द टायटन

तुषार काळभोर's picture
तुषार काळभोर in जनातलं, मनातलं
19 Aug 2012 - 11:35 pm

* १. मला फुटबॉलमधलं काही कळत नाही.
* २. त्यावेळी पेप्रात वैग्रे जे वाचलं होतं, त्यावरून आणि आता नेटावरनं थोडंफार माहिती करून घेऊन लिहितोय.

मागील १० वर्षे हा फोटो मनावर कोरला गेलाय...

फुटबॉल वर्ल्डकपः२००२- अंतिम सामना - ३० जून २००२
जर्मनी वि ब्राझील
जर्मनी : जगातील सर्वोत्तम बचाव असलेला संघ (आणि जगातील सर्वोत्तम गोलकीपर व संघाचा कर्णधार-ऑलिवर कान)
ब्राझील : जगातील सर्वोत्तम आक्रमण असलेला संघ (३ R: रोनाल्डो, रिवाल्डो आणि रोनाल्डिनो) (उदा. द्रविड, लक्ष्मण, सचिन आणि गांगुलीची मधली फळी किंवा भागवत-चंद्रशेखर-प्रसन्ना-वेंकटराघवनची फिरकी चौकडी)

खरंतर या ३ रो-रि-रो मुळे ब्राझील हॉट फेवरिट होते. त्यामानाने जर्मनीकडून कुणाला फार अपेक्षा नव्हत्या. पात्रता फेरीत अपयशी ठरून पहिल्यांदाच जर्मनीला वर्ल्डकप प्रवेशासाठी झुंजावं लागलं होतं. अर्जेंटिना, इटली व गतविजेता फ्रान्स यांच्यापैकी एक फायनलचा दुसरा प्रतिस्पर्धी असेल, अशी अटकळ होती. पण, भरभक्कम बचावाच्या जोरावर-अंतिम सामन्यापूर्वी फक्त १ गोल स्वीकारत- जर्मनीने अंतिम सामन्यात धडक मारली.

जर्मनीचा आघाडीचा स्ट्रायकर- बलाक (Michael Ballack) ला उपांत्य सामन्यातील येलो कार्डची शिक्षा म्हणून फायनल खेळता येणार नव्हती. अर्धी लढाई जर्मनीने तिथेच गमावली. शिवाय अभेद्य मानला जाणारा ऑलिवर कानसुद्धा १०० % फिट नव्हता. त्याच्या उजव्या हाताच्या अनामिकेचे स्नायू दुखावले गेले होते.
ग्रुपस्टेज व बादफेर्‍यांमध्ये कान ने केवळ १ गोल स्वीकारला होता. ६७व्या मिनिटापर्यंत ऑलिवर अभेद्य होता. पण ६७व्या मिनिटाला त्याच्या हातून चूक घडली. रिवाल्डोने गोलच्या दिशेने मारलेला एक फटका ऑलिवरने अडवला, पण त्याला बॉल पकडून ठेवता आला नाही. बॉल त्याच्या हातातून निसटला आणि गेला....रोनाल्डोच्या पायापाशी!!! पहिला गोल.
सामन्याच्या ६७व्या मिनिटाला केवळ ब्राझीलच्या सुदैवाने गोल आणि बाराच मिनिटांनी रोनाल्डोने आणखी एक गोल केला- हा गोल मात्र १००% रोनाल्डोचा होता.
अंतिम सामन्यात ऑलिवर कान वर २ गोल स्वीकारण्याची वेळ आली. जर्मनी हरला होता. शिट्टी वाजताच ब्राझीलच्या खेळाडूंनी जल्लोष चालू केला आणि ऑलिवर जागेवरच मटकन खाली बसला.
सर्वाधिक गोलः गोल्डन बूट - रोनाल्डो
२र्‍या क्रमांकाचे गोलः सिल्वर बूट -मिरोस्लाव क्लोज-जर्मनी (५गोल-सौदी अरेबिया विरुद्ध हॅटट्रिक- सर्व पाच गोल हेडरने )
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू: गोल्डन बॉल - द टायटन-ऑलिवर कान

गोलपोस्टला हताशपणे टेकून बसलेला टायटन आज १० वर्षांनीही लोकांच्या मनातून गेलेला नाही.

