सांडून येतो..

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
24 Nov 2010 - 10:49 pm

मला यत्ता चौथी पर्यंत हिंदी यायचं नाही..

शाळेत विषयच नव्हता..

यायचं नाही म्हणजे नाही…अजाबात नाय…

म्हणून जे काही दिसेल ते मराठीतच समजून घ्यायचं..

मुकद्दर का सिकंदर हा सिनेमा..

आम्ही चाळकरी पोरं “मुकंदर का सिकंदर” असं म्हणायचो..

आणि त्याचा अर्थ आमच्या दृष्टीनं लिटरली मराठी होता: “मुकंदर ? …का सिकंदर?” म्हणजे “चहा की कॉफी?” ..
“मुकंदर ऑर सिकंदर ?”.. मेक युअर चॉईस…

कुर्बानी “पिच्चर” मध्ये आप जैसा कोई हे मस्त डिस्को गाणं आलं..

मूळ अर्थ कळत नसल्यानं जे ऐकू येईल ते खरं..

“आप जैसा कोई मेरी जिंदगी में आये..तो बाप बन जाये..”

सीरीयसली असंच वाटायचं..जोक करायचा म्हणून नव्हे..

मग थोड्या दिवसांनी..

“आप जैसा कोई मेरी जिंदगी में आये..तो वापस जाये..”

असं…

“तोहफा तोहफा..लाया लाया..”असं गाणं सुपरहिट्ट एकदम..

मला त्यात (शिवाजी महाराजांची असते तशी) “तोफ” हा शब्द दिसून मनापासून कोणीतरी युद्धासाठी तोफा घेऊन आलाय आणि तसं गाऊन श्रीदेवीला सांगतोय असं वाटायचं..

“तोफा तोफा लाया लाया..” काय चूक आहे त्यात?

पाण्याच्या टाकी विषयी माहिती देणारं “टाकी ओ टाकी ओ टाकी टाकी टाकी रे..” असंही एक सुंदर गीत होतं..

“प्यार करनेवाले प्यार करते है ‘शाम’ से..” असंही ढिंगचॅक गाणं माझं लाडकं..

‘शान’से हे नंतर कळलं..

पण संध्याकाळपासूनच चौपाटीवर जागा पकडून बसलेली गुटर्गू मंडळी बघून हा माझा अजाण वयातला अर्थही आता बरोबरच वाटतो..

माझा चाळीतला चाळूसोबती मला सिनेमाची स्टोरी सांगत होता..

“….अरे तो प्रेम चोप्रा ना मीनाक्षी शेशाद्रीवर बलात्कार करतो..”

“म्हणजे काय करतो नक्की ?” मी ज्ञानलालासेनं विचारता झालो..

तो थोडा विचारात पडला..

मग …”अरे बलात्कार..म्हणजे हिकडे तिकडे हातबीत लावून सतावतो तिला तो..”

हलकेच मला समजावत तो वदला..

दोघेही तिसरीत होतो..असो..

मराठी, संस्कृत वगैरे मध्येही ऐकून अर्थ लावण्याची बोंबच होती..

“सा विद्या या विमुक्तये” हे शाळेचं बोधवाक्य मला “चावी द्याया विमुक्तये” असं ऐकू यायचं..

अर्थ नाहीच कळायचा..पण चावी किंवा किल्लीशी संबंधित..चावी द्यायला हवी आहे..किंवा तत्सम काहीतरी वाटायचं..

“सदाचार हा थोर सांडू नये तो” हे मला “सदाचार हा थोर सांडून येतो” असं ऐकू यायचं..म्हणजे “मी जरा जाऊन सदाचार सांडतो आणि येतोच परत लगेच..”

”आज ये अंगणा पाहुणा गोजिरा..” अशी कविता होती..

त्यात “श्रावणी न्हातसे..अश्विनी गातसे..” अशी ओळ होती..

मला आमच्या वर्गातल्या त्याच नावाच्या मुली अनुक्रमे नहात आणि गाणं गात आहेत असं डोळ्यासमोर यायचं..

