कन्या रास/ ६ व्या घरातील शुक्र

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
8 Feb 2013 - 3:38 am

डिसक्लेमर - कन्या राशीचे लोक व विशेषतः शुक्र ६ व्या घरात पडलेले लोक हे अतिशय व्यग्र व कर्तव्यपरायण असतात. यांच्या प्रेमाची अभिव्यक्ती ही "उपयोगी पडण्याकडे" खूप असते. पण ते रुक्ष नसतात, या ज्योतिषशास्त्राच्या समजूतीवर बेतलेला हा लेख असून ज्यांना ज्योतिषाचे वावडे असेल त्यांनी आताच दुसरा धागा उघडावा.

____________________________________________________________________

एकदा तुझे खूप लाड करायचे आहेत. अगदी मन भरुन, तुझ्या गालांवरुन, कानांवरुन अलगद हाताची बोटे फिरवत, तुझ्याही तनामनाच्या तारा झंकारुन उठाव्यात असे. अन नंतर तुझे पाय चेपून द्यायचे आहेत, तळवे चोळून. आवडेल तुला? आणि हो हे सर्व केव्हा तुला मनसोक्त चांगलं चुंगलं करुन खायला घातल्यानंतर.

तू मला अरसिक म्हणणार मला माहीत आहे. कारण तुझ्या प्रेमाची अभिव्यक्ती म्हणजे कामधाम सोडून, कविता वाचणे, सूर्यास्त अनुभवणे व अन्य .... पण ते सर्व "इम्पल्सिव्ह" अगदी मनस्वी, कलंदरपणे. मलादेखील ते सर्व अनुभवायचे आहे रे पण मी पडले "कन्या रास आणि ६ व्या घरात शुक्र" पडलेली प्रेयसी. फारशी काव्यात जगणारी नाही. 'वहावत जाणं" तर मला माहीतच नाही. मी, आपल्या प्रियतम व्यक्तीच्या "उपयोगी" पडण्याकडे कल असलेली. म्हणजे बघ - कोणी मला २ पर्याय दिले की मी तुझी सर्वात लाडकी प्रेरणा बनू शकेन अथवा तुझ्या आयुष्याच्या संध्याकाळी तुझा आधार व तुझी सहचारी बनू शकेन तर २ रा पर्यायच अतिशय आनंदाने निवडणारी. नवरंग सिनेमातील "जमुना" याच अगदी याच पठडीतली.

बरेचदा माझं असं वागणं तुला त्रासदायक होतं याचीही मला जाणीव आहे.म्हणजे सकाळी तू लाडात यावं आणि मी तुला आंघोळ, मुखपक्षालनाकरता पिटाळावं हाच आपला नॉर्म (नेहेमीचं). रात्री तुला एखादी गाण्याची अथवा कसेही मैफिल जागवण्याची हुक्की यावी पण माझ्या कर्तव्यदक्षतेमुळे , दुसर्‍या दिवशीच्या रुटीनच्या विवंचनेमुळे आपण तो बेत रद्द करावा हे अनेकदा घडतं. "यु आर नेव्हर इन द मोमेंट" ही तुझी नेहमीची तक्रार आणि त्यावर माझं उत्तर ठरलेलं - "कामंधामं सोडून कोण रमणार कलेत? चल सोड मला चिक्कार पसारा पडलाय"

"काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात,
क्षितीजाच्या पलीकडे ऊभे दिवसाचे दूत"

अशा कर्तव्यपरायणताप्रधान ओळी कुसुमाग्रजांना आमच्यासारख्या लोकांकडे पाहूनच सुचल्या असाव्यात.
पण याचा अर्थ असा नाही की मला तुझ्याबरोबर सूर्यास्त अनुभवायचा नाही. मलाही एक कविता तुझ्याबरोबर अनुभवायची आहे, अगदी तुझ्याशी तादात्म्य पावून, त्या कवितेला तुझ्या डोळ्यांतून वाचत. मलाही वाटतं तुझा हात हातात घेऊन,एकदा तरी सूर्यास्त निवांतपणे अनुभवेन. कधीतरी सगळं 'परफेक्ट" असेल, आणि माझ्या लगबगीची जरुरी नसेल. येईल असा दिवस नक्की येईल.

मुक्तकअनुभवमत

प्रतिक्रिया

पिवळा डांबिस's picture

8 Feb 2013 - 3:45 am | पिवळा डांबिस

कठीण आहे....
त्या ६व्या घरातल्या कन्येच्या प्रियकराचं!!!!
:(

शुचि's picture

8 Feb 2013 - 3:47 am | शुचि

हाहाहा :)
कठीण काय हो पिडां त्यात? सगळं पर्फेक्ट असेल तर शी कॅन ओपन अप :(

पिवळा डांबिस's picture

8 Feb 2013 - 3:58 am | पिवळा डांबिस

सगळं पर्फेक्ट असेल तर शी कॅन ओपन अप

हो, पण तोपर्यंत "गाढव मेलं वझ्यानं, आन शिंगरू हेलपाट्यानं!!!"
त्यापेक्षा 'माझ्याशि मयतरि कर्नार कं?' च्या घाऊक इ-मेल्स पाठवणं जास्त सोपं!!!
:)

=))
खरंय. शुक्राची उच्चीची रास मीन. त्या न्यायाने १२ वे स्थान शुक्रास अधिक लाभदायक. ६ वे हे घर बरोब्बर १८ अंशातून विरुद्ध. त्यामुळे शुक्र येथे थोडा फ्रस्ट्रेट होतोच. बाकी जाणकार अधिक पप्रकाश टाकतीलच.

