सारोजनीक गनपती उत्सव - खारपाडा

ब्रिटिश's picture
ब्रिटिश in जनातलं, मनातलं
5 Sep 2008 - 9:46 pm

मांगच्या सालची गोस्ट सांगतय

कमीटीची मीटींग झाल्ती

मीटींगमदी ठरला क ह्ये गनपती उत्सवान गावचा नाटक बसवाचा.
पन ईशय कोन्ता ?

कूनी म्हनालं सामाजीक ठीवा, त कुनी म्हनल सांस्क्रुतीक , त कुनी आनकी कसला
चीक्कार भांडना झायली पन कुन्याव कई बी आयकना. तवा काश्या (माजा बा मंडली, काशिनाथ भोईर, पन तेला सगलीजना काश्या म्हनुनच वलीकतान. आवराच नाय तो सोता पन
काशिनाथ म्हुन हाक दील्ली क पाच मिन्ट ईचार करुन ओ देतं) उबा राह्यला न म्हनला
"यंदा आपून ऐतीहाशीक नाटकच कराचा. क र मास्तर ?"

मास्तर कमीटीचा आद्यक्श. पन त्याचे डोल्यासमोर बांबू फिरलं.

"व्हय व्हय ! आपून ऐतीहाशीक नाटकच कराचा. " मास्तरचा अनूमोदन

ईशय फिक्स - 'द्रुपदी वस्त्रहरन'

"चला आता काश्टींग करुया " मास्तर
म्हन्जे ? म्हात्र्यांचा सुरया

"आर म्हन्जी कोनी कोनी क कराचा ते. तर मंडली , डायरेक्टर मीच होतय आनी नाटक बी लीवतं. मना म्हाईत हाय ईतीहास" मास्तर

"बर मंग आता एयाक्टर बी तुमीच ठरवा. " बाबू घरत - खजिनदार

हां. तर आता धर्मराज कोन ?

मी हुतय " भास्कर राउताचा बंड्या

अर्जुन .. भिम .. नकुल .. सगली पांडवा झायली

"दुर्योदन ?"
"तुकाराम तु हो."

"पन मास्तर मना टेजवर बोलाया जमन?
"आर तु कई नाय बोलाचा. निस्ता पाच येला ह्य ह्य करुन हासाचा बोल." मास्तर

दुशासन कोन ?
सगल्यांचा हात वर

"आर बाबांव गनपती सारोजनीक हाय , द्रुपदी नाय." मास्तर

"ह्या काम आपन पक्याला देव . कुनाचा आब्जेक्सन ?"

सगली मान्सा चिप रायली बोल. पक्या बीनईरोद दुशासन.

आता द्रुपदी

सगली लोका यकमेकांचे तोंडाकड बगु लागली. कोनाव कई बी सूचना
आपल्या बायकामुली कोन पाटवल पक्या करुन पातल सोरवाला. कई ईपरीत झाला तर कवरा लफरा वाडलं

"पनवेलचे 'मल्लिका' मदी माजी वलक हाय." बारक्या म्हनाला "तीतुन आनु यकादी."

"जमल जमल , आनी तीचा यक डांस बी ठीउ . मोप गर्दी जमल. "

रेसल सुरु . सगला येवस्तीत जमला पन येक लफरा झाला

"द्युत" कसा खेलाचा ह्ये मास्तरला कलना. आता मास्तरलाच म्हाईत नाय म्हन्जे बाकी सग्ल्यांची बोंब. क कराचा

"आरं पोराव कना घाबरता, यक काम करा तीन पानी खेला. लासला धर्मराज हरल न मंग द्रुपदीचा वस्रहरन करु. क बोल्ता?" दत्ता पाटील बोल्ला
ह्ये बी पटल सर्वांना.

नाटक सुरु झाल

झाल्त काय मंडली , काश्या न बंड्या दोगव भट्टीची लाउन आल्ते आनी यकमेकांच डायलाग बोलत व्हते.
सगला लोच्या चाल्ला व्हता

शेवटी यकदाचा धर्मराजान दुयोधनाला तीन पानीच आवतान द्दील्ल नी 'द्युता' स सुर्वात झाली
पन धर्मराज जिकतच गेला . दुयोधनाला पत्ताच येयना .

दुयोधनाला एक्का जोड त धर्मराजाला कलर
दुयोधनाला कलर त धर्मराजाला राऊंड
दुयोधनाला चट्टी त धर्मराजाला तीन तीर्या

मास्तर ईंगेतून वरडा लागले धर्मराजा तुला हराला पायजेल, तुला हराला पायजेल ,
काश्या तराट , तो कइ आयकना
"मना पत्ते सरस येतान मंग मी कना शो दीउ ?"

