मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सारोजनीक गनपती उत्सव - खारपाडा

ब्रिटिश · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मांगच्या सालची गोस्ट सांगतय कमीटीची मीटींग झाल्ती मीटींगमदी ठरला क ह्ये गनपती उत्सवान गावचा नाटक बसवाचा. पन ईशय कोन्ता ? कूनी म्हनालं सामाजीक ठीवा, त कुनी म्हनल सांस्क्रुतीक , त कुनी आनकी कसला चीक्कार भांडना झायली पन कुन्याव कई बी आयकना. तवा काश्या (माजा बा मंडली, काशिनाथ भोईर, पन तेला सगलीजना काश्या म्हनुनच वलीकतान. आवराच नाय तो सोता पन काशिनाथ म्हुन हाक दील्ली क पाच मिन्ट ईचार करुन ओ देतं) उबा राह्यला न म्हनला "यंदा आपून ऐतीहाशीक नाटकच कराचा. क र मास्तर ?" मास्तर कमीटीचा आद्यक्श. पन त्याचे डोल्यासमोर बांबू फिरलं. "व्हय व्हय ! आपून ऐतीहाशीक नाटकच कराचा. " मास्तरचा अनूमोदन ईशय फिक्स - 'द्रुपदी वस्त्रहरन' "चला आता काश्टींग करुया " मास्तर म्हन्जे ? म्हात्र्यांचा सुरया "आर म्हन्जी कोनी कोनी क कराचा ते. तर मंडली , डायरेक्टर मीच होतय आनी नाटक बी लीवतं. मना म्हाईत हाय ईतीहास" मास्तर "बर मंग आता एयाक्टर बी तुमीच ठरवा. " बाबू घरत - खजिनदार हां. तर आता धर्मराज कोन ? मी हुतय " भास्कर राउताचा बंड्या अर्जुन .. भिम .. नकुल .. सगली पांडवा झायली "दुर्योदन ?" "तुकाराम तु हो." "पन मास्तर मना टेजवर बोलाया जमन? "आर तु कई नाय बोलाचा. निस्ता पाच येला ह्य ह्य करुन हासाचा बोल." मास्तर दुशासन कोन ? सगल्यांचा हात वर "आर बाबांव गनपती सारोजनीक हाय , द्रुपदी नाय." मास्तर "ह्या काम आपन पक्याला देव . कुनाचा आब्जेक्सन ?" सगली मान्सा चिप रायली बोल. पक्या बीनईरोद दुशासन. आता द्रुपदी सगली लोका यकमेकांचे तोंडाकड बगु लागली. कोनाव कई बी सूचना आपल्या बायकामुली कोन पाटवल पक्या करुन पातल सोरवाला. कई ईपरीत झाला तर कवरा लफरा वाडलं "पनवेलचे 'मल्लिका' मदी माजी वलक हाय." बारक्या म्हनाला "तीतुन आनु यकादी." "जमल जमल , आनी तीचा यक डांस बी ठीउ . मोप गर्दी जमल. " रेसल सुरु . सगला येवस्तीत जमला पन येक लफरा झाला "द्युत" कसा खेलाचा ह्ये मास्तरला कलना. आता मास्तरलाच म्हाईत नाय म्हन्जे बाकी सग्ल्यांची बोंब. क कराचा "आरं पोराव कना घाबरता, यक काम करा तीन पानी खेला. लासला धर्मराज हरल न मंग द्रुपदीचा वस्रहरन करु. क बोल्ता?" दत्ता पाटील बोल्ला ह्ये बी पटल सर्वांना. नाटक सुरु झाल झाल्त काय मंडली , काश्या न बंड्या दोगव भट्टीची लाउन आल्ते आनी यकमेकांच डायलाग बोलत व्हते. सगला लोच्या चाल्ला व्हता शेवटी यकदाचा धर्मराजान दुयोधनाला तीन पानीच आवतान द्दील्ल नी 'द्युता' स सुर्वात झाली पन धर्मराज जिकतच गेला . दुयोधनाला पत्ताच येयना . दुयोधनाला एक्का जोड त धर्मराजाला कलर दुयोधनाला कलर त धर्मराजाला राऊंड दुयोधनाला चट्टी त धर्मराजाला तीन तीर्या मास्तर ईंगेतून वरडा लागले धर्मराजा तुला हराला पायजेल, तुला हराला पायजेल , काश्या तराट , तो कइ आयकना "मना पत्ते सरस येतान मंग मी कना शो दीउ ?" दुयोधन रास हरला . काश्या उटला " द्रुपदीला हाना. मी सोरनार पातल . माजा आदीकार हाय तो." दुयोधन म्हनाला " नाटकान क लीवलय ? मीच द्रुपदी ला मांडीव बशीवनार" दुशासन म्हनाला "मीच द्रुपदीची सारी वडनार" हा लफरा वारला. ही मारामारी . आनी मंडली द्रुपदि सोरुन सगल्यांची वस्त्रहरना झायली. मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)