मलातरी "जनाबाई" चे उदाहरण म्हणजे ६ व्या घरातील उच्चीच्या अर्थात मीनेच्या शुक्राचे वाटते. ६ वे घर कारण तिने कामात, रगाड्यात आनंद मिळवला, कविता केल्या, ईश्वराशी तादत्म्य साधले. ६ वे घर हे नोकरी, काम, व्यग्रता आदिचे निदर्शक आहे तसेच अन्य गोष्टी म्हणजे रोग, रिपु वगैरेही याच्या कारकत्वाखाली येतात पण ते अलाहिदा.

शुचि's picture

8 Feb 2013 - 4:08 am | शुचि

१८० अंश*

निनाद's picture

8 Feb 2013 - 7:19 am | निनाद

पण शुक्र स्वस्थानाला पाह्तो. त्याचे (शुक्र योग्य नक्षत्रात असेल तर) फायदे मिळणारच. चांगल्या रसिक गोष्टींवर, उंची मद्य, उंची अत्तरे वगैरे वर होईल वगैरे.

शुचि's picture

8 Feb 2013 - 7:23 am | शुचि

प्रत्येक ग्रहाची दृष्टी वेगवेगळी असते ना? शुक्र स्वत;पासून ७ व्या घराला पाहतो का? अ‍ॅस्पेक्ट्स/दृष्टी याबद्दल अजून तितकेसे वाचले नाही.

निनाद's picture

8 Feb 2013 - 7:39 am | निनाद

७ वी दृष्टी बाय डिफॉल्ट येतेच ना.
इतर दृष्ट्या मात्र निरनिराळ्या. फक्त एकच ग्रह भाव घेऊन विश्लेषण करणे अवघड वाटते.
येथे मनाचा विचार करत आहात, शिवाय सुख म्हणजे चौथा भाव. जोडीदारासंबंधित म्हणजे सप्तम, यात महत्त्वाचा भाव चंद्र आणि त्याला पाहणारे ग्रह यांची स्थिती कळल्या शिवाय कसे काय निष्कर्ष काढावेत? हे तर किमान कळलेच पाहिजे शिवाय बृहस्पती काय अवस्थेत आहे? त्याची दृष्टी कुठे आहे? यावर प्रेमाची गुणवत्ता पाहता येईल. मग ठरवता येईल पसारा प्रेमाने आवरला जातोय की मंगळाचा त्रागा त्यात आहे ते :)

पण थोडंफार जनरलायझेशन करता येईलच की :)
मला हे शब्दचित्र इतकं स्पेसिफिक नको होतं. जनरलाइज्ड हवं होतं.

मन१'s picture

8 Feb 2013 - 10:18 am | मन१

चर्चा नक्की कोणत्या भाषेत सुरु आहे तेच कळेना झालय.

राही's picture

8 Feb 2013 - 11:09 am | राही

माझ्या मते सहावे स्थान हे शुक्राला योग्य स्थान नव्हे.ग्रह कितीही उच्चीचा असला तरी स्थानदोष येतोच.दृष्टी,योग महत्त्वाचे आहेतच,तरीही रोगस्थानी पडलेला शुक्र प्रणयाला हीनता आणतो.विषयलोलुपता,लंपटपणा दर्शवतो.

शुचि's picture

8 Feb 2013 - 7:25 pm | शुचि

मध्यंतरी मी वाचले की पत्रिकेतील कोणताही योग घ्या, त्याला २ बाजू असतात - सकारात्मक व थोडी नकारात्मक. पैकी ६ व्या घरातील शुक्राची काही ऋण बाजू असू शकेल. नव्हे आहेच. मान्य आहे.
पाश्चात्य पद्धतीचे ज्योतिषविषयक लेख वाचताना त्या लोकांचा व्यावहारीक दृष्टीकोन खूप जाण॑वला. एखाद्या स्थानातील ग्रहाची/योगाची/दृष्टीची व्यवहारात काय परिणीती होते ते शिकावयास मिळाले.

पुष्करिणी's picture

8 Feb 2013 - 8:00 am | पुष्करिणी

हायला, जनाबाई आणि माझं हे स्थान सेम टू सेम :),

नगरीनिरंजन's picture

8 Feb 2013 - 8:22 am | नगरीनिरंजन

प्रेयसीची जन्मरास मेष आणि लग्नरास वॄश्चिक असेल आणि तिच्या प्रथमस्थानी रवि-मंगळाची युती असेल तर तिच्या प्रियकराच्या कुंडलीत कोणत्याही स्थानी असलेला शुक्र धावतपळत सहाव्या स्थानात येतो. ;-)

शुचि's picture

8 Feb 2013 - 8:50 am | शुचि

=)) हाहा!!

मन१'s picture

8 Feb 2013 - 10:19 am | मन१

अग्गाग्गाया.......फुटलोय. वारलोय

प्रेयसीची जन्मरास मेष आणि लग्नरास वॄश्चिक असेल आणि तिच्या प्रथमस्थानी रवि-मंगळाची युती असेल

प्रचलित ज्योतिषशास्त्र प्रमाण मानून : त्या बिचार्‍याला रोज आत्महत्या करावीशी वाटत असेल. :D

ऋषिकेश's picture

8 Feb 2013 - 10:27 am | ऋषिकेश

खिक् :)
योग्य त्या परिचित व्यक्तीस दुवा फॉरवर्डला आहे ;)

शुचि's picture

8 Feb 2013 - 6:12 pm | शुचि

गुंडोपंत की काय? मी गुंडोपंतांचे ज्योतिषविषयक लेख खूप मिस करते.

