मुस्लीमच कां जिंकले ? एक अभ्यास

शरद's picture
शरद in काथ्याकूट
24 Aug 2013 - 12:15 pm
गाभा: 

मुस्लिमच कां जिंकले ? एक अभ्यास

भारतावर अनादी काळापासून आक्रमणे होत आहेत. भागवतात यांची सूची दिली आहे. उदा. किरात,हूण, पुलिन्द, आभीर,शुंग, यवन, खस, शक इत्यादी. पण इस्लामचे आक्रमण एक अभूतपूर्व आक्रमण होते. इतर आक्रमणांत व याच्यात काय फरक होता की फक्त इस्लामच यशस्वी झाले याची चिकित्सा करावयाचा हा एक प्रयत्न.

इ.स.पूर्व २००० ते इ.स.६०० हा कालखंड प्रथम बघू. या वेळी भारतात "हिंदू" नावाचा धर्म नव्हता पण श्रुति-स्मृति-पुराणोक्त वचनांवर विश्वास ठेवणारी एक समाजघडी प्रस्थापित होती. प्रथम तीन, नंतर चार व त्यानंतर ४+१ (चातुर्वर्णांबाहेरचा) अशी वर्णव्यवस्था प्रचारात होती. वर्णसंकराने निर्माण होणारी प्रजा निराळी जात म्हणून जन्मास येत होती. अशा शेकडो जाती निर्माण झाल्या पण त्या सर्व परत या समाजघडीतच सामावल्या जात होत्या. हा सर्वसंग्राहक विचार एका दृष्टीने कोता होता; पूर्वीसारखे आता कोणीही कोणत्याही प्रकारे वर्ण बदलू शकत नव्हता. पूर्वी क्षत्रीयाला वर्ण बदलून ब्राह्मण होता येत होते, तशी परवानगी आता नव्हती. पण दुसर्‍या दृष्टीने या सर्वसमावेशक व्यवस्थेने सर्वांना सामावून घेतले. जन्माला येणार्‍या कोणालाही मी या व्यवस्थेचा "भाग" नाही असे सांगावयाची सोयच ठेवली नाही. सिंहाच्या गुहेत आत गेला की गेलाच तसे तू जन्माला आलास की तू आमच्यातलाच, तुझे स्थान ठरलेच, भले ते वरचे असेल की खालचे. तुला बाहेर पडावयास जागाच नाही. आता या त्रयीवर अजिबात विश्वास न ठेवणारे, तिला झुगारून देणारे नव्हतेच कां ? होते की. बुद्ध होते, जैन होते, नाथपंथी, योगी, निरीश्वरवादी आदि होतेच. यांना ना श्रुति-स्मृति-पुराण मान्य होते ना वर्णव्यवस्था. पण शेवटी यांनाही गिळंकृत केले गेले. मान न मान, तुम हम एक.

हाच न्याय आक्रमकांना लावला गेला. या कालखंडातील आक्रमक सांस्कृतिक बाजूने इथल्या संस्कृतीपेक्षा डावे होते. त्यांना सामावून जातांना फारसे त्रास पडले नाहीत. त्यातही व्यवहार पाहिला गेलाच. आक्रमक योद्धा असेल तर त्याला क्षत्रीय म्हणा, गबर असेल तर वैश्यात ढकला आणि गौण असेल तर शूद्र म्हणा. संपलं. महाभारतातील युद्धात देखील हे उपरे "आपल्यातीलच" म्हणून दोनही बाजूंनी लढले. शेकडो वर्षे येणार्‍या या परदेशी नद्यांना येथील समाज सागराने आपल्यात सामावून घेतले. त्यांच्या चाली-रिती, निष्ठा स्विकारून त्यांनाही आपल्या जीवन पद्धतीत जागा देण्यास आली. तुझे +माझे = आपले ही उदार विचार धारा भारतात प्राचीन काळापासून प्रचलित होती.

