिंसेला इतकी व्यापक लोकमान्यता तिथूनच आली आहे...
असो...मूळ धागा प्रश्नांकित असल्यामुळे हे माझे मत...

रमेश आठवले's picture

25 Aug 2013 - 10:08 am | रमेश आठवले

"अल्लावर श्रद्धा नसलेल्या ’काफिर" यांना येनकेन प्रकारेण धर्मात घ्या".
येनकेन प्रकारेण साठी एक नवीन उदाहरण अनपेक्षित पणे समजले.
गरिबी रेखा (बी पी एल ) आखण्याचे काम सर्व प्रथम कावेबाज औरंगजेब बादशाह ने केले. त्याने जिझीया कराचे दर कर आकारण्यासाठी हिंदूंचे तीन वर्ग केले. श्रीमंत , मध्यम आणि गरीब व त्यांचे वेग वेगळे कर दर ठरवले. सर्वात जास्त दर गरीब वर्गासाठी लावला. याचा सरळ परिणाम म्हणजे गरीब वर्गातून मोठ्या संख्येने मुस्लिम धर्म स्वीकारला गेला,
दुसरे सर्व विदित कारण म्हणजे-
प्रजनन दर
प्रजनन दर जास्त असल्यामुळे भारतातील मुस्लिमांची संख्या १९५१ साली ९.९१ टक्के होती ती २००१ साली १३.४३ टक्के आणि २०१० साली १४ टक्के झाली. ( India’s Muslim Population by Carin Zissis for Council of Foreign Relations)

तिमा's picture

25 Aug 2013 - 10:31 am | तिमा

आत्ताही घरभेदी 'भाऊ' मदत करत आहेत म्हणूनच अतिरेकी जिंकत आहेत. एकी नसलेल्या समाजाचा पराभव अटळ आहे.

चौकटराजा's picture

25 Aug 2013 - 1:59 pm | चौकटराजा

२६ जानेवारी १९५० रोजी भारतीयांमधे असलेल्या मुस्लिमांचे प्रमाणापेक्षा आताचे प्रमाण जास्त असेल तर मुस्लीम जिंकत चालले आहेत असे म्हणू. त्यांचे प्रमाण भारतात २०५० ला पनास टक्क्याहून अधिक झाले तर ...?भारतीय राज्य घटना
जिंकली असे म्हणू.

sagarparadkar's picture

25 Aug 2013 - 3:34 pm | sagarparadkar

प्रचीन काळी वैभवाच्या शिखरावर असलेल्या,सुसंस्कृत ग्रीक संस्कृतीचा रानटी स्पार्टन्सनी कसा विध्वंस केला ते वाचा. बाकी कुठे नाही सापडला हा इतिहास तर डॉ. मीना प्रभू लिखित 'ग्रीकांजली' ह्या प्रवासवर्णनात शोधा.
सावरकरांचा एकच शब्द देण्याचा मोह इथे टाळता येत नाही तो म्हणजे 'सद्गुणविकृती'

ह्यांच्या मतदानाच्या अधिकारावर आणि प्रजननाच्या कारखान्या वर कायमची बंदी घालायला हवी

टवाळ कार्टा's picture

25 Aug 2013 - 4:33 pm | टवाळ कार्टा

अजुन सरकार कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण नाही ठेउ शकत....

अवतार's picture

25 Aug 2013 - 4:36 pm | अवतार

केवळ भारतच नाही तर इतर जगाच्या इतर बऱ्याच प्रदेशांत झाले. ख्रिश्चन धर्मीयांनीही अशीच आक्रमणे केली. पण त्यापाठी केवळ धर्मांतराचा हेतू नसून त्या प्रदेशांची लूट करणे हा मुख्य हेतू होता.
जसवंत सिंह यांच्या म्हणण्याप्रमाणे ब्रिटीश किंवा इतर आक्रमकांची ओळख ख्रिश्चन आक्रमक अशी केली जात नाही. पण मुस्लिमांच्या बाबतीत मात्र इस्लामचे आक्रमण असा शब्द प्रयोग केला जातो.
याचे कारण म्हणजे आठव्या शतकापासून म्हणजे महंमद बिन कासिमच्या काळापासून ते थेट अब्दालीपर्यंत मुस्लिमांच्या आक्रमणात सातत्य आढळून येते. तसे सातत्य इतर आक्रमकांच्या बाबतीत आढळत नाही. अर्थात ही आक्रमणे प्रत्येक वेळी इस्लामचा प्रचार करण्याच्या हेतूने झाली नव्हती. नाहीतर गझनीच्या महमूदला सतरा वेळा स्वारी करण्याची गरज नव्हती, अब्दालीला तीन वेळा आक्रमण करावे लागले नसते.
ह्या सर्व आक्रमणांचा मुख्य रोख देवळांवर होता. याचे कारण म्हणजे त्या वेळी देवळांमध्ये प्रचंड संपत्ती साठवली जात असे. अलीकडेच त्रावणकोरच्या मंदिरात पन्नास हजार कोटींचा खजिना सापडला हे त्याचे उदाहरण. त्याच बरोबरीने स्वत: प्रेषित पैगंबर यांनी काबा मशीद (जे मुळचे मूर्तिपूजक अरबांचे मंदिर होते) येथील ३६० मूर्त्या फोडून टाकल्या आणि निराकार अल्लाची संकल्पना मांडली. धर्माने दिलेली ही प्रेरणा आणि संपत्तीचा हव्यास ह्या दुहेरी कारणांतून ही आक्रमणे झाली. त्यातही संपत्तीचा हव्यास हे प्रमुख कारण मानले पाहिजे. शत्रूकडून मिळालेली लूट आणि स्त्रिया यांमध्ये वाटा मिळण्याची सोय धर्माने करून ठेवणे हे त्याचे कारण आहे. हजारोंच्या संख्येने सैन्य घेऊन कोणी वारंवार निव्वळ धर्मप्रचारासाठी स्वाऱ्या करत नाही. मुस्लिम धर्मांध असले तरी इतकेही धर्मांध नव्हते.
हा झाला सैनिकी विजय. पण राजकीय आणि धार्मिक आक्रमण हे इस्लामचे खरे आक्रमण होते. इथल्या बहुसंख्य जनतेला मुस्लिम बनवण्यात इस्लामी राज्यकर्त्यांना यश आले नाही कारण या आक्रमणांचा प्रतिकार करणारी प्रेरणा संपली नाही. एक पृथ्वीराज गेला तरी महाराणा प्रताप येतोच. गुरु गोविंदसिंह येतातच. शिवाजी, संभाजी, छत्रसाल निर्माण होतातच. जेव्हा लढण्याची प्रेरणाच संपते तेव्हा खरा पराभव होतो. ही प्रेरणा समूळ समाप्त करण्यात मुस्लिम आक्रमकांना यश आले नाही हा त्यांचा पराभव आहे.
आधुनिक राष्ट्राच्या संकल्पनेत मध्यवर्ती केंद्रीय सत्ता हा प्रमुख आधार असतो. काही प्रमाणात सम्राट अशोक याचा अपवाद सोडला तर अशी सत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न मोगल आणि नंतर शिवाजी महाराज यांच्याशिवाय कोणी केलेला दिसत नाही. नाहीतर पानिपतच्या युद्धात मराठा सैन्यावर जाट आणि शिखांच्या मदतीशिवाय लढण्याची वेळ आली नसती. राणा प्रतापच्या विरोधात इतर राजपूतांनी अकबराला मदत केली नसती. खुद्द शिवाजी महाराजांना विश्वासघात सहन करावा लागला नसता. हा झाला राजकीय विजय.
प्रश्न असा उद्भवतो की बहुसंख्य जनतेच्या भावनांची कदर न करणारे राज्यकर्ते हजार वर्षे राज्य कसे करू शकले? याच मुस्लिम नवाब आणि बादशहांनी देवळे बांधण्यासाठी देणग्या दिल्याचे इतिहासात नमूद आहे. तरीही हे आपले राज्य नाही ही भावना जनतेच्या मनात होतीच. त्याशिवाय औरंगजेबाचा कैदी म्हणून आग्र्यात गेलेल्या शिवाजीला पाहण्यासाठी तेथील जनता कुतूहल दाखवणार नाही.
यातून एवढेच दिसते की धर्म आणि राज्यव्यवस्था यांचा संबंध नाही हे तत्वज्ञान या देशात पूर्वी पासून अस्तित्वात होते. येथील बौद्ध राजांनी हिंदूंना मदत केली आहे तसेच हिंदू राजांनी बौद्ध धर्मालाही मदत केलेली आहे(याच्या उलटही घडलेले आहेच). जोपर्यंत देवळांना किंवा इतर धर्मस्थळांना नियमित देणग्या मिळत होत्या आणि धार्मिक बाबतीत ढवळाढवळ होत नव्हती तोपर्यंत राजकीय दृष्टीने उदासीन राहणे हा इथल्या जनतेचा स्थायीभाव होता. हे इस्लामच्या धर्माधारित राष्ट्राच्या संकल्पनेच्या विरोधात होते. त्यामुळे मुस्लिम राज्यकर्त्यांनाही इथे टिकून राहण्यासाठी तडजोडी कराव्याच लागल्या. इतर प्रदेशांप्रमाणे अनिर्बंध सत्ता त्यांना मिळवता आली नाही.
थोडक्यात म्हणजे हिंदूंचा पराभव हा
जातीयवाद आणि मुर्तीपुजेच्या नावाखाली बोकाळलेली कर्मकांडे
मध्यवर्ती सत्तेचा अभाव
बहुसंख्य जनतेला धार्मिक आर्थिक आणि राजकीय सत्तेपासून वंचित ठेवणे
या कारणांनी घडवून आणला आहे.
A house divided against itself cannot stand - Abraham Lincoln

अत्रुप्त आत्मा's picture

25 Aug 2013 - 7:54 pm | अत्रुप्त आत्मा

अत्यंत परिपूर्ण प्रतिसाद...!
सर्व काही आले. :)

अवतारजी, प्रतिसाद आवडला..