वेताळ's picture

9 Feb 2013 - 7:46 pm | वेताळ

म्हणायचे आहे का?

शुचि's picture

9 Feb 2013 - 7:52 pm | शुचि

धोंडोपंतच. धन्यवाद.

निशांत५'s picture

8 Feb 2013 - 10:38 am | निशांत५

येउच् द्या मग तो दिवस

अमोल केळकर's picture

8 Feb 2013 - 10:58 am | अमोल केळकर

डिसक्लेमर - आवडले

अमोल केळकर
( पत्रिका काढून घेण्यासाठी इथे भेट द्या :) )

अवघड आहे ब्वॉ या कन्येच्या प्रियकराचं =)) अगदी सहमत आहे पिडांकाकांशी.

नक्शत्त्रा's picture

8 Feb 2013 - 11:16 am | नक्शत्त्रा

चर्चा नक्की कोणत्या भाषेत सुरु आहे तेच कळेना झालय.

कवितानागेश's picture

8 Feb 2013 - 11:48 am | कवितानागेश

कन्या प्रभावी स्त्रीचे वर्णन एका ठिकाणी होते, की ती नौकाविहार करत असते, आणि एकीकडे कणसे भाजण्यात मग्न असते! ;)
काहिसे असेvv

अगदी योग्य मुद्दा मांडलास लिमाऊ. हीच ती कर्तव्यपरायणता, दक्षता, व्यग्रता. मला एक कन्या लग्न/कन्या चंद्र बाई माहीते आहेत. त्यांचं घर टापटीप ठेवणं, एकंदर कामाचा उरक इतका लाजवाब आहे. कुटुंबाच्या इतक्या "उपयोगी" त्या पडल्या आहेते; शी इज अ‍ॅन अ‍ॅसेट!!!
अमेझिंग!! कन्या राशीचे गुण खरच अग्नीराशींसारखे भडक (फ्लॅशी) किंवा उठून दिसणारे नसतील पण खूप आहेत, सॉलीड म्हणजे काँक्रीट आहेत, व्यावहारीक आहेत.
कन्या रास रॉक्स (झिंदाबाद) :)

कर्तव्यपरायणता, दक्षता, व्यग्रता. मला एक कन्या लग्न/कन्या चंद्र बाई माहीते आहेत. त्यांचं घर टापटीप ठेवणं, एकंदर कामाचा उरक
पण मी काय म्हणते, हे सगळे प्रकार कोणत्याही राशीच्या बाईला सर्वसाधारणपणे करावेच लागतात ना! आजकाल अनेक बायका (त्यात मीही) म्हणत असतात "अगं काय सांगू, मागल्या अठवड्यात वेळच नाही मिळाला, आता अमूक एक गोष्ट करते, पुन्हा पुढचा अठवडा बिझी." त्या सगळ्या कन्या राशीच्या असतात का? हेच पुरुषांच्या बाबतीतही लागू होईल.
मला टापटिप, स्वच्छता आवडते, मी घर व्यवस्थित ठेवणे याला प्राधान्य देते (असे समज) पण माझी रास कन्या नाही. पत्रिकेत (किंवा जो कागद आहे त्यावर)तर वृषभ ल्हिलीये. आता काय म्हणावे? हे आणि एवढेच नाही तर आतापर्यंत अमूक एका राशीची लक्षणे टाईप जे जे वाचले/ऐकले आहेत त्यात जवळ्जवळ सगळ्यांना अरे, ही आपली रास नसूनही आपण अमूक एक गोष्ट करतो असे आढळून येईल. एखादी गोष्ट आपल्याला आधी आवडत नाही आणि नंतर एकदम आपल्याला साक्षात्कार होतो की, हैला! मला शिवणकाम आवडत नव्हतं, आता फार आवडतं. ही उदाहरणे आहेत. यामुळे माझा भयंकर गोंधळ उडतो.

रेवती मी जे नीरीक्षण केले आहे त्यात - या कन्या बाईंचा उरक, स्वच्छतेची आवड, टापटीपपणा अक्षरक्षः "पर्फेक्शन" ला पोहोचलेला वाटला मला.
तू वृषभ राशीची आहेस मला माहीत आहे. एका लेखात तू लिहीले होतेस हे मला आठवते(विश्वास नसेल तर अजून सांगते तुझा मुलगा सिंहेचा आहे :)) पण कोणास ठाऊक ही वृषभ रास ६ व्या घरात पडलेली असेल. म्हणजे तुझे लग्न ९ = धनु असेल.
किंवा कन्येत स्टॅलिअम (बरेच ग्रह एकत्रित पडणे) असेल. तेव्हा एकंदर कन्येचा प्रभाव बघावा लागेल.
मला नेहमी वाटते - तू ज्या रीतीने पाकृ लिहीतेस, एकदा तू योगा (सूर्यनमस्कार) नेहमी करत असल्याचा उल्लेख केला होतास, तुझ्यावर कन्येचा प्रभाव असू शकतो. कन्या ही आरोग्यविषयक सतर्क, दक्ष व कर्तव्तनिष्ठ रास आहे.