वाचने 34422 वाचनखूण प्रतिक्रिया 57

In reply to by नंदन

मुक्तसुनीत Fri, 09/05/2008 - 22:40
लई भारी !! "सारे प्रवासी घडीचे" ची जबरदस्त आठवण झाली !

टारझन Fri, 09/05/2008 - 22:10
बाला मना तुजा म्हाभारत आवाडलांव... क लितय .. क लितय ...हासून हासून छातिचा पिंजरा न धुंगनाव्या खॉब्र्याच्या वाट्या झाल्या -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

प्राजु Fri, 09/05/2008 - 22:26
लय भारि लिवलय... कसा सुचता तुला य बासे मंदी लिवाला?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सर्किट Fri, 09/05/2008 - 23:47
मच्छिंद्र कांबळींच्या वस्त्रहरणाची आठवण झाली !!! मस्त॑ रे मिथुन ! -- सर्किट

विसोबा खेचर Sat, 09/06/2008 - 00:50
रं बाला मिथून, लै लै लै लै लै भारी लिवलंस बोल! तुजे पाय मना दाव, पकराचे हायत बोल! :) तात्या भोईर, अंजूरफाटा.

In reply to by विसोबा खेचर

ब्रिटिश Mon, 09/08/2008 - 12:08
दादुस, पयाची झेरोस दील्ली त चालल क ह्ये ह्ये हे मिपावरची भाश्या चेंजवनारा मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)

शैलेन्द्र Sat, 09/06/2008 - 00:57
"मास्तर कमीटीचा आद्यक्श. पन त्याचे डोल्यासमोर बांबू फिरलं. " बांबू पोकल होता न? बांबु पोकल्च बरा....

ईश्वरी Sat, 09/06/2008 - 01:17
मस्त लिहीलयं .
"आर तु कई नाय बोलाचा. निस्ता पाच येला ह्य ह्य करुन हासाचा बोल." मास्तर "आर बाबांव गनपती सारोजनीक हाय , द्रुपदी नाय." मास्तर "आरं पोराव कना घाबरता, यक काम करा तीन पानी खेला. "
ह. ह. पु. वा. ईश्वरी

रेवती Sat, 09/06/2008 - 03:44
भरपूर हसले. हे सगळं खरं घडलयं का? असल्यास तुमच्या वडीलांबद्द्ल लिहीताना अडचण आली का? रेवती

शितल Sat, 09/06/2008 - 09:31
अरे बाप रे हसु हसुन वाट लागली.:) मस्त मजेशीर किस्सा आहे. :)

जैनाचं कार्ट Sat, 09/06/2008 - 10:46
:D =)) राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

सहज Sat, 09/06/2008 - 11:31
आनी मंडली द्रुपदि सोरुन सगल्यांची वस्त्रहरना झायली. अरे कोणी ह्या मिथुनदाचा फोटो लावा रे. जबरी! सारे भोईर खानदान खतरनाक हाय भो! आज्जा, बा, नातू जियो!!!!!!!

झकासराव Sat, 09/06/2008 - 12:08
=)) जबरा रे! तुझी ही आग्री (बरोबर आहे ना?) भाषा वाचली की मला तो हास्यसम्राट मधील एक स्पर्धक आठवतो. तो देखील आग्री लोकांचे भारी विनोद सांगत असे त्या भाषेत. मस्त वाटते ही भाषा :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

अनिल हटेला Sat, 09/06/2008 - 12:09
जल्ला हासून हासून मी दमून गेलो ना रे !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

विजुभाऊ Sat, 09/06/2008 - 12:26
आर बाबांव गनपती सारोजनीक हाय , द्रुपदी नाय." मास्तर ठ्यॉ =)) =)) =)) जल्ला ता सगला सोरला आन गनपती दरला रं बाला पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