या सर्व समावेशक पद्धतीमध्ये फायदे तसे तोटेही होते. सगळ्यांना वाव देतांना एकसंधीपणा नष्ट झाला. प्रथमत: देवतांची संख्या अतोनात वाढली. त्यांच्या उपासनेत विविधता आली. कर्मकांडे वाढली. आपलाच देव सर्वश्रेष्ठ असे म्हणता म्हणता एकमेकातील भांडणे विकोपाला गेली. त्यातही पुरुषार्थाची महती कमी होऊन दैववाद फोफावला. कलिनिषेध सारखा मूर्खपणा आपला अनिष्ट प्रभाव सर्व स्तरांवर गाजवू लागला. या सगळ्यामुळे मला माझ्या शेजार्‍याची काळजी वाटेनाशी झाली. तो माझ्या जातीचा नाही, त्याचा देव निराळा, त्याची भाषा निराळी असले निरर्थक वाद एकमेकांमध्ये भिंती उभ्या करू लागले. आता सिन्धवर हल्ला झाला तर त्याच्या मदतीला जायला पाहिजे असे मगधाला वाटेनासे झाले.. एका राष्ट्राच्या दृष्टीने ही एक फार भयानक गोष्ट होती. दुर्दैवाने यावर विचार करून त्याचे उत्तर शोधू शकेल असा महापुरुष त्या काळी निर्माण झाला नाही.

या व्यवस्थेत सगळे काही संतुष्ट नव्हते. एक तर माणुस कोणत्याही परिस्थीतीत संतुष्ट नसतोच व वर्णव्यवस्थेत खालच्या
वर्णांतील लोकांनी संतुष्ट असावयाचे कारणच नव्हते. पण त्यांना यातून बाहेर पडावयास मार्गच नव्हता. जाणार कुठे व कुणाकडे ? असंतुष्ट होते ते असहाय्य होते....... आणि या वेळीच इस्लामने भारतावर आक्रमणे केली

इस्लामची स्थापना झाल्यावर लगेचच खलिफांनी सागरमार्गे भारतावर आक्रमण करायाचा प्रयत्न केला. तो फसला. मग खुष्कीमार्गे हल्ले केले पण त्यातही फार यश मिळाले नाही. सिन्धच्या राजाने प्रतिकार करून त्यांना पिटाळून लावले. पण काही फितुर, देशद्रोह्यांमुळे मुस्लिमांनी प्रथम सिन्धमध्ये आ॒पले पाय रोवले. (इ.स.७०८) पण सिन्धबाहेर प्रदेश जिंकावयाच्या प्रयत्नात प्रतिहार, चालुक्य वंशांच्या राजांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही. सिंधमधूनही यांना हुसकावणे शक्य होते. पण आड आले मुलतानमधील सूर्यमंदिर. यावर अनेकांची श्रद्धा होती. त्यामुळे भारतीयांचा हल्ला झाला की मंदिराचा नाश करू एवढी धमकीही पुरी होतसे.
दुसरी अवस्था गझनीच्या महमुदाच्या स्वार्‍यांची. त्यालाही कडवा प्रतिकार झाला. जथपाल राजाने तर गझनीवर स्वारीची सुरवात केली. केवळ वाटेतील प्रचंड हिमवृष्टीने गझनी वाचली ! १०२४ ला सौराष्ट्रातील सोमनाथ मंदिर लुटण्यात आले.. महमद घोरीची स्वारी ही तिसरी अवस्था. पृथ्वीराजाच्या पराभवानंतर मुसलमान भारतात स्थिरावले. भारतातील लोकांनी मदत केली नसती तर हे अशक्य होते.

आता आपण मुस्लिम यशस्वी कां झाले याचा विचार करू. आता "हिंदूधर्म" हा शब्द वापरावयास हरकत नाही. दोन धर्मातील सर्व फरक मी येथे विचारात घेणार नाही. पण इस्लाममधील काही महत्वाच्या गोष्टी प्रथम नोंदवू. (१) कोणताही मुसलमान दुसर्‍या कोणत्याही मुसलमानाचा भाऊ असतो.(२) कोणालाही मुसलमान होता येते किंवा करता येते.(३) अल्लावर श्रद्धा नसलेल्या ’काफिर" यांना येनकेन प्रकारेण धर्मात घ्या. धर्मप्रसाराकरिता तलवार वापरण्यास हरकत नाही. उलट हिंदू धर्मात (१) एकसंघता नव्हती, बंधूत्व सोडाच, पण एकमेकाची सावलीही वर्ज्य होती.(२) बाहेरच्याला हिंदूधर्मात येण्यास बंदी होती. (३) मतप्रवर्तन तलवारीने नव्हे तर विचारांनी व्हावे अशी अपेक्षा होती. (४) कलीयुगात "अधर्माचा’ प्रसार होणार" असे "धर्मच " सांगत होता.