“आली आली सर ही ओली..” हे गाणं ऐकलं की आमच्या रत्नागिरीच्या धुवांधार पावसात भिजून ओले झालेले साळवी सर (सर्वात कडक्क सर..!!) वर्गाच्या दारात आलेत असं वाटायचं..

गंजका खिळा,पत्रा वगैरे लागला की धनुर्वात होतो असं ऐकलेलं..आम्ही एकमेकांना सांगायचो..”अरे पत्रा लागलाय ना तुला..आता तुला धनुर्विद्या होणार”.. की बिचारा कापलेला पोरगा गळफटायाचा..

नगरपालिकेच्या व्यायामशाळेत दर शनिवारी शेंदूर लावून आम्ही सगळे हनुमान स्तोत्र म्हणायचो..

तालीम मास्तर खड्या आवाजात “भीमरूपी महारुद्रा” सुरु करायचे..

खोब-याच्या आशेनं आम्ही उभे असायचो..

त्यात एका ठिकाणी “हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी..” अशी ओळ यायची..

मला एकदम वाटायचं की श्लोक संपले आणि मास्तर काहीतरी “हे धर” म्हणून सांगताहेत..म्हणून एकदा मी “धरायला” पुढेही झालो होतो..

पुढे हायस्कूल सुरु झालं..बरंच काही नीट समजायला लागलं..जमिनीवर टाकून बसायची बस्करं गेली आणि लाकडी बेंच आली..

मग चुपचाप समोरच्या डेस्कात कर्कटकानं खोदखोदून आरपार भोकं पाडण्याची वर्षं सुरु झाली..

मज्जा..!!

चित्रपटविचार

प्रतिक्रिया

"गौरी-हरा चा कुमार
नाव त्याचे लंबोदर"

असा एक अभंग आहे

लहानपणी हा आम्ही

"गौरी हरा चाकू मार
नाव त्याचे लंबोदर"

असा म्हणत असू.

मराठे's picture

22 Aug 2012 - 1:04 am | मराठे

धागा वर काढल्याबद्धल धन्यु!
थोडी भरः
शुभंकरोती कल्याणम् | आरोग्यम् धनसंपदा ||
शत्रुबुद्धी विनाशाय | 'दिपक जोशी' नमोस्तुते ||

मन१'s picture

22 Aug 2012 - 1:18 am | मन१

पुन्हा एकदा लहानपनीची सैर घडवलीत. आमचही बहुतांशाने अस्सच व्हायचं. गाणीही तीच "प्यार करनेवाले" वगैरे.
"ए तो बलात्कार करतो म्हणजे रे काय करतो" हे आमचेही तेव्हाचे प्रश्न

इरसाल's picture

22 Aug 2012 - 9:52 am | इरसाल

हे कसे काय सुटुन गेले होते.

तिमा's picture

22 Aug 2012 - 10:15 am | तिमा

चारुशीला साबळे यांचे लग्न झाले होते त्या सुमारास आम्हाला ही जाहिरात अशी ऐकू यायची.

जरासी सावधानी जिंदगीभर वाच्छानी!

नि३सोलपुरकर's picture

22 Aug 2012 - 4:08 pm | नि३सोलपुरकर

धागा वर काढल्याबद्धल ...
जबरदस्त आहेत एकेक किस्से. ह.ह.वाट लागली
हे कसे काय सुटुन गेले होते समजत नाही
शाळेत असतांना आम्ही असेच मजा करायचो." निले गगन के तले "ह्या गाण्याच्या चालीवर "निले गगन के तले सवेरे संडास को चले ,हाथ मे लोटा .लोटे मे पानी....