सॉरी चूकीची स्मायली पडली आहे :(

हो. आहे की! सिंह राशीचाच आहे. तुला कसे माहित?
पळा पळा. आणखी गोंधळ! ;)
बाबौ! पत्रिकावाल्यांना बरंच काही कळतं असं वाटायला लागलय.
माझा खरंतर विश्वास नव्हता, अजूनही गोंधळ आहे.
विश्वास आहे असेही म्हणू शकत नाही.
दोन जणांनी आमच्याबद्दल फारशी माहिती नसलेल्यांनी काय काय सांगितलेलेही जणूकाही भूत, भविष्यातले दिसत असावे असे बरोबर सांगितल्याने मला हेरगिरीचा संशय आला होता पण पत्रिका प्रकरणावर विश्वास बसला नव्हता/नाही.
त त प प.
अवांतर: ते चिंतुकाकाही असंच काही ओळखतात वाटतं.

स्वतःची पोस्ट एडिट कशी करता आली तुला?

माझ्याजागी संपादक व्हायचे असल्यास तुलाही करता येईल. ;)
विनोद सोडून दे. नीलकांत स्वसंपादनाची सुविधा देणार आहे वाटते सगळ्यांना.

माझ्याजागी संपादक व्हायचे असल्यास >> LOL! :D केवढी लालूच ती! त्यापेक्षा मी तुलाच सांगेन माझ्या पोस्टी एडिट करायला! कसं? :P

रेवती's picture

9 Feb 2013 - 12:02 am | रेवती

हो. चालेल. :)

प्रकाश घाटपांडे's picture

8 Feb 2013 - 11:55 am | प्रकाश घाटपांडे

काहींचा शुक्र कुठेही असो माणस फुल्ल्टू गंडलेली असतात.

नाना चेंगट's picture

8 Feb 2013 - 12:52 pm | नाना चेंगट

गंमतीशीर

पैसा's picture

8 Feb 2013 - 1:03 pm | पैसा

यातले ग्रह राशी याबद्दल आपल्याला काही म्हणायचे नाही, पण एकूण प्रसंग आहे मजेशीर!

परिकथेतील राजकुमार's picture

8 Feb 2013 - 1:22 pm | परिकथेतील राजकुमार

माझी आणि कामदेवाची कुंडली एकच असल्याने मला तशी काय चिंता नाय.

फक्त शंकर नावाच्या माणसांपासून मी अंमळ लांब राह्तो.

नाना चेंगट's picture

8 Feb 2013 - 1:23 pm | नाना चेंगट

>>>फक्त शंकर नावाच्या माणसांपासून मी अंमळ लांब राह्तो.

हायकोडताने परवानगी दिली आहे, घाबरायची गरज नाही.

इष्टुर फाकडा's picture

11 Feb 2013 - 8:23 pm | इष्टुर फाकडा

नान्बा फारच जोकी बुवा तुम्ही :)

म्हनुन सांगु आम्च्या राशीला कन्याच येत न्ह्याय वो :-( वाट बघुन ष्यान शुक्र पार अस्तंगत व्ह्याया आलाया.
काय तर उपाय सुचवा शुक्राची वात विजायच्या आत

ऋषिकेश's picture

8 Feb 2013 - 2:21 pm | ऋषिकेश

सहा नंबर घरात शिफ्ट व्हा.. कन्या आणि शुक्र दोन्ही मिळतील ;)

अग्निकोल्हा's picture

8 Feb 2013 - 8:10 pm | अग्निकोल्हा

हा सहा नंबरी शिफ्ट व्हायचा ऑप्शन बहुदा लागु पडणार नाही, कारण कन्या आणि शुक्र एकाच देहात आपलं सॉरी घरात त्यांना नक्किच नकोय ;)

दादा कोंडके's picture

8 Feb 2013 - 6:16 pm | दादा कोंडके

काय तर उपाय सुचवा शुक्राची वात विजायच्या आत

फिस्सकन हसलो एकदम. :D

शुचि's picture

8 Feb 2013 - 6:18 pm | शुचि

मी सुद्धा :)

सहाव्या स्थानातील शुक्र म्हणे नोकरीची कधी काळजी वाटू देत नाही. एक नोकरी गेली तर लगेच दुसरी मिळते म्हणे. अजून काय काय करतो सहाव्या स्थानातील शुक्र?

आमच्याही सहाव्या स्थानात शुक्र आहे म्हणून म्हटलं.
जोडीला जन्मरास सिंह, लग्नरास सिंह, द्वितीय स्थानात शनी मंगळाची युती, सप्तम स्थानात रवी असे एकापेक्षा एक योग आमच्या कुंडलीत आहेत. पूर्वी ज्योतिषांना पत्रिका दाखवली की ते माझ्याकडे "शेवटचे काही दिवस राहिलेत बिचार्‍याचे" अशा नजरेने पाहायचे. म्हणून मग तोडकं मोडकं फलज्योतिष शिकून घेतलं. म्हटलं सालं आहे तरी काय एव्हढ भयानक आपल्या कुंडलीत ते पाहूया तरी.

नाही म्हणायला लाभस्थानात असलेल्या राहूचाच काय तो दिलासा आहे मला. लाभस्थानात असलेला राहू शुभ फले देतो म्हणतात. बर्‍या वाईट मार्गाने प्रचंड धनलाभ. एप्रिलमध्ये राहू महादशा सुरु झाली की रोज एक लॉटरीचं तिकीट काढीन म्हणतो. :D

शुचि's picture

8 Feb 2013 - 9:45 pm | शुचि

माझ्या ६ व्या (वृश्चिक) स्थानात बुध, शुक्र , नेपचुन व मंगळ पडले आहेत. ज्योतिषी माझ्याकडेही अशाच नजरेने बघायचे म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे "शेवटचे काही दिवस राहिलेत बिचार्‍याचे" हो :)
या शुक्रामुळे नोकरीची विवंचना नसणे हे अक्षरक्षः १००% खरे आहे. एक जाते न जाते तो दुसरी हजर असते. करीअर चे घर वेगळे बरं का ते १० वे. आता तुम्हाला माहेत असेलच. ६ वे हे नोकर-चाकर, नोकरी, लहान प्रणी, शत्रु, रोग स्थान. कामवाल्या बायाही फार चांगल्या मिळतात (भारतात असतेवेळी) मला.