आता इस्लामला हिंदुस्थानातील धर्माशी वैर होते व हिंदूंना त्यांना सामावून घ्यावयाचे नव्हते. दलितांना इस्लाममधील एकता आवडली व जातीच्या जाती इस्लामात सामील झाल्या. या परक्यांना मदत करावयास येथील लोक तयार झाले. इथे फितुर वा देशद्रोही ही विशेषणे जरा जपूनच वापरली पाहिजेत. एक हिंदू राजा दुसर्‍या हिंदू राजाचा पराभव करण्यास मुसलमानांना बोलवत होता. आणि आपल्या धर्मग्रंथांत सुग्रीव, बिभिषण, इ. उदाहरणे होतीच. थोडक्यात मुस्लीमांचा विजय अटळ होता. थोड्याफार फरकाने इंग्रजांच्या वेळीही हेच झाले.

शरद

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Sep 2013 - 9:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

करा करा भाषांतर... वल्ली, बॅटमॅन यांना आवाहन !

लॉरी टांगटूंगकर's picture

16 Sep 2013 - 12:16 am | लॉरी टांगटूंगकर

पुराणप्रेमी मंडळाचे नॉन व्हेज खोदकाम पाहून गहिवरून आले.
बार्बेक्यू नेशनचा मेन्यू!!!!!! =))
8) :P :D =)) :) ;) %) :| :-/ =O :'( :* :[ o_0 >:O :! :# =]

अनिरुद्ध प's picture

12 Sep 2013 - 12:29 pm | अनिरुद्ध प

अर्धवट वाटतोय कारण यात," सुराघटसहस्रेण मांसभूतौदनेन च ।
यक्ष्ये त्वां प्रियतां देवि पुरीं पुनरुपागता" कुठेही गन्गेचा उल्लेख नाहीय्,मात्र यक्षान्चा उल्लेख दिसत आहे.

गंगेचा उल्लेख त्या श्लोकात नसला तरी मागच्या श्लोकांत मिळेल. आणि यक्ष्ये म्हंजे यक्षाशी काही संबंध नाही. ते यक्ष् धातूचे भविष्यकाळी रूप आहे. अर्थ आहे "मी पूजा करेन".

प्रचेतस's picture

12 Sep 2013 - 12:38 pm | प्रचेतस

हो.
पण हा श्लोक पूर्ण आहे. हा सर्ग सीता अयोध्यात्याग करून गंगापार झाल्यावर तिला उद्देशून जी प्रार्थना म्हणते तो उल्लेख आहे. त्यामुळे प्रत्येक श्लोकाच्या सुरुवातीला गंगेचा उल्लेख असेलच असे नाही.

बाकी हे यक्ष म्हणजे ते यक्ष, किन्नर, गंधर्ववाली जमात नै. यक्ष्ये त्वां म्हणजे तुला समर्पित करेन/ पूजा करेन असा अर्थ होतो.

अनिरुद्ध प's picture

12 Sep 2013 - 12:47 pm | अनिरुद्ध प

श्लोका वर दोन प्रतिक्रिया आणि दोन्ही दिग्गजान्च्या आता काय करावे?

मालोजीराव's picture

12 Sep 2013 - 3:18 pm | मालोजीराव

चांगलं लागतं बे चवीला !

उद्दाम's picture

12 Sep 2013 - 11:32 am | उद्दाम

म्हशे, अगं जास्त तावातावाने नगं बोलूस. नाहीतर कोणच्या तरी पुराणातली म्हशीची बिर्याणी कशी करावी, याचीही लिंक कुणीतरी देईल .

म्हैसच कशाला बै, विश्वामित्रान्नी कुत्र्याची तंगडी खाल्ली होती. आता ती का , कशी, कोठे ... बाकीच्यान्ना नगं इचारूस. होमवर्क समज तुझा आणि बघ काही पुराणकथा घावते का ते.

मायबोलीवर चिनुक्स की कोणत्या तरी आय डी ने अन्न वै प्राणम या नावाची एक अती प्रचंड लेख मालिका लिहिली आहे. ती वाचून बघ. त्यात सगळे आहे. त्याची लिंक मला मिळत नाही आहे, म्हणून मी दिली नाही. मायबोलीवर आय्डी काढून सगळे लेख शोधून बघ.

अनिरुद्ध प's picture

12 Sep 2013 - 11:58 am | अनिरुद्ध प

सान्गीतलेत्,माझ्या माहिती प्रमाणे श्री राम्,श्री विश्वामित्र हे क्षत्रिय होते तेव्हा ते मासभक्षण करत असतील त्याना ते निशिद्ध नव्हते,ब्राहमणात अगस्ती रुशी यान्चा एक अपवाद म्हणजे वातापी रा़क्षासाचा,म्हणजे याचा सरसकट अर्थ ब्राह्मण हे मासाहारी होते असा नव्हे.