(गवि चे खास आभार लहानपनीची सैर घडवल्याबद्दल)

अक्षया's picture

22 Aug 2012 - 4:24 pm | अक्षया

लहान पणी सुधीर फडकेंचे सखी मंद झाल्या तारका हे गाणे, मती मंद झाल्या तारका असे म्हणायचो. :)

तेच आम्ही
"सखी स्वस्त झाल्या खारका
आता तरी खाशील का?" असं म्हणायचो :)

कपिलमुनी's picture

22 Aug 2012 - 5:45 pm | कपिलमुनी

या कुंदेंदुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता |
या वीणावरदण्डमंडितकरा या श्वेतपद्मासना ||
या ब्रह्माच्युतशंकरप्रभ्रृतिभिर्देवै: सदा वन्दिता |
सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेषजाड्यापहा |

या प्रार्थनेने बालपणात प्रचंड त्रास दिला आहे ..
प्रत्येक पोरगा वेगळा उच्चार करायचा...विशेषत "जाड्यापहा " " ब्रह्माच्युतशंकरप्रभ्रृतिभिर्देवै"

आणि पोरं नको तिथे शब्द तोडायची ...मग फारच इनोदी प्रकार व्हायचे !!

सुहास झेले's picture

28 Aug 2012 - 12:46 pm | सुहास झेले

हा हा हा .... :) :)

मी एकटाच असा नव्हतो, हे पाहून डोळे पाणावले ;-)

मीपण अगदी लहानपणी या शब्दात गोंधळायचो. उच्चार काय ते समजेपर्यंत, रोज, काही न बोलता, फक्त तोंड हालवायचो. शेजाऱ्याला पण समजायचं नाही.

प्रथम धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद!

गवि, खूप हसलो.. मस्त आठवणी सांगीतल्यात.. त्यात बर्‍याचशा माझ्याच असल्यासारख्या आहेत!

"कर्पूरगौरं.." म्हणतांना अजुनही गोंधळ आहेत...

आता हे बरोबर ..

कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्
सदा वसन्तं हृदयारविंदे भवं भवानीसहितं नमामि
मंदारमाला कुलितालकाय कपालमालांकित शेखराय
दिव्यांबराय च दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय|

की हे बरोबर..

कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्
सदा वसन्तं हृदयारविंदे भवं भवानीसहितं नमामि
मंदारमाला कुलिक्तालकाय कपालमाला सशी शेखराय
दिव्यांबराय च दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय|

राघव

तर्री's picture

26 Aug 2012 - 12:10 pm | तर्री

माझा हिंदी बरोबर इंग्रजीशी पण सम्बंध नव्हता. त्यामुळे खेळात आम्ही नाटॅठोम,टयामप्लीस, असे शब्द आयात केले होते.

फियान्सी हा शब्द ऐकला तेंव्हा मला तो "फियान्सिंग" असा ऐकला आणि चक्रावून गेलो होतो ! आता तो प्रसंग आठवून हसू येते.

"झुटा अपना देश हम परदेसी हो गये" - असे ऐक गाणे रेडिओ वर वाजत असे. भारतीय रेडिओ हे देशद्रोही गाणे कसे काय वाजवू शकतो असा प्रश्न मला पडत असे.

बदला ये मोसम - हे मला बदला = सूड असे वाटत असे. लागे प्यारा जग सारा चा अर्थच लागत नसे मग.

"छोड दो आचल" चा ही अर्थ कळत नव्हता आणि जो काळला होता तो "अश्लील" होता.
"रूप तेरा मस्ताना " हे रूप तेरा मस्त (आहे) ना ? असा प्रश्न तो नायक तिला विचारतो आहे असे वाटे .

आनंद घारे's picture

11 Dec 2012 - 8:13 pm | आनंद घारे

मागे एका मित्राने 'कोटीच्या कोटी उड्डाणे' नावाचा असाच मजेदार धागा काढला होता. हा धागा आणि इथले प्रतिसाद वाचून त्याची आठवण झाली. त्या धाग्याचा दुवा मिळेल का?

मला लेख आणि प्रतिसाद दोन्ही दिसत नाहीत...

अरे एक महिना होत आला तरी लेख वाचनेबल केला गेला नाही आहे. असे का ??????????

धन्यवाद पण तेव्हडे जरा प्रतिसाद पण वाचु द्या की.

धन्यवाद खुप खुप धन्यवाद

नन्या's picture

8 Dec 2012 - 8:04 pm | नन्या

लहानपणी शाळेत मास्तरांनी विचारले की "तमसो मा ज्योतीर्रगमयी" चा अर्थ सांगा. वर्गमित्र म्हणाला "तुमची आई ज्योतिबाला गेली."