वा वा लाभस्थानातील राहू चांगला काय? माझ्या जवळच्या एका व्यक्तीचा आहे.

बाकी कन्या व वृश्चिक या २ राशींचे मला फार ममत्व आहे. स्टेलिअम मुळेच असेल.मी असे वाचले आहे की ग्रह म्हणजे ज्योत व तो ज्या राशीत पडतो ती रास म्हणजे कंदील. म्हनजे असं बघा तुमचा शुक्र मंद गुलाबी प्रकाश देतो तो १०=मकर राशीतून. माझा शुक्र हीच प्रभा वृश्चिक राशीतून देतो. अर्थात मकरेच्या अधिपत्याखाली येणारे तुम्हाला रोझी रंगाचे दिसते म्हणजे महत्त्वाकांक्षा, रेप्युटेशन, करीअर वगैरे.

बाकी तुम्ही जाणताच. येथे ओपन अप झाल्याबद्दल आपले खूप धन्यवाद.

शुचि's picture

8 Feb 2013 - 9:51 pm | शुचि

च्यायला!! व्हर्चुअल(आभासी) जगात ओपन अप नाही व्हायचं तर काय वास्तव जगात. जिथे कोणाचा पायपोस कोणाला नसतो ना समविचारी लोक भेटतात. प्रत्येक जण मुखवटा सांभाळण्यात गर्क :D

अग्निकोल्हा's picture

8 Feb 2013 - 10:39 pm | अग्निकोल्हा

च्यायला!! व्हर्चुअल(आभासी) जगात ओपन अप नाही व्हायचं तर काय वास्तव जगात. जिथे कोणाचा पायपोस कोणाला नसतो ना समविचारी लोक भेटतात. प्रत्येक जण मुखवटा सांभाळण्यात गर्क smiley

कधि कधि तुम्हि अनपेक्षितपणे फार मोलाच्या गोष्टि बोलुन जाता.

शुचि's picture

8 Feb 2013 - 10:50 pm | शुचि

बॉर्र :D

राही's picture

9 Feb 2013 - 12:20 am | राही

राहू केतू या दोन ग्रहांस (फलज्योतिषापुरते ग्रहच)६-१२ही स्थाने त्यातल्या त्यात बरी.ते ज्या स्थानी पडतात त्या स्थानाला हानी पोहचवतात.मग राहू रोगस्थानी पडलेला बरा. रोग पळवून लावतो, नोकरवर्गावर वचक ठेवतो. राहू सहामध्ये म्हणजे केतू बारामध्ये आलाच.
कन्याराशीसंदर्भात माझे निरीक्षण असे आहे की या राशीच्या व्यक्ती चंचल,संशयी असतात.यांना सुपरमॅन किंवा वुमन व्हायचे असते म्हणून बरीचशी ओझी अंगावर घेतात पण धड कुठलेच काम पार पाडू शकत नाहीत. बघतात एकीकडे,चालतात दुसरीकडे आणि मनात विचार तिसरेच असतात.छोट्या छोट्या बॅटल्स जिंकतात पण वॉर जिंकणे इनके बसकी बात नहीं.अर्थात हे सरसकटीकरण झाले. स्पेसिफिक केसेस असतातच.
टापटीप आणि सौंदर्यदृष्टी हे खास वृषभवाल्यांचे गुणविशेष.

खरे आहे केतु हा मीनेत उच्चीचा. त्याची अध्यात्मिकता मीनेशी व्यवस्थित रेझोनेट होते.

टापटीप आणि सौंदर्यदृष्टी हे खास वृषभवाल्यांचे गुणविशेष.

असावेत. वाचले आहे असे. शेवटी शुक्राची स्वरास व चंद्राची आवडती रास :) चंद्राची आवडती रास म्हणजे चंद्र आपले सर्वात सुंदर व मौल्यवान वस्त्रप्रावरण परीधान करुन या राशीत येतो. :)

या गोष्टी शिकण्याचे लेसन्स कुठे घेतलेस शुचीतै? (ही चेष्टा नव्हे)

रेवती छंद आहे.... नादच म्हण ना. नेटवर खूप वाचते. लायब्ररीतून पुस्तके आणते, विकत घेते.
१२ वर्षापूर्वी दादरला एका ठीकाणी क्लास लावायला गेले होते पण जमले नाही.

पूर्वी मला खूप वाटायचे की लॉटरी लागावी पण मग अनेक बातम्या वाचल्या - लॉटरीमुळे हर्षवायू, किडनॅपींग, खून :(
बाबौ तेव्हापासून कधीच तिकीट खरेदी केले नाही.
.
.
.
पाहीलत ही ६ व्या घरातील स्टॅलिअमची अनाठायी चिंता ;)

कन्या राशीवाल्यांना कसलेही प्रश्न पडतात म्हणे. "कुणाला कशाचं तर बोडकीला केसांचं" असा एकंदरीत प्रकार असतो. प्रेमाची गोष्ट चित्रपटात एक पावसाचं गाणं आहे ज्याच्यात तो अतुल कुलकर्णी आणि सागरीका घाटगे दर्दभरं गीत गात भिजत असतात. आमचे कन्या राशीय मित्र म्हणे हे लोक पावसात भिजताना मोबाईल कुठे ठेवतात. :)

शुचि's picture

9 Feb 2013 - 12:38 am | शुचि

टू गुड!!! मस्त!! येऊ द्या असे किस्से!