आधुनिक राष्ट्राच्या संकल्पनेत मध्यवर्ती केंद्रीय सत्ता हा प्रमुख आधार असतो. काही प्रमाणात सम्राट अशोक याचा अपवाद सोडला तर अशी सत्ता निर्माण करण्याचा प्रयत्न मोगल आणि नंतर शिवाजी महाराज यांच्याशिवाय कोणी केलेला दिसत नाही.

+१११

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Sep 2013 - 4:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद आवडला.

-दिलीप बिरुटे

arunjoshi123's picture

25 Aug 2013 - 6:19 pm | arunjoshi123

मोहम्म्द पैगंबरांच्या मृत्यूपूर्वी भारतात केरळमधे इस्लाम राज्धर्म म्हणून युद्ध न करता स्वीकारला गेला.

मुक्त विहारि's picture

25 Aug 2013 - 7:53 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

यात नवीन काय आहे? केरळातला राजा तिकडे गेला. त्याने पैगंबरांच्या मुलीशी विवाह केला. येताना तो वाटेत मेला. पण त्याची बायको भारतात आली आणि तिने त्या नवर्‍याच्या राज्यात म्हंजे केरळात मशीद उभारली ती मशीद जगातील दुसरी मशीद मानली जाते.

आता, ही दुसरी मशीद, मग पहिली कोणती?

तर जगातील पहिली मशीद म्हणजे खुद्द पैगंबरांचे घर!

म्हणजे एका अर्थाने, भारतातील ती केरळातील जामा मशीद ही जगातील पहिलीच मशीद मानता येते.

अनिरुद्ध प's picture

26 Aug 2013 - 4:21 pm | अनिरुद्ध प

माहिती,मग त्यातुन एक सिद्ध झाले की ईस्लाम मध्ये सुद्धा स्त्रियाना सुद्धा पुरुषा ईतकेच स्थान आहे किवा होते,मग प्रार्थनाग्रुहात (मशजीद) प्रार्थना करण्याचा हक्क मात्र फक्त पुरुषाना हे नन्तर झाले असावेका?

रामपुरी's picture

11 Sep 2013 - 11:04 pm | रामपुरी

"पैगंबरांचे" असे अनेकवचन/आदरार्थी मुद्दाम केले आहे की चुकून झाले? देवांच्या नावाचे अनेकवचन बघण्यात येत नाही. उदा. रामाचे धनुष्य. रामांचे धनुष्य कोणी म्हणत नाही. इत्यादी

आशु जोग's picture

12 Sep 2013 - 12:34 am | आशु जोग

भावना दुखवू नयेत असा हेतू असावा...

गब्रिएल's picture

25 Aug 2013 - 9:14 pm | गब्रिएल

जो केरली राजा अरबस्तानात मोहम्म्द पैगंबरान्ला भेटायला गेला तो परत्ताना अचानक वाटेतच मेला, कसा कोन जाने. त्यचे थदगे येमेनमदे आहे. त्याला तिते घेउन जाणार्या मुस्लमान धर्मच्या व्यापार्यानि परत येउन राजाच्या रिलेर्टिवाना साम्गितले की राजाने मुस्ल्मान धर्म घेत्ला होता. अशे ते राजघराने मुसलमान जाले.

आशु जोग's picture

25 Aug 2013 - 11:02 pm | आशु जोग

नावे वेगळी असली तरी शेवटी सर्व मार्ग एकाच ईश्वराकडे जातात. इस्लाम काय ख्रिश्चन काय ?
सर्वच धर्म दया क्षमा शांतीचा संदेश देतात. सगळ्याच धर्मांची शिकवण मानवता हीच आहे. ईस्लामचा अर्थ शांतता असा आहे. असे असताना कोण जिंकले कोण हरले हा प्रश्न का पडावा ?

शिल्पा ब's picture

26 Aug 2013 - 12:51 am | शिल्पा ब

अय्या! तुम्ही एवढे निरागस कधीपासून झालात?

अनिरुद्ध प's picture

26 Aug 2013 - 12:20 pm | अनिरुद्ध प

निर्विकार असे अभिप्रेत आहे का?

ऋषिकेश's picture

26 Aug 2013 - 3:17 pm | ऋषिकेश

कै च्या कै लेखन!
भारतातील मुसलमानांचे हिंदुकरण ही इतर परकीयांपेक्षा अधिककाळ चालु आहे इतकेच फारतर म्हणता यावे. (मला हिंदु हा धर्म नाही जीवनपद्धती आहे हे श्री.वाजपेयी यांचे मत चिंत्य (आणि बर्‍यापैकी मान्य) आहे)

भारतातील मुसलमानांचे हिंदुकरण ही इतर परकीयांपेक्षा अधिककाळ चालु आहे इतकेच फारतर म्हणता यावे. (मला हिंदु हा धर्म नाही जीवनपद्धती आहे हे श्री.वाजपेयी यांचे मत चिंत्य (आणि बर्‍यापैकी मान्य) आहे) >>>

ऋ , तु काय करतोयस इथे ? इतिहासाच्या धाग्यात ? इतिहास पेटवितो माहीत आहे ना !! ;)

असो ...या निमीत्ताने शरद पुन्हा बोर्डावर दिसले यातच समाधान !! विषय नेहमीच डोक्यात जातो ...हा नव्हे हो ..इतिहास हा ...त्यामुळे नो कमेंटंस

कोण जिंकले किंवा कोण हारले या वादात न पडणारा.

अग्निकोल्हा's picture

27 Aug 2013 - 5:05 pm | अग्निकोल्हा

पण हे वाक्य अनेकदा ऐकत असतो कि हिंदु हा धर्म नाही जीवनपद्धती आहे. म्हणजे नक्कि काय आहे ? हिंदुत्व जर जिवनपध्दति आहे तर ती "धर्म" म्हणून जे काहि असते (स्व अथवा पर) त्याचे अस्तित्व नाकारते काय ?

अनिरुद्ध प's picture

26 Aug 2013 - 3:42 pm | अनिरुद्ध प

उध्रुत करुन सान्गाल का? तेव्हडेच आमच्या सारख्या अल्पमती माणसाला कळले तर बरे होइल.

साती's picture

26 Aug 2013 - 9:42 pm | साती

ते दुसर्‍याच परिच्छेदातील पहिले वाक्य इ स २००० ते इस ६०० बदलून इसपूर्व २००० ते इसपूर्व ६०० करा बघू.

मनो's picture

27 Aug 2013 - 9:58 am | मनो

शीर्षकातच अभ्यास असल्यामुळे एक अभ्यासू उत्तर देण्याचा हा प्रयत्न. हिंदू अथवा मुस्लिम ही शेवटी दोन एकसारखीच माणसे, बदलते ती परिस्थिती असं मानून हे लिहितो आहे.

(अवांतर: या विषयावर एक सुंदर पुस्तक आहे. मिळाले तर जरूर वाचा. Guns, Germs, and Steel by Jared Diamond.)

भारताच्या आक्रमकांविषयी बोलायचं झालं तर लढाईतल्या विजयाचे मुख्य कारण म्हणजे नवे डावपेच आणि नवीन हत्यारांचा वापर.

नकाशाकडे नजर टाकली तर दिसतं की अगदी तुर्कस्तान पासून भारतापर्यंत पसरला आहे तो प्रदेश बहुतेक रुक्ष. या प्रदेशात पाणी एकंदरीने कमी त्यामुळे शेतीचे प्रमाण कमी. भटक्या टोळ्या जास्ती, अन्न पिकवण्यापेक्षा हिसकावून घेणे जास्त फायदेशीर. म्हणून आपापसात भांडणे फार. लढाई आणि नवीन हत्यारांचा वापर या परिस्थितीत जास्त. बाबरनामा या बाबराच्या आत्मचरित्रात याची भरपूर उदाहरणे सापडतात. याउलट परिस्थिती होती भारतात. गंगेयमुनेच्या दुआबात सुपीक जमीन भरपूर आणि नगरे समृद्ध.

दोन उदाहरणे पाहूया.

अल्लाउद्दिन खिलजी. त्याने देवगिरी विरुद्ध काय डावपेच वापरले?

पाहिलं म्हणजे गती आणि गुप्तता. त्याला अत्यंत वेगाने दिल्लीपासून देवगिरीपर्यंत येणे शक्य झाले कारण त्याच्याकडे असलेले अरबी घोडे. हत्ती अथवा पायी हे अंतर इतक्या कमी वेळात जाणे शक्य नव्हते. (बाजीरावाने काही शतकांनंतर उलट दिल्लीवर अशीच चपळ धडक मारून दाखवली ती पुन्हा घोडदळाच्या भरवशावरच) यामुळे त्याला अचानक रामदेवराव यादवाची बचावाची सिद्धता नसताना देवगिरी गाठता आली. आणि त्याच्या सामर्थ्याविषयी अफवांनी त्याला मदतच झाली.

दुसरं म्हणजे त्याने उगाच देवगिरी किल्ल्यावर हल्ला चढवून आपले घोडेस्वार वाया घालवले नाहीत. त्यापेक्षा त्याने धान्य पाणी रोखून धरले. त्याला चपळ घोड्यांची या कमी मदतच झाली.