अभ्या..'s picture

8 Dec 2012 - 8:14 pm | अभ्या..

उंच उंच गगनी दिसे गरुड हा पहा(?), प्रिय अमुच्या शाळेचा ध्वज दिसे पहा. हे शाळेचे ध्वजगीत गाताना,
उंच उंच गगनी दिसे गरुड चावला, प्रिय अमुच्या शाळेचा मास्तर कावला. हेच आम्ही म्हणत होतो.

मी पण लहानपणी असंच काहीबाही ऐकत असे ....
'उगवला चन्द्र पुनवेचा' ह्या बकुळ पंडित ह्यांनी गायलेल्या गाण्यात एक ओळ होती 'दाहि दिशा कशा फुलल्या' आणि मी ऐकत असे 'दाढि मिश्या कश्या फुलल्या' ... वर मी माझ्या तीर्थरुपांना विचारले पण कि इथे 'दाढि मिश्या कशा फुलल्या' असं का म्हणतात ..... आणि आमच्या घरात एक प्रचंड हास्यस्फोटच झाला ....

एकदा माझी मुलगी लहान असताना तिने पहिल्यांदा 'सखी मंद झाल्या तारका' ऐकले तेव्हा ती हे गाणं गुणगुणायला लागली. मी तिला गोंधळून टाकण्यासाठी सांगत असे कि खरे बोल आहेत की 'सखी बंद झाल्या तारका' .... तिलाही ते बरेच दिवस खरंच वाटत होतं ....
तसंच नात्यातली एक छोटी मुलगी गाणं म्हणत असे 'साजनजी घर आये, दुल्हन ट्यूशन जाये'

उत्तम चोरगे's picture

8 Dec 2012 - 10:08 pm | उत्तम चोरगे

उडाला उडाला कपि उडाला साता समुद्राच्या पलीकडे गेला च्या ऐवेजी आम्ही उडाला उडाला पक्षी उडाला साता समुद्राच्या पलीकडे गेला असे म्हणायचो.

माझी मुलगी ३.५ वयाची असतांना "घरातली ईडापिडा बाहेर जाओ, बाहेरची लक्ष्मी घरात येओ, 'बाहेरच्या' धन्याला उदंड आयुष्य मिळो.
अस म्हणायची.

गणपतीच्या आरतीत हमखास काही पुणेरी मंडळी
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे या ऐवजी संकष्टी पावावे...... असे म्हणतात.

बॅटमॅन's picture

10 Dec 2012 - 1:52 pm | बॅटमॅन

+१.

ते संकष्टी पावावे वैग्रे ऐकून गणपती संकष्टी सोडून अन्य दिवशी पावत नाही का, नसल्यास का, अशा प्रष्णांनी वैताग आणला होता ते आठवले.

प्रकाश घाटपांडे's picture

9 Dec 2012 - 2:47 pm | प्रकाश घाटपांडे

गावात हरिपाठ असायचा. तेव्हा भजन म्हटले जायचे. ते असे शब्द तोडून
तुहा ईठ्ठ ल बरवा | तुहा माध व बरवा||

माझ्या लहानपनी "छोड दो आचल जमाना क्या कहेगा" हे गाने मी "खोल दो आचल जमाना क्या कहेगा" असे म्हनायचो..एकदा माझ्या मोथ्या भावाने ऐकले आनी मला बदडउन काधले.

"कर्मन्ये वाधिकारस्ते" हे "कर्मन्ये राधिका अस्ते" असे काहिसे म्हनायचो.

आनन्दिता's picture

10 Dec 2012 - 11:06 pm | आनन्दिता

लहानपणी मी घुंगट की आड से 'दिलगर' का असं म्हणायचे
हिंदीच काय पण या असल्या अर्थाचं काहीच न समजण्या इतक वय...!
शिवाय गाण्याच्या शेवटी "दिलगर का दिलगर का दिलगर का ,हा........ दिलगर का दिलगर का दिलगर का"
हे इतक्यांदा गायलंय की मला उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेर गारेगार विकायला येणाराच्या "गारे गारे गोडे गोडे" या आरोळीशी त्याच साम्य वाटायचं त्यामुळे "दिलगर" हा गारेगार सारखा एखादा तत्सम पदार्थ असुन नायक व नायिका त्याची गाणं गाऊन जाहिरात करत आहेत अस काहिसं वाटत असे.....