नवर्‍यावर मिथुनेचा बराचसा प्रभाव आहे. एकदा माझी मुलगी लहान असताना बार्बी मागत होती. मी फणकार्‍याने म्हटले - "बार्बी बिर्बी काही नाही आणायची. बार्बी कल्चर नकोय आपल्या घरी."

नवरा खवचटपणे खिदळत आणी मला नखशिखांत न्याहाळत म्हणे "नाही गं आपल्याकडे ते कल्चर नाही. डोंट वरी" :D

मी रागाने लाल!!

धन्या's picture

9 Feb 2013 - 12:52 am | धन्या

मिथून इंटेलेक्च्युअल्सची रास आहे ना?

बाकी थोडंसं मेष आणि वॄश्चिक बद्दल चर्चा करायला हरकत नाही. त्यानंतर शक्य असेल तर सिंह. ;)

कवितानागेश's picture

9 Feb 2013 - 1:10 am | कवितानागेश

मिथून इंटेलेक्च्युअल्सची रास आहे ना?>
होच्च मुळी! :)

रेवती's picture

9 Feb 2013 - 1:57 am | रेवती

ओके माऊताई. ;)

कन्या राशीचे लोक सतत साशंक असतात म्हणे. घरातलेच एक निरीक्षण म्हणजे उठसूठ हात धुवायचेच, पण हात धुताना प्रत्येक वेळी नळसुद्धा धुवून घ्यायचा.

निनाद's picture

9 Feb 2013 - 10:51 am | निनाद

कन्येचे लोक अतिशय पारखी असतात. यांचे व्यक्तींविषयीचे अंदाज कधीच चुकत नाहीत. कन्या रास उत्तम असलेल्या माणसाचा व्यक्तींविषयक सल्ला अवश्य घ्यावा. तत्क्षणी तो योग्य वाटला नाही तरी. प्रत्यक्षात त्यांनी म्हंटलेलेच खरे होते असा अनुभव आहे.
यांचा संशयही अनाठाई असत नाही. त्यांना जेथे धूर दिसतो तेथे नक्की आग असते!

प्रसाद प्रसाद's picture

9 Feb 2013 - 1:08 pm | प्रसाद प्रसाद

मला भेटलेल्या (जवळच्या) तीन कन्या राशीच्या व्यक्ती मात्र अगदी विरुद्ध. नवीन परिचय असताना कोणीही गोड बोलले की लगेच फसतात, मानापमानाच्या कल्पना जरा जास्त तीव्र असतात. स्वभावात बरेच वेळा संशयीपणा पण दिसून येतो. मला भेटलेल्या तीन व्यक्ती पैकी दोघांना बऱ्याच वेळा चेष्टा केलेली कळत नाही लगेच राग रुसवा वगैरे सुरु होतो. पण स्वभावाने कन्या राशीचे लोकं प्रेमळ असतात असा माझा जनरल अनुभव आहे.