बॅटमॅन's picture

12 Sep 2013 - 12:06 pm | बॅटमॅन

अहो अगस्तीच कशाला, वर गुरु वसिष्ठांचा दाखला दिलाय की. आणि ते काही अनवस्थाप्रसंग म्हणून नव्हे, तर चांगली फीष्ट म्हणून खाल्लेली आहे.

अनिरुद्ध प's picture

12 Sep 2013 - 12:23 pm | अनिरुद्ध प

लिन्क वर तो श्लोक नक्कि कुठला ?

बॅटमॅन's picture

12 Sep 2013 - 12:26 pm | बॅटमॅन

लिंकच्या डाव्या पानावरचे संभाषण पहावे.

"वत्सतरी पुनर्विसर्जिता" असा उल्लेख सापडेल. वत्सतरी=कालवड.

"येनागतेषु वसिष्ठमिश्रेषु वत्सतरी विशसिता |"

आलेल्या वसिष्ठांसाठी कालवड कापली आहे.

मृत्युन्जय's picture

12 Sep 2013 - 2:55 pm | मृत्युन्जय

पुराणात कुठे म्हशी कापल्याचा उल्लेख आहे काय?

प्रचेतस's picture

12 Sep 2013 - 3:10 pm | प्रचेतस

हाहाहा.
म्हशींचे उल्लेख बॅट्या शोधून देईलच पण हे बघ खुद्द महाभारतात २१००० गायी कापल्याचे उल्लेख आहेत.

द्रोणपर्वातील षोडषराजकीय आख्यान. रन्तिदेवाची कथा.

On such nights, when guests were assembled in the abode of Rantideva, one and twenty thousand kine were sacrificed (for feeding them). And yet the royal cook adorned with begemmed ear-rings, had to cry out, saying, 'Eat as much soup as you like, for, of meat, there is not as much today as in other days. Whatever gold was left belonging to Rantideva, he gave even that remnant away unto the Brahmanas during the progress of one of his sacrifices. In his very sight the gods used to take the libations of clarified butter poured into the fire for them, and the Pitris the food that was offered to them, in Sraddhas. And all superior Brahmanas used to obtain from him (the means of gratifying) all their desires. When he died, O Srinjaya, who was superior to thee in respect of the four cardinal virtues and who, superior to thee was, therefore, much superior to thy son, thou shouldst not, saying, 'Oh, Swaitya, Oh, Swaitya,' grieve for the latter who performed no sacrifice and made no sacrificial present.'"

बॅटमॅन's picture

12 Sep 2013 - 3:23 pm | बॅटमॅन

जबरीच रे. बहुतेक हाच तो रन्तिदेव राजा असावा ज्याच्या किचनमध्ये इतक्या गायी मारल्या जायच्या की त्यांची कातडी नदीच्या काठी ठीकठिकाणी पडलेली असायची. त्यामुळे त्या नदीला चामडेवाली नदी ऊर्फ "चर्मण्वती" असे नाव पडले. हीच आजची चंबळ नदी होय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Sep 2013 - 5:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

एका रात्रीच्या जेवणाला २१,००० गाई कमी पडल्या ???!!!

मला वाटतं हे सगळं बघून पश्चाताप होऊन किंवा गाईबैल नामशेष होण्याची पाळी आली म्हणून "गोवध बंदी" झाली असावी !

सुनील's picture

12 Sep 2013 - 3:12 pm | सुनील

म्हशीचे रुप घेतलेल्या असुराला मारणार्‍या दुर्गेचा उल्लेख आहे ;)

नाय नाय. तो म्हैसा पक्षी रेडा आहे. =))

सुनील's picture

12 Sep 2013 - 3:17 pm | सुनील

खरपूस भाजलेली तंदूरी खाताना कोंबडा की कोंबडी असा विचार करता का? :)

बॅटमॅन's picture

12 Sep 2013 - 3:20 pm | बॅटमॅन

पुराणांचे माहिती नाही.