केदार-मिसळपाव's picture

11 Dec 2012 - 1:36 pm | केदार-मिसळपाव

अरे व्वा... मी "दिलबर का दिलबर का दिलबर का" ऐवजी... "गुलबर्गा गुलबर्गा गुलबर्गा" असे कारन यमक चान्गले जुलायचे.

सुबक ठेंगणी's picture

11 Dec 2012 - 6:43 am | सुबक ठेंगणी

"ये दुनिया इक दुल्हन ये माथेकी बिंदिया...ये मेरा इंडिया... आय लव्ह माय इंडिया" चं माझ्या भाचीने निरागसपणे की काय ते केलेलं विडंबन "ये दुनिया दिल का तरू...हेमा अंडी इंडिया...ये मेरा इंडिया...आयला मा इंडिया...
स्वतःला अतिशय प्रिय अशा अंड्याचा आणि आयला ह्या शब्दाचा मोठा चपखल वापर वाचकांच्या नजरेतून सुटू नये...

श्रीरंग_जोशी's picture

12 Dec 2012 - 2:54 am | श्रीरंग_जोशी

भारी धागा अन प्रतिसादही.

माझेही असेच काहीसे अनुभव...

१. शादी कुत्तों का त्यौहार, लिज्जत पापड हो हर बार... (शादी, उत्सव या त्यौहार हे तसे ऐकू यायचे त्याला मी तरी काय करणार?)
२. मुन्नाभाई एम बी बी एस मधले चंदामामा सोये गाण्यात मी चौथ्या ओळीत 'गली के कुत्ते भागे' असे म्हणत असे, एकदा जालिय अंतरा मुखडा खेळताना माझी फार उडवल्या गेली होती. कारण 'घडी के कांटे' च्या ऐवजी मी सरळ गली के कुत्ते करून टाकलं होतं.
३. माझा एक भाचा लहान असताना डाबर वाटिका केशतेलाची मराठी जाहिरात अनेकदा लागत असे. त्यात वाक्य होते - 'बोल पुत्रा बोल, कशामध्ये आहे निसर्गाची शक्ती?' तर माझा भाचा ते वाक्य 'बोल कुत्रा बोल, कशामध्ये आहे निसर्गाची शक्ती?' असे म्हणत असे ;-).

अभ्या..'s picture

13 Dec 2012 - 3:05 am | अभ्या..

दिल मधले 'खंबे जैसी खडी है पटाखे की लडी है'
हे गाणं एक मित्र 'खंबे जैसी खडी है पट्टा लेकर खडी है' असे म्हणत असे.
आणि तेच बरोबर आहे हे पण तावातावाने सांगत असे.

पिलीयन रायडर's picture

27 Dec 2012 - 3:36 pm | पिलीयन रायडर

'खंबे जैसी खडी है पट्टा लेकर खडी है' असं नाहीये ते??????

आनन्दिता's picture

12 Dec 2012 - 7:02 am | आनन्दिता

हि हि हि ......
काय हो जोशीबुवा कुत्र्यांवर फार जीव दिसतोय तुम्चा !!! ;)
बाकी "शादी कुत्तों का त्यौहार " धमाल वाटलं एकदम .....

चिर्कुट's picture

27 Dec 2012 - 2:42 pm | चिर्कुट

माझे वरातीमागूनचे घोडे पळवू का? पळवतोच..
माझे फेव्हरेट गाणे: चंदाराणी, चंदाराणी, का गं दिसतेस 'ट'कल्यावाणी?? :)

बाकी हा धागा नजरेतून सुटला होता. हहपुवा झाली काही प्रतिसाद वाचून..

समीरसूर's picture

27 Dec 2012 - 5:11 pm | समीरसूर

काय लिहिलंय...वा वा वा! मजा आ गया...