रामदास's picture

9 Feb 2013 - 6:43 pm | रामदास

काही वर्षांपूर्वी फलज्योतीषाचा अभ्यास करताना ह. ना.काटवे नावाच्या एका लेखकांची मंगळ विचार -रवि विचार अशी काही छोटी छोटी पुस्तके -पुस्तीका-वाचली होती . आता या नंतर जे काही लिहीतो आहे त्याचा काटव्यांचा काही संबंध नाही. शनीवारच्या निमीत्ताने काही निरीक्षणे आणि विचार ऑल माय ओन वर्क )
शुक्र हवा की नको असा काही पर्याय नसतो. बाकी ग्रह जसे आपोआप येतात तसा तोही असतोच पण बाकी ग्रह जन्मतः छळतात तसा हा लहानपणापासून छळत नाही.साधारणपणे वयाच्या चौदाव्या किंवा पंधराव्या वर्षापर्यंत शुक्राचे अस्तित्व जातकाला जाणवत नाही. त्याचा अंमल निद्रावस्थेत कधीकधी जाणवतो. ह्याला पौगंडवस्थेतला शुक्र असे म्हणतात. कॉलेजच्या शेवटच्या वर्षापर्यंत हळूहळू त्या शुक्राचा चुलबुल पांडे होतो. ह्या अवस्थेला शुक्राचा उदय झाला असे म्हणतात.पण घरातील इतरांचे ग्रह या शुक्रावर नजर ठेवून असतात त्यामुळे त्याला नोकरी लागे पर्यंत स्तंभी याच अवस्थेत रहावे लागते.नोकरी लागल्यावर साधारण वर्ष दोन वर्षात घरातले इतरांचे ग्रह आपल्या शुक्राला सिरीयसली घ्यायचे म्हणतात पण मनावर घेत नाहीत. अशा वेळी जातकाने आपला शुक्र पंचमाच्या पंधरा अंशावर आलेला आहे असे जाणवून द्यावे.( तो पंधरा अंशावर आलेला नसतो पण तसे म्हणावे.) यानंतर शुक्राची दशा सुरु होते आणि विवाहसुखाची सुरुवात होते पण ही दशा जेमतेम वर्ष दिड वर्ष टिकते आणि चंद्राच्या अंतर्दशेत गुरुची प्रत्यंतर दशा सुरु होऊन अपत्यप्राप्ती होते. ह्यानंतर शुक्राला काही काळ वनवास सहन करावा लागतो. अशावेळी शुक्र वक्री मार्गाने जाण्याची शक्यता असल्याने त्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येते. (फार फार वर्षांपूर्वी "अमुक तमुकच्या डिलीव्हरीत धाकटी आली मदतीला आणि झाली सुरु थेरं अशा स्टोर्‍या वारंवार ऐकवण्यात येतात) यानंतर "अटी व शर्ते लागू "या नियमानी शुक्राला वाव देण्यात येतो पण बाळाची कन्या रास असल्यास बाळ झोपल्यासारखे दिसले तरी ते झोपलेले नसते याचा विचार करावा लागतो. (अधीक तपशील जाणून घेण्यास वपुंची बहुत दिन नच भेटलो ही कथा वाचावी.) पुढील काही वर्षात शुक्र फक्त शनीवारीच उगवतो आणि शनीवारीच मावळतो.यानंतर काय सांगावे जातकाच्या पन्नाशीच्या नंतरच्या वयात शुक्राला चोर शुक्र म्हणतात. काही राज्यात या वयात जातकाला कूपन सिस्टीमवर ठेवण्यात येते. ही कूपने जमा करता येत नाहीत आणि एकाच वेळी सगळी कूपने वापरण्याची क्षमता शुक्रात नसते त्यामुळे चोर शुक्राचा हिरमुसलेला शुक्र होतो.
आणखी काय सांगावे शुक्राबद्दल ? साठीच्या नंतर तो शनीसोबत उर्ध्वदिशेनी प्रोस्टेट या ग्रंथीत ठाण मांडतो आणि त्याचे कारकत्व कायमचे संपुष्टात येते.
आता थोडेसे गांभीर्याने : कन्या राशीप्रमाणे चंद्र कुंडली मांडली तर पंचमातील आणि ष्ष्ठातील राशी एकाच ग्रहाच्या मालकीच्या असतात. येथे जातकाचा विचार करताना दोन महत्वाच्या मुद्द्यांचा विचार करावा .
१ शुक्र हा सौंदर्याचा किंवा लैंगीक आयुष्याचा कारक म्हटला जात असला तरी त्याचा बिजगुण आसक्ती हा आहे. शनीच्या घरात या आसक्तीलाकिती वाव मिळेल ?
२ सहावे स्थान हे पंचमाच्या सातत्याचे स्थान आहे.पंचमाची फळे किती सातत्यानी मिळतील असा विचार करताना सहाव्या घरातील शुक्र कितपत कामाला येईल ? शनीचा बिजगुण विरक्ती आहे हे लक्षात घेतल्यावर बाकीचे प्रश्न पडणार नाहीत .
तूर्तास इतकेच

शुक्र ग्रह संबंधित विनोदी ललीत अतिशय आवडले. ६० व्या वर्षानंतर शुक्राचा प्रभाव संपुष्टात येणे त्याआधी कुपन सिस्टीम हे मुद्दे अतोनात "वाईट वाटायला लावणारे" वाटले परंतु त्यांना दिलेली विनोदाची फोडणी फार आवडली.

कन्या रास प्रबळ असलेले लोक = ६ व्या घरात शुक्र असलेले लोक असा काहीसा विचार माझ्या ललीतामध्ये मांडला आहे. मी कन्या लग्न+६ व्या घरात शुक्र असा विचार केला नव्हता.

पुढचे घर हा आधीच्या घराचे सातत्य दर्शवितो (पक्षी आधीचे घर उदाहरणार्थ ५ घ्या ना हा पुढील म्हणजे ६ व्या घराचा पाया असतो) हा विचार आवडला. या संदर्भात फार अचूक व मुद्देसूद पुस्तक वाचल्याचे स्मरते. पण त्याला १५ वर्षे लोटली.
७ वे घर विवाह तर पुढील घर ८ वे हे विवाहाचे विस्तारीकरण अर्थात लैगिक सुख दर्शविते.
१ ले घर व्यक्तीमत्त्व तर २ रे घर व्यक्तीमत्त्वाचेच विस्तारीकरण अर्थात "पझेशन्स्/वित्त" आदि दर्शविते.

अशी बरीच सखोल सांगड त्या पुस्तकात वाचली होती.
या विचारांचा मागोवा घेणारे लेख धांडोळून वाचेन म्हणते.

माझा लेख परत वाचला.

कन्या राशीचे लोक व विशेषतः शुक्र ६ व्या घरात पडलेले लोक हे अतिशय व्यग्र व कर्तव्यपरायण असतात.

या वाक्यावरुन चंद्र रास=कन्या आणि शुक्र ६ व्या घरात असा ग्रह होणे स्वाभाविक आहे.

रामदास यांचा तसा ग्रह झाला याला माझ्या लेखनातील चूकच (मर्यादा) करणीभूत आहे.

पण असा कन्येचा डबल व्यग्रपणा एनीवे शनिच्या घरात पडलेल्या शुक्राने दर्शविला जातोच आहे. तेव्हा वरील सर्व म्युझिंग लेखाशी रेझोनेट होते आहे. : )

या निमित्ताने एक चांगला प्रतिसाद वाचावयास मिळाला.

प्रकाश घाटपांडे's picture

10 Feb 2013 - 3:05 pm | प्रकाश घाटपांडे

काश आज ह ना काटवे जिवंत असते!