रामदेवराय यादव अथवा त्याचे सरदार वैयक्तिक शौर्यात कमी पडले नाहीत, त्यांची चूक झाली ती गाफील राहण्यात, शत्रूवर नजर न ठेवण्यात. आणि भांडणे फक्त हिंदूमधेच नव्हती, मुघल पक्षात तुर्की, इराणी, अफगाण, दख्खनी असे अनेक पक्ष होते आणि वेळप्रसंगी ते दुसर्याचा जीवही घेण्यास कमी करीत नसत अशी कित्येक उदाहरणे इतिहासात आहेत.

दुसरं उदाहरण बाबराचं. त्याने इब्राहिमखान लोदीवर जो विजय मिळवला तो तोफखाना आणि बंदुकांच्या जोरावर. इब्राहिमखानाकडे कित्येक पट सैन्य होते, अनेक हत्ती होते, पण तोफांपुढे त्यांचे काहीही चालले नाही. बाबराने तोफा मिळवल्या त्या मध्यपूर्वेत. मंगोल साम्राज्यात तोफांची दारू चीनमधून युरोपपर्यंत पोहोचली. तिथे तिच्यावर अनेक प्रयोग होऊन युरोपियन लोकांनी त्यात प्रभुत्व मिळवले पण ते नंतर. पंधराव्या शतकात बाबाराकडे त्या काळातल्या आधुनिक तोफा आणि दारू होती. अगदी शिवकालातही तोफांचे गोलंदाज मुस्लिम असत आणि दारुगोळा युरोपियन लोकांकडून विकत घेतला जात असे.

घोडदळाबाबत मात्र वेगळेच चित्र दिसते. मराठ्यांनी घोडे विकत घेऊन आणि स्वतः त्यांची पैदास करून कित्येक हजारांचे सैन्य बनवले. बऱ्हाणपूरपासून गुजरातेपर्यंत आणि विजापूरच्या वेशीपासून माळव्यापर्यंत औरंगझेब बादशाह जिवंत असताना मराठी घोड्यांनी दौड मारली होती. तेंव्हा कोणताही फायदा अथवा डावपेच हा एका पक्षाकडे कायम राहू शकत नाही, परिस्थितीनुसार दोन्ही पक्ष त्याचा वापर करून यशस्वी होऊ शकतात.

अगदी सुंदर उत्तर. म्हणूनच भारताच्या इतिहासातील खरी सोनेरी पाने दोनच .. मोघलकाळ आणि इंग्रजकाळ .. उरलेला नुस्ताच पोकळ यज्ञ-जाळ .. असे मला वाटू लागलेले आहे.

--- सोनेरी उद्दाम

गुप्तकाळ आणि मौर्यकाळ व अन्य काळाबद्दल काही माहिती आहे की तिथेही पोकळ शब्दजञ्जाळ आहे फक्त?

श्रीगुरुजी's picture

27 Aug 2013 - 12:41 pm | श्रीगुरुजी

>>> पण इस्लाममधील काही महत्वाच्या गोष्टी प्रथम नोंदवू. (१) कोणताही मुसलमान दुसर्‍या कोणत्याही मुसलमानाचा भाऊ असतो

ज्या देशात मुस्लिम अल्पसंख्य असतात व इतर धर्माचे नागरिक जास्त असतात, त्या देशात मुस्लिम एकमेकांचे भाऊ असतात व मुस्लिमांमधील सर्व पंथ एकत्र येऊन आपल्यावर अन्याय होत आहे असा कांगावा करून वेगळा देश मागण्याच्या मागे लागतात व त्यासाठी थेट युद्ध सुरू करतात. (उदा. भारतातले काश्मिर, रशियातील चेचन्या, पूर्वीच्या युगोस्लावियातील बोस्निया, फिलिपाईन्स, चीन मधील उग्यार प्रांत इ. अमेरिकेत सुद्धा टेक्सस हे मुस्लिम राज्य म्हणून जाहीर करावे यासाठी काही वर्षांपूर्वी लुईस फराक्खान नावाच्या बाटग्याने लाँग मार्च काढला होता). या सर्व देशात इतर धर्मियांचे प्राबल्य असल्याने तिथे फुटिरतेची चळवळ सुरू आहे.

ज्या देशात मुस्लिम बहुसंख्य असतात तिथे ते आपापसात लढतात. सुन्नी विरूद्ध शिया (पाकिस्तान, इराक, इराण इ.), सुन्नी विरुद्ध अहमदी (पाकिस्तान), सुन्नी विरूद्ध बहाई (सौदी अरेबिया, पाकिस्तान), सुन्नी विरूद्ध हाजिरा (अफगाणिस्तान) इ. याची उदाहरणे आहेत. या सर्व देशात मुस्लिम बहुसंख्य आहेत. मुस्लिमात सुन्नी बहुसंख्य असल्याने इतर पंथांविरूद्ध ते लढत असतात.

एकंदरीत मुस्लिमांना सशस्त्र झगडा आवडतो. मग तो स्वधर्मियांविरूद्ध असेल किंवा इतरधर्मियांविरूद्ध.

आशु जोग's picture

27 Aug 2013 - 3:39 pm | आशु जोग

या लोकांचे वर्तन लोकसंख्येच्या प्रमाणात कसे बदलते ते कुणाकडे असेल तर इथे सादर करा ना !

श्रीगुरुजी's picture

27 Aug 2013 - 10:18 pm | श्रीगुरुजी

>>> या लोकांचे वर्तन लोकसंख्येच्या प्रमाणात कसे बदलते ते कुणाकडे असेल तर इथे सादर करा ना !

साधे उदाहरण म्हणजे पाकिस्तान. १९४७ साली पाकिस्तानात २२ टक्के हिंदू होते. ख्रिश्चन व शीखही ही बर्‍यापैकी होते. मुस्लिम ७० टक्क्यांच्या आसपास होते. त्यामुळे त्यांचे पहिले लक्ष गैरमुस्लिम होते. २०१३ पर्यंत हिंदूंचे प्रमाण २ टक्क्यांहून कमी झाले आहे. एकूण मुस्लिमांचे प्रमाण ९५ टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे गैरमुस्लिमांविरूद्धचा लढा यशस्वीरित्या संपत आलेला आहे. १९८० च्या दशकात प्रथम अहमदींना मुस्लिम धर्मातून बहिष्कृत करून अमुस्लिम ठरविले गेले आणि आता गेल्या काही वर्षांपासून सुन्नी मुस्लिम शियांना संपविण्याच्या मागे लागले आहेत. शियांच्या मशिदीबाहेर आत्मघातकी बॉम्बहल्ले करणे, शियांच्या मिरवणुकीवर हल्ले चढविणे इ. सुरू आहे. म्हणजे प्रथम हिंदूंना संपविले, नंतर अहमदींना आणि आता शियांच्या ते मागे आहेत. म्हणजे प्रथम गैरमुस्लिम, नंतर मुस्लिमातला अल्पसंख्य गट आणि आता मुस्लिमातला प्रतिस्पर्धी पंथ असा क्रम आहे. उद्या शिया पाकिस्तानमध्ये शिल्लक राहिले नाहीत तर उरलेले सुन्नी मुस्लिम आपापसात लढतील.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Aug 2013 - 10:27 pm | अत्रुप्त आत्मा

+१ टू श्रीगुरुजी...!

या परस्पर झगड्याची सोय एका हदिसमधे (हदिस-प्रेषित मुहंमद पैगंबर यांच्या उक्ती) आलेली आहे! हदिस'ना कुराणाच्या खालोखाल मान्यता असते. जेंव्हा प्रेषित निर्वतले..पैगंबरवासी झाले,त्यानंतर लगेच उत्तराधिकारी नेमण्याविषयी वाद सुरु झाले. सकिफा नावाच्या स्थळी हा वादविवाद सुरु झाला. मदिनेच्या लोकांना पुढचा उत्तराधिकारी आपल्या कुळगटापैकी हवा होता. हे कानी पडताच . अबू बेकर व उमर तेथे गेले.आणी उताराधिकारीत्व/खिलाफत/खलिफापद हे कुरैशांच्या (प्रेषितांच्या वंशापैकी व्यक्तिचेच) असेल असे मदिनेच्या लोकांना युक्तिवादाने पटवू लागले. यावेळी त्यांनी प्रेषितांच्या दोन हदिसचा आधार घेतला..
त्या अश्या-

१)प्रेषित म्हणाले-"सर्व लोक हे कुरैशांचे अज्ञाधारक आहेत." (हदिस क्रमांक-२५-१००९.१०)

२)प्रेषित म्हणाले-"खिलाफत(राज्यसत्ता) ही नेहमीच कुरैशांच्या ताब्यात राहिल,जरी त्यांची दोन माणसेही(पॄथ्वीवर) जिवंत राहिली तरी.(ती त्यांच्याकडेच राहिल)" (हदिस क्रमांक-७१३९,४०)

नंतर मदिनेच्या मुस्लिमांमधे इस्लाममधे येण्यापूर्वी ज्या तिन टोळ्या होत्या,त्यातल्या वैरभावनेचा मुत्सद्दीपणानी वापर केला,आणी अबू बेकर यांच्याशी सर्वांना एकनिष्ठतेची(खलिफापद मान्य करण्याची) शपथ घेण्यास भाग पाडले. इकडे प्रेषितांचे जावई अली हे (बिचारे) त्यांच्या अंत्यविधीची तयारी करण्यात गुंतून(थांबून) राहिले. त्यांना आपण स्वतः खलिफा होऊ,व लोक त्याला मान्यता देतील असे अधीपासूनच वाटत होते.पण वरिल प्रकार समजल्यावर ते अत्यंत नाराज झाले.अलींना मान्यता देणारा/मानणारा पंथ (हाच पुढिल शिया पंथ गणला गेला),जो आजही खिलाफत साठी अलिच योग्य होते,हे दाखवण्यासाठी असेच आधार/पुरावे काढून दाखवत असतो. हा कुरेशांअतर्गत असलेल्या दोन प्रमुख टोळ्या हाशिमी व उम्मय्यी कुळगटातला वाद होता. शेवटी त्यावेळी हा वाद कसाबसा मिट्वून अलिंनी अबू बेकर प्रती शपथ घेतली,आणी स्वतःची खलिफा होण्याची इच्छा..मुस्ल्लिमांमधे फूट पडू नये,म्हणून पहिल्या तिनही खलिफा निवडीवेळे पर्यंत दाबून ठेवली,तिसरे खलिफा उस्मान यांची हत्या झाल्यावर, अलींना आता आपण खलिफा होणार याची जवळपास खात्रीच वाटत होती...