खूप छान!

--समीर

चेतन माने's picture

8 Feb 2013 - 2:52 pm | चेतन माने

लेख आणि प्रतिसाद वाचून हहपुवा झाली
माझे वडील एक आठवण सांगतात , त्यांचे भाऊ (माझे काका) लहानपणी आरतीत "दुर्गे हलकट भारी तुजवीण संसारी" असं म्हणायचे !!!

लहानपणी तांब्याला समानार्थी शब्द लोटा हे कळलं, आणि त्याच सुमारास "वो मेरी निंद, मेरा चैन मुझे लोटा दो" हे गाणं ऐकण्यात आलं. तेव्हा त्या बयेला तिची झोप, साखळी (चैन म्हणजे तिची गळ्यातली साखळी असंही वाटायचं तेव्हा), आणि तांब्या का हवाय हे माझ्या बालमनाला कित्येक वर्ष उमगलं नव्हतं... :)

आँ? मी न लिहीताच माझ्या नावे नवा धागा कसा आला हे पाहून अचंबा झाला. पण आता आठवलं...

हे पुरातन परत परत वर कसं येतंय बॉ??

चला, त्यानिमित्ताने प्रतिसादांबद्दल धन्यवाद म्हणतो..

चेतन माने's picture

8 Feb 2013 - 3:38 pm | चेतन माने

अहो गवि तिकडे काथ्याकुटात काही जुन्या लेखनांचे धागे निघालेत त्यात निघालेल्या एक धाग्याच्या प्रतिसादात हा तुमचा धागा सापडला !!!
जाम मज्जा आली बघा वाचताना :D :D :D

धनंजय माने's picture

22 Mar 2016 - 4:17 am | धनंजय माने

माने कंचे वो तुमी ?

नानबा's picture

10 Feb 2013 - 9:08 pm | नानबा

सर्व प्रतिक्रिया वाचून आठवलेला किस्सा - लहानपणी कधीतरी पहिल्यांदाच एरि पवन ढूंढे किसे मेरा मन, चलते चलते, बावरीसी तू फिरे, कौन है तेरा सजन ही गझल, येडी पवन ढूंढे किसे मेरा मन, आणि बावळीसी तू फिरे अशीच कित्येक वर्ष डोक्यात होती.. :)

दादा कोंडके's picture

10 Feb 2013 - 11:11 pm | दादा कोंडके

परत वाचायला मजा आली.

बाकी, माझ्या एका मित्राला कोणतीही चुक न करता 'इचक दाना-बिचक दाना' गाणं घरी दोन-चारदा सांगुनसुद्धा परत म्हणल्यामुळे मार पडला होता. :)

यसवायजी's picture

11 Feb 2013 - 3:26 pm | यसवायजी

हरे राम हरे कॄष्ण..

बंड्या:
हले लांब हले लांब, लांब लांब हले हले
हले कुठणं हले कुठणं, कुठणं कुठणं हले हले

:)

प्रसाद गोडबोले's picture

15 Feb 2013 - 8:55 pm | प्रसाद गोडबोले

“तोहफा तोहफा..लाया लाया..”असं गाणं सुपरहिट्ट एकदम..

मला त्यात (शिवाजी महाराजांची असते तशी) “तोफ” हा शब्द दिसून मनापासून कोणीतरी युद्धासाठी तोफा घेऊन आलाय आणि तसं गाऊन श्रीदेवीला सांगतोय असं वाटायचं..

>>> हा हा हा ...लय भारी इनोद !१

मस्त लेखन !!

प्रसाद गोडबोले's picture

15 Feb 2013 - 9:03 pm | प्रसाद गोडबोले

लहानपणी
"दिवे लागले रे दिवे लागले रे तमाच्या तळाशी दिवे लागले रे" हे प्रसिध्द गाणे
कित्येक दिवस मला
"दिवे लागले रे दिवे लागले रे तमाशात आता दिवे लागले रे " असे ऐकु येत होते

गामा पैलवान's picture

17 Mar 2016 - 9:06 pm | गामा पैलवान

जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा
वो भारत देश है मेरा
वो भारत देश है मेरा

हे गाणं ऐकल्यावर परसोन्याच्या चिमण्या म्हणजे काय असा आमच्या बालबुद्धीस प्रश्न पडला होता.