दादा कोंडके's picture

9 Feb 2013 - 11:59 pm | दादा कोंडके

एकदा तुझे खूप लाड करायचे आहेत. अगदी मन भरुन, तुझ्या गालांवरुन, कानांवरुन अलगद हाताची बोटे फिरवत, तुझ्याही तनामनाच्या तारा झंकारुन उठाव्यात असे. अन नंतर तुझे पाय चेपून द्यायचे आहेत, तळवे चोळून. आवडेल तुला? आणि हो हे सर्व केव्हा तुला मनसोक्त चांगलं चुंगलं करुन खायला घातल्यानंतर.

बेशुद्ध पडल्यामुळे पुढचं वाचू शकलो नाही. स्वारी.

एस's picture

10 Feb 2013 - 12:14 am | एस

शुचिजी, कन्या आधिक सहाव्यातला शुक्र ह्ये काम्बिनिशन आसलेल्या पुल्लिंगी मनुष्यांचं बी आसंच आसतं काय? थोडा टार्च मारा की ह्या गहन टॉपिकवर...

(अवांतर - मी जगातला सर्वात रोमॅंटिक पुरुष आहे असं माझं ठाम मत आहे, तर माझा आणि रोमान्सचा दूरदूरपर्यंत संबंध नाही असं त्यावर मी सोडून बाकी सगळ्यांचं उत्तर आहे. ह्यामागचं रहस्य आत्ता कळालं.)

हो असंच असावं असं वाटतं. स्त्री काय अन पुरुष काय स्वभावात साम्य असू शकतं की.

मला ज्योति आणि आशा दोन्हींचे वावडे नाही म्हणून विचारतो :

शुक्र हा शब्द नक्की काय दर्शवतो?

ग्रह, आचार्य की जंतु?

तो कशावरनं आला असावा?

शुक्रिया शब्दावरनं आठवलं, शुक्र क्रिया असं काही आहे का?

इथे ग्रह म्हणून वापरला आहे.

पण "दैत्यानाम परमम गुरुम" असा उल्लेख आहे खरा शुक्राच्या मंत्रात. माझा फॉर्मल (विधीवत) अभ्यास नसल्याने थोडा संभ्रम आहेच याबद्दल. एक-दोनदा ही शंका आली होती की शुक्र ग्रह की राक्षस गुरु? ज्युपिटर = गुरु हे देवांचे गुरु की ग्रह? कारण गुरुच्या मंत्रात देवानाम च ऋषीनाम च गुरुं असा उल्लेख आहे.

संजय क्षीरसागर's picture

10 Feb 2013 - 7:36 am | संजय क्षीरसागर

काय आहे मंत्र?

हिमकुन्दमृणालाभम दैत्यानाम परमम गुरुम
सर्वशास्त्रप्रवक्तारम भार्गवम प्रणमाम्यहम

विजुभाऊ's picture

10 Feb 2013 - 6:45 pm | विजुभाऊ

मस्त लिहिलय.
शंका: वृषभ रास ही शुक्राची रास समजली जाते.
सर्व वृशभ व्यक्ती कायम शुक्राच्या प्रभावाखालीच असतात का?

शक्यता नाकारता येत नाही.

चावटमेला's picture

10 Feb 2013 - 6:49 pm | चावटमेला

माझा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास नाही, पण जे थोडेफार पौराणिक कथांचे वाचन केले आहे, त्या आधारे कुतूहल म्हणून शंका विचारतो. बृहस्पती हा देवांचा गुरु आणि शुक्र हा राक्षसांचा, हे दोघे एकमेकांचे कट्टर शत्रू, बुध हा चंद्राचा अनौरस पुत्र, तर रवि आणि शनि ह्या बाप्-लेकांमध्ये आडवा विस्तव जात नाही, मग माझ्या अंदाजाने गुरु-शुक्र, बुध्-चंद्र, रवि-शनि, अशा युती त्या त्या स्थानाची वाट लावत असतील ना?
(लॉजिकल थिंकर ;)) चावटमेला

शक्य आहे. अशा टाइपचं काहीतरी वाचलेलं अंधुक आठवतय.

वाचतो आहे.
माझा हया लोकांचा अनुभव थोडक्यात असा -
१. हे लोक वेळेला अती महत्व देतात . पॅरॅनोइड म्हणावे इतके.
२. कोणतेही नवे काम करताना घडयाळ पाहून किती वेळ - अंतर - पैसे लागले ह्याचा ठाव अचूक घेतात - तो हिशोब डोक्यात इतका पक्का बसतो की पुढच्या वेळेस त्यांचे "वेळ - अंतर - पैसे" कसे वाचवायचे याचे आडाखे सुरु होतात.
३. सतत नाविन्याचा शोध घेतात - पण हे अगदी बेसिक नाविन्य असते. इन्क्रिमेंटल इनोव्हेशन एवढेच, भव्य दिव्य काही करणार नाहित.
४.ह्यांच्या साठी घडयाळ - वासरी - दिनदर्शिका - पैसे ( थोडक्यात रिसोर्सेस )= अन्न / वस्त्र / निवारा .

पण हे अगदी बेसिक नाविन्य असते. इन्क्रिमेंटल इनोव्हेशन एवढेच, भव्य दिव्य काही करणार नाहित.
४.ह्यांच्या साठी घडयाळ - वासरी - दिनदर्शिका - पैसे ( थोडक्यात रिसोर्सेस )= अन्न / वस्त्र / निवारा .

अतिशय लहान गोष्टींत आनंद सामावलेला अस्तो व लहान सहान गोष्तीत आनंद शोधण्याची वृत्ती. हे खरे आहे.