दुयोधन रास हरला . काश्या उटला " द्रुपदीला हाना. मी सोरनार पातल . माजा आदीकार हाय तो."
दुयोधन म्हनाला " नाटकान क लीवलय ? मीच द्रुपदी ला मांडीव बशीवनार"
दुशासन म्हनाला "मीच द्रुपदीची सारी वडनार"

हा लफरा वारला. ही मारामारी .

आनी मंडली द्रुपदि सोरुन सगल्यांची वस्त्रहरना झायली.

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

धनंजय's picture

5 Sep 2008 - 9:54 pm | धनंजय

मस्त!!!

नंदन's picture

5 Sep 2008 - 10:04 pm | नंदन

झकास.

>> "आर बाबांव गनपती सारोजनीक हाय , द्रुपदी नाय." मास्तर
-- ह ह पु

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मुक्तसुनीत's picture

5 Sep 2008 - 10:40 pm | मुक्तसुनीत

लई भारी !! "सारे प्रवासी घडीचे" ची जबरदस्त आठवण झाली !

टारझन's picture

5 Sep 2008 - 10:10 pm | टारझन

बाला मना तुजा म्हाभारत आवाडलांव...
क लितय .. क लितय ...हासून हासून छातिचा पिंजरा न धुंगनाव्या खॉब्र्याच्या वाट्या झाल्या

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

भास्कर केन्डे's picture

31 Dec 2008 - 3:26 am | भास्कर केन्डे

=)) =))

आगा आये... ह्यो टारबा बी भोयरान सोबत पनवेल्ला र्‍हायलान दिसत.

यशोधरा's picture

5 Sep 2008 - 10:12 pm | यशोधरा

मस्त लिहिलांव!!
=))

प्राजु's picture

5 Sep 2008 - 10:26 pm | प्राजु

लय भारि लिवलय... कसा सुचता तुला य बासे मंदी लिवाला??
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Sep 2008 - 10:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे बाल्या, सारोजनीक गनपती उत्सवातलं नाटक वाचून
हसून हसून बरगड्या फुटाची येल आली ना बाबा :)

सर्किट's picture

5 Sep 2008 - 11:47 pm | सर्किट (not verified)

मच्छिंद्र कांबळींच्या वस्त्रहरणाची आठवण झाली !!!

मस्त॑ रे मिथुन !

-- सर्किट

चंबा मुतनाळ's picture

6 Sep 2008 - 12:01 am | चंबा मुतनाळ

फुड्च्या येरला म्या वनार धर्मराजा. क पत्तं आलाव त्येला

विसोबा खेचर's picture

6 Sep 2008 - 12:50 am | विसोबा खेचर

रं बाला मिथून, लै लै लै लै लै भारी लिवलंस बोल!

तुजे पाय मना दाव, पकराचे हायत बोल! :)

तात्या भोईर,
अंजूरफाटा.

ब्रिटिश's picture

8 Sep 2008 - 12:08 pm | ब्रिटिश

दादुस, पयाची झेरोस दील्ली त चालल क

ह्ये ह्ये हे

मिपावरची भाश्या चेंजवनारा
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

शैलेन्द्र's picture

6 Sep 2008 - 12:57 am | शैलेन्द्र

"मास्तर कमीटीचा आद्यक्श. पन त्याचे डोल्यासमोर बांबू फिरलं. "

बांबू पोकल होता न? बांबु पोकल्च बरा....

चतुरंग's picture

6 Sep 2008 - 1:03 am | चतुरंग

"आर बाबांव गनपती सारोजनीक हाय , द्रुपदी नाय." मास्तर
हे तर एकदम छप्परफाड! :D

चतुरंग

ईश्वरी's picture

6 Sep 2008 - 1:17 am | ईश्वरी

मस्त लिहीलयं .
"आर तु कई नाय बोलाचा. निस्ता पाच येला ह्य ह्य करुन हासाचा बोल." मास्तर
"आर बाबांव गनपती सारोजनीक हाय , द्रुपदी नाय." मास्तर
"आरं पोराव कना घाबरता, यक काम करा तीन पानी खेला. "

ह. ह. पु. वा.
ईश्वरी

रेवती's picture

6 Sep 2008 - 3:44 am | रेवती

भरपूर हसले. हे सगळं खरं घडलयं का?
असल्यास तुमच्या वडीलांबद्द्ल लिहीताना अडचण आली का?

रेवती

मदनबाण's picture

6 Sep 2008 - 4:09 am | मदनबाण

मस्त लिवला हार रं तु !!

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

रामदास's picture

6 Sep 2008 - 7:54 am | रामदास

मस्त लिवला र तू .
http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

शितल's picture

6 Sep 2008 - 9:31 am | शितल

अरे बाप रे
हसु हसुन वाट लागली.:)
मस्त मजेशीर किस्सा आहे. :)

जैनाचं कार्ट's picture

6 Sep 2008 - 10:46 am | जैनाचं कार्ट (not verified)

:D =))

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

सहज's picture

6 Sep 2008 - 11:31 am | सहज

आनी मंडली द्रुपदि सोरुन सगल्यांची वस्त्रहरना झायली.