-गा.पै.

खटपट्या's picture

19 Mar 2016 - 2:44 am | खटपट्या

हायला लय मस्त घागा हाय.
१. झीलाले मस्किन मुकुन बरंजीश, बहारे हीजरा बेचारा दील है. - याचा अर्थ अजुन कळलेला नाहीये.
२. नीशेष जाड्या पहा - हे तर दहावीपर्यंत असंच बोलत होतो. त्यानंतर बोलायची वेळ आली नाही.
३. मीथुनचे एक गाणे आहे ते - "आया मै डीस्को डान्सर" असे आहे का "आय अ‍ॅम ए डीस्को डान्सर" असे आहे?

दोन्हि चूक! ते आय एम अ डिस्को डान्सर अस आहे.

Shridhar Laxman Patil's picture

19 Mar 2016 - 10:26 am | Shridhar Laxman...

आम्ही चौथीमध्ये असताना आम्ही शेजारी पाचवीच्या वर्गात एक तक्ता पाहीला "रामपूर का मेला". आम्हाला प्रश्न पडला रामपूर का बरे मेला असेल.. आणि रामपूर हे एखाद्या माणसाचं नाव कसं काय असू शकतं. नंतर पाचवीच्या वर्गात गेल्यावर त्याचा अर्थ कळाला " रामपूर ची यात्रा/जत्रा" :-D

Shridhar Laxman Patil's picture

19 Mar 2016 - 10:26 am | Shridhar Laxman...

आम्ही चौथीमध्ये असताना आम्ही शेजारी पाचवीच्या वर्गात एक तक्ता पाहीला "रामपूर का मेला". आम्हाला प्रश्न पडला रामपूर का बरे मेला असेल.. आणि रामपूर हे एखाद्या माणसाचं नाव कसं काय असू शकतं. नंतर पाचवीच्या वर्गात गेल्यावर त्याचा अर्थ कळाला " रामपूर ची यात्रा/जत्रा" :-D

याच्या ऐवजी 'करगोटे बदलते रहे सारी रात हम' असे म्हणत असू.

"उठी उठी गोपाळा, अरुणोदय झाला" म्हणजे कुणी तरी गोपाळ नावाच्या माणसाला अरे तुला अरुण आणि उदय नावाची जुळी मुले झाली आहेत असे म्हणून उठवत आहेत असे वाटायचे.

Jack an Jill went up the hill ह्यांत हि टीनएजर मुले डोंगरावरच्या झाडीत जातात …. इथे माझी काय कल्पना होती हे न संगलेलेच बरे.

सिरुसेरि's picture

22 Mar 2016 - 6:29 pm | सिरुसेरि

सुरुवातीला "कट्यार काळजात घुसली" या नाटकाचे नाव "खट्याळ काळचा ब्रुस ली" असे ऐकले होते . त्यामुळे या नाटकात काहितरी जबरदस्त हाणामारी असणार असा समज झाला होता .

तर्राट जोकर's picture

23 Mar 2016 - 4:26 am | तर्राट जोकर

एक्सेक भारी प्रतिसाद. हसून ह्सून पुरेवाट. किती रोखुन ठेवलंय पण शेवटी फव्वारा फुटाच. आजुबाजुंच्यांना नक्कीच भुताटकीचा संशय येत असेल. ;-)

माझ्या पाचवीच्या वर्गात आशिष नावाचा जरा ऊंचेला मुलगा होता. राष्ट्रगीताच्यावेळेस रांगेत त्याला सर्वात मागे उभे राह्याला लागत असे. राष्ट्रगीतात 'तवशुभ आशिष मागे' आले की मी हटकुन मागे वळुन पाहायचो आणि त्याला इशारे करुन सांगायचो, बघ राष्ट्रगीतातच सांगितलंय, 'आशिष मागे आहे' म्हणून. ;-)