क्रीडाप्रकटन

प्रतिक्रिया

मी-सौरभ's picture

19 Aug 2012 - 11:38 pm | मी-सौरभ

कान हा माझ्या अत्यंत आवडत्या फुटबॉल पटूंपै़की एक आहे :)

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Aug 2012 - 11:39 pm | बिपिन कार्यकर्ते

क्लास!

तुषार काळभोर's picture

19 Aug 2012 - 11:40 pm | तुषार काळभोर

स्पर्धेच्या इतिहासात केवळ एकाच गोल कीपरला गोल्डन बॉल सन्मान मिळालाय.

मस्तच, पण हात फार लवकर आखडता घेतलात.
अजुन लिहा की.

तुषार काळभोर's picture

20 Aug 2012 - 6:03 am | तुषार काळभोर

कळत नसलेल्या गोष्टीवर लिहिलंय. उगाच कशाला लांबण लावायचं!!

अत्रुप्त आत्मा's picture

20 Aug 2012 - 8:21 am | अत्रुप्त आत्मा

येक नंबर हो... ! :-)

मन१'s picture

20 Aug 2012 - 8:26 am | मन१

If anyone can then Oliver Kahn असं काहीतरी म्हणायचे पठ्ठ्याबद्दल.
ब्राझीलच्या R मध्ये रॉबर्टो कार्लोस ह्या दिग्गजाचही नाव येतं.
फुटबॉलातलं मलाही कै ठाउक नै.

(अवांतर)

कार्लोस हे नाव का येतं त्यासाठी हा व्हिडीओ....

फुटबॉल च्या जगात जर्मनी हा तसा सर्वोत्तम बचाव असलेला संघ मानला जात नाही. आपल्यावर किती गोल होत आहेत याची चिंता न करता धडाधड गोल टाकणारा म्हणून ओळखला जातो. परंतु २००२ च्या स्पर्धेत ऑलिवर कान ने मात्र जर्मनीचा बचावही किती बळकट आहे हे दाखवून दिले.

टीप : इटली चा बचाव सर्वोत्तम मानला जातो.

सानिकास्वप्निल's picture

20 Aug 2012 - 4:04 pm | सानिकास्वप्निल

मस्तच !!

स्पा's picture

20 Aug 2012 - 4:27 pm | स्पा

आवडल.
पण त्रोटक वाटलं

तुषार काळभोर's picture

20 Aug 2012 - 10:07 pm | तुषार काळभोर

मला मुळातच फुटबॉल मधलं काही कळत नाही. केवळ हा एक प्रसंग मनावर कोरला गेलाय, त्याच्याविषयी मनातलं उतरवलं, झालं.

छोटा डॉन's picture

20 Aug 2012 - 10:39 pm | छोटा डॉन

>>केवळ हा एक प्रसंग मनावर कोरला गेलाय, त्याच्याविषयी मनातलं उतरवलं, झालं.
:)
छान केलं तुम्ही असे म्हणेन.
ऑलिव्हर कान्हचे बॅडलक असेकी नेमके त्या वेळेस ब्राझिल फायनलला आले, ब्राझिलचे ४-स्टार 'आर' टिममध्ये असताना आणि त्यांनी संपुर्ण स्पर्धा गाजवली असता हा कप त्यांना मिळाला नसता तर तो त्यांच्यवर अन्याय झाला असता.
त्या दिवशी मॅच संपल्यावर गोलपोस्टपाशी सुन्न होऊन बसलेला कान्ह आजही सगळ्यांच्या लक्षात आहे पण त्या वेळेस सगळ्यांचा ( अलमोस्ट बरं का,गणपा आणि मेव्या आदींनी पर्सनली घ्यायचे कारण नाही, धन्यवाद) सपोर्ट हा ब्राझिललाच होता. बाकी आठवण एकंदरीत छान, आवडली.

- छोटा डॉन

बॅटमॅन's picture

22 Aug 2012 - 7:31 pm | बॅटमॅन

हे मात्र खरं. कान भारी पण सपोर्ट मात्र ब्राझिललाच!!!

जाई.'s picture

20 Aug 2012 - 9:02 pm | जाई.

लिखाण आवडलं

पैसा's picture

20 Aug 2012 - 11:24 pm | पैसा

लिखाण आवडलं.