पण...

तोपर्यंत मुस्लिम साम्राज्याचा जवळजवळ चौपट विस्तार झालेला होता,बळजबरीने म्हणा किंवा युद्धलूट मिळण्याच्या आकर्षणाने म्हणा लाख्खो लोक इस्लाम'मधे आलेले होते. पण त्याच्यात कथित ऐक्याचा पाइक असलेला इस्लाम आलेलाच नव्हता,त्यामुळे अत्ता पाकिस्तानात जी अवस्था आहे,तीच तिथे निर्माण झालेली होती. प्रचंड वाढलेलं राज्य .. तिथे प्रशासनाच्या व नवमुस्लिमांच्या लावण्याच्या सोइ/कर-अकारणी अश्या प्रशासनाच्या अनंत भानगडी निर्माण झाल्या होत्या.त्यामुळे गैरमुस्लिमांविरुद्धचा जिहाद थंडावला होता. म्हणून मग "बाहेर"च्या मारामारीत तात्पुरता हरवलेला अंतर्गत कलह/वैमनस्य प्रचंड उफाळून आला,त्यात वर म्हटल्याप्रमाणे कुफा,बसरा अश्या नव्या प्रांतातल्या मुस्लिम झालेल्या प्रजेला खलिफा आपल्या'तला असावा,असे वाटू लागले...आणी (अव्यहार्य)धर्मवचनांचा जोर ओसरून ज्याची लाठी बळकट त्या'चा राजसत्तेवर अधिकार पहिला.. हा त्यांच्या जुन्या टोळीयुगाचा नियम वर्चस्व गाजवू लागला... शेवटी अली(हाशिमी-कुळगट) आणी मुविया(उम्मय्यी-कुळगट) यांच्यात आमने/सामने युद्ध सुरु झालं. दोघेहीजण आपण इस्लाम'नुसार बरोबर आहोत.राज्यपदासाठी योग्य आहोत,असे दावे धर्माच्या आधारे काढून दाखवू लागले. आम-मुस्लिम जनता भांबावली,आणी मग ती'ही ज्याचं सैन्य आपल्या प्रदेशात घाबरवायला/शपथ घेववायला येइल..त्याच्याशी शपथ घेऊ लागली..आज अली तर उद्या मुविया असा अक्षरशः कपडे बदलल्या सारखा खेळ सुरु झाला. (इस्लामी इतिहास/वर्तमानातल्या..या परिस्थितिवर नरहर कुरुंदकरांनी मुस्लिमांना असे आवाहन केले होते, की- "कुणीतरी एक चुकला होता(इस्लामनुसार..अयोग्य होता..) असे तुंम्ही मान्य करायला हवे!" ) शेवटी दोघांमध्ये लढाया डावपेच इतके विकोपाला गेले/कंताळवाणे झाले की त्यांना हजारो मुस्लिमांचा बळी देऊन खिलाफत दोन विभागात वाटण्याची इस्लाम बाह्य तड-जोड स्विकारावी लागली! इस्लामी राज्य दोन ठिकाणी विभागले गेले. पुढे विशुद्ध इस्लामचा पुरस्कार करणार्‍या एका कड्व्या धर्मनिष्ठ गटाच्या (खारिजिंच्या) या दोघांन्नाही अधीपासून असलेल्या विरोधाच्या पडसादामुळे मुविया जखमी होऊन वाचला..आणी अली मारले गेले! नंतर धूर्त..मुत्सद्दी अश्या मुवियानी सगळी खिलाफत बळकावली.. या सर्व घटनांकडे पाहिल्यावर मला एकच वाटते.. एखादी व्यवस्था धर्मातून/धर्माबाहेरून कशिही कुठूनही आलेली असो,त्या व्यवस्थेतच जर बेइमानी असेल,तर त्यातल्या बेइमानांचेच नेहमी फावणार! इस्लाममधे तेच झाले आहे... आणी कदाचित यापुढेही होत राहिल...

जाता जाता-- बाकी ह्या खारिजिंविषयी थोडे सांगायला हवे... खारिजी हा इस्लाममधील विशुद्ध इस्लामचा प्राणपणानी पुरस्कार करणारा/आचरणारा, असा सर्वसामान्य मुस्लिमांमधला एक गट होता.. ते "सर्व मुस्लिम हे परस्परांचे बंधू आहेत" या कुराणातल्या वचनाचा आधार घेऊन असे प्रतिपादत असत ,की खलिफा हा त्यापदाला योग्य गुणधर्म असलेला असा अख्या मुस्लिम समुदायातला कुणीही होऊ शकतो!
हा इस्लाममधला खास तत्वनिष्ठांचा(आणी त्यामुळेच व्यवहारात कायम अपयशी राहिलेला) गट..! त्यांना बिचार्‍यांना हे समजणेच शक्य नव्हते की धर्मात वाइटाबरोबर जे काही थोडंफार चांगलं आलेलं असतं त्याला कधिही पाळायचं नसतं..तर वाइटाच्या रक्षणासाठी त्या कथित चांगल्याचे फलक हाती घेऊन त्याचा वापर जाहिरात करण्यासाठी करायचा असतो! यांच्याबाबत एक कथा सांगितली जाते... धर्मवचनांचा काटेकोरपणे.. टोकाला जाऊन अर्थ काढून त्याची तितकीच काटेकोर अंमलबजावणी (अर्थातच पहिली स्वतःवर..) करणार्‍यांपैकी हे लोक होते.. "एका खारिजीला कळले,की त्यानी जो झाडाखाली पडलेला खजूर खाल्ला,तो दुसर्‍याच्या बागेतला होता.झाले... लगेच त्याने "चोरी करणार्‍याचे हात तोडावे" या इस्लामी न्यायशास्त्राच्या आधारे स्वतःचा खजूर उचललेला हात कापला...! खरेखोटे कसेही असो..! पण हे खारिजी होते मात्र अव्वल! त्यांना स्वतःच्या (इहलौकिक) जीवनाबद्दल काहिही आस्था नसायची,आपले सर्व जीवन हे कुराणानी सांगितल्या प्रमाणे इहलोकावर अल्लाचे राज्य आणण्यासाठी ते खर्चून टाकीत असत! लढायांमधे सुद्धा

स्वर्ग...स्वर्ग

...अल-जन्नत..अल जन्नत.. अश्या घोषणा देत प्राणपणानी लढणारी ही लोकं! यांचे देह हे खरच धर्माचं साधन होते! त्यामुळे असं वाटतं... की...

ज्या धर्मांसाठी लढायचं,ते धर्म "कसे" आहेत? हे पाहायची विवेकबुद्धी यांच्याजवळ असती तर...?

यावर मला पुन्हा एकदा कुरुंदकरांच्या लेखनातील काही वाक्य अठवतात...

"चांगली माणसं आणी वाइट व्यवस्था"

"वाईट माणसं आणी चांगली व्यवस्था"

यापैकी आपण कश्याची निवड करणार ??????

आशु जोग's picture

29 Aug 2013 - 12:20 am | आशु जोग

अत्रुप्त आत्मा, गुरुजी
माहितीपूर्ण प्रतिसाद. थोडे थोडे वाचत आहे.

श्रीगुरुजी's picture

29 Aug 2013 - 3:02 pm | श्रीगुरुजी

+१११.

एकंदरीत मुस्लिमांचा सर्व इतिहास व वर्तमान हा युद्ध, लढाया इ. शीच जोडलेला आहे.

अनिरुद्ध प's picture

29 Aug 2013 - 4:16 pm | अनिरुद्ध प

छान अभ्यासपुर्ण लेख/माहीती.

अवतार's picture

29 Aug 2013 - 9:56 pm | अवतार

जे सत्याचे प्रतिपादन दुराग्रहाने करतात त्यांची श्रद्धा सत्यावर नसते. ती स्वत:च्या अहंकारावर असते.

- व.पु.

मालोजीराव's picture

6 Sep 2013 - 3:25 pm | मालोजीराव

अप्रतिम,माहितीपूर्ण प्रतिसाद

इरसाल's picture

12 Sep 2013 - 2:21 pm | इरसाल

प्रतिसाद वल्ली.

प्रचेतस's picture

12 Sep 2013 - 2:47 pm | प्रचेतस

अहो मी नाय, अ आ बुवांनी लिहिलाय तो प्रतिसाद. :)

सुनील's picture

28 Aug 2013 - 9:29 am | सुनील

काथ्याकूट टाकून पुन्हा तिथे न फिरकणे असा शरदरावांचा पूर्वेतिहास नाही. तेव्हा, बहुधा कार्यबाहुल्यामुळे त्यांना फुरसद मिळाली नसावी, असे मानण्यास वाव आहे.

त्यांना वेळ मिळावा आणि आतापावेतो झालेल्या चर्चेवर त्यांनी त्यांचे मत मांडावे, असे वाटते.

आशु जोग's picture

28 Aug 2013 - 12:30 pm | आशु जोग

घड्याळपक्षात भांडणे सुरू आहेत. त्यामुळे शरदराव बिझी आहेत.