परंतु महाभारत, अनुशासन पर्व, अध्याय क्र. ८८. भीष्म-युधिष्ठिर संवाद. पितरांना काय अर्पण केल्यास त्यांची तृप्ती चिरकाल टिकते असे युधिष्ठिर भीष्मांना विचारतोय. त्यावर भीष्म एक लंबीचवडी लिष्ट सांगताहेत. याचे मांस अर्पण केल्यावर १ दिवस, त्याचे मांस अर्पिल्यावर १ महिना, इ.इ. त्यात ८ व्या श्लोकात म्हशीच्या/रेड्याच्या मांसाने तृप्ती ११ महिने टिकते असे सांगितले आहे.

मासान् एकादश प्रीतिः पितॄणां माहिषेण तु |
गव्येन दत्ते श्राद्धे तु संवत्सरम इहॊच्यते ||

"म्हशीच्या मांसाने पितरांची प्रीति/प्रेम/तृप्ती ११ महिने टिकते, तर श्रद्धापूर्वक अर्पिलेल्या गाईच्या मांसाने वर्षभर टिकते.

रेफ्रन्स लिंक

मृत्युन्जय's picture

12 Sep 2013 - 3:25 pm | मृत्युन्जय

शी किती घाणेरडे होते आपले पुर्वज कायबी खाऊन तृप्त व्हायचे.

हो ना! कशाचेही मांस खायचे, आणि वर ब्राह्मण वगैरेही म्हणवून घ्यायचे. ते गौतम बुद्धसाहेबही तसेच-अहिंसा अहिंसा म्हणायचे पण मृत्यू झाला डुकराचे इन्फेक्टेड मांस खाऊनच.

अनुप ढेरे's picture

12 Sep 2013 - 2:19 pm | अनुप ढेरे

ही घ्या लिंक
http://www.maayboli.com/node/2802
फार भारी आहे !!

उद्दाम's picture

12 Sep 2013 - 2:41 pm | उद्दाम

आणि मी शोधत असलेली ती रामायण महाभारतवाली लिंक ही ... http://www.maayboli.com/node/3055

अनिरुद्ध प's picture

12 Sep 2013 - 2:53 pm | अनिरुद्ध प

वाचत आहे.

आशु जोग's picture

11 Sep 2013 - 5:19 pm | आशु जोग

आपल्याकडे अंधश्रद्धा निर्मूलनवाले एक कार्यकर्ते होते, त्यांनी मूर्तीपुढे केल्या जाणार्‍या पशुहत्या बंद व्हाव्यात यासाठी एक बिल आणले होते. त्यांना कुणी विचारले, मूर्तीसमोरच्याच हत्या का ? ते म्हणाले मूर्तीसमोर हे शब्द टाकले नाहीत तर ईदला प्रॉब्लेम येतो ना !

मोदक's picture

11 Sep 2013 - 10:05 pm | मोदक

कोण ओ कोण..?

आशु जोग's picture

11 Sep 2013 - 10:23 pm | आशु जोग

तेच हो ते

मोदक's picture

11 Sep 2013 - 10:49 pm | मोदक

लाजू नका.. नाव घ्या!

मी मनमौजी's picture

12 Sep 2013 - 1:00 pm | मी मनमौजी

सुरेख लिहले आहे.

राही's picture

12 Sep 2013 - 6:24 pm | राही

इरावतीबाई कर्वे यांनी त्यांच्या एका लेखात सूचकपणाने असे लिहिले आहे की पुराणकाळात राजे गुरांची खिल्लारे बाळगीत, विराटाच्या गाई चोरल्या म्हणून मोठे युद्ध झाले, हे सर्व निव्वळ दुधातुपासाठी नक्कीच नसावे.

मुस्लिमान विरुद्ध बोलण्याची हिम्मत होत नाही म्हणून काही लोकांनी इथे विषय बदलला आहे. हिंदून विरुद्ध बोलणारे सगळे हिंदूच आहेत. हेच मुस्लिम जिंकण्याचं महत्वाचं कारण असावं . मुसलमान नेमके ह्याच्या विरुद्ध.

ओ म्हैस तै, तुमच्या शंकेचे नीट निरसन केले ते गेलं कुठल्या कुठं, वर आणि गिरे तोभी टांग/शिंग उपर आहेच का. असले काडीसारू लोक जिंकले की संकेतस्थळे हरतात हे बाकी खरं.

उद्दाम's picture

14 Sep 2013 - 7:11 pm | उद्दाम

:)

-- म्हैषासूर उद्दाम

उद्दाम's picture

14 Sep 2013 - 7:14 pm | उद्दाम

जथपाल राजाने तर गझनीवर स्वारीची सुरवात केली. केवळ वाटेतील प्रचंड हिमवृष्टीने गझनी वाचली !