अरे कोणी ह्या मिथुनदाचा फोटो लावा रे. जबरी!

सारे भोईर खानदान खतरनाक हाय भो!

आज्जा, बा, नातू जियो!!!!!!!

प्रमोद देव's picture

6 Sep 2008 - 11:40 am | प्रमोद देव

आवल्डे माना!

झकासराव's picture

6 Sep 2008 - 12:08 pm | झकासराव

=))
जबरा रे!
तुझी ही आग्री (बरोबर आहे ना?) भाषा वाचली की मला तो हास्यसम्राट मधील एक स्पर्धक आठवतो.
तो देखील आग्री लोकांचे भारी विनोद सांगत असे त्या भाषेत. मस्त वाटते ही भाषा :)

................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

अनिल हटेला's picture

6 Sep 2008 - 12:09 pm | अनिल हटेला

जल्ला हासून हासून मी दमून गेलो ना रे !!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

विजुभाऊ's picture

6 Sep 2008 - 12:26 pm | विजुभाऊ

आर बाबांव गनपती सारोजनीक हाय , द्रुपदी नाय." मास्तर

ठ्यॉ =)) =)) =))
जल्ला ता सगला सोरला आन गनपती दरला रं बाला
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

अवलिया's picture

6 Sep 2008 - 4:00 pm | अवलिया

दुयोधनाला एक्का जोड त धर्मराजाला कलर
दुयोधनाला कलर त धर्मराजाला राऊंड
दुयोधनाला चट्टी त धर्मराजाला तीन तीर्या

मास्तर ईंगेतून वरडा लागले धर्मराजा तुला हराला पायजेल, तुला हराला पायजेल ,
काश्या तराट , तो कइ आयकना
"मना पत्ते सरस येतान मंग मी कना शो दीउ ?"

=)) =)) =))

धमाल मुलगा's picture

8 Sep 2008 - 12:19 pm | धमाल मुलगा

मायला,
काय लिवतो का काय कर्तो रे बोल?

जल्ला, हापिसात बसुन वाचलां आन खुर्चीतून पर्लो ना मी, बोल!

"आर बाबांव गनपती सारोजनीक हाय , द्रुपदी नाय." मास्तर
__/\__
=)) ठ्ठोऽऽ!!!!!

दुयोधनाला एक्का जोड त धर्मराजाला कलर
दुयोधनाला कलर त धर्मराजाला राऊंड
दुयोधनाला चट्टी त धर्मराजाला तीन तीर्या

कोनच्या क्लबात जायचा रं धरमराजा?

जबरा रे...

अगदी...आजा, बा,आन् नातु तिघेही जबरा रे तुम्ही!!!!

अवांतरः बाला, जल्ला मनां आग्री शिकव ना...लै मज्जा येते बोलायला

सुमीत भातखंडे's picture

8 Sep 2008 - 2:03 pm | सुमीत भातखंडे

ह ह पु वा
=)) =)) =))

चित्तरंजन भट's picture

8 Sep 2008 - 2:10 pm | चित्तरंजन भट

=)) =)) =))

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Sep 2008 - 2:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

धमाल ... ब्रिटीशभौ, तुमच्या नावापासूनच भारी सुरूवात आहे ... =))

लगे रहो ब्रिटिशभौ!

ऋचा's picture

8 Sep 2008 - 2:26 pm | ऋचा

"आर तु कई नाय बोलाचा. निस्ता पाच येला ह्य ह्य करुन हासाचा बोल." मास्तर
"आर बाबांव गनपती सारोजनीक हाय , द्रुपदी नाय." मास्तर
"आरं पोराव कना घाबरता, यक काम करा तीन पानी खेला. "

=)) =)) =))

काय लिवतो रे तु!!
माना बी शिकव ना ही भासा
लै बेस वाट्ट बग बोलाया :)
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

मन's picture

8 Sep 2008 - 6:24 pm | मन

ठो ..........

आपलाच,
मनोबा

लिखाळ's picture

8 Sep 2008 - 9:16 pm | लिखाळ

जाम मजा आली :)
--लिखाळ.

साज१९८१'s picture

9 Sep 2008 - 8:19 am | साज१९८१

जल्ला लिहिल तु भरि रे!!
पन ते काश्या आदी दुशसन होत बिनेईरोद न मग धर्मराजा कसे झाल शेवटी? :)

ब्रिटिश's picture

9 Sep 2008 - 11:14 am | ब्रिटिश

चुक रीपेर केलय दादुस, आबारी हाय

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Sep 2008 - 12:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पर भौ, ते बंद्या जालं हूतं ना धरमराज? तो बला क गेला?