अवलिया Sat, 09/06/2008 - 16:00
दुयोधनाला एक्का जोड त धर्मराजाला कलर दुयोधनाला कलर त धर्मराजाला राऊंड दुयोधनाला चट्टी त धर्मराजाला तीन तीर्या मास्तर ईंगेतून वरडा लागले धर्मराजा तुला हराला पायजेल, तुला हराला पायजेल , काश्या तराट , तो कइ आयकना "मना पत्ते सरस येतान मंग मी कना शो दीउ ?" =)) =)) =))

धमाल मुलगा Mon, 09/08/2008 - 12:19
मायला, काय लिवतो का काय कर्तो रे बोल? जल्ला, हापिसात बसुन वाचलां आन खुर्चीतून पर्लो ना मी, बोल! "आर बाबांव गनपती सारोजनीक हाय , द्रुपदी नाय." मास्तर __/\__ =)) ठ्ठोऽऽ!!!!!
दुयोधनाला एक्का जोड त धर्मराजाला कलर दुयोधनाला कलर त धर्मराजाला राऊंड दुयोधनाला चट्टी त धर्मराजाला तीन तीर्या
कोनच्या क्लबात जायचा रं धरमराजा? जबरा रे... अगदी...आजा, बा,आन् नातु तिघेही जबरा रे तुम्ही!!!! अवांतरः बाला, जल्ला मनां आग्री शिकव ना...लै मज्जा येते बोलायला

ऋचा Mon, 09/08/2008 - 14:26
"आर तु कई नाय बोलाचा. निस्ता पाच येला ह्य ह्य करुन हासाचा बोल." मास्तर "आर बाबांव गनपती सारोजनीक हाय , द्रुपदी नाय." मास्तर "आरं पोराव कना घाबरता, यक काम करा तीन पानी खेला. " =)) =)) =)) काय लिवतो रे तु!! माना बी शिकव ना ही भासा लै बेस वाट्ट बग बोलाया :) "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

साज१९८१ Tue, 09/09/2008 - 08:19
जल्ला लिहिल तु भरि रे!! पन ते काश्या आदी दुशसन होत बिनेईरोद न मग धर्मराजा कसे झाल शेवटी? :)

दिपक Tue, 12/30/2008 - 12:20
आनी मंडली द्रुपदि सोरुन सगल्यांची वस्त्रहरना झायली. =)) =)) जबरा! बाला जाम हाशिवला तु.. ---दिपक

राघव Tue, 12/30/2008 - 19:53
"आर बाबांव गनपती सारोजनीक हाय , द्रुपदी नाय." मास्तर =)) =)) =)) अरे बापरे... कसलं भारी लिहिलंयंस रे ब्रिटीशा..! बाकी ही भाषा वाचून ती शिकायची इच्छा होतेच. मलाही झाली. शिकवणी चालू कर एखादी! :) मुमुक्षु

भास्कर केन्डे Wed, 12/31/2008 - 03:40
भोईर सायबा, काय लिहिलं आहे राव!!! एकदम षटकारांचे षटकार मारलेत. स्वतः पूलंनी सुद्धा तुमची पाठ थोपटली असती हे वाचून... येऊ द्या आजून. आपला, (पनवेलचा आगरी) भास्कर

शिल्पा ब Mon, 02/21/2011 - 13:58
अ‍ॅ हॅ हॅ हॅ हॅ .....अवलियामुळे हे लेखन समोर आलं म्हणुन त्याला धन्यवाद. मस्त.. स्मायल्या आणा रे परत!!

मेघवेडा Fri, 02/10/2012 - 22:43
"आर बाबांव गनपती सारोजनीक हाय , द्रुपदी नाय." मास्तर "मना पत्ते सरस येतान मंग मी कना शो दीउ ?"
=)) =)) हहपुवा! _____/\_____

सोत्रि Fri, 02/10/2012 - 22:59
अरे हा दादूस कुठे हरवला आहे? ह्याला शोधून काढा कोणीतरी.... - ( ब्रिटीश दादूसचा पंखा ) सोकाजी

तिमा Sun, 09/08/2013 - 16:54
थोर लेखन. फार पूर्वी डोंबिवलीत या भाषेशी परिचय होता. शाळेतले वर्गमित्र ही, गारुन टाकेल,चिरुन टाकेल, अशा प्रेमळ धमक्या द्यायची.