शरद's picture

28 Aug 2013 - 3:34 pm | शरद

माझा लेख लिहण्याचा उद्देश मी पहिल्या परिच्छेदात स्वच्छ केलेला होता. इस्लामच्या आधीच्या भारतावरील आक्रमकांना भारतीय समाजात सामावून घेण्यात भारत यशस्वी झाला तसा तो यावेळी झाला नाही. असे का घडले हे पाहतांना येथील सामाजिक-धार्मिक धारणांचा भाग मोठा होता असे मला वाटले हे नमुद करावयाचा प्रयत्न होता. ते शेवटच्या दोन परिच्छेदात सांगितले. माझ्या नेहमीच्या लेखात मी शक्यतो मित्रांशी गप्पा मारतो त्या प्रकारचे लिहावयाचा प्रयत्न करतो. इथे तसे नाही म्हणून मुद्दाम एक अभ्यास असेही लिहले. पण बर्‍याच प्रतिसादांवरून असे दिसते की मी थोडा कमी पडलो आहे. आता जरा प्रतिसादांतील मुद्द्यांवरूनच जरा जास्त लिहत आहे.

महंमदाच्या मृत्यूनंतर काही दशकांतच इस्लामचा प्रसार मध्य आशियात व पश्चिमेकडे पार द. स्पेन, फ्रान्सपर्यंत झाला. पण तेथील परिस्थिती निराळी होती व त्याचा या लेखाशी काहीही संबंध नाही.

आज भारतात किती मुस्लिम आहेत याचा तर विषयाशी दूरान्वयेही संबंध नाही. आज अफगाणिस्थान ( हा त्यावेळी भारतातच गणला जावयाचा) ते बंगालपर्यंत सर्व मुसलमान मोजले तर व आज हिंदू किती हेही तपासले तर कदाचित या बाजूनेही मुस्लिमांचा विजय झाला असेच म्हणावे लागेल. आज आपण मुस्लिम-ख्रिश्चन-शिख-बौद्ध-जैन यांना सोडून सगळ्यांना "हिंदू" समजतो ते जरा ओढूनताणूनच आहे ( हा झाला एका निराळ्या लेखाचा विषय). इ.स.१३०० पासून ७०० वर्षात या धर्माने ४५०० वर्षे जुन्या असलेल्या "धर्मावर" केलेला हल्ला तपासून पहा. डोळ्यावर कातडे ओढून इतिहास बदलत नाही. पण हेही लेखाशी असंबंधित.या संबंधात आणखी एक अवांतर मुद्दा. आज एखाद्या देशात कोणत्या धर्माचे किती लोक आहेत यावरून आक्रमणे झाली का व ती यशस्वी झाली का असे वाद काढण्यात अर्थ नाही. चीन, जपान येथे बौद्ध धर्म आहे म्हणजे भारतातून जाऊन आपण आक्रमणे केली असे कोणी म्हणते का ?

मुस्लिम, सर्व मुस्लिम, एकमेकांना "बंधू" समजतात हे त्यांच्या धर्माने सांगितले आहे. मुस्लिम एकमेकांशी भांडतात कां? हो, भांडतात की, युद्धेही करतात. पण त्याने काय सिद्ध झाले ? जगात सर्वत्र, धर्म कोणताही असला तरी भाउ-भाउ भांडतात. आपल्याकडेही सर्व जीवांत एकच परमेश्वर आहे असे म्हणून आपापसात भांडतोच की. आज आपणही हिंदू धर्माची ओळख करून देतांना धर्मतत्व सांगतो, भांडणे नाही. अरेबिअन नाईटस मध्ये असे दिसते की रस्त्यावरचा गरीब माणुसही खलिफाला अरेतुरे म्हणत होता ! म्हणजे त्या वेळी "भाईचारा" होता.

धर्मांतरे बळजबरीने झाली कां ? मोठ्या प्रमाणत झाली. मान्य. पण सुरवातीच्या काळांत जातीच्या जाती धर्मांतरित झाल्या, उदा."जुलाहा", ज्यात कबीर वाढला, त्या बळजबरीने झाल्या म्हणणे चुकीचे ठरेल. विसाव्या शतकातील बौद्धांचे उदाहरण ध्यानात घ्या.

हिंदू त्याकाळीही "सेक्युलर" होते हे कारण. मान्य. निराळ्या शब्दांत तेच नमुद केले आहे.

जिंकण्याचे एक कारण युद्ध नीती, घोडदळ वगैरे. तेही आहेच. पण जर फितुर, म्हणजे येथील असंतुष्ट, नसते तर वा मुलतानमधील सूर्यमंदिर, घातक उदारपणा इ. घटक नसते तर हा मुद्दाही प्रमुख ठरला नसता. आपण आक्रमकांवर अनेक विजय मिळवले आहेत. पण अंतिम विजय त्यांचाच झाला असता.

मुस्लिम आक्रमणे का झाली, धर्मप्रसाराकरिता का संपत्ती लुटण्याकरिता, हा मुद्दाही इथे अवांतर ठरतो.

आता इ.स.पूर्व २००० ते इ.स. ६०० का ? इ.स.पूर्व २००० पासूनच्या आक्रमणाच्या नोंदी मिळतात व इ.स.सातव्या शतकापासून इस्लाम आक्रमणाला सुरवात झाली म्हणून. इ.स.पूर्व ६०० कोठून आले ? (त्या काळात बुद्ध-जैन धर्माचा उगम झाला म्हणून तर सुचले नाही ना ?)

शरद

माझा लेख लिहण्याचा उद्देश मी पहिल्या परिच्छेदात स्वच्छ केलेला होता. इस्लामच्या आधीच्या भारतावरील आक्रमकांना भारतीय समाजात सामावून घेण्यात भारत यशस्वी झाला तसा तो यावेळी झाला नाही. असे का घडले हे पाहतांना येथील सामाजिक-धार्मिक धारणांचा भाग मोठा होता असे मला वाटले हे नमुद करावयाचा प्रयत्न होता. ते शेवटच्या दोन परिच्छेदात सांगितले. माझ्या नेहमीच्या लेखात मी शक्यतो मित्रांशी गप्पा मारतो त्या प्रकारचे लिहावयाचा प्रयत्न करतो. इथे तसे नाही म्हणून मुद्दाम एक अभ्यास असेही लिहले. पण बर्‍याच प्रतिसादांवरून असे दिसते की मी थोडा कमी पडलो आहे. आता जरा प्रतिसादांतील मुद्द्यांवरूनच जरा जास्त लिहत आहे.

महंमदाच्या मृत्यूनंतर काही दशकांतच इस्लामचा प्रसार मध्य आशियात व पश्चिमेकडे पार द. स्पेन, फ्रान्सपर्यंत झाला. पण तेथील परिस्थिती निराळी होती व त्याचा या लेखाशी काहीही संबंध नाही.

आज भारतात किती मुस्लिम आहेत याचा तर विषयाशी दूरान्वयेही संबंध नाही. आज अफगाणिस्थान ( हा त्यावेळी भारतातच गणला जावयाचा) ते बंगालपर्यंत सर्व मुसलमान मोजले तर व आज हिंदू किती हेही तपासले तर कदाचित या बाजूनेही मुस्लिमांचा विजय झाला असेच म्हणावे लागेल. आज आपण मुस्लिम-ख्रिश्चन-शिख-बौद्ध-जैन यांना सोडून सगळ्यांना "हिंदू" समजतो ते जरा ओढूनताणूनच आहे ( हा झाला एका निराळ्या लेखाचा विषय). इ.स.१३०० पासून ७०० वर्षात या धर्माने ४५०० वर्षे जुन्या असलेल्या "धर्मावर" केलेला हल्ला तपासून पहा. डोळ्यावर कातडे ओढून इतिहास बदलत नाही. पण हेही लेखाशी असंबंधित.या संबंधात आणखी एक अवांतर मुद्दा. आज एखाद्या देशात कोणत्या धर्माचे किती लोक आहेत यावरून आक्रमणे झाली का व ती यशस्वी झाली का असे वाद काढण्यात अर्थ नाही. चीन, जपान येथे बौद्ध धर्म आहे म्हणजे भारतातून जाऊन आपण आक्रमणे केली असे कोणी म्हणते का ?

मुस्लिम, सर्व मुस्लिम, एकमेकांना "बंधू" समजतात हे त्यांच्या धर्माने सांगितले आहे. मुस्लिम एकमेकांशी भांडतात कां? हो, भांडतात की, युद्धेही करतात. पण त्याने काय सिद्ध झाले ? जगात सर्वत्र, धर्म कोणताही असला तरी भाउ-भाउ भांडतात. आपल्याकडेही सर्व जीवांत एकच परमेश्वर आहे असे म्हणून आपापसात भांडतोच की. आज आपणही हिंदू धर्माची ओळख करून देतांना धर्मतत्व सांगतो, भांडणे नाही. अरेबिअन नाईटस मध्ये असे दिसते की रस्त्यावरचा गरीब माणुसही खलिफाला अरेतुरे म्हणत होता ! म्हणजे त्या वेळी "भाईचारा" होता.

धर्मांतरे बळजबरीने झाली कां ? मोठ्या प्रमाणत झाली. मान्य. पण सुरवातीच्या काळांत जातीच्या जाती धर्मांतरित झाल्या, उदा."जुलाहा", ज्यात कबीर वाढला, त्या बळजबरीने झाल्या म्हणणे चुकीचे ठरेल. विसाव्या शतकातील बौद्धांचे उदाहरण ध्यानात घ्या.

हिंदू त्याकाळीही "सेक्युलर" होते हे कारण. मान्य. निराळ्या शब्दांत तेच नमुद केले आहे.

जिंकण्याचे एक कारण युद्ध नीती, घोडदळ वगैरे. तेही आहेच. पण जर फितुर, म्हणजे येथील असंतुष्ट, नसते तर वा मुलतानमधील सूर्यमंदिर, घातक उदारपणा इ. घटक नसते तर हा मुद्दाही प्रमुख ठरला नसता. आपण आक्रमकांवर अनेक विजय मिळवले आहेत. पण अंतिम विजय त्यांचाच झाला असता.

मुस्लिम आक्रमणे का झाली, धर्मप्रसाराकरिता का संपत्ती लुटण्याकरिता, हा मुद्दाही इथे अवांतर ठरतो.

आता इ.स.पूर्व २००० ते इ.स. ६०० का ? इ.स.पूर्व २००० पासूनच्या आक्रमणाच्या नोंदी मिळतात व इ.स.सातव्या शतकापासून इस्लाम आक्रमणाला सुरवात झाली म्हणून. इ.स.पूर्व ६०० कोठून आले ? (त्या काळात बुद्ध-जैन धर्माचा उगम झाला म्हणून तर सुचले नाही ना ?)

शरद

आशु जोग's picture

28 Aug 2013 - 8:10 pm | आशु जोग

शरद यांच्या लिखाणातील सर्वात कौतुकास्पद गोष्ट म्हणजे त्यांनी हिंदू हारले आणि मुस्लिम जिंकले ही वस्तुस्थिती मान्य केली आहे आणि आपल्यासमोर ठेवली आहे. प्रश्न समजून घेतला नाही तर त्यावर उपायही शोधता येणार नाही.

आशु जोग's picture

29 Aug 2013 - 11:10 pm | आशु जोग

एक लिंक मिळाली, इथे देशासाठी काही करण्याची चढाओढ लागलेली दिसते. आजच्या काळात हे दुर्मिळ होत चाललय.

काळा पहाड's picture

30 Aug 2013 - 12:00 am | काळा पहाड

कसली लिंक देताय राव. खाली जाऊन पहा जरा किती विष ओकलय ते. हे लोक विषारीच हे आता तरी मान्य करायला प्रत्यवाय नसावा. यांना कुणी सांगितलं होतं का आर एस एस बरोबर भारतात रहायला! जायचं ना त्या पाकिस्तानात!!

म्हैस's picture

5 Sep 2013 - 4:24 pm | म्हैस

नाही. ह्यात दिलेली मुस्लिमांच्या जिंकण्याची कारणे अजिबात पटली नाहीत.
विचार करणे, दुसर्याबद्दल सहानुभूती असणे , पाप पुण्याची चढ असणे, समजूतदार पणा असणे हे गुण मुसाल्मानांच्यात अजिबात नाहीत. एक मुसलमान दुसर्या मुसलमानाला भाऊ मानतो कि नाही हे माहित नाही. पण जे इस्लाम ला मनात नाहीत त्यांना मारून, झोडून, कापून जबरदस्तीने धर्मांतर करायला लावणे, हिंदुन्सार्ख्याच दुसर्या धर्माच्या स्त्रियांचे जबरदस्तीने मुस्लिम पुरुषांबरोबर निकाह लावून द्यायचे. हिसकावून घेणे, क्रूरतेचा कळस गाठणे, मरा किवा मारा ह्या वृत्तीने ते जिंकले आहेत. हिंदू, पारशी हे मुळातच मवाळ. ते तितका कडवा प्रतिकार करू शकले नाहीत. आणि अनेक मुस्लिम राजांना हरवल्यावर तो राजा शरण आला कि त्याला सोडून देणे हेच हिंदूंना किती वेळा नद्लय.

उद्दाम's picture

6 Sep 2013 - 2:27 pm | उद्दाम

कोणत्या मुस्लिम राजाला कोणत्या हिंदु राजाने सोडले? काही यादी मिळेल का?

अनिरुद्ध प's picture

6 Sep 2013 - 3:16 pm | अनिरुद्ध प

शक्य नाही पण त्या बद्दलचे एक उदाहरण आठवले ते सान्गतो,ही चुक छत्रपति शिवाजीमहाराजान्च्या सेनापतिने केली होती,एका मुस्लीम सरदाराला माफ केले होते,(वेडात मराठे वीर दौडले सात्),असो ही माहिती ऐकिव आहे,चु भु दे घे.

सुबोध खरे's picture

7 Sep 2013 - 7:48 pm | सुबोध खरे

पृथ्वीराज चौहान ने महंमद घोरीला चोवीस वेळा सोडून दिले. पंचविसाव्या वेळेला जेंव्हा महंमद घोरी जिंकला तेंव्हा त्याने पृथ्वीराज चौहानचे शिरकाण केले.

उद्दाम's picture

7 Sep 2013 - 7:56 pm | उद्दाम

पृथ्वीराज आणि घोरी यांच्यात दोनच लढाया झाल्या.

१९९१ - घोरी हरला, त्याला पृथीराजाने जिवंत सोडले.

१९९२ -- घोरीने पुन्हा हल्ला केला त्यात तो जिंकला.

बाकीच्या २२ लढाया कुठल्या?

ते ११९१ आणि ११९२ असे वाचावे.

पैसा's picture

7 Sep 2013 - 7:58 pm | पैसा

ऊप्स! १९९१ १९९२ नै हो. ११९१ ११९२.

पूर्वीच्या काळी राजा व्हायचं, राज्य टिकवायचं म्हणजे हे अटळच असायचं.

नामस्मरणाने मनासारख्या गोष्टी घडत नसतात.घडणाऱ्या गोष्टी मनासारख्या वाटतात.

हो ना? मग मुसलमानाना का शिव्या घालत बसलाय? नामस्मरण करा आणि जे घडले / घडते त्यातच आनंद मानून रहा.

आशु जोग's picture

7 Sep 2013 - 9:51 am | आशु जोग

आता यापुढे काय काळजी घ्यावी म्हणजे सौदी धर्माला रोखता येइल, हिंदू धर्म वाढवता येइल.

अनिरुद्ध प's picture

7 Sep 2013 - 11:37 am | अनिरुद्ध प

तुम्ही कोणाकडुन उत्तराची अपेक्षा करत आहात ?

lakhu risbud's picture

7 Sep 2013 - 1:05 pm | lakhu risbud

धर्माचा उगम,स्थापना ज्या प्रदेशात,भूभागात झाली तेथील परिस्थितीचा,वातावरणाचा त्या त्या धर्माच्या आचार-विचार-नियम या सर्व गोष्टींवर प्रभाव पडलेला दिसतो.

हिंदू धर्म
हिंदू धर्माचा उगम सिंधू नदीच्या अत्यंत सुपीक अशा त्रिभुज प्रदेशात झाला,पाण्याची मुबलक उपलब्धता,समशीतोष्ण हवामान या मुळेच धर्माचरणाचे नीती-नियम या गोष्टींचा विचार करून बनवले गेले.
उदा. रोजच्या रोज स्नानसंध्या झालीच पाहिजे,त्याशिवाय देवदर्शन करता येणार नाही.
शेती आधारित जीवनपद्धती असे,त्यात पशुशक्तीचे महत्व अनन्य साधारण,त्यामुळेच गोमांस भक्षण करणे निषिद्ध झाले.
अशा प्रकारचे नियम बनले अशी अनेक उदाहरणे आहेत.

इस्लाम धर्म
या धर्माचा उगम सध्याच्या सौदी अरेबिया आणि आसपासच्या परिसरात झाला.
वाळवंटातील अत्यंत विषम हवामान,मनुष्य प्राण्यास जगण्यासाठी निसर्गाशी पदोपदी लढा द्यावा लागणार, या गोष्टींचा विचार करूनच त्या धर्माचे नीती-नियम तयार केले गेले.
उदा. वाळवंटात रात्री सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय असते. प्रचंड थंडीत उब मिळविण्यासाठी ते जमिनीवर एखादा माणूस झोपला असेल तर त्याच्या जवळ जाणार, झोपेत त्या माणसाचा धक्का लागला तर प्राण वाचविण्यासाठी दंश आणि त्यातूनच मृत्यू ठरलेला. म्हणूनच इस्लाम मध्ये जमिनीवर झोपणे निषिद्ध आहे.
.
हिम्मतराव बाविस्कारांनी कोकणात काम करताना त्यांचा या बाबतचा अनुभव सांगितला आहे.
त्यांना विंचू दंशांच्या रुग्णांमध्ये मुस्लिम धर्मियांचे प्रमाण अत्यंत कमी आढळले . त्यामागच्या कारणांचा शोध घेतल्यावर त्यांना हे कारण आढळले कि गरिबातला गरीब मुसलमान पण जमिनीपासून उंच असणाऱ्या चौपाई वर झोपतो. म्हणून विंचू दंशाच्या घटना कमी असतात .

गोमांस,बकर्याचे मांस भक्षण करणे.
वाळवंटात अन्नाचे दुर्भिक्ष्य असते. जे मिळेल ते अन्न ग्रहण करणे आवश्यक असे. म्हणूनच धर्माने मांस भक्षण करणे धर्माचरणाशी जोडले. डुक्कराचे मांस निषिद्ध कारण डुक्कर हा प्राणी प्रामुख्याने खरकटे मानवी आरोग्यास अपायकारक अन्न खाणारा. अनुयायांमध्ये रोगराई पसरून संख्या कमी होऊ नये म्हणून डुक्कराचे मांस निषिद्ध.

जुम्मे के जुम्मे नहाना कारण वाळवंटात पाण्याचे दुर्भिक्ष्य,माणसांना पिण्यासाठी पाणी मिळणे दुष्प्राप्य तिथे अंघोळ कुठे करणार ? म्हणून फक्त(साप्ताहिक सामुदायिक प्रार्थनेच्या)मशिदीतील नमाजा आधी स्वच्छ अंघोळ वगैरे करून नमाज पढने हे धर्माचरण ठरवले गेले.

दाढी- महंमद आणि त्यांच्या अनुयायांना धर्म टिकविण्यासाठी आणि नंतर प्रसारार्थ अनेक लढाया खडतर प्रवास करावा लागला. वाळवंटात दिवसा अनेक वेळा सुमारे ५५-६० कि मी वेगाने वारे वाहतात,त्या वाऱ्या मध्ये वाळवंटातील वाळू मिसळली तर घोड्यावर व पायी प्रवास करणाऱ्या माणसाच्या चेहरा ओरबाडून काढू शकते. हे कमी करण्यासाठीच दाढी वाढविणे आणि डोक्यावर काहीतरी आच्छादन असणे हे धर्माचरणाशी जोडले गेले.

खिल्ली उडविण्याचा हेतू नाही, पण मागे एका लेखात वाचले होते कि हिंदू धर्मात रोजच्या रोज आंघोळ करणे आवश्यक असल्यामुळे आणि शाकाहारी आहारामुळे हिंदू तुलनेने सहिष्णू,कट्टर धर्माभिमानी किवा (धर्मासाठी काहीही करणारा) नसतो.

हे आक्रमक भारतात आल्यावर इतर ठिकाणी न मिळणारे स्वच्छ आणि मुबलक पाणी,(त्यामुळे मिळालेली अंघोळ) सुंदर हवामान यामुळे त्यांचा कट्टर पणा कमी झाला. आणि ते याच परिसरात स्थायिक झाले.

हा दाखला अनेक जणांना पटणार नाही पण अनभव घेण्यासाठी दोन दिवस अंघोळ न करून बघा,
आपल्या नकळतच आपण चीडचिडे बनतो.

उद्दाम's picture

7 Sep 2013 - 7:32 pm | उद्दाम

हिंदू धर्मात रोजच्या रोज आंघोळ करणे आवश्यक असल्यामुळे आणि शाकाहारी आहारामुळे हिंदू तुलनेने सहिष्णू,कट्टर धर्माभिमानी किवा (धर्मासाठी काहीही करणारा) नसतो.

:)

हिंदु धर्मातील काही लोकान्ना आंघोळीलाच काय प्यायलाही पाणी मिळत नव्हते. मग त्यांचं काय झालं?

मांस खाणं हे हिंदु धर्मात नाही, असे कुणी सांगितलं? वाल्मिकी रामायणात सीतामैय्या हरणाचे मांस घालून बिर्याणी करत होती, असा उल्लेख आहे.

आमची परमपूज्य कुलदेवी रोज एक बकरे की काहीतरी खाते म्हणे.

:)

lakhu risbud's picture

8 Sep 2013 - 12:18 am | lakhu risbud

विनोदी वाटले तरी हे पण एक महत्वाचे कारण आहे असे मला वाटते.

उद्दाम शेट जरा चष्मा (काढून) का घालून ? नीट बघा कि राव
गोमांस भक्षण निषिद्ध म्हंटले आहे.
आणि हे नियम धर्माचा उगम ज्या ठिकाणी झाला त्या अनुषंगाने आणि त्या कालानुरूप
तयार केले गेले असे मी म्हंटले आहे.
हिंदू धर्माचे काही अनुयायी ज्या भूभागात राहत होते त्या ठिकाणी नैसर्गिक कारणांमुळे पाण्याचे
दुर्भिक्ष्य होऊ शकत नाही का ?
जरा सारासार बुद्धी वापर ना राव,झापडबंद विचार का करता ?

म्हणजे गोमांस खाल्ल्याने आक्रमकता येते असे आपणास सुचवायचे आहे का?

कोणताही मांसाहार खाणारा आक्रमक होत असेल तर तसे हिंदूही कशा ना कशाचे मांस खातच असतात. आता तरीही तुम्ही म्हणताय की हिंदु आक्रमक नसतात.

म्हणजे मग ते गोमांस खात नाहीत म्हणून आक्रमक नसतात, असा तुमच्या एकंदर कीर्तनाचा निष्कर्श निघेल, हे आपल्या लक्षात आलय का?

lakhu risbud's picture

8 Sep 2013 - 2:56 pm | lakhu risbud

उगाच शब्दांचा कीस का पडत बसलाय राव ?
तो शेवरीचा कापूस असतो ना लहानपणी आमाला लई मज यायची उडवायला
शेवरया फोडायच्या आणि कापूस हवेत उडवायचा.
फकस्त बघायला भारी वाटतय पार त्यातून काय बी मिळत न्हायी..
सगळ्या घरादारावर ती बोन्डं पडलेली असायची,दम्याचा तरास होऊ नये म्हून नंतर मोठ्यांचा मार मिळायचा
तुमच बी तसच चाललंय बघा,नुस्त्या प्रतिसादाच्या शेवऱ्या उडवायच्या.
तो एक जुना आय डी व्हता बघा पंगा शेट त्यांची आठवन येउन ऱ्हायली
तुमचं लिकान वाचून. म्हंजी कॅपासिटी हाये,पंर ती असल्या शेवऱ्या उडवण्याच्या कामाला वापरायची.

चिगो's picture

7 Sep 2013 - 11:12 pm | चिगो

इंट्रेस्टिंग..

@उद्दाम . तुम्हाला का मिरच्या झोंबल्या मुसलमानांना शिव्या घातल्या तर? तुमच्यासारखे हिंदू हे १ मुख्य कारण आहे हिंदूंच्या पराभवाचं. इतिहास आणि वर्तमान दोन्ही जाणून घ्या जरा. आज मुसलमान हिंदुस्थानातच किती डोईजड झालेत हे दिसत नाहीये का तुम्हाला? तिकडे बांगलादेश, पाकिस्तान मध्ये हिंदुंवर कर अत्याचार केले जातात हे जरा बघा. गेल्याच वर्षी बांगलादेश मध्ये ४७ हिंदू आणि २२ बौद्ध मंदिरा पाडली गेली . हि बातमी वाचली नवती का तुम्ही? परवाच आणखी १ बातमी वाचली. 'मदरशांचे अनुदान वाढवण्याची. ' यासीन भटकळ ने स्पष्ट सांगितलं , benglore मधल्या मदरशामध्ये त्याचा ब्रेन storming होवून हिंदुन्विरूढ त्याला भडकावण्यात आलं. आणि नामस्मरणाच्या विषयावर काहीही बोलण्याचा तुम्हाला अधिकार काय? ती माझी स्वाक्षरी आहे. तुम्ही मुसलमानांना अनजारात, गोंजारत बसण्यात आनंद माना न.

पिंपातला उंदीर's picture

7 Sep 2013 - 4:18 pm | पिंपातला उंदीर

म्हैस दीदी हिंदू वर या देशात शतकं ना शतक अन्याय झाले आहेत. तुमच्या मध्यम वर्गीय कोशा बाहेर आलात तर कळेल गाव कुसाबाहेर किती हिंदू राहले आणि त्याना पिढ्यान पिढ्या काय काय सोसावे लागले ते

अनिरुद्ध प's picture

7 Sep 2013 - 4:49 pm | अनिरुद्ध प

उद्गिरकर साहेब,
टोला चुकिच्या ठिकाणी हाणलात,जे म्हैस यानी सान्गीतले ते त्यानाच परत काय सान्गताय ?

पिंपातला उंदीर's picture

7 Sep 2013 - 7:25 pm | पिंपातला उंदीर

अनिरुद्ध साहेब ते कसे काय बुवा?

यात मला झोंबण्यासारखे काही नाही.

आणि तुमचा प्रतिसाद आणि ती नामस्मरणाची स्वाक्षरी यात काही गॅप नसल्याने मला तो एकच म्याटर वाटला. :) स्वाक्षरी करताना जरा गॅप / चार डॉट्स वगैरे टाका म्हंजे लोकांचं कन्फुजन न्हाई होणार.

-----

पिंपातला उंदीर's picture

7 Sep 2013 - 7:33 pm | पिंपातला उंदीर

हिंदू धर्मात रोजच्या रोज आंघोळ करणे आवश्यक असल्यामुळे आणि शाकाहारी आहारामुळे हिंदू तुलनेने सहिष्णू,कट्टर धर्माभिमानी किवा (धर्मासाठी काहीही करणारा) नसतो.

लाईच विनोदी बुवा तुम्ही

अग्निकोल्हा's picture

8 Sep 2013 - 12:08 am | अग्निकोल्हा

खिक्क!

अनिरुद्ध प's picture

11 Sep 2013 - 12:52 pm | अनिरुद्ध प

विनोदी असे काय आहे? ते जरा स्पष्ट कराल का? अमोल साहेब.

arunjoshi123's picture

7 Sep 2013 - 9:24 pm | arunjoshi123

मुस्लिम भारतात 'निर्विवादपणे' न जिंकल्याचा एक तोटा तरी स्पष्ट आहे- भारताला खूप खनिज तेल आयात करावे लागते. अन्यथा अल्ला तिथे तेल या समीकरणामुळे भारतासमोर ओढवलेले ट्रेड डिफिसिट्चे प्रकरण उद्भवले नसते.

उद्दाम's picture

8 Sep 2013 - 2:53 pm | उद्दाम

माल्दीवला तेल अगदी कमी दरात मिळते.

ज्या वेळी हि मुस्लिम आक्रमणं झाली त्या वेळी आर्यावर्तात धर्माचा पगडा जबरदस्त होता.
माझ्या office मधल्या २ मुस्लिम सहकार्यान सोबत झालेल्या चर्चेतून आणि काही पुस्तकांतून मिळालेली इस्लाम च्या शिकवणी बद्दल ची माहिती अशी:
१. मनुष्य हा प्राणी जीव साखळी मध्ये सगळ्यात वरचा असल्यामुळे बाकीचे जीव हे त्याच्या सुखासाठी असतात. मनुष्याच्या सुखासाठी त्यांना त्रास झाला तर काही हरकत नसते. त्यामुळे उपवासाला सुधा मांस खाण्याची पद्धत आहे.
हिंदूंमध्ये मात्र हत्या हे पाप मानलं गेलाय. अर्थात मांस भक्षण हिंदूंमध्ये सुधा चालत आलंय. पण आपल्या आनंदासाठी इतरांना क्रूरपणे वागवण हा प्रकार पुष्कळच कमी.
२. इस्लाम मध्ये काफिरांचा (इस्लाम ला न मान्नार्याचा ) शिरचेद करण हा धर्माभिमान मानलं गेला आहे.
मनुष्याची विनाकारण हत्या हे हिंदूंमध्ये सगळ्यात मोठं पाप मानलं गेलंय.
३. इस्लाम मध्ये पुनर्जन्म, कर्मभोग ह्या गोष्टी मनात नाहीत. एकदाच एक 'कयामत का दिन आयेगा और अल्ला सबको उनके करमो का फल देगा' असं त्यांच्यात मानण्यात आलंय.
या उलट हिंदुन्च्यात 'जशी कर्म तशी फलं' हा विचार असल्यामुळे हिंदू बरेच सौम्य.
४. मेल्यावर माणसाला जिथे पुरलं जातं तिथेच त्याचा आत्मा त्या मृत शरीराला बांधून राहतो. त्या आत्म्याला फार दुखी कष्टी व्हावा लागत, असं इस्लाम चं म्हणणं हे. त्यामुळे जिवंत असेपर्यंत खा, प्या , मजा करा. इतरांच्या वेदनांची आणि दुखाची काळजी करू नका. हा विचार त्यांच्यात आहे.
या उलट मेल्यावर आत्मा शरीरापासून मुक्त होतो आणि त्याचा पुढचा प्रवास हा जिवंतपणी केलेल्या चांगल्या वाईट कर्मांवर अवलंबून असतो असं हिंदू धर्म मानतो.

हिंदूंचा सौम्य पण आपण आज सुधा बघत आहोत.
पाकड्यांनी कितीही खोड्या काढल्या तरी आपण निषेध खलिते पाठवण्या पलीकडे काहीही करत नाही.
या उलट मुस्लिम आहेत. गेल्या महिन्यामध्ये गणपतीची वर्गणी मागायला आलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना मुस्लिमांकडून मारहाण झाल्याची. इस्लाम राष्टांमध्ये अल्पसंख्यांक बहुसंख्यान्कांकडे नजर रोखून सुधा बघू शकत नाहीत. इथे मात्र हिंदू स्त्रियांवर मुस्लिमांकडून बलात्कार केले जात आहेत. मशीदीवर नुसता गुलाल पडला म्हणून दंगली होतात. भारताच्या राज्य घटनेचे कायदे त्यांना लागू होत नाहीत.
देवा ! काय होणार आहे पुढे काय माहित.

चेतनकुलकर्णी_85's picture

8 Sep 2013 - 10:25 pm | चेतनकुलकर्णी_85

देवा ! काय होणार आहे पुढे काय माहित.

भारतात गल्लोगल्ली सुंता केंद्रे निघाली नाही तर नशीब!!

वाल्मिकी रामायण कोणी वाचलं आहे का ?
त्यात खरच
"वाल्मिकी रामायणात सीतामैय्या हरणाचे मांस घालून बिर्याणी करत होती, असा उल्लेख आहे का?".
मी खात्री करून घेईन आणि मग प्रतिक्रिया देईन. माझ्या माहितीप्रमाणे ते वनवासात असल्यामुळे फक्त फळे आणि कंदमुळे खात होते.

बॅटमॅन's picture

11 Sep 2013 - 4:22 pm | बॅटमॅन

या लिंक्स बघा.

अयोध्याकांड, अध्याय ९६ वा. श्लोक क्र. १-२.

http://www.valmikiramayan.net/utf8/ayodhya/sarga96/ayodhya_96_frame.htm

अरण्यकांड, अध्याय ४४ वा. श्लोक क्र. २७.

http://www.valmikiramayan.net/utf8/aranya/sarga44/aranya_44_frame.htm

अजून बरेच उल्लेख सापडतील.

ही लिंक उदाहरणादाखल पाहणे.

http://hindtoday.com/Blogs/ViewBlogsV2.aspx?HTAdvtId=1488&HTAdvtPlaceCod...

यात दिलेले उल्लेख क्रॉस-चेक करायचे असतील तर रामायण अख्खे नेटवर ट्रान्स्लेटेड मिळेल. ती लिंक इथे.

http://www.valmikiramayan.net/

सातही कांडे आहेत. कांड, अध्याय क्र. आणि श्लोक क्र. वरच्या लिंकमधले पाहून आरामात चेकवता येईल.

हरीण मारून खाल्ल्याचे कितीतरी उल्लेख आहेत.

प्रचेतस's picture

11 Sep 2013 - 4:32 pm | प्रचेतस

=))

अजून बघ

अयोध्याकांड सर्ग ५२ श्लोक ८९

सुराघटसहस्रेण मांसभूतौदनेन च ।
यक्ष्ये त्वां प्रियतां देवि पुरीं पुनरुपागता ||

अरण्यकांड सर्ग ४७ श्लोक २२-२३

विचराम द्विजश्रेष्ठ वनं गम्भीरमोजसा ।
समाश्वस मुहुर्तं तु शक्यं वस्तुमिह त्वया ||२२||

आगमिष्यति मे भर्ता वन्यमादाय पुष्कलम् ।
रुरून् गोधान् वराहांश्च हत्वाऽऽदायामिषं बहु ॥ २३ ॥

बॅटमॅन's picture

11 Sep 2013 - 4:39 pm | बॅटमॅन

=)) =)) =))

अख्खा बार्बेक्यू नेशनचा मेनूच की रे =))

प्रचेतस's picture

11 Sep 2013 - 4:45 pm | प्रचेतस

अगदी अगदी. :)

यशोधरा's picture

11 Sep 2013 - 5:02 pm | यशोधरा

=))

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Sep 2013 - 9:45 pm | डॉ सुहास म्हात्रे

अख्खा बार्बेक्यू नेशनचा मेनूच की रे

अनिरुद्ध प's picture

11 Sep 2013 - 5:55 pm | अनिरुद्ध प

मराठीत अनुवाद जरा सान्गाल का?

सुराघटसहस्रेण मांसभूतौदनेन च ।
यक्ष्ये त्वां प्रियतां देवि पुरीं पुनरुपागता

हे गंगे, अयोध्यापुरीत परत आल्यावर मी मद्याचे सहस्त्र घट आणि त्याजबरोबर मांस घालून शिजवलेला भात अर्पण करून तुझी पूजा करेन.

विचराम द्विजश्रेष्ठ वनं गम्भीरमोजसा ।
समाश्वस मुहुर्तं तु शक्यं वस्तुमिह त्वया ||२२||

आगमिष्यति मे भर्ता वन्यमादाय पुष्कलम् ।
रुरून् गोधान् वराहांश्च हत्वाऽऽदायामिषं बहु ॥

हे द्विज, आपण येथे थांबू शकत असाल तर मुहूर्तभर विश्राम करावा. आत्ता माझे पती भरपूर प्रमाणात जंगली- फळे- मुळे तसेच रूरू, गोध(?) आणि रानडुक्कर आदि हिंस्त्र पशुंची हत्या करून घेऊन पोहोंचतील.

(भाषांतर बरोबर ना बॅट्या)

येस्सार!! भाषांतर बरोब्बर.

फक्त रुरू=हरीण/काळवीट आणि गोधा=सरडा हे राहिले.

प्रचेतस's picture

11 Sep 2013 - 9:12 pm | प्रचेतस

धन्स रे.
याच बरोबर ब्राह्मणसुद्धा तेव्हा मांसभक्षण करत होते हेही सिद्ध होते. =))
ब्राह्मणरूप धारण करून आलेल्या रावणाला उद्देशून सीता हा श्लोक म्हणत आहे.

अहो स्वतः गुरू वसिष्ठांनी मांसभक्षण केल्याचा उल्लेख आहे भवभूतीच्या उत्तररामचरितात.

वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात वसिष्ठ ऋषी व्हिजिटला आलेले असताना त्यांच्यासाठी वत्सतरी म्हंजेच छोटी गाय मारल्याचा उल्लेख आहे. सौधातकी नामक एकजण त्याबद्दल निषेध व्यक्त करतो आहे.

ती वरिजिनल संस्कृत लिंक इथे पाहता येईल.

प्रचेतस's picture

11 Sep 2013 - 9:39 pm | प्रचेतस

हाहाहा. भारी बे

बाकी हे ऋग्वेदातले एक सूक्त बघ

त्ते कृष्णः शकुन आतुतोद पिपीलः सर्प उत वा श्वापदः ।
अग्निष्टद्विश्वादगदं कृणोतु सोमश्च यो ब्राह्मणाँ आविवेश ॥६॥
अग्नेर्वर्म परि गोभिर्व्ययस्व सं प्रोर्णुष्व पीवसा मेदसा च ।
नेत्त्वा धृष्णुर्हरसा जर्हृषाणो दधृग्विधक्ष्यन्पर्यङ्खयाते ॥७॥

आता भाषांतर कुणी विचारू नये.