सर्वसाक्षी's picture

9 Sep 2008 - 10:10 pm | सर्वसाक्षी

वाचायला मजा आली. बाज उत्तम राखलाय.

बट्टू's picture

30 Dec 2008 - 4:36 am | बट्टू

वाचून खूप हसलो.

विनायक प्रभू's picture

30 Dec 2008 - 11:23 am | विनायक प्रभू

हसुन ह्सुन वाकलो.
आजा, बा बघितला नाय.
नातू लै भारी
पणतु- बाप रे बाप

दिपक's picture

30 Dec 2008 - 12:20 pm | दिपक

आनी मंडली द्रुपदि सोरुन सगल्यांची वस्त्रहरना झायली.

=)) =))

जबरा! बाला जाम हाशिवला तु..

---दिपक

राघव's picture

30 Dec 2008 - 7:53 pm | राघव

"आर बाबांव गनपती सारोजनीक हाय , द्रुपदी नाय." मास्तर
=)) =)) =))
अरे बापरे... कसलं भारी लिहिलंयंस रे ब्रिटीशा..!

बाकी ही भाषा वाचून ती शिकायची इच्छा होतेच. मलाही झाली. शिकवणी चालू कर एखादी! :)

मुमुक्षु

भास्कर केन्डे's picture

31 Dec 2008 - 3:40 am | भास्कर केन्डे

भोईर सायबा,

काय लिहिलं आहे राव!!! एकदम षटकारांचे षटकार मारलेत.

स्वतः पूलंनी सुद्धा तुमची पाठ थोपटली असती हे वाचून... येऊ द्या आजून.

आपला,
(पनवेलचा आगरी) भास्कर

वाटाड्या...'s picture

1 Jan 2009 - 1:27 am | वाटाड्या...

बाबानु..

कं कं लिवतं रं? मना योक सांग..त्या द्रुपदी चं कं झलं र फुडं...अं??

शिल्पा ब's picture

21 Feb 2011 - 1:58 pm | शिल्पा ब

अ‍ॅ हॅ हॅ हॅ हॅ .....अवलियामुळे हे लेखन समोर आलं म्हणुन त्याला धन्यवाद.
मस्त..

स्मायल्या आणा रे परत!!

चिगो's picture

21 Feb 2011 - 2:27 pm | चिगो

येकदम टकाटक.. :-)

मेघवेडा's picture

10 Feb 2012 - 10:43 pm | मेघवेडा

"आर बाबांव गनपती सारोजनीक हाय , द्रुपदी नाय." मास्तर

"मना पत्ते सरस येतान मंग मी कना शो दीउ ?"

=)) =)) हहपुवा! _____/\_____

सोत्रि's picture

10 Feb 2012 - 10:59 pm | सोत्रि

अरे हा दादूस कुठे हरवला आहे?
ह्याला शोधून काढा कोणीतरी....

- ( ब्रिटीश दादूसचा पंखा ) सोकाजी

टुकुल's picture

11 Feb 2012 - 3:16 am | टुकुल

हा लेख वर आलेला पाहुन पहिल्यांदा हाच विचार आला..

--टुकुल

बॅटमॅन's picture

8 Sep 2013 - 2:11 pm | बॅटमॅन

हा लेख वर काढत आहे. निव्वळ अप्रतिम!!!!

प्रचेतस's picture

8 Sep 2013 - 2:50 pm | प्रचेतस

जबरी रे.
खल्लास धागा आहे.

ब्रिटिश दादुस सध्या हांव कुटं?

तिमा's picture

8 Sep 2013 - 4:54 pm | तिमा

थोर लेखन. फार पूर्वी डोंबिवलीत या भाषेशी परिचय होता. शाळेतले वर्गमित्र ही, गारुन टाकेल,चिरुन टाकेल, अशा प्रेमळ धमक्या द्यायची.

मुक्त विहारि's picture

9 Sep 2013 - 4:20 pm | मुक्त विहारि

ख्फिह्फिउव्ह्फिउहि

ह्या बिटिस कुटं गेला....

पोकल बांबूचे फटके हाना त्याला....

अनिरुद्ध प's picture

12 Sep 2013 - 4:25 pm | अनिरुद्ध प

जल्ला तुला बरा जमता हाडुक सोदाया,
मिथुन भौ लै भारि लिवलया ?

होबासराव's picture

25 Feb 2016 - 7:54 pm | होबासराव

आनी मंडली द्रुपदि सोरुन सगल्यांची वस्त्रहरना झायली.

आर बाबौ हहपवा :))

विजुभाऊ's picture

15 Mar 2019 - 5:13 pm | विजुभाऊ

मजा आली पुना वचून.
मिथन्या कुठं हायेस रं बाला.
लईच मिसवतोय सगल्यानला