हायला, मग याचे श्रेय जथपालाला का द्यायचे?

अनिरुद्ध प's picture

16 Sep 2013 - 7:13 pm | अनिरुद्ध प

?

उद्दाम's picture

18 Sep 2013 - 1:03 pm | उद्दाम

खायचे प्यायचे करुन धागा सुस्त पडला.

अनिरुद्ध प's picture

18 Sep 2013 - 1:36 pm | अनिरुद्ध प

नुसतेच अभक्ष भक्षण नव्हे तर + अपेयपान (हे पचनासाठी उपयुक्त असे मानले जाते,अर्थात हे आपल्याला जास्त माहीत असावे कारण आपल्या पूर्व प्रतिसादावरुन आपण वैद्यक क्ष्रेत्रात काम करता असे जाणवते.) आणि म्हणुनच मुस्लीम जिन्कले असावेत असा कयास आहे.(अलक्षेन्द्र आणि पुरु)

@बॅटमॅन. अहो महाराज माझ्या शंकेचा निरसन मुळीच झाला नाहीये. इंटरनेट च्या लीन्कांवर विश्वास बाळबोध लोकच ठेवतील. अहो इथे स्वताला हिंदू म्हणवून घेणाऱ्या लोकांनीच प्रतिक्रिया किती खालच्या थराला जावून लिहिल्यात . तिथे इंटरनेट वरच्या उठ सुठ कोणीही काहीही लिहिलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा का? आणि मांसाहाराचा आणि मुस्लिम जिंकण्याचा संबंधाच काय? लेख काय प्रतिक्रिया काय ..........

धागा काय अन प्रतिक्रिया काय. सुरुवात तुम्ही केली अन वर मलाच सांगता होय.

अनिरुद्ध प's picture

7 Oct 2013 - 6:02 pm | अनिरुद्ध प

झोपि गेलेला १७ दिवसानी जागा झाला.

दादा कोंडके's picture

7 Oct 2013 - 6:48 pm | दादा कोंडके

सुरुवात तुम्ही केली अन वर मलाच सांगता होय.

अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी? :))

आशु जोग's picture

7 Oct 2013 - 3:55 pm | आशु जोग

असा अभ्यास झालाच पाहिजे. आमचे गुरुजी म्हणतात तसे 'अ‍ॅकॅडेमिक्स आलं की अ‍ॅक्टिव्हिजम मागोमाग येतंच'

आशु जोग's picture

7 Oct 2013 - 9:22 pm | आशु जोग

नुकतीच वाचलेली पाकिस्तानी प्रतिक्रिया.
पाकिस्तानातल्या बलुचिस्तानात भूकंप झाला आणि **च्या कृपेने नॅचरल गॅस बाहेर येवू लागला. आपल्याकडे नैसर्गिक साधनसंपत्ती प्रचंड आहे ** च्या कृपेने

उद्दाम's picture

8 Oct 2013 - 9:23 am | उद्दाम

अरे वा! बातमी ऐकून तुमचाही गॅस बाहेर आला वाटतं.

गॅस कुणाचा आलाय ते दिसतंच आहे हो निधर्मांधहृदयसम्राट.

तुम्ही स्वताच्या अंगावर ओढून घेताय राव ???? जर अक्कल वापर कि स्वताची (असेल तर). गाई म्हशी कापण्याचा , सीतामाईने मतान शिजवण्याचा विषय मी काढलाय का? हिंदूंनी जागं होणा गरजेच आहे . पण झोपलेल्याला जागा करता येत. तुमच्यासारख्या झोपेच सोंग घेणाऱ्या हिंदूंना कसा जाग करणार?

बॅटमॅन's picture

21 Oct 2013 - 2:41 pm | बॅटमॅन

पाण्यात जरा शांऽऽत डुंबा तुमच्या आयडीगत. असले चुळबुळवाले विचार १२ गडगड्यांच्या व्हिरीत टाकून या जावा.

स्वतःचे बलिदान दिले तर अजून उत्तम. किमानपक्षी काही जणांची "बडे का" खायची होय तरी होईल.

मृत्युन्जय's picture

21 Oct 2013 - 3:13 pm | मृत्युन्जय

२००

आशु जोग's picture

22 Oct 2013 - 11:46 pm | आशु जोग

.... मुस्लीमच कां जिंकले ?

त्यांनी २०० रन्